आकर्षण

आठ सेमी लांब,तीन सेमी रुंद आणि एक सेमी जाड या मापाचा एक पोलादी तुकडा आहे. याच मापांचा एक लोहचुंबक (बार मॅग्नेट ) सुद्धा आहे. दोन्ही तुकडे दिसायला एकरूप आहेत. ते एका टेबलावर ठेवले आहेत.
...आता अन्य कोणत्याही वस्तूचे सहाय्य न घेता, केवळ हे दोन तुकडे हाताळून,त्यांतील लोहचुंबक कोणता आणि पोलादी (माइल्ड स्टील) तुकडा कोणता ते ओळखायचे आहे. तर तुम्ही ते कसे ओळखाल ?
***************************************************
(कृपया उत्तर व्यनि. ने)

लेखनविषय: दुवे:

Comments

आकर्षण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री धनंजय यांचे उत्तर आले. लोहचुंबक कोणता आणि पोलादी तुकडा कोणता हे ओळखण्याचा अचूक मार्ग त्यांनी शोधला आहे. श्री. धनंजय यांना सुटणार नाही असे कोणतेच कोडे नाही.

आकर्षण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
" लोहचुंबक दक्षिणोत्तर दिशेत स्थिर रहातो." या गुणधर्माचा उपयोग करून काही जणांनी कोड्याचे उत्तर लिहिले आहे. कोड्यातील तुकड्याची मापे ८*३*१ सेमी. आहेत.लोखंडाचे वि.गु. (स्पे.ग्रॅ.) ७.५ ध्ररले तरी तुकड्याचे वजन २४*७.५=१८० ग्रॅम आहे. एवद्या वजनाचा लोहचुंबक हाताच्या बोटावर तोलून धरला तरी तो फिरण्याची शक्यता नाही. घर्षणजन्य बल (फ्रिक्शनल फोर्स) बराच असणार. चुंबकसूची (मॅग्नेटिक नीडल) फिरते कारण ती अगदी हलकी असते.तसेच ती योग्य आधारावर तोललेली (बॅलन्सड) असते. म्हणून कोडे सोडविण्यासाठी अन्य गुणधर्माचा विचार करावा. तो गुणधर्म सर्वपरिचित आहेच.

आकर्षण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. वाचक्नवी यांनी लोहचुंबकाच्या एका गुणधर्माचा योग्य तर्‍हेने उपयोग करून कोडे सोडविले आहे.

आकर्षण :उत्तर्

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या प्रश्नाचे श्री.धनंजय यांनी पाठविलेले उत्तर पुढील प्रमाणे:
"कोड्याचे नाव "आकर्षण" असल्यामुळे दोन तुकड्यांच्या आकर्षणाचा उपयोग केला तर चालेल असे वाटते. चुंबकाची आकर्षणशक्ती त्याच्या ध्रुवांपाशी जास्त असते, आणि त्याच्या विषुववृत्तावर सर्वात कमी असते. साध्या लोहाच्या तुकड्याची चुंबकाकडे आकर्षणशक्ती सगळ्या भागांत एकसारखी असते. त्यामुळे ते दोन तुकडे वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांना चिकटवून बघावेत. एक सगळीकडून दुसर्‍याच्या टोकाला सारख्याच आकर्षणाने चिकटेल - ते साधे लोह. दुसरे लोहचुंबक.

धनंजय

 
^ वर