वाहन चालवणे म्हणजे किल्ली फिरवुन (अगर लाथ मारुन) स्टिअरिंग फिरवत पुढे जाणे हे खरे काय?

बहुतेक सर्व चा असा च समज आहे. वाहन चालवणे मध्ये इतर ही कित्येक गोष्टी चा अंतर्भाव आहे. जसे:-

  1. सुरक्षा
  2. पर्यावरण
  3. व्यवस्थापन
  4. यंत्र ज्ञान
  5. शिक्षण

या विषय वर चर्चा करणे आवश्यक आहे. आणखी मुद्दे असतील ते जोडणे सुद्धा आवश्यक आहे.

Comments

भाग २ सुरु करा!

जनहीतवादी,

५० प्रतिसादां नंतर प्रतिसाद शोढणे अवघड होते. (हा ड्रुपल चा बग आहे.)
तेव्हा चर्चेचा भाग २ सुरु करावा ही विनंती!

आपला
गुंडोपंत

सराव

पण मला वाटते की वाहन चालवणे हा सरावाचा भाग आहे. सराव करतांना योग्य ते ज्ञान देणे आवश्यक आहे. मात्र माझ्या माहितीत असलेले अनेक ड्रायव्हिंग स्कुलवाले नुसतेच 'हं असं चालवा' असे शिकवतांना दिसतात. बहुतेक वेळा 'गाडी अशी चालते' हे समजे पर्यंतच ट्रेनींग संपुनही जाते.
नियम कळण्याची फक्त सुरुवातच झालेली असते.
आरटिओ ऑफिसला, ट्रेनींग स्कूल कडून आले आहेत, म्हणून लायसन्स तर आयतेच हातात पडते.
मग असे प्रश्न पडतात की,
ट्रेनींग स्कुल चे ईंस्ट्र्क्टर होण्यासाठी काही परिक्षा/नियम आहेत का?
शिवाय 'किती ट्रेनींग हे योग्य ट्रेनींग' यावरही काही नियम आहेत का?
याची 'वार्षीक ज्ञान तपासणी' असते का?
स्कूल्स ची चांगले, उत्तम, बरे वगैरे वर्गवारी आहे का?
शिवाय यांची फी कशी ठरते हे ही कळले नाही.

माझ्या माहिती नुसार नवीन गाडे शिकतांना किमान १२० तास ट्रेनींग आवश्यक आहे. यात रात्री व पावसातही गाडी चालवण्याचा अनुभव धरला पाहिजे.

-निनाद

चर्चा चा पुढील भाग

लोक चे मागणे स्वीकारले. पुढील भाग खालील नाव ने सुरु केला आहे.
वाहन चालक रहदारी चे नियम पाळत नाहीत, कारणे व उपाय.
तो पहाणे साठी येथे टिचकी मारा.

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

शिरस्त्राणसक्ती

नवीन पुणेकर यांच्या प्रतिसादामुळे हा धागा वर आल्यामुळे दिसला.
भारतात कित्येक वर्षे शिरस्त्राणसक्तीचा कायदा असूनही अंमलबजावणी होत नाही. मुंबई, दिल्ली, बंगलोर या शहरांत काही वर्षे ती कठोरपणे होते. १-१-२०११ पासून पुण्यातही शिरस्त्राणसक्ती करण्याचा निर्णय मीरा बोरवणकर यांनी घेतला असल्याचे वाचले.
वाहन चालविताना भ्रमणध्वनी वापरण्यामुळे इतरांच्या जिवाला धोका होऊ शकतो. आसनपट्टा किंवा शिरस्त्राण यांची सक्ती करणे मात्र व्यक्तिगत स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. धूम्रपान, मद्यपान, पर्वतारोहण, अशा कृतींवर बंदी नसताना शिरस्त्राणविरहीत दुचाकीवापरावरही बंदी नसावी. फारतर डोक्याला झालेल्या इजांशी संबंधित विम्याचे परतावे नाकारावे.
या सक्तीविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी कोणी सहकार्य करू इच्छिते काय?

 
^ वर