तर्कक्रीडा -कार्डे उलटणे

एकदा मी आणि माझा मोठा मुलगा गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा माझा धाकटा मुलगा तिथे आला आणि त्याने खेळण्याच्या पत्त्यांच्या आकाराची काही कार्डे खिशातून काढली. पुढे म्हणाला "प्रत्येक कार्डावर एका बाजूला वर्तुळ आहे आणि दुसऱ्या बाजूला त्रिकोण आहे. ह्यापैकी काही आकृत्या लाल रंगात तर काही निळ्या रंगात रंगवलेल्या आहेत." नंतर त्याने ती कार्डे टेबलावर मांडली. आता आम्हाला प्रत्येक कार्डाची एकच बाजू दिसत होती.

१. काही कार्डांवर लाल वर्तुळ होते.
२. काही कार्डांवर निळे वर्तुळ होते.
३. काही कार्डांवर लाल त्रिकोण होता.
४. काही कार्डांवर निळा त्रिकोण होता.

धाकटा मुलगा म्हणाला "मला वाटतं सगळ्या लाल वर्तुळांच्या मागे निळा त्रिकोण आहे. बघा बरं माझं म्हणणं बरोबर आहे का?" त्यावर मी प्रत्येक कार्ड उलटून पहायला सुरुवात केली. मोठा मुलगा म्हणाला "आ‌ई, सगळी कार्डं उलटून बघायची गरज नाही." मी म्हटलं "असं कसं हो‌ईल?" त्यावर तो म्हणाला "जरा विचार कर, म्हणजे कळेल की कोणकोणती कार्डं उलटावी लागतील." मला काही कळेना.

कोणकोणती कार्डे उलटून पहायची ते तुम्ही सांगाल मला?

(उत्तरे व्यनिने पाठवावीत.)

Comments

फक्त वर्तुळ असलेली पाने उलटून पाहावी.

फक्त वर्तुळ असलेली पाने उलटून पाहावी.

हेमंत

उत्तर

आतापर्यंत आलेल्या एकूण ५ उत्तरापैकी फक्त धनंजय यांचे उत्तर बरोबर आहे.

उत्तर : लाल वर्तुळ आणि लाल त्रिकोण (प्रकार १ आणि ३) ही कार्डे उलटून बघावी लागतील.

स्पष्टीकरण-

"सगळ्या लाल वर्तुळांच्या मागे निळा त्रिकोण आहे." हे विधान बरोबर की चूक हे आपल्याला तपासून पहायचे आहे.

लाल वर्तुळ असलेली कार्डे तपासायला हवीतच.

निळे वर्तुळ असलेल्या कार्डांचा ह्या विधानाशी काहीच संबंध नाही. म्हणून ती बघायची जरूर नाही.

निळा त्रिकोण असलेली कार्डे बघायला हवीत असे काहींच्या उत्तरात आहे. पण निळ्या त्रिकोणामागे लाल वर्तुळ किंवा निळे वर्तुळ - काहीही असले तरी त्यातून वरील विधानाची सत्यता तपासण्याच्या दृष्टीने काहीच माहिती मिळत नाही. म्हणून ती कार्डे उलटण्याची जरूर नाही.

लाल त्रिकोणाची कार्डे मात्र उलटून बघायला हवीत. कारण एखाद्या जरी लाल त्रिकोणाच्या मागे लाल वर्तुळ सापडले तरी वरील विधान चूक ठरेल.

 
^ वर