मेड इन चायना
अमेरिकेत सद्ध्या (इराक युद्ध, मिनिआपोलीस पूल वगैरे सोडल्यास) जी एक गोष्ट सातत्याने प्रकाशात येत आहे त्यावर सी एन एन ने एक बातमीपट तयार केला आहे. त्याचे नाव: "मेड इन चायना"
हल्ली भारतातपण "मेड इन चायना" चे प्रमाण वाढत आहे. पण आपल्याकडे डोळ्यात तेल घालून बाहेरून नक्की काय आयात होत आहे हे पहाणारी सरकारी संस्था आहे का? जसे कोक - पेप्सीच्या बाबतीत पाण्याचे प्रकरण एका स्वयंसेवी संस्थेमुळे बाहेर आले तसे चायनीज् उत्पादने कोणाला तपाविशी वाटतात का? अमेरिकेतील खालील माहीती बघा:
- जून २००७ मधे चायनामधून येणार्या टुथपेस्टमधे "डायएथिलीन ग्लायकॉल" हे "ऍन्टीफ्रीज"मधले रसायन मिळाले जे शरीरात गेल्यास दुष्परीणाम भोगावे लागतील (ते दात-हिरड्यांच्या माध्यमातून सहज जाणार!)
- थॉमस या रेल्वे इंजीन खेळात लेडपेंट मिळाला. लेड पेंट हा विशेष करून ६ वर्षाखालील मुलांना चांगला नसतो आणि ही खेळणी ३-४ वर्षाची मुले जास्त वापरतात.
- अत्यंत तकलादू खूर्च्या की ज्यात बसल्यावर त्या पाठीशी मोडू शकतील आणि अर्थातच त्यात कंबरडे मोडू शकते.
- सीरॅमिक हिटर्स ज्यांची कॉर्ड तापल्यावर जळू शकेल (योग्य प्रोटेक्शन नाही)
- मे २००७, मधे "मंकफिश"च्या नावाखाली "पफर फिश" (अमेरिकेत) निर्यात केला. ह्या "पफर फिश"मधे टेट्रॉडोटॉक्सीन असते जे शरीरात गेल्यास गंभीर आजार अथवा मरण येऊ शकते.
- काचेच्या वस्तू ज्या हातातल्या हातात फुटू शकतात
- पाळीव प्राण्यांचे प्रदूषित खाद्य - ज्याने पाळीव प्राणी मरू शकतील
- लहान मुलींचे खेळातील दागीने ज्यात परत लेडपेंट सापडला
- आणि तरी संपूर्ण अमेरिका हा मेड इन चायनाच्या विळख्यात राहतोच आहे - कारण उठसूठ गोष्टी स्वस्तात होतात म्हणून मोठे उद्योग तिथून करून घेतात.
आता प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघायचा प्रयत्न होऊ लागला आहे. चायनाने पण या गोष्टी गंभीर घेऊन (निदान तसे दाखवून) त्यांच्यातल्या एका वरीष्ठ सरकारी अधिकार्याला लाच घेऊन दुर्लक्ष केल्याबद्दल ताबडतोब फाशीची शिक्षा सुनावून ती आमलात आणली! पण जेंव्हा असे प्रॉडक्ट्स अमेरिका सरसकट (लाखो/कोटींच्या आकड्यात) घेण्यास नाकारते, तेंव्हा ते अर्थातच भारतीय आणि इतर कमी "तपसाल्या जाणार्या" बाजारपेठांमधे येऊ शकतात.
यावर आपण तुर्त काही करू शकू का? व्यक्ती म्हणून एक गोष्ट नक्कीच करू शकतो, ती म्हणजे "मेड इन चायना" न घेणे. देशप्रेमासाठी (स्बदेशी) म्हणून नाही पण स्वतःच्या आणि मुलांच्या जीवासाठी म्हणून तरी....
Comments
कशी ओळखायची?
प्रत्येक बारीक सारिक मेड इन चायना वस्तूवर प्रामाणिकपणे मेड इन चायनाचा शिक्का असतो का?नसल्यास अशा वस्तू ओळखण्याची खूण काय आहे?
असायला हवा...
प्रत्येक बारीक सारिक मेड इन चायना वस्तूवर प्रामाणिकपणे मेड इन चायनाचा शिक्का असतो का?
बहुतांशी आयात केलेल्या वस्तूंवर तसा त्या त्या देशांचा शिक्का असतो. (एकदा तर मी अमेरिकेत , एका दुकानात "मेड इन मद्रास" असा शर्ट पाहीला होता!).
एक साधी काळजी म्हणजे जे काही खाद्य पदार्थ अथवा लहानमुलांची खेळणी घेतो, ती पाहून घेणे. दिवाळीत "मेड इन चायना" माळा स्वस्त आल्या म्हणून अनेकांनी घेतल्या आणि तसे त्यावेळेस (अमेरिकन पद्धतीने) गैर वाटले नसले तरी आता "सेफ्टी"च्या दृष्टीने पुनर्विचार करावा असे वाटते.
सी एन एन वरील हा दुवा आपल्याला मेड इन चायना कळते का ते तपासण्यासाठी पहा...
स्वस्तात मस्त.
विकासराव,
स्वस्तात मस्त मिळतं म्हणून मेड इन चायना घेणारे अनेक आहेत,दुष्परिणामाचा विचार कोण करतो,पण त्या वस्तू टिकणा-या नसतात हे कळू लागल्यामुळे आता त्याची खरेदी फारसी होतांना दिसत नाही. दिवाळीत "मेड इन चायना" माळा स्वस्त आल्या म्हणून अनेकांनी घेतल्या.दिसतच खास होत्या त्या माळा.:)
चंद्र अमेरिकेतला
एका ब्लॉगवर पूर्वी ही कविता वाचली होती. येथे चिकटवते.
Monday, April 23, 2007
चंद्र अमेरिकेतला
दारात उभी राहून चंद्र न्याहाळताना वाटलं,
अमेरिकेतला चंद्र कसा दिसेल?
लखलखत्या दिव्यांच्या साथीला
आकाशाची थोडीतरी किनार असेल?
लेकाला विचारलं," बाबा रे ,असतो तरी कसा तो ?
दिसण्याने त्याच्या जीव तुझा सुखावतो ? "
तर म्हणाला, "आई, खूपच दिवस झाले ग त्याला बघून,
शेवटचा भेटलो त्याला , तेव्हा भरवला होतास तू वरणभात ऊन ऊन.
आता बघावसं वाटल, तरी टाळतोच ती कल्पना,
वाटतं, कदाचित नसेल ना मागे शिक्का ' मेड इन चायना ?'
मूळ अनुदिनी
सही
असेलही कदाचित...
अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.
एकदम मस्त!
एकदम मस्त!
धन्यवाद
गरज!
वा विकासराव चांगली चर्चा!
भारताने आपली सीमा (ही पण एकप्रकारेअ देशाची सीमा राखणीच आहे!) प्रखरपणे राखायला हवी!
या चीनी आयातीवर वर काटेकोर नियम, कायदे नि निर्बंध हवेत. कदाचित ते आहेतही पण ते राबवणारे हात कुठे आहेत? ते तर टेबलाखाली आहेत ना?
यंत्रणा आहे पण अंमलबजावणी करणारे नाहियेत हो...
शिवाय आपल्या वाणीज्य नि परराष्ट्र खात्याचेही लक्ष हवे अशा प्रकारांकडे.
त्यांनी योग्य तो दहा वेळा गवगवा करुन ठेवायला हवा या प्रकरणांचा. भारत हे कदापी खपवून घेणार नाही हे जाहीरपणे वारंवार सागावे. असा माल मोठ्या प्रसिद्धीसह परत पाठवावा. या साठी माध्यमांचा चातुर्याने उपयोग करुन घ्यावा. जनमत बनवावे. याचा जागतिक मतावर निश्चित परिणाम होईल असे मला वाटते!
आपला
गुंडोपंत
हे पहा!
जरा गुगल केले तर असे दिसले की चीनी निर्यात हे चीन साठी उत्तर असले तरी जगासाठी मोठाच प्रश्न आहे!
हा बिझिनेस विक मध्ये आलेला लेख पहा...
आपला
गुंडोपंत
"मी चांगल्या प्रतीच्या आयात निर्यातीचे समर्थन करतो!"
(च्यामारी झाले का परत समर्थन सुरु???)
चांगला दुवा
या दुव्यात चांगली माहीती दिसतेय. आपली इंग्रजी प्रसार माध्यमे याला प्रसिद्धी देतील असे वाटत नाही, कारण बर्याचदा डावे लोक त्यांना जवळ असतात असे ऐकले आहे. आणि मग कर्तव्यापेक्षा भावना श्रेष्ठ होते...
चक्क भावना!
भावना आणी तीही चक्क कम्युनीस्टांना?
मोठा गंभीर प्रसंग आहे बॉ! ;)
मला वाटायचे की कम्युनीस्टांना फक्त कर्तव्यच असते! ;)
आपला
गुंडोपंत
मी (फक्त आपल्या फायद्याच्या) भांडवलवादाचे समर्थन करतो! ;)
डेटलाईन
एनबीसीच्या डेटलाईन या कार्यक्रमात गेल्या आठवड्यात काही चायनीज उत्पादक बनावट औषधे बनवून अमेरिकन बाजारात सर्रास विकतात असा एक कार्यक्रम होता. 'डिट्टो' जशीच्या तशी औषधे-पाकिटे बनवण्यात हे लोक अगदी तय्यार असल्याचे दाखवले होते. पाहिला का?
गुंडोपंतांनी दिलेला दुवा वाचून आठवले.
यात तर
आम्ही कसा पाहणार बॉ?
पण डुप्लिकेट म्हणाल तर आमचे उल्हासनगर (कोण उल्लासनगर म्हणंतंय ते? :) ) मागे नाही हां
हवी ती गोष्ट व्हर्जीनलच्या तोंडात मारेल अशी बनवतात! यांचे परफ्युम तर आता 'ओरिजिनल डुप्लिकेट' असेच विकले जातात म्हणे... नि त्या मार्केटवर भारताची अनिर्बंध सत्ता चालते.
काही दिवसांनी बहुतेक फ्रेंच अत्तराच्या कंपन्यपण आउट सोर्स करतील त्यांची निर्मीती! ;)
आपला
गुंडोपंत
सार्वजनीक वाहतुक व्यवस्था वापरतांना घामट वास येणार्यांनी डुप्लीकेट का होईना पण अत्तर वापरावे याचे मी समर्थन करतो!
हा हा हा :)
सार्वजनीक वाहतुक व्यवस्था वापरतांना घामट वास येणार्यांनी डुप्लीकेट का होईना पण अत्तर वापरावे याचे मी समर्थन करतो!
हा हा हा :):):)सही.
अवांतर :) उल्हासनगर मेड इन चायनाच काय ? कोणत्याही देशाच्या वस्तूची निर्मिती करु शकते म्हणे :)
डेटलाईन - दुवा
या माहीतीबद्दल धन्यवाद.
त्या कार्यक्रमाचा दुवा मिळाला आहे - लिखीत आणि दृक् श्राव्य माध्यमातील.
वाचले!
यातले बरेचसे खरे आहे!
असे निश्चितच घडत असणार... कुणाला माहीत आपणही कधीतरी ही खोटी औषधे खाऊन प्लासिबो एफेक्टने बरे ही झाले असू नाही का?
आपल्याकडेही मस्जिद बंदर जवळ पोत्यांनी हव्या त्या गोळ्या किलोवर मिळतात! चांगला राजरोस बाजारचह् आहे तेथे. अनेक नामांकित हॉस्पिटले, डॉक्टर्स तेथुन गोळ्या घेतातही असे ऐकले आहे! खरे खोटे 'मुंबईच्या माहितगार' तात्यांना माहीती...
आपला
गुंडोपंत
"औषधेच घ्यावी लागू नयेत यासाठी गुंडोपंत व्यायामाचे व ध्यानाचे समर्थन करतात!"
अमेरिकेतून मस्जिदबंदर
गुंड्याभाऊ,
हल्ली लोक म्हणतात की अमेरिकेचे काही अप्रूपच उरलेले नाही, पण म्हणून अमेरिकेतून डायरेक्ट मस्जिदबंदर?
पण अमेरिकेची सुरक्षायंत्रणा पार करून या गोळ्या पोहोचतातच कशा देशात म्हणतो मी?
- राजीव.
मेड (रूल्स) इन चायना - हसण्याची तयारी ठेवा..
बातमीचा स्त्रोतः लंडन टाइम्स (दुवा)
China tells living Buddhas to obtain permission before they reincarnate
चायना मधे आता तिबेटीअन पुनर्जन्म घेणार्या बुद्धांना चायनीज कम्यूनिस्ट सरकार कडून तसा तो पुनर्जन्म आहे /अथवा ठरवला आहे अशी परवानगी घ्यावी लागणार आहे! १४ भागांच्या या रेग्यूलेशनचे कारण आहे की ७२ वर्षीय दलाई लामांना पुनर्जन्म घेण्यापासून रोखणे!
हा हा हा
हा हा हा!!!
हसुन हसुन लोळलो... आता उठुन हे लिहिले...
लै म्हंजे लैच भारी आहेत बर्का चायनीज डोकी!
काय करतील भरवसा नाही... आता माओ च्या तिबेट मधल्या पुनर्जन्माची वाट पाहण्याशिवाय काय आहे? ;))))
आपला
गुंडोपंत चाऊ
लिव्हिंग विदाऊट मेड इन चायना
मागे एका चर्चेत मिलिंदरावांनी वरील नावाच्या पुस्तकाचा उल्लेख केला होता. एका अमेरिकन कुटुंबाने 'मेड इन चायना' चा शिक्का असलेली कुठलीही वस्तू वर्षभर खरेदी करायची नाही, असे ठरवल्यावर त्यांना जे अनुभव आले ते यात लिहिले आहेत. अधिक माहिती या दुव्यावर.
टेड कॉपल
टेड कॉपल यांचे या विषयावरील विश्लेषण आणि अमेरिकेची अगतिकता आज एनपीआर वरती ऐकायला मिळाली. वेळ मिळाल्यास ती येथे ऐका.