माहिती हवी आहे

सर्व उपक्रमींना कळवण्यास आनंद होतो की नुकतेच मी माझे आय्. आय्. टी पवई येथील शिक्षण (एम. टेक.) पूर्ण केले असून नोएडा (नवी दिल्ली च्या जवळ) नोकरी करीत आहे.
या भागात कोणते मराठी मंडळ कार्यरत असल्यास कृपया कळवावे.
या भागात कोणी उपक्रमी रहात असल्यास सांगावे.

(२ महिने उपक्रमापासून दूर होतो. आता पुन्हा चालू)

धन्यवाद.
मेघदूत.

लेखनविषय: दुवे:

Comments

मनापासून अभिनंदन! :)

अरे कालिदासाच्या मेघदूता,

नुकतेच मी माझे आय्. आय्. टी पवई येथील शिक्षण (एम. टेक.) पूर्ण केले असून नोएडा (नवी दिल्ली च्या जवळ) नोकरी करीत आहे.

मनापासून अभिनंदन! आय आय टी परिक्षा पास झालास याचा आनंद वाटला. हल्ली दिल्लीला असतोस, एकदा सवड काढून चांदनी चौकातील 'घंटेवाला मिठाईवाला' या दुकानात जा आणि रबडी खा, व कशी होती ते मला कळव! :)

(२ महिने उपक्रमापासून दूर होतो. आता पुन्हा चालू)

आता नेहमी येत जा..

तुझा,
तात्या.

आंध्र प्रदेश क्यान्टीन

आंध्र प्रदेश भवन
१, अशोका रोड

येथे असलेल्या आंध्र प्रदेश भवनात (मांसाहार करत असल्यास) चिकन बिर्याणी, मटण फ्राय, चिकन फ्राय, चिकन करी, फिश करी वगैरे खायला विसरु नका.

तुमच्या पदवीप्राप्तीबद्दल हार्दिक अभिनंदन.

दिल्ली हाट

आन्ध्रा भवनातील शाकाहारही वाईट नाही. दिल्ली हाट मधील महाराष्ट्राचा ठेला ( 28°34'23.31"N, 77°12'22.90"E) देखील भेट देण्यासारखा आहे.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

अहो तात्या

काय सारखी नावे बदलता तुम्ही आता पतौडी झालात काय !
मी बघा पहिल्यापासून कालिदासाचाच आहे ;)

--चांदनी चौकातील 'घंटेवाला मिठाईवाला' या दुकानात जा आणि रबडी खा
हो इकडे लोक जेवण कमी करतात आणि जिलबी सामोसा आणि रबडीच खातात :) शिवाय सकाळी नाश्ट्याला पराठे, जेवणात आलू मटार आणि रात्री पनीर ठरलेले.

सध्या रोजच्या जेवणाची सवय लावून घेतोय, बाकी जेवणाचे सोडले तर इकडची लाईफ मस्त आहे !
तुमचे अभिनंदन येणार हे अपेक्षित होतेच :)

मिसळपाव चालू झाले की नाही अजून ? मुंबईची काय खबरबात?

आपला,
मेघदूत

 
^ वर