उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
या संख्या कोणत्या ?
यनावाला
August 17, 2007 - 4:50 pm
'प' ही पाच अंकी संख्या आहे.
** तिचा पहिला अंक (दशसहस्र) प मधे शून्य(०) हा अंक किती वेळा आहे ते दाखवितो.
**तिचा दुसरा अंक (सहस्र) प मधे एक (१) हा अंक .........,,..........................
**..... तिसरा अंक (शतक) ....,,...दोन(२) ..................,,..........................
**.....चौथा अंक (दशक)......,,....तीन (३) ..................,,.........................
**.... पाचवा अंक (एककांक)........चार(४) ....................,,.............................
तर प ही संख्या शोधून काढा.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
वरील प्रमाणेच स ही सात अंकी संख्या आहे. तीही शोधावी.
*************************************************************************८८
दुवे:
Comments
दोन संख्या
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. वाचक्नवी आणि श्री. तो यांनी दोन्ही संख्या बरोबर शोधल्या आहेत. अभिनंदन!
श्री. सहज हे पाच अंकी इष्ट संख्या शोधण्यात यशस्वी झाले आहेत.
संख्या कोणत्या? उत्तरे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मृदुला यांनी दोन्ही संख्या अचूक शोधल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी या पद्धतीच्या ५ अंकी, ६अंकी, ७ अंकी आणि ८ अंकी अशा चार संख्या शोधून कमाल केली आहे ! !"गोपालन" ,"तीन भावंडे" या तर्कक्रीडांचीही त्यांनी रीतीसह बरोबर उत्तरे कळविली आहेत.
या संख्या कोणत्या? उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मृदुला यांनी अशा प्रकारच्या चार संख्या कळविल्या आहेत् . त्या पुढील प्रमाणे :
पाच अंकी..... २१२०० (२ शून्ये, १ एक, २ दोन, ० तीन, ० चार)
सहा अंकी..... ३१०१००
सात अंकी..... ३२११०००
आठ अंकी..... ४२१०१०००
......................................
या कोड्याचे यापेक्षा अधिक चांगले उत्तर संभवत नाही....यनावाला.