मॅथ्यु फ्लिंडर्स

मॅथ्यु फ्लिंडर्स

मॅथ्यु फ्लिंडर्स नी ऑस्ट्रेलियाचा पहिला नकाशा सन १८०० च्या सुमारास काढला. त्यासाठी त्याला १ वर्ष लागले.
त्यानेच हे नाव दिले. त्याने एका गळक्या बोटीतून फेरि केली. या बोटीचे नाव टॉम्स थम्ब असे होते.
त्याने टास्मानिया हे बेट आहे असे दाखवून दिले.
त्याच्या बायको चे नाव ऍन असे होते.
त्याने लिहिलेल्या पुस्तकाचे नाव् 'अ व्होयेज टु टेरा ऑस्ट्रालिस ' असे होते.

- ऋतुजा

लेखनविषय: दुवे:

Comments

अरे वा !

वा ! ऋतुजा !
माहितीची देवाण-घेवाण करणारा हा लेख लहान असला तरी आवडला. लिहित राहा.
माहितीची विचारणा करणारा तुझा पहिला लेख ( 'येथे लहान मुलांसाठी काय आहे?' असा विचारणारा लेख) उडवला गेला असला तरी हा टिकेल असे दिसते. (मोठ्यांच्या जगातले नियम भारी असतात बाबा !)

स्वागत आणि शुभेच्छा :)
-- लिखाळ.

नेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :) (वार्‍यावरची वरात-पुल)

थँक्यु

थँक्यु वेरि मच
-ऋतुजा

थॅक्यूसाठी

ऋतुजाताई,
थँक्यू साठी "धन्यवाद" असा खूप छान शब्द आहे. आणि मजा म्हणजे हा शब्द अनेक भारतीय भाषांमध्ये चालतो. तुझा प्रयत्न खूप आवडला, पुढे काय लिहिणार आहेस?
आपला
(कौतुकमिश्रित) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

आणखी माहिती दे

ऋतुजा,

मॅथ्यू फ्लिंडर्सवर आणखी माहिती दे ना. वाचायला खूप आवडेल. मॅथ्यू फ्लिंडर्सची गोष्टच तुझ्या शब्दांत लिहिता येईल का ते बघ.

तुला लिहिणे कठिण होत असेल तर कोणा मोठ्याची मदत घे.

अवांतर..

तर कोणा मोठ्याची मदत घे.

म्हणजे कोणाची? :))

म्हणजे

ऋतुजाच्या आई-बाबांची, दादा ताई, काका-काकू, मामा-मामी असतील तर त्यांची. :)

मीच लीहीते आहे

हो अजुन माहीती लिहिन्.
हे मीच लीहीते आहे.

-ऋतुजा

छान

ऋतुजा, लिहीत रहा.
तुझ्या लेखातून चांगली माहिती मिळाली. तुझे वाचन चांगले दिसते आहे.

चित्रा

ओ के

मला ही माहिती नेट वर मिळाली . आणि हीच माहीति मी शाळेत दीले होते.
त्याची साईट वर मीळाली.
-ऋतुजा

ओ के

मला ही माहिती नेट वर मिळाली . आणि हीच माहीति मी शाळेत दीले होते.
त्याची साईट वर मीळाली.
-ऋतुजा

नवी माहिती

ही माहिती त्याला नवी आहे. वाचून उत्सुकता चाळवली गेली.

(त्याला कमीत कमी शब्दात अधिकाधिक माहितीबद्दल ओढ आहे. त्याने नुकतीच एका जादुगाराची तीन ओळींची थक्क करून सोडणारी जाहिरात वाचली. ओळी पुढीलप्रमाणे..
१. भारतका नंबर वन!
२. जादुगार अबक.. (नाव आठवत नाही)
३. हाथी गायब!
यातली तिसरी कलेजा खलास करणारी)

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

हा हा हा!

हा हा हा हा हा !!!

म्हणजे

कलेजा खलास करणारी म्हजे कय?
-ऋतुजा

छान माहिती आहे

स्वागत -
असेच थोडक्यातसुद्धा खूप माहिती लिहिणारे सांग.
मग आम्हा लंब्या गप्पिष्टांचा कलेजा खलास झाला की बघ!
मॅथ्यू फ्लिंडर्स पुन्हा ऑस्ट्रेलियात गेला का? ऍनसुद्धा मोठी धीराची बाई असणार. तिच्याबद्दल तुला माहिती आहे का?

म्हणजे

कलेजा (उर्दू) म्हणजे काळीज, जिगर (उर्दू), लिव्हर (इंग्रजी)

काळजावर आधारित काही मराठी वाक्प्रचार खालील प्रमाणे

काळजात धस्स होणे - एखादा धक्का बसल्यानंतरची होणारी अवस्था, ('शॉक' बसणे)
कलिजा खलास होणे -एखाद्या गोष्टीवर फिदा होणे, (जाम खूष होणे, एखादी गोष्ट 'कूल' वाटणे)
काळजाला हात घालणे -एखाद्या गोष्टीबद्दल दया वाटणे. ('पिटी फिल' करणे)

~~लहान मुले अडचणीत आणणारे प्रश्न विचारण्यात पटाईत असतात, उत्तरात चुका असल्यास नवल नाही~~

अजून २

१. काळजात रुतून बसणे ;)
२. काळीज धडधड करणे (काळीज माझं धडधड करी... उडते पापणी वरचे वरी - शा. दादा कोंडके)

हे काय??????

हे आता काय म्हण्यचे बर?

-ऋतुजा

वाक्प्रचार

याला वाक्प्रचार म्हणतात. म्हणजे वाक्य वाचल्यावर जो अर्थ 'दिसतो' त्याऐवजी दुसराच अर्थ 'असतो'.

उदा. काळजात रुतून बसणे - म्हणजे खूप आवडणे.

चांगली माहीती!

चांगले लिहीले आहेस. अजून लिहीत राहा. अशी वेगळी माहीती वाचायला आवडली.

हेच

हेच म्हणते,माहित नसलेली माहिती वाचायला आवडली,थोडे अजून सविस्तर लिही ना,वाचायला आवडेल

अल्पाक्षरी

अल्पाक्षरी शब्दयोजना व नवीन माहिती.

उपक्रमावर स्वागत.

पुढेही लिहा... क्वीन्सलँड, व्हिक्टोरिया या राज्यांबद्दल अशी काही रंजक माहिती आहे का?

आयडीया चांगली आहे.

नंतर ही माहिती विकिवरही टाकता येईल.

ऋतुजा हलकेच घे हो (टेक इट इझी!) या भूगोलांच्या सरांचे प्रश्न वाचून घाबरू नकोस पण लिहित जा. आम्ही वाचू!

खरे आहे

किंबहुना इथे जितकी अधिक लहान मुले लिहू लागतील तितके उपक्रमाचे स्टँडर्ड सुधारेल, अशी प्रस्तुत लेखकाची प्रामाणिक भावना आहे.

खरे आहे. मुले ही काहीही झालं तरी देवाघरची फुले (आणि आंबेडकर आणि शाहू महाराज :)

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

हे खरे आहे

हेच तर खरे अहे.
-ॠतुजा

हो

ऑस्ट्रेलियाची राजधानी सीडनी अहे
ऑस्ट्रेलियाचे चलन आहे डॉलार आहे
ऑस्ट्रेलियातला खेळ अहे फूट्टी

पुडची माहिती ननतार लीहिते

-ऋतुजा

शाब्बास !

अरे वा ! हुशारच आहे. ऑस्ट्रेलियातला खेळ अहे फूट्टी
म्हणजे कोणता ?

पुडची माहिती ननतार लीहिते

नंतर तर नंतर ! पण लिहित राहा :) बाकी तुझे शुद्धलेखन आणि माझे शुद्धलेखन सारखेच आहे. :)
त्याच्याकडेही लक्ष देत जा ! म्हणजे शुद्ध लिहीत राहा. ( म्हणजे तुम्ही अशुद्ध लिहिता का ? असा प्रश्न विचारु नको .)
जे लिहिलेले कळते ते शुद्ध असते असे आम्ही समजतो .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अधिक माहिती

ऋतुजा,
उपक्रमवर तुमचे स्वागत! तुम्ही दिलेली माहिती चांगली आहे, पण एक खुलासा इथे करतो, ऑस्ट्रेलिया या नावाबद्दल -

ऑस्ट्रेलिया हा दक्षिणेतला एक विशाल भूखंड आहे हे रोमन काळापासून "सर्वज्ञात" होतं (कसं होतं ह्याचा खुलासा कोणी केला नाहिये). काही लोकं म्हणतात की ऍरिस्टॉटलने प्रथम "ऑस्ट्रेलिया" बद्दल आपल्या एका पुस्तकात नोंद केली आणि त्यावरुन ही "कवीकल्पना" लोकांत पसरली. नंतर टॉलेमीच्या जॉग्राफिया पुस्तकात त्यानी दक्षिणेचा अज्ञात देश 'टेरा इन्कॉग्निटा ऑस्ट्रालिस' असा उल्लेख केला आहे.

नंतर मॅथ्यू फ्लाईंडर्सने जेंव्हा दक्षिणेच्या नवीन सापडलेला भूखंडाला प्रदक्षिणा घालून ती अनेक बेटं नसून एक सलग भूप्रदेश आहे हे सिद्ध केले तेंव्हा त्यानी असा तर्क केला की आपल्याला तो "टेरा ऑस्ट्रालिस" सापडला, म्हणून त्यानी ऑस्ट्रेलिया हे नाव सुचवले.

खिरे

दुवा

इंटर्नेटवर नेटाने थोडी शोधाशोध केल्यावर हा सुंदर दुवा मिळाला -
दुवा

उत्तरे

सॉरी आधी चुकीचे लीहिले.
१. ऑस्ट्रेलियाची राजधानी
कॅनबेरा आहे.

२. ऑस्ट्रेलियातील विविध प्रांत / राज्ये, त्यांच्या राजधान्या
नु साऊथ वेल्स् - सिडनी
व्हिक्टोरिया - मेलबर्न
साऊथ ऑस्ट्रेलिया - अडेलेड
वेस्ट् ऑस्ट्रेलिया - पर्थ
क्विन्स् लँड - ब्रिस्बेन्

५. ऑस्ट्रेलियाचा एक कैद्यांची वसाहत (पीनल कॉलनी) म्हणून सुरुवात होऊन त्यापुढील संक्षिप्त (ब्रीफ) इतिहास
हे आता माहित नाही. विचारुन् नन्तर लिहिते.

६. ऑस्ट्रेलियातील आदिवासींबद्दल (ऍबॉरिजिनीज़) थोडक्यात माहिती
हे पण माहीत नाही - (काका मला सांगणार आहे मग तो लिहिणार आहेहे अस म्हणाला.)

७. ऑस्ट्रेलियातील खाद्यवैशिष्ट्ये (म्हणजे खास ऑस्ट्रेलियातले कोणकोणते पदार्थ आवर्जून खाण्यासारखे आहेत किंवा टिपिकल आहेत)
मी चिकन खाते. कारण मला खुप आवडते. माझे फ्रेंड्स् चिपस्/बर्गर् खातात. आणी अजून् खुप काही काही खातात्. मटन पण खुपजण खातात. माझ्या बाबांच्या कामाच्या ठेकाणे बार्बेक्यु असतो.

८. ऑस्ट्रेलियातील खेळ
इथे सगळे फुटी खेळतात. म्हणजे फुटबोलसारखा पण वेगळा

९. ऑस्ट्रेलियातील शाळकरी मुलाच्या आयुष्यातील एक दिवस (अ टिपिकल डे इन द लाइफ ऑफ ऍन ऑस्ट्रेलियन स्कूलकिड)
हे नाही येत्

१०. जमल्यास ऑस्ट्रेलियन भाषावैशिष्ट्ये (म्हणजे ऑस्ट्रेलियन इंग्रजीतले काही खास शब्द / वाक्प्रचार [फ्रेझेस] किंवा भाषेचे वेगळेपण, उच्चारातले [प्रोनन्सिएशन] फरक, झालेच तर त्यातून होणारे विनोद वगैरे - म्हणजे 'डिड यू कम हियर टूडाय?' 'नो, आय केम हियर टू लिव्ह!' वगैरे)
हे खुप मोठा आहे. मी नन्तर लिहिते.

-ऋतुजा

वा वा

  • हे पण माहीत नाही - (काका मला सांगणार आहे मग तो लिहिणार आहेहे अस म्हणाला.)
  • मी चिकन खाते. कारण मला खुप आवडते. माझे फ्रेंड्स् चिपस्/बर्गर् खातात. आणी अजून् खुप काही काही खातात्. मटन पण खुपजण खातात. माझ्या बाबांच्या कामाच्या ठेकाणे बार्बेक्यु असतो.
  • हे नाही येत्


अरे वा ! घरात लहान कोणी आल्यावर इतर मोठ्यांना जो आनंद होतो तसाच मला झाला आहे.
या तर्‍हेच्या संकेतस्थळांवर इतकी सहज, साधी आणि निरागस उत्तरे वाचून अतिशय बरे वाटले. ऋतुजा तू इथे भरपूर लेखन कर !
--('पोलिटिकली करेक्ट' भाषेला कंटाळलेला) लिखाळ.

सर्किटकाका,

माझी मुलगी सध्या थर्ड ग्रेड मध्ये आहे.

तिला मराठी येतं का लिहायला? म्हणजे येत असल्यास इथेच येऊन लिहायला प्रोत्साहित केलंत तर? हा प्रकार कशाप्रकारे फुलवता येईल यावर विचाराधीन आहे.

बायदवे, आमच्या फोर्थ ग्रेडचा फक्त स्वतःचे नाव मराठीत लिहिण्याइतपतच मराठीशी संबंध आहे. :-( इतरांनी आणि ऋतुजाने ही लेखनकला कशी साध्य केली त्याबद्दल काही टीपा आहेत का?

मला पण चालेल

मला पण फ्रेंड्शीप करायला आवडेल तीच्याशी
-ऋतुजा

 
^ वर