सिद्धांतकौमुदी

'सिद्धान्तकौमुदी' या व्याकरणग्रंथाच्या बर्‍याच प्रती मला खरेदी करायच्या होत्या."पुराण पुस्तक भांडारात" गेलो.प्रत पाहिली. मुद्रितमूल्य शंभर रुपयांहून अधिक आणि पूर्ण रुपयांत होते.भांडारात काही प्रती होत्या. त्यांची एकूण किंमत पन्नासहजार नऊशे सत्तावीस (५०९२७) रुपये भरली.

"सर्व प्रती खरेदी केल्यास सूट किती? "
"एकही रुपया नाही. मुद्रित मूल्यानुसार सर्व प्रतींची किंपत मोजावी लागेल.पुस्तक दुर्मिळ आहे."

उत्तर ऐकून तसाच बाहेर पडलो."अभिनव पुस्तकालया"त आलो. मुद्रितमूल्य तेच. इथेही त्या ग्रंथाच्या काही प्रती होत्या.त्यांची एकूण किंमत एकोणतीस हजार दोनशे त्र्याहत्तर (२९२७३) होती.
इथेही तोच प्रश्न विचारला. उत्तर अगदी तसेच मिळाले.शेवटी एकच प्रत विकत घेऊन बाहेर पडलो.
तर 'सिद्धान्तकौमुदी" ग्रंथाचे मुद्रितमूल्य (छापील किंमत ) किती?

..............................................................................................................................
कोणतीही लेखी आकडेमोड न करता कोडे तोंडी सोडविता यावे.
**********************************************************************

लेखनविषय: दुवे:

Comments

सिद्धान्तकौमुदी :उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
१.सर्वप्रथम उत्तर बरोबर श्री. धनंजय यांचे आले. त्यात तोंडी पद्धत नव्हती. दुसर्‍या पत्रात त्यांनी मौखिक रीत दिलीच.
..
२.श्री.दिगम्भा यांनी अचूक उत्तर कळविले. मात्र त्यासाठी त्यांना लघुगणकाची (कॅल्क्युलेटर) मदत घ्यावी लागली असे लिहिले आहे.
...
३.मौखिक रीतीसह अचूक उत्तर श्री.वाचक्नवी यांनी कळविले आहे.
...
या सर्वांचे अभिनंदन!

सिद्धान्तकौमुदी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अंजू यांनी एका प्रतीची किंमत अचूक शोधून काढली आहे. मात्र त्यांना कोडे तोंडी सोडविता आले नाही.

सिद्धान्तकौमुदी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रतीचे मुद्रितमूल्य श्री.मुक्तसुनीत यांनी अचूक शोधून काढले. मात्र त्याकरिता त्यांना कॅल्क्युलेटरचे सहाय्य घ्यावे लागले असे त्यांनी कळविले आहे.

 
^ वर