महामहोपाध्याय पां,वा.काणे जीवनचरित्र
मी महामहोपाध्यय पां. वा. काणे यांचे जीवनचरित्र लिहितो आहे. "धर्मशास्त्राचा इतिहास" आणि "संस्कृत काव्यशास्त्राचा इतिहास" हे त्यांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ तर मी पाहिले आहेतच, शिवाय इतरही ग्रंथ नजरेखालून घातले आहेत. पण त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारशी माहिती मिळत नाही. त्यांचे वंशज वा इतर कुणी नातेवाईक असतील तर त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा. अन्य कुणाला त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल माहिती असल्यास द्यावी, ही विनंती आहे.
"धर्मशास्त्राचा इतिहास"च्या पाचव्या खंडात त्यांनी स्वतःबद्दल, विशेषतः शिक्षण व लेखन याबद्दल लिहिलेले मी वाचलेले आहेच. त्या शिवाय इतर कौटुंबिक माहिती हवी आहे.
माझा पत्ता-
डॉ. पद्माकर दादेगावकर,
१/सी, ३-३-९३४/ए, वरलक्ष्मी,
कुतुबीगुडा, हैदराबाद ५०००२७ (आंध्र प्रदेश), भारत
फोन - ०४०-६५८८७८८४ / ०९३९१३७३८७१/
ईमेल - dadegaonkar@yahoo.com
Comments
व्यासंगाला प्रणाम...
दादेगावकरसाहेब,
मी महामहोपाध्यय पां. वा. काणे यांचे जीवनचरित्र लिहितो आहे. "धर्मशास्त्राचा इतिहास" आणि "संस्कृत काव्यशास्त्राचा इतिहास" हे त्यांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ तर मी पाहिले आहेतच, शिवाय इतरही ग्रंथ नजरेखालून घातले आहेत.
मला काणेसाहेब किंवा त्यांच्या ग्रंथांबद्दल माहिती तर सोडाच, पण मला असे कुणी काणे म्हणून सद्गृहस्थ आहेत/होते आणि त्यानी "धर्मशास्त्राचा इतिहास" आणि "संस्कृत काव्यशास्त्राचा इतिहास" या मला अत्यंत किचकट वाटणार्या विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत हेदेखील माहीत नव्हते!
असो, काणेसाहेबांचे जीवनचरित्र लिहिण्याकरता आपल्याला अनेकोत्तम शुभेच्छा!
आपला,
('धर्मशास्त्र' हा शब्द कशाशी खातात हेदेखील माहीत नसलेला!) तात्या.
पण
आपल्या या पुस्तक उपक्रमाबद्दल शुभेच्छा.
एखाद्या गोष्टीवर मनापासून काम करावेसे वाटणे हा एक वेगळाच गुण आहे यात शंका नाही. शिवाय विषय/व्यक्ती काहीशी विस्मरीत सतांनाही नेटाने कार्य पुर्ण करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
पण आपण येथे प्रस्ताव देतांना महामहोपाध्यय पां. वा. काणे यांच्या विषयी अजून माहीती दिली असतीत तर बरे वाटले असते.
त्यांची ओळख करून द्यायली हवी होती. पुस्तके कोणती आहेत ती वेगळी का आहेत, महामहोपाध्ययांचे भाष्य नक्की काय आहे. कोणते वेगळे मुद्दे त्यांनी मांडले आहेत हे वाचायला आवडेल.
शिवाय नवीन पद्धतीने ती प्रकाशित झाली आहेत काय? कोणता प्रकाशक?
नुसती नजरे खालून घातले यामुळे आपल्या महामहोपाध्यय व त्यांचे योगदान याविषयी आपल्याला 'काय समजले' हे ही वाचायला आवडेल.
मला पडलेले प्रश्न-
आपण हे पुस्तक का लिहित आहात?
आपला त्या विषयातला रस का व कसा आहे?
आपला
गुंडोपंत
काणे चरित्राबद्दल अधिक
Padmakar Dadegaonkar
श्रियुत गुण्डोपंत,
नमस्कार!
आपण दाखविलेल्या अस्थेबद्दल धन्यवाद.
महामहोपाध्याय काणे हे धार्मिक सुधारक होते. हिंदू धर्मातील कालबाह्य व विसंगत रूढी, परंपरा नष्ट व्हायला हव्यात असे त्यंचे मत होते. त्यासाठी त्यांनी हिंदू धर्माचा प्रचंड व्यासंग केला होता. याशिवाय तत्कालीन सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतही त्यांचा मोठा सहभाग होता. भांडारकर प्राच्य विद्या संस्था, एशियाटिक सोसायटी, मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या उभारणीत त्यांचे महत्त्वचे योगदान होते. ते मुंबई विदयापीठाचे उपकुलपती होते. कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या इण्डॉलॉजी विभागाच्या स्थापनेत त्यांचे मोठेच सकार्य होते. ते दोनदा राज्य सभेवर नियुक्त झाले होते. त्यांनी परदेश प्रवासही केला होता.भयंकर दारिद्र्य व अनंत आजारांशी सामना करीत त्यांनी शिक्षण व नंतरचे प्रचंड लेखन केले. आजच्या धार्मिक उन्मादाच्या वातावरणात त्यांचे धर्म, रूढी, परंपरा यांबद्दलचे विचार अत्यंत मौलिक व कालस्य्संगत आहेत असे वाटल्यामुळे
आवडले
आपले छोटेसे विवेचन आवडले.
इतर सदस्यांनी दिलेल्या यादीमुळे थोडी ओळखही झाली.
आपण पुस्तक लिहितच आहात तर माहिती तयारच असेल.
महामहोपाध्याय पां,वा.काणे जीवनचरित्र असे एक पानही मराठी विकिवर चढवा की...
कुणीतरी भारत रत्नांचे पानही (यादी?) चढवायला हवे आहे मराठी विकिवर.
(माझे डोळे मेल्यामुळे मला हल्ली वाचणेच शक्य होत नाहीये. म्हणून मी करत नाहीये! प्रियालीताईअ वाचताय न हे???
शिवाय त्याने यात 'आधीच' दुवा कसा दिला नाही?? ;))) )
आपला
बसल्या बसल्या सुचना देणारा, व सध्या इतरांकडून टायपिंग करून घेणारा! ;)
गुंडोपंत
घ्या.
यादी नाही पण वर्गिकरण आहे. डॉ. पांडुरंग वामन काणे हे पान देखील उपलब्ध आहे. या इंग्रजी दुव्यावरून भर घालता येईल.
स्तुत्य
पद्माकरमहोदय,
तुम्ही सुरू केलेला उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे आणि त्यात तुम्हाला सुयश लाभावे अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्या प्रयत्नांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आपला
(शुभेच्छुक) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"
’भारतरत्न'
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1460547.cms
'भारतरत्नां'चा माहितीकोश... ह्याचा शोध घ्या. कदाचित आपणास हवी असलेली माहिती काही प्रमाणात इथे मिळू शकेल असे वाटते.
[ Thursday, January 25, 2007 09:26:14 pm]
म. टा. प्रतिनिधी
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापासून शहनाई उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्यापर्यंत ४१ जणांना 'भारतरत्न' देऊन त्यांनी केलेल्या महान कामगिरीबद्दल देशाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यातील बहुसंख्यांची ओळख अनेकांना असली तरी काही महान व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात कमी राहिल्यामुळे सर्वसामान्यांना त्यांचा परिचय नाही... ही उणीव एका सचित्र पुस्तकाने दूर झाली आहे.
भारत सरकारने आतापर्यंत 'भारतरत्न' पुरस्कार देऊन गौरविलेल्या मानकऱ्यांची तपशीलवार माहिती असलेले पुस्तक लक्ष्मण सकपाळ यांनी लिहिले असून डोंबिवलीच्या मानसी प्रकाशनने ते अलीकडेच प्रकाशित केले आहे.
चिपळूण तालुक्यातील पेढे गावात वेदविद्यापारंगत कुटुंबात जन्मलेले महामहोपाध्याय पां. वा. काणे यांचीही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्यांना १९६३ साली या सर्वश्रेष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९९९ साली मरणोत्तर गौरवण्यात आलेले गोपीनाथ बोदोर्लोई हे आसामचे; त्यांनी आदिवासींसाठी केलेल्या कामाचा गौरव 'भारतरत्न'ने झाला. काशी येथे जन्मलेले महान तत्त्वज्ञ डॉ. भगवानदास हे 'भारतरत्न' मिळणारे चौथे आहेत. त्यांना १९५५ साली हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी काशी विद्यापीठाची स्थापना केली होती.
' भारतरत्न' पुरस्काराबद्दल वेगळी माहिती या पुस्तकात आहे; शिवाय मानकऱ्यांमध्ये परदेशी शिक्षण घेतलेले किती, पदवीधर किती, परदेशी किती, वकील किती, या सर्वांना कोणत्या साली पुरस्कार देण्यात आला याची परिशिष्टेही असल्याने ते संग्राह्य बनले आहे. अधिक माहितीसाठी प्रकाशकांचा फोन ९५२५१-२४९३९५३
अरेरे
१९६३ साली भारतरत्न मिळवणार्या या मराठी माणसाबद्दल मला तितकी माहीती नाही. लाज वाटते, वाईट वाटते. तसे भारतरत्न मिळवणारे बरेच जण माहीत नाहीत. आंबेडकरांना मिळाला होता बहूतेक.
आंतरजालाला व त्यावर काम करणार्यांना धन्यवाद. आधीक खजील होण्याआधी येथे माहीती मिळू शकेल
पद्माकरजी आपल्याला अनेक शुभेच्छा!
भारतरत्ने
सहजराव, भरतरत्न स्व. काणे यांच्यासह इतर भारतरत्नांची जंत्री दुव्यातून दिल्याबद्दल आभार. विकीवर सतत पडिक असूनही हा महत्वाचा दुवा वाचयाचा कसा राहून गेला कोणास ठाऊक. या रत्नांच्या कार्याबद्दल माहिती करुन घेताना उर भरून येतो. मात्र एक नाव खटकते, मोरारजी देसाई. कदाचित ते महाराष्ट्र द्वेष्टे होते म्हणूनही असेल. तसेच काही नावे (जसे की सुभाषचंद्र बोस, लो. टिऴक, इ.) या यादित येण्यापासून केवळ राजकारणामुळे वंचित आहेत हे पाहूनही मन दु।खी होते. असो. विषयांतराबद्दल क्षमस्व.
आपला,
(भारतीय) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥
लोकसत्तेचा वापर करता येईल.
श्री. पद्माकर साहेब,
आपणास लोकसत्तेचा वापर करता येईल. जालापेक्षा वर्तमानपत्र सर्वगामी आहेत.
आपणास शुभेच्छा.
आपला,
द्वारकानाथ
डॉ. पी.पी. काणे - धाकटे चिरंजीव
थोडा बारीक जालतपास केला असता, महामहोपाध्यायांचे धाकटे चिरंजीव डॉ. पी.पी. काणे हे आय्.आय्.टी. , मुंबई येथे
PROFESSORS EMERITI म्हणून कार्यरत आहेत असे दिसते.
दुवा : http://www.phy.iitb.ac.in/academic/Bulletin290605.htm
P. P. Kane, Ph.D. (Rochester)
शोधसूत्र -
विकि --> http://www.payer.de/dharmashastra/dharmash01.htm (जर्मन साईट - धर्मशास्त्राचा इतिहास Vol. V, part II. -- 1962. -- Epilogue - हा तुम्ही अभ्यासलेला आहेच.) --> त्यातला "सन १९५१-माझा धाकटा मुलगा - युनि. ऑफ रॉचेस्टर येथे - आटोमिक आणि न्युक्लिअर फिजिक्स मध्ये पी.एच्.डी." हा उल्लेख -- ->http://prola.aps.org/abstract/PR/v112/i4/p1337_1 -->http://prola.aps.org/abstract/PRA/v51/i3/p2608_1 -->http://www.phy.iitb.ac.in/academic/Bulletin290605.htm
आय.आय.टी. मुंबईत Department of Physics मध्ये चौकशी केल्यास अधिक माहिती मिळू शकेल. (दूरध्वनी : 91 22-2576 7551 )
आपल्या महत्त्वाच्या उपक्रमाला शुभेच्छा!!
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.