इंटरनेट युगातील पत्रकारांचे स्थान.

महानगरात राहणा-या प्रत्येक नागरिकांचे घर आता माध्यम कक्ष बनलेलं आहे.अशा वेळी नव्या विचारप्रसारण युगामधे एकविसाव्या शतकात जगभरातील वृत्तपत्रांचे व्यक्तिमत्व संपूर्णपणे पालटत आहे या नव्या युगातील वृत्तपत्रांचा,आणि पत्रकारांचा चेहरा कसा असेल या विषयाची चर्चा नवी दिशा देऊ शकते.कोणतेही प्रसार माध्यम, आपण उदाहरणार्थ दैनिके घेऊ ही जर लोकांच्या पसंतीला उतरली पाहिजे असे वाटत असेल तर,श्रोता,प्रेक्षक वा वाचकांची ज्ञानपातळी किती वाढते याला विशेष महत्व येत आहे.पण हे करत असतांना पत्रकारांच्या वैचारिक पातळ्यांचा विचार झाला पाहिजे,तो होत असेल का ?पत्रकारीतेचा कोर्स कॉप्या करुन पास होणारे विद्यार्थी जेव्हा दैनिकात काम करतात.तेव्हा त्यांची वैचारिक पातळी वाढलेली असते का ?कोणाच्या तरी वशील्याने पत्रकार म्हणून् टेंभी मिरवणारे नव्या युगाचे आव्हान पेलनार आहेत का ?जनसेवा,आणि आपला वाचक आपल्या दैनिकांपासून् दूर जाऊ नये या हेतूत दैनिकांचा प्रवास कसा असेल,त्यात पत्रकारांचे योगदान कसे ?पत्रकारांकडे सामान्य माणूस,राजकारणी,संपादक,कसे पहातात.त्याचीही चर्चा येथे अपेक्षीत आहे.

सुचना:- येथे सर्व प्रकारचे शेले,टीका,टवाळक्या,अभ्यासपूर्ण प्रतिसाद,दूवे,संदर्भ ,प्रतिसाद देत असतांना स्विकारले जातील.*
(उपक्रमाच्या सर्व अटी लागू)*

Comments

ह ह पु वा!

पत्रकारीतेचा कोर्स कॉप्या करुन पास होणारे विद्यार्थी जेव्हा दैनिकात काम करतात.तेव्हा त्यांची वैचारिक पातळी वाढलेली असते का ?कोणाच्या तरी वशील्याने पत्रकार म्हणून् टेंभी मिरवणारे

ह ह पु वा!

अटी लागु हे एकदमच सही!!!
आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायलाहे नको?)

वाद होतील म्हणून..?

आम्हाला या विषयात चर्चा करायला आवडले असते,पण या चर्चेचा समारोप कसा होईल,या बद्दल आमच्या मनात काही शंका आहेत.म्हणून प्रश्न चांगले आहेत.आणि उत्तरे कुठेतरी शोधून घेऊ असे वाटते.


अवांतर;) अटी लागू याला तर तोडच नाही.असे असे लिहा म्हणायचे,पण पहा बॉ त्याची जवाबदारी तुमची.सही.!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकास चर्चा.

वा तात्या,

झकास चर्चा आहे.

सुचना:- येथे सर्व प्रकारचे शेले,टीका,टवाळक्या,अभ्यासपूर्ण प्रतिसाद,दूवे,संदर्भ ,प्रतिसाद देत असतांना स्विकारले जातील.*

पत्रकारांच्या वैचारिक पातळ्यांचा विचार झाला पाहिजे,तो होत असेल का ?पत्रकारीतेचा कोर्स कॉप्या करुन पास होणारे विद्यार्थी जेव्हा दैनिकात काम करतात....

हे जाम आवडले.

बिनधास्त चर्चा कर, आपण आहोत तुझ्या बरूबर.

????

वा तात्या,
झकास चर्चा आहे.

ऑ????

आता हा कोण नवीन तात्या बुवा?? तो मी नव्हेच एवढंच सांगू इच्छितो! !

असो, नवीन तात्याचं उपक्रमावर मनापासून स्वागत!

आणि काय रे मिसळपावा, माझ्या आयडीसदृष आयडी घेऊन वावरणार्‍या पडद्यामागच्या नवीन कलाकारा, कोण रे तू? :)

बाय द वे, माझा आयडी 'मिसळपाव' आहे, 'मिसळपाव्' नाही! :) असो..

बाकी चालू द्या. आम्ही पत्रकार आणि पत्रकारितेवर काही बोललो की उपक्रमराव आम्हाला जेलमध्ये टाकतात आणि आमच्या व्य नि च्या आणि खरडवहीच्या सुविधा काढून टाकतात. मागच्या वेळेला अण्णा आणि बाबुजींच्या पुण्याईमुळे आम्ही एका दिवसात जेलमधून जेमतेम सुटलो! :)

आता इतक्यात पुन्हा जेलात जाऊ इच्छित नाही! :)

आपला,
(पाय लंगडा नसलेला, सध्या पॅरोलवर सुटलेला जुनाच तात्या! :)

तोतयाचे बंड

तात्या (नं.१),

आपण हा प्रश्न विचारल्यामुळे, आम्हाला इथे "तोतयाचे बंड" चालू असल्याचे कळले कारण मिसळपाव आणि मिसळपाव् यातला फरक कोण ल्क्षात ठेवणार. इतकी वेगवेगळी नावे आणि वाटताना एकच व्यक्ती पाहून शेवटी मला शंका येऊ लागली की "कर्ता करवीता तोच (म्हणजे "तात्या")" आहे, जरी वाटताना अनेक चर्चा पर्तिसाद वगैरे वाटले तरी!

वाचकांना कोण विचारतो?

आपला वाचक आपल्या दैनिकांपासून् दूर जाऊ नये या हेतूत दैनिकांचा प्रवास कसा असेल,त्यात पत्रकारांचे योगदान कसे ?

बहुतेक वृत्तपत्रांचे मुख्य उत्पन्न जाहिरातींवर अवलंबून असते. त्यांच्या खपावर (वाचकसंख्येवर) नाही. त्यामुळे वाचकवर्ग टिकवण्यासाठी गुणवत्ता टिकवण्याची गरज त्यांना वाटत नाही. जाहिरातदारांकडून आगाऊ पैसे घेतलेले असल्यामुळे अंक काढणे भाग असते. मग तो भरण्यासाठी कित्येक वेळा कसातरी तयार केलेला (व कुणीही नवशिक्याने लिहिलेला) मजकूर छापला जातो.

लोकांमधले वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे. वाचकांनी वृत्तपत्रांतून लिहिण्याचे प्रमाणही कमी झाले असावे कारण हल्ली ब्लॉगिंग (मुक्त पत्रकारिता)ची सोय आहे. त्यामुळे एखाद्याला आपले विचार इतरांपर्यंत पोचवायचे असतील तर त्याला वृत्तपत्रांवर अवलंबून राहावे लागत नाही.

वा

वा! कोर्डेसाहेब उत्तम मुद्दे मांडले आहेत.
याशिवाय जाहिराती नि 'मॅटर' हा बरेचदा पुरकही असतो/ठेवला जातो.
वर्तमानपत्रे जाहीरातींवरच चालतात हे खरे आहे नि खरे नाही.
वाचकांसाठी ती पुर्वी चालत असत, पण आजही काही प्रमाणात चालतात. मला वाटते की हे एकमेकांत गुंतलेले आहे. इतके सरळ नि सोपे नाही. किंवा कदाचित छोट्या वर्तमानपत्रांसाठी असेलही पण मोठ्यांसाठी नाही. कारण तिथे अनेक प्रकारचे दबाव आहेत.
अनेकदा संपादक जाहिरातींच्या दबावापुढे मान टाकतात हे खरे. जसे सध्याचा जाहिराताळलेला मटा पाहुन गोविंदराव तळवलकर किती हळहळत असतील याची कल्पनाच केलेली बरी! त्यांच्या काळातल्या मटाला जे वलय होते ते केतकरांनी धुळीला मिळवले. मटाचा सोटा करून त्यांनी वाचकवर्गही मर्यादीत केला. पुढची घसरण माहीतीच आहे.
याचा उत्तम फायदा लोकसत्ताला मिळाला पण नंतर केतकरच तिथे गेल्याने सगळाच घोळ झाला. मटाला तर आता जाहिरातीं शिवाय चेहेराच उरला नाही!

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायलाहे नको?)

केतकरांचे भाकित

कुमार केतकर हे भविष्यात राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जातील हे भाकित आम्ही केव्हाच वर्तवले आहे. फक्त पुरावा म्हणून येथे लिहित आहोत.

अवांतर- हे तुम्ही सांगायची काय गरज आहे? असा प्रश्न वाचकांच्या मनात आला आहे हे आम्ही ओळखले आहे.

(मनकवडा)
प्रकाश घाटपांडे

मनसे चे काय मग?

मनसेचे ते काय करणार मग?
का राजू (परुळेकर) ला नि राज ला त्यांच्या हाल वर सोडून जाणार आहेत?
अर्थात राजकारणात काही सांगता येत नाही बॉ काय घडेल ते... केतकरही त्यांना धड काही मिळाले नाही तर उलटी आग ओकायला कमी करणार नाहीत नाही का?

लेख वाचले की कळतेच या बोटावरची त्या बोटावर करणे सहजच जमते त्यांना!
आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायलाहे नको?)

पुरावा...

केतकरांना पुरावा नाही हो... जाळावा...
हिंदूधर्मीय आहेत ते.

-सुमारकर्ण

अरे?

अरे ? काय झाले एकदम भडकायला?
असं म्हणायचं नाही बाबा व्यक्तिगत काही...

शशांकराव व्यनि पाठवतील बरं तुम्हाला तंबी देणारा!!
(आणी शिवाय खाली मला पाठवलेली तंबी पण जोडतील! ;) )

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायलाहे नको?)

उत्तरक्रिया

माझा वरील प्रतिसाद हा हिंदूधर्मीयांच्या उत्तरक्रियेविषयी माहितीपूर्ण म्हणून धरावा. त्याचा इतर कोणताही अर्थ काढू नये अशी विनंती.

(माहितीपूर्ण) आजानुकर्ण
--(काय यमक जुळलंय)

वारताहार

संपादकासाहेबा बदूल बोलुन् झालं आसन,त जरशीक पेपराबद्दल बी लिव्हा ना ,अन मंग वारताहरावर,त्याची त माह्यीती पाह्यजे ना भाऊ !

इंटरनेट युगातील पत्रकारांचे स्थान.

वृत्तपत्रांमधे सतत निरनिराळ्या बातम्या येत असतात.

लोकांच्या आयुष्यावर दुरगामी परीणाम करणारया व देशाच्या भवितव्याबद्दलच्या बातम्या लोकांपर्यंत सोप्या भाषेत समजावुन सांगणे.

लोकांना विचार करावयास लावणे. एकदा ही प्रक्रीया लोकांना कळली की लोक फक्त स्वता:पुरताच नव्हे तर समाज , राष्ट्र् , जग ..... सगळ्यांचे हित बघतील.

चर्चेचा रोख थोडा बदलून काही प्रश्न

या चर्चेत आता अधिक प्रतिसाद येत नसल्याने किंचित विषयांतरीत प्रश्न विचारत आहे....

मध्यंतरी अमेरिकन (भारतातही दिसतेच) टिव्हीवर 'एवरीबडी लव्ज रेमंड' या मालिकेतील एक भाग पाहत असताना काही प्रश्न डोक्यात आले...

भाग काहीसा असा:

रेमंड हा एका अग्रगण्य वृत्तपत्रात क्रिडाविषयक स्तंभ लिहिणारा प्रसिद्ध लेखक. बाहेरच्या जगात लोकांना त्याची ओळख पटल्यावर नेहमीच त्याचे कौतुक केले जाते. असेच एकदा घरी आलेले आगंतुक पाहुणे रेमंडची ओळख आपल्या मुलाशी करून देतात आणि तो ही क्रिडासंदर्भात स्तंभ चालवणारा लेखक असल्याचे सांगतात. रेमंड त्याला तो कोठे लिहितो (कोणत्या वृत्तपत्र किंवा नियतकालिकासाठी) असे विचारतो तसे तो पाहुणा सांगतो की मी इंटरनेटवर लिहितो. (यानंतर अर्थातच, हशा)

  1. बेसुमार ब्लॉग्ज, ऑर्कुटसारख्या स्थळांवरून होणारे अनेक गैरव्यवहार आणि एकंदरीत महाजालाचे गैरफायदे यांतून इंटरनेट लेखकांना गांभीर्याने घेतले जात नसावे असे वाटते का?
  2. महाजालाचा वाचकवर्ग अजूनही मर्यादित आहे आणि त्यामुळे लेखकवर्ग फारसा गंभीर नाही असे वाटते का?
  3. वृत्तपत्रे, नियतकालिके यातून होणारे लेखनाचे संपादन महाजालावर होत नसल्याने लोकांची दृष्टी त्याकडे गांभीर्याने पाहायची नसावी का?
  4. आणि अर्थातच, हा दर्जा सुधारावा यासाठी काय करता येणे शक्य आहे?

माझी उत्तरे

आपण म्हणत असलेला "रेमंड"चा भाग मी पाहीला नाही पण ती मालीका मधून कधी कधी (पुन्रप्रक्षेपण) पाहतो.

1. बेसुमार ब्लॉग्ज, ऑर्कुटसारख्या स्थळांवरून होणारे अनेक गैरव्यवहार आणि एकंदरीत महाजालाचे गैरफायदे यांतून इंटरनेट लेखकांना गांभीर्याने घेतले जात नसावे असे वाटते का?

नुसते तेव्ह्ढेच वाटत नाही, अजून तेव्ह्ढा "प्रौढ" (mature) वाचकवर्ग तयार झालेला नाही.शिवाय चांगले ब्लॉग कसे शोधायचे हा पण एक प्रश्न सामान्यांना पडणारच

2. महाजालाचा वाचकवर्ग अजूनही मर्यादित आहे आणि त्यामुळे लेखकवर्ग फारसा गंभीर नाही असे वाटते का?

मनापासून लिहीणारा लेखक वर्ग गंभीर असतो. पण त्यांना वाचक कसे मिळवायचे हे एक् आव्हान ठरते.

3. वृत्तपत्रे, नियतकालिके यातून होणारे लेखनाचे संपादन महाजालावर होत नसल्याने लोकांची दृष्टी त्याकडे गांभीर्याने पाहायची नसावी का?

मला स्वतःला जर कोणी एखादा ब्लॉग सांगीतला (की चांगला आहे वगैरे) तर मी तो आवर्जून बघतो. पण सातत्याने जाणे होत नाही, मधून मधून बघितला गेला तरी.

4. आणि अर्थातच, हा दर्जा सुधारावा यासाठी काय करता येणे शक्य आहे?
चांगले लिखाण, माहीती, आणि "फोकस" अथवा ज्याला "टार्गेट ऑडीयन्स" म्हणू शकतो असा असणे महत्वाचे आहे आणि तेच खरे आव्हान आहे.

हा प्रश्न सर्वांनाच पडतो. कालचीच एक गोष्टः हल्ली "social entrepreneurship" हा प्रकार बराच वाढीस लागला आहे आणि त्यांना मदत करण्याच्या एका समितीत मी आहे. (या विषयावरून एक लेख लिहायचा आहे, पण अजून वेळ मिळाला नाही / दिलेला नाही..). कालच एक व्यक्ती आली होती जी हार्वर्ड विद्यापिठात या विषयावर शिकवते आणि स्वतःची संस्थापण चालवते आणि "मोर दॅन" प्रथिततयश आहे. तीला पण (एक) मदत काय हवी होती की तीचा ब्लॉग जास्त लोकांपुढे जाणे! कारण त्यातून ती नकळत स्वतःचे नाव जगापुढे मोठे करत असते. अर्थातच ते होण्यासाठी एक उपाय हा "क्रॉस ब्लॉगींग" हा असतो.. तो एक् वेगळा विषय आहे...

माझी उत्तरे

1. बेसुमार ब्लॉग्ज, ऑर्कुटसारख्या स्थळांवरून होणारे अनेक गैरव्यवहार आणि एकंदरीत महाजालाचे गैरफायदे यांतून इंटरनेट लेखकांना गांभीर्याने घेतले जात नसावे असे वाटते का?

असे नाही. इंटरनेट लेखकांना गांभीर्याने घेतले जाते. मराठी संकेतस्थळे आणि मराठी ब्लॉग यांचे लेखक आणि वाचक अतिशय मर्यादित आहेत. केवळ त्यांचा संदर्भ विचारात घेऊ नये. तुलनेत देशी इंग्रजी, हिंदी, कन्नडा इंटरनेट लेखकांमध्ये गंभीर आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा चालतात. अनेक इंग्रजी, हिंदी पत्रकार स्वतःची जी मते वृत्तपत्रातून मांडता येणे शक्य नाही ती मोकळेपणाने मांडण्यासाठी ब्लॉगचा आधार घेतात. अर्थात विकास यांनी म्हटल्याप्रमाणे ब्लॉग/इंटरनेट लेखकांवर कोणतेच नियंत्रण नसल्यामुळे समाजाचा एकत्रित आयक्यू जो आहे तोच समस्त ब्लॉगलेखकांचा एकत्रित आयक्यू होईल. जसजशी लेखकांची संख्या वाढत जाईल तसतसे गांभीर्यपूर्ण लेखन शोधणे अवघड होत जाईल.
देशी भाषांमध्ये इंग्रजीनंतर हिंदी ब्लॉगलेखक नियमित आणि मुद्देसूद लेखनाबाबत पुरेसे गंभीर आहेत असे स्पष्ट दिसते. संदर्भादाखल अक्षरग्रामवरील कोणतेही सँपल ५ ब्लॉग्ज घ्या.
या बातमीवरुन कन्नडा लेखकही पुरेसे प्रगल्भ आणि लेखन ही एक गंभीरपूर्वक करण्याची गोष्ट आहे याची जाणीव असलेले आहेत असे वाटते.
मराठी ब्लॉगलेखक मात्र "गेले ते दिन गेले" किंवा "आमच्यावेळी अस्सलं नव्हतं" किंवा "लै कंटाळा आला बै" टाईपचेच दळण दळत आहेत.
पॉलिटिकली इनकरेक्ट वाटले तरी याचे प्रमुख कारण बहुतांश मराठी ब्लॉगलेखक हे परदेशात स्थायिक झालेले आहेत. तेथे येणारा होमसिकनेस घालवण्यासाठी किंवा विरंगुळा म्हणून (किंवा मायभूमी सोडून आलो याबद्दल निष्कारण अपराधी वाटत आहे त्याचे प्रायश्चित्त म्हणून) मराठी लेखन करतात असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते.
कृपया हे कोणीही वैयक्तिक घेऊ नये. :)) हे सामान्य निरी़क्षण आहे.

2. महाजालाचा वाचकवर्ग अजूनही मर्यादित आहे आणि त्यामुळे लेखकवर्ग फारसा गंभीर नाही असे वाटते का?
याबाबत थोडासा सहमत आहे. महाजालाचा वाचकवर्ग मर्यादित असला तरी त्याची संख्या केवळ वाढत जाणार आहे. ती कमी होणार नाही. जसजसे आपले लेखन गांभीर्याने वाचले जाते. हे लेखकांना कळत जाईल तसतसे लेखकही गंभीर होत जातील.

3. वृत्तपत्रे, नियतकालिके यातून होणारे लेखनाचे संपादन महाजालावर होत नसल्याने लोकांची दृष्टी त्याकडे गांभीर्याने पाहायची नसावी का?

तसे नाही. लेखनाकडे पाहण्याची दृष्टी संपादन होते की नाही यावर अवलंबून नसावी असे वाटते. निदान माझी तरी तशी नाही. उपसंपादकाला माझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे यावर माझा तरी विश्वास नाही. ;)

4. आणि अर्थातच, हा दर्जा सुधारावा यासाठी काय करता येणे शक्य आहे?
वैयक्तिक लेखकांनी दर्जा सुधारणे गरजेचे आहे. यात सामूहिक प्रयत्न करता येणे शक्य नाही असे वाटते.

सहमत

मराठी ब्लॉगलेखक मात्र "गेले ते दिन गेले" किंवा "आमच्यावेळी अस्सलं नव्हतं" किंवा "लै कंटाळा आला बै" टाईपचेच दळण दळत आहेत.

हे मलाही अनेकदा जाणवते.

तेथे येणारा होमसिकनेस घालवण्यासाठी किंवा विरंगुळा म्हणून (किंवा मायभूमी सोडून आलो याबद्दल निष्कारण अपराधी वाटत आहे त्याचे प्रायश्चित्त म्हणून) मराठी लेखन करतात असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते.

हे ही मला जाणवते. विशेषतः विरंगुळा आणि वेळ बर्‍या कामात जावा याच कारणासाठी मी माझा ब्लॉग सुरू केल्याचे आठवते. तसेच बरेचसे ब्लॉग्ज हे परदेशस्थांचे असूनही (म्हणजे त्यांच्या जीवनाच्या कक्षा इतरांच्या मानाने रूंदावल्या असाव्यात असे [आपले] मानून :) )आपले घर, अंगण, खाऊ, शाळा यांच्या बाहेर जात नाहीत. (चू. भू. दे. घे.)

या आणि अशा अनेक गोष्टी जाणवण्यामागे अनेक अनुभव आहेत. जसे रेमंडचा एक भाग वर दिला. तसेच, माझ्या ब्लॉगवर एकदा

"आता पु.लंसारखं कोणी लिहितच नाही मग वाचायचं काय?" अशाप्रकारची प्रतिक्रिया होती. आता ही एका व्यक्तीची प्रतिक्रिया असून ती संपूर्ण समाजाला लावणे योग्य नाही तरीही माणसे या स्टँडर्डायझेशनच्या बाहेर पडली असे वाटत नाही. आपण (येथे मी मराठी नेट लेखक) चाकोरीबाहेर लिहायला सुरूवात केली पाहिजे असे वाटते.

* मी जरा मराठी लेखक वाचकांचा विचार जास्त करते आहे असे वाटते.

सहमत

पॉलिटिकली इनकरेक्ट वाटले तरी याचे प्रमुख कारण बहुतांश मराठी ब्लॉगलेखक हे परदेशात स्थायिक झालेले आहेत. तेथे येणारा होमसिकनेस घालवण्यासाठी किंवा विरंगुळा म्हणून (किंवा मायभूमी सोडून आलो याबद्दल निष्कारण अपराधी वाटत आहे त्याचे प्रायश्चित्त म्हणून) मराठी लेखन करतात असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते.

अगदी बरोबर . पण हा अस्वस्थपणाच लिहिण्याची उर्मी देतो. प्रियाली चा (उगिचच म्याडम , ताई म्हणत नाही बरंका?) मनात आलं ..लिहिलं वाचल की मनाने प्रियाली कडे जातो आणि साष्टांग दंडवत घालतो.
अवांतर- अंधश्रद्धा कथा वाचताना अंगावर काटाच आला.
( नरेंद्र दाभोळकरांचा सहकारी व अंनिसचा हितचिंतक)
प्रकाश घाटपांडे

पहा आमच्या नजरेने.


व्हेन आय एम लर्निंग इन नाइंटीन असे काही तरी वर्ष असेल,एका जिल्ह्याच्या ठिकाणी राहून सुद्धा इंटरनेट काय आहे.हे आम्हाला माहीत नव्हते. तरीही ज्यांना या बद्दल माहिती होते,त्यांनी या शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे असे कधी सांगितल्याचे तरी आठवत नाही.म्हणून ब्लॉग्ज,वर मराठी,हिंदी किंवा अन्य भाषेत किती विद्यार्थी , शिक्षक,शासकीय कर्मचारी ,आणि खाजगी क्षेत्रातील व्यक्ती लिहीत असतील असतील हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय जरी असला तरी शैक्षणिक मागासलेपण हे एक कारण आहे.म्हणून ब्लॉगवर लिहिण्याची सुरुवात तर केलीय ना ! इथून ती सुरुवात असेल.विषयाचा विचार नंतर.

2. महाजालाचा वाचकवर्ग अजूनही मर्यादित आहे आणि त्यामुळे लेखकवर्ग फारसा गंभीर नाही असे वाटते का?
महाजालावरील वाचक वर्ग कमी आहे,या मताशी सहमत आहे.आणि लेखक गंभीरपणे लिहीत नाही,त्याचे कारण एक तर आपले लेखन या नवप्रवाहात टिकेल का ? प्रसिद्धी मिळेल का ? या भितीने ते लिहीत नसावे,किंवा ते जे लिहितील ते या पिढीला पचनी पडेल का ? त्यामुळे प्रस्थापित लेखकांनी या मायाजाळावरील लेखनाकडे पाठ फिरवली असावी ?(स्तंभ लेखन,प्रासंगिक,किंवा अग्रलेख या संबंधात)
3. वृत्तपत्रे, नियतकालिके यातून होणारे लेखनाचे संपादन महाजालावर होत नसल्याने लोकांची दृष्टी त्याकडे गांभीर्याने पाहायची नसावी का?
महाजालावर बातमी वाचण्यापेक्षा ,इतरांना ज्याची माहिती नाही अशा दीर्घ ज्ञानाची माहिती माहिती मिळते का या शोधात सामान्य लोक मायाजालावर दिसतात.त्याच बातम्या,विविध वाहिन्यांवर आखो देखा हाल पाहण्यास मिळत असेल तर केवळ बातमी वाचण्यासाठी मायाजालावर फार गर्दी होईल यावर तरी माझा फारसा विश्वास नाही.
4. आणि अर्थातच, हा दर्जा सुधारावा यासाठी काय करता येणे शक्य आहे?

प्रत्येकाच्या घरी शौचालय असावे या साठी शासन जी कार्यवाही करते,तशीच कार्यवाही ज्याच्या घरी संगणक नसेल,आणि त्यासाठी ब्रँड बँड सुविधा नसेल तर त्याला राशन वरचे धान्य आणि शासकीय सवलती मिळणार नाही.असा कायदा आणि त्याची अंमलबजावणी केली तर येणा-या दशकात दैनिकांपेक्षा मायाजालावरील दर्जेदार लेखन करणा-यांची संख्या,आणि द वाचकांची संख्या वाढलेली असेल यात शंकाच नाही.

अवांतर ;) विचारांच्या बाबतीत आमचे विचार मागासलेपणाचे वाटत असतील तर त्यास व्यवस्था जवाबदार आहे असे समजावे.(ह.घ्या)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैच!

शौचालयाचे ब्रॉड बँडशी केलेली तुलना भयंकरच आवडली बरं का!
आपले बी तसेच हाये भौ!! सकाळी उपक्राम काडल्या बिगर होतच नाय बा नीट!

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायलाहे नको?)

अजूनही

अजूनही 'जाल हे माध्यम' लेखनाच्या दृष्टीने नवे आहे. हे माध्यम जरी ताकदवान असले तरी त्याच्या स्वरूपामुळे एकाच प्रकारचे लिखाण सतत वाचत रहावे लागणे शक्य नाही. माझ्या मह्णण्याचा अर्थ असा की, केतकरांनी मटा चा सोटा केला तरी 'इतर योग्य, घरी चालत येणारा पर्याय' नसल्याने वाचले जाणे स्वाभाविक होते. पण जालाच्या लेखनात मात्र हे घडणे शक्य दिसत नाही. कारण पर्याय खुप आहेत. जालाचा संवाद - इमेल्स इतर - हा पण उपयोग आहे.

शिवाय एखाद्याला मटाचे लेख आवडले न आवडले तरी लगेच प्रत्युत्तर देणे अशक्यच होते. ते जालावर सहजतेने घडते. इतक्यातच घडून गेलेल्या किस्स्याने हे चांगलेच जाणवून गेले. (केतकरांनाही इथुन पळून जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही हे नक्की ;) )

या शिवाय महत्वाचा मुद्दा म्हणजे जाल हे 'वाय' पीढीच्या ताब्यातले साधन आहे. या पीढीला कोणतीच गोष्ट खुप काळ मन लावून विचार पुर्वक करण्याचे सवय नाहीये असे म्हणतात.
उदा. सर्फिंग करतांना झरझर नुसतीच नजर फिरवणे, नुसत्याच हेडलाईन्स वाचणे.
अर्थातच लेखकही त्या वाचनाला समर्पक असेच लेखन करणार हे सुसंगत नाही का? मग त्यात अभ्यासपूर्ण नि खुप मोठे सुसंगत लिखाण कसे येईल? आले तरी साधारण ४ स्क्रिन्स नंतर वाचन करणे सोपे वाटत नाही. पुस्तक मात्र कसेही वापरता येते. (आता येणारी नवी इ-पुस्तके हे दूर करत आहेत.)
यामुळेच कागदावर प्रकाशित असणार्‍या साहित्याची किंमत ही काहीशी जास्तच आहे/ राहील असे वाटते.

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र)

पंत सही !

एखाद्याला मटाचे लेख आवडले न आवडले तरी लगेच प्रत्युत्तर देणे अशक्यच होते. ते जालावर सहजतेने घडते. इतक्यातच घडून गेलेल्या किस्स्याने हे चांगलेच जाणवून गेले. (केतकरांनाही इथुन पळून जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही हे नक्की ;) )

सहमत. हेच म्हणतो आम्ही. मायाजालावरील बातम्यांना जेव्हा अभ्यासक असे प्रत्युत्तर देतील तेव्हा अनेक दैनिके आणि त्यांचे संपादक पळून जातील.मटाला जर अशा लेखनाच्या बाबतीत प्रत्युत्तर दिले तर केतकर आणि त्यांचे संपादक मंडळ पळून जातीलच आणि येतील तेव्हा त्यांच्या दैनिकाचे नाव अन स्वतःचे नाव बदललेले असेल. त्यांच्या दैनिकाचे नाव असेल प्रा.डॉ.दिलीप बिरुटे आणि संपादकाचे नाव असेल गुंडोपत. हा हा हा : )))))))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकसत्ता

मटाला जर अशा लेखनाच्या बाबतीत प्रत्युत्तर दिले तर केतकर आणि त्यांचे संपादक मंडळ पळून जातीलच

कुमार केतकर लोकसत्ताचे संपादक आहेत.

हो हो!

हो हो! विकासराव,
त्यांनी जेव्हा मटा चा सोनिया टाइम्स केला होता त्यावेळची गोष्ट आहे ही...
आताही लोकसत्ता चा काँगसत्ता केलाच आहे त्यांनी!

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र)

माझे मत

१. बेसुमार ब्लॉग्ज, ऑर्कुटसारख्या स्थळांवरून होणारे अनेक गैरव्यवहार आणि एकंदरीत महाजालाचे गैरफायदे यांतून इंटरनेट लेखकांना गांभीर्याने घेतले जात नसावे असे वाटते का?

खरे आहे. गेल्या १२ वर्ष।त(तप) मा़झ्या (internet surfing /usage) अनुभवात खुप कचरा चाळल्यावर जरा काहीतरी चांगले वाचायला मिळते. गुगलमुळे खुप काम सोपे झाले आहे आता. पण खरे आहे की ह्या पुढे हे माध्यम प्रवाही ठरेल. ही तर सुरवात आहे. तसेच "लेखक"ह्या शब्दाला मा़झ्या मनात तरी एक विशिष्ट दर्जा आहे. महाजालावर बरेच "लेखन"आढळते "दर्जा" "विश्वासार्हता"ब-याचदा कमी.

२. महाजालाचा वाचकवर्ग अजूनही मर्यादित आहे आणि त्यामुळे लेखकवर्ग फारसा गंभीर नाही असे वाटते का?

वृत्तपत्रे एकाच वेळी अनेक जण पाने वाटुन वाचु शकतात पण संगणक नाही. संगणक एक किती जणांना परवडतो मग माणशी एक संगणक ... अजुन वेळ यायची आहे
पण तरी महाजालाचा नियमीत वाचकवर्ग आहे. ह्या पुढे वाढतच जाणार आहे. बरेचसे वाचक हुशार आहेत त्यांना योग्य वाटेल त्याच गोष्टी ते गंभीरपणे घेतात. तरी मला असे वाटते की लोक प्राध्यान्य मनोरंजनालाच देतात आणी तोच (तसेच ईमेल - ईमेल मधेपण खरी व्यक्तीगत कीती आणी टाईमपास कीती ह्याचा ज्याने त्याने विचार करावा) आत्तातरी महाजालाचा मुख्य वापर आहे.
टीव्ही वर पण डीस्कवरी, नॅशनल जिऑ आदी आहेत पण जास्त वेळ हा मनोरंजनात्मक वाहीन्या बघण्यात....

३. वृत्तपत्रे, नियतकालिके यातून होणारे लेखनाचे संपादन महाजालावर होत नसल्याने लोकांची दृष्टी त्याकडे गांभीर्याने पाहायची नसावी का? आणि अर्थातच, हा दर्जा सुधारावा यासाठी काय करता येणे शक्य आहे?

लेखनाचे संपादन - दर्जा - गांभीर्य => (subjective) => ह्याचा ज्याने त्याने विचार करावा.
दर्जा सुधारावा = लेखकाने स्वःता प्रयत्न करावा. लोकांनी तारतम्यतेने प्रतिसाद द्यावा (त्यांना संधी , सोय मिळावी.) लेखकाने ती गांभीर्याने घ्यावी.

खरे तर बोलणार नव्हतो पण रहावत नाही ..... शिल्पाताईंनी त्यांना योग्य वाटेल असे काही लेख लिहले अन काही प्रतीसाद त्यानां आले. त्यांनी उपक्रमावर लिखाण थांबबले ह्याचा मला खेद वाटला कारण मला नाही वाटत की १००% उपक्रमीनां त्यांचे लिखाण नको होते. मला जास्त वाईट वाटेल की जर त्यांनी एकंदर लिखाण करायचेच सोडले. (ref: त्यांचा ४०४ एरर ब्लॉग्ज) तसे आपण भारतीय फार भावुक आहोत असे मला वाटते. Anyways शिल्पाताईंनी लिहले किंवा नाही लिहले ज्या गावांना त्यांचा विकास (दारुबंदीसहीत) करावयाचा आहे ते आपले काम करतीलाच. (शिल्पाताईंचा लेख अन त्या लेखाचे त्यांना वाटलेले प्रतिकुल प्रतिसाद, दोन्ही बाबी गौण व ग्रामविकास महत्वाचा) Always look at the big picture. शेवटी आपण भुंग्यासारखे मधुप्रक्शालन (बरोबर का?) आणी मुख्य म्हणजे pollination अर्थात पुढिल पीढीसाठी योग्य गोष्टींची पेरणी करत जाणे.

 
^ वर