भारतीयांनी कॅल्क्यूलसचा सिद्धांत न्यूटनच्या आधी, किमान २५० वर्षांपूर्वी मांडला

भारतीयांनी कॅल्क्यूलसचा सिद्धांत न्यूटनच्या आधी, किमान २५० वर्षांपूर्वी मांडला
http://www.physorg.com

वर सम्दर्भ दिलेल्या बातमी प्रमाणे, मँचेस्टर विश्वविद्यालयातील काही संशधकांच्या तुकडीने शोधले की "इनफिनीट सिरीज" , "पाय सिरीज " संकल्पनेची गरज, पायची १७व्या घातापर्यंत (? - डेसीमल प्लेसेस पर्यंत) किंमत आणि एकंदरीतच मूलभूत कॅल्क्यूलस हा केरळ मधे ("kerala school") शोधण्यात आले आणि आपण मात्र त्याचे श्रेय चुकीच्या पद्धतीने न्यूटन आणि लेब्नीट्झना देतो. न्यूटनच्या नावाप्रमाणेच "माधव" आणि नीलकंठ" ह्या दोघांचे काम श्रेष्ठ आहे.

पाश्चिमात्य देशांव्यतिरीक्त इतर कोठून वैज्ञानीक ज्ञान येऊ शकणारच नाही या आंधळ्या अत्मविश्वासामुळे आत्तापर्यंत या गोष्टीकडे दुर्लक्ष केले गेले. पश्चिमेकडून पुर्वेकडे ज्ञान गेले हे सिद्ध करण्यासाठी लागणारे पुरावे हे सोपे ठेवले गेले आहेत तर उलटे करायचे झाले तर मात्र कठीण पुरावे द्यावे लागतात. तरी पण नंतरच्या काळात (१५-१६व्या शतकात) केरळमधे "जेस्युआईटस्" होते त्यामुळे शक्यता वाटते. त्यांना स्थानीक भाषा येत असत आणि गणित/विज्ञान यांची चांगली माहीती होती. शिवाय पोप ग्रेगरी XIII ने ज्यूलीयन कॅलेंडर अधुनीक करण्यासाठी समिती नेमली आणि तसे करवून आणले ज्याहेक जर्मन धर्मोपदेशक पुन्हा पुन्हा जगातील इतर देशांच्या कॅलेंडरबाबत चौकशी करत होता असा माहीती असलेला इतिहास आहे.

थोडे अवांतरः कधीतरी एकदा (विनोद म्हणून) ऐकले होते की आदीशंकराचार्यांनंतर केरळ ने फक्त दोनच प्रकारची माणसे भारताला दिली - "टायपिस्ट आणि कम्यूनिस्ट" (वि.आ. बुवा). आता कळले की कॅल्क्यूलस पण केरळ मधे होते!

Comments

घात

घात - इन्डेक्स, दशांश स्थळे - डेसिमल प्लेसेस

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

बरोबर

घात - इन्डेक्स, दशांश स्थळे - डेसिमल प्लेसेस

धन्यवाद, मला चुकतयं असे वाटले पण नक्की आठवत नव्हते.

आधी आपल्या प्रतिक्रीयेचा "घात" असा विषय वाचून मी चक्रावलो!

केरळ?

न्यूटन(१६४३-१७२७)च्या आधी अडीचशे वर्षे म्हणजे इसवी सन सुमारे १४५०. आर्यभटाचा ग्रंथ इ.स.४९९ चा, त्यानंतर वराहमिहिर, नंतर ब्रह्मगुप्त. त्याचा ब्रह्मस्फुटसिद्धान्त हा ग्रंथ इ.स. ६२८ चा. भास्कराचार्यांचा सिद्धांतशिरोमणी १११४ चा. या ग्रंथाचे लीलावती, बीजगणित, ग्रहगणित व गोलाध्याय असे चार भाग. त्यातला शेवटच्या भागात शून्यलब्धी म्हणजेच कॅलक्युलसची प्रमेये आणि ती वापरून केलेली गणिते. भास्कराचार्यांनंतर भारतीय खगोलशास्त्राच्या इतिहासात इतका मोठा माणूस कोणी होऊन गेला नाही.
मग हे कॅलक्युलसचा शोध लावणारे१५-१६ व्या शतकातले केरळी -माधव आणि नीलकंठ- आद्य कॅलक्युलसवेत्ते कसे?-वाचक्‍नवी

केरळ? - अगदी बरोबर बोललात!

आपला मुद्दा अगदी योग्य आहे. मी ही माहीती देण्याचे कारण चर्चा हेच होते (म्हणून ती चर्चेत घातली). सध्या ही बातमी नेटवर जोरात प्रवास करत आहे. मी काही यातील तज्ञ नाही, पण कदाचीत एक गोष्ट असेल म्हणजे कॅल्क्यूलस मधील एखादा "स्पेसिफिक" शोध केरळवाल्यांचा असेल...

मला हि असच वाटत

पाश्चिमात्य देशांव्यतिरीक्त इतर कोठून वैज्ञानीक ज्ञान येऊ शकणारच नाही या आंधळ्या अत्मविश्वासामुळे आत्तापर्यंत या गोष्टीकडे दुर्लक्ष केले गेले.

असे किती तरी शोध लागले असतील पण पाश्चिमात्य देशाच्या जाहिरातीमुळे या गोष्टी लपल्या असतील ?

 
^ वर