केतकरी चरफ़डाट आणि आणीबाणी

आजचा लोकसत्तचा अग्रलेख(खरंतर मला वाटलेला केतकरी चरफ़डाट) वाचलात का? इथे वाचा
त्यात अत्यंत आक्षेपार्ह विधाने आहेत ते थोड्या पार्श्वभुमी सकट देतोः (पुर्ण अग्रलेख वाचाच)

वास्तविक 'आणीबाणी' या शब्दाखेरीज दोन्ही ठिकाणच्या परिस्थितीत काही साम्य नाही. इंदिरा गांधी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या होत्या, तर त्यांना सत्तेवरून अवैधमार्गांनी हुसकवून लावायचा चंग जयप्रकाश नारायण प्रभृतिंनी बांधला होता. त्यासाठी लष्कराला पाचारण करायचे आवाहनही त्यांनी जाहिर सभेतून केले होते. इंदिरा गांधी यांच्या सत्तेला न्यायालयांनी थेट आव्हान दिलेले नव्हते. त्या पंतप्रधानपदी राहू शकतात असे तेव्हाचे न्यायमुर्ती व्ही.आर.कृष्ण अय्यर यांच्या निकालाने स्पष्ट केले होते. याउलट अलाहाबादच्या उच्च न्यायालयाचा जो मुळ निकाल होता तो मात्र मोठ्या कटाचा भाग होता असे बॅ. गाडगीळ यांच्यासह अन्य काही कायदे पंडितांचे मत होते. अलाहाबाद न्यायलयानेही त्यांच्या पंतप्रधानपदाला आव्हान दिलेले नव्हते. मुद्दा हा की इंदिरा गांधी यांनी १९७७ च्या जानेवारी सार्वत्रिक निवडणुका जाहिर केल्या. तसे करण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता. त्यावेळच्या घटनेतील तरतुदीनुसार आणखी किमान एक वर्ष तीच लोकसभा कार्यरत राहू शकली असती त्यामुळे अर्थातच पाकिस्तानातील आणिबाणी आणि इंदिरा गांधी यांनी विरोधकांच्या आपमतलबी देशविघातक चाळ्यांना आवर घातला जावा म्हणून लागू केलेली १९७५ची आणिबाणी यात काडीमात्र साम्य नाही

प्रश्नः
१) इंदिरा गांधीनी या कारणासाठी आणीबाणी लादली होती असं अग्रलेखातून मांडणे किती योग्य आहे? अशी संपादकाची वैयक्तिक मते अग्रलेखात मांडली जावीत का?

२) आणीबाणीची खरी कारणे यावर निष्पक्ष इतिहास काय सांगतो?

३) पाकिस्तनची आणिबाणी आणि आपली यात परिस्थितीजन्य फरक सोडल्यास आणीबाणी लादण्याच्या मानसिकतेत/प्रवृत्तीत फ़रक आहे का?

लेखनविषय: दुवे:

Comments

"कुमार् सोनिया केतकर"

असे त्यांचे पूर्ण नाव आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकिट मिळणार अशी हवा होती. शहाण्यास अधिक काही सांगणे नलगे.

मुक्तसुनीत

दै. लोकसत्ताच्या तोडीचे दुसरे वृत्तपत्र मराठीत नाही. कुमार केतकर जे पण लिहीतात ते अभ्यासपुर्ण असते व आपणास विचार करायला लावणारे असते. त्यामुळे इतक्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही केतकरांवर टिका करायला नको होती.
आपला
कॉ.विकि

खालची पातळी

त्यामुळे इतक्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही केतकरांवर टिका करायला नको होती.
-- स्वत। केतकरांनी यापेक्षा कितीतरी खालची पातळी कितीतरी वेळा गाठलेली आहे. तेव्हा लांडग्याशी लबाडी का करताय हे विचारणे मला तरी पटत नाही.

तोडीचे??
--म्हणजे डावे सोडून सर्वांच्या नावे बोटे मोडण्याबद्दल म्हणत आहात काय? तसे असेल तर सामना आहे ना तोडीचा. सामन्यात शिवसेना सोडून सगळ्यांच्या नावे शिव्यांच्या लाखोल्या असतात. आणि जर वृत्तपत्राच्या दर्जाविषयी म्हणत असाल तर तुम्हाला शुभेच्छा!

आपला,
(तटस्थ) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

खरच खालची पातळीवरील टिका

मी दै. लोकसत्ताचा नियमित वाचक आहे मला असे वाटाते की जे धर्मनिरपेक्ष आहेत त्यांच्या बाजूने कुमार केतकर आहेत. केतकर डाव्यांवर पण घसरतात आपण अणुकरारावरील त्यांचे लेख वाचले नाहीत वाटत. केतकर विचारवंत आहेत. त्यांचे अग्रलेख विचार करण्यास लावणारे असतात.
आणि केतकरांनी किती कुठे खालची पातळी गाठली आहे ते तुम्ही सांगावे. सामना विषयी बोलत असाल तर ते कट्टर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते वृत्तपत्र आहे. त्यापे़क्षा दै. नवशक्ती (फक्त रविवार)उत्तम .
आपला
कॉ.विकि

सोनिया

धर्मनिर.... (बघा, मला हा कठीण शब्द धडपणे लिहीतासुद्धा येत नाही!) आहे काय?

या प्रतिसादाखाली येणारे व्यक्तिगत रोखाचे काही प्रतिसाद संपादित केले आहेत. व्यक्तिगत वादविवादांसाठी सदस्यांनी खरडवही किंवा व्य. नि.चा उपयोग करावा. - संपादन मंडळ.

तसे नाही !

कुमार केतकर आणि सोनियाजी यांचे विचार आणि कृती म्हणजे धर्मनिरपेक्षता असे म्हणा किंवा माना प्रदीपराव, म्हणजे भांडण होणार नाही !

प्रदीप राव

आपणास काय म्हणायचे आहे सोनिया गांधी या जातियवादी आहेत ?
आपला
कॉ.विकि

नि:संशय

आहेत त्या जातीयवादी. कारण कॉंग्रेस पक्ष हा सर्वात छुपा जातीयवादी पक्ष आहे.

नाही

सोनिया गांधी जातियवादी असतील असे वाटत नाही. त्यांची आतापर्यंतची कोणतीच कृती जातीयवादी वाटली नाही. त्यांच्या आजूबाजूचा गोतावळा एकवेळ असू शकतो.
एक व्यक्तिगत प्रश्न - आपण भाजपा समर्थक आहात का?
आपला
कॉ.विकि

आक्षेपार्ह

"विरोधकांच्या आपमतलबी देशविघातक चाळ्यांना आवर घातला जावा म्हणून " हे कुमार केतकरांचे ७५ च्या आणीबाणीचे कारण मला तरी गैर वाटले. त्यामुळे आपले " मला तरी सुमार केतकरांचा ह्या अग्रलेखात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही." हे मत आश्चर्यकारक वाटले. आपण आणीबाणीचे समर्थन करीत नसाल याची कल्पना आहे, पण तरी मग हे कसे काय?

मेधा पाटकर आणि संदीप पांडे यांच्या अशाच एका जन आंदोलनाची घोषणा इथे वाचा - संपूर्ण क्रांती -मल्टिनॅशनल कंपन्यांच्या विरूद्ध. आता केतकर त्यांनाही नावे ठेवणार का? का जर मनमोहन सिंग आता ही कसली यांनी आणीबाणी जाहीर केली- असल्या (एक प्रकारच्या) विरोधकांना कंटाळून - तर त्याचे समर्थन करणार?

७५ च्या आणीबाणीबद्दल अधिक माहिती

असमर्थनीय

इंदिराजींची निवडणूक उच्च न्यायालयाने अवैध ठरवली होती. त्यांच्या पंतप्रधान असण्याविषयी कोर्टाने कुठलीही टिप्पणी केली नव्हती.

त्यांचे लोकसभेत मत देण्याचे हक्क मात्र रद्द् करण्यात आले होते. बाकी राज्यघटनेप्रमाणे कोणीही पंतप्रधान/मंत्री वगैरे न निवडता होवू शकतो पण त्याला/तीला सहा महीन्यात निवडून येणे भाग असते. ती मुभा कोर्टाने इंदीराजींना दिली होती. पण "इफेक्टीव्हली" त्यांची निवडणूक मात्र रदबातलच केली होती. मी आधी वाचल्याप्रमाणे (इंटरनेट संदर्भ मिळू शकला नाही) त्या न्यायाधिशाचे ट्रकखाली अपघाती निधन झाले (कोणास संदर्भ मिळाल्यास/माहीती असल्यास कळवा)

तरी त्यांनी पंतप्रधानपदावरून राजीनामा द्यावा ह्यासाठी विविध संपांना (रेल्वे, गिरणी कामगार) सक्रिय पाठिंबा देऊन देशात अराजक निर्माण करणे, हे कुणाच्या मतलबाचे होते ?

संपाचे अराजक हे आधी पण झाले होते आणि नंतर पण झाले होते. आणिबाणी फक्त एकदाच झाली होती. त्यासाठी राज्यघटनाच स्थगीत करणे आणि सरसकट कोणालाही तुरूंगात डांबणे हे कुठल्याच लोकशाहीच्या तत्वात न बसणारे आणि म्हणून असमर्थनीय आहे...

मला वाटते: बांग्लादेशच्या युद्धानंतर इंदिराजींना "एकोहं द्वितीयोनास्ती न भूतो न भविष्यती" अशी गर्विष्ठ भावना झाली होती. त्यामुळे आपण काही करू शकू या घमेंडीत त्यांचे आणि त्यांच्या पुत्राचे वर्तन झाले.

विषयांतरः बाकी वर्षदीड वर्षापूर्वी अचानक "आणिबाणी के तीन दलाल" मधील एका दलालाच्या नातवाची भेट झाली. माजरटपणा चेहेर्‍यावर दिसत होताच. आपण कसे हिंदूंचे तारणहार आहोत असे आणि भाजप कसे नाही हे मला सांगायला लागला... म्हणले मला काही फरक पडत नाही, तो तुझा आणि त्यांचा प्रश्न मला कशाला "घमेंडीत" सांगतोयस? माझे कसे गांधी घराण्याशी संबंध आहेत आणि मी कसा डून स्कूल मधे शिकलोय हे सांगत होता...पण गंमत म्हणजे हाच मुलगा स्वतःचे आडनाव लाजेखातर हळूच बोलत होता. शेवटी खोदून विचारल्यावर कोणाचा नातू ते सांगीतले. आणि अर्थातच न्यूयॉर्कमधे धंदा शोधत हिंडत होता....

आणिबाणीके तीन दलाल

आणिबाणीके तीन दलाल इंदीरा, संजय, बन्सीलाल अशी ती घोषणा होती. (काँग्रेसच्या अधिकृत संकेतस्थळावर पहा). आणि माझ्या लिहीण्यात एक चूक झाली. "आणिबाणीके तीन दलालांपैकी " नाही तर "चांडाळ चौकडी" पैकी एकाच्या नातवास भेटलो होतो. (चांडाळ चौकडी म्हणजे संजय, धवन, बन्सीलाल आणि चौथा व्हि.सी. शुक्ला).

जनता पक्षाचे सरकार पाडण्यात आणि जेपींचा मोरू करण्यात महत्वाची भूमिका जनसंघाची होती. वाजपेयींनी जनसंघ मोडीत काढून भाजपाची स्थापना केली, ती उगीच नाही.

जेपींचा मोरू जनसंघाने नाही तर त्यांच्याच समर्थकांनी केला - चंद्रशेखर, व्हि.पी. सिंग, सुब्रम्हण्यम् स्वामी इत्यादी "मोरू" करण्यास पुरेसे होते! बाकी झाली ती सत्तेसाठी भांडणे... जेंव्हा त्यांच्या लक्षात आले की जनता पार्टीत पुर्वाश्रमीच्या जनसंघातील सदस्य सभासद म्हणून जास्त आहेत त्यामुळे कुठल्याही पक्षांतर्गत मतदानाच्या वेळेस त्यांचे म्हणणे वरचढ ठरेल त्यावेळेस मोडतोड झाली. मग बाजपेयी वगैरेंनी जनता पार्टीतून काडीमोड घेऊन भाजप स्थापला, जनसंघ मोडीत काढून नाही...

सबंध?

या प्रतिक्रीया आपण आणिबाणीचे जे काही थोडेफार समर्थन केले त्या संदर्भात झाल्या. त्या वेळी जे काही त्या वेळच्या सत्तेच्या दलालांनी केले त्याला इंदिरा गांधींचा वरदहस्त होता. मग त्यात तरूणांच्या सक्तीची नसबंदी करण्यापासून ते मिसा खाली कुणालाही अटकेत टाकणे आणि अनन्वित अत्याचार करणे हे चालू होते.

पुढे भाजपने "strange bedfellowship" कुणाबरोबर केली याचा येथे काही संबंध नाही आणि असे म्हणताना भाजपचे त्यात समर्थन अथवा त्यांच्या बाजूने प्रतिवादही नाही. त्यामुळे थोडक्यात हे सारे असंबंद्ध होत आहे असे वाटले.

चीन आणि बांगलादेश

या आधीही चीन आणि बांगलादेश युद्धाच्या वेळी आणिबाणी लागू झाली होती.

ती आणिबाणि बाह्य व्यवहारांपुरती मर्यादीत होती आंतर्गत व्यवहारांशी आणि आम जनतेशी त्याचा संबंध नव्हता. तशी घटनात्मक तरतूद आहे आणि ती संयामाने वापरली गेली होती. न्यायलायात हरल्यानंतर स्वतःचे स्थान टिकवायला आंतर्गत आणिबाणी जाहीर करण्याशिवाय पर्यायच नव्हता.

भाजप अथवा इतर अजून कोणी त्यातील कुणाशी नंतर राजकीय व्यवहार केला त्यावर आणिबाणिचे निर्दोषत्व ठरत नाही. आपण म्हणता तशा नसबंधीच्या अथवा इतर घटना तुरळक होत्य आणि त्या ब्लोअप केल्याचे मी तरी कधी वाचले नव्हते. काही दुवा असल्यास कळवा, मी ही शोधीन... जेपींना जो काही त्रास दिला गेला, जॉर्ज फर्नांडीस आणि त्यांच्या भावाला आणि तसाच इतर अनेकांना जो काही त्रास दिला गेला तो काही क्षम्य नाही. आणि हो आपल्या लाडक्या पुलंना ह्याच काळात विदूषक म्हणले गेले आणि त्यांनी पण अपवादात्मक परीस्थिती ओळखून आणिबाणी विरूद्ध (मला वाटते दुर्गा भागवतांबरोबर) रणशिंग फुंकले होते.

ह्याच्या उलट पाकिस्तानात झाले. तिथल्या आणिबाणींत लोकांच्या जीवनमानात आजवर सुधारच झालेला आहे. त्यामुळे त्यांना आणिबाणी, मिलिटरी रूल, हेच आवडत आले आहे.

जीवनमानात सुधारणा? आपल्याला जाऊन रहायला आवडेल का? अगदी व्हेकेशनींगसाठी (अलास्का ऐवजी कराची?) तुम्हाला उद्या कॅलीफोर्नीयात असे राहायला आवडेल का? काय राव, आपण अमेरीकेत मुक्त जीवनपद्धतीची फळे चाखणार आणि इतरांना मात्र म्हणणार आणिबाणी योग्य होती.. तुमच्या मॅडम हिलरींना विचारा, काय वाटते त्यांना ते...

अरेच्या

>> पण त्याची कारणे देखील सांगा ?
अरेच्या! ही कारणे मला माहीत नव्हती. धन्यवाद! मी केवळ निवडणूक रद्द ठरवली इतकंच ऐकत आलो आहे.
पण तरीही आणीबाणी समर्थनीय होत नाहीच.. होय ना? आणि त्याला जबाबदार श्रीमती गांधीच कारण 'सो कॉल्ड' देशविघातक कारवाया रोखण्यासाठी त्यांचा राजीनामाही पुरला असता.. त्याऐवजी पद जाणार म्हणून आणीबाणी घोषित करणे ही मनोवृत्ती आणि मुशर्रफ यांची मनोवृत्ती यात फारसा फरक दिसत नाही. (मी मनोवृत्ती म्हणतो आहे व्यक्ती नव्हे)

इंदिरा गांधींच्या विरोधात म्हणून देशविघातक ?!?

>> इंदिराजींची निवडणूक उच्च न्यायालयाने अवैध ठरवली होती
हेच सत्य आहे.. जर निवडच चुकीची तर त्यावर आधारीत पद उपभोगणं कितपत योग्य होतं? हे मतलबी नाही काय?

>> नंतरच्या काही वर्षांत न्यायालयाने अशा सेवांतील संपांना बेकायदेशीर ठरवले आहे.
नंतरच्या !!!!

>> आणि ते देशविघातकही होतेच.
भारतासारख्या लोकशाही देशात जर बहुसंख्य लोक एखाद्या गोष्टीच्या विरोधात आहेत तर केवळ एक व्यक्ती स्वतःला देशहित समजते असं म्हणू शकत नाही. त्यावेळच्या परिस्थितिनुसार हे संप देशविघातक कसे म्हणता येतील? ते केवळ इंदिरा गांधींच्या विरोधात म्हणून देशविघातक ?!?

सहमत

प्रवृत्ती तीच. परिस्थिती थोडीफार वेगळी. "प्रशासकीय अनुमती" ची प्रशासकाला वाटणारी गरज, हेच आणिबाणीचे कारण.

इतरांपेक्षा "वेगळेपण" असलेल्यांना इतरांपेक्षा वेगळा "अधिकार" पण हवा आहे असं वाटण स्वाभाविक आहे.
प्रकाश घाटपांडे

केतकरांचे भाकित

http://mr.upakram.org/node/549#comment-8131 इथे आम्ही केतकरांचे भाकित वर्तवले होते ते आठवते का? विनोबांनी आणीबाणीला "अनुशासन पर्व" असे नाव दिले होते हे आठवते का?
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

प्रकाश घाटपांडे

गांधी

गांधीवादी निर्मला देशपांडे

आजकाल लोक सोनिया गांधी वादी आहेत. केतकराण्णा नाहीत काय? तशा निर्मला देशपांडे इंदिरा गांधीवादी तर नव्हत्या?

आणीबाणी वर निरपेक्ष मत देणारं कोणतं पुस्तक आहे काय?

अभिजित...

निरपेक्ष की निष्पक्ष?

कोणत्याही गोष्टीवर कोणाचे मत विचारले तर ते निष्पक्ष असत नाही. सर्व गोष्टी रिलेटिवच असतात. ऍब्सोल्युट गोष्ट कोणतीच असत नाही. प्रत्येक ठिकाणी पॉइंट ऑफ रेफरन्स महत्त्वाचा.

काय?


आम्हाला येथे भेट द्या.

सहमत

अजानुकर्णाशी सहमत. 'धर्मनिरपेक्ष 'व 'सर्वधर्मसमभाव" हा शब्दोत्सव अनेक विद्वांनांचा आनंदोत्सव असतो.(शब्दोच्छल हा शब्द वापरला तर निगेटीव्ह विचारश्रेणी वाटते ना)
प्रकाश घाटपांडे

निष्पक्ष

तेच ते हो...काय शब्दकीस पाडत असता राव. पुस्तकाचं काय?

अभिजित...

मुशारफवादी निर्मला जी

गांधीवादाच्या नावाखाली (गांधीजी स्वतः पण असे वागले असते का याची त्यांच्या काही "ऍक्शन्स" पटल्या नाहीत तरी वाटते) निर्मलाजी मुशारफच्या आणि त्याच्या बायकोबरोबर पाकीस्तानात (फोटोत) पाहील्याचे आठवते. मला वाटते त्या रालोआच्या काळात त्या शांतीसाठी "जगाला प्रेम अर्पावे" करायला गेल्या होत्या. त्यावेळेस आपल्या देशात रालोआचे अर्थात भाजपचे सरकार असल्याने त्यांना लोकशाहीची काळजी वाटत होती. पण आता मानवी हक्काचे संरक्षण करणार्‍या निर्मला,काही मुशारफ बद्दल बोलतात का, हा एक संशोधनात्मक विषय आहे.

दोन चुका

दोन चुका = एक बरोबर असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

आणि हो विसरू नका की वर दाखवलेल्या दोनही भारतीय नेत्यांनी याच पाकीस्तानी नेतृत्वास धोरणात्मक (राजकारण म्हणून) जगा समोर शांतीची संधी दिली त्याला काय प्रसार माध्यमांकडून लाड करून घ्यायचे होते ते करून दिले आणि नंतर "श्रीफळ" हातात ठेवून घालवून दिले. त्या रात्री मुशारफचा चेहेरा गोरामोरा होऊन मेडीयाच्या नजरेला नजर न मिळवता ते आग्रा ते दिल्ली आणि बॅक टू पॅव्हेलियन गेले. थोडक्यात एक नेतृत्व म्हणून करायच्या गोष्टी आणि मानवी हक्कांसाठी लढा असे म्हणणार्‍या निर्मलाजी अथवा (नक्षलवाद्यांचे कौतूक करणारा) संजय पांडे यांनी मुशारफ बरोबर जाणे आणि आता मूग गिळून गप्प बसणे यात समाजवाद - हिंदूत्ववाद (जमीन-अस्माना) इतका फरक आहे इतकेच मला म्हणायचे होते. यात मी कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू घेत नव्हतो कारण मला तशी बाजू नाही.

आणीबाणी व एक्सप्रेस समूह

केतकर कदाचित विसरले आहेत की, आणीबाणीला विरोध करण्यात एक्सप्रेस समूह व विशेषतः संस्थापक रामनाथजी गोयंका आघाडीवर होते. दि. २८ जून १९७५ च्या इंडियन एक्सप्रेस मधील अग्रलेखाचा रकाना कोरा ठेऊन त्यांनी आणीबाणी चा निषेध केला होता.

जयेश

अनुशासनपर्व

विनोबा कुठल्यातरी कारणाने, बहुतेक जयप्रकाशांवर रागावल्याने, मौनव्रतात होते. त्यांनी पाटीवर 'अनुशानपर्व ' लिहून पुढे प्रश्नचिन्ह काढले होते असे आता म्हणायला लागले आहेत. खरे खोटे माहीत नाही. अर्धशिक्षित इंदिरा गांधींना महाभारतातील अनुशासनपर्व हा शब्द माहीत असायची सुतराम शक्यता नव्हती. असे म्हणतात की वसंतराव साठे बरोबर होते. त्यांनी त्याचा अर्थ विनोबांचा आणीबाणीला पाठिंबा आहे असे इंदिरा गांधींना सांगितले आणि प्रश्नचिन्ह गिळून याचा गाजावाजा केला.
आचार्य अत्रे विनोबांचे परमभक्त. सदैव विनोबावर चांगले लिहिणारे आणि स्तुतिसुमने उधळणारे. विनोबांनी आणीबाणीची भलावण केल्याचे समजताच त्यांनी आचार्य विनोबांवर आगपाखड करणार्‍या अग्रलेखांचा भडिमार केला. पहिल्या अग्रलेखकाचे शीर्षक होते..विनोबा की वानरोबा?
विनोबांनी त्यानंतर मरेपर्यंत मराठी वर्तमानपत्रे वाचली नाहीत!
असे म्हणतात की इंदिरा गांधींना आणीबाणी लादल्याचा पुढे पश्चात्ताप झाला होता. आणीबाणीला चांगले म्हणनारे त्या काळात सुद्धा इंदिराजींचे लाळघोट्ये सोडले तर आणखी कुणी नव्हते. आत्ता असे वीर निपजावेत या काळाच्या कठोर करणीला काय म्हणावे?
तुरुंगात हाल झाल्यामुळे जयप्रकाशांचे मूत्रपिंड कायमचे खराब झाले आणि त्या दुखण्यात त्यांचा पुढे अंत झाला. नेहरूमित्र शेख अब्दुल्‍ला यांनी तुरुंगात टाकल्यामुळे श्यामाप्रसाद मुखर्जींचा झाला तसाच. श्यामाप्रसादांचा अपराध काय तर त्यांनी काश्मीरमध्ये पासपोर्टशिवाय प्रवेश केला. आजही काश्मीरचा झेंडा, राष्ट्रगीत वेगळे आहे. काश्मीरला मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान असतो. या नेहरू घराण्याने देशाचे जेवढे वाट्टोळे केले आहे त्याहून जास्त कुणीही नाही.--वाचक्‍नवी

आचार्य अत्रे आणि आणिबाणी

आचार्य अत्रे विनोबांचे परमभक्त. सदैव विनोबावर चांगले लिहिणारे आणि स्तुतिसुमने उधळणारे. विनोबांनी आणीबाणीची भलावण केल्याचे समजताच त्यांनी आचार्य विनोबांवर आगपाखड करणार्‍या अग्रलेखांचा भडिमार केला. पहिल्या अग्रलेखकाचे शीर्षक होते..विनोबा की वानरोबा?

आचार्य अत्रे जून १९६९ मध्ये निवर्तले. आणिबाणी त्यानंतर सुमारे ६ वर्षांनी म्हणजे १९७५ मध्ये सुरू झाली.

खतरनाक

आत्ता इथे मायकेल केल्सो असता तर म्हणाला असता "BURN!"

मायकल

अरे! आचार्य अत्र्यांच्या बाबतीत मागे मनोगतावरही असा अभूतपूर्व गोंधळ झाल्याचे आठवते.

ज्याकी. ;-)

बर्न!

आचार्य विनोबा भावे या माणसाबद्दल मला अतीव आदर आहे. त्यांची पाच सहा पुस्तके माझ्या संग्रही आहेत. गांधींनंतर गांधीवाद जिवंत ठेवण्याचे त्यांचे कार्य फार मोठे आहे. त्यांचा अनादर करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. त्यांच्या आणि निर्मला देशपांडे यांच्या वागणुकीतील बुवाबाजी कधीकधी अस्वस्थ करीत असे. राजकारणी जयप्रकाशांना सर्वोदयाकडे वळवून आपण एक फार चांगला नेता घालवला असे मला मनापासून वाटते. नेहरूंपेक्षा जयप्रकाश हे हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान झाले असते तर भारताच्या अंतर्गत राजकारणाला फार चांगली दिशा मिळाली असती.
विनोबांची विनाकारण अवहेलना मला सुद्धा आवडली नसती. --वाचक्‍नवी

डेडली

आणि मला वाटले बॅक टू द फ्युचर ही सायन्स फिक्शन कथा आहे. :)
इंदिरा गांधींचे शिक्षण शांतिनिकेतन आणि ऑक्सफर्डमध्ये झाल्याचे ऐकले होते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

चूक मान्य

आचार्य अत्रे १३ जून १९६९ रोजी वारले. अगदी बरोबर. मग 'विनोबा की वानरोबा' हे व असे लेख कुणी लिहिले असावेत? बाळ ठाकरे? नवाकाळचे खाडिलकर? काही आठवत नाही. लेख मी स्वत: वाचले आहेत. कदाचित ते विनोबांनी द्विभाषिकाला किंवा मुंबई तोडून उरलेल्या महाराष्ट्राच्या निर्मितीला पाठिबा देण्यासाठी केलेल्या विधानांच्या निषेधार्थ असावेत. त्या लेखांनंतर विनोबांनी मराठी वृत्तपत्रे वाचणे बंद केले हे नक्की. --वाचक्‍नवी

विनोबा की...

चर्चेच्या मूळ विषयाला अवांतर...

विनोबांबद्दल मलापण आदर आहे, पण मी काही त्यांचा भक्त नाही. त्यांची पुस्तके वाचनीय आहेत आणि त्यावरून त्यांचे ज्ञान समजते आणि आपल्याला पण गोष्टि सहजपणे कळतात. पण ज्या विनोबांनी गीताई मधे "उणाही आपुला धर्म, परधर्माहूनी भला, स्वधर्मात भला मृत्यू, परधर्म भयंकर" असे "श्रेयान् स्वधर्मा विगुणः परधर्मो स्वनुष्टीतात, स्वधर्मे निधनम् श्रेय् परधर्म भयावहा||" (व्याकरणाबद्दल माफी!) ) या श्लोकाचे उचीत भाषांतर केले त्या विनोबांनी स्वतःचा "स्वभाव धर्म" हा राजकार्णि नसताना देखील त्यात एका अर्थी पडून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मोरारजी देसाईंची आणि काँग्रेसची बाजू घेतली, ती ही अशावेळेस जेंव्हा मोरारजींच्या आज्ञेवरून झालेल्या गोळीबारात हुतात्माचौकात १०५ लोकांना प्राण घालवावे लागले.

या संदर्भात आचार्य अत्रे यांनी आचार्य विनोबा भाव्यांवर तोफ डागली आणि "विनोबा की वानरोबा" असा लेख लिहीला. त्याच काळात अत्र्यांचे सहकारी असलेल्या एका कवींनी (तसे प्रसिद्ध नसल्याने नाव विसरलो, आता ते हयात नाहीत) फडाच्या कवीता आंदोलनासाठी केल्या होत्या. त्या कुठेतरी वाचल्याचे लक्षात आहे. त्याच्या ओळी खालील प्रमाणे:

हा कसला बाबा संत, हा संत नव्हे एजंट
संयुक्त महाराष्ट्राला अपशकून करण्या आला
काँग्रेसचे खुनशी मंत्री हा त्यांचा की वाजंत्री
ते मोरारजी-चव्हाण, ह्या एजंटाचे प्राण...

पुढे अशीच चूक विनोबांनी आणिबाणिच्या काळात आधी अनुशासन पर्व म्हणून आणि नंतर मौनव्रतात असताना टाळ्या वाजवून केली असल्याचे आठवते. त्यामुळे मग त्यांची थट्टा झाली. त्यातच भूदान चळवळ कितीही श्रेष्ठ कल्पना असली तरी वास्तवात त्यात त्यांना (विनोबांना) फसवण्यात आले. ते असताना जमीन दान करायची नंतर परत बळकावायची असे प्रकार झाल्याचे वाचण्यात आले होते.

हे सर्व लिहीण्यात विनोबांची थट्टा (ती पण त्यांच्या तिथीप्रमाणे पंचविसाव्या पूण्यतिथीच्या पूर्वसंध्येवर) करण्याचा हेतू नाही कारण त्यांचे साहीत्य मला आवडते. विषयाच्या ओघात नीर-क्षीर वृत्तीने संबंधीत माहीती लिहीणे इतकाच ह्या प्रतिसादाचा हेतू...

अवांतर नव्हे समांतर

प्रतिसाद हा अवांतर नसून समांतर आहे. असे माहितीपूर्ण प्रतिसाद यायला़च हवेत. विनोबांच्या गीताई तल्या
इंद्रिये जिंकली ज्याने तो स्थितप्रद्न्य कसा असे?
कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा?
असं काहीस आठवतय?
प्रकाश घाटपांडे

दै. लोकसत्ता ला पत्र पाठवा

या चर्चेबाबतlokmanas@expressindia.com या पत्त्यावर दै. लोकसत्ताला पत्र पाठवा.
आपला
कॉ.विकि

 
^ वर