कोण व कोणास

हा चर्चा विषय आहे की लेख हे माहीत नाही.

पण काल उडत्या तबकड्यांवर प्रतिसाद देतांना मी बरेच काही बकुन गेलो.
'बहुतेक विचारवंत एकच विषय घेतात नि तासत बसतात' वगैरे वगैरे.
या वर विचार करतांना नंतर मला असं जाणवलें की माझे निरिक्षण चुकीचे नाही पण विचार तितकेसे बरोबरही नाहीत.

म्हणजे, जर एखाद्या विद्यार्थ्याला एक विषयात शोध घेवून निबंध लिहायचा आहे तर त्याला त्याच विषयात डोके खुपसून बसणे प्राप्त आहे. म्हणजे विषयाचा सुक्ष्म अभ्यास करणे जरूरीचे आहे. त्यात त्याला पंडित्य म्हणजे पी एच डी हवी असेल तर विषयाच्या अतिसूक्ष्मात जाणे अपरिहार्य होते.

उदा. समजा मला मोबाईल फोन्सची भविष्यातील टेक्नॉलॉजी असे संशोधन करण्याची इच्छा झाली. तर मला लगेच या विषयावर तंत्रज्ञान निबंध लिहिणे शक्य होणार नाही. कारण आवाका प्रचंड मोठा होईल. मला त्यातले नेमकेपण हेरावे लागेल. म्हणजे मला बँडविड्थ वर काम करायचे आहे की हँडसेटच्या स्वरूपावर काम करायचे आहे निश्चित करावे लागेल. त्यांनंतर त्यात आधीच खुप जणांनी काम केले असण्याची शक्यता असेल. त्यातलेही नेमके कोणते भाग हाताळायचे हे ठरवावे लागेल. म्हणजे, मला व्हिडियो फोन्स हा विभाग हाताळायचा आहे का हे निश्चित करावे लागेल. मग त्यातही, नक्की कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञावर काम करायचे हे ठरवावे लागेल. कारण अनेक तंत्रज्ञाने अनेक उपाय सुचवत असणार. म्हणजे पहा आपण एका मोठ्या विषयातून (जॉन्रे) सुक्ष्मात चाललो आहोत. (वर्तकी अर्थाने नाही! ;) ) यावरही पुढे जाऊन मला एक नेमका प्रश्न - नक्की कसा व्हिडियो डाटा पाठवायचा वगैरे शोधुन त्यावरच काम करावे लागेल.

त्या आधी 'हाच प्रश्न का' हे माझ्या गाईड ला पटवावे लागेल. किंवा तो जर एखादा प्रश्न हाताळत असेल तर त्यातलाच एक भागही मला संशोधनासाठी देवू शकेल.
म्हणजे मला फक्त या नि या विषयात डोके घालणे प्राप्त झाले. आता याची समग्र माहिती असण्यासाठी मला 'प्रचंड वाचन व तेही माझ्या प्रश्नाच्या दृष्टीकोनातून' करणे आले. मग मी अपरिहार्यपणे याच विषयाशी बांधले जाणे आले.

आता वरील उदाहरण व आपण आधी चर्चा केलेले शास्त्रज्ञ पाहता, त्यांचा विषय ही त्यांची पॅशन आहे असे म्हणायला जागा आहे. नि एकदा असे म्हणणे मान्य केले की ते कोणत्याही विषयाकडे ते त्यांच्या चष्म्यातून त्याच दृष्टीने पाहणार हे ही आलेच.

अर्थात माझ्यासारख्या मट्ठ माणसाला वाटणार की; काय हे लोक, एकच विषय घेतात नि तासत बसतात आयुष्यभर. पण ते तासत बसणे नसून सूक्ष्मात जाणे आहे असे मला नंतर जाणवले.

असो,
इतक्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांवर खरं तर माझी काही बोलण्याची लायकी नव्हती/नाहिये.

इतक्या सामान्य वकुबाच्या, सुमार बुद्धीच्या माणसाने गप्प बसणेच योग्य होते. ना माझे कधे शोध निबंध प्रकाशित झाले आहेत ना कसले पेटंट! मी कोण हे सगळे बकणारा. पण म्हणतात ना उथळ पाण्याला खळखळाट फार त्यातली गत आमची!

कालच्या काही वक्तव्यांवर मला पश्चात्ताप झाला व हे विचार सुचले. आशा आहे 'संशोधनाची पार्श्वभूमी काय असते' हे समजण्याला उपयोगी पडतील.

आपला
गुंडोपंत
(भावनेच्या भरात लिहिले आहे, शुद्धलेखन काय लेखनाकडेही नीट पाहिलेगेले नाहिये... तेंव्हा सांभाळून घ्या या बावळट माणसाला, ही विनंती!)

लेखनविषय: दुवे:

Comments

स्वगत

वरचे प्रकटीकरण खरं तर स्वगत या प्रकारात मोडेल असे वाटते.
पण फक्त लेख व चर्चाप्रस्ताव असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत.
स्वगतही माहितीपूर्ण होऊ शकतेच ना?

शिवाय विषय या विभागात 'संशोधन' हा विषयच नाहिये. ;०

या स्थळाच्या उद्दीष्टांच्या दृष्टीकोनातून पाहिले असता 'संशोधन' याचा विषयांमध्ये अंतर्भाव महत्वाचा वाटतो!!

अर्थात संपादकांना जास्त कळते या न्यायाने संपादकांनी संपुर्ण विचार करूनच हे पर्याय ठेवले असतील (व नसतील! ;) )

यात अजून पर्याय असावेत असे वाटले. अर्थात अजूनही मते असु शकतील.

आपला
गुंडोपंत

छान!

आपला हा लेखन प्रपंच एकदम आवडला गुंडोपंत. फक्त सध्याच्या काळात स्वगत हे शक्यतो इतरांबद्दल बोलण्यासाठी वापरतात.:) येथे आपण स्वतःबद्दल वापरलेत पण आवडले. नारळीकरांबद्दल आणि शास्त्रज्ञच कशाला पण कोणीही काही स्वतःबाहेर जाऊन काम करत असेल तर त्या व्यक्तीबद्दल आदर ठेवला पाहीजे असे वाटते.

हो ना!

आपला हा लेखन प्रपंच एकदम आवडला गुंडोपंत.

धन्यवाद! विकासशेठ...
नारळीकरांबद्दल आणि शास्त्रज्ञच कशाला पण कोणीही काही स्वतःबाहेर जाऊन काम करत असेल तर त्या व्यक्तीबद्दल आदर ठेवला पाहीजे असे वाटते.

अगदी खरंय हो! असे किती तरी महान लोक आहे की जे एक शब्दही न काढता मुकटपणे लोकांसाठी कामे करत आहेत. ते इतर ठिकाणे कसेही असोत त्यांच्याकामाविषयी आदर असलाच पाहिजे. म्हणून तर मला नंतर वाईट वाटले हो. अगदी पश्चात्तापच झाला! म्हंटलं मन मोकळं करून टाकू. असं काय असतं हो, म्हंटलं तर अहं खुप मोठा नि म्हंटल तर आवाक्यात. मी आपला आवाक्यातच आणून टाकला आज!

आपल्या "कंफर्टझोन" मधुन बाहेर पडून काही करायला फार कष्ट पडतात हो. आपण कोण लागून गेलोय त्यावर भाष्य करायला...

काय म्हणता?
आपला
गुंडोपंत
~खेडुताला बाहेर काढण्याचा काही मार्ग नाही का? लिखाणातले वेगळेपण यावर काही सवलत त्याला? :) ~

हेच म्हणतो

लोक जेव्हा तोंड सोडून सचिन तेंडुलकरवर बोलतात तेव्हा हेच मनात येते...

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

एकदम प्रांजळ

आवडले.

आजपासून मी पण अनेकदा विचार करून योग्य पण मोजक्या शब्दात अगदी गरज असेल तरच लिहायचा प्रयत्न करीन. अगदी काही काळ उत्स्फूर्ततेची उर्मी दाबून टाकावी लागली तरी. वरवर निरागस वाटणारा अनिर्बंध उत्साह कधी बेशिस्त होतो व मोठी बेशिस्त किती बीभत्स भासते हे प्रत्येकजण जाणतोच.

बर्‍याचदा नामांकीत लोकांबद्दल काही ना काही कमीपणाचे लिहणे बहूतेक लोकांना (**) आवडते, असे मला वाटते. मग त्यापुढे शब्दोछल. (??) असो प्रत्येकाला स्वतंत्र मत असते ह्यावर दुमत नाही, पण आपण नुस्ता वाद घालतोय, विषयांतर करतोय की काही खरच उपयुक्त काम करतोय ह्यावर जरा जास्त विचार करावा.

** बहूतेक लोकांना = म्हणजे माझ्यासकट हो, म्हणजे कुणी व्यक्तिगत घेऊ नका.(पण निदान स्वतःला एकदा विचारा की आपण असे करतो का मनातल्या मनात सुद्धा) असो यापुढे मी प्रयत्न करीन सुधरण्याचा.

उर्मी ते उपरती

आजपासून मी पण अनेकदा विचार करून योग्य पण मोजक्या शब्दात अगदी गरज असेल तरच लिहायचा प्रयत्न करीन. अगदी काही काळ उत्स्फूर्ततेची उर्मी दाबून टाकावी लागली तरी. वरवर निरागस वाटणारा अनिर्बंध उत्साह कधी बेशिस्त होतो व मोठी बेशिस्त किती बीभत्स भासते हे प्रत्येकजण जाणतोच.

उर्मी दाबण्या पेक्षा उपरती बरी. ही घडणे बिघडण्याची प्रक्रिया आहे. विवेकाच्या प्रक्रियेत स्वत:ला अडकवून स्वतःला संतुलित राखण्यातच बरीच एनर्जी खर्च होते. मग आपल्याकडून कार्याचे आउटपुट काय बाहेर पडणार? त्यापेक्षा त्या उर्जेतून आलेले आउटपुट बाहेर पडू द्यावे. विवेक ही पुनरावलोकनाची संधी नेहमीच देतो. त्यातून उपरती झाली तर तेही आउटपुटच आहे.

असो प्रत्येकाला स्वतंत्र मत असते ह्यावर दुमत नाही, पण आपण नुस्ता वाद घालतोय, विषयांतर करतोय की काही खरच उपयुक्त काम करतोय ह्यावर जरा जास्त विचार करावा.

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अर्थ दुसर्‍याच्या मतस्वातंत्र्याचा आदर करावा असा देखील आहे. आपल्याला मान्य नसलेले मत जर केवळ दुसर्‍याचे आहे म्हणून जर त्याची मुस्कटदाबी होत असेल तर ते व्यक्त होउ देण्यासाठी करावी लागणारी लढाई ही सुद्धा अभिव्यक्तिस्वातंत्र्याची च लढाईच आहे. असो आणि विषयांतर हे कधि कधि नव्या दुर्लक्षित वा उपयुक्त विषयाला जन्म घालत असते याचाही विचार झाला पाहिजे.

प्रकाश घाटपांडे

मानलं!

वा! घाटपांडे साहेब,
आपण कधीकधी (की बरेचदा!) फारच सुंदर फिलॉसॉफिकल गोष्टी लिहुन जाता!
आपला हा प्रतिसाद खुपच आवडून गेला.
तुम्ही इथली , उपक्रमाची एक मोठी ऍसेट अहात असं म्हंटलं तर वावगं ठरू नये!

आपला
गुंडोपंत

सुंदर

अतिशय सुंदर प्रतिसाद..

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

संशोधन एक विचार.

खरे तर तबकड्यांवर आम्हालाही काहीतरी लिहिण्याचा मोह झाला होता पण तो नाद सोडून दिला. पंत, जिज्ञासा वृत्तीमुळे माणसाला एखादा प्रश्न पडतो.त्या प्रश्नाची चिकित्सा करायची आणि मग त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न माणूस करत असतो.पण त्या प्रयत्नाला शास्त्रीय तत्वांचा आणि शोध पध्द्तीचा आधार घ्यावा लागतो तेव्हा त्या विषयातून एक नवीन विचार जन्म घेतो किंवा त्याला संशोधनाची प्रतिष्ठा लाभत असते.संशोधन काही वेळ घालविण्याचा कार्य नाही,किंवा अधिक वेळ लागला आहे,म्हणजे संशोधनाला महत्व येते असेही नाही.तर ज्या विचारामध्ये जिज्ञासा,सत्यनिष्ठा,निर्भयता,परिश्रम,चिकाटी,संशोधनासाठी आवश्यक असे गूण आहे.जिज्ञासा वृत्तीने निर्माण झालेल्या प्रश्नापासून संशोधनाची प्रक्रिया सुरू होते आणि त्या प्रश्नाचे विश्वसनीय, प्रमाणभूत उत्तर मिळाले की त्या संशोधन विषयावरचे संशोधन संपते त्यासाठी प्रचंड मेहनत,आणि वाचन असलेच पाहिजे यात शंकाच नाही.ज्येष्ठ शास्त्रज्ञांवर खरे तर बोलू नये असे माझे वैयक्तिक मत आहे.कारण त्यांनी काही वेळ प्रामाणिकपणाने संशोधनाला दिलेला असतो त्याच्यासंबंधी विधाने जरा जागरूकपणाने केली पाहिजेत असे वाटते.

अवातंर:) शुद्धलेखनाची काळजी घेतली आहे,पण तरीही चुका राहिल्यास त्या दाखवाव्यात पण व्य.नि.ने :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे पटले! आणी

त्या प्रयत्नाला शास्त्रीय तत्वांचा आणि शोध पध्द्तीचा आधार घ्यावा लागतो तेव्हा त्या विषयातून एक नवीन विचार जन्म घेतो किंवा त्याला संशोधनाची प्रतिष्ठा लाभत असते.
वा वा!!
क्या बात है सर!
अगदी योग्य शब्दांत छानच मांडला हा विचार.

त्यांनी काही वेळ प्रामाणिकपणाने संशोधनाला दिलेला असतो त्याच्यासंबंधी विधाने जरा जागरूकपणाने केली पाहिजेत असे वाटते.

पटले हो सर... पण नेहेमी प्रमाणे जाग उशीरा आली ना!

आणी सर आपण कधी पासुन शुद्धेलेखनाच्या फळीत सामील झालात?
एकदम पार्टी बदल?

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

शुद्धलेखन ! हा हा हा

आणी सर आपण कधी पासून शुद्धेलेखनाच्या फळीत सामील झालात?
एकदम पार्टी बदल?

नाही हो ! आपली अशुद्धलेखनाची चळवळ चालूच आहे,म्हणजे ~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
पण हे शुद्धलेखनवाले जाहीर डसतात. त्यापेक्षा त्यांचे जे काही म्हणणे असेल त्यांनी व्य. नि. ने पाठवावे म्हणजे तिकडे लक्ष देण्याची गरज राहणार नाही,कसे ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा हा हा!

पण हे शुद्धलेखनवाले जाहीर डसतात.

"जाहीर डसणे" वाक्प्रचार अतिशय आवडला! अजून हसणे थांबले नाही!:)))))))

त्यापेक्षा त्यांचे जे काही म्हणणे असेल त्यांनी व्य. नि. ने पाठवावे म्हणजे तिकडे लक्ष देण्याची गरज राहणार नाही,कसे ! :)

वा अनुल्लेखाने मारणे हा उत्तम उपाय!
(तुम्ही मनोगताच्या संपादकांमध्ये अहात की काय? ;) )

संपादक राव ह. घ्या. :))

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

कोणी म्हटलंय ;-)

कोणी म्हटलंय पेक्षा काय म्हटलंय हे महत्त्वाचं (असं कुणीतरी म्हटलंय :-)

असं कुणीतरी कुठेतरी म्हटलं असणारच पण त्याबरोबर कोणी म्हटलंय हे ही फार महत्त्वाचे ठरते.

"हा देश खड्ड्यात जावो!" (अरे बापरे! काय भलतंच वाक्य सुचलं) असे रस्त्यावरचा भिकारी म्हणाला तर फार फरक पडणार नाही (फारतर एखाद्या तथाकथित देशभक्ताची थप्पड खाईल.) पण खुद्द देशाचे पंतप्रधान (लगे हाथ, पार्टी प्रेसिडेंट ;-) ) असे म्हणून गेले तर? (किती गोंधळ/ हुल्लड/ हंगामा होईल?)

माणूस मोठा असला म्हणून बरोबर असतो असे थोडेच आहे?

जे आवडतं त्याची भलावण करावी, आणि जे आवडलं नाही त्याची निंदा.

हे मात्र बरोबर.

बाकी, ही चर्चा अनावश्यक वाटली.

म्हणजे

कळले नाही!
म्हणजे या चर्चेचा विषय नि ही चर्चा की खालची प्रतिसादातली चर्चा?

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

कळले नाही!

कळले नाही! म्हणजे या चर्चेचा विषय नि ही चर्चा की खालची प्रतिसादातली चर्चा?

वर तुम्ही हा खेद सूक्ष्मात जाण्याबद्दल वाटला होता ते खाली पुन्हा स्पष्ट केल्याने विषय काय होता ते आता कळले (पूर्वी कळले नव्हते) पण तरीही वेगळा चर्चाप्रस्ताव टाकायचे प्रयोजन कळले नाही. असो.

मला प्रथम तुम्ही चर्चाप्रस्ताव का टाकला ते कळले नाही आणि तुम्हाला मला प्रतिसादात काय म्हणायचे आहे ते कळले नाही म्हणजे आपन दोगं बी असुध भासेते लिवत व्हतो म्हनायचं. ;-) कारन ~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो. (ह. घ्या)

भारीच टोला! :))

मला प्रथम तुम्ही चर्चाप्रस्ताव का टाकला ते कळले नाही आणि तुम्हाला मला प्रतिसादात काय म्हणायचे आहे ते कळले नाही म्हणजे आपन दोगं बी असुध भासेते लिवत व्हतो म्हनायचं. ;-) कारन ~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो. (ह. घ्या)


वा!
प्रियालीताई भारीच टोला दिला तुम्ही गुंडोपंतांना! :)))
अगदी सही!!

आपला
गुंडोपंत

धन्यवाद!

वरील प्रतिक्रीयेतून आपण मला लिबरल समजलात, आम्हाला सगळे पावले! आता आम्ही युयुत्सु महाराजांचे देऊळ बांधून नारळ फोडायला मोकळे! :) (फक्त ते त्यांनीच वर्णिलेल्याकुठल्या देवात मोडतात ते मात्र मला माहीत नाही!)

सुक्ष्मात

सुक्ष्मात चाललो आहोत. (वर्तकी अर्थाने नाही! ;) )

हॅ हे गुंडोपंत. लई भारी. यावरून आठवले.मूंबईला नागपाड्याला असताना जे जे रोड ते नागपाडा पोलिस एमटी या रस्त्यावर पदपथावर काही भिकारी बसलेले असायचे. त्यातील काही हे मला चेहर्‍यावरून ऍरिस्टॉटल, टायको ब्राहे, गॅलिलीओ सारखे वाटायचे. तासन तास सूक्ष्मात, डोळ्यात कुठलेही भाव नाहीत, जणू काही अनंताचा विचार करताहेत. काही काळानंतर ते मला हळुच सिगारेटच्या चांदीच्या कागदावर ब्राउन शुगरचे चेसिंग करताना दिसले आणी सूक्ष्माचा रहस्यभेद झाला.
प्रकाश घाटपांडे

माझीही बकबक

काल उडत्या तबकड्यांवर प्रतिसाद देतांना मी बरेच काही बकुन गेलो.

जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही बकलात आणि त्याचा पश्चात्ताप होत असेल तर बरेच आहे पण ज्यावर चर्चा झाली तो मूळ मुद्दा बदलतो का?

'बहुतेक विचारवंत एकच विषय घेतात नि तासत बसतात' वगैरे वगैरे.
या वर विचार करतांना नंतर मला असं जाणवलें की माझे निरिक्षण चुकीचे नाही पण विचार तितकेसे बरोबरही नाहीत.

हो म्हणजे दिलिपकुमार, राजकुमार कोणत्याही भूमिकेत दिलिप आणि राजच असतात. शाहरुख कधीकधी बदलतो आणि आमीर प्रत्येकवेळेस आपल्या चुका, मर्यादा जाणून बदलत राहतो. मला बॉ आमीरच आवडतो कारण त्याच्यात बदलायची क्षमता आहे.

आता वरील उदाहरण व आपण आधी चर्चा केलेले शास्त्रज्ञ पाहता, त्यांचा विषय ही त्यांची पॅशन आहे असे म्हणायला जागा आहे. नि एकदा असे म्हणणे मान्य केले की ते कोणत्याही विषयाकडे ते त्यांच्या चष्म्यातून त्याच दृष्टीने पाहणार हे ही आलेच.

हे गरजेचे आहे का? त्यापेक्षा जास्त गरज लोकांनी आपापले नंबर (चष्म्याचे, मटक्याचे नाहीत) तपासून घेण्याची नाही काय?

इतक्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांवर खरं तर माझी काही बोलण्याची लायकी नव्हती/नाहिये.

अमिताभवर बोलायची माझीही लायकी नव्हती/नाही पण त्याने रिटायर व्हावे असे मला रोज वाटते. बरेचदा त्याचा उबगही येतो.

इतक्या सामान्य वकुबाच्या, सुमार बुद्धीच्या माणसाने गप्प बसणेच योग्य होते. ना माझे कधे शोध निबंध प्रकाशित झाले आहेत ना कसले पेटंट! मी कोण हे सगळे बकणारा. पण म्हणतात ना उथळ पाण्याला खळखळाट फार त्यातली गत आमची!

आमचीही गत तशीच असावी कारण आम्ही शाळेच्या नाटकातही स्टेजवर चढलो नाही. माझे काही शोधनिबंध प्रसिद्ध झाले नाही, माझे काही चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत, मला तर गाता येत, नाही मी रेकणार्‍या नव्या गायकांवर कसे बोलू असे प्रश्न जनतेला पडायला लागले तर प्रमोद देव म्हणाले तसे "बाबा वाक्यम् प्रमाणम्" असे म्हणावे लागेल.

बाबांचे भक्तगण तेच तर करतात. प्रचार आणि प्रसार!!! आणि गुंडोपंतांसारखी (व्यक्तिगत टीका नाही हो! )भोळी माणसे एखाद वेळेस वैतागून तोंड उघडतात आणि नंतर अरेच्चा बाबांच्या भजनी इतकी माणसं असताना मी हे काय बकून गेलो असा विचार करून पश्चात्ताप करतात.

-राजीव.

अरे मुद्दा तो नाही रे!

अरे राजीवा,
बाबांचे भक्तगण तेच तर करतात. प्रचार आणि प्रसार!!! आणि गुंडोपंतांसारखी (व्यक्तिगत टीका नाही हो! )भोळी माणसे एखाद वेळेस वैतागून तोंड उघडतात आणि नंतर अरेच्चा बाबांच्या भजनी इतकी माणसं असताना मी हे काय बकून गेलो असा विचार करून पश्चात्ताप करतात.

मुद्दा तो नाहीये रे बाबा! पश्चाताप माझ्या विचारांच्या योग्य नसल्या बद्दल आहे. मुख्य म्हणजे हे वैतागूनही नाहिये.

नारळीकरांच्या भजनी आक्खा देश असु देत. मला काही घेणे देणे नाही. पण त्या शास्त्रज्ञांची 'सूक्ष्मात जाणे यातली जी काही चिवटपणाची कॅपॅसिटी आहे (जी त्यांनी अनेक वर्षात दाखवून दिली आहे) त्याविषयी मी भाष्य करणे'; हे माझे मलाच विचार केल्यावर रुचले नाही.

वरील स्वगत तु परत वाचलेस तर मी सुरुवातीलाच स्प्ष्ट केले आहे की, या वर विचार करतांना नंतर मला असं जाणवलें की माझे निरिक्षण चुकीचे नाही पण विचार तितकेसे बरोबरही नाहीत.

म्हणजेच त्यांच्या विज्ञानातल्या/संशोधनातल्या घेतलेया परिश्रमांवर 'मी' काही भाष्य करणे मलाच पटले नाही. 'त्यांच्या क्षेत्रातल्या त्या उंचीवर' मी नाही तरीही मी त्यावर बोलतोय "नि त्यात काय विषेश" असा भाव त्यात आहे, या जाणीवे विषयी चे हे प्रकटन आहे.

या शिवायही, उद्या नारळीकर म्हणाले की ज्योतिष झूट नि त्यावर घाटपांडें साहेबांनी इथे काही लिहिलेच, तर गुंडोपंत सरसावणार नाहीत असे नाहीच. कारण नारळीकरांनी ज्योतिषात काही संशोधन असे केलेले नाही. (मला माहित नाही). मी काही ते ऐकुन घेणार नाहीच याची खात्री बाळग.

थोडक्यात त्यांच्या संशोधनाची वासलात "घेतात एक् विषय नि बसतात तासत" येवढ्यावर लागू नये इतकेच!

बाकी मला भोळा म्हणालास???
वा! परत गुदगुल्या हां!!! थँक्यु थँक्यु!!

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

अपराधी वाटून घेऊ नये

गुंडोपंतांचा हा लेख मला अनावश्यक वाटला. माझ्या मते जे वाटते ते निरागसपणे बोलून मोकळे व्हावे व नंतर चुकीचे वाटल्यास तेही तितक्याच निरागसपणे सांगावे. उगीचच अपराधी वाटून घेण्याचे कारण नाही.
फक्त
दुसर्‍याचे मन दुखावले जाईल असे लागट बोल आपण शक्यतो बोलू नयेत असे मला तरी वाटते. आणि कोणी काही बोलला की लगेच आपल्या श्रद्धास्थानावर हा हल्ला आहे असे मानून "इंच-इंच लढवू" मोड् मध्येही जाऊ नये. इतके का आपण इन्सिक्युअर् आहोत?
येताजाता हमरीतुमरीवर येणे मला बरे वाटत नाही. अर्थात् ज्यांना यातच मजा वाटत असेल त्यांनी ती मजा सुखेनैव घ्यावी, पण अती ताणले की जनलोकांत आपले हसे होते याचीही जाणीव असू द्यावी.
- दिगम्भा

हेच.

बोलून झाले ना मोकळे, काय बी वाईट वाटून नै घ्याचं.
जनलोकांत आपले हसे होते याचीही जाणीव असू द्यावी.

नाय कोनी कोनाला हसत नाय जरशीक सबूरी धराची मोठ्या लोकाबद्दल बोलाचा नाय.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत जेलात जाण्यापरीस फटकन लिहून मोकळं :)
खेडुत कुढं अडकला तेला भायेर याचा चान्स देला पाहिजे राव.
बाबूराव :)

मला मात्र ते

आपल्याला तसे वाटण्याची शक्यता आहेच.

पण मला मात्र कुणीही कुणाची समिक्षा करतांना त्या व्यक्तीच्या "सर्वच कार्याची भलामण करु नये नि सर्वच कार्य त्यात काय विषेश" असेही गणु नये असे वाटते. मी वर म्हणाल्या प्रमाणेच, त्यांच्या विज्ञानातल्या/संशोधनातल्या घेतलेया परिश्रमांवर 'मी' काही भाष्य करणे मलाच पटले नाही. 'त्यांच्या क्षेत्रातल्या त्या उंचीवर' मी नाही तरीही मी त्यावर बोलतोय "नि त्यात काय विषेश" असा भाव त्यात आहे, या जाणीवे विषयी चे हे प्रकटन आहे.
मला हा विषय उघडावासा वाटला कारण या संकेत स्थळाचे वाचक एलिट आहेत असे यनावाला साहेब म्हणाले. अशा वेगळी जाणीव असलेल्या सदस्यांकडून कुणाचे तरी संशोधन इतक्या वर्षांची मेहेनत एका वाक्यात धुडकावून टाकण्यावरही काहीच प्रतिक्रिया येवू नये या भावनेतूनही आली असेल.
आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

वा!

लोकमान्यांचे शब्द आठवले, "...एक गांजाची चिलीम ओढली की वाटेल तेव्हढ्या कल्पना सुचायला लागतात..." बाकी आपले काय "चिलीम का ताज्या धारेची?" :-)

वा!

एक गांजाची चिलीम ओढली की वाटेल तेव्हढ्या कल्पना सुचायला लागतात
वा वा! चर्चे आधी ओढून पहायला पाहिजे!
भांगेत तशी मजा राहीली नाही हो काही हल्ली विकासराव! ;)))))

बाकी एकुणच 'चर्चासत्रां मधल्या विचारांकडे' बघण्याचा दृष्टीकोन बदलावा की काय असे वाटायला लागले आहे आता मला!

काय म्हणता?

आपला
गुंडोपंत
~जो घेतलेला 'कळतो' तो गांजाचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे "शुद्धीचा" फाजील(?) आग्रह येथे धरू नये. ;)))) ~

मी कधी माफी मागितली बॉ?

"माहितीपूर्ण ह्या नावाखाली कुणाचीही भलामण आणि कुणाचीही हेटाई करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला उपक्रमाने दिले आहे. "

असं म्हणता?
बरं! मग आपली मजाच आहे ;)

"तू आपले विचार लिहिण्याबद्दल माफी कुणाची आणि कशाबद्दल मागतो आहेस ?"
मी कधी माफी मागितली बॉ?

"कुणाच्या श्रद्धास्थानाची निंदा केल्यामुळे माफी मागायची अशी प्रथा तू पाडलीस, त्यर मग मला हजारो लोकांना, माझ्या मातापित्यांसकट, उत्तरेच देत बसावी लागतील रे."
नाय बा!! मी तर काही कुणाची श्रद्धास्थाने दुखावली असतील वगैरे चा विचार केलाच नाही! :)
मी तर 'मला काय वाटते आहे' याचाच विचार करतोय! ;)

"विचार व्यक्त करायचे."
ते तर केलेच! :))

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

मी काय म्हणणार?

पण अती ताणले की जनलोकांत आपले हसे होते याचीही जाणीव असू द्यावी.

अरे!!! अति ताणले गेले? मी तर पहिल्यांदाच असा काही विचार/प्रकटन मांडले आहे.
मला कल्पना नव्हती, मला वाटले की चर्चा होते आहे.
मी काही उगीचआपराधी वगैरे वाटून घेत नाहिये.
इथे एक माहितीपुर्ण लेख लिहायचा तर दहवेळा गुगल करावे लागते तर
संशोधन करायला नि ते सविस्तर पणे मांडायला काय खस्ता खाव्या लागत असतील;

याचा विचार करून त्या संशोधनाची वासलात चार शब्दात लावू नये, इतकेच म्हणायचे आहे.

असो,
आपण माझ्या विचारांबद्दल मला हसु शकता बॉ! मी काय म्हणणार?

आपला
गुंडोपंत

कर्ता कर्म

कोण आणि कोणी- कर्ता
काय आणि कोणास - कर्म

लेखन अकारण असेल तर कर्मणि प्रयोग वापरावा
लेखन सकारण असेल तर कर्तरी प्रयोग वापरावा
अन्यथा भावे प्रयोग उत्तम

प्रकाश घाटपांडे

प्रकाटाआ

प्रतिसाद काढून टाकला आहे.

विनाकारण

यात दुसरी शक्यता अशी. अकारण, भावे वगैरे दोन अर्थी शब्दांनी तुम्ही कुठलातरी भन्नाट विनोद साधला आहे, आणि मला तो मठ्ठपणामुळे मुळीच समजलेला नाही.

सकारण वा अकारण पलिकडे काही व्याकरणाच्या चौकटीत /कैचित न अडकता असणार "विनाकारण". याला हव तर आमचा मठ्ठपणा समजावे. बाकी पहिल्या शक्यतेतील भाष्य आवडले.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर