वाहन चालवणे म्हणजे किल्ली फिरवुन (अगर लाथ मारुन) स्टिअरिंग फिरवत पुढे जाणे हे खरे काय?

बहुतेक सर्व चा असा च समज आहे. वाहन चालवणे मध्ये इतर ही कित्येक गोष्टी चा अंतर्भाव आहे. जसे:-

  1. सुरक्षा
  2. पर्यावरण
  3. व्यवस्थापन
  4. यंत्र ज्ञान
  5. शिक्षण

या विषय वर चर्चा करणे आवश्यक आहे. आणखी मुद्दे असतील ते जोडणे सुद्धा आवश्यक आहे.

Comments

सहावा

सहावा मुद्दा: वाहन चालकाचे मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य...
आपल्याला या चर्चेत नक्कि काय हवे असे वाटते हे आणखीन स्पष्ट केले तर जास्त लिहिता येइल.





मराठीत लिहा. वापरा.

सुरक्षा हा सर्वात महत्व चा मुद्दा.

सुरक्षा म्हणजे अपघात टाळणे. तो टाळणे हे लक्ष ठेवले तर अनेक पैलू दृष्टीपथ मध्ये येतील. (प्रत्यय वापरत असताना नाम चे किंवा सर्वनाम चे रुप मध्ये बदल करु नये असे मी चे मत आहे. मी ते पाळणे चा प्रयत्न करत आहे.) स्वाथ्य हे फक्त वाहनचालक चे च नाही तर वाहन चे, रस्ता चे, रस्ता वरील खांब चे सर्व गोष्टी चा विचार करावा लागेल. पर्यावरण मध्ये रस्ता वरील इतर व आजुबाजु चे यांचा ही विचार करणे भाग आहे.

हम्म्

आपल्याकडे बरेच लोकांना वाहतूक ह्या विषयावर कमी कळते. जबाबदारीने वाहन चालवणे हे त्याहून कमी लोकांना कळते.

असो पण ह्या व्यासपीठावर या विषय वर चर्चा करणे का बरे आवश्यक आहे? समजले नाही.

सहमत..

आपल्याकडे बरेच लोकांना वाहतूक ह्या विषयावर कमी कळते. जबाबदारीने वाहन चालवणे हे त्याहून कमी लोकांना कळते. या मताशी पुर्णपणे सहमत... कदाचित यासाठीच या विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे.





मराठीत लिहा. वापरा.

सातवा

सातवा मुद्दा:
७. दुसर्‍याच्या व स्वतःच्या जिवाची किंवा शारीरिक/आर्थिक नुकसानाची पर्वा.
'मुकद्दर का सिकंदर' मधल्या गण्यातल्या अमिताभसारखे वेडीवाकडी फटफटी/दुचाकी चालवत सिग्नलमधून वेगाने वाट काढणारे दुसर्‍याचा तर सोडाच, स्वत:चाही जीव धोक्यात घालतात.
८. आपली देहबोली चुकीची आहे की योग्य याची जाणीव. सिग्नल नसलेल्या एखाद्या चौकात/वळणावर मानेने 'तु आधी जा' आणि 'तु थांब मी जातो' या देहबोल्या योग्य रितीने व्यक्त न केल्याने होणारे अपघात रोज किमान एक पाहते.

शारिरीक, आर्थिक नुकसान तसेच देहबोली

सुरक्षा नियम बरोबर असतील, लोक ते समजले असतील, तसेच ते पाळणे कसे आवश्यक आहे, हे ते ना पटले असेल तर अपघात होणे अशक्य नसले तरी सहज शक्य नाही. मी ला वाटते आपण प्रथम सुरक्षा नियम ची चर्चा करु या. या मध्ये सुरक्षा नियम कोठले असावेत, का असावेत, ते कसे शिकवावेत, ते ची अंमलबजावणी कशी करावी, जर पाळले नाही तर शिक्षा काय असावी या गोष्टी चा उहापोह करु या.

प्रथम सुरक्षा नियम ची यादी करु या. सुरवात वाहन पासुन करु या. पुढचे काम तुमचे.

औषधे

वेगवेगळी औषधे व त्याच्या परिणामाखाली वाहणे चालवणे धोकादायक असु शकते.
ही औषधे कोणती यावर कोणी काही माहिती देईल काय?

बाकी 'एक खास औषध घेऊन' भन्नाट ट्रक चालवणारे वीर आपण रोजच पाहतो नाही का!?

वर चाणक्याने व सहजरावांनी म्हंटल्या प्रमाणे

१. चर्चा विषय जरा विस्तृत नको का ठेवायला?
२. जरा आवाका तर कळला पाहिजे?
३. विषय काय आहे?
४. विषयाची ओळख करून दिली आहे का?
५. चर्चा नक्की कशावर हवी आहे?
६. लेखकाची भुमीका काय आहे?
७. का तशी भुमीका आहे?
८. लेखकाचा या विषयातला अभ्यास काय?

चर्चा तर होईल पण
उगाच 'करा चर्चा म्हणून चर्चा टाकण्यात' काय हशील?

असो,

आपला
'घेऊन' कधीही न चालवणारा
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

हो चर्चा चा आवाका मोठा आहे.

सुरक्षा हा विषय इतका मोठा आहे ते करता पुस्तक लागेल. कोणी एकाने प्रयत्न केल्यास ते मध्ये चुका राहतील. चर्चा करत असते तेव्हा कोण ना कोण च्या लक्षात येईल. मी ला सर्व माहीत असते तर मी पुस्तक लिहुन तुम्ही ला विकत दिले असते.

उत्तम कल्पना!

असे पुस्तक लिहिणे व व ते सर्वत्र वितरीत करणे,
यात वाहतूकीच्या नियमांसह साध्या पद्धतीने चित्रे व उदाहरणांसहीत सुचना असणे ही अतिशय उत्तम कल्पना आहे असे आम्हाला वाटते.

शिवाय यातून पैसे ही मिळण्याची शक्यता आहे!

आपला
गुंडोपंत

नियम

पंत.. लोक नियम पाळत नाहित हाच तर सर्वात मोठा मुद्दा आहे. पुस्तके वाचून नियम पाळले जातील असे वाटते का?





मराठीत लिहा. वापरा.

माहिती

खरंय हो चाणक्यराव!
वाचणार किती लोक हा मुद्दा आहेच!

तरीही नियमांची प्रसिद्धी तर होईल नक्कीच! जितके नियम जास्त माहित तितके पाळले जाण्याची शक्यता वाढणार ना?

शिवाय बर्‍याच वादांमध्ये समेटासाठी त्याकडे प्रमाण म्हणूनही ही पाहता येईल.

आपला
गुंडोपंत

~उपक्रमाच्या जेलात गेल्यावर (म्हणजे लिखाण बंद!) बाहेर यायचा मार्ग काय आहे हे ही नको का कळायला? की थेट जन्मठेपच? काही नियम आहेत का त्यासाठी?~

आर टि ओ

मला वाटतं कि पादेशिक परिवहन कार्यालयात चौकशी केल्यास अशी पुस्तिका आहे कि नाही याचा छडा लागेल. प्राथमिक मत असे आहे कि अशे पुस्तिका उपलब्ध असावी.
नियम पाळण्यासाठी म्हणाल तर आम्ही दोन प्रकारची माणसे पाहिली आहेत.

  1. सार्वजनीक नियम हे सर्वांनी पाळण्यासाठी केलेले असतात आणि ते पाळणे आमचे कर्तव्य आहे. असे मानणारे...
  2. नियम हे मोडण्यासाठीच असतात. ते मोडण्यातच आमची धन्यता आहे आणि मी ते मोडणाराच. मग ते वाहतुकीचे असोत कि संकेतस्थलळाचे कि आणि कशाचे....

वाईट एकच आहे कि स्वतः पहिल्या प्रकारच्या माणसांमध्ये व्यवस्थित राहून दुसर्‍या प्रकारच्या माणसांना चिथावणारे जास्त आहेत. कदाचित तेच सर्वात धोकादायक आहेत.





मराठीत लिहा. वापरा.

नामंजूर

पुण्यातील रहदारीवर मिलिंद छत्रे यांनी मनोगतावर मधे विडंबन टाकले होते ते वाचा. हसता हसता विचार करायला लावणारे आहे:

नामंजूर

मिल्या शुक्र, २९/०६/२००७ - ०८:०२. » विडंबन
पुण्याचे ट्रॅफ़िक पाहून पुणेकर गाडी चालवताना हे गाणे म्हणत असावेत असे वाटते

चाल : नामंजूर

जपत जनांना कार हाकणे - नामंजूर
लाल दिव्याला उगा थांबणे - नामंजूर
मी ठरवावी दिशा वाहत्या ट्रॅफ़िकची
वनवे म्हणुनी लांबून जाणे - नामंजूर ||

मला फ़ालतू फलकांचा ह्या जाच नको
कुठे कसेही वळण्यावर ह्या टाच नको
थांबवितो मी गाडी जिथे मज हो इच्छा
जागा बघुनी पार्कींग करणे - नामंजूर ||

रस्त्यांवरच्या अपघातांना कारण मी
वेगासाठी देह ठेवतो तारण मी
भले हाडांचा होवो सार्‍या चक्काचूर
मज शिस्तीचे थिटे बहाणे - नामंजूर ||

पडणे-झडणे, भांडण तंटे रोज घडे
संधिसाधू, लाचार मामू मध्ये पडे
'रोख' जरासे तिथेच द्यावे अन जावे
चौकीला नेणे गार्‍हाणे - नामंजूर ||

(
मी गर्दीला ह्या शाप मानले नाही
अन नियम तोडणे पाप मानले नाही
खड्डा ज्यावर एकही पडला नाही
मी पथ असला अद्याप पाहिला नाही ||
)

नो एन्ट्री अन स्पीड लिमिट्स ही दूर बरी
मिळता जागा घुसण्याची ही ओढ खरी
परदेशातून नियम पाळणे मज समजे
पण नियमांना इथे पाळणे - नामंजूर

~ मिलिंद छत्रे

नामंजूर!

नेमके मर्म वर कवी ने बोट ठेवले आहे. नियम आहेत. कोणी ही नियम पाळणे पसंत करत नाही. या करता उपाय शोधा. नामंजूर म्हणून हात वर हात धरुन बसु नका.

नियम पाळायला शिका

नियम पाळायला शिका - घरात आणि दारात.

त्या कवितेत शेवटी म्हणल्याप्रमाणे परदेशात नियम पाळण्यात भारतीय पुढे असतात, मग स्वदेशात पाळायला काय झाले? आज आपण पाळू लागलो तर उद्या पुढच्या पिढ्यांना आपोआप सवय लागेल...थोडक्यात रहदारीसाठीच नाही तर सर्वच बाबतीत आपण नागरीक शास्त्र - हक्क आणि जबाबदारी शिकले पाहीजे आणि आचरणात आणले पाहीजे. चांगली सवय लावणे अवघड असते, पण आपण आपली जबाबदारी जो पर्यंत समजत नाही आणि इतरांवर ती घालायचा प्रयत्न करू तो पर्यंत काही होणार नाही....

हो. नियम पाळले पाहिजेत.

नियम पाळणे आवश्यक नाही, अत्यावश्यक आहे. नियम पाळले नाही तर जो परिणाम होतो ते बद्दल प्रत्येकजण उदासिन आहे. स्वतः पलिकडे कोण ही जग पाहणे स तयार नाही. या करता उपाय काढणे आवश्यक आहे.

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवले आहे.

माझी अधिक ओळख येथे आहे. टिचकी मारा

चूक दाखवली. धन्यवाद

चुक दुरुस्त केली. लिहणे मध्ये चूक होते. आता मी च्या चुका कमी करणे चा प्रयत्न करीन.
प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवले आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

मुद्दा क्र. ९

सुरक्षा :-------पर कोनाची बॉ,जेला तेला जेच्या तेच्या जीवाची काळजी रहात न्है व्हय.
पर्यावरण:--------सुर्य् देवाच्या पॉवरवर गाड्या चालन तवा पर्यावरणाचा सवाल राहीन् का ?
व्यवस्थापन:--------ह्यो सवाल काय कळला नाय बॉ ! गाडी चालाले कह्याला व्यवस्थापन जेला सायकल येती तेला गाडी येतीच ना.
यंत्र ज्ञान :------------यंत्राचं ज्ञान असल्याबीगर कह्याला हात बी लाऊ नै.
शिक्षण :---------------- म्हंजी शाळा,कालीजमदी गाड्या चालाचं शिक्षण देलं पाहिजे म्हण्ता का काय ?

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं :)

बाबूराव :)

बाबुराव ना सवाल कळना नाही. पण विचार बरोबर लिहले

  1. सर्व ना स्वतः ची काळजी. इतर लोक चे काही ही होवो. असे तुम्ही चे म्हणणे आहे का?
  2. सुर्य देव जो पर्यंत शक्ती देत नाही तो पर्यंत इतर पर्याय वापरात आणणे शक्य आहे.
  3. गाडी स्वतः च्या घर मध्ये किंवा शेतात चालवताना स्वतः चे स्वतः पहा. पण सार्वजनिक ठिकाणी, जेथे हजारो लोक रस्ता ची सुविधा वापर करतात तेथे वाहतुक व्यवस्थापन नको का?
  4. यंत्र चे ज्ञान असेल तर उगीच २०० च्या वेगाने गाडी चालवणे का?
  5. शिक्षण फक्त शाळा कॉलेज मध्ये नाही तर सर्व ठिकाणी दिले जाते. जन्म झाला पासुन अग्नित विलिन होई पर्यंत.

एक प्रश्न...

आपण जे कोणी आत्ता भारत्वासीय आहात त्यातील कितीजणांना दुचाकी (खरे म्हणजे कुठलीही, पण तुर्तास स्वयंचलीत बद्दल बोलू) चालवताना हेल्मेट (शिरस्त्राण?) घालणे आवश्यक वाटते आणि कितीजण ते (जर दुचाकी चालवत असेल तर) नेमाने करतात?

केवळ उत्सुकतेपोटी प्रश्न आहे.

विकास

माझ्यापुरते - मी येथे सायकल चालवताना पण हेल्मेट वापरतो...

शिरस्त्राण

विकास, तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.
हल्ली दुचाकी चावणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शिरस्त्राण वापरणे कमीच आहे. नाही म्हणले तरी चालेल. पण कधी दुचाकी वरून हमरस्त्यावरून जायचा प्रसंग आला तर नेमाने वापरतो. शिरस्त्राण वापरणे आवश्यक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान जिथे वेग जास्त आहे आणि अपघाताची शक्यता जास्त आहे तिथे तरी.
येथे भारतात माणसाच्या जीवाची किंमत किती असते हे नव्याने सांगण्याची गरज आहे असे वाटत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या साधनांबाबत आणि नियमांबाबत एकुणच आनंद असतो. तसेच रस्ता, वाहतुक हे मुद्दे सोडून इतर ठिकाणी सुद्धा असे नियम आणि उपकरणे आहेत. त्याचे पालन भारतात किती होते हा संशोधनाचा विषय आहे.

अवांतरः पुण्यात शिरस्त्राणांची सक्ति झाली त्यावेळी लोकं रस्त्यावर उतरले, आंदोलन करण्यासाठी, ते ही शिरस्त्राणांची सक्ति नको म्हणून. हेच पुणेकर ज्या रस्त्यांवर अपघात होण्याची जास्त शक्यता आहे अशा रस्त्यांवर मात्र फक्त घरात वा आपल्या कार्यालयात बोलतात. त्या बद्दल कोणी आंदोलन करायची भाषा नाही करत. असे का बरे?





मराठीत लिहा. वापरा.

वापरावेसे वाटते

मोठ्या रस्त्यावर नक्की वापरते. पण छोट्या रस्त्यावर वापरताना खालील प्रश्न पडतात.
१. दुचाकीच्या पोटात शिरस्त्राण मावत नाही, बाहेर कुलूप करुन त्याला अडकवल्यास चोरटे कुलपासह कापून नेतात.
२. शिरस्त्राणाने केसांची वळणे विस्कटतात.
३. शिरस्त्राणात रुमाल बांधावा लागतो, कारण शिरस्त्राणाचा डोक्याला स्पर्श होऊन केस गळतात असे ऐकले आहे.
४. शिरस्त्राणातून कधीकधी गाड्यांचे भोंगे ऐकू येत नाहीत.
पण हे बचाव चांगले नाहीत, शिरस्त्राण वापरायला हवेच याची जाणीव मनी आहे.

हे काही नियम

चित्र नियम/अर्थ
थांबा
जाण्यासाठी तयार व्हा
आता जाऊ शकता
मी डावीकडे वळणार/सरकणार
मी उजवीकडे वळणार/रत्यावर उजवीकडे सरकणार आहे
मी थांबतोय बरं का!
मी वेग कमी करतोय हां!
बरं. जा तुम्ही माझ्यापुढे.
फक्त एकाच बाजूने वाहनं येऊदेत!
माझ्या तोंडासमोरच्यांनी थांबा बरं लगेच!
माझ्या मागच्यांनी थांबा आता.
माझ्या समोरचे आणि मागचे दोन्हीकडचे थांबा!
माझ्या डावीउजवीकडच्यांनी थांबा पटकन!
डावीकडचे चला!
उजवीकडचे चला!
काही नाही,फक्त इशारा बदलतोय!
महत्वाच्या साहेबांना (व्ही आय पीं ना)सलाम!

चुभूदेघे. चित्रे व माहिती http://www.indiandrivingschools.com/ वरुन साभार.

वा!

वा!
छानच दुवा दिलात अनुताई!
एकदम झटकन!

पहा बरं ग्राफिकली पहायला किती सोपे वाटत आहेत ते नियम.

आपला
गुंडोपंत

सचित्र

पंत, रस्त्यावरचे बाहतुकीचे नियम सचित्रच असतात ना? सर्व सामान्यांना कळावे असे...





मराठीत लिहा. वापरा.

कळले नाही?

क्षमा करा पण आपले म्हणने कळले नाही?
मी तरी फलकांवर अशी 'चित्रे' अजून पाहिली नाहीत?
'खुणा' जरूर असतात.
नवीन पद्धती प्रमाणे चित्रे असणार आहेत का?
बापरे! कधी पासून लागू होते आहे हे सगळे? मी अगदीच दूर गेलो आहे असे दिसते सुधारणांपासून!

नवीन पीढीचा वेग जास्त असणार पण इतका?

आपला
दूर गेलेला
गुंडोपंत

चित्रे

बहुधा असतात बरं का भारतात! आता काही ठिकाणी त्यांच्यावर अमका बुवा तमक्या देवीचा मेळावा किंवा 'अखिल भारतीय जाहिर मोर्चा' असे कागद डकवलेले असतात म्हणून दिसल्या नसतील इतकेच! चित्रे आहेत, मी येता जाता पाहते, फक्त त्यातली काही जी फिकी झाली आहेत ती परत रंगवण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. आणि अगदी या तक्त्यातल्या हवालदारासारखी नसली तरी घाटातल्या, वनवे इ. चिन्हांची चित्रे व्यवस्थित असतात.

असतील बॉ!

मला अशी चित्रे कुठे दिसली नाहीत अजून तरी.
म्हणजे लाल रंगांच्या 'स्टॉप' साईन च्या ऐवजी ' थांबा असा हात केलेल्या पोलिसाचे चित्र' वगैरे...???
आता तुम्ही रोज येता जाता पाहताय म्हणजे असतीलही पुण्यात. आपल्याला काही कल्पना नाही बॉ!

पुण्याला येण्या आधी जरा वाहतुकीच्या नियमांची माहिती काढूनच यावे लागेल असे दिसते आहे.

आपला
गाववाला
गुंडोपंत

प्रकाटाआ

प्रकाटाआ





मराठीत लिहा. वापरा.

मला वाटते

तुम्ही आणि मी 'चित्रे' या मुद्द्याचे वेगवेगळे अर्थ घेऊन बोलतो आहोत. मी 'खुणांच्या चित्रांना' पण चित्र म्हणते आहे आणि तुम्ही 'मानवी चित्रांना'च चित्र म्हणत आहात. पोलीसाचे चित्र प्रत्येक ठिकाणी नसते कारण तसे चित्र असण्याची आवश्यकता असलेल्या सिग्नलला प्रत्यक्ष वाहतूकमामाच असतात. (बहुधा तटस्थपणे बाजूला तंबाखू मळत बसलेले असतात. फक्त महिनाअखेरचे ३ दिवस वसूली व्हायला हवी म्हणून नियम मोडणार्‍या प्रत्येकाला पकडतात. अर्थात या नियमाला सन्माननीय अपवाद आहेत. मी 'लाच बीच देऊ नका,पावती घ्या नाहीतर गाडी इथे ठेवून जा' असे म्हणणारेही पाहिले आहेत.हौसे गवशे आणि नवशे सर्व प्रकारचे लोक असणारच.) अगदी जिथे मामा नसतो तिथे ही चित्रे काढल्यास लोक त्यावर कागदे चिकटवणार किंवा त्याला औरंगजेबासारख्या दाढीमिशा काढणार. त्यापेक्षा नसलेले बरे. खुणांच्या चित्रावर ते बिघडवायला जास्त वाव नसल्याने कोणी चित्रकारी दाखवत नाही.
झेड के हॉटेलाकडून कॅंपात जाणार्‍या रस्त्यावर तो कॅंपाच्या अगदी जवळ गेल्यावर वनवे होतो तिथे एक छानसे पोलीसाचे चित्र आहे.

हो ना त्यामुळेच

हो ना त्यामुळेच मी ही गोंधळून गेलो!
मलाही अशी चित्रे असणे जरा चमत्कारीक वाटतच होतं.
पण तुम्ही रोज येताजाता पाहताय म्हंटल्यावर मला वाटलं खरंच असणार.
चला आता तुम्ही नि मी वाहतूक चिन्हांविषयीच बोलतो आहोत.

आता शंका नाही

पण तरीही, चालवतांनाच्या सर्व(?) शक्यता गृहीत धरून काढलेली चित्रे असलेले एखादे पुस्तक असणे चांगलेच राहील असे वाटते.

असो,

आपला
गुंडोपंत

वाह्तूक चिन्हे

वाहतुक नियमाची चिन्हे असतात पण वाहतूक नियमनाची चिन्हे नसतात. ती कृती दाखवणारी चित्रे असतात. प्रदर्शनात वा प्रबोधनात ती वापरतात. पुण्यातल्या वाहतुकीत सुधारणा झाल्याची चिन्हे नाहीत.
प्रकाश घाटपांडे

अरे बापरे..

पंत, मला वाटत रस्त्यावर सिग्नल सगळीकडेच असतात आणि ते दिसण्यासाठीच असतात. तसेच वाहन चालवण्याचा परवाना घ्यायला जाताना परिवहन कार्यालयात जी परिक्षा द्यावी लागते त्यासाठी हे सर्व माहित असने बंधनकारक आहे. किंबहुना पुर्व तयारीसाठी असे फलक तिथे असतातच.
सर्वसामान्यांना हे बंधनकारक असते हेच माहित नसण्याचे हे एक कारण असु शकेल.





मराठीत लिहा. वापरा.

हो!

मला वाटत रस्त्यावर सिग्नल सगळीकडेच असतात आणि ते दिसण्यासाठीच असतात.
अर्थात ते दिसतातही हो!
फक्त मागे झुडुपात लपून बसलेला पोलिस कधीकधी दिसत नाही! ;)

आपला
नको तेंव्हा पकडला जाणारा
गुंडोपंत

वा!

चित्रे आणि नियमांची 'टेबली' आवृत्ती आवडली. याचा थोडा अधिक विस्तार करून लेख(मालिका) लिहिणे शक्य आहे का?

वा!

पिवळा दिवा म्हणजे 'जाण्यासाठी तयार व्हा' ही नवीनच 'माहिती 'समजली. आणि त्यावरुन इथले माहितीलालस सभासद किती काटेकोरपणे माहिती वाचतात ते पण समजले.

पिवळा दिवा

पिवळा दिवा म्हणजे 'जाण्यासाठी तयार व्हा' ही नवीनच 'माहिती 'समजली

हे लाल ते हिरवा या सिग्नल प्रवासातला अर्थ, हिरवा ते लाल या सिग्नल प्रवासात' थांबण्यासाठी तयार व्हा' हा अर्थ
पण खरा अर्थ सोयिस्कर पणे दुर्लक्ष करा.
प्रकाश घाटपांडे

लाल ते हिरवा प्रवास

अहो लाल ते हिरवा ह्या प्रवासात तो दिवा कधी पिवळा होतो का? पुढच्या वेळेस निट निरखुन बघा!!

धन्यवाद

ही त्रुटी तत्परतेने दाखवल्याबद्दल वरुणरावांचे धन्यवाद.
इंडीयन ड्रायव्हिंग स्कूल्स डॉट कॉम

पिवळा दिवा

पिवळा दिवा म्हणजे 'जाण्यासाठी तयार व्हा' ही नवीनच 'माहिती 'समजली.
>> ही शंका मलाही आली होती.

भर भरुन प्रतिसाद मिळणे म्हणजे लोक ना काळजी आहे.

लोक ना नियम माहीती असणे आवश्यक आहे. अनु ताई नी दिलेली सचित्र माहिती उपयोगी आहे. जेवढी माहिती जास्त व सचित्र मिळेल तेवढे चांगले.

चर्चा चा रोख मी ला असा दिसला. नियम आहेत. पुरेसे आहेत. परंतु, एक तर लोक ना माहित नाहित अथवा माहित असुन पाळले जात नाहित. काही म्हणतात दंड करा. काही म्हणतात दंड भरणे सहज टाळता येते. पोलीस ला चिरीमिरी दिली की थोडक्यात सुटका होते. कित्येक वाहनचालक इतके तरबेज आहेत की ५० ची नोट तयार ठेवतात. पोलिसाने हटकले की नोट काढतात. पोलीस च्या हात मध्ये कोंबतात व वाहन पुढे नेतात. मी च्या असे ही वाचन मध्ये आले की पोलिस दंड च्या पावती देतात. परंतु, एक च क्रमांक च्या पुष्कळ पावती असतात. हे असेच दर्शिवते की दंड हा विश्वसनिय उपाय नाही.

लोक नियम तोडत असतात. कारण त्याना वेळ वाचवणे जास्त महत्व चे वाटते. उपाय शोधत ना हे विचार मध्ये घ्यावे. शिस्त तोडणारे ना पोलिस स्टेशन मध्ये बोलव उन दिवस भर वाट पाहणे स लावणे. १० मिनटे किंवा कमी वाचवणे चा प्रयत्न करणारे ला एक दिवस.

बघा आणखी काय शिक्षा सुचते.
प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवले आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

आणखी काही

चित्र नियम/अर्थ चित्र नियम/अर्थ
पुढे उजवे वळण पुढे डावे वळण
केसाच्या आकड्यासारखे उजवे वळण केसाच्या आकड्यासारखे डावे वळण
उजवीकडे थोडे आतल्या बाजूला वळून सरळ डावीकडे थोडे आतल्या बाजूला वळून सरळ
उंच चढ रस्ता पुढे निमुळता झालाय
खोलगट आणि मोठा उतार हा निमुळता रस्ता पुढे रुंद झालाय
पुढे अरुंद पूल पुढे निसरडा रस्ता
पुढे रस्त्यावर खडी पुढे सायकलींसाठी रस्ता ओलांडायचा मार्ग
पुढे पादचार्‍यांसाठी रस्ता ओलांडायचा मार्ग पुढे शाळा आहे
काम चालू रस्ता बंद रस्त्याजवळपास/रस्त्यावर गुरे
दरड कोसळण्याचा धोका नाव मिळेल
उजवीकडे वळायला उपरस्ता डावीकडे वळायला उपरस्ता
इंग्रजी 'वाय' आकाराचा रस्ता इंग्रजी 'वाय' आकाराचा रस्ता
इंग्रजी 'वाय' आकाराचा रस्ता इंग्रजी 'टी' आकाराचा रस्ता
पुढे मोठा रस्ता पुढे मोठा रस्ता
वर्तुळमार्ग पुढे धोकादायक खोलगट भाग
पुढे खडबडीत रस्ता/उंचवटे पुढे रस्त्याला अडसर
आगगाडीचे रुळ २०० मीटरवर आगगाडीचे रुळ ५०-१०० मीटरवर
रेल्वेफाटक २०० मीटरवर रेल्वेफाटक ५०-१०० मीटरवर

(काही शब्दार्थ चुकले असू शकतील. चुभूदेघे. या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊ नये, म्हणजे चुका दाखवल्यास त्या दुरुस्त करता येतील.)

रस्ता वरील मार्ग दर्शक खुणा

मार्ग दर्शक खुणा चिनी लिपी प्रमाणे असतात. शिकणे करता खूप सोपे असतात. पहा - समजा - लक्ष मध्ये ठेवा. सर्व नी प्रयत्न केले तर दिवस काय तास मध्ये सर्व खुणा उपक्रम वर दिसतील.
प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवले आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

काय सांगता?

मार्ग दर्शक खुणा चिनी लिपी प्रमाणे असतात. शिकणे करता खूप सोपे असतात.
मला तर चीनी भयंकर अवघड वाटते बॉ!
पण आपल्या मार्ग दर्शक खुणा कळतात... पण चीनी काही कधी कळेल असे वाटत नाही! ;))

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

नियम तोडणारे स शिक्षा

मी असे सुचवले की, आर्थिक शिक्षा देणे ऐवजी शारिरीक शिक्षा द्यावी. वेळ वाचवणे साठी नियम तोडला तर वेळ पोलीस स्टेशन मध्ये घालवणे भाग पाडणे. मी च्या या विचार वर ४ निरोप आले. सर्व ना मी चे म्हणणे पटले. निरनिराळी शिक्षा सुचवली आहे.

  1. पकडले की, तेथेच थांबणे.
  2. १०-१२ किंवा जास्त असले तर मिरवणूक काढणे.
  3. नियम ची रेकॉर्ड ऐकवणे
  4. रहदारी नियंत्रण करणे स लावणे
  5. कागद वर नियम लिहणे स लावणे
  6. पुन्हा नियम तोडणार नाही असे प्रतिज्ञापत्र लिहुन घेणे.

इतर लोक सुद्धा असाच विचार करत असावेत. सर्व नी आपले विचार येथे च व्यक्त करावे.

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवले आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

एक आर टि ओ अधिकारी

पुण्यात एक निवृत्त आर टी ओ अधिकारी श्री रमेश कुवर हे अनेक प्रदर्शनात एक स्टॉल लावतात. त्यात त्यात वाहतुकीच्या नियमाचे प्रबोधन करणारे फलक , अपघातांची दाहकता दर्शवणारे फोटो, नेहमी केल्या जाणार्‍या चुकांची लक्षवेधी मांडणी, असा हा उपक्रम असतो. मी त्यांना म्हटल,'' याचा काही उपयोग होतो का?" ते म्हणाले कि एवढे लोक बघुन गेल्यावर एखाद्याला उपरती होउन एक अपघात जरी वाचला तरी या स्टॉलचे सार्थक झाले असे मी मानेन.
प्रकाश घाटपांडे

एक स्तुत्य उपक्रम

श्री रमेश कुवर हे एक चांगला उपक्रम राबवत आहेत. मी च्या शुभेच्छा. आपण यातुन बोध घेऊन आपला उपक्रम पुढे नेऊ या. आपण जो विचार करत आहोत तो शेवटी काही तरी फळ देईल. निदान आशा करणे स हरकत नसावी. विचार करा व लिहित रहा.

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवले आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

नियम पाळणे सोपे करा.

चर्चा मध्ये 'शिरस्त्राण' चा मुद्दा पाहिला. पुणे मध्ये शिरस्त्राण विरुद्ध मोर्चा काढला होता. हे खरे आहे. अपघात केव्हा तरी होतो. परंतु, शिरस्त्राण सारखे सांभाळणे भाग पडते. दुचाकी वर सुरक्षित पणे शिरस्त्राण ठेवणे शक्य झाले तर पुष्कळ लोक शिरस्त्राण चा वापर करतील. शिरस्त्राण दुचाकी बरोबर विकले तर जवळ जवळ १००% लोक शिरस्त्राण चा उपयोग करतील. निदान मी ला तरी असे वाटते.

बोला आपले काय मत आहे?

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवले आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

नियम - प्रश्न

शिरस्त्राण दुचाकी बरोबर विकले तर जवळ जवळ १००% लोक शिरस्त्राण चा उपयोग करतील. निदान मी ला तरी असे वाटते.

प्रश्न होता की उपक्रमावरील किती व्यक्ती "सेफ्टी" समजून "शिरस्त्राणाचा" वापर करतात हा.

दुचाकीबरोबर

आता स्कूटी पेप घेताना मला शिरस्त्राण बरोबर आणून ते दाखवावे लागले व माझ्याकडे शिरस्त्राण आहे अशा स्वरुपाच्या एका लिखीत कागदावर सही करावी लागली. ते नसते तर गाडीबरोबर विकत घ्यावे लागले असते रासे सांगण्यात आले. सबब, ही पद्धत सुरु झालेली आहे.

 
^ वर