उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
चौर्याहत्तर
डंबलडोर
September 9, 2007 - 8:07 am
जीवेत शरद: शतम् |
(लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत. का ? ह्या स्वर्गीय आवाजाचे वर्णन करण्यास आमचे पंचेवीस नाही, पंचवीस अब्ज शब्दही अपुरे आहेत. जीवेत शरदः शतम्. नव्हे, जीवेत शरदः ग्रीष्म वसंत शिशिर वर्षा हेमंत शतम्. पर्देमें रहने दो, असो, किंवा राधा कैसे ना जले. आशाताई, वय आणि आवाज ह्यांचा काहीही संबंध नाही, ह्याची खात्री पटवून दिल्याबद्दल आपला शतशः ऋणी - तथागत.)
दुवे:
Comments
हे काय?
हे काय तथागत?
हा तर तथाकथित लेख झाला!
पण लेख म्हणून अजून मोठे तर काही टाका...!?
त्याला लेख तर म्हणता आले पाहिजे की नाही?
असो, पहिलेच लिखाण म्हणून आम्ही स्वागत करतो!
आपला
गुंडोपंत
१०००+२५
गुंडोपंत,
एक चित्र म्हणजे हजार शब्द असे कुणीतरी म्हटले आहे. त्यात आमचे पंचवीस शब्द आम्ही टाकले.
एवढा मोठा लेख, तोही पहिलाच !
आक्षेपाचे कारण कळले नाही.
- तथागत
--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||
अनुमोदन
तथागत यांना अनुमोदन(थोडे दिवस थांबा मोदकही मिळतील..). गुंड्याभाऊ, प्रत्येक लेख लेखाची जी टिपणे मागील चर्चेतून काढली गेली आहेत त्यात बसेलच असे नाही..तेव्हा लेखकाला लेखनस्वातंत्र्य असावे आणि वाचकांनी सुद्धा हेतू समजून घ्यावा. आधीच उपक्रमावर कविता नसतात त्यात लेखातील भावनेला नियमांच्या चाकोरीत बांधाल तर लिहिणार्यांची गोची होईल. एकतर लिहिणे टाळले जाईल वा नीरस होईल. जनहितवादींच्या लेखात आणि या लेखात फरक आहे.
अभिजित...
जे (फाजील) बोललेले व (फाजील) लिहिलेले 'कळते' तो भाषेचा (फाजील) प्रकार शुद्धच असतो(?!?!?!).
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.(!?!?!?!)
१०००+२५०
मला वाटतं, आशाताईंच्या ७४ व्या वाढदिवशी उपक्रमावर त्यांच्याविषयी अधिक वाचायला आवडले असते.
अनेक मोठ्या कलाकारांचे, खेळाडूंचे, व्यक्तिंचे फक्त फोटो चिकटवत गेलो तर उपक्रम हे चित्रसंग्रहालय व्हायचे. - ह. घ्या.
आपण प्रयत्न करा निदान २५० शब्दांत आशाताईंबद्दल बरेच सांगता येईल.
पुढील लेखनाला शुभेच्छा!!
हेच म्हणतोय!
आशाताईंच्या ७४ व्या वाढदिवशी उपक्रमावर त्यांच्याविषयी अधिक वाचायला आवडले असते.
लेखनावर आक्षेप नाहीये हो!
हेच म्हणतोय हो मी पण.
काही माहिती तर द्या.
असो,
लेख आपला आहे, कसा लिहायचा आपणच ठरवा. मी फक्त नम्रपणे सुचवू शकतो.
असेही लेखनाचे स्वागत मी केले आहेच.
आपला
गुंडोपंत
हम्म
सहमत.
चला आता प्रतिसादांतून तरी वरील माहिती येऊ द्या. :-)
अभिजित...
शुभेच्छा ! पण....
गुंडोपंताशी सहमत !
आपण पहिल्यांदा लिहिताय म्हणून या लेखनाला शुभेच्छा देतो. खरे तर आपण पहिल्यांदाच लिहिताय म्हणून लिंक जरी दिली असती तरी आम्ही तिथे जाऊन वाचले असते आणि आपण म्हणता तसे एक चित्र म्हणजे हजार शब्द असे कुणीतरी म्हटले आहे.तेव्हा पुढील लेखात नुसते चित्र टाका आम्ही समजून घेऊ हा किती शब्दांचा लेख आहे ते,असो ! :) (ह.घ्या )
या चित्रांबरोबर काही त्यांच्या गाण्याविषयी,जीवनाविषयी, काही सांगता आले असते तर हे लेखन अधिक चांगले झाले असते असे वाटते !
पण तरिही या निमित्ताने आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे हे महत्वाचे वाटते.
अवांतर :-" जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो" या विचारांशी सहमत.
धन्यवाद!
वा बिरुटे सर,
आमचा मुद्दा संपुर्णपणे योग्य शब्दात मांडल्या बद्दल धन्यवाद!!
आपला
गुंडोपंत
अल्पसंतुष्ट.
१००० + २५० म्हणजे फार अल्पसंतुष्टपणा झाला. मी १००० + १००० ची भलामण केली असती. --वाचक्नवी