दहीहंडी

सर्व उपक्रमिंना गोपाळकाल्याच्या हार्दीक शुभेच्छा !
आजकाल या उत्सवात राजकीय पक्ष खुप(जरा जास्तच) धवळाढवळ करतात. उंच उंच दहिहंड्या(आठ थराच्याही वर) व मोठ्या रकमेची बक्षीसे यांवर त्या त्या पक्षाला प्रसिध्दी मिळते आणि हल्ली हंड्या फोडल्याच जात नाहीत. सलामी द्या ठरावीक रक्कम घेवून जा. दहीहंडिचे बाजारीकरण झाले आहे .याबाबत आपले मत कळवा.
आपला
कॉ.विकि

लेखनविषय: दुवे:

Comments

हो असं आहे खरं!

हो असं बाजारीकरण होतं आहे खरं!

पण ते कोणत्या सणाचे होत नाहिये?
दिवाळी तरी कुठे दिवाळीसारखी उरली आहे?
अजून संकष्टी नि चतुर्थी चे 'प्रॉड्क्टस' सापडले नाहियेत म्हणून नाहीतर ते ही विकले जातीलच. (असल्यास कल्पना नाही!)
अर्थात हा एक भाग झाला. विकले जाते आहे, बाजारीकरण होते कारण काही प्रमाणात आपणच ते सपोर्ट करतो आहोत.

मात्र राजकारण आल्यानेच दहीहण्ड्या मोठ्याही झाल्या ना... नाही का?
परंपरा टिकण्याची शक्यताही बाजारीकरणानेच कधीकधी तयार होते असेही वाटते. प्रसारमाध्यमे प्रसिद्धी देतात. एका मोठ्या स्केलवर त्याला मान्यताही मिळते.

त्याच वेळी 'बाजारीकरण म्हणजे काय' हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे असे मला वाटते.

आपला
गुंडो

मुसाफिरखान्यात हिंदू - मुस्लिम ऐक्याची दहीहंडी

मी दहीहंडी नावाने एक प्रतिसाद येथे दिला आहे तो म. टा>च्या बातमीतील आहे आणि परत खाली देत आहे. आपण म्हणता तसे बाजारीकरण झाले आहे हे नक्कीच मान्य आहे तसेच गुंडोपंतानी मांडलेला मुद्दा पण योग्यच आहे. संकष्टीचे "प्रॉडक्ट्स" जरी निघाले नसले तरी विशिष्ठ देवळांच्या बाहेरील तरूणांच्या (आणि मोठ्यांच्या) रांगा, एखादा माणूस चेन्नईहून कसा दर्शनाला येतो, अमिताभने घरातून चालत जाऊन उंदराच्या कानात बोललेले पाहून इतरांनीपण तेच करणे हे वेगळ्याप्रकारचे पण बाजारीकरणच वाटते.

प्रेषक विकास (शुक्र, 08/31/2007 - 12:40)
मुसाफिरखान्यात हिंदू - मुस्लिम ऐक्याची दहीहंडी

[ Friday, August 31, 2007 01:50:33 am]

अडीच लाखाची दहीहंडी
- नरेश कदम

श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाच्या अमलबजावणीवरून सत्ताधारी व विरोधकात संघर्ष सुरू असताना मुसाफिरखाना या मुस्लिमबहुल वस्तीत महम्मद अली शेख हे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी दोन लाख ५१ हजार रुपयांची दहीहंडी उभारणार आहेत. या उत्सवात मराठी लावणीचा फडही रंगणार आहे.

ही दहीहंडी मुसाफिरखान्यातील डोबळे बिल्डिंग समोर बांधण्यात येणार आहे. आठ थरांची ही दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला दोन लाख ५१हजार रुपयांचे बक्षीस मिळेल. त्याचप्रमाणे या दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन थर लावतील त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. महिला दहीहंडी पथकांनी सहा थर लावले तर त्यांना अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे शेख यांनी जाहीर केले आहे.

गोविंदा पथकातील कुणाला अपघात झाला तर त्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची तरतूदही शेख यांनी केली आहे. त्याचप्रमाणे उत्सव मंडळाच्या ठिकाणी डॉक्टरांचे एक पथकही असेल. सगळयांना अल्पोहारांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, महसूल मंत्री नारायण राणे, उर्जा मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार मिलिंद देवरा, आमदार युसुफ अब्राहनी हजेरी लावणार आहेत.

हम्म्

>>आजकाल या उत्सवात राजकीय पक्ष खुप(जरा जास्तच) धवळाढवळ करतात

गुळापाशी मुंग्या जाणारच् . बाय द् वे - "उपक्रमिंना गोपाळकाल्याच्या हार्दीक शुभेच्छा" ह्या पक्षाच्या धोरणामधे बसतात का? नाही "गोपाला"चे नाव घेतले आहे म्हणून हो... बंगालात दुर्गापूजेच्या कालात बहूतेक भक्तगण भाग घेतात वाटते, तेव्हा ते कदाचीत राजकीय कार्यकर्त्याची वस्त्रे काढून ठेवत असावीत... ह.घ्या.

प्रसिध्दी कोणी कोणाला कशी द्यावी ह्याचे काही अनौपचारीक नियम पण (ह्या मेडियाच्या / बाजारीकरणाच्या जमन्यात) ऊरले नाही आहेत.

बाकी दहीहंडी फोडणे हा बघायला सुंदर प्रकार आहे व त्याला उत्तेजना (प्रसिध्दी, पैसे)द्यायला हरकत् नाही. जर का १ लाखाच्या १० दहीहंड्या फोडून एखाद्या गावातील होतकरू तरुणांचा गट त्यांच्या (अविकसीत / बेभरवश्याच्या) शेतीला पूरक व्यवसाय म्हणून करत असेल व (शेतकर्‍यांच्या) आत्महत्या कमी होत असतील तर चांगली गोष्ट नाही का? फक्त दहीहंडी हा प्रकार त्यातील कौशल्य कमी न होऊ देता किती सुरक्षीत करत येईल ते बघावे. फुकट कोणाचा जीव, अवयव जायला नको.

दहीहंडी हा महाराष्ट्रातील प्रकार आहे की अजुन कूठला म्हणजे उत्तरप्रदेश, गु़जराथ?

सुरक्षीतता

या मुद्द्याबद्दल १००% सहमत.
सर्कशीत लावतात तशी जाळी आजूबाजूला लावण्याची व्यवस्था केल्यास/गोविंदांना पॅड व शिरस्त्राणे दिल्यास इजा झाली तरी खूप मोठी होणार नाही असे वाटते.

सहमत..

दहीहंडिचे बाजारीकरण झाले आहे .याबाबत आपले मत कळवा.

आपल्या मताशी सहमत आहे. पण गुंड्याभाऊ म्हणतात तेही खरंच आहे. आज प्रत्येकच गोष्टीचे बाजारीकरण होत आहे. फक्त आपण त्या बाजारीकरणासोबत किती वाहून जायचं ते आपल्याच हातात आहे! असो..

सर्व उपक्रमींना गोपाळकाल्याच्या शुभेच्छा!..

आपला,
(मुंबईचा बाल्या) तात्या.

बाजारीकरण

उत्सवांचे,सणांचे,देवाधर्माचे,बुद्धिमत्तेचे, सौंदर्याचे,भावनांचे कशाचे म्हणून नाही ? मागणी तसा पुरवठा या न्यायाने बाजारी करण होणे अपरिहार्य आहे. आपल्या मनातल्या विचारांच्या देवाणघेवाण किंवा संघर्षाला सुद्धा मनोव्यापार म्हटले आहे.

प्रकाश घाटपांडे

असं कसं?

विकि
तु चर्चा सुरु करतोस आणी गायब होतोस.
असे कसे काय?

जर असे वाटत असेल की चर्चा रंगावी तर त्यात काही जबाबदारी चर्चा टाकणार्‍याची असते!
हे माध्यम इंटरॅक्टीव्ह आहे; हे समजले नसेल तर काही (स्वघोषित) पत्रकारांची गत झाली तसे होते रे बाबा... ;)

आपला
गुंडो.

 
^ वर