टिकली बद्दल पडलेले काही प्रश्न

मराठी स्त्रिया समारंभाच्या किंवा पारंपारिक पोषाखाच्या वेळी चंद्रकोरीच्या आकाराची टिकली लावतात याचे कारण काय आहे? अशी टिकली अजून कोणत्या प्रदेशात वापरली जाते?

आमच्या एका विदुषी मैत्रीणीच्या मते ही टिकली द्वितीयेच्या चंद्राचे प्रतीक आहे. आपले सौभाग्य द्वितियेच्या चंद्राप्रमाणे वर्धिष्णू राहो असे सूचित करण्यासाठी ही टिकली वापरली जाते.

आमच्या लहानपणी काही महिला कपाळावर टिकलीच्या ऐवजी कुंकवाची आडवी लहानशी पण जाड रेघ ओढत असत असे आठवते, हे कशाचे प्रतीक आहे?

भारतात व इतरत्र टिकल्यांचे वेगवेगळे आकार कोणते व त्यांचे अर्थ काय याविषयी कोणाकडून माहिती मिळेल का?


कळकळीची विनंती: टिकली लावणे योग्य की अयोग्य याकडे ही चर्चा नेऊ नये. आजानुकर्णाच्या मते टिकली लावावी किंवा नाही हा त्या स्त्रिचा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

या सर्व आक्षेपांची

कल्पना होती म्हणूनच प्रतिसादात 'अंदाजपंचे' असे लिहीले आहे.
अवांतरः कुंकू/गंध म्हणजे शंकराच्या तिसर्‍या डोळ्याचे प्रतीक असे ऐकल्याचे आठवते.

म्हणजे असे का? असेल ,असेल तसेही असेल

आपली (म्हणजे समस्त मानवजातीचीच) पाळेमुळे आफ्रिकेच्या धरतीत रुजली आहेत असे म्हणतात.
अनुजी, तुम्ही म्हणता तसेही असण्याची शक्यता आहे...

एक चेहरा
एक चेहरा

द्वितियेचाच असावा

सदर चंद्र द्वितियेचाच असावा. मला येथे संदर्भ देता येणे शक्य नसले तरी द्वितियेचा चंद्र हा प्रतिपदेच्या चंद्रापेक्षा अधिक मंगल असतो असा प्रवाद हिंदू आणि मुसलमानांमध्येही (दुज का चाँद/बीजेचा चंद्र ) आहे.

बिरबल आणि बादशहाच्या गोष्टीमध्ये बिरबलाने बादशहाचे वर्णन द्वितियेचा चंद्र तर त्याच्या शत्रूचे वर्णन पौर्णिमेचा चंद्र असे केल्यावर बादशहा (नेहमीप्रमाणे ) सटकला व बिरबलाला खोपच्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा बिरबलाने द्वितियेचा चंद्र हा कसा भारी आणि पौर्णिमेचा चंद्र कसा नंतर डाऊन जातो हे स्पष्ट केले आहे. सीतामाईनेही रावण हा पौर्णिमेचा तर प्रभूरामचंद्र हे द्वितियेचा चंद्र असे म्हटल्याचे कुठेसे वाचले आहे.

मात्र हे सर्व खात्रीशीर नाही.

-आजानुचंद्र.

लाल रंगाचे कुंकू

मागच्या वर्षी लोकसत्तामधील चतुरंग पुरवणीमध्यी स्त्रीसमस्या वा स्त्रियांविषयक लेखन सातत्याने येत असे. मला नेमका दुवा सापडला नाही, मात्र अशा एका लेखामध्ये मांडलेले आणि माझ्या लक्षात राहिलेले काही मुद्दी येथे देते -

त्या लेखानुसार कुंकवाचा लाल रंग हा रक्ताचा म्हणूनच असला, तरी हे रक्त पुरुषाने बंधन म्हणून् लावलेले रक्त नाही, तर हे रक्त मासिक पाळीशी संबंध दर्शवते. मासिक पाळीचे चक्र असते. निसर्गातील अनेक गोष्टींचे चक्र असले. निसर्गामध्ये अनेक गोष्टी पुन:पुन्हा होतात, आवर्ती असतात. निसर्गाचा आवर्ती गुणधर्म मासिक पाळीमुळे स्त्री च्या शरीरामध्ये ठळक जाणवतो. स्त्रीचे शरीर हे ह्यामुळे पुरुषापेक्षा निसर्गाच्या अधिक जवळचे, अधिक नैसर्गिक आहे असे मानले जात असे. त्याचे चिह्न म्हणून लाल रंगाचा व गोलाकार (आवर्तन दर्शविणारे) बिंदू कपाळावर लावणे सुरू झाले. त्यामुळे ऋतुप्राप्ती झालेली स्त्रीच केवळ कुंकू लावत असे.

ही झाली सुरुवात. मात्र पुढे लाल रंगाचा संदर्भ पुरुषाने स्त्री ला वा स्त्रियांना जिंकण्यासाठी सांडलेल्या रक्ताशी जोडला गेला व पुढे केवळ लग्नानंतरच लाल कुंकू लावण्याची परवानगी स्त्रीला मिळाली. मात्र तोपर्यंत स्त्री = कुंकू असे समीकरण् झालेले असल्यामुळे, लग्नापूर्वी काळे वा इतर रंगाचे कुंकू लावणे सुरू झाले.

सूर्यवंश, चंद्रवंश

वैवस्वत मनू आणि त्याच्यापुढील वंश जसे रामाचा ईक्श्वाकु वंश सूर्यवंशी असून महाभारतातील कुरुवंश चंद्रवंशी होता असे वाटते. आपल्या महाराष्ट्रात आजही सोमवंशी कायस्थप्रभू आणि चांद्रसेनीय कायस्थ प्रभू - एसकेपी आणि सीकेपी जाती इ. चांद्रवंशी जाती असाव्यात.

विस्ताराने नंतर.--प्रियाली.
प्रियालीबाई नंतर विस्तार करतीलच, पण थोडक्यात...वैवस्वत मनूचा वंश सूर्यवंश. यात पुढील वंश येतात: अयोध्येचा इक्ष्वाकु(इ र्‍हस्व), विदेह चा निमि, वैशालीचा दिष्ट, आनर्त चा शर्याति, नृग, नरिष्यंत.
सोमपुत्र पुरूरवा ऐल ने स्थापलेला सोमवंश. याच्या शाखा: पौरव, यादव, अनु, द्रुह्यु, तुर्वसु, काश्य, अमावसु, आयु, क्षत्रवृद्ध.. . या प्रत्येक वंशाच्या अनेक उपशाखा. कुरुवंश पौरववंशाची एक उपशाखा.--वाचक्‍नवी

 
^ वर