श्रीकृष्ण आयोग अहवाल

बाँबस्फोट खटल्याचा निकाल लागल्याबरोबर श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी नव्याने केली जाऊ लागली आहे. जर त्या शिफारसी इतक्या महत्वाच्या होत्या तर त्यांच्या अंमलबजावणीची मागणी आत्ताच, म्हणजे बाँबस्फोट खटल्याचा निकाल लागल्यावरच का पुढे केली जात आहे? वास्तविक सदर अहवाल विधानसभेने कित्येक वर्षे अगोदर बहुमताने फेटाळला आहे. नंतर आलेल्या सरकारलाही त्याबद्दल विशेष काही करण्याची आवश्यकता वाटली नाही. यांत मागणी करणारांचा बाँबस्फोट खटल्यांत शिक्षा झालेल्यांची शिक्षा माफ करून घेण्याच्या दृष्टीने वाटाघाटींचा मुद्दा निर्माण करण्याचा डाव असावा अशी शंका येते. आणि सध्याचे सरकार अंमलबजावणीबद्दल काही आश्वासन देत असेल तर त्यांत मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणाशिवाय दुसरे काही नाही असेच म्हणावे लागेल.

(वरील आशयाचे पत्र काही वृत्तपत्रांना पाठवले आहे. पण ते छापून येईलच असे नाही.)

आपणांस काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

का?

वरील आशयाचे पत्र काही वृत्तपत्रांना पाठवले आहे. पण ते छापून येईलच असे नाही असे आपणास का वाटते?

१. या आयोगाला सरकारनेच एकदा नाकारल्यावर मग परत हा भाग वर का येतो आहे?
२. मुळात नाकारले ते का बॉ?...
३. मग मुळात नेमलाच कशाला?
४. कुणी घेतला हा निर्णय? काय कारणाने?
५. नक्की किती खर्च झाला?
६. आयोगाच्या नक्की काय सुचना होत्या?
७. याआयोगाच्या कामकाजाला ला मार्गदर्शक तत्वे कोणती होती?
८. ती पाळली गेली याची काय खात्री? क्रॉस चेक कसे केले?)

असे काही प्रश्न मला ही चर्चा वाचल्यावर पडले...

आपला
शंकासूर
गुंडोपंत

पत्र छापून येणे

पण ते छापून येईलच असे नाही असे आपणास का वाटते?

कारण वृत्तपत्रांत वाचकांच्या पत्रव्यवहारासाठी जागा मर्यादित असते. त्यामानाने पत्रांची आवक खूप ज्यास्त असते. साधारणपणे दहा पत्रे पाठवल्यास दोन पत्रे छापून येतात असा माझा अनुभव आहे.

मला आणखी एक प्रश्न पडला आहे. आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी कोर्टाच्या आदेशाच्या अंमलबजावणीप्रमाणे सक्तीची असते का?

मग

साधारणपणे दहा पत्रे पाठवल्यास दोन पत्रे छापून येतात असा माझा अनुभव आहे.
अहो मग पाठवा की किमान पाच पत्रे..वेगवेगळ्या नाव व पत्त्याने तेच पत्र्. तुमच्या अनुभवाप्रमाणे छापून येईल ना..

आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी कोर्टाच्या आदेशाच्या अंमलबजावणीप्रमाणे सक्तीची असते का?
आयोगाचे पण प्रकार असतात. ह्या श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारसी, सरकार फेटाळू शकते.
------------------------------------------------------------------------------
नेहमीच सर्व दोषींवर कारवाई व्हावी. पण तसे झाले तर आपण एक आदर्श व महान राष्ट्र् गणले गेलो तर आलीका पंचाईत्. नेहमीच चांगले, योग्य वागावे लागेल. नकोरे बाबा....
------------------------------------------------------------------------------

कोर्डेकाका

मुळात ही दंगल कोणी जाणिवपुर्वक घडवली आणि श्रीकृष्ण आयोग ज्यांनी फेटाळला त्यांच राजकारण आपण जाणता . आपण कट्टर हिंदुत्ववादी आहात का आपल्या लेखावरून तसे वाटले.
एक प्रश्न- दंगलीतील दोषींवर कारवाई व्हावी असे आपणास वाटत नाही का?
आपला
कॉ.विकि

हेच

हेच म्हणतो मी .दंगलीतील दोषींवर कारवाई व्हावी असे आपणास वाटत नाही का?

कारवाईचे राजकारण

एक प्रश्न- दंगलीतील दोषींवर कारवाई व्हावी असे आपणास वाटत नाही का?

दंगलीतीलच काय कुठल्याही दोषींवर, कोणीही असेल तरी कारवाई हवी. मग ती नंदीग्राम मधे निरपराध शेतकर्‍यांना (ज्यात ऐकल्याप्रमाणे मुसलमान जास्त होते) मारणार्‍या कम्यूनिस्ट सरकारच्या निर्णय घेणार्‍यांवर पण. स्वतंत्र भारतात कायदे हातात घेऊन सरकारी आणि सामन्य लोकांचे बळी घेणार्‍या नक्षलवाद्यांचे स्मारक बांधणार्‍यांच्या काय आरत्या ओवाळायच्या? त्याचा आपण विरोध करता का?

पण मुंबई दंगलीच्या बाबतीत एक प्रश्नः राधाबाई चाळीला ज्यांनी आग लावली , त्यानंतर अजून काही "हिंदू धर्मीय" म्हणून लोकांवर हल्ले केले आणि तसे होत असताना ४८ तास जेंव्हा सरकार निवांत बसले ते दंगल चालू होयचे कारण होते. ज्यांना प्रतिक्रीया म्हणून अशावेळेस शठ्यंप्रतिशठ्यम् योग्य वाटते त्यांनी ते तसे केले. मला ते योग्य वाटत नाही आणि त्याचे मी समर्थनही करत नाही. म्हणूनच म्हणले की होऊदेत कारवाई. पण ज्या राजकारण्यांना ते योग्य वाटत नाही, असे सत्तेतील अथवा विरोधातील राजकारणी बहुसंख्यांवरील हल्ल्यावर त्यांना "शांतीपूर्ण" मदत करायला गेल्याचे आठवत नाही . तेंव्हा काय किंवा नंतरच्या बाँबस्फोटात काय, हे म्हणणार की ही रामजन्मभूमीची प्रतिक्रीया आहे. मग कायदे हातात घेऊन वाटेल ते केले तर चालते. (याला फक्त न्या. कोद्यांनी योग्य उत्तर आत्ता दिले).

शिवाय इतके जर श्रीकृष्ण अहवालाचे पडले होते तर, युतीला सत्तेतून बाहेर घालवल्यावर विलासराव आणि काँग्रेसची दुसरी टर्म संपायला येईपर्यंत वाट का पाहीली? बरे असे पहाल की गेली सहा वर्षे बिचारे महाराष्ट्र चांगला करण्यात व्यस्त आहेत तर: गेटवे ऑफ इंडीया, लोकल, अजून काही बाँबस्फोट, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, वीजेचा तुटवडा, इथपासून ते आता वक्फबोर्डाच्या जागेतील कोट्यावधी रुपयांचा कथीत भ्रष्टाचार. थोडक्यात स्वतःच्या पापाचे घडे भरत आले आणि त्यातच न्या. कोदे यांचे कर्तव्य कठोर निर्णय. काहीतरी दाखवायला हवेच, निदान परमपूज्य (परम - मोठे, पूज्य - शून्य, परमपूज्य "मोठे शून्य") सोनीयाजी गांधींनी तरी. महात्म्यानंतर आपल्या देशात फक्त त्याच आहेत...मी जर त्यांच्या जागी असतो तर स्वतःचा राष्ट्रपती उमेदवार निवडून येणार याची १००% खात्री असताना, अजून "अशा" शिवसेनेची मते मागायला गेलो नसतो. तेंव्हा यांची तत्वे वगैरे कुठे गेली? आता अफझल गुरू बरोबर अजून चार लोकांना फाशी देण्याची वेळ येणार, मग त्यांचे दयेचे अर्ज, मग तीच लांबवण, मग परत शिवसेना ओरडणार - त्यासाठी आधीच गप्प करता आले तर बरे, म्हणून ही उपरती - त्यात ना धड निरपराध बळींना न्याय ना त्यांच्या कुटूंबियांना न्याय...

मला सांगा उद्या श्रीकृष्ण अहवाल वगैरे बडबड जशी अचानक सुरू झाली तशीच अचानक थांबली आणि काहीच केले गेलेले दिसले नाही, अथवा तो अहवाल लक्षात घेऊन त्यातील निवडक (पण राजकीय दृष्ट्या दूर्बल म्हणजेच राजकारणी सोडून) लोकांवरच फक्त या काँग्रेस सरकारने कारवाई केली तर आपण तेंव्हा काय म्हणणार?

आपण कट्टर हिंदुत्ववादी आहात का आपल्या लेखावरून तसे वाटले.

बरं, कोर्डेसाहेबांनी असे लिहीले म्हणून लगेच त्यांना कट्टर हिंदूत्ववादी म्हणायचे याला काय अर्थ आहे? (कोर्डेसाहेब कोण आहेत, त्यांचे राजकीय विचार काय आहेत वगैरे मला काही माहीत नाही.) पण ज्या विचारधारेमुळे गेल्या शतकात कदाचीत हिटलरने केला त्याहूनही अधीक नरसंहार केला त्या कम्यूनिस्ट विचारधारेचे आपण आहात म्हणून कॉम्रेड म्हणून बिरूद आपण अभिमानाने लावताना पाहून मात्र सखेद आश्चर्य वाटते. जर एखाद्या शब्दाचा शिवीसारखा वापरच करायचा असेल तर तो कुठल्या हे जरा लक्षात घ्या.

ओहो!!!

पण ज्या विचारधारेमुळे गेल्या शतकात कदाचीत हिटलरने केला त्याहूनही अधीक नरसंहार केला त्या कम्यूनिस्ट विचारधारेचे
ओहो!!! अच्छा!
म्हणजे भांडवलवादी अगदीच सोवळे वाटतात की काय तुम्हाला?
आजवर या गिधाडांनी काय कमी माणसे मारली की काय? नीट हिशोब करा कम्युनीस्टांपेक्षा नक्कीच जास्त आहेत ती! अगदी इराक युद्धात आजवर ५ लाख इराकी मेले असं म्हणतात. मग तेंव्हा का नाही आठवत हे सगळे? त्याचे ना काही हाक ना बोंब!!! फक्त अमेरीकी ढोल वाजवून माध्यमांनी खुप वेळा एखादी गोष्ट ठसवली म्हणून ती विकत घेण्याचे काही कारण नाहीये आम्हाला... साम्यवादी कार्यपद्धतीने साम्यवादाचा घात केला असेल. पण प्रत्येकच पद्धतीत सगळेच चांगले नसते हे ही तितकेच खरे! याचा अर्थ मी साम्यवादाचे समर्थन करतो असे नाही. पण तो संपुर्णपणे वाईटच हे ही मान्य नाही!

आपला
दोन्हीचा तितकाच तिटकारा असणारा मानवतावादी
गुंडोपंत

माणूस म्हणून मुक्तविचारांनी जगु देणार्‍या भारतीय (कागदावरती) समतोल पद्धतीचे गुंडोपंत समर्थन करतात!

खुलासा

गुंडोपंत,

म्हणजे भांडवलवादी अगदीच सोवळे वाटतात की काय तुम्हाला?

अजिबात नाही. अमेरिका तर त्याहूनही नाही आणि तसे माझे कदीही म्हणण्याची तयारी आहे. (माझीच काय अगदी चांगले गोरे अमेरिकन्स पण म्हणतात). हा उप-वाद चालू होण्याचे कारण इतकेच होते की कोर्डेसाहेबांनी या विषयावर लिहील्यावर त्यात कुठेतरी श्रीकृष्ण अहवालाच्या विरोधात दिसताच त्यांना "कट्टर हिंदूत्ववादी " म्हणून संबोधण्यात आले. माझा आक्षेप दोन गोष्टींना होता: एक तर लगेच कूणाचे "क्लासीफिकेशन" करण्याची गरज नव्हती. त्यात "हिंदूत्ववाद" हा डाव्या विचारसरणीच्या सवंग पत्रकारांनी शिवी केली आहे. त्यात विकी साहेब स्वतःला कॉम्रेड म्हणून संबोधतात आणि उठसूठ हिंदू धर्माला, धर्मीयांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बोलतात. या सर्व गोष्टी माझ्या लिहीण्यामागे होत्या. जेव्हढे अत्याचार कम्यूनिस्टांनी अगदी भारतात देखील केलेत त्याबद्दल यांची बोलण्याची तयारी आहे का? नक्षलवाद्यांना, आसाम, त्रिपूरा (नॉर्थ इस्ट) मधील माओवाद्यांना हे शस्त्रास्त्रे खाली ठेवायला सांगायला तयार आहेत का?

आपण म्हणता त्याप्रमाणे भांडवलशहांनी पण हिंसा केली आहे आणि मी त्या हिंसेचे अथवा भांडवलशाहीचे समर्थन इथे अथवा इतरत्र करत नाही. पण एक गोष्ट सध्याच्या जगात लक्षात ठेवा की "कायद्याचे राज्य" ज्याला म्हणतात ते भांडवलशाही देशातच, त्यांना आदर्श नाही म्हणले आणि सर्व तृटी लक्षात घेतल्या तरी, दिसते. आज अमेरिकेत अनेक उद्योजकांना गजाआड जावे लागले, तेच कदाचीत इतर भांडवलशाही देशात दिसतयं. ते होण्यासाठी वेळ नक्कीच लागला. आपल्याकडे पण हर्षद मेहेता तयार झाला पण त्याल त्याच्या संपत्तीची चव काही घेता आली नाही. पण हे कम्यूनिस्ट राष्ट्रात आहे का? तुम्हाला माहीत आहे, ही टेस्टा सेटलवाड, जिचे माध्यमे कौतूक करतात, तिच्या सबरंग मासीकाच्या/वेबपेजचे "चिन्ह" (लोगो) हे असे काढले होते की त्यात काश्मीरच काय गुजरात/राजस्थानचा काही भाग पण पाकीस्तानात दाखवला होता. त्यावर टिका केल्यावर या बाईने आक्रस्ताळे पणा करत काढून टाकला पण तशा चिन्हाचे कारण सांगीतले की "मला ऐक्य दाखवायचे होते". भारत सरकारच्या पैशाने एक अमेरिकेत आलेल्या "अभ्यासू भारतीय व्यक्तीने" एम आय टी मधे जाहीर कार्यक्रमात स्वत: " कम्यूनिस्ट आहे इतकेच सांगीतले नाही तर भारतापासून काश्मीर वेगळा करून पाकीस्तानला देण्याची का गरज आहे ह्यावर डोळ्यात पाणी आणून प्रवचन केले. खेद इतकाच की त्या व्यक्तीला विरोध करणारे भारतीय फक्त दोनच... बाकी पाकीस्तानी खुदूखुदू हसत होते. म्हणून वाटते की आज आपल्या देशातील अनेक प्रश्नांचे कारण ही कम्यूनिस्ट विचारसरणी आहे. आणि त्याला अनुसरून माझा प्रतिसाद होता.

वाईटाला वाईट म्हणण्याची माझी तयारी आहे, आपली असते असे देखील आपल्या लिहीण्यावरून वाटते, पण तशी विकीसाहेबांची आहे का ते विचारा...मी माझ्या प्रतिसादात "मला ते योग्य वाटत नाही आणि त्याचे मी समर्थनही करत नाही. म्हणूनच म्हणले की होऊदेत कारवाई." इतके देखील म्हणले आहे. पण असे होणार नाही असे वाटते असे पुढे म्हणले कारण या सर्व अहवालाच्या बाजूच्या लोकांना बाळासाहेबांना शि़क्षा व्हावयास हवी आणि तशी होण्याची शक्यता उच्चन्यायलयाच्या या संदर्भातील एका निर्णयामुळे नाही हे देखील आजच म.टा. मधे वाचले. निदान मी कुठल्याही हिंसेच्या विरोधात लिहीतोय आणि कायदा कोणीच हातात घेऊन हिंसाचार कशासाठीच करू नये असे म्हणतोय. तसे कॉ. विकीसाहेबांनी येथे फक्त लिहून सांगावे की "कम्यूनिस्टांनी केलेल्या हिंसेच्या देखील मी विरोधात आहे".

मला काय म्हणायचे आहे हे आपल्याला समजले असेल अशी आशा करतो आणि हे विषयांतर थांबवतो.

बाकी याला पर्याय काय? भांडवलशाही वाईट, कम्यूनिस्ट तर त्याहूनही वाईट... मग करायचे काय? कदाचीत विचार केला तर याचे उत्तर आपल्याच संस्कृतीत मिळेल. त्याला हिंदू म्हणायचे नसेल तर नका म्हणू, भारतीय म्हणा पण विचार करा... वाटल्यास वेगळी चर्चा चालू करा!

हे बाकी

हे बाकी आपले म्हणणे खरे आहे. आपण इतका संयत नि विचारपुर्ण प्रतिसाद दिला आहे की, यावर मी काही भाष्य करणे योग्य वाटत नाही. आपल्या शांतपणे विवेचन करु शकणार्‍या मनाचे कौतुक वाटते आहे.
आपल्या प्रतिसादाच्या शेवट्च्या भागात आपण सुवलेल्या मुद्यावर चर्चा करायला आवडेल.

मला वैयक्तिक रित्या (नि जाहीरही) हिंदु म्हंटल्यानी काहीच वावगे वाटण्यासारखे नाही... आनंदच आहे. पण शेवटी हे संबोधन आपल्याला ब्रिटीशांनी दिले आहे. त्यामुळे याला इतर काही संबोधु शकलो तर जास्त आनंद होईल इतकेच.
मात्र एक जुन्या धोरणांची - नवीन विचार धारा असे स्वरूप होईल का याचे?
आपला
गुंडोपंत

कट्टर हिंदुत्ववादी

विकी यांस,

आपण कट्टर हिंदुत्ववादी आहात का आपल्या लेखावरून तसे वाटले.

मी हिंदू आहे आणि भविष्यांत आमच्या वंशजांतील पुरुषांवर सक्तीने सुंता करण्याची व स्त्रियांवर सक्तीने पडद्यांत राहाण्याची पाळी येऊ नये अशी माझी इच्छा आहे. सध्याच्या निधर्मी राजकारण्यांचे मुस्लिमानुनयी 'निधर्मी" राजकारण व हिंदूंचा मुसलमानांच्या बाबतींतला भोळसट आशावाद तशी पाळी आणील असे वाटते. असे वाटणे म्हणजे कट्टर हिंदुत्ववाद असेल तर मी कट्टर हिंदुत्ववादी आहे.

ह्यॅ!हयॅ!ह्यॅ!

>>सध्याच्या निधर्मी राजकारण्यांचे मुस्लिमानुनयी 'निधर्मी" राजकारण व हिंदूंचा मुसलमानांच्या बाबतींतला भोळसट आशावाद तशी पाळी आणील असे वाटते.

निधर्मी राजकारणाच्या या मुस्लिमानुयायासाठी किती राजकारण्यांनी मुसलमान धर्म स्वीकारून स्वतःचा सुंता केला आणि आपल्या बायकापोरींना पडद्यात ढकलले त्याची आकडेवारी देता का? कट्टर हिंदुत्ववादी अशीच भडक विधाने करून इतरांची डोकी भडकवत असतात.

- राजीव.

अप्रस्तुत प्रश्न

जेसन् बोर्न् / राजीव यांस

निधर्मी राजकारणाच्या या मुस्लिमानुयायासाठी किती राजकारण्यांनी मुसलमान धर्म स्वीकारून स्वतःचा सुंता केला आणि आपल्या बायकापोरींना पडद्यात ढकलले त्याची आकडेवारी देता का?

मला वाटतं मी राजकारण्यांवर पाळी येईल असे लिहिले नाही तर राजकारण्यांच्या धोरणामुळे लोकांवर काय पाळी येईल ते लिहिले आहे.

सहमत

जेसन बॉर्न यांच्याशी सहमत.

--आजानुबॉर्न ______


शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.

कोर्डेकाका

भावनिक होऊ नका.
सुंता करायला मोघलाई लागून गेली आहे ती तर केव्हाच संपली. भविष्यात पाळी येणारच कशी.आता भारत स्वतंत्र होऊन ६० वर्षे होत आहेत आणि आपण धर्मनिपेक्ष राष्ट्र म्हणून आपली प्रतिमा जपली आहे.
आम्ही फक्त एवढेच जाणतो जे दोषी आहेत त्यांना कायधाने शिक्षा व्हायलाच हवी आणि हो कायदा धर्म ,जात,पंथ मानत नसतो.श्रीकृष्ण आयोगाची अंमलबजावणी झालीच पाहिजे.
आपला
कॉ.विकि

मोंगलाई संपली?

सुंता करायला मोघलाई लागून गेली आहे ती तर केव्हाच संपली. भविष्यात पाळी येणारच कशी.

याच खोट्या मृगजळामागे धावल्यामुळे हिंदू समाजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. महंमद बीन कासीम ने केलेल्या पहिल्या यशस्वी आक्रमणानंतर (इ.स. ७१२) बाप्पा रावळ सारख्या शूर रजपूत वीरांनी अगदी सिंध प्रांत पण परत जिंकून घेतला. मग २५०-३०० वर्षे शांततेत गेली. पुढील मोठी आक्रमणे महंमद गझनीची. (इ.स. ९८८ ते १०१७). मधल्या काळात हिंदू समाज ह्याच खोट्या मृगजळामागे धावत होता की महंमद बीन कासीम चा काळ संपला. आता परत आक्रमण होणे नाही. मग दिला महंमद गझनीने दणका. एकदोनदा नव्हे तर १८ वेळा. त्यानंतर पुढील मोठे आक्रमण महंमद घोरीचे. (इ.स्. ११९३-९४). मधल्या काळात परत हिंदू समाज निद्रिस्त. महंमद गझनीचा जमाना संपला आता आक्रमण होणे नाही. इतकेच काय तर घोरी पृथ्वीराज चौहानच्या हातात जिवंत पकडला जाऊनही पृथ्वीराज त्याच मृगजळामागे धावत होता की घोरीला आपली चूक कळली आता तो परत आक्रमण करणार नाही! पुढच्याच वर्षी पृथ्वीराज पकडला गेला आणि दिल्लीवर मुसलमानी वर्चस्वाचा काळाकुट्ट कालावधी चालू झाला. त्या खोट्या मृगजळामागे धावल्यामुळे भारताचे आणि हिंदू समाजाचे अतोनात नुकसान होऊनही परत आपण म्हणायला मोकळे की मोंगलाई केव्हाच संपली!

सध्याच्या काळातील मोंगलाईचे उदाहरण द्यायचेच् झाले तर बघा काश्मीर खोरे! सर्व हिंदूंना त्यांच्या घरातून नेसत्या वस्त्रानिशी हाकलून लावण्यात आले! आठवा नोआखाली मधील अत्याचार, कलकत्यातील प्रत्यक्ष कृतीदिन. आठवा मुंबईतील मधील बाँबस्फोट, आठवा संसदभवनावरील हल्ला! आठवा अगदी अलिकडल्या काळापर्यंत उत्तर प्रदेशात वेळोवेळी होत असलेल्या दंगली. अशी अनेक उदाहरणे देता येतील. तरीही एका उदाहरणाशिवाय ती यादी अपूर्णच असेल. ते म्हणजे १९४७ मधील पाकिस्तानची स्थापना. मुस्लिम लीगने पाकिस्तानची मागणी १९४० मध्ये लाहोर ठराव करून केली. १९४६ च्या निवडणुका लीगने पाकिस्तान या एक कलमी कार्यक्रमावर लढविल्या. उत्तर प्रदेश-बिहार हे कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानमध्ये सामील केले जाणार नव्हते. मग त्या राज्यांमधील मुसलमानांसाठी राखीव असलेल्या जागांवर मुस्लिम लीगचे बहुसंख्य उमेदवार का निवडून यावेत?त्यांना मते देणारे कोण होते? तेथील स्थानिक मुसलमानच ना?ते गेले का फाळणीनंतर पाकिस्तानात? त्यापैकी फारच थोडे. बहुसंख्य राहिले ना भारतात. आणि तरीही आपण म्हणता की मोंगलाई केव्हाच संपली!

धन्य तो दांभिक धर्मनिरपेक्षता वाद! त्याला आणि त्याच्या पाठिराख्यांना शतश: प्रणाम.

---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

अहो असं काय बोलता क्लिंटन साहेब

अहो असं काय बोलता क्लिंटन साहेब, मार्क्सला वाईट वाटेल ना! डोळे बंद करा, वाळूत डोके ठेवून गुदमरायला होत असेल तर छानसे पांघरूण डोक्यावर घेऊन (एकट्याच्याच बरकां मोनीका नको!) शांत पडा आणि बघा मोगलाई दिसतेय का ते! नाहीतर उगाच लोकं तुम्हालापण कट्टर हिंदूत्ववादी समजतील..

प्रतिसादात दम आहे

क्लिंटन साहेब,
आपल्या प्रतिसादात दम आहे!

आपले म्हणणे मान्य आहे. यांनी भारताची वाट लावली एका मोठ्या माहितीच्या ठेव्याला आग लावून त्यावर सैन्य पोसले. हा रानटी समाज तरच बरे!

आपला
गुंडोपंत

म्हणजे!!

मग त्या राज्यांमधील मुसलमानांसाठी राखीव असलेल्या जागांवर मुस्लिम लीगचे बहुसंख्य उमेदवार का निवडून यावेत?त्यांना मते देणारे कोण होते? तेथील स्थानिक मुसलमानच ना?ते गेले का फाळणीनंतर पाकिस्तानात? त्यापैकी फारच थोडे. बहुसंख्य राहिले ना भारतात. आणि तरीही आपण म्हणता की मोंगलाई केव्हाच संपली!

मुस्लिमांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी स्थानिक मुसलमानांनी बहुसंखेने मुस्लीम उमेदवारांना मते द्यावीत याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. बरं ज्यांना पाकिस्तनात जायचेच नव्हते, (किंवा जायचे होते, पण जावेसे वाटले नाही) ते का बरे गेले नाहीत? इथेच का राहिले म्हणायचे? दांभिकता म्हणतात ती हीच!

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

गफलत

उमेदवार मुस्लीम असण्यावर मूळ प्रतिसादकर्त्यांचा आक्षेप नसावा. तो मुस्लीम लीगचा असण्यावर असावा.

(असे वाटते.)

ओह..

म्हणजे आपल्याल्या हव्या त्या पक्षाला मत देण्याबद्दल आक्षेप आहे तर! (असे वाटले) :)

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

नशिब

सुंता करायला मोघलाई लागून गेली आहे ती तर केव्हाच संपली.

मोघलाईत काहीतरी वाईट घडले इतके तरी मान्य आहे, शिवाजीचा जन्म अगदीच वाया गेला नाही म्हणायचे!

काशीजी की कला गई, मथूरा मस्जीद हूई
शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी

शिवराय भूषण

इथे....

इथे मुस्लीमविरोधी बरेच दिसत आहेत. त्यांनी तसे न घाबरता स्प्ष्ट लिहावे .
आपला
कॉ.विकि

स्पष्टीकरण - कम्यूनिझम विरोधी आहे

कॉम्रेड साहेब,

माझ्यापुरते आपल्या "इथे मुस्लीमविरोधी बरेच दिसत आहेत. त्यांनी तसे न घाबरता स्प्ष्ट लिहावे " विधानाचे स्पष्टीकरणः

मी मुस्लीमविरोधी नाही, मी कम्यूनिझम विरोधी आहे आणि ते मी लपवलेले नाही. माझा कम्यूनिझमचा विरोध हा बाकी काही चांगले आहे म्हणून कम्यूनिझम चांगले नाही असा नाही, तर कम्यूनिझम हा 'on its own' वाईट आहे असा मुद्दा आहे. मी व्यक्तीगत हल्ले चढवत नाही. पण मी कुठल्याही, कोणीही कायदा हातात केलेल्या हिंसेला विरोध करतो. मग ते हिंदू असो, मुस्लीम असो, भांडवलशाही असोत अथवा कम्यूनिस्ट. आपण असे स्पष्ट बोलून इतरांच्या हिंसे बरोबरच, "कम्यूनिस्टांच्या कायदा हातात घेऊन हिंसा करण्याच्या नीतीला आणि त्यामुळे तयार होणार्‍या देशविघातक शक्तींना विरोध करतो", असे स्पष्ट म्हणायला तयार आहात का?

नसलात तर तसे न घाबरता स्प्ष्ट लिहावे . तरीही निदान आपण आपल्या विचारधारांशी प्रामाणीकच ठराल, पण गप्प बसालात तर मात्र नाही.

कशावरून?

मला वाटत नाही की उपक्रम सारख्या संकेतस्थळावर वैचारीक देवाणघेवाण करणारी मंडळी कोणत्या तरी एखाद्या समुदायाचा रंग/धर्म/जात यासारख्या कारणावरून द्वेष करत असतील! माझा तरी वैयक्तिक पातळीवर धर्मांधतेला आणि दहशतवादाला विरोध आहे.

तसा औरंगजेब हा खूप धार्मिक आणि कुराणाचे नियमितपणे पठण आणि अभ्यास करणारा होता.निदान इतिहास तरी असेच सांगतो. औरंगजेबाला १७ व्या शतकातील ओसामा बीन लादेन असे म्हटले तर त्यात चूक काय? भगवद्गीतेचा नियमितपणे अभ्यास करणारा रक्ताचे पाट वाहणारा दहशतवादी माझ्या तरी माहितीत नाही. आपल्या माहितीत असल्यास जरूर सांगावे. तेव्हा माझा विरोध आहे त्यांना जे लोक असे समजतात की जे महंमदाला मानत नाहीत त्यांच्या कत्तली करा, आणि अशा कत्तली करून जन्नतमधील ७२ अप्सरांचा उपभोग घेता येतो किंवा ज्या प्रदेशात इस्लामचे राज्य नाही तो अपवित्र प्रदेश आहे! माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे उत्तर प्रदेश-बिहार सारख्या राज्यांमध्ये राहणार्‍या मुसलमानांनी १९४६ साली मुस्लिम लीगला मते दिली होती. याचा अर्थ त्यांनी भारताच्या फाळणीला पाठिंबा दिला होता. माझा विरोध आहे अशा मुसलमानांना की ज्यांनी आमच्या देशाच्या फाळणीला पाठिंबा दिला आणि तरीही भारतात राहिले.कोणालाही व्यक्तिगत पातळीवर विरोध नाही.माजी राष्ट्राध्यक्ष कलाम,माजी सरन्यायाधीश अहमदी,परवीरचक्र विजेते अब्दुल हमीद, माजी उपराष्ट्रपती महंमद हिदायतुल्ला यासारख्या भारताच्या सुपुत्रांचा मला अभिमानच आहे. आणि तरीही मला कोणी मुस्लिमविरोधी म्हणत असेल तर जरूर म्हणा.

मुद्दा थोडा श्रीकृष्ण आयोग अहवालापासून दूर जातो आहे. तरीही सांगतो की माझा व्यक्तिगत पातळीवर कुमार केतकर,प्रफुल बिडवाई,अरूंधती रॉय यासारख्या ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांनाही विरोध आहे. कुमार केतकरांच्या मते मार्च १९९३ चे बॉम्बस्फोट 'हिंदू अतिरेक्यांनी' बाबरी 'मशिदी'चा विध्वंस केल्यामुळे झाले. डोळ्यावर झापडच लावायचे ठरवले तर असे अनेक तर्क लढवता येऊ शकतील.भारतात इस्लामी धर्मांधतेचा हैदोस इ.स. ६३६ पासून म्हणजे महंमद-बीन-कासीमच्या हल्ल्याच्या ७६ वर्षांपासून चालू आहे. अधिक माहितीसाठी इथे टिचकी द्या. त्यावेळी कोणत्या बाबरीचा विध्वंस झाला होता? तसेच कुमार केतकर पूर्वी महाराष्ट्र टाईम्सचे संपादक असताना त्यांचा असाच एक अग्रलेख श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल प्रसिध्द झाला तेव्हा वाचला होता.(सन १९९८) त्यात त्यांनी जावईशोध लावला होता की 'इस देश मे रेहना होगा तो वंदे मातरम केहना होगा' यासारख्या 'जातीय' घोषणांमुळे धार्मिक तेढ वाढली.याविषयीची आपली मते जाणून घ्यायला आवडेल.

---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

दहशतवादावर ऐकलेले वाक्य

कालच इथल्या (बॉस्टनमधील) एका "रिपब्लिकन/राईटविंग" रेडीओ स्टेशनवर (मी लेफ्ट/राईट ऐकत असतो दोन्ही बाजू कळतात - कुठे बरोबर आणि कुठे दिशाभूल करतात ते!) एका टॉ़अ शो होस्टचे (अगदी अमेरिकेच्या संदर्भातही) १००% बरोबर वाटले नाही तरी विचार करायला लावणारे वाक्य ऐकले, ते तसेच इंग्रजीत लिहीतो:

"let me make it clear, all Muslims are not terrorist, but the problem is all terrorists are Muslims"

हा अग्रलेख वाचा

कृपया हा अग्रलेख वाचा
येथे टिचकी मारा-स्वातंत्र्याची फाळणी
आपला
कॉ.विकि

केतकर

हा हा तुम्ही कॉम्रेड लोकांचेच वर्तमानपत्र वाचायला देणार. दुसरी अपेक्षा नाही. लेख शेवट पर्यंत सुद्धा वाचावासा वाटला नाही. कुमार केतकरांना राजकारणाचे वेध लागले आहेत.
स्वतःला धर्म निरपेक्ष समजुन मते लाटायची हल्ली फॅशनच आली आहे. धर्मनिरपेक्षतेचा नको इतका अतिरेक झाला आहे हे सर्व सामान्यांना पटते आहे. सर्व समावेशक राजकिय नेतृत्व नाही ही खंत आहे. म्हणून आज कोणी ही पंतप्रधान अन अगदी राष्ट्रपती सुद्धा बनते. असो, समजुन घेणार्‍याला समजावता येउ शकते. कागदावर स्वतःचा धर्म, जात, पोटजात सगळ लिहुन परत स्वतःला धर्म निरपेक्ष म्हणवून घेणार्‍यांना कोण समजवणार?

श्रीकृष्ण आयोग अहवालाची अंमल बजावणी:
या विषयावरच्या प्रतिसादात बरेच चांगले मुद्दे आले आहेत. मला वाटतात ती कारणे अशी:

  1. बॉम्बस्फोटाच्या खटल्यातुन लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवून समाज अस्थिर करून राजकारण्याना अनेक कारस्थाने करण्यासाठी मोकळीक देण्यासाठी. हे म्हणजे एकदम मुरब्बी राजकारण - काँग्रेसचे.
  2. प्रत्येकाची आपापली खुर्ची वाचवण्यासाठीची धडपड.
  3. उरला सुरला काँग्रेस विरोध मोडुन काढण्यासाठीची सुनियोजित चाल.
  4. कॉग्रेसच्या हातुन गेलेली मुस्लिमांची साथ मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न.. इत्यादी

बाकी पुर्वी राजकिय अस्थिरतेचा विडा जनता दलाचा असायचा आता तो, कम्युनिस्टांचा आहे.

मराठीत लिहा. वापरा.

विकि आता सविस्तर उत्तरे द्या

विकिराव आता सविस्तर उत्तरे द्या!
निव्वळ दुवे नको!
आपला
गुंडोपंत

गुंडोपंत

उत्तरे कोणती देऊ. कोर्डेकाकांना किंवा तुम्हाला दंगलीतील दोषींवर कारवाई व्हावी असे वाटत नाही का. त्या विकास ने एक कविता लिहीली आहे त्याला असे सांगावेसे वाटते की शिवरायांच्या सैन्यात मुसलमानही होते. इतिहास त्याने वाचला की नाही. मी कोर्डेकाकांना लिहीलेला पहीला प्रतिसादात लिहीले आहे की श्रीकृष्ण आयोग कोणत्या पक्षाच्या सरकारने धुडकावला. त्या सरकारची भुमिकाच किंवा विचारधारा हिदुत्ववादी होती आणि आहे आपण ते लक्षात घ्या.

(बाम्बस्फोटातील कारस्थानात मुख्य भुमिका भारतातल्या आणि परदेशातल्या मुस्लीमांची होती ,असं आयोगाने आपल्या अहवालात नमूद केले आहे. याचा अर्थ न्या.श्रीकृष्ण यांनी मुस्लीम गुन्हेगारांना पाठीशी घालण्याच्या किंचीतही प्रयत्न केला नाही. असा होतो तरीही युती सरकारने आयोग मुस्लीमधार्जीणा आहे असा आरोप कराव याचे आश्चर्य वाटते. -दै. आपलं महानगर . शनिवार, ११ ऑगस्ट २००७)


आपला
कॉ.विकि

कॉम्रेड नक्की काय म्हणताय?

त्या विकास ने एक कविता लिहीली आहे त्याला असे सांगावेसे वाटते की शिवरायांच्या सैन्यात मुसलमानही होते. इतिहास त्याने वाचला की नाही.

अहो साहेब, मला जरा नीट समजून सांगता का, की मी आपण लावलेल्या संदर्भात कुठली कविता लिहीली? आणि सरसकट मुसलमानांच्या विरुद्ध नक्की काय बोललोय ते? मी तर अगदी विषयापासून स्पष्ट म्हणले की मी मुस्लीमविरोधी नाही पण कम्यूनिझमविरोधी आहे. या अहवालाबाबत पण काँग्रेस राजकारण करत आहे आणि आपल्यासारख्यांना "खुळे" बनवत आहे. त्यांनी केले तर न्यायाप्रमाणे करूदेत माझा काही विरोध नाही, हे पण स्पष्ट केले होते. पण ते काही करणार नाही हे आपल्याला भारतीय राजकारणाची जरातरी माहीती असेल तर समजायला हवे.

म्हणून मूळ वाद हा हिंसा मग ती कोणीही केली असो, ती चूकच असे स्पष्ट पण मानणे महत्वाचे असे मी म्हणलो. त्यावर आपल्याला, कम्यूनिस्टांचे कायदा हातात घेण्याबद्दलचे आणि हिंसा करण्याबद्दल निषेध करायची विनंती केली. अर्थातच आपण त्याला बगल देऊन काहीतरी असंबद्ध माझ्याबद्दल आणि इतरांबद्दल वरती लिहीले. कारण स्पष्ट आहे: कम्यूनिस्टांचे कायदा हातात घेणे, हिंसा करणे, राष्ट्रविघातक कारवाया करणे या सर्वाला आपण तयार आहात कारण आपल्याला आपल्या "जय हिंद, जय महाराष्ट्रा" पेक्षा "जय कम्यूनिझम" मोठा वाटतो, मग त्याच्यानावाने होत असलेली हिंसा ही कायद्यापेक्षा मोठीच (आपल्या नजरेत) असणार!

तुम्हाला काय वाटते, "हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" असे म्हणणार्‍या आणि स्वतःची तलवार ही "भवानीमातेचा" प्रसाद समजून स्वतःच्या लोकांच्या आणि हिंदवी स्वराज्याच्या विरोधकांना मोडण्यासाठी वापरणारा, देशात प्रथमच "हिंदवी स्वराज्य" (बाकीच्यांची राज्ये त्या त्या राजांच्या घराण्याच्या नावाची अथवा स्वतःच्या नावाची असायची, शिवाजी हा एकटाच...) स्थापन करणारा आणि स्वतःला "गोब्राम्हणप्रतिपालक" (पूजक नव्हे) अशी पदवी लावणारा शिवाजी आज असता तर काय कम्यूनिस्ट असता? तुम्ही कशाला त्याच्या गप्पा मारता. ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवता त्यांचेच बोला - म्हणजे मार्क्स, लेनीन, स्टॅलीन, माओ आणि डेंग....कारण तुमचे बसू पण दसरा आला की काली पूजा करणार आणि पॉलीटब्यूरोमधे बसले तरी सदर्‍याच्या आत जानवी लपवून घालणार...

मी परत आपल्याला एकच साधा प्रश्न विचारतो: "आपल्याला हिंसा ही कम्यूनिस्टांसकट कोणी ही केली तरी अमान्य आहे आणि त्यासंदर्भात समान न्याय लागावा असे वाटते की फक्त तथाकथीत हिंदूंनीच केलेली हिंसेला न्याय मिळावासा वाटतो"?

पुर्नसंपादीतः

आत्ता लक्षात आले की आपण मी शिवराय कवीभूषणाच्या चार ओळी लिहील्या त्याला कविता म्हणाला असाल. तसे असले तरी वरील प्रतिसादात फरक पडत नाही. त्या ओळी: "काशीजी की कला गई, मथूरा मस्जीद हूई, शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी " या शिवराय भूषणाने लिहीलेल्या होत्या. त्याचा संदर्भ , "सुंता करायला मोघलाई लागून गेली आहे ती तर केव्हाच संपली. " या आपल्याच प्रतिसादातील आपण लिहीलेल्या वाक्याशी होता.

आंधळेपणाचा कहर

त्या सरकारची भुमिकाच किंवा विचारधारा हिदुत्ववादी होती आणि आहे आपण ते लक्षात घ्या.
अस्स? मग त्यांना सत्तेत आणणारे सुद्धा हिंदुत्वावादीच होते ना? आज राष्ट्रवादी (क्ष - काँग्रेस) आणि काँग्रेस सत्तेत आहे ते फक्त त्यांच्या सत्तेच्या भुके पोटी. महाराष्ट्रात राजकारणा बद्दल बोलायचेच असेल तर महाराष्ट्रवादी बनुन बोला.
आता काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे द्या...

  1. महाराष्ट्रात कम्युनिस्ट सत्तेत का नाहीत?
  2. कम्युनिस्टजर निधर्मवादी आहेत तर ते भारतात स्वबळावर सत्तेत का येत नाहीत?
  3. कम्युनिस्टांचा झेंडा घेउन मिरवणारे बर्धन महाराष्ट्रातल्या सर्व सामान्य शेतकर्‍यांच्या आत्महत्या बघून काही बोलत का नाहीत?
  4. कम्युनिस्ट लोकं पुढे येउन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कामगार (अभियंता-बी पी ओ कर्मचारी) लोकांना संघटीत करून संघटना उभी करून त्यांचे प्रश्न का सोडवत नाहीत.

हे प्रश्न आधी सोडवा मग इतर लोक कोण आहेत त्या बद्दल बोला.

मराठीत लिहा. वापरा.

कम्यूनिस्ट

शरद रावांच्या मूळ प्रस्तावात नजरचुकीने कम्यूनिस्ट शब्द टंकला गेला नाही असे वाटते. संपादकांनी नोंद घ्यावी.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

ही चर्चा

श्रीकृष्ण आयोग आणि कम्युनिष्ठ् पक्षाचा सबंध काय. चर्चा चाललीय कशावर आणि घसरता आहेत कशावर काय म्हणावे ह्यांना. कृपया असे करू नका. धर्म बाजूला ठेवून या चर्चेकडे बघा माणुसकिच्या दृष्टीकोनातून.
आपला
कॉ.विकि

चर्चेचा संबंध

श्रीकृष्ण आयोग आणि कम्युनिष्ठ् पक्षाचा सबंध काय. चर्चा चाललीय कशावर आणि घसरता आहेत कशावर काय म्हणावे ह्यांना.

श्रीकृष्ण आयोगाचा "राजकारणासाठी" होणारा वापर बोलल्या नंतर आपण ती चर्चा हिंदूत्ववादावर नेली. तेथे आपण म्हणत असलेली घसरण चालू झाली. पुढे "दंगलीतील दोषींवर कारवाई व्हावी असे आपणास वाटत नाही का?" असा प्रश्न विचारलात.

थोडक्यात चर्चेचा रोख आपण श्रीकृष्ण अहवालावरून हिंदूत्ववादावर नेलात जे मला आक्षेपार्ह वाटले. वर दंगलीतील दोषींवर कारवाई होण्याच्या बाजूने असणे अथवा विरुद्ध असणे यावर प्रश्न विचारलात. त्यावर माझी प्रतिक्रीया होती की या सर्वाचे मूळ हिंसा आहे मग ती कोणीही कोणत्याही कारणासाठी केली असोत.

म्हणून पुढे म्हणले की याच नाही तर कुठल्याही दंगलीत अथवा हिंसे संदर्भात हिंसा करणार्‍यांवर कारवाई झाली पाहीजे आणि पुढे आपल्याला विनंती केली की कम्यूनिस्टांनी केलेली हिंसा आपल्याला योग्य वाटते का अथवा त्याचा आपण निषेध कराल का? जो पर्यंत आपण स्वतः उल्लेख करत असलेल्या माणूसकीशी प्रामाणीक राहून, हिंसा करणार्‍या कम्यूनिस्टांचा निषेध करत नाहीत आणि संधी मिळताच हिंदूंना बडवताय, तो पर्यंत आपण माणूसकी दाखवत नसून त्याच्या बुरख्याखाली पक्षपात दाखवत आहात. म्हणून म्हणतो की उगाच हिंदूत्ववाद्यांना वगैरे शिव्या देणे बंद करा निषेध करायचाच असेल तर तो कुठल्याही हिंसेचा करा.

अर्थातच "हे सत्य आपल्याला कटू ठरले" आणि म्हणून अजूनपण कम्यूनिस्टांच्या हिंसेचा आपण निषेध करायला तयार नाहीत... कारण कम्यूनिझम हा आपल्यासाठी रिलीजन झाला आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की "रिलीजन ही एक अफूची गोळी आहे!"

-----------------------------

थोडेसे या चर्चेच्या विषयास अवांतर, पण त्यातील वादविवादाशी संबंधीतः रिडीफ वर, रॉच्या माजी संचालकांचा बी. रामन यांचा "China's interest is our Interest" हा लेख वाचा आणि आजही कम्यूनिस्ट आजही कसे वागताहेत ते वाचून् तुम्हाला "राष्ट्रधर्म पाळण्याच्या दृष्टीकोनातून बरोबर वाटत आहे का ते सांगीतलेतर बरे होईल.

वाहवा!

अर्थातच "हे सत्य आपल्याला कटू ठरले" आणि म्हणून अजूनपण कम्यूनिस्टांच्या हिंसेचा आपण निषेध करायला तयार नाहीत... कारण कम्यूनिझम हा आपल्यासाठी रिलीजन झाला आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की "रिलीजन ही एक अफूची गोळी आहे!"

चक्क कम्यूनिझम हा रिलीजन असे म्हणणे!
वाहवा! ३ चीयर्स फॉर विकासराव!
झकास!

विकिराव यावर टीप्पणी नाही देवू शकलात तर काय कामाचा तो मार्क्स?

आपला
गुंडोपंत

"थँक गॉड, आय ऍम नॉट अ मार्क्सिस्ट्!" - कार्ल मार्क्स्??

कुमार केतकरांना कम्युनिस्ट असे अर्ध्यावर डाव मोडण्यासाठी निघालेले अजिबात आवडलेले दिसत नाही.
मनोगतावरून मिळालेला हा दुवा - लोकसत्ताचा अग्रलेख
पहा.

केतकर सोनियाचा दिवा विझू नये म्हणून 'योगक्षेम वहाम्यहम' सारखा हातांचा कंस () करताना दिसत असले तरी कम्युनिस्टांना कंस(मामा) सारखे दिसू शकतील. ;)

ता.क. निरीक्षकांना केतकरांविषयी यापूर्वीही फारसा आदर नसला तरी कम्युनिस्टांबद्दल त्यांनी केलेल्या अनर्गल विधानांमुळे तो पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. कृपया जाणकार कम्युनिस्टांनी त्यांना सणसणीत उत्तर देणारा लेख लिहावा व तो आदर नाहीसा करावी ही आग्रहाची विनंती. केतकरांनी उद्धृत केलेले - "थँक गॉड, आय ऍम नॉट अ मार्क्सिस्ट्!" हे दस्तुरखुद्द कार्ल मार्क्सचे विधान - खोटे असल्याचे सप्रमाण सिद्ध करावे.

सुमार..(!)

..केतकरांच्या अग्रलेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद. आता तरी त्यांना मा. सोनीयाजी राज्यसभेचे तिकीट देतील अशी अपेक्षा करू!

केतकरांनी उद्धृत केलेले - "थँक गॉड, आय ऍम नॉट अ मार्क्सिस्ट्!" हे दस्तुरखुद्द कार्ल मार्क्सचे विधान - खोटे असल्याचे सप्रमाण सिद्ध करावे.

मी कम्यूनिझमचा कितीही विरोध करत असलो, तरी, हे विधान कदाचीत मार्क्सने फक्त केतकरांच्या स्वप्नात जाऊन त्यांना दृष्टांतासारखे सांगीतले असावे असे वाटते. ("वत्सा, असे... म्हण, तुला नक्की तिकीट मिळेल!," वगैरे). कारण कार्ल मार्क्स चा काळ हा १८१८-१८८३ म्हणजे झारशाहीचा त्रास टोकाला जाण्याच्या आधीचा आणि बोल्शेव्हीक क्रांतीच्या बर्‍याच आधीचा होता. त्यावेळेस कोणी कम्यूनिस्ट असतील असे वाटत तरी नाही.

पण केतकरांचे कसे आहे, बुशने इराक वर हल्ला केला, ओसामाने ९/११ घडवले, त्यांच्या दृष्टीने कर्ताकरवीता हिंदूत्ववादच, आता कम्यूनिस्टांनी "सोनीयाजींच्या " विरोधातच तोफ डागली म्हणल्यावर हे "शूर आम्ही सरदार ...काय कुनाची भिती" बाळगणार?

आता ओ कसं !

आबूराव म्हणत होते हे डावे नं. एकचे चालू ,कॊंग्रेस पेक्शा एक पाऊल पुढं हाये !
तिकडं सरकार पाडाले निघले हे डावे,यानला बी लयी सोक हाये म्हणे सत्तेचा
मंग कसं व्हावं या देशाचं !

बाबूराव येथे पाहा !

कम्युनिझम् - एक धर्म

चक्क कम्यूनिझम हा रिलीजन असे म्हणणे!

"धर्म ही अफूची गोळी आहे असे मानणारा कम्युनिझम् हाही एक धर्मच आहे" हे जॉर्ज् बर्नार्ड् शॉ चे वाक्य आहे.

वॉव

"धर्म ही अफूची गोळी आहे असे मानणारा कम्युनिझम् हाही एक धर्मच आहे" हे जॉर्ज् बर्नार्ड् शॉ चे वाक्य आहे.

धन्यवाद शरदराव, मला हे माहीत नव्हते, मी आपले प्रतिक्रीया लिहीण्याच्या जोशात लिहीले.

श्रीकृष्ण आयोगाने काँग्रेसही अडचणीत?

खालील बातमी वाचली तर या नव्याने चालू झालेल्या तमाशाच्या मागे काय राजकारण असू शकते ते समजेल.

श्रीकृष्ण आयोगाने काँग्रेसही अडचणीत?

[ Tuesday, August 21, 2007 01:37:59 am]

संजय व्हनमाने, मुंबई

श्रीकृष्ण आयोगाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्याने शिवसेनेत वातावरण तापले असले तरी त्याची झळ काँग्रेसलाही बसणार आहे. दंगलप्रकरणी गुन्हे दाखल झालेले निम्म्याहून अधिक शिवसैनिक मधल्या काळात महसूलमंत्री नारायण राणे यांचे बोट धरून काँग्रेसमध्ये गेले आहेत. या गुन्ह्यांमध्ये मोठ्या नेत्यांचा समावेश नसला तरी तळागाळातले कार्यकतेर् खूप आहेत. काँग्रेसमध्येच राहून आता आयोगाला विरोध कसा करायचा, या कोंडीत हे कार्यकतेर् अडकले आहेत.

श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाला शिवसेनेचा कडाडून विरोध झाल्याने युती सरकारने हा अहवाल 'अंशत: स्वीकारला' म्हणत फेटाळलाच! अहवालच फेटाळल्याने, ज्यांची त्यात नावे आहेत ते बिनधास्त झाले होते. या अहवालात नेत्यांपेक्षा कार्यर्कत्यांचा मोठ्या प्रमाणात नामोल्लेख होता. शिवसेनेत फूट पडताना कालिदास कोळंबकर, श्रीकांत सरमळकर, जयवंत परब यासारख्या नेत्यांबरोबर कार्यर्कत्यांचा मोठा थवाच नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेला. या राणेसमर्थकांपैकी नेत्यांची नावे अहवालात नसली तरी स्थानिक पातळीवरील कार्यर्कत्यांची नावे मात्र या अहवालात आहेत. त्यामुळे, अहवालाच्या अमलबजावणीचा मुद्दा पुढे आल्याने या कार्यर्कत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

शिवसेनेने पुन्हा आयोगाचा अहवाल काढायला कडाडून विरोध केला आहे. या विरोधाचा आवाज शिवसैनिक आणि विशेषत: ज्यांची नावे अहवालात आहेत, त्यांनी बुलंद केला आहे. मात्र, अहवालात नावे असणारे कितीतरी राणेसमर्थक काँग्रेसमध्ये असल्याने 'स्वपक्षा'विरोधात नेमकी काय भूमिका घ्यायची? हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे आहे. एकट्या परळ-लालबागमधीलच शंभराहून अधिक राणेसमर्थकांची नावे या अहवालात असल्याचे कळते.

याबाबत लवकरच राणे यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हे घालण्यात येईल, असे यापैकीच एकाने सांगितले. तर हा 'पोलिटिकल गेम' असून याला नारायण राणे चोख उत्तर देतील; अशी प्रतिक्रिया एका बड्या राणेसमर्थक पदाधिकाऱ्याने नोंदवली.

अद्याप आयोगाने कोणाला नोटिसा काढल्या नसल्या तरी पुढेमागे त्या निघू शकतात. त्यामुळे महसूलमंत्री नारायण राणे यांनीही या प्रकरणात काय करता येईल; यात लक्ष घालण्यात सुरुवात केली आहे.

कसं बोललात!

कसं बोललात!
आता माझ्याकडे १८७३ सालच्या दंगलींचा अहवाल आला आहे . मी त्याचा अभ्यास करीन आणि त्यास जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा करीन !

दहीहंडी

मुसाफिरखान्यात हिंदू - मुस्लिम ऐक्याची दहीहंडी

[ Friday, August 31, 2007 01:50:33 am]

अडीच लाखाची दहीहंडी
- नरेश कदम

श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाच्या अमलबजावणीवरून सत्ताधारी व विरोधकात संघर्ष सुरू असताना मुसाफिरखाना या मुस्लिमबहुल वस्तीत महम्मद अली शेख हे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी दोन लाख ५१ हजार रुपयांची दहीहंडी उभारणार आहेत. या उत्सवात मराठी लावणीचा फडही रंगणार आहे.

ही दहीहंडी मुसाफिरखान्यातील डोबळे बिल्डिंग समोर बांधण्यात येणार आहे. आठ थरांची ही दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला दोन लाख ५१हजार रुपयांचे बक्षीस मिळेल. त्याचप्रमाणे या दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन थर लावतील त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. महिला दहीहंडी पथकांनी सहा थर लावले तर त्यांना अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे शेख यांनी जाहीर केले आहे.

गोविंदा पथकातील कुणाला अपघात झाला तर त्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची तरतूदही शेख यांनी केली आहे. त्याचप्रमाणे उत्सव मंडळाच्या ठिकाणी डॉक्टरांचे एक पथकही असेल. सगळयांना अल्पोहारांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, महसूल मंत्री नारायण राणे, उर्जा मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार मिलिंद देवरा, आमदार युसुफ अब्राहनी हजेरी लावणार आहेत.

 
^ वर