वाहन चालक रहदारी चे नियम पाळत नाहीत, कारणे व उपाय.

हा खालील चर्चा चा
वाहन चालवणे म्हणजे किल्ली फिरवुन (अगर लाथ मारुन) स्टिअरिंग फिरवत पुढे जाणे हे खरे काय?
(चर्चा येथे सुरु झाली)
पुढील भाग आहे.

आपण सर्व जरी रहदारीचे नियम पालन करणे आवश्यक मानतो तरी ते नियम स्वतः ही मोडतो. कारणे आहेत. नाही असे नाही. परंतु, परिणाम काय होतो? स्वतः बरोबर इतर व्यक्ती चा जीव धोका मध्ये घालतो. सर्व च वेळी धोका होईल असे नाही, खरचटणे, त्वरित भरणारी जखम वगैरे वर निभावले जाते. कधी कधी अंतिम संस्कार ची वेळ येते. अशी वेळ आली तर चूक दुरुस्त करणे अशक्य आहे हे आपण सर्व पूर्ण पणे जाणून आहोत. विषय चे महत्व ओळखून मी चर्चा प्रस्ताव ठेवला. सर्वानी भर भरुन प्रतिसाद दिला. ते बद्दल मी सर्व चा आभारी आहे.

प्रस्ताव ठेवला तेव्हा मी खालील ५ मुद्दे दिले.

 1. सुरक्षा
 2. पर्यावरण
 3. व्यवस्थापन
 4. यंत्र ज्ञान
 5. शिक्षण

पहिला च मुद्दा सर्व ना इतका महत्व चा वाटला की एक पृष्ठ अपुरे पडले. आपण फक्त दोष दाखवुन कपाळ ला हात लाऊन बसु नये. नियम का पाळले जात नाहीत या चे मूळ शोधुन मूळ वर घाव घालावा. सर्व ना पटले. उपाय सुचत आहेत. लोक लिहित आहेत. व्यवहारी उपाय योग्य संस्था शोधून पाठवणे चा मानस आहे.

एक मुद्दा असा आला की, 'दुचाकी वाहन चालक शिरस्त्राण वापरत नाहीत' दिसलेले कारण दुचाकी वर शिरस्त्राण ठेवणे स सुरक्षित सोय नाही हा मुद्दा सध्या चर्चा मध्ये आहे.

चला नवा दम ने पुढे जाऊ.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम!

उत्तम केलेत.
आशा आहे येथे ही आपल्याला अपेक्षित अशी चर्चा होईल.

आपला
गुंडोपंत

शिरस्त्राण

एक मुद्दा असा आला की, 'दुचाकी वाहन चालक शिरस्त्राण वापरत नाहीत' दिसलेले कारण दुचाकी वर शिरस्त्राण ठेवणे स सुरक्षित सोय नाही हा मुद्दा सध्या चर्चा मध्ये आहे.

हे कारण तितकेसे संयुक्तिक वाटत नाही. कारण गाडी जर चालू स्थितीत असेल तर शिरस्त्राण डोईवर हवे. जेव्हा गाडी पार्क केली असेल तेव्हा बाजूला शिरस्त्राण अडकवण्यासाठी एक कडी बसवून घेता येते.

या अनास्थे मागेमुख्यतः शिरस्त्राण घातल्यावर केस, मानेजवळची त्वचा, घाम, वळून बघण्यातली अडचण, शिरस्त्राणाचा आकार वगैरे गोष्टी कारणीभूत असाव्यात.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

हेल्मेट -टुबी ऑर नॉट टुबी

हेल्मेट बद्दल अनेकदा लोक कळवळ्याब्´ने बोलतात.

हेल्मेट वापरले तर प्रवासाचा शीण जाणवत नाही. चेहर्‍याची त्वचा, डोळे आणि केस यांचे आरोग्य धूर, धुळ यांमूळे बिघडत नाही याचा मला अनुभव आहे.

पण पुण्यातल्या रस्त्यांवरून शिरस्त्राण घालून जाणे म्हणजे मानदुखी आणी पाठदुखीला आमंत्रण आहे असे वाटते. तसेच वळून पाहता येत नाही, कडेचे दिसत नाही. (दर्शनकक्षा कमी होते ), घाम येतो, केस गळतात असे काही मुद्दे आहेतच.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा ऐकला आहे (स्वानुभव नाही) की हेल्मेट असताना तोंडातल्या गुटख्याची पिंक टाकता येत नाही ;)

-- (शिरस्त्राण वापरणारा ) लिखाळ.

आज आमचा श्रावण एक महिन्याचा झाला ! आज सायंकाळी त्याच्या वाढदिवसानिमित्त 'तीर्थ-प्रसाद' आहे :)

गुद्दे

सुरक्षा

आपन् मसं नेम् पाळु हो पन् इत्रांन्नी न्हाय् पाळ्ले तर् मंग नुस्कानी कोन् आन् कशी भरुन देनार? मान्स जिवानिशी जात्यात.

पर्यावरण

हल्लि या परयावरनावर लई मान्स बोल्त्यात. सोता शीमीट् कांकरीट च्या जंगलात र्‍हात्यात. आन लोकंन्ला अक्कल शिकित्यात.

व्यवस्थापन
अवो यांचीच् समदी येवस्था कराया लागतीया. लोकांच्या पैशातून. यांच गाडी घोड बांदायची येवस्था, खान्या पिन्याची येवस्था,बरळायची येवस्था, सगळी ईव्हेंट म्यानेजमेंट

यंत्र ज्ञान
आमचा पिरा फिटर ला काय कुनी न्यान दिल्त् काय्? सोताच सोता शिक्ला. कंच बी वींजान खोलून् बशिवतोय्. घासलेटवर फटफट्या फिरितो.हाताळाय भेटल् कि बराबर् न्यान व्हतय्. काड्या केल्या बिगर यंत्रन्यान व्हत नाय्.
शिक्षण
अवो पुस्तकातल्या न्यानाल ल्वॉक शिक्शान म्हंत्यात. आमच्या श्येतात आजोबाच्या टायमाला चार आने रोजान् काम करनार्‍या अंगठेभाद्दरान आमच्या शेतजमीनी खरेदी केल्यात. मंबईत् बाराधा च्या ट्र्का फिरितोय. कागदाला 'कागुद' फिरितोय. मान्साला मानुस फिरितोय्. किन्नरचे लई डायवर केलेत.
ह घ्या.
( वडिलोपार्जित शेत्या इकलेला)
प्रकाश घाटपांडे

अवांतर वाटेल पण विचार करा

काल ही बातमी वाचली

आता बोला हजार रुपयांसाठी कोणाचा कोथळा काढून मोटरसायकल घेणारी व्यक्ति तुमचे वाहतूक नियम, पर्यावरण ह्या गोष्टींची किती कदर करेल?

असो तुमच्या प्रयत्नांना कमी लेखण्याचा माझा प्रयत्न नाही आहे. तुम्हाला पटते ते तुम्ही करा. ह्या संकेतस्थळावर येणार्‍यांपैकी तुमच्या "टारगेट ऑडीयन्सस्" नसेल असे मला वाटते. व ज्यांना मानवाचा जन्म मिळून मेंदूचा सभ्य वापर करणे माहीत नाही व ज्यांना आपण रस्त्यावर वाहन चालवण्यापासून रोखू शकत् नसलो तर हा सर्व शब्दांचाच खेळ आहे. अजून कशाला खेळायचा, नवा खेळूया :-)

एक उपाय असा पण आहे की शक्यतो अत्यंत "प्रभावी" सार्वजनीक वाहतूक व्यवस्था निर्माण करायची की जेणे करुन लोकांना स्वतःचे वाहन असायची गरज नाही. काय् वाटते? (लगेच शक्य नाही पण हा मार्ग चोखाळलाच जाइल कारण शेवटी इंधनसाठे पण मर्यादीत आहे/ पर्यावरणाला वाचवायचे आहे)

सार्वजनीक वाहतूक व्यवस्था

अत्यंत "प्रभावी" सार्वजनीक वाहतूक व्यवस्था निर्माण करायची की जेणे करुन लोकांना स्वतःचे वाहन असायची गरज नाही. काय् वाटते?

एकदम महत्वाचे आहे. त्याची खूप गरज आहे. अमेरिकेत "कार उद्योमंनी" व्यवस्थित सार्वजनीक वाहतूक व्यवस्था सुरू होण्या आधीच मारली असे म्हणतात... त्यांचा देश आणि लोकंसख्येच् घनता यात आणि आपल्यात जमिन अस्मानाचा फरक आहे. आपल्याकडे जर सार्वजनीक वाहतूक व्यवस्था नीट नसली तर भविष्याच्या दृष्टीने मारक ठरू शकेल.

चित्र

एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते असे म्हणतात. ही चित्रफीत पाहून याची कल्पना येते. :)

">

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

वॉव! + एक गोष्ट

सॉलीडच आहे! चित्र हजार शब्दांच्या असले तर ही चित्रफित हजार वर्षांबद्दल सांगते - आपल्याला शिस्त आवडत नाही!

एक खरी ोष्ट (अर्थात पुण्यातली, शंकरशेठ रोडवर कुठेतरी..): एक जेष्ठ नागरीक पादचार्‍यांसाठी "चाला" म्हणून दिवा लागल्यावर, रस्ता ओलांडू लागले. तेव्हढ्यात एक दुचाकीस्वार त्याला लाल दिवा असताना तो तोडून पुढे आला. हे गृहस्थ त्याला ओरडले की "आमच्यासारख्या माणसांना (जेष्ठ) गोंधळायला होते, सिग्नल कसा तोडतोस?" त्वरीत उत्तर मिळाले, "तुम्हाला काही लागले का?" हे गृहस्थ वैतागले आणि बाजूस उभ्या असलेल्या पोलीसास म्हणाले की "हा बघ सिग्नल तोडून रस्ता ओलांडणार्‍यांच्या मधे येत होता". 'स्थितप्रज्ञ' पोलीसाने प्श्नार्थी उत्तर दिले, "अहो काका, पण त्याने तुम्हाला कुठे लागवले का (धडक मारली का)?"

तात्पर्यः आपल्याकडे जे काही नियम, कायदे वगैरे आहे ते जसेच्या तसे तूर्त पाळले तरी बर्‍याच सुविधा होतील.. एकदा कायदे पाळायची सवय झाली की मग अर्थातच त्यात योग्य दुरुस्त्या करणे शक्य आहे कारण त्यावेळेस "कायदा वापरून अनुभवातून" कळेल की नक्की काय बदल करण्याची गरज आहे ते.

सहमत

आपल्याकडे जे काही नियम, कायदे वगैरे आहे ते जसेच्या तसे तूर्त पाळले तरी बर्‍याच सुविधा होतील..

आपल्या मताशी सहमत आहे. अडचण अशी आहे की आपल्याकडे लोकांचा कल सार्वनजिक कायदे पाळण्याकडे फारसा नसतो. असे का हा स्वतंत्र चर्चाविषय होऊ शकेल. गरज सिव्हिक सेन्सची आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

पटयत का बघा

>>आपल्याकडे लोकांचा कल सार्वनजिक कायदे पाळण्याकडे फारसा नसतो. गरज सिव्हिक सेन्सची आहे.

सहमत. "वाहन चालक रहदारी चे नियम पाळत नाहीत, कारणे व उपाय." हा विषय चालू आहे यात महत्वाचे असे की "नियम पाळत नाहीत" कोण? तर "लोक"...आता एक वेगळे उदाहरण देतो. पटतय का पहा.

आता एक चर्चाविषय घ्या "गो ना दातारशास्त्री आणि इतर रम्यकथाकार."
आता आपल्याकडे सर्वजण हुशार. काहीजण तर पंडीत व मोजकी लो़क तर सर्वश्रेष्ठ मानली जाणारी. कर्तृत्वाने तसेच समाजमान्यतेनुसार देखील (आमच्या गुंडोपंताच्या प्रमाणभाषा - बोलीभाषाप्रमाणे). तर आता अशी लोकपण ह्या वरच्या चर्चेत मुळ चर्चाविषयाशी संबध नसलेला "फ्रेन्च उच्चार" घेऊन अवांतर उच्छाद मांडू लागली. (सायकलस्वार सिग्नल सोडून घुसले तसे) आता माझ्यासारख्याला वाटते ह्या शहाण्या लोकांकडे "आपापसात" किंवा वेगळी चर्चा करावी एवढा सेन्स नाहीये ?. सुशिक्षीत (फक्त साक्षरच म्हणूया खरतर ) असतील पण हा सुसंस्कृतपणा नक्कीच नाही आहे.

काही लक्षात येतय? "तुम्हाला काही लागले का?" तद्वत "तुम्ही गप्प बसा, तुमचा चर्चाविषय नाही ना. संपादकमंडळ आहे सर्मथ तुम्ही कशाला बोलताय. असे मला प्रतिसाद आले तर नवल नाही. :-) मला उद्यापासून लेखनबंद झाले तर नक्की समजा त्या विद्वानांपैकी एकजण तरी नक्की संपादकमंडळात आहे. :-)

ज्यांना कळत असे समजण्यात येते ती लोकपण असे चुकीचे वागतात तर सामान्यांचे काय घेऊन बसलात. असो नामांकीत लोकांना सर्व माफ हा देखील अस्सल भारतीय कायदा उपक्रमावर लागू असेल. ;-) पण भीती तेथेच आहे. अहो ते पण करतात तर मग आम्हीपण ह्या प्रमाणे जो तो सायकलस्वार अधे मधे येऊ लागतो. पुढची कथा तर आपण जाणताच्

असो हा देश असा आहे की प्रत्येकाला आपणच इथले राज्यकर्ते व हम करे सो कायदा असे वाटते.

गॉट इट? हाउज् दॅट्?

उदाहरण

सहजराव,
रहदारीच्या भाषेत बोलायचे तर आपण दिलेले उदाहरण म्हणजे सायकलला दिवा नाही या प्रकारात मोडण्यासारखे आहे आणि आजूबाजूला अनेक अपघात चालू आहेत. मराठी संकेतस्थळांवर बरेच इंटरेष्टींग प्रकार जाणूनबुजून केले जातात. इतरत्र नजर टाकल्यास आपल्या दृष्टीस पडतील. असो. ही चर्चा मराठी संकेतस्थळांवर भरकटण्याआधी थांबवूयात. यावर अधिक चर्चा करायची असेल तर नवीन चर्चाविषय किंवा खरडवहीत आपले स्वागत आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

सायकलचा दिवा

याच पुण्यात सायकलला दिवा चालू नसेल तर पोलिस पकडत असे. अर्थात ही जुन्या लोकांनी सांगितलेली माहीती आहे. डायनामो अगोदर रॉकेलचे दिवे असत. आत्ताच दिवा वार्‍याने विझला अशी थाप त्यावेळचे तरूण मारत असत. त्यावेळी पोलिस त्या दिव्याला हात लावुन तो गरम आहे का? याची उलटतपासणी करत असे.

प्रकाश घाटपांडे

वा काय वाजवलंय!

वा सहजराव
काय वाजवलंय या सो कॉल्ड हुषार लोकांना!

मला उद्यापासून लेखनबंद झाले तर नक्की समजा त्या विद्वानांपैकी एकजण तरी नक्की संपादकमंडळात आहे. :-)

सही टाकलाय!! ही पहा दहशत... कोण म्हणतंय फक्त बुश यात आहे?

ज्यांना कळत असे समजण्यात येते ती लोकपण असे चुकीचे वागतात तर सामान्यांचे काय घेऊन बसलात. असो नामांकीत लोकांना सर्व माफ हा देखील अस्सल भारतीय कायदा उपक्रमावर लागू असेल.

एकदम झकास!

अशी लोकपण ह्या वरच्या चर्चेत मुळ चर्चाविषयाशी संबध नसलेला "फ्रेन्च उच्चार" घेऊन अवांतर उच्छाद मांडू लागली.

उच्छाद? दम आणलाय हो यांनी नाकात.
एक वेळ माशा तरी हात हलवून हाकलता येतील, डास ओडोंमॉस ने घालवू, झुरळांवर पण बेगॉन ने नियंत्रण आणू पण सो कॉल्ड पंडीतांची भाषा शुद्धता ?.... अवघड आहे बॉ!

आपला
मट्ठ, कुजकट नि एक नंबरचा हलकट
गुंडो.

सुसूत्रता

वाहवा ! कय मस्त चित्रफित आहे. देव असेल तर तो खरेच भारतात (सर्वत्र, चौकाचौकात) आहे असे वाटले.
नियमभंगामधली एकी आणि रस्त्यावर नियम डावलून वाहन चालवताना असलेली सुसूत्रता अतिशय भावली. अशा वेळी सिग्नल दिसल्यावर थांबणार्‍याला मागून येणार्‍याची धडक बसली तर तो नियम पाळणारा उपट्सूंभच दोषी ठरणार हे नक्की. (मी स्वतः सिग्नलला पहिला थांबणारा असेन तर मागे वळून कोणी भरदाव आपल्या दिशेने येत नाही ना ! याची खात्री करुन थांबत असे. नाहितर तो अंगावरुन गाडी घेवून जायचा :)

अवांतर : या पिवळ्या रिक्षा कोण्या गावातल्या?

-- (गाडिवरला) लिखाळ. (पुण्यात दुचाकीला गाडी म्हणतात हे वेगळे सांगायला नकोच ;)

आज आमचा श्रावण एक महिन्याचा झाला ! आज सायंकाळी त्याच्या वाढदिवसानिमित्त 'तीर्थ-प्रसाद' आहे :)

सहमत

देव असेल तर तो खरेच भारतात (सर्वत्र, चौकाचौकात) आहे असे वाटले.

म्हणून तर भारत आत्मशुद्धी वगैरेसाठी प्रसिद्ध आहे.
पण इथे चूक शासन/महापालिकेची वाटते. दोन रस्त्यांमध्ये दुभाजक असायला हवा म्हणजे इकडून तिकडे होणारे मुक्त आवागमन थांबेल. :) रिक्षांबद्दल काही कल्पना नाही बुवा!
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

बरोबर आहे / उपाय..

>>>पण इथे चूक शासन/महापालिकेची वाटते. दोन रस्त्यांमध्ये दुभाजक असायला हवा म्हणजे इकडून तिकडे होणारे मुक्त आवागमन थांबेल.

अगदी बरोबर आहे. जेंव्हा "प्लॅनिंग" चा प्रश्न असतो तेंव्हा ती चूक अर्थातच शासन/महापलीकेचीच असते.

पण ते होत नसेल तर काय करावे? : आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर लोकनियुक्त सभासद पाठवत असतो. पालीकेसाठी, विधानसभा आणि लोकसभा (त्यात परत विधानपरीषद आणि राज्यसभापण आहेतच). या लोकनियुक्त सभासदांना गाठून आपण आपले प्रश्न मांडले पाहीजेत. दुर्दैवाने सर्वसाधारणपणे आपल्याला तशी सवय नसते आणि त्यामुळे त्यांनापण तशी ऐकायची सवय नसते. हे बदलले पाहीजे. त्यांच्याकडे त्यांच्या मतदार संघाचे म्हणून निधी असतात त्याचा गैरवापर करण्याऐवजी जरा लोकोपयोगीवापर तरी लोकं त्यांच्या मागे लागली तर होऊ शकेल असे वाटते. हे (लोकं मागे लागणे) मी येथे (अमेरिकेत घडतानाअ पाहीले आहे). तसेच पुण्यातपण माहीतीत अशी घटना घडली: डेड एन्डच्ला इमारत असल्यामुळे र्स्त्यासाठी जागा असून पाऊलवाटच होती. पण नगरसेवकाच्या कानावर सतत ही गोष्ट घालून तेथे र्स्ता झाला. त्याचे त्याला पण श्रेय मिळाले आणि आपले कामही झाले!

ऍनिमेशन

एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते असे म्हणतात. ही चित्रफीत पाहून याची कल्पना येते. :)

अगदी मान्य...

योगायोगाने याच संबंधीचे एक गंमतीशीर ऍनिमेशन आजच (हे असंच लिहीतात का? मराठी शब्द काय?) इमेलवर मिळाले ते मोह आवरत नाही म्हणून लावले आहे ते बघा - इटलीवरचे आहे, पण भारताला पण तितकेच लागू आहे. हा दुवा पहा

ग्रेट!

हे ऍनिमेशन (इटली आणि युरोपिअन युनियन) मस्तच आहे. ते बघितल्यामुळे आता मी "सोनीयाजींना" परत कद्द्द्द्दीही विदेशी म्हणणार नाही:) आता कळले की त्या इतक्या सहज भारतात कशा रुळू शकल्या ते! :-)

मस्त

हे आधी पाहिले होते. :)
यात बरेचसे तथ्य आहे. फरक इतकाच आहे की भारताच्या मानाने येथील अड्चणी बर्‍याच कमी आहेत, पण युरोपच्या मानाने बर्‍यापैकी गंभीर आहेत. भारत एका टोकाला आणि जर्मनी, इंग्लंड दुसर्‍या टोकाला असे धरले तर ईटली साधारण मध्यावर येईल.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

सहमत

आता कळले की त्या इतक्या सहज भारतात कशा रुळू शकल्या ते! खरच की....

मराठीत लिहा. वापरा.

दुसरे टोक/दुवा

आजच बातमी वाचली की जर्मनीतील एका गावात सर्व ट्रॅफीक सिग्नल काढून टाकण्यात आले आहेत. सर्व जबाबदारी लोकांवर टाकण्याचा हा प्रयोग आहे आणि हा यशस्वी होत आहे. एका अर्थाने भारतातही बर्‍याच ठिकाणी सिग्नल असून नसल्यासारखे आहेत. फरक आहे तो लोकांच्या प्रतिसादांमध्ये.

अवांतर : आधीचा दुवा काम करत नसल्याचे लक्षात आले म्हणून दुवा बदलला आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

चर्चा उत्तम प्रकारे चालली आहे

अभिजित: या अनास्थे मागेमुख्यतः शिरस्त्राण घातल्यावर केस, मानेजवळची त्वचा, घाम, वळून बघण्यातली अडचण, शिरस्त्राणाचा आकार वगैरे गोष्टी कारणीभूत असाव्यात.
लिखाळ : हेल्मेट बद्दल अनेकदा लोक कळवळ्याब्´ने बोलतात. हेल्मेट वापरले तर प्रवासाचा शीण जाणवत नाही. चेहर्‍याची त्वचा, डोळे आणि केस यांचे आरोग्य धूर, धुळ यांमूळे बिघडत नाही याचा मला अनुभव आहे. पण पुण्यातल्या रस्त्यांवरून शिरस्त्राण घालून जाणे म्हणजे मानदुखी आणी पाठदुखीला आमंत्रण आहे असे वाटते. तसेच वळून पाहता येत नाही, कडेचे दिसत नाही. (दर्शनकक्षा कमी होते ), घाम येतो, केस गळतात असे काही मुद्दे आहेतच.

सहज: काल ही बातमी वाचली. आता बोला हजार रुपयांसाठी कोणाचा कोथळा काढून मोटरसायकल घेणारी व्यक्ति तुमचे वाहतूक नियम, पर्यावरण ह्या गोष्टींची किती कदर करेल?

आता बोला हजार एक उपाय असा पण आहे की शक्यतो अत्यंत "प्रभावी" सार्वजनीक वाहतूक व्यवस्था निर्माण करायची की जेणे करुन लोकांना स्वतःचे वाहन असायची गरज नाही. काय् वाटते? (लगेच शक्य नाही पण हा मार्ग चोखाळलाच जाइल कारण शेवटी इंधनसाठे पण मर्यादीत आहे/ पर्यावरणाला वाचवायचे आहे)

विकास : तात्पर्यः आपल्याकडे जे काही नियम, कायदे वगैरे आहे ते जसेच्या तसे तूर्त पाळले तरी बर्‍याच सुविधा होतील.. एकदा कायदे पाळायची सवय झाली की मग अर्थातच त्यात योग्य दुरुस्त्या करणे शक्य आहे कारण त्यावेळेस "कायदा वापरून अनुभवातून" कळेल की नक्की काय बदल करण्याची गरज आहे ते.

सहज : ज्यांना कळत असे समजण्यात येते ती लोकपण असे चुकीचे वागतात तर सामान्यांचे काय घेऊन बसलात. असो नामांकीत लोकांना सर्व माफ

लिखाळ: वाहवा ! काय मस्त चित्रफित आहे. देव असेल तर तो खरेच भारतात (सर्वत्र, चौकाचौकात) आहे असे वाटले. नियमभंगामधली एकी आणि रस्त्यावर नियम डावलून वाहन चालवताना असलेली सुसूत्रता अतिशय भावली. अशा वेळी सिग्नल दिसल्यावर थांबणार्‍याला मागून येणार्‍याची धडक बसली तर तो नियम पाळणारा उपट्सूंभच दोषी ठरणार हे नक्की.
राजेंद्र: पण इथे चूक शासन/महापालिकेची वाटते. दोन रस्त्यांमध्ये दुभाजक असायला हवा म्हणजे इकडून तिकडे होणारे मुक्त आवागमन थांबेल.
विकास: पण ते होत नसेल तर काय करावे? : आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर लोकनियुक्त सभासद पाठवत असतो. पालीकेसाठी, विधानसभा आणि लोकसभा (त्यात परत विधानपरीषद आणि राज्यसभापण आहेतच). या लोकनियुक्त सभासदांना गाठून आपण आपले प्रश्न मांडले पाहीजेत. दुर्दैवाने सर्वसाधारणपणे आपल्याला तशी सवय नसते आणि त्यामुळे त्यांनापण तशी ऐकायची सवय नसते. हे बदलले पाहीजे.
चित्रा : एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते असे म्हणतात. ही चित्रफीत पाहून याची कल्पना येते. :) अगदी मान्य...

फक्त एक च प्रतिक्रिया वेगळी आहे बाकी सर्व प्रतिक्रिया काय बदल पाहिजे या बाबत आहेत. कोणी एक अभ्यासू म्हणत आहेत की, उपक्रम वर वैचारिक चर्चा होऊ शकत नाही. फक्त कथा, कादंबरी, काव्य हे च येथील चर्चा विषय आहेत. परंतु, प्रतिसाद पाहता वरील विषय सुद्धा चर्चा योग्य वाटतो. अहो भाषा हे साधन आहे. हे साधन जीवन सुधारणे स्तव वापरणे शक्य नसेल तर ते लुप्त होईल.

इटली ची रहदारी ची चित्रफीत पाहुन भारत व इटली मध्ये साम्य आहे व तेथील व्यक्ती भारत मध्ये लवकर रुळतात हे चाणक्य यांचे मत पटले. परंतु, चित्रा या नी योग्य वेळी योग्य स्थळी ही चित्रफीत दाखवली या बद्दल धन्यवाद.

शिरस्त्राण सुरक्षित पणे ठेवणे शक्य आहे असे कोणी तरी सांगितले. मला पटले नाही. पुर्वी बजाज स्कूटर ला २ शिरस्त्रणे ठेवणे स डिकी होती. ती पद्धत मला सुरक्षित वाटते. आणखी काही त्रुटी दिसतात जसे घाम येणे, पहाणे स अडचण येणे वगैरे. घाम करता कापडी अवरण ने डोके झाकणे शक्य आहे.

रस्ता दुभाजक असावा असे मत मांडले आहे. मला योग्य वाटते. तो किती रुंद असावा, किती ऊंच असावा, त्या वर कोठली झाडे असावी या बद्दल विचार होऊ शकतो.

जबाबदारी हा महत्वपूर्ण मुद्दा ही समोर येत आहे. सध्या रस्ता दुभाजक् बद्दल बोलु या. जबाब्दारी वर जबाबदार पणे चर्चा होणे स थोडे थांबावे.

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

रस्ता दुभाजक

रस्ता दुभाजक असायलाच हवेत. पण या सोबत अनेक गोष्टी येतात. काहि प्रश्न आहेत ते असे...

 1. किती रुंद असलेल्या रस्त्यांवर दुभाजल हवेत? सदाशिव पेठेतल्या गल्लीत रस्ता दुभाजक आले तर काय होइल? पण म्हणून छोट्या रस्त्यावर दुभाजकच नको असे म्हणले तर लोकं अतिरेकी पणा करून शक्य त्या सर्व ठिकाणी कोंडी करतात.
 2. रस्ता दुभाजक करताना दुसरामुद्दा असा आहे कि तो दुचाक्यंना सहजा सहजी ओलांडता येता कामा नये. नाहितर मग तो नाममात्र राहातो. पण थोडे उंच दुभाजक करताना पादचार्‍यांना ते ओलांडता आले पाहिजेत. याचे चांगले उदाहरण पुण्यातला जंगली महाराज रस्ता आहे.
 3. अरुंद रस्त्यावर दुभाजक करताना, तो कमीत कमी रुंद असावा. जेणे करून दुभाजकामुळे रस्ता आणखिनच अरुंद होता कामा नये.
 4. अनेकदा रस्ता दुभाजक न दिसल्याने प्राणघातक अपघात झाले आहे. त्यामुळे ते अपघाताचे कारण न बनणे हा सुद्धा एक मुद्दा आहे.
मराठीत लिहा. वापरा.

रस्तादुभाजक

रस्तादुभाजक (मीडीयन) साधारणपणे खालील कारणासाठी असतो,
१. समोरासमोर येणार्‍या वाहनांना एकमेकांच्या क्षेत्रात घुसण्यापासून रोखणे.
२. रस्ता पार करताना पादचार्‍यांसाठी सुरक्षित थांबा.
३. रोषणाई/पाण्याचा निचरा यासारख्या आवश्यक सेवांसाठी तारा/नलिका नेण्यासाठी जागा.
४. रस्त्याच्या पुढील वाढीसाठी तरतूद.
५. सुशोभिकरण, वृक्षारोपण इत्यादी.

यासार्‍यासाठी यांची रुदी २ मिटर पर्यंत असणे आवश्यक वाटते.

फक्त पहिल्या कारणासाठी तात्पुरत्या कारणासाठी वापरले जाणारे न्यूजर्सी दुभाजक पुरेसे ठरावेत.

किती लहान असलेल्या रस्त्यावर दुभाजक? किमान ७ मिटर. दुभाजक साधारणपणे रंगवले जातात.

दुभाजकाच्या सुरुवाती व शेवटी प्रकाशपरावर्तक खुणा अपघात टाळू शकतात.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

रस्ता दुभाजक करता परिमाण

चाणक्य व तो म्हणतात ती परिमाणे आवश्यक आहेत च. मी च्या मते समोर च्या वाहन चा हेडलाईट चा प्रकाश डोळा वर आला तर वाहन चालक ला समोर चे दिसत नाही. म्हणून हा मुद्दा दुर्लक्षित करता येत नाही. रस्ता ची रुंदी २० मिटर पेक्षा कमी असेल तर तो बोळ या संज्ञा स पात्र ठरतो. रस्ता दुभाजक बोळ करता नाही.

दुभाजक रुंद च असला पाहिजे. मोठे पाणी व जलनिस्सारण नळ, उच्च दाब ची विद्युत वाहिनी, मुख्य दूरध्वनि केबल, रस्ता प्रकाश योजना वगैरे करता रस्ता चा हा भाग च वापरणे योग्य आहे.

रस्ता दुभाजक नियम पाळणे स वाहन चालक ना भाग पाडतो. नियम पाळले जावेत या करता केलेली ही तरतूद आहे.

रस्ता दुभाजक चे आणखी परिमाण व फायदे सुचले तर आवश्य सांगा.

वेग मर्यादा नियम पाळणे स भाग पाडणे कसे शक्य होईल या चा ही विचार करावा.

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

शिस्त - बेशिस्त

रस्ता दुभाजक हा पुण्यासारख्या ठिकाणी शहरातल्या वाहतुकीला शिस्त म्हणुन गरजेचा आहे. पण राष्ट्रीय महामार्गावर (क्र.-४) यामुळे बेशिस्त वाढलेली सुद्धा पाहिली आहे. रस्ता ओलांडण्यासाठी/बाजु बदलण्यासाठी योग्य तरतुद न केल्यामुळे जड वाहने सुद्धा बेदरकार पणे रस्त्यावरून चुकिच्या दिशेने जाताना दिसतात.

 1. शहरांतर्गत रस्त्यांवरचे दुभाजक
 2. महामार्गावरचे दुभाजक

या दोहोंची वेगळी परिमाणे आणि त्यांची चर्चा गरजेचे आहे असे वाटते.

मराठीत लिहा. वापरा.

रहदारी तील अनस्था ला केवळ वाहन चालक जबाबदार?

चाण्यक्य यानी महत्व चा मुद्दा मांडला आहे. रहदारी नियंत्रण म्हणजे फक्त वाहन चालक ना धडा
शिकवणे नाही. मी चे म्हणणे नियम पाळणे सोपे केले पाहिजे, नियम पाळणे स भाग पाडले पाहिजे
हे सिद्ध होते.

वाहन चालक जवळ चा मार्ग शोधतात. हे गैर म्हणता येत नाही. त्या वर टीका करणे पेक्षा जवळ चा मार्ग उपलब्ध करणे हे लक्ष ठेवले पाहिजे. जर रस्ता दुभाजक पुरेसा रुंद असेल तर हे शक्य होईल. दर १०० मिटर वर रस्तादुभाजक ला योग्य छेद घेऊन वाट करणे शक्य होईल. ६ मीटर रुंदी मध्ये वाहन उभा करुन रहदारी चा अंदाज घेऊन उलट दिशा ला वळून जाणे शक्य होईल. पदचारी कोठे ही रस्ता ऑलांडतात. ते करता १०० मीटर वर अर्ध भुयारी मार्ग ठेवले पाहिजेत(उदाहरण पुणे तील डेक्कन जिमखाना संभाजी चौक). नियम, उंच दुभाजक हे उपाय योग्य नव्हेत. रस्ता दुभाजक बरोबर लेन सुद्धा चौक जवळ आवश्यक आहेत. चौक व लेन व्यवस्था अशी असावी की वाहन चुकी च्या लेन मध्ये नेले तर ते भलत्या बाजुला गेले पाहिजे.

पहा अशी व्यवस्था करता येईल काय?

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

चौक व वेग नियंत्रक

मला चौक मध्ये काय सोय करावी व वेग नियंत्रक कसा असवा याची खालील माहिती मिळाली. पहा.
Sketch of square and speed braker is at the end of the picture

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

 
^ वर