जगणे म्हणजे काय ?

माणसाने कसे जगावे,याबद्दल अनेकांनी उपयुक्त लिखाण केले आहे.त्यामध्ये संतांचे योगदान मोठे आहे.त्यांच्या उपदेशांप्रमाणे आचरण केले तर पूनर्जन्माचा फ़ेरा चुकेल,असे संतानी स्पष्टच सांगितले आहे.किमान चालू जन्म तरी सुखकारक जावा,असे बहुतेक सर्वाना वाटत असते.यादृष्टीकोनांतून विचार करु जाता,संत समर्थ रामदास यांच्या ''दासबोधा''तील तपशीलवार सुचना पुरेशा आहेत,असे म्हणता येईल.पण संतांचे उपदेश हे ,सारे करून सवरून झाल्यावर ,शेवटी भजन करण्यापुरते विचारांत घेण्याची परंपरा निर्माण झाली आहे.तसेच जीवनाकडे गांभीर्याने न बघता,''खा ,प्या ,मजा करा ''यावरच बहुतेकांचा भर आहे.यामुळे कांही महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊन गेले आहे.पण एवढेच म्हणजे जगणे,नव्हेच ! तुमच्या घरावर प्रेम करणे याचा अर्थ घर सुंदर स्वछ असावे म्हणून तुम्ही प्रयत्नशील असायला हवे.ते बायकोवर किंवा फ़क्त नोकरांवर सोपवणे,पुरेसे नाही.तुम्ही ज्यागावात रहाता ,तेथील रस्ते,बागा,सार्वजणिक पाणी-व्यवस्था यामध्ये ही सहभाग घेवून या सर्व गोष्टी चांगल्याच रहातील यासाठी लक्ष दिले पाहिजे‌. समर्थ रामदास स्वामीनी दासबोधामध्ये जे तपशीलवार मार्गदर्शन केले आहे,त्यानुसार वैयक्तिक आचरण केले तर आपले वैयक्तिक व सार्वजणिक जीवन नक्कीच कृतार्थ झाल्याशिवाय रहाणार नाही.यासाठी प्रत्येकाने हे माझे ही कर्तव्य आहे,असे मानून इतर कोणीतरी करेल याची वाट पाहणे बंद केले पाहिजे.यातूनच जगण्याचा खरा अर्थ उमगेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

'जगणे' चा अर्थ

माझ्या मते जगणे म्हणजे 'जग'णे म्हणजेच जग अनुभवणे.

एकच प्यारा ३ वेळा?

एकच प्यारा ३ वेळा का आला आहे?

असो,
हा प्रश्न फक्त रामदासाच्या नि संतांच्या दृष्टीकोनातूनच का बघावा?
यादृष्टीकोनांतून विचार करु जाता,संत समर्थ रामदास यांच्या ''दासबोधा''तील तपशीलवार सुचना पुरेशा आहेत,असे म्हणता येईल.

असं का म्हणता येईल, यावर काही खुलासा केला नाहिये आपण.

यावर अजूनही अनेक तत्ववेत्त्यांनी सखोल चिंतन केले आहे.
त्यांचा विचार करायचाच नाही का मग?

समर्थ रामदास स्वामीनी दासबोधामध्ये जे तपशीलवार मार्गदर्शन केले आहे
रस्ते व बागा स्वच्छ ठेवण्या विषयी कोणते मार्गदर्शन आहे तेही येथे तपशिलवार दिलेत आवडेल.

याशिवाय मला तर 'आला दिवस आपला म्हणावा' हे 'तात्या-तत्व' आवडते.
मी तसे आचरण केले तर काय बिघडले?

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

गुंड्याभाऊ,

याशिवाय मला तर 'आला दिवस आपला म्हणावा' हे 'तात्या-तत्व' आवडते.
मी तसे आचरण केले तर काय बिघडले?

खरं आहे रे बाबा! 'गेला दिवस आपला म्हणायचा, उद्याचं माहीत नाही!' असं म्हणून गेला दिवस थोडे कष्ट, थोडी मौजमजा करून पुढे ढकलणारी सामान्य माणसं आपण! :)

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

हेच म्हणतो. शुद्धलेखनाचे फाजिल लाड थांबवलेच पाहिजेत! :)

आपला,
(बोलीभाषेचा पुरस्कर्ता) तात्या.

--
गाण्याच्या बाबतीत ज्यांना स्वतःला धड दोन ओळीही गुणगुणता येत नाहीत अशी मंडळी 'संगीत समिक्षक' होतात, तसेच थोडेसे या शुद्धलेखनाचे डोस पाजणार्‍यांचे आहे! :)

बोहल्यावरून पळून गेले! :)

यासाठी प्रत्येकाने हे माझे ही कर्तव्य आहे,असे मानून इतर कोणीतरी करेल याची वाट पाहणे बंद केले पाहिजे.यातूनच जगण्याचा खरा अर्थ उमगेल.

असं म्हणता? बरं बरं! :)

म्हणजे आमचं जगणं समाजाकरता अन् देशाकरता अंमळ निरुपोयोगीच आहे असं म्हणायला हवं. कारण आम्ही खा, प्या आणि मजा करा या पंथातले आहोत! असो..

आणि स्वतः रामदास स्वामी तर ऐन वेळेस बोहल्यावरून पळून गेले तेव्हा त्या नवर्‍यामुलीची अन् तिच्या आईवडिलांची काय मानसिक अवस्था झाली असेल याचा विचार करा की राव! त्या मुलीकडच्या मंडळींची त्या काळच्या समाजात किती नाचक्की झाली असेल याचा विचार खुद्द स्वामींनी तरी कधी केला काय?

आदर्श जगण्याच्या गप्पा काय, कुणालाही मारता येतात हो!

असो,

आपला,
(बाईबाटलीतला!) तात्या.

रामदास

आणि स्वतः रामदास स्वामी तर ऐन वेळेस बोहल्यावरून पळून गेले तेव्हा त्या नवर्‍यामुलीची अन् तिच्या आईवडिलांची काय मानसिक अवस्था झाली असेल याचा विचार करा की राव! त्या मुलीकडच्या मंडळींची त्या काळच्या समाजात किती नाचक्की झाली असेल याचा विचार खुद्द स्वामींनी तरी कधी केला काय?

हा प्रश्न बर्‍याच लोकांना पडला आहे. रामदासस्वामींनाही पडला असेलच की? त्यांना जबरदस्तीने बोहल्यावर चढवल्यामुळे ते पळून गेले असावे. पण ज्या वयात ते पळून गेले ते वय त्यांचे विचार करायचे नव्हते. स्वत:ची सुटका ही प्रेरणा प्रबळ ठरली. पण नंतर त्याबाबतचे भाष्य कुठे आहे कि नाही याचा खुलासा जाणकार करु शकतील.

प्रकाश घाटपांडे

हेच म्हणतो..

पण नंतर त्याबाबतचे भाष्य कुठे आहे कि नाही याचा खुलासा जाणकार करु शकतील.

हेच म्हणतो.

आणि मागाहून रामदास स्वामींनी त्या मुलीकडच्या मंडळींची क्षमा वगैरे मागितल्याचेही ऐकिवात नाही!

म्हणूनच म्हणतो की भलाइकीच्या गप्पा मारणे आणि लोकांना उपदेश करणे खूप सोप्पे आहे!

तात्या.

राज्या म्हणे

स्वतः रामदास स्वामी तर ऐन वेळेस बोहल्यावरून पळून गेले तेव्हा त्या नवर्‍यामुलीची अन् तिच्या आईवडिलांची काय मानसिक अवस्था झाली असेल याचा विचार करा की राव!

पटलं तात्या! तुकारामांची बायकोही विठ्ठलाला शिव्या घालत असे कारण स्वतःचा प्रपंच आणि पोरवडा सोडून महाराज जगाच्या प्रपंचाने चिंतीत होते आणि गौतम बुद्धही आपल्या बायकोला आणि मुलाला ते झोपेत असताना सोडून पळाले होते.

- राज्या.

कष्टाची भाकरी कमावणे हीच खरी विठ्ठलभक्ति!

तुकारामांची बायकोही विठ्ठलाला शिव्या घालत असे कारण स्वतःचा प्रपंच आणि पोरवडा सोडून महाराज जगाच्या प्रपंचाने चिंतीत होते

खरं आहे. तसा मीही तुकोबांच्या काव्याचा फॅन आहे. ते एक प्रतिभासंपन्न कवी होते हेही निर्विवाद! पण विठ्ठलभक्ती करतांना स्वतःच्या बायको-पोरांना हालाखीच्या परिस्थितीत ढकलण्याचा महाराजांना काय अधिकार होता? उलट पोटापाण्यासाठी काहीतरी कष्ट (!) करून स्वतःच्या बायकोला, मुलांना सुखसमाधानात ठेवणे हीच खरी विठ्ठलभक्ती! पोटापाण्याच्या उद्योगाकरता, आपला प्रपंच चालवण्याकरता तुकोबांनी झडझडून कष्ट केल्याचे ऐकिवात नाही!

मेहनतीची, कष्टाची भाकरी न कमावता 'विठ्ठल विठ्ठल' करत बसणे केव्हाही सोपेच आहे असे वाटते!

आणि गौतम बुद्धही आपल्या बायकोला आणि मुलाला ते झोपेत असताना सोडून पळाले होते.

आय सी! त्यांच्याबद्दल मला फारशी माहिती नाही!

आपला,
बाबासाहेब अभ्यंकर! :)

ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ

भारतीय तत्वज्ञ, संत तसेच अधुनीक (पाश्चात्य) आईनस्टाईन सारखे वैज्ञनीक, अनेक विचारवंत वगैरे - यांच्या काहीना काही अशा पण "असामान्य" वागण्याच्या कथा वाचायला/ऐकायला मिळतील. पण त्यामुळे त्यांनी सांगीतलेले तत्वज्ञान, लावलेले शोध वगैरेचे महत्व कमी होत नाही.

रामाला तर शिव्यादेणारे आहेतच. उद्या शिवाजीला पण आठ बायकांशी लग्न कसे केले म्हणून कालसापेक्ष गोष्टींबद्दल बोलत बसायचे आणि त्याचा पराक्रम जो कालातीत आहे त्यावर बोलायचे नाही असे केले तर जसे योग्य नाही तसेच वरील तत्वज्ञांचे तत्वज्ञान न शिकता/वाचता, लग्नातून कोणं पळाले, बायको कडे कोणी दुर्लक्ष केले, बायको-मुलाला कोणी सोडले या गोष्टींच्या उहापोहाची गरज नाही असे वाटते. आजही असे अगदी मराठी लेखक/विचारवंत हयात आहेत अथवा नजीकच्या काळात हयात होते, ज्यांनी दोन लग्ने केलीत, बायकापोरांना सोडून लग्नाव्यतिरिक्त राहीलेत, विवहबाह्य संबंध ठेवलेत. त्याबद्दल त्यांची नावे घेऊन बोलायचे ठरवले तर शिष्ठाचाराला धरून होणार नाही पण आपण त्यांच्या कथा, कादंबर्‍या, लेख वगैरे वाचतो आणि "appreciate"ही करतो आणि तसे करयालापण हवे. मग जे शतकांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेले पण ज्यांचे विचार, साहीत्यकृती कालातीत राहीलेत त्यांच्याबद्दलच ही चर्चा कशाला?

नामुष्कीची वेळ!

पण त्यामुळे त्यांनी सांगीतलेले तत्वज्ञान, लावलेले शोध वगैरेचे महत्व कमी होत नाही.

असं आम्हीही म्हटलेलं नाही!

तसेच वरील तत्वज्ञांचे तत्वज्ञान न शिकता/वाचता, लग्नातून कोणं पळाले, बायको कडे कोणी दुर्लक्ष केले, बायको-मुलाला कोणी सोडले या गोष्टींच्या उहापोहाची गरज नाही असे वाटते.

का बरं? अहो ही तर मंडळी आपल्या गाथांतून आणि काव्यातून अन् श्लोकांतून जगावं कसं या बद्दलचे धडे देत असतात. मग त्यांनी स्वतः तसा आदर्श लोकांसमोर ठेवायला नको का?

आजही असे अगदी मराठी लेखक/विचारवंत हयात आहेत अथवा नजीकच्या काळात हयात होते, ज्यांनी दोन लग्ने केलीत, बायकापोरांना सोडून लग्नाव्यतिरिक्त राहीलेत, विवहबाह्य संबंध ठेवलेत.

हो पण त्यांनी उपदेशपर श्लोक वगैरे लिहिलेले नाहीत! दुसर्‍याला उपदेश करणार्‍या किंवा संतस्थानावर असलेल्या मंडळींनी स्वतः तो आदर्श नको का पाळायला? स्वतः दुसर्‍या एका कुटुंबातील एका मुलीचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करून, तिच्या आईवडिलांची भर लग्न समारंभात फटफजिती करणार्‍या, बोहल्यावरून पळून जाणार्‍या रामदासांनी 'प्रपंच करावा नेटका' असे म्हणणे म्हणजे मानभावीपणाची सीमाच नाही का? रामदासांसारख्या व्यक्तिने 'प्रपंच करावा नेटका' असं म्हणणे याचं आपण काय समर्थन करू शकाल विकासराव?

त्याबद्दल त्यांची नावे घेऊन बोलायचे ठरवले तर शिष्ठाचाराला धरून होणार नाही पण आपण त्यांच्या कथा, कादंबर्‍या, लेख वगैरे वाचतो आणि "appreciate"ही करतो आणि तसे करयालापण हवे.

अच्छा, म्हणजे रामदास, तुकोबा आणि हल्लीच्या कथा-कादंबर्‍या लिहिणार्‍या मंडळींना आपण एकाच मापात मोजताय! मग प्रश्नच मिटला! :)

आपला,
(कुणाही मुलीला न फसवलेला, आणि कुणाही मुलीच्या वडिलांवर भर लग्नात नामुष्कीची वेळ न आणलेला!) तात्या.

नामुष्की?

कुणाही मुलीला न फसवलेला, आणि कुणाही मुलीच्या वडिलांवर भर लग्नात नामुष्कीची वेळ...

रामदास लग्नातून पळून गेले तेंव्हा ते काही तात्यांच्या अथवा आमच्या (आत्ताच्या) वयाचे नव्हते तर कसे बसे बारा वर्षाचे अर्थात अगदी आत्ताच्या काळातील कायद्याप्रमाणेपण लग्नासाठी (आणि इतर सर्व गोष्टींसाठी) अज्ञानीच होते. त्याही आधी त्यांच्या लहानवयात त्यांना अध्यात्माची आवड लागली असल्याचे पाहून त्यांच्या घरच्यांना काळजी वाटत होती. एक वेळेस लहान नारायणाला शोधताना त्यांच्या आईस ते फडताळात मिळाले, काय करतो असे विचारले तेंव्हा ते म्हणाले की "चिंता करतो विश्वाची". अर्थातच त्या कालानूरूप घरच्यांनी त्यांचे लग्न बाराव्या वर्षी (कदाचीत जरा उशीराच असेल) करायचे ठरवले. आता बारा वर्षाचा मुलगा पण आध्यात्मिक दृष्ट्या जागा झालेला, पळून गेला. गेला ते गेला काही भानगडी करत बसला नाही तर १२ वर्षे नाशकात संन्यास घेऊन तपश्चर्या केली ज्याला आत्मसिद्धी म्हणतात ती करवून मग पुढे राष्ट्रासाठी जनजागृतीचे व्रत घेयचे ठरवले. ते घेण्याआधी बारा वर्षे संपूर्ण भारतभ्रमण केले आणि मग बलोपासनेसाठी जागृती केली, इत्यादी.

थोडक्यात वयाने मोठा बलदंड दाढीमिशा असलेल्या हातात, कुबडी आणि अंगावर फक्त लंगोटी अशा वेशातल्या माणसाने लग्नातून पळ काढला नव्हता, तर १२ वर्षाच्या मुलाने... एव्हढे लक्षात ठेवावे. बरं असं लहानपणात स्वतःचे धेय समजून पळ काढून त्रास देणारे रामदासच नाही तर वयाच्या अकराव्या वर्षी घरातून पळ काढून गायनसिद्धी प्राप्त करण्याच्या मागे लागणारे तुमचे (आणि आमचेही) भिमसेनपण होते हे आपल्यास माहीत असेलच. आता कोणी जर म्हणले की स्वतःच्या आई-वडीलांना त्रास देणारा हा माणूस "जे का रंजले गांजले.." सुरेल आवाजात म्हणत असला तरी काय आचरण शून्य तर तुम्हाला मान्य होईल का?

आपल्याशी बाकी कितीही पटत असले तरी असे आपले विचार वाचले की उगाच जाता येता स्वतःला आवडणार्‍या, गुरूस्थानी असलेल्या व्यक्तीं व्यतिरिक्त इतरांबद्दल विरुद्ध उलट सुलट बोलून आपला बुद्धीवाद नाही तर बुद्धीभ्रम दिसतो असे वाटते.

बरं बरं! :)

इतरांबद्दल विरुद्ध उलट सुलट बोलून आपला बुद्धीवाद नाही तर बुद्धीभ्रम दिसतो असे वाटते.

बरं बाबा! च्यामारी आपण काय ते महान बुद्धीवादी का काय ते म्हणतात ते! आम्ही आपले बुद्धीभ्रम झालेले!

मान्य!

आपण व्यक्तिगत उल्लेख केलात म्हणून आम्हीही केला!

मुद्दे संपले की मनुष्य व्यक्तिगत पातळीवर उतरतो!

असो,

आपला,
(बुद्धीभ्रम झालेला!) तात्या.

व्यक्तीगत नव्हते

आपण व्यक्तिगत उल्लेख केलात म्हणून आम्हीही केला! मुद्दे संपले की मनुष्य व्यक्तिगत पातळीवर उतरतो!

व्यक्तिगत वाटले असल्यास क्षमस्व कारण तसा उद्देश नव्हता आणि तसे आपण नाही आहात हे ही माहीत आहे म्हणूनच मनापासून "बुद्धीभ्रम दिसतो असे वाटते" म्हणले "आहे" असे नाही.

बाकी मुद्यांबद्दल बोलाल तर त्या विधानाआधी मी लिहीला होताच पण त्यावर आपण काही लिहीले नाहीत.

चलो साला, कोई बात नही!

व्यक्तिगत वाटले असल्यास क्षमस्व कारण तसा उद्देश नव्हता आणि तसे आपण नाही आहात हे ही माहीत आहे म्हणूनच मनापासून "बुद्धीभ्रम दिसतो असे वाटते" म्हणले "आहे" असे नाही.

चलो साला, कोई बात नही! :)

बाकी मुद्यांबद्दल बोलाल तर त्या विधानाआधी मी लिहीला होताच पण त्यावर आपण काही लिहीले नाहीत.

अहो परत तेच तेच काय लिहायचं? माझे मुद्दे मी मांडले आहेत, आपलं स्पष्टीकरण मला पटत नाही! आता त्यावर काय इलाज सांगा बरं! :)

प्रत्यक्षात कधी भेटू तेव्हा या विषयावर अवश्य बोलू...

नायतर राहिलं! तुम्ही तुमच्या जागी अन् मी माझ्या जागी, दोघेही बरोबर! :)

रामदास स्वामी की जय!

तात्या.

ठिक आहे...

जय भिम सेन जोशी! :)

मांडवली!

वा! दोघांनी
जयजयकार करुन
"मांडवली" सही केली आहे!

मग आता वादाचा मुद्दाच संपला नाही का?!

झकास उदाहरण आहे हे,
माझ्यासारख्या उथळ (नि व्यक्तीगत पातळीवर उतरून) बेजबाबदार विधाने करत भांडणार्‍यांसाठी! ;)

आपला
भांडोपंत उथळ

~गुंड्या मानतो की जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

"मांडवली"

उष्ट्राणां च गृहे लग्नं गर्दभा: शांतीपाठका: ।
परस्परं प्रशंसती अहो रुपम अहो ध्वनि: ॥

आता भांडवली विषयी
ना गुणी गुणीनं वेत्ती गुणी गुणीषु मत्सरी ।
गुणीच गुणरागीच विरलः सरलो जन: ॥

प्रकाश घाटपांडे

झकास!

"उष्ट्राणां च गृहे लग्नं गर्दभा: शांतीपाठका: ।
परस्परं प्रशंसती अहो रुपम अहो ध्वनि: ॥"

झकास्!
हसून हसून दमलो! :)))

आपला
गर्दभपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

पटण्यासारखे विश्लेषण

विकासराव,
आपण अतिशय सुंदर व योग्य पद्धतीने या घटनेचे विशेलषण केले आहे आणि आपल्या विश्लेषणाच्या समर्थनार्थ दुसरे उदाहरणही चपखल दिले आहे. सुदैवाने सर्वच लोक आपल्या स्वतःपुरता किंवा आपल्या कुटुंबापुरताच विचार करत नाहीत. प्रसंगी उच्चतर ध्येयासाठी ते या सर्वाचा त्यागही करतात. अनेक संतांनी देशभक्तांनी, स्वातंत्रवीरांनी तसेच समाजसेवकांनी आपल्या आप्तस्वकीयांचा, कुटुंबाचा त्याग केल्याची किंवा त्याच्या ध्येयवेडेपणामुळे कुटुंबाची परवड झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. व्यावहारिक शहाणपण किंवा ज्याला 'कन्वेंशनल विज्डम' असे म्हणतात त्याचा वापर करून अश्या लोकांच्या वागण्यातील दोष शोधून त्यांच्यावर चिखलफेक करणे अतिशय सोपे आहे.
आपला
(विश्लेषक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

जगणे म्हणजे

जगणे म्हणजे जन्म व मृत्यु यातील प्रवास. कसा असावा कसा नसावा हा भाग अलाहिदा.
प्रकाश घाटपांडे

जीवन गाणे

'गेला दिवस आपला म्हणायचा, उद्याचं माहीत नाही!' असं म्हणून गेला दिवस थोडे कष्ट, थोडी मौजमजा करून पुढे ढकलणारी सामान्य माणसं आपण! :)

'तात्या-तत्वा' चे आम्हीही वारकरी आहोत,अहो ठरवून जगता येत नाही दासबोध जरी चाळला नसला तरी बरेच वारकरी संत वयक्तिक आयुष्य जगलेच नाही (इथे वादाला संधी आहे)पण त्यांचा उपदेश मात्र जीवनात आणण्याजोगा होता.बाकी तीन तीन उतारे चा अर्थ कळला नाही उतारा घेऊन लिहिलंय की काय (ह.घ्या)

''संसारतापे तापलो मी देवा करीता सेवा कुटुंबाची
म्हणुनी आठेवले तुझे पाय येवो माझे माय पांडुरंगे''
म्हणणारा तुका माझा लाडका आहे.

अवांतर ;) जरा नव्हतो आम्ही येथे तर अशुद्धलेखनाची चळवळ मागे पडल्यासारखी वाटली ! ते काही नाही शुद्धलेखनाचे फाजिल लाड थांबवलेच पाहिजेत! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत आहे..

तरी बरेच वारकरी संत वयक्तिक आयुष्य जगलेच नाही (इथे वादाला संधी आहे)पण त्यांचा उपदेश मात्र जीवनात आणण्याजोगा होता.

सहमत आहे. रामदास स्वामीही त्यापैकीच. आम्ही त्यांच्या वैयक्तिक वागणुकीवर भाष्य केले आहे, त्यांच्या दासबोधाबद्दल आम्हाला नितांत आदरच आहे. पण तो लिहिण्यापूर्वी बोहल्यावरून पळून जाऊन एका मुलीवर आणि तिच्या आईवडिलांवर अन्याय करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला होता? बरं, घाटपांडेसाहेब म्हणतात तसे अजाणतेपणी, व बालवय असल्यामुळे त्यांनी तसे केले असले तरी जाणतेपण आल्यावर त्या बाबतीत त्यांनी स्वतःला काही शासन अथवा पश्चात्ताप करून घेतला आहे काय? कुणाला माहिती असल्यास कळवावे!

बाकी तीन तीन उतारे चा अर्थ कळला नाही उतारा घेऊन लिहिलंय की काय (ह.घ्या)

मस्त! :)

तात्या.

सर्वप्रथम

मूळ लेख ही दासबोधाची जाहीरात आहे का?

तसेच दासबोधाशिवाय जगण्याचा खरा अर्थ उमजणार नाही काय? कारण सर्व भारत व जग ज्यांना मानते, उत्तम आयुष्य जगले असे मानते (उदाहरण म्हणजे मदर तेरेसा) त्या सर्वांनी दासबोध वाचले होते काय? दासबोधाच्या अगोदर म्हणजे समर्थ महाराजांच्या अगोदर "नक्कीच कृतार्थ जीवनाचे" काय निकष होते?

जगण्यावर शतदा प्रेम पण कोणत्या !

सहजराव,

दासबोधाची जाहिरात असू द्या नाहीतर नसूद्या जगण्याला आकार देण्यासाठी संत महंत,प्रचारक,यांना सोडून जगणे असू शकत नाही का ? खरं तर माणूस जगतांना आपल्या एक स्टाइल ने जगतो तो कोणाच्या उपदेशावरुन जीवनाचा रहाटगाडा चालवतो यावर आमचा तरी विश्वास नाही !
आपल्या सहज जगण्यावर जसे असेल तसे माणसाने शतदा प्रेम करावे मग बघा जगण्याची गम्मत:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणजे

कारण सर्व भारत व जग ज्यांना मानते, उत्तम आयुष्य जगले असे मानते (उदाहरण म्हणजे मदर तेरेसा)

म्हणजे त्यांच्या 'त्या संतपदाच्या' चमत्कारासह म्हणताय?

आपला
खोचकपंत उथळ

~गुंडो मानतात की जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो. त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

दासबोध

या चर्चेची सुरवात करताना दासबोधाचा का संदर्भ वापरला आहे ते दासबोध आवडत असूनही मला समजले नाही...

अवांतरः

पण त्याहूनही मदर तेरेसांचे जगणे उत्तम आयुष्य कशासाठी म्हणावे हे ही आता कळले नाही. ते कदाचीत त्यांच्या स्वतःसाठी आणि एक ख्रिस्ती मिशनरी म्हणून असेलही पण देवाच्या अस्तित्वावर स्वतःचीच शंका असताना देखील इतरांना त्यासाठी धर्मोपदेश करायला लावणे हे काही प्रामाणिक पणाचे लक्षण होत नाही. शिवाय त्यांची स्वतःस घेत असलेली वागणूक आणि इतरांना इश्वराच्या नावाखाली त्या देत असलेली वागणूक यात देखील दंभत्व दिसायचे...

इशावास्योपनिषद

असे म्हणतात की इशावास्योपनिषद हे भारतीय तत्वज्ञानाचा कणा आहे. त्याच्या (केवळ) १३ श्लोकांवर संपूर्ण गीता रचलेली आहे. त्यातील खालील श्लोक हा प्रसिद्ध आहे आणि त्यात आपल्या तत्वज्ञानाप्रमाणे कसे जगावे याचा सारांश आहे:

ईशावास्यम् इदं सर्वम् यत किं च् जगत्यां जगत्
तेन त्यक्तेन भुञ्जीथा: मा गृधः कस्यस्विद् धनम् ||

अर्थः हे सारे विश्व आणि विश्वातील चराचर सृष्टी ही ईश्वरानी (divinity)भरलेली आहे/समृद्ध आहे. त्याची ही समृद्धता इतरांबरोबर वाटून, उपभोगत आनंदाने जगा. दुसर्‍याकुणाच्या धनाचा/संपत्तीवर डोळा थेवू नका अथवा त्याला हात लावू नका/गैरवापर करू नका.

जगणे म्हणजे काय?

इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे व त्यांच्या दु:खात आपले दु:ख आहे हे ध्यानात ठेवून जीवन जगायला आपण शिकलो तर आपले सर्वांचे जीवन सुखी होईल. वैविध्य हे निसर्ग निर्मित आहे म्हणून ते शिवम् सुंदरम् आहे पण विषमता ही मानव निर्मित आहे. ती मानवाच्या संकुचित मनोवृत्तीतून निर्माण होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

जगा आणि जगू द्या, ही वृत्ती आपण अंगिकारली पाहिजे म्हणजे सर्वांचेच जीवन आनंदमय होईल. आपला जन्म हा आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे हे ध्यानात घेतले तर आपले जीवन सुखी झाल्याशिवाय रहाणार नाही.

जगणे म्हणजे काय् ?

मला ह्या संत मंडळी विशयी तिटकारा आहे . कारण ह्या मंडळीनी लोकांची दिशाभूल
करण्याचेच काम केले . ह्या मंडळींनी जगण्यासाठी कश्ट् न करता लोकांना फालतु विचार
करायला लावला.आज भारतात पसरलेली असंख्य साधूमहादू मंड्ळी यांचीच अपत्ये आहेत.
असे म्हणावयास हरकत नाही .आज कुठलाही साधु असे सांगत नाही की मी या कारखान्यात
१० तास काम करतो. आणि नंतरच मी प्रवचन देतो. हे सगळेच आयत्या बिळावरचे नागोबा
आहेत आणि आपण या लोकांना डोक्यावर घेतो.
आपण् काहीही न करता जगावे कसे हे तत्व या लोकांनी इतरांना शिकवले.
आणि या भारतात एक आळशी लोकांची जमात जन्माला घातली. अश्या या फालतू लोकानी
या देशाला सतत् मागे ठेवले .
मला जास्त लिहावयास वेळ नाही.
" असलेल्या एका डोळ्याने जग नीट बघणारा कावळा ."

:-)

मला जास्त लिहावयास वेळ नाही.
कावळेपंत/बाई, इतका जुना लेख वेळ नसताना कसा काय हुडकला बॉ?

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

^ वर