आईची मुलं
हल्लीची मूल स्वतःची किती प्रगती करू शकतात या बद्दल मला भरपूर शंका वाटते.मुलाचं समाजात मुक्तपणे वावरण्याच बळ त्यांचे आईवडील स्वतःच हिरावून घेतात अस वाटत.हे सगळं लिहिण्याची वेळ येते आहे कारण माझ्या अनुभवाची मर्यादा उरली नाही आहे.आईची हि लाडकी मूल की मुलांची लाडकी आई त्यांचं प्रेम की त्यांची भीती हे सगळे प्रश्न माझ्या मनात सध्या चालू आहेत.
अनुभव :-
१- आम्ही मित्रमैत्रिणींनी सहलीला जायचं ठरवलं त्याप्रमाणे सर्व बेत आखले.भरपूर चर्चे नंतर सहलीची जागा वॉटरपार्कला जाण्याची ठरली. त्यात एक मित्र म्हणतो मी घरी सांगणार नाही मी कामाच्या निमित्तानेच घराबाहेर पडतो आणि मग तुम्हाला भेटतो. आम्ही म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही. मग हा म्हणतो माझ्यासाठी टॉवेल आणि कपडे तुम्ही आणा मी घरातून घेऊन निघालो तर आईला कळेल.बापरे हि तर हद्दच झाली. मी विचार करतो या मुलाला महिन्यातले तीन रविवार अर्ध्या दिवसासाठी कामावर जावं लागत त्यातला एक रविवार हा सहलीला आमच्या बरोबर येतो आहे हे जर त्याच्या घरी कळाल तर काय बिघडेल?
२- मला मोबाईल घ्यायचा होता आम्ही ट्रेनमधून प्रवास करत होतो मी एका मित्राला म्हटलं आपण मोबाईल घ्यायला जाऊया. तर हा म्हणतो घरी आईला सांगावं लागेल.मी विचार केला काय फरक पडला असता हा आईला न सांगता माझ्या बरोबर दोन स्टेशन पुढे आला असता तर?
३- माझ्या एका शाळेतल्या मित्राला माझ्या ऑफिसमध्ये काम मिळवून दिल. तसं काम फिरतीच होत घरी यायला उशीर होतो या सगळ्या गोष्टी त्याला माहिती होत्या. ईंटरव्हीवच्या दिवशी हा मला सांगतो मी एकटा नाही जाणार तू पण चल माझ्या बरोबर म्हटलं ठीक आहे.कामावर लागला त्या दिवशी त्याची आई मला म्हणते नीट घेऊन जा रे ह्याला ह्याला प्रवासाची नीट माहिती नाही आहे. मी मनातल्या मनात विचार केला २३ वर्षाच्या या ( लहान )मुलाच बोट घट्ट पकडून ह्याला मुंबईभर नीट फिरवावं अशी ह्याच्या आईची इच्छा आहे का? कामाला लागल्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरी फोन अरे ह्याला मालाडला जायला सांगितलं आहे हा मालाडला एवढ्या लांब कसा जाणार यावर मी तो कसा जाऊ शकेल ते सांगितलं. तिसऱ्या दिवशी रात्री १० वाजता माझ्या घरी फोन हा अजून आला नाही आमच्या घरच्यांनी सांगितलं निनादला तर घरी यायला कधी तरी १२ १२.३०वाजतात तुम्ही काही काळजी करू नका जास्त काम असेल तर होतो असा उशीर तो येईल घरी त्यांनी ठीक आहे म्हणून फोन ठेवून दिला. चवथ्या दिवशी त्याचा मला फोन आला हे काम सोडतो आहे म्हणून. त्याच्या घरच्यांनी त्याला ते काम सोडायला लावलं कारण घरी यायला १०-११ वाजायचे.यावर म्हणतो काल मी पास काढला मग त्या पासाचे आणि तीन दिवसाचे पैसे हवे मला. माझ्या ऑफिसने देऊ केले. त्यात ह्याच्या ईच्छे प्रमाणे १०० रु कमी होते तर त्यावर ह्याच म्हणणं नाही तीन दिवसाचे मला एवढेच पैसे पाहिजे तर ते मी माझ्या पाकिटातून देऊ केले आणि कटकट संपवली.
४- दुसरा इंजिनिअर आला तो जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत काम करू शकत होता.रात्री आठ नंतर त्याच्या आईच मन घरी लागायचं नाही आठ वाजले अजून हा कसा आला नाही आणि इकडे हा आठ वाजले की आई घरी चिंता करत असेल म्हणून ह्याच मन कामात लागणार नाही.हे सुधा न समजण्या पलीकडचं?
५- आमच्या सोसायटीत एका कुटुंबातली दोन मूल खाली कधीच खेळायला नसतात.ना क्रिकेट ना बेटमिंटन कुठल्याच खेळात नाही. एक दिवशी संध्याकाळी सर्व मूल खाली खेळत असताना हा मुलगा बेटमिंटनचे क्लासेस जिमखान्यात लावले आहे तेथे खेळण्यास जात होता. आम्ही सर्व एकमेकांच्या चहेऱ्याकडे बघत होतो सर्वांच्या मनात एकच प्रश्न हा आमच्यात खेळला तर काय बिघडेल? सोसायटीत खेळायचं नाही जास्त कोणाशी बोलायचं नाही फक्त कुठले क्लास लावले की झालं हि कोणाची मानसिकता आहे त्या मुलाची की त्याच्या आईवडीलांची.
आता कंटाळ आला आहे या असल्या अनुभवांचा.आपल्या मुलांना मुंबईतच इतकं जपणाऱ्या या आईवडीलांची मूल परदेशी गेली तर ? पण खरंच हि मूल आपल्या आईला सोडून परदेशी जाऊ शकतील का?
काय भविष्य असेल असल्या मम्मीज बॉय बनलेल्या आणि बनवलेल्या मुलांचं ?
Comments
यावरून परीक्षा
हा प्रश्न आहे खरा आणि तसे होताना दिसतेही. अमेरिकेतही हा प्रकार इथल्या पद्धतीने का होईना होत असतो..
२-३ वर्षांपूर्वी एम आय टी मधील प्रोव्होस्ट का अशीच कोणीतरी उच्चस्तरीय बाई (तिचे नाव/पद मी आत्ता विसरलो, शोधून सांगू शकीन) ही शाळेतून महाविद्यालयात प्रवेश देण्यावरून पालकांचे आणि मुलांचे वर्कशॉप घेयची. ती म्हणाली की जर आम्हाला लिहीण्यातून (निबंध प्रवेशासाठी लिहावे लागतात त्यातून) मुलगा/मुलगी स्वतंत्रपणे विचार करत नसल्याचे जाणवले अथवा जर प्रवेशाबद्दल कुठलीही चौकशी करण्यासाठी आई-वडीलांचे फोन आले तर त्या मुलाचा आम्ही फारसा विचार करत नाही कारण तो स्वतंत्र राहू शकणार / विचार करू शकणार नाही असे आम्ही समजतो.
थोडे अवांतरः याच बाईचे ३० वर्षे मानाची सर्व्हीस (आणि लोकांमधे प्रसिद्ध होवून) एम आय टी सारख्या मान्यवर संस्थेत केल्यावर एका निनावी फोन मुळे लक्षात आले की तीने सांगीतलेले शिक्षण तिच्याकडे नाहीच आहे आणि ती ज्या मान्यवर विद्यालयातून शिकली असे तीने ३० वर्षांपूर्वी सांगीतले, तसे काही नाहीच आहे अर्थातच दुसर्यादिवशी तिला काम नव्हते. नंतर कदाचीत आई-बाबा म्हणाले असतील म्हणून सांगत होतो की खोटे बोलू नकोस!)
वैताग
आम्ही कॉलेजमध्ये असताना आमच्या कंपूत एक असाच 'ममाज बॉय' होता. टोळक्यातले कुणी सिग्रेट ओढत असेल तर तो म्हणायचा की अरे मी जरा लांब उभा रहातो, आईला वास येईल..
हे अतिरेकी प्रेम मुलांना वैताग ठरु शकते. त्यांना दुबळे तर ते करतेच...
सन्जोप राव
शादी से पहले - शादी के बाद!
काय भविष्य असेल असल्या मम्मीज बॉय बनलेल्या आणि बनवलेल्या मुलांचं ?
त्याची कल्पना नाही पण मुलांच्या आयुष्यात अतीहस्त्क्षेप असेल तर लग्ना नंतर यांची परिस्थीती अवघड होवू शकेल. यांना आई व पत्नी यांचा मागणी व हक्काचा तोल सांभाळणे फार कठीण जाईल असे वाटते. तसेच असा हस्तक्षेप करणार्या आईलाही मुलाचे लग्न पचवणे जड जाईल असे वाटते.
एक अजून- हेच प्रश्न एखादी मुलगी असती तर पडले असते का हो?
की तीचे असे घरी विचारणे सहजपणे गृहीतच धरले गेले असते?
आपला
पुर्वाश्रमीचा ममाज बॉय नि आताचा बायकोच्या ताटाखालचे मांजर ;)
गुंडोपंत
ममाज बॉय
अरे वा. आपले अनुभव मजेदारच.
माझ्या एका मित्राला लहानपणी तो खेळताना पडला की घरचे रागवायचे. अनेकदा तर तो मला अश्या प्रसंगी सोबत घेवून जायचा आणि मी त्याच्या घरच्यांना सांगायचो की तो पडला यात त्याची चूक फारशी नव्हती.
माझा अजून एक मित्र, तो आमच्या बरोबर द्वितीयवर्षात असताना सिंहगडावर राहण्यास आला. तेंव्हा त्याला आणि मला त्याच्या घरच्यांशी थोडा वाद घालायला लागलाच होता. तर त्याला गडावर सांकाळी चढणे, तेथे राहणे हा एक मोठा पराक्रम घडत आहे असे वाटत होते. (तोवर मला गडावरचे बेडूक सुद्धा ओळखायला लागले होते इतक्या वेळा मी हा उद्योग केला होता.)
आता तुम्हाला असा प्रश्न पडला की अशी मुले परदेशात जातील का? तेथे त्यांचे कसे होईल ! तर मी सांगतो. त्यांना रोज येथून तिकडे सर्व सांगावे लागते. येथे कोठे इतरत्र फिरायचे असेल तरी ते घरी सांगतात. एक मुलगा तर त्याच्या घरी त्याने आज काय खाल्ले ते सुद्धा सांगत असतो.
अनेकदा मला वाटते की घरच्यांचे मन सुद्धा मुलांनीच तयार करायचे असते. मुल थोडे उद्योगी व्हायला लागले तर घरचे त्याला सरावतात. आपणच काही वेळा जोखडातून बाहेर यायला लागते. ते ज्याला जमत नाही तो परदेशातून सुद्धा हजेरी देत राहतो.
मुलांना जोखडात ठेवू नये आणि जोखडातील मुलांनी लवकर त्यातून सुटकेचा मर्ग शोधावा हे उत्तम.
--लिखाळ.
यंदा श्रावण पाळावा म्हणतो ! त्याला साखळीला बांधावे की पिंजर्यात ठेवावे याचा निर्णय होत नाहीये :)
एकदम पटले!
अनेकदा मला वाटते की घरच्यांचे मन सुद्धा मुलांनीच तयार करायचे असते. मुल थोडे उद्योगी व्हायला लागले तर घरचे त्याला सरावतात. आपणच काही वेळा जोखडातून बाहेर यायला लागते. ते ज्याला जमत नाही तो परदेशातून सुद्धा हजेरी देत राहतो.
मुलांना जोखडात ठेवू नये आणि जोखडातील मुलांनी लवकर त्यातून सुटकेचा मर्ग शोधावा हे उत्तम.
ह्या सारखा उत्तम मतित्तार्थ या चर्चेसंदर्भात नाही!
अवघड आहे
अनिरुद्ध दातार
प्रसंग १] माझ्याही ओळखीत एक असाच मुलगा (माझा क्लासमेट) आहे. टी शर्ट खरेदी करताना त्याला एखादा सिलेक्ट करायला सांगितला, की तो आईला विचारत होता. (शेजारीच बाबा उभे असताना).
प्रसंग २] कधी कधी (खरेतर् बर्याचदा) त्याचे आई-बाबा संध्याकाळी बाहेर गेले असताना मी त्याला अभ्यासाला घरी बोलावले असता त्याने फार विचित्र (माझ्याकरता विचित्र) कारण सांगितले ते असे: "आई-बाबा बाहेर गेले आहेत."
मी:"मग कुलुप लावून ये आणि किल्ली समोर ठेव"
तो: "अरे नाही रे. तसं नाही करता येणार"
मी :"का?"
आणखीनच विचित्र कारण (माझ्याकरता)
तो: "बाबांना समोरुन किल्ली घ्यावी लागेल."
आता याचे काय करावे????????????????????
अवघड आहे...............(रामा शिवा गोविंदा!)