उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
टिकली बद्दल पडलेले काही प्रश्न
आजानुकर्ण
August 13, 2007 - 4:43 am
मराठी स्त्रिया समारंभाच्या किंवा पारंपारिक पोषाखाच्या वेळी चंद्रकोरीच्या आकाराची टिकली लावतात याचे कारण काय आहे? अशी टिकली अजून कोणत्या प्रदेशात वापरली जाते?
आमच्या एका विदुषी मैत्रीणीच्या मते ही टिकली द्वितीयेच्या चंद्राचे प्रतीक आहे. आपले सौभाग्य द्वितियेच्या चंद्राप्रमाणे वर्धिष्णू राहो असे सूचित करण्यासाठी ही टिकली वापरली जाते.
आमच्या लहानपणी काही महिला कपाळावर टिकलीच्या ऐवजी कुंकवाची आडवी लहानशी पण जाड रेघ ओढत असत असे आठवते, हे कशाचे प्रतीक आहे?
भारतात व इतरत्र टिकल्यांचे वेगवेगळे आकार कोणते व त्यांचे अर्थ काय याविषयी कोणाकडून माहिती मिळेल का?
कळकळीची विनंती: टिकली लावणे योग्य की अयोग्य याकडे ही चर्चा नेऊ नये. आजानुकर्णाच्या मते टिकली लावावी किंवा नाही हा त्या स्त्रिचा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे.
दुवे:
Comments
चांगला पायंडा
आजानुकर्ण,
तुझी विनंती खरंतर तू ठळक शब्दात लिहायला हवी होती.
असो, हा नक्कीच चांगला पायंडा आहे. अशाने चर्चा प्रवर्तकाला नक्की काय अपेक्षित आहे हे इतरांना कळेल व चर्चेमध्ये अनावश्यक प्रतिसाद येणार नाहीत.
विषयांतराबद्दल क्षमस्व!
-जयेश
टिकली
सर्व हिंदू धर्मीयांमध्ये टिकली हा प्रकार अस्तीत्वात आहे, माझ्या माहीती प्रमाणे फक्त आसाम व त्या बाजूला ईतर काही प्रदेश येथे टिकली पहावयास मिळत नाही.
टिकली / कुंकू वरुन मला आठवले की बंगाली स्त्री जरा आकाराने मोठी पण एकदम सटिक गोल टिकली लावतात तर हिमाचल प्रदेशामध्ये आकाराने छोटी टिकली लावतात, पंजाब मध्ये तर टिकलीला मानाचे स्थान ! पण आजकाल पंजाबी वधू/ स्त्री ही टिकली लावण्यापेक्षा जास्त महत्व हे मांग भरणे (मराठी शब्द ? ) ह्यालाच देते. राजस्तान मध्ये तर एक वेगळीच पण सुरेख टिकली दिसते पिवळ्या अथवा कधी कधी हिरव्या रंगाची व हे रंग घरीच तयार केलेले असतात. केरळ, आंध्र, कर्नाटक व तामिलनाडू येथे सर्व साधरण पणे महाराष्ट्रीयन पध्दतीचीच टिकली लावतात.
पण टिकलीचा प्रसार कसा व कारण काय ह्याची माहिती मला देखील नाही आहे पण जर कोणाकडे असेल तर येथे लिहावी.
राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.
मांग भरणे
हिंदी मांग या शब्दासाठी मळवट हा प्रतिशब्द होईल का?
शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.
नाही.
माझ्या माहितीप्रमाणे
माँग या शब्दाचा अर्थ भांग असा आहे. काही प्रांतात सुवासिनी भांगात कुंकू (सिंदूर) भरतात. हे पहिल्यांदा लग्नाच्या वेळी वर वधूच्या भांगात भरतो. जसे महाराष्ट्रात मंगळसूत्र घातले जाते तसेच.
संपूर्ण कपाळभर कुंकू लावतात त्याला मळवट भरणे असे म्हणतात असे मला वाटते.
माँग / भांग
माँग या शब्दाचा अर्थ भांग
नाही , उत्तर भारतात भांग ला भांग च म्हणतात
व माँग ह्यांचा अर्थ स्त्रीयांना माहीतच असावा.
राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.
माँग या शब्दाचा अर्थ
माँग ह्या शब्दाचा मराठीत अर्थ भांग असाच आहे.
माँग - parting line of hair
असा अर्थ
हिन्दी-अंग्रेजी शब्दकोश
संकलक- डॉ.हरदेव बाहरी
प्रकाशक - राजपाल अँड् सन्स्, दिल्ली
यामध्ये आहे.
माँग आणि भांगचा गोंधळ
उत्तर भारतातील स्त्रियांची माँग म्हणजे महाराष्ट्रातील स्त्रियांची भांग असून,
उत्तर भारतात शिवरात्री/ होळीला पिण्यात येणारी भंग/ भांग म्हणजेही महाराष्ट्रातील भांग - भांगेची गोळी असावी.
सर्व प्रकारच्या भांगा भरण्यापासून दूर,
राजीव.
हो !
हो बरोबर मला देखील हेच म्हणायचे होते पण गोळी हा शब्द लिहण्यास विसरलो होतो ;)
धन्यवाद.
राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.
कुंकवाची आडवी रेघ
कुंकवाची आडवी जाड रेघ- याला ' कुंकवाची चिरी ' म्हणतात असे वाटते.
काय जमतय का जमल कुठे?
टिकली, कुंकवाची आडवी लहानशी पण जाड रेघ, मांग भरणे, मळवट, कन्नड भाषा शिकणे / शिकवणे , इथे येउन विचारणे, सांगणे..
काय जमतय का ऑलरेडी जमल कुठे? :-) ह. घ्या.
मेहेंदी लगा के रखना
डोली सजाके रखना
लेने तुझे ओ गोरी
आयेंगे आजानुकर्णा
सॉरी थट्टा आवडली नसेल तर उडवून लावा पण आशा आहे की सर्व जण ह. घे.
संपादकीय पुस्ती - कृपया परस्परांविषयी किंवा इतर सदस्यांविषयी व्यक्तिगत स्वरूपाची टीकाटिप्पणी प्रतिसादांतून करू नये. प्रतिसादाच्या माध्यमातून होणारे लेखन सार्वजनिक स्वरूपाचे आणि लेखाच्या/चर्चेच्या विषयाशी सुसंगत असेल याची कृपया काळजी घ्यावी.
टिकली तर टिकली.
टिकली तर टिकली नाही तर उचलून फेकली.याचा अर्थ माहित आहे का ? कप्पाळभर कुंकु त्याची सर नाही बॉ टिकलीला.
अहा!
लेने तुझे ओ गोरी
आयेंगे आजानुकर्णा
क्या बात है कविता... ते ही आमच्या आवडत्या आजानुकर्णा वर?
वा!
सांग रे बाबा... आम्ही नक्की येऊ अक्षता टाकायला नि अर्थात जेवायला!!!
आपला
भोजनभाऊ
गुंडोपंत
बिंदू - तिलक - टिकली
ही केवळ स्त्रियांनी लावायची पद्धत नसून भारतीय पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही आपल्या भुवयांच्या मध्यभागी तिलक लावण्याची प्रथा होती. बहुधा शरीरातील चक्रांतील एक प्रमुख चक्र जे दोन भुवयांमध्ये स्थित असते किंवा तेथे तिसरे नेत्र असते अशा धारणांतून तिलक लावला जातो असे म्हणतात. कालांतराने ही पद्धत स्त्रियांच्या माथी अधिक प्रमाणात रुढ झाली असावी.
महाराष्ट्रात आणि इतरत्र वेगवेगळ्या आकारांच्या कुंकवांचे (टिकल्यांचे नाही) महत्त्व काय हे जाणून घेणे मलाही आवडेल.
शैव/वैष्णव
पुरुष टिळा लावतात हे लक्षातच आले नाही. :) मला चंद्रकोरीची सुरुवात कशी झाली हे जाणून घ्यायचे होते त्यामुळे असे झाले असेल.
पुरुषांच्या तिलकामध्ये उभा गंध लावणारे वैष्णव तर आडवा गंध लावणारे शैव असा साधारण फरक असतो.
शिवाय धार्मिक कार्यामध्ये मध्यमा व अनामिका यांचा वापर करुन कुंकवाचे/गोपीचंदनाचे दोन ठिपके देण्याचीही पद्धत आहे. हा बहुधा आडवा की उभा या गोंधळात न पडता जिंका जिंका परिस्थिती निर्माण करण्यासाठी शोधलेला मार्ग असावा.
शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.
आज्ञाचक्र
योगशास्त्रात सांगितल्याप्रमाणे शरीरात जी सात(की आठ ?) चक्रे असतात, त्यातील आज्ञाचक्र दोन भुवयांच्यामधे असते. हे सर्वात शक्तिशाली चक्र आहे. इथे तिन्ही नाड्यांचा-इडा, पिंगळा, सुषुम्ना- संगम होतो. तिथे रोज टिळा लावल्यास हे चक्र जागृत होते.
इतर चक्रे-आठवतात तशी ..मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुद्धि, आणि सहस्रारचक्र.--वाचक्नवी
कृपया गैरसमज टाळावा
थोडे विषयांतर आहे-
मोहेंजोदारो, हरप्पा या (द्रविडी?) संस्कृतीमध्ये कपाळावर आणि भांगात लाल रंग लावण्याची प्रथा असावी. त्यामुळे कुंकवाला ५००० वर्षांचा भारतीय इतिहास आहे.
आर्य संस्कृतीतील स्त्रिया वेदकालात कुंकू वगैरे लावत नसाव्यात असे वाचल्याचे आठवते. (सायटेशन नीडेड).
एखाद्या स्त्रीला वरायचे असेल तर बर्याच वेळा युद्ध करून आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवावे लागे. त्यावेळी झालेल्या जखमांचे रक्त जेता पुरुष वरलेल्या स्त्रीच्या कपाळी लावून आपला विजय जाहीर करत असे. हीच (असंस्कृत/रानटी?) पद्धत आता परंपरा म्हणून पाळली जाते. ही प्रथा आज टिकलीपाशी येऊन टेकली आहे.
आणि 'क्युंकी...'च्या जमान्यात महिला वर्गात टिकल्यांचे मार्केटिंग करण्यासाठी ती स्पॉन्सरही केली जात असावी असा अनेकांना दाट संशय आहे. चंद्रकोर, फुलपाखरू, नाग, विद्युल्लता, चमकचांदणी, ज्योत अशा अनेक आकारात ती मिळत असल्याचे जाणवते. (हे निरीक्षण नमूद करणार्या मंडळींचे फारच बारीक लक्ष असते असा गैरसमज कृपया टाळावा.;) )
माझी आजी मेणाचा रुपया कपाळावर करून त्यावर कुंकू भरत असे. या कुंकवाच्या बिंबाला एक हळदीची रेष अधोरेखित करत असे असेही आठवते. आईच्या काळात गंध आले. आता पुढचे... समजले असेलच.;)
चंद्रकोरीसारख्या कुंकवाचा अर्थ माहित नाही पण शिवकालीन (चंद्रवंशीय) स्त्रिया आपला चंद्रवंश ठसवण्यासाठी त्या आकाराची कोर कपाळावर रेखत असाव्यात.सहसा ती चंद्रकोर क्षत्रिय महिलाच कपाळावर कोरत असत.बर्याच शिवकालीन चित्रांत आणि चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते. (पहा - राजा शिवछत्रपती या बाबासाहेब पुरंदरे यांच्या छोट्यांसाठीच्या पुस्तकातली श्री. दलालांची चित्रे आणि भालजी पेंढरकरांचे चित्रपट)
इतर महिला मळवट, चिरी या स्वरूपात कुंकू लावत. तसेच कपाळावर मध्यभागी कुंकू रेखायचा संदर्भ-बिंदू म्हणून गोंदण्याची पद्धत होती. (रेफरन्स पॉईंट - टॅटू)
मळवट हा प्रकार हाताची चार बोटे हळदीत माखून कपाळावर आडवी ओढायची (कपाळ भरून जाईल असे) आणि मग त्यावर मोठे गोलाकार कुंकू लावायचे असा आहे. पहा - तुळजाभवानीचा मळवट.
यासारख्या शक्तीमाताक्षेत्रात पुरुषही मळवट भरतात(फक्त हळदीचा, त्यावर कुंकू नसते.)
आता टिकल्यांच्या जमान्यात कोणत्याही आकाराची टिकली तयार करणे सोपे झाल्याने ही कोर सर्रास वापरात येत आहे.
पण काळ्या रंगाची चंद्रकोर पहाणे अगदी जिवावर येते. (पुन्हा एकदा- हे निरीक्षण नमूद करणार्या मंडळींचे फारच बारीक लक्ष असते असा गैरसमज कृपया टाळावा.;) )
दुसरे म्हणजे या टिकल्यांचे नांदण्याचे ठिकाण कपाळापेक्षा आरसे आणि बाथरूमच्या टाईल्स हेच जास्त झाल्याने आरसे आणि टाईल्स सौभाग्यवती (की वान) झालेले आढळतात - त्याचाही निरीक्षकांना खेद वाटतो.
कुंकू, टिकली या विषयावर अजून इंटरनेट - विकीवर फारशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. जाणकारांनी कृपया नोंद घेऊन ही कमतरता भरून काढावी.
धन्यवाद/चंद्रवंशीय?
विसुनाना,
विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
चंद्रवंशीय/चांद्रवंशीय म्हणजे काय? शिवाजीराजे चंद्रवंशीय होते का?
चंद्रवंशातले इतर राजे कोणते? सूर्यवंशातले कोणते? अजून इतर वंश आहेत का? पृथ्वी वंश वगैरे?
पुरुष तिलक लावतात त्याला काही आधार आहे का? शिवाय ही (असंस्कृत व रानटी ) पद्धत मुसलमान/ख्रिश्चन धर्मांमध्ये नव्हती का? ते लोक काही विशिष्ट तिलक लावल्याचे ऐकिवात नाही?
(मला यातली काहीही माहिती नाही त्यामुळे माझे प्रश्न मूर्खपणाचे वाटले तर क्षमस्व.)
अवांतरः आम्ही उशीरा उठल्यावर अगदी सूर्यवंशीय आहेस असा शेरा मारला जातो. म्हणजे महाराजांचा आणि आमचा वंश वेगळा का? ह. घ्या. ;)
शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.
सूर्यवंशी -चंद्रवंशी
वैवस्वत मनू आणि त्याच्यापुढील वंश जसे रामाचा ईक्श्वाकु वंश सूर्यवंशी असून महाभारतातील कुरुवंश चंद्रवंशी होता असे वाटते. आपल्या महाराष्ट्रात आजही सोमवंशी कायस्थप्रभू आणि चांद्रसेनीय कायस्थ प्रभू - एसकेपी आणि सीकेपी जाती इ. चांद्रवंशी जाती असाव्यात.
विस्ताराने नंतर.
कायस्थप्रभू
प्रभू रामचंद्र हे जर सूर्यवंशी असतील तर कायस्थ प्रभू हे चांद्रसेनीय/चांद्रवंशी कसे काय?
क्य बात है!
...येशूलाच ठाऊक!
हा हा हा!!
वा टग्या!
दोनच शब्दात काय टाकलात!!!
जिओ!!!
आपला
गुंडोपंत
रामोशी
आमच्या गावाकड रामोशी जमात आहे. गुन्हेगारीचा शिक्का, फासेपारधींसारखा. ते स्वत:ला रामवंशी समजतात. रामवंशीचा अपभ्रंश होउन रामोशी झालं
प्रकाश घाटपांडे
गैरसमज नाही
मी आत्ताच ऋग्वेदात उषेचे वर्णन कपाळावर ठसठशीत कुंकू लावलेले असल्याचे केलेले वाचले. तेव्हा "सो कॉल्ड" आर्यसंस्कृतीत टिळा लावला जात होता की नाही याचा जाणकारांनी खुलासा करावा.
बाकी प्रतिसाद आवडला.
अवांतरः
हा गैरसमज कसा बुवा? समोरच्या मंडळींनी बारीक लक्ष द्यावे म्हणूनच बर्याच स्त्रिया रंगीबेरंगी टिकल्या लावत असाव्यात. हातातील बांगड्या स्वतःला दिसतात. हनुवटी मानेला चिकटवली तर गळ्यातील हारही दिसेल पण टिकली पाहायची झाली तर सतत आरशात पाहायला हवं जे अशक्य आहे, तेव्हा टिकली ही समोरच्याला दिसावी म्हणूनच लावली जाते "हल्ली". तेव्हा बारीक लक्ष द्यावेच, न देता समोरच्या ललनेचा अपमान होण्याची शक्यता आहे. ;-)
यावरून एक आठवलं, अमेरिकेत एक नवी मालिका येते बिल एन्गेव असे काहीसे नाव आहे. मी पाहत नाही पण प्रोमोज् पाहिले त्यात एक बाप आपल्या १६-१७ वर्षांच्या कन्यकेला सांगतो की 'कानात मोठ्ठे हलणारे डुलणारे इअरिंग्ज घालत जा.' पोरगी विचारते, 'असं का?' तेव्हा बाप सांगतो, 'अशाने समोरच्या पोरांचे लक्ष केवळ तुझ्या इअरिंग्जवर राहिल.' :) आता हा ही गैरसमज की काय कळले नाही. (ह. घ्या.)
शिवाजी महाराजांचा टिळा
गूगल वर शोधले असता शिवाजी महाराजांची चित्रे उभ्या व आडव्या दोन्ही प्रकारच्या टिळ्यासह पाहण्यास मिळाली
शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.
महाराजांचा टिळा
शिवाजी महाराज हे जर खरंच सिसोदिया वंशातील असतील (पर्यायाने राजपूत, यावर मतभेद असल्याचे वाचले आहे) तर त्यांनी आडवे शिवगंध लावणे आलेच. तसेही ते शंकराचे भक्त असल्याने, जसे, 'हर हर महादेव' ही घोषणा मराठ्यांची तसेच रजपूतांचीही तेही आडवे शिवगंध लावत असावेत. (महाराणा प्रतापच्या डोक्यावर असेच आडवे शिवगंध दिसते.) परंतु ओवाळताना उभा टिळा लावायची प्रथा असते असे वाटते तेव्हा उभे आणि आडवे टिळे योग्य वाटतात.
पुन्हा शंकराचा आणि चंद्राचा संबंध आहेच, तर चांद्रवंशीय राजे शिवभक्त होते असे काही आहे का?
चित्रकार
यात आपण चित्रकारांचा ही विचार करायला हवा!
चित्रकाराला महाराज 'असे' असावेत असे वाटल्यानेही त्याने ते तसे रंगवले असण्याची शक्यता आहेच. यात महारांजांच्या वेळी कसे गंध लावत होते पेक्षा चित्रकाराच्या वेळी गंध लावण्याची कोणती 'फॅशन' होती हे कदाचित महत्वाचे ठरू शकते, नाही का?
त्यामुळे या चित्रांवर आपले मत ठरवू नका!
यातले गंध वगैरे भाग तर अगदीच वर वर झाले पण महाराजांचा निर्यांचा झगा, त्यांचा जीरेटोपावरचा मोत्याचा सर वगैरे कुठुन आला असावा हे ही कळत नाही... माणूस (त्यात मराठी ;) उत्तरेतला कदाचित पण जाईल बॉ... :) ) हे सगळे घालून लढाई वर जाणार का? अर्थातच नाही!
पण प्रतिमा ही प्रत्यक्षाहून सुंदर असते... नि ती तशी ठेवायचा प्रयत्न होतो असे वाटले.
आपला
गुंडोपंत
वा गुंडोपंत !
पंत,
आपल्या विचाराशी सहमत. चित्रकाराला राजांची प्रतिमा सुंदर दिसण्यासाठी चित्रकाराने त्याला जी सुंदरतेची आभुषणे वाटली ती त्याने रंगवली.चित्रावरुन मत ठरवू नये. एकदम सही !
अवांतर् ;) माझी आज्जी आडवं कुंकु लावायची मधाच्या पोळ्याचा मेन अन लालभडक कुंकु. आज आज्जी की याद आयी !
हो हो
काय बोललात तुम्ही!!!
अगदी हेच हो सर!!
मधाच्याच पोळ्याचं मेण नि (तीच्या भाषेत) कूकु.
आपला
गुंडोपंत
पिंजर
माझी आजी 'कुंकू' या शब्दाऐवजी 'पिंजर' असाही शब्द वापरत असे. हा शब्द आणखी कुणी ऐकला आहे काय?
अवांतरः या शब्दाचा आणि पिंजरा या शब्दाचा काही लागाबांधा असावा काय? (संसाराचा पिंजरा = पिंजर?) ;)
अमृता प्रीतम
अमृता प्रीतम यांच्या कादंबरीचे व त्यावर बेतलेल्या चित्रपटाचे नाव 'पिंजर' आहे.
याचा काही संबंध असावा का?
हिंदी पिंजर म्हणजे पिंजरा
हिंदी पिंजरचा अर्थ पिंजरा किंवा मराठीत ज्याला द केज म्हणतात तो असावा.
पिंजर=सापळा (?)
अमृता प्रीतम यांच्या कादंबरीत तो पिंजर सापळा या अर्थी वापरला गेला असावा का? तसे माणसाच्या छातीचा अस्थीपंजर पिंजराच दिसतो.
मी मूळ कादंबरी वाचली नाही परंतु चित्रपट पाहिला आहे त्यावरून त्या स्त्रीचे वर्णन मनाने पुरुषाकडे नसलेली किंवा अतिशय दु:खी आणि जबरदस्तीने नांदावे लागलेली स्त्री अशाप्रकारचे आहे. चित्रपट पाहताना हा प्रत्यय अनेकदा येतो. त्याअर्थी माणूस म्हणून न जगणारा फक्त अस्थिपंजर या अर्थाने पिंजर हा शब्द येत असावा असे वाटते.
स्त्री मुक्ती आणी कुंकू
कुंकू व मंगळसूत्र हे पुरुषाच्या दास्याचे प्रतिक मानल्याने काही स्त्रीया या भानगडीत पडत नाहीत. खंडोबाचा भंडारा मात्र मळवट भरल्यासारखा पुरुष लावतात. गंध उभे कि आडवे यावरुन वैष्णव व शैव यांच्यात लई मारामार्या हायेत्. तर असा हा गंटिळा ( गंध + टिळा) पुर्वी मला अष्टगंध लावले कि खूप अध्यात्मिक वाटायच. पूजेला मी अष्टगंध लावायचो.
प्रकाश घाटपांडे
अध्यात्मिकता
पुर्वी वाटायचे म्हणजे, आता नाही का?
नास्तीकतेतही अध्यात्मिकता का नाही असु शकत?
आस्तिकतेत खरंच अध्यात्मिकता असते का?
अष्टगंध लावल्याने तुम्हाला का तसे वाटायचे?
म्हणजे मी मनाची नक्की कोणती भावना सुखावत होती नि ती का असं विचारतो आहे.
आपला
गुंडोपंत
अष्टगंध
कारण पूजा करताना आदल्या दिवशीच्या पूजेच्या चंदन उगाळलेल्या टिकल्या या काढून टाकण्याचे श्रम देवांना अंघोळ घालायच्या अगोदर करावी लागे. अष्टगंध हे भगवे असल्याने आकर्षक वाटे त्यामानाने उगाळलेल्या चंदनाच्या टिकल्या या अगदिच रंगहीन वाटे.सोवळ्याची चड्डी घालून मी पूजा करत असे.
विवेकाधिष्टित नास्तिकता ही दांभिक अस्तिकतेपेक्षा खरी अध्यात्मिक आहे असे मला वाटते.
हो. श्रावणात गावाकडे मारुतीच्या देवळात रामायण,महाभारताच्या पोथ्या तपस्वी गुरुजी वाचत. त्यांच्या कपाळावर अष्टगंध लावले असायचे. मी त्या कथा भक्तिभावाने ऐकत असे. पण मी नंतर हळू हळू बदलत गेलो. आता रुढार्थाने मी नास्तिक आहे.( तरी देखिल मला भावना संवेदना आहेत)
प्रकाश घाटपांडे
झकास!
सोवळ्याची चड्डी ????
म्हणजे सोवळे कापुन त्याची चड्डी?
पर्याय बरा आहे तसा... आमच्या कडे एकदा गुरुजींचे सोवळे सुटल्याचा किस्सा झाला होता... ;)
विवेकाधिष्टित नास्तिकता ही दांभिक अस्तिकतेपेक्षा खरी अध्यात्मिक आहे असे मला वाटते.
वा आवडले!
पण मी नंतर हळू हळू बदलत गेलो. आता रुढार्थाने मी नास्तिक आहे.( तरी देखिल मला भावना संवेदना आहेत)
हे दिलदार पणे आपण मान्य करताय वा!
मी बदलतोय नि माझा विश्वासही बदलू शकतो हे जाहिर पणे मान्य करायला मोठीच हिम्मत लागते!
आपला
गुंडोपंत
उत्तर आवडले
प्रकाशराव,
आपले अष्टगंधावरील उत्तर आवडले आणि पटलेही, आम्ही स्वतःला आस्तिक समजत असलो तरी. फक्त जगात सर्व प्रकारचे लोकं बघितल्यावर, विविध लोकांशी संबंध आल्यामुळे, आणि इतिहासाच्या थोड्याफार ज्ञानामुळे, आपल्या एका उत्तरात थोडीशी सुधारणा सुचवावीशी वाटते:
विवेकाधिष्टित नास्तिकता ही दांभिक अस्तिकतेपेक्षा खरी अध्यात्मिक आहे असे मला वाटते.
असे सरळसोट विधान करण्यापेक्षा:
विवेकाधिष्टितता ही दांभिकतेपेक्षा खरी अध्यात्मिक आहे असे मला वाटते.
यात नास्तिक आणि अस्तिक हे शब्द त्या त्या वेळेच्या (आणि वेगवेगळ्या व्यक्तींच्या येणार्या) अनुभवावर ठेवलेले बरे असे वाटते कारण नास्तीकता पण कधी कधी दांभिक असू शकते आणि अस्तिकता पण विवेकाधिष्ठीत असू शकते...
पटले
पटले .
प्रकाश घाटपांडे
पंढरपूरचा विठोबा
कस्तूरी मळवट चंदनाची उटी
रूळे माळ कंठी, वैजंयती ||
राजस सुकुमार, मदनाचा पुतळा
वा हाच ऐकत होतो!
वा हाच ऐकत होतो अण्णांच्या आवाजात!
क्या बात है!
या प्रकाशचित्रात चंदनाची उटी पिंपळपानाच्या आकारात मोठी छान दिसते आहे!
आपला
गुंडोपंत
गुंडोपंतांना सर्वांना (बरेचदा) समानतेने वागवणारा वारकरी संप्रदाय आवडतो!
वा छान
वा छान चर्चा. चर्चा विषय सुद्धा फार वेगळाच आहे.
(वर कुणितरी म्हटल्या प्रमाणे) दोन भुवयांमध्ये (आज्ञा) चक्र असते आणि त्यातून उर्जा बाहेर पडत असते तेथे थंडावा येण्यासाठी अथवा तेथली उर्जा रक्षण करण्यासाठी चंदनासारख्या थंड पदार्थाचा टिळा लावण्याची पद्धत (स्त्री-पुरुष दोहोंसाठी) चालू झाली असावी. (ऐकिव माहिती)
पुढे स्त्रीयांसाठी ते बंधनकारक आणि पुरुषांसाठी गरजेनुसार ( आणि सध्या ट्रॅडिशनल वाटण्यासाठी :) ते शिल्लक उरले असावे.
--लिखाळ.
यंदा श्रावण पाळावा म्हणतो ! त्याला साखळीला बांधावे की पिंजर्यात ठेवावे याचा निर्णय होत नाहीये :)
श्रावणटिकली
दोन्ही केले तरी बिचार्याचे हाल. [पाळला तर टिकला म्हणावे नाही तर 'टिकली' ].
प्रकाश घाटपांडे
छान
विषयानुरुप व विषयांतराचे प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार.
यावरुन शंकाचे मोहोळ मनात उठले आहे.
टिळा लावताना वापरण्यात येणार्या कुंकू, हळद, अष्टगंध, गोपीचंदन, बुक्का या सर्व रंगांनाही काही अर्थ नक्कीच असेल.
त्याबाबत कोणाला माहिती आहे का?
विशेषतः वारकरी लोक लावतात त्या बुक्क्याबद्दल* जास्त उत्सुकता आहे. गोपीचंदन व अष्टगंधामुळे डोक्याचा विशिष्ट बिंदू थंड राहतो हे ठीक. पण कुंकूच का? आणि त्याचा रंग लालच का? गुलाल का लावत नाही. काळ्या रंगाचा बुक्का लावण्याची प्रथा कशी सुरु झाली. विठ्ठलाचा रंग काळा आहे म्हणून का? हिरव्या किंवा निळ्या रंगाचे टिळे का लावले जात नाहीत?
*हा बुक्का म्हणजे गुद्दा नव्हे.
कुंकवाचा लाल रंग
हा वर विसुनानांनी म्हटल्याप्रमाणे पूर्वी रक्ताचा टिळा लावण्याची प्रथा होती त्यावरून आला असावा. रक्ताला अनेक संस्कृतीत हे मानाचे स्थान आहे. रक्ताने पत्र लिहिणे, रक्ताने टिळा लावणे, रक्ताचा उपयोग सहीसाठी करणे इ. इ. बहुधा संबंध किंवा नात्यातील किंवा कार्यातील अतितीव्र संहती दाखवते.
बाकी, पिवळ्या, काळ्या, भगव्या रंगांबद्दल मलाही प्रश्नच आहे.
अवांतरः आमच्या लाडक्या अँजेलिना जोली या अभिनेत्रीने तिच्या एका पूर्वाश्रमीच्या लग्नात आपल्या नवर्याचे नाव आपल्या रक्ताने कपड्यावर लिहिले होते आणि दांपत्याने प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांच्या रक्ताने आपल्या कपड्यावर लिहिले होते असे काहीसे आठवले. असो... त्यानंतर लवकरच ते विभक्त झाले.
मेडम आमी नाराज !
उपक्रममदी खरी बातमी घ्याची म्हंजी तुमचा शबूद खरा मानतो आमी.
टीळा लावाची जूनी रीत हाये,रुशी, मुनी काय लाल रगत लावीत होते की काय कपाळाला?
जरा उच्का बरं गुगुलू सेठ ला नाय तर बूकामधी ! :)
बाबूराव येथे पाहा !
अहो बाबुराव
माझा शब्द खरा नका हो मानू, माझ्याही चुका होतातच. आता ऋषी मुनी कुंकू नव्हते लावत,बहुधा अष्टगंध, चंदन यांचे टिळे लावत असावे. शेंदूर, रक्तचंदन इ. आहेच.
पुरुषाने बायकांना ही माझी हक्काची बाई या कल्पनेतून रक्ताचा टिळा लावायला सुरुवात केली असावी आणि बायका कुंकू लावतात त्याचे कारण त्यांना आपल्या नवर्याच्या रक्ताशी बांधिलकी दाखवायची असते असे काहीसे कारण असावे असे मला वाटते हो! मी गूगलबाबाला अद्याप नमस्कार नाही केला पण शोधले पाहिजे.
पी जे (अवांतर)
अवांतरः आमच्या लाडक्या अँजेलिना जोली या अभिनेत्रीने तिच्या एका पूर्वाश्रमीच्या लग्नात आपल्या नवर्याचे नाव आपल्या रक्ताने कपड्यावर लिहिले होते आणि दांपत्याने प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांच्या रक्ताने आपल्या कपड्यावर लिहिले होते असे काहीसे आठवले. असो... त्यानंतर लवकरच ते विभक्त झाले.
»
याबाबतीत "ते विभक्त झाले" म्हणण्याऐवजी "ते विरक्त झाले" असे म्हणणे मग जास्त संयुक्तिक ठरू शकेल...
जबरी
जबरी विनोद... हहपुवा.
लग्नापूर्वी घ्यारक्त, लग्नानंतर काही दिवस आरक्त, आणि लग्न मोडल्यावर विरक्त.
खो खो हसलो
यावर मी खोखो हसलो. रक्ताने लिहिले तेव्हा ते आरक्त झाले होते, नंतर विरक्त
प्रकाश घाटपांडे
छान दिसते
असेच कधी तरी कोणाच्या तरी कपाळावर असा ठिपका चुकून लागला असेल आणि नंतर 'कपाळावर काहीतरी असलेले बरे दिसते आणि चेहर्याचे पण समान दोन भाग नीट होतात.' या भावनेने वेगवेगळी कुंकवे ,गंध, बुक्के आणि टिकल्या रुढ झाल्या असतील हे(अंदाजपंचे) उत्तर 'का' ला चालेल का?
छ्या!
छ्या! काहीतरीच!
मला नाही पटले!
इतके उथळ असेल हे सगळे असे वाटत नाही.
आपला
गुंडोपंत