इतरांचे काय?

साधारण ऐंशीच्या दशकात बँकेतली नोकरी म्हणजे अगदी झकास होती. मग पुढे प्रोफेसर असणे झकास झाले. पण या मंडळीना स्थैर्य असले तरी इतर आणी स्थैर्य असलेले अशी आर्थीक दरी आवाक्या बाहेरील नव्हती. मात्र गेल्या काही वर्षात हे चित्र अगदीच बदलले आहे. भारतातले आय टी क्षेत्रातले पगार हे सर्व सामान्यांच्या विचारापलिकडले आहेत. सर्वसाधारण महिन्याला लाखभर पगार असणारे लोक हे अगदी सहजपणेच सापडतात असे दिसते आहे.
याचा इतर क्षेत्रांवर गंभीर परिणाम होतो आहे का? समाजाचे मानसिकताही विस्कटते आहे असे वाटते का?
दिसणार्‍या पगाराच्या आकड्यांनी आयटी साठी प्रवेशाचे झुंबड आहे.
तरुण मुली आयटीमधे(च) नवरा हवा अशा अटी घालत आहेत वगैरे वगैरे.
यातून साधारण समाजाचे सरळ सरळ दोन भाग पडत आहेत असे दिसते आहे.
काही वेळा आयटी हे पण सर्व साधारण सेवा क्षेत्रच आहे तेंव्हा त्यांचे पगारही कमी असावेत किंवा इतरांचे त्यांच्या बरोबरीचे असावेत अशीही ओरड ऐकु येते.

या मोठ्या दरीचा अजून एक परिणाम म्हणजे इतर क्षेत्रात काम करणारे लोक म्हणजे अगदीच 'हे' आहेत असे जाणवून दिले जाणे. यात माध्यामांनीही नकळत पणे भर घालत राहणेही जाणवते.

अशी मोठी दरी असणारे लोक खरच ही तसा करतात. याचा परिणाम राहणीमान आणी त्यांची मुले यावरही दिसुन येतो.

आपल्याला काय वाटते या विषयी?
पगार कशावर ठरावेत? याचे पुढे काय परिणाम होतील?
आयटी ची बूम किती वर्ष राहु शकेल?
(आयटी हे आयटी म्हणून कितपत शिल्लक आहे हा एक वेगळा प्रश्न आहे कारण अर्थातचे त्याचे इतर व्यवसायातले मिश्रण - इंटीग्रेशन)
रिटेलींग मध्ये येणारी बूम याची बरोबरी करणार आहे का?
वगैरे वगैरे...
मग ज्यांना पुढेही असाच पैसा मिलावा असे वाटते त्या तरूण मंडळींनी नक्की कोणत्या क्षेत्रात असावे?

--------
गुंडोपंत ही चर्चा विकासरावांच्या फ्रेंडशीप या चर्चेवरून सुरु करत आहेत.
गुंडोपंताचा व्यक्तीशः जास्त पैसे मिळ्वण्याला कोणताही विरोध नाही. पण सामाजिक दरीचा विचार अपरिहार्य आहे असे वाटते. भविष्यविषयक मार्गदर्शक विचारांचे (फ्युचरिस्टीक थॉट) स्वागत आहे!
यात व्यवसायांचे भविष्यातील स्वरूप व नोकर्‍या यावरही उहापोह चालेल.

Comments

हा तक्ता पहा

हा तक्ता पहा

यात आयटी - सॅप मधले पगाराचे सर्वसाधारण आकडे आहेत.
अर्थात मॅनेजर्स नि प्रोजेक्ट लिडर्स चे पगार जास्त आहेत पण निव्वळ प्रोग्रामर्स मात्र यथातथा आहेत. हे फक्त आयटी चे आकडे आहेत. पण या साईटवर बहुदा इतर पगारही मिळावेत असे दिसते.

आपला
बिन पगारी फुल अधिकारी
गुंडोपंत

इतरांचे हाल ?

चर्चा प्रस्ताव सहीच आहे.
आय टी क्षेत्रातील तज्ञांना जर त्यांच्या कौशल्यामुळे लाखभर पगार मिळतो,त्याबद्दल तर आम्हाला बोलायचेच नाही,आम्ही विचार करत आहोत,इतर क्षेत्रातील नौकरीबद्दल,हे दोन तीन क्षेत्रे सोडली तर, इतके पगार कुठे आहेत ? असेल तर महिनाभर दहा हजाराच्या आत कमावणा-यांची संख्या जास्त भरेल त्याचे प्रमाण २०ते४०% टक्के असेल,हेही आम्ही जास्तच सांगितले वाटते !
खरे तर याच्यावर जोरदार चर्चा झालीच पाहिजे,पण नेहमी प्रमाणे हसत खेळत.

अवांतर :-पंत या चर्चाप्रस्तावाचा प्रतिसाद लिहितांना ६० रुपये पुरुषाला,आणि ४० रुपये रोज स्त्रीला,हे काही डोळ्यासमोरुन जात नाही राव ! कधी कधी उपक्रमवर आम्ही फारच बॅकवर्ड विचाराचे वाटतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो ते ही आहेच!

६० रुपये पुरुषाला,आणि ४० रुपये रोज स्त्रीला,हे काही डोळ्यासमोरुन जात नाही राव !

मान्य आहे हो! इमारत बांधकाम - इथे तर राजरोस इतका मोठा अन्याय होतोय - न कुणाला गम ना पस्तावा! बिचार्‍या बायका पुरुषां इतक्याच उन्हातान्हात राबतात - त्या कधीच गवंडी मात्र होत नाहीत. त्यांच्या लहान मुलांना खेळायला जागा नसते. अगदी वैयक्तीक बाबी पण उघड्यावर किंवा अडोसा मिळेल तेथे उरकाव्या लागतात. मुकादमांकडून लैगिक शोषण तर असणारच!
माझे मत आहे की येथे सरकारने कमीत कमी रोजंदारीच्या कमीतकमी दराची अंमल बजावणी होईल हे पाहणे अत्यावश्यक आहे. मात्र या साठी लागणारे यंत्रणा अगदीच ढिसाळ नि तुटपुंजी आहे.
हे चित्र फार फार निराशाजनक आहे... कुठे ते २० -२० लाख पगार नि कुठे "बाईला ४० मिळन याचं त या नाय तर् जावा!"
हे काम तरी बरे पण तात्यांनी दिलेल्या रौशनीच्या लेखातही वेश्यांना मिळणारे तुटपुंजे पैसे नि होणारे हाल हा उल्लेख होता मन हेलावून टाकणार होता.

"ते त्यांचे नशीब" म्हणून आपण झटकून टाकू शकत नाही हे वास्तव. शेवटी आपल्याच समाजाचा एक भाग आहेत ही माणसे. केवळ आपली जमीन धरणाच्या पाण्यात गेली नाहीये नि आपण उघड्यावर आलो नाही, म्हणून 'आपण' तेथे नाही इतकेच.

आपला
व्यथीत
गुंडोपंत

एक काळजी...

आय टी त जास्त पैसे मिळतात कारण आत्ता त्याला भाव आहे. तो राहीला म्हणून एका अर्थी काही बिघडणार नाही (यात मी समजीक विषमता हा विषय बाजूला ठेवत आहे) . जे आय टी मधे प्रोफेशनल्स आहेत त्यांना आजच्या बाजारातील भावाचा फायदा होत आहे आणि मुक्त अर्थव्यवस्थेत त्यात काही चूक नाही . उद्या जरी मागणी कमी झाली तरी अशा शिकलेल्यांना स्वतःला सांभाळणे फार अवघड जाईल असे वाटत नाही. कारण ते त्यांच्या क्षेत्रात कष्ट करत वर येत आहेत/आलेत.

पण आय टी म्हणत आजच्या तरूण पिढी चा एक भाग जो कॉल सेंटरची कामे करतोय, त्यांचे प्रकरण वेगळे वाटते. मला लांबून वाटणारे जर बरोबर असेल तर अशी मुले-मुली ना धड पुढे शिकतात ना एक इंग्रजी फाडफाड बोलणे सोडल्यास व्यक्तिमत्व विकास करतात (अपवाद अर्थातच असणार). त्यात इतरांपेक्षा जास्त पैसे मिळाल्यामुळे उगाच स्वतः च्या शहाणपणा बद्दल अवास्तव कल्पना झाल्या आहेत. त्यात स्वैराचार वाढत असल्याच्या आणि त्यामुळे अनेक चैनीच्या सवयी लागण्याचे प्रकार या दुसर्‍या प्रकारातील लोकांना जास्त आहे. उद्या ही मुले-मुली जसजशी मोठे होतील आणि जशी ही कामे इतर (भारताहून खालच्या) विकसनशील देशात जाऊ लागतील तेंव्हा एक पिढी म्हणून यांचे काय होईल आणि त्याचे सामाजीक परीणाम काय असतील हा एक प्रश्न आहे. तो विशेष करून भारतातील काही शहरी भागात जास्त अनुभवायला येणार आहे असे वाटते. ("तुम्हाला निवृत्त होताना जो पगार आहे, त्याही पेक्षा जास्त मला आत्ता पहीला पगार मिळतोय" असे एका कॉलसेंटरवाल्या चिरंजीवाने आपल्या जन्मदात्याला सांगीतले/सुनावले. आता ते बोलण्यात माज होता का अभिमान ते माहीत नाही, जीवनाबद्दलचे अज्ञान नक्कीच असावे असे वाटले)

इतरांचे काय?

विषय चांगला आहे. पण माझे काही प्रश्न आहेत.

  1. आपल्याला आय टी. म्हणजे नक्कि कोण म्हणायचे आहे? से स्पष्ट केल्यास जास्त उहापोह करता येइल.
  2. इतरांचे काय? हा भारतात प्रत्येक क्षेत्रात विचार करण्याचा प्रश्न आहे. फक्त कमाइ पुरता मर्यादित आहे का?




मराठीत लिहा. वापरा.

उत्तरे

आपल्याला आय टी. म्हणजे नक्कि कोण म्हणायचे आहे?

अर्थातच जे लोक सर्वसाधारण पणे सत्यम, इन्फोटेक, टीसीएस सारख्या ठिकाणी काम करतात. साधारण पणे संगणकाधारीत चरीतार्थ चालवतात पण मी यात हार्डवेयरवाले धरत नाहीये. पण काही प्रमाणात नेटवर्क व सिक्युरीटीवाले मात्र आहेत. याध्ये मोठ्या प्रमाणात चालणारे भारतात इन्सोर्स होणारे सॉफ्ट डेव्ह. चे काम अध्यारूत आहे.(हे सगळे बरोबर आहे का? मलाच कळत नाहिये हे मी योग्य रीतीने मांडतो आहे की नाही ते! :( आशा आहे मथितार्थ घ्याल!)

(दुसरा प्रश्न नीट कळला नाही बॉ!)
भारतात सगळीकडे विषमता असली तरी ती आयटी व इतर क्षेत्रे यात जाणवण्याजोगी स्प्ष्ट आहे असे वाटते. त्यामुळे येणारी दरी व इतर प्रश्न असे स्वरूप आहे. मात्र 'पुढे काय असणार' याविषयक विवेचन वाचायला आवडेल. कोणते क्षेत्र पुढे जाईल? का? कोणते नाही जाणार वगैरे
कुठे कौशल्याचा (स्किल्स चा) दुष्काळ नि कशात सुकाळ आहे/पुढे असु शकेल हे ही वाचायला आवडेल.

आपला
अकुशल मनुष्यबळाच्या लोंढ्यातला एक बिंदु
गुंडोपंत

सविस्तर

गुंडोपंत आता जरा सविस्तर लिहितो.
मुळातच आय. टी. याचा आपल्याकडे जास्त बोलबाला आहे. कारण रग्गड पगार दिसतात. पण अगदि खोलात जाउन विचार केल्यास असे दिसुन येइल कि मुळातच आय. टी. संबंधीत नोकरी यात बरीच विषमता आहे.
माफ करा पण तुमची आय टी चे व्याख्या फारच तोकडी वाटते आहे. संगणाकाधारीत म्हणले तर इतके उद्योग आहेत आणि त्यात इतका पैसा आहे कि तो एक वेगळा चर्चेचा मुद्दा होईल. तसेच हा पैसा मिळवण्यासाठी लागणार्‍या निकषांमध्ये सुद्धा मोठी दरी आहे. आपण म्हणता आहात ती दरी निर्माण होण्याचे एक कारण हे सुद्धा आहे.
आता मोबदला म्हणलात तर काही मुद्दे देतो, त्या बद्दल तुमचे मत स्वागतार्ह आहे. उदाहरणातले आकडे खरे नाहीत. पण जवळपास हेच असावेत असे वाटते.
टाटा मोटर्स हल्ली तरूण अभियंत्यांना ४ लाख पगार देते. काम - वाहन निर्मीती मध्ये सहभाग. कामाची वेळ सकाळी ८ ते सध्याकाळी ५ जास्तीत जास्त ६. सुट्टी: एकच दिवस- गुरूवार.
इतर संगणकाधारीत काम करणारी कंपनी : तरूण अभियंत्यांना ४ लाख पगार देते. काम - पल्याड बसलेल्या वरिष्ठ अभियंत्या सोबत फोन वर बोलुन तो सांगेल ते काम यात खास करून आज्ञावल्यांचा काही भाग तयार करणे वा केलेली प्रणाली तपासणे. कामाची वेळ : सकाळी ८/९ ते संध्याकाळी माहित नाही. सुट्टी: कागदावर २ दिवस - शनिवार - रविवार. पण कामाच्या रेट्यामुळे नक्कि किती आणि कधी माहित नाही.

यात दरी आहे का? असल्यास कुठे? खरतर दरी आहे. मला मान्य आहे. पण कसली दरी या बद्दल मतभिन्नता भरपूर असेल.

मुळातच आपण ज्याला दरी म्हणतो आहोत ती भावना आहे. ज्यांना मिळत नाही त्यांना हेवा वाटतो. ज्यांना योग्यता नसताना पैसा मिळतो त्यांना कुठे तरी मस्ती कुठे तरी अपराधी भावना असते. परत आज भारतात हा पैसा येतो आहे तो भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा नक्कि किती भाग आहे? येतो तो पैसा जास्त वाटतो कारण मोबदला डॉलरमध्ये मिळतो आहे. डॉलरची घसरण दिसते आहे. अर्थात तफावर खुप कमी होण्यास खुप काळ आहे. तसेच हा संगणक क्षेत्रातला हा पैसा मुख्यत्वे सेवा पुरवून मिळतो आहे. कोणते उत्पादन विकुन नाही. उद्या जर बाहेरच्या देशांना आमच्या कडून मिळणार्‍या सेवा काहि कारणांमुळे नको वाटल्या वा परवडेना झाल्या तर या इतर नसलेल्यांचे काय? त्यांना एवढाच पैसा नेहमी मिळवत रहाता येइल का? तसेच डॉलरच्या घसरणीमुळे कंपन्यांच्या नफ्यावर तात्काळ परिणाम होणार आहे. कंपन्या फायदा मिळवायला धंदा करतात, कर्मचार्‍यांचे भले करायला नाही. त्यामुळे भविष्यात पगार वाढीचे प्रमाण नक्किच कमी राहणार आहे. कुठे तरी हि दरी भरून येणार आहेच. तसेच तुलनेने काम जास्त आणि पगारवाढ कमी मिळाल्यास, योग्य तो मोबदला, कामाचे समाधान आणि कुटूंबासाठी वेळ असे मिळवण्याकडे लोकांचा प्रामुख्याने कल राहिल असे वाटते. भले ही मग उद्या एखादा माणूस संगणकाधारीत काम करेल पण त्याचे काम हे एका बांधकाम क्षेत्रातला एक संगणकाधारीत कामातला सहायक म्हणून असेल.





मराठीत लिहा. वापरा.

कुटूंबासाठी वेळ

कारण रग्गड पगार दिसतात.
हो तेच कारण आहे ना...
तुमची आय टी चे व्याख्या फारच तोकडी वाटते आहे.
मी ते शब्दात बांधु शकलो नाही हे म्हंटलेच होते हो!

टाटा मोटर्स हल्ली तरूण अभियंत्यांना ४ लाख पगार देते....इतर संगणकाधारीत काम करणारी कंपनी : तरूण अभियंत्यांना ४ लाख पगार देते.
संगणकाधारीत काम करणारी कंपनी मधला तरुण लवकरच म्हणजे २-३ वर्षात अजून पुढे असेल नाही का?
टाटा वाला मात्र बसेल तिथेच तेच नटबोल्ट फिट करत (अर्थात यात वैयक्तीक रीत्या लोक आपली प्रगती साधणारच आहेत यात शंका नाही फक्त संगणकवाल्याला जास्त चॉईस असावा! )
मुळातच आपण ज्याला दरी म्हणतो आहोत ती भावना आहे.
क्या बात है!
तसेच हा संगणक क्षेत्रातला हा पैसा मुख्यत्वे सेवा पुरवून मिळतो आहे. कोणते उत्पादन विकुन नाही.

हे मत मी मागेही मांडले आहेच... अपवाद फक्त फ्लेक्स वाल्या घैसासांचा!
यात खुप वाव आहे यात शंका नाही पण तसे प्रॉडक्ट बनवायला तशी मानसिकता हवी! जी नेमकी जर्मनीत निघाली नि त्यांनी सॅप बनवुन मा.सॉ. मागे टाकत जगाल विकले... आज ६०% जग त्यावर चालते असं म्हणतात (मला माहिती नाही ऐकीव माहीती...)

उद्या जर बाहेरच्या देशांना आमच्या कडून मिळणार्‍या सेवा काहि कारणांमुळे नको वाटल्या वा परवडेना झाल्या तर या इतर नसलेल्यांचे काय? त्यांना एवढाच पैसा नेहमी मिळवत रहाता येइल का?

हा मोठा मुद्दा आहे. भारताचा परदेश वणिज्य विभाग किंवा मोठ्या कंपन्या यावर काय धोरणे आखतो आहे हे समजले तर चर्चेला अजून दिशा मिळेल!
योग्य तो मोबदला, कामाचे समाधान आणि कुटूंबासाठी वेळ असे मिळवण्याकडे लोकांचा प्रामुख्याने कल राहिल असे वाटते.
हो असे असावे खरे!
कुटूंबासाठी वेळ हा मुख्य मुद्दा बनेल यात शंका नाही...

आपला
गुंडोपंत

मानससिकता...

संगणकाधारीत काम करणारी कंपनी मधला तरुण लवकरच म्हणजे २-३ वर्षात अजून पुढे असेल नाही का?
टाटा वाला मात्र बसेल तिथेच तेच नटबोल्ट फिट करत

या मागची मानसिकता कळली नाही. जर अभियंता म्हणून पाहिले तर टाटा मोटर्स (हे उदाहरण घेतले आहे कारण भारतात स्वयंपुर्णतेने चारचाकी बनवणारी कंपनी म्हणून) मध्ये कोणता अभियंता असेब्ली लाईनवर जाउन नट बोल्ट लावतो असे मी पाहिले नाही. तसेच संगणका समोर बसुन करायचे काम सोडून बाकिची तुच्छ असे का बरे? अभियंता हा एक व्यवस्थापक असतो अथवा किंमतीचे आणि वेळेचे बंधन असेलेला शास्त्र्ज्ञ. या उलट दुससरी टाटा कंपनी (टि सी एस) वा इतर आघाडीच्या आणि संगणक क्षेत्रातल्या कंपन्या कमी पगारात मिळणारे संगणकिय कामगार तसेच जास्त काळ टिकतील म्हणून बिगर अभियांत्रीकीचे शिक्षण घेतलेले लोक सुद्धा घेत आहेत.
तुमच्या वरील वाक्यातील "संगणकाधारीत काम करणारी कंपनी मधला तरुण लवकरच म्हणजे २-३ वर्षात अजून पुढे असेल नाही का?" हे समजावून सांगाल का?
तसेच विसुनानांनी खाली लिहिलेली उदाहरणे सुद्धा बरीच बोलकी आहेत.





मराठीत लिहा. वापरा.

मान्य!

प्रतिसादातला तो भाग उगाचच कुजकट झाला! माफ करा!
पण मला असे म्हणायचे होते की संगणकांत सध्य मिळणारी संधी उत्तम आहे इतकेच!
बाकी मान्य!

आपला
गुंडोपंत

संधी

संधी कधी आणि कोणती पकडायची हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. आधी डोगर चढायचा आणि मग दरी पाहायची कि आधी दरी मग डोंगर? कि सरळ सुरक्षित मार्ग? शेवटी प्रत्येकाचा आपला मार्ग आहे. सगळे जातात म्हणून आपण पण त्याच मार्गाने आंधळेपणाने जायचे का? जायचेच तर पुर्ण विचाराने जावे असे आमचे वैयक्तिक मत आहे.
तुम्ही माझ्या दुसर्‍या प्रश्नाला बगल दिली आहे. त्याचे उत्तर दिले तर आणखी बोलता येइल.





मराठीत लिहा. वापरा.

कोणता बॉ?

कोणता बॉ दुसरा प्रश्न?
म्या अडाण्याला सांगा बुवा जरा समजावून!

आपला

गुंडोपंत

हम्म्

चर्चाविषय छान आहे. म्हणला तर तसा काही विशेष नाही , सोपा आहे आणी म्हणला तर जरा क्लिष्ट् आहे.
सध्या मी जरा इतरांचे काय?..इतर क्षेत्रात काम करणारे लोक म्हणजे अगदीच 'हे' ... ह्यावर बोलतो.

सोपा असा की हे तर जगाच्या इतिहासात कायमच घडत आले आहे. जास्त "मोबदला, रक्कम, पैसा" मिळवणारी, असणारी जनता नेहमीच मोजकी असते. आजही असेच आहे, असे वाचल्याचे आठवते की जगातील २०% लोकांकडे जगातील ८०% संपत्ती आहे. पुर्वी काय बरे कमाईचे मार्ग होते? राजघराणे, जमीनदार, धर्मसत्तेतील नियंत्रक, हे लोक पैसा राखून होते बाकी बारा बलुतेदार.., नोकर, (मुख्य सैनीक अन शेतकरी / शेतमजुर)

पण बदलत्या जमान्यात लोकशाही, समानता, संधी (भांडवलशाहीच्या नावाने कोणी किती नाक मुरडो पण खुप जणांना स्वःताचे आयुष्य बदलायची संधी दिली.)कितितरी लोकांना वाव मिळाला, आम जनतेला पैसा बर्‍यापैकी मिळू लागला आहे. काही वर्षापुर्वी बँकेतल्या लोकांबद्दल, (मग पुढे प्रोफेसर :-)) हेच बोलले गेले असेल. सध्या आयटी वाल्यांबद्दल..माझ्यामते तरी नो बिग डील, हाच "आयटी "चा पैसा असा येतो आणी नवीन घर हप्ता, रिक्षाच भाड, मोबाईल आणी फ्रेंडशीपबँड संपला बघा...:-) महागाई बघीतली ना म्हणजे खेळतोय की हा पैसा "इतर लोकांकडे"(मान्य कमी आधीक प्रमाणात पण इतरांकडे पण जातोय हे नक्की)

कलाकारांना केवढा पैसा मिळतोय जो तो करोडो किंवा भरपुर् लाख, (आता दुवे सापडत नाही पण रेडीफ आदीवर वाचले आहे) नुस्ते बिनिचे कलाकार नाही तर नवीन टीव्ही कलाकार, काल पर्यंत आईवडीलांची कसे होणार (ह्याचे / हिचे) अशी काळजी असलेली पण छान नाचू, गाऊ शकणारी तरूण मुले जी स्पर्धेत जिंकतात, नवीन शास्त्रिय संगीतवाली, खेळाडू मंडळी, किती नवीन ड्रेसडिझायनर मंडळी, खोर्‍याने पैसा ओढणारे ज्योतिषी, वास्तुशास्त्र तज्ञ , फेंगशुई तज्ञ, अहो सरकारी नोकरांनापण पाचव्या पे कमीशन नंतर वाढलाच की... जितकी नवीन क्षेत्रे येतील, लोक मेहनतीने त्या संधीचा लाभ घेतील त्यांना तो लखलाभ होईलच.

समाजाचे मानसिकताही , राहणीमान आणी त्यांची मुले
हा त्या समाजाचा आणी ज्यांची तसली मुले त्यांचा प्रश्ण् :-) समाज आणी इतर लोक ह्यांचा विचार शहरातील कोणी करत नाही. ज्याला लहानपणा पासुन इतरांना अगदीच 'हे' अस वागवायची शिकवण मिळाली आहे ते असेच समजणार. ज्यांना योग्य शिक्षण मिळाले ते असे करणार नाहीत. कुठल्याही समाजात कायमच कुठेना कुठे विषमता असते.

तरुण मुली आयटीमधे(च) नवरा हवा अशा अटी घालत आहेत वगैरे वगैरे
सरासरी विचार केला तर आयटी क्षेत्रात काम करणारी खुपच कमी मंडळी आहेत जेव्हा भारतातील सर्व "यंदा कर्तव्य आहे"मंडळी मोजली तर, बरीच आयटी वाली मंडळी आपापसात करतात :-) झाल.. मला नाही वाटत इतर मुलींची लग्नच नाही होत. होतात की त्यांची पण "इतर लोकांशी" अगदि असा हट्ट धरला तर गैर काय, जास्त पैसा, परदेशवारी अशा गोष्टी त्या मुलीला वाटल्या आवडीच्या तर..

बाकीची दरी बिरी जी काही आहे त्याचे असे आहे की प्रत्येकाने आपापली दरी , डोंगर, स्वःता पार केली पाहीजे. स्वःता मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही. जर आयटी मधे संधी आहे, पैसा आहे तर् या लाभ घ्या, आयटी ने जो पैसा आणलाय तो आयटी लोकांना हव्या त्या सेवा पुरवून काढा की त्यांच्या कडून.. कोणाला बंदी नाही, आणी नुस्ते आयटी कडे आसुयेने बघत राहीले तर त्यांचेच नुकसान... कल्पकता, मेहनत, धाडस, उद्योजकता ज्याच्याकडे असेल तर तो कुढेही पैसा मिळवेलच.

बाकी एक मुद्दा म्हणजे आयटी व वर उल्लेख केलेली मंडळी ही मुख्यता शहरात आहेत जेथील लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणात पायाभुत गरजा वाढत नाही. मग जादा मागणी कमी पुरवठा.. गोष्ट् महाग. तसेच लोकांच्या मागण्या, गरजापण वाढल्या आहेत म्हणून खर्च पण जास्त. (लहानपणी मी शाळेत, बाहेर "सपाता" घालायचो बरीच मुले घालायची.)

बेसीक खाणे, (गहू, डाळ, तांदूळ, भाजी) (सार्वजनीक वितरण व्यवस्था, रेशन हो..) एक साधे घर, सार्वजनीक वाहतुक सेवा, किमान शिक्षण ह्या गोष्टी तरी नाही रे वर्गातील लोकांना परवडाव्या अशा सरकारने वाजवी दराने उपलब्ध करुन द्या. तसे थोडेफार देत पण आहे म्हणा सरकार. बाकी जे काय विकायचे किंवा विकत घ्यायचे हे विकणारा, घेणारा ठरवेल.

शेवटी काय सर्वांच्या मुलभूत गरजा भागल्या की झाले. कोणी कितीका कमवेना.

असो जरा विस्कळीत वाटला हा प्रतीसाद तर तो माझाच दोष. मी आपले एक विशीष्ट क्षेत्र, कमाई, सामाजीक काहीतरी ह्या धाग्यात अडकलो.

वा सहजराव!

जर आयटी मधे संधी आहे, पैसा आहे तर् या लाभ घ्या, आयटी ने जो पैसा आणलाय तो आयटी लोकांना हव्या त्या सेवा पुरवून काढा की त्यांच्या कडून.. कोणाला बंदी नाही, आणी नुस्ते आयटी कडे आसुयेने बघत राहीले तर त्यांचेच नुकसान... कल्पकता, मेहनत, धाडस, उद्योजकता ज्याच्याकडे असेल तर तो कुढेही पैसा मिळवेलच.

वा सहजराव मस्त मुद्दा आहे हा!

आवांतरः
पण मग मी पुढे अजुन माय्क्रोस्कोपिककली सांगा की नक्की कशा प्रकारच्या सोई हव्या आहेत बरं?
मला सुचलेली कल्पना अशी होती की - चांगल्या प्रतीचे पाळणाघर (पुर्ण प्रशिक्षित सेवक सेविकां व वयानुसार मुलांसाठी योग्य तो करिक्युलमसह) व सर्व प्रकारच्या वैद्यकीय सोई असणारे वृद्धाश्रम बांधणे हा उत्तम व्यवसाय आहे. मुले व आईवडील ही दोन टोकांची मिळवणी आयटी मधल्या लोकांची त्यांच्या लाईफस्टाईल व कामाच्या गरजेमुळे आजच्या पीढीची अत्यंतिक गरज बनली आहे.

आपल्याला काय वाटते?

आपला
फालतु कल्पना लढवत बसणारा
गुंडोपंत

पैसा पसरत आहे.

आय.टी. मध्ये येणारा पैसा इतर क्षेत्रात पसरत आहे. तसेच भारताची आर्थिक भरभराट होत आहे. त्यामुळेच चलनवाढ होत आहे.
उदा. -
१. अन्नधान्य, दूध,भाज्यांचे दर वाढले. उत्पादकांचे उत्पन्न वाढले.
२. घरे अणि फ्लॅट्स च्या किमती वाढल्या.
३. चाळीस अणि साठ रुपये रोजंदारीवर आता कोणत्याही क्षेत्रात माणसे मिळत नाहीत. शेतमजूर १५० रुपये रोजी घेतो. (शेतकर्‍यांना विचारा.) बांधकामाला मिस्त्री मिळत नाहीत.(दुसरं लै काम हाय. असलं बारकं (१०,००० रु. किमतीचे) काम घेयाला परवडत नाही.)
४. मोलकरणी आता एका तासाच्या कामाचे महिन्याला किमान ५०० रुपये घेतात. (स्त्रीवर्गाला विचारा.)
५. अनेक क्लासेस आणि प्रायव्हेट इंस्टिट्यूटमध्ये शिकवणार्‍यांचे पगार २० -२५ हजार रुपयांवर पोचले आहेत. ( माझ्या शेजारी रहाणार्‍या एका प्रोफेश्वराला महिना साठ हजार रुपये पगार आहे. तो बारावीला /आय.आय.टी. कोचिंगला शिकवतो.)
६. ऑटोमोबाईल, इन्स्ट्रुमेंटेशन, मेक्यानिकल, केमिकल इंजिनियरचे पगार २५ ते ३० हजारांपर्यंत आहेत. चांगल्या कंपन्या तर आय.टी. इतकेही पगार देतात.(पुण्याच्या प्रसिद्ध काँप्रेसर कंपनीत इंजिनियरला ७० हजार रुपये पगार मिळतो.) या क्षेत्रातील कामगारांनाही आता सरासरी दहा हजाराच्यावर पगार मिळतो.
७. मॉलमध्ये विक्रेत्याचे काम केल्यास दहा हजार रुपये पगार मिळतो.
८. साधा एम्.बी.बी.एस्. डॉक्टर एका वेळच्या तपासणीचे ५० ते १०० रुपये घेतो. स्पेशालिस्ट्स् तर सोडाच. पुन्हा पूर्वीसारखा केसपेपर प्रकार नाही. प्रत्येक वेळी नवी फी.
९. साध्या मराठी टी.व्ही. मालिकांत काम करण्याचे एका भागाचे पाच ते दहा हजार रुपये मिळतात. (जुनी माहिती.) अक्षयकुमार या नटाने(?) एका चित्रपटासाठी ११ कोटी रुपये घेतले असे नुकतेच वाचले.
१०. सरकारी खात्यात काम करणारी मंडळी लाखो रुपये मिळवतात असे ऐकले.

आता पगार कुणाला कमी आहे? हे जरा बारकाव्यांनिशी कळले तर बरे होईल.

ता.क. मी तुम्ही व्याख्या केल्याप्रमाणे आय्.टी. मध्ये काम करत नाही याची कृपया नोंद घ्यावी.

व्याख्या!

ता.क. मी तुम्ही व्याख्या केल्याप्रमाणे आय्.टी. मध्ये काम करत नाही याची कृपया नोंद घ्यावी.

माझी व्याख्या पुर्ण नाहीये, किंबहुना मी तशी करु शकलो नाही... तुम्ही मदत करा ना!

बाकी तोच पैसा समाजात झिरपतो आहे हे मान्य आहे. एकुणच राहणीमान सुधारले आहे हे ही खरे आहे. पण त्यात नक्की आकडेवारी कळली तर बरे होईल. कुठे मिळू शकेल?
माझा मुद्दा फक्त आयटी हे काही तरी विशेष आहे हा भेदभाव असण्याचा आहे.

१०. सरकारी खात्यात काम करणारी मंडळी लाखो रुपये मिळवतात असे ऐकले.

सही!!! नुसते पाटबंधारे, महापलिका जकात, नगर विकास आराखडा विभागात किंवा पिड्ब्ल्युडी मध्ये आहे असं सहज म्हंटलं तरी मला माणसाच्या मागे उभा असलेला भव्य बंगला, तगडे दागदागिने नि नवी कोरी गाडी दिसते... ;)

आपला
सायकलवाला
गुंडोपंत

तापमान वाढलेले वाटते.

विसुनाना,
चार महानगरातील तापमान अंश सेल्सीयस मधे असे होते,त्या प्रमाणे आमच्या नगराचे महागाई चे तापमान आम्ही सांगितले,बाकी आपल्या शहराचे तापमान जरा वाढलेले वाटते १५० रु शेतक-यांना रोज मिळतो, हे विदर्भाच्या शेतक्-यांना कोणीतरी सांगितली पाहिजे असे वाटते. नक्की आत्महत्या कमी होतील.;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेतकर्‍यांना नाही - शेतमजूरांना...

अंबाजोगाईच्या माझ्या मित्राच्या शेतात शेतमजूरांची कमतरता असून ते रोजी १५० रु. देत आहेत.
नपेक्षा एका शेतकर्‍याच्या घरातली मंडळी दुसर्‍या शेतकर्‍याच्या शेतात आणि या उलट राबतात आणि पैसा वाचवतात.
शारिरीक श्रमांचे 'ईर्जिक'!!
शेती परवडत नाही याचे हेही एक कारण आहे.

आपल्या शहराचे तापमान जरा वाढलेले वाटते
एकूणच वैश्विक औश्मिकरणाचे आणि वैश्विक अर्थव्यवस्थेचे दुष्परिणाम काहीतरी गरम करतातच.
वातावरण नाहीतर अर्थकारण.

विदर्भाच्या शेतक्-यांना
शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा एक वेगळा विषय आहे. त्यावर असे उडत-उडत भाष्य करता येणार नाही.

वैश्विक औश्मिकरण !

एकूणच वैश्विक औश्मिकरणाचे आणि वैश्विक अर्थव्यवस्थेचे दुष्परिणाम काहीतरी गरम करतातच.
वातावरण नाहीतर अर्थकारण.

सही ! :)))
शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा एक वेगळा विषय आहे. त्यावर असे उडत-उडत भाष्य करता येणार नाही.

शारिरीक श्रमांचे 'ईर्जिक'!! आणि १५० रुपये.याचाही या प्रश्नाच्या संदर्भात उपयोग होईल.
पण आता विषयांतरामुळे ते टाळतो आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सापेक्ष

आता ही दरी आयटी व इतर यांमध्ये जाणवत आहे..आम्ही लहान होतो तेव्हा 'बॅंक/पोस्ट' व इतर यामधे असेल..त्याच्यानंतर 'अभियंते' व 'इतर' यामध्ये असेल. दरी आहे हे कबूल, त्याबद्दल वाईटही वाटते पण आर्थिक स्तरांतील फरक हा समाजव्यवस्थेचा भाग नेहमीच असावा(म्हणजे असेल).
आणि 'आयटी' म्हणजे बक्कळ पगार ही संकल्पना हळूहळू कमी होत आहे. इतर क्षेत्रे, विशेषतः व्यवस्थापन आणि उत्पादन, यांत्रिकी यातील पगारही वाढत आहेत. परकीय चलनात पैसे मिळत असल्याने ते मोठे दिसणे हाही भाग आहेच. रुपया सबल होतो तसतशी ही दरी नाहीशी नाही झाली तरी कमी नक्की होईल असे वाटते.
'आयटी मधले नवरे हवे' किंवा 'ग्रीनकार्डवाले नवरे हवे' हा पवित्रा सध्या असला तरी आयटीतील प्रश्न, ग्रीनकार्डवाल्या काही नवर्‍यांची परदेशात दुसरीबरोबर लिव्ह इन नाती अशा केसेस ऐकून वधूपितेही डोळे उघडे ठेवून मुले शोधत आहेत असे वाटते.

खुप बरे होईल

काही नवर्‍यांची परदेशात दुसरीबरोबर लिव्ह इन नाती अशा केसेस ऐकून वधूपितेही डोळे उघडे ठेवून मुले शोधत आहेत असे वाटते.

वधुपित्यांनी जरा डोळे उघडे ठेवून जर विवाह जमवले तर परदेशांतच काय इथेही अनेक मुलींची आयुष्ये सुधारतील यात शंका नाही...

बाकी 'लिव्ह इन नाती' ही टर्म सही!!! :)

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र म्हणे!)

रुपया होतोय की

रुपया सबल होतो तसतशी ही दरी नाहीशी नाही झाली तरी कमी नक्की होईल असे वाटते.


रुपया सबल होतो आहे की फक्त डॉलर घसरतो आहे?
इतर चलनांबरोबर काय स्थिती आहे नक्की? चीनी युआन व युरो ची स्थिती काय आहे?
हा पण चिचारात घ्यायचा मुद्दा आहे!
आपला
चलनी
गुंडोपंत

एकंदरीत..

चर्चा आणि प्रतिसाद वाचून आम्ही धंदेवाले बरे असे म्हणावेसे वाटते! आपणच नोकर आणि आपणच मालक! :)

त्यामुळे जे काही उत्पन्न होईल त्याला आपणच जबाबदार. कमी कष्ट कमी पैसा, जास्त कष्ट जास्त पैसा एवढं साधंसुधं गणित आमच्या विम्याच्या आणि शेअरबाजाराच्या (कन्सल्टंसी) धंद्यात आहे. कुणी तिसरी व्यक्ति आमचं मासिक उत्पन्न ठरवू शकत नाही याचं एकंदरीत चर्चा वाचता खूप समाधान वाटतं! :)

('तात्या, तुम्हाला अमुक अमुक रुपये मासिक पगार मिळेल' असं कुणाकडूनही ऐकून न घेणारा व स्वतःशिवाय कुणाचाही नोकर नसलेला!) तात्या.

धंदेवाले बरे

खरे आहे, तात्या...
शिवाय पिंक स्लिप नाही. बाकड्यावर बसणे नाही.
कमी कष्ट कमी पैसा, जास्त कष्ट जास्त पैसा
-?? हे वाक्य ' कमी कष्ट जास्त पैसा' असे वाचले.;)
आम्ही तर ऐकले की शेअरबाजार हा पाण्यावरती लोणी काढायचा व्यवसाय आहे.
आजकाल तर पैसे गुंतवणार्‍यांपेक्षा कन्स्ल्टंटना शेअरबाजारात जास्त पैसा मिळतो, म्हणे(सगळ्या सांगोवांगीच्या कथा, बरं का!)

आयटी वाले !

मी स्वत:ला आयटी वालाच समजतो कारण मी आयटी साठी काम करतो माझे काम आयटी साठी सहाय्य करणे आहे असे मला वाटते कारण मी व माझ्या सारखे लाखो हार्डवेयर वाले ह्याच्यासाठीच राबतात व आपला मोबदला घेतात ! तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एकेकाची कमाई ही सत्यम व ईन्फो. वाल्यांच्या तोंडाला फेस आणेल , उदा. दिल्ली मध्ये नेहरु प्लेस मध्ये ज्याचे १०*१० चे दुकान आहे तो देखील ९०००-१०००० रु निवळ नफा रोज घरी घेऊन जातो ते देखील रोख रक्कम !
जो रिपेरींग चे काम करतो तो देखील रोजचे २०००-४००० सोडत नाही.

तेव्हा हार्डवेयर वाल्यांना देखील तुम्ही आयटी वालेच समजा !

बाकी आयटी च्या बुमचे काहीही हो पण आमचा धंदा कधी मंदा नाही पडणार !
पण हा बुम नसुन काळाची गरज आहे असे वाटते. संगणकाशिवाय जगणे आजकाल भारतामधील ५ ते १० % लोक विसरली आहेत हे नक्की !

विसुनाना : आपली माहीती एकदम महत्वपुर्ण तथा सत्य आहे अहो रोजचा अनुभव आहे आज काल हा काय करावे ! घरगडी देखील ३५००.०० महीना घेतो व राहणे जेवण फ्री !

राज जैन

आम्ही इतर !

नमस्कार !
आम्ही इतर या सदरात मोडतो. (सध्या सदरा वापरायचे सोडून टि-शर्ट वापरतो आणि ऐटीत (आय.टी. मध्ये नव्हे) फिरतो :)

तर काय ! १० वी १२ नंतर शास्त्र आणि कला शाखांकडे जाण्याचा कल आजकाल कमी झाला आहे (ऐकिव माहिती). इंजीनियर होवून मग ते इलेक्ट्रिकल अथवा मेकॅनिकल असले तरी पुढे आय टी मध्येच जायचे आहे अशी तयारी ठेवून मुले असतात. जेथे पैसा आणि जास्त संधी आहेत तेथेच लोक जाणार.

शस्त्रशाखेचे उच्चविद्याविभूषित असलेले आणि आचार्य (पिएचडी) करित साडेपाच हजारावर पाच पर्षें काम करित भविष्याची चिंता करित राहणारे लोक सुद्धा आहेतच. पण कमी. त्या उलट वाणिज्य / कला / शास्त्र यातून पारंगत अथवा कोठल्याशा कोणालाच माहित नसलेल्या महाविद्यालयातून चाराची पाच वर्षे करुन शिकलेला मनुष्य एखाद्या वर्षाचा सॉफ्टवेअरच कोर्स करुन त्यापुढे एखाद्या वर्षाची उमेदवारी करुन एकदम डोळे दिपवून टाकणारा पगार मिळवू लागतो.
हे ज्याचे त्याचे निर्णय आहेत असे वाटते. काही लोक आवड आणि निवड भिन्न असली तरी चालेल म्हणतात काही लोक जे आवडेल तेच निवडणार म्हणतात. ज्याच्या नशिबी पैसा त्याला तो मिळतोच. कोणी कुणाचा हेवा करु नये आणि कोणाला 'हे' म्हणू नये झाले !

पण इतर सदरातल्या आम्हांस ठाकठिक पैसा, आवडते काम, स्वतःच्या आवडिनिवडी पुरवायला आणि येथे टंकायला पुरेसा वेळ मिळतो त्यात आम्हांस आनंद वाटतो.

शहरातील अर्थकारण मात्र या नव्याने येणार्या पैशाच्या लोंढ्याने झपाट्याने बदलते आहे आणि त्यात मागील पिढीतील सामान्य अर्थिक स्थितीतील लोक पोळले जात आहेत असे वाटते.

-- (इतर) लिखाळ.

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

एकदम पटले

आपला प्रतिसाद पटण्याजोगा आहे.

हे ज्याचे त्याचे निर्णय आहेत असे वाटते. काही लोक आवड आणि निवड भिन्न असली तरी चालेल म्हणतात काही लोक जे आवडेल तेच निवडणार म्हणतात. ज्याच्या नशिबी पैसा त्याला तो मिळतोच. कोणी कुणाचा हेवा करु नये आणि कोणाला 'हे' म्हणू नये झाले !

एकदम बरोबर

शहरातील अर्थकारण मात्र या नव्याने येणार्या पैशाच्या लोंढ्याने झपाट्याने बदलते आहे आणि त्यात मागील पिढीतील सामान्य अर्थिक स्थितीतील लोक पोळले जात आहेत असे वाटते.

पटणारेच विधान आहे. म्हणून आय टी त किंवा अजून कशात पैसा आहे हा एक भाग आहे, त्याहूनही अधीक आपण अधुनीक समाज म्हणून कसे घडतोय (का बिघडतोय) हा मुद्दा जास्त मह्त्वाचा वाटतो. सद्ध्याचे अर्थकारण बर्‍याच अर्थाने असमतोल आणत आहे.

थोडे अवांतर वाटेल, पण तरीही खालील मुद्दा विचार करायला मांडतो:

आपल्या पारंपारीक "धर्म-अर्थ-काम-मोक्ष" ( duties-prosperity-desires-fulfillment हे माझे भाषांतर आहे पण काय म्हणायचे आहे इतके समजण्यापुरते ते शब्द बघा..) तत्वज्ञानासंदर्भात एका मोठ्या व्यक्तीने एक चांगले विश्लेषण केल्याचे वाचले होते: "नदीला जो पर्यंत दोन्ही कडे काठ असतात तो पर्यंत ती प्रवाहाच्या योग्य दिशेने वाहात राहते. पण त्यातील एक जरी काठ मोडला तरी तीचे वाहणे ताळतंत्र सोडते आणि आजूबाजूला पूर येतो... म्हणून नदीची, नदीच्या पाण्याची जशी गरज आहे तशीच तिला असेलेले काठ नीट राहाण्याची नितांत गरज असते. जे नदीचे आणि काठाचे तेच अर्थ आणि काम या आवश्यक गोष्टींचे आणि त्यांंना समतोल ठेवणार्‍या धर्म आणि मोक्षाच्या काठांचे.." आज व्यक्ती म्हणून घरात आणि समाज म्हणून दारात आपण कुठलीही जबाबदारी (धर्म) पाळत नाही आहोत. कालच ऐकले की पुण्यात ३ आय टी इंजीनियर्सचा अपघाती मृत्यू झाला. त्यातील एक वाचू शकला असता पण त्याला मदत करायला रस्तावर कोणीही थांबले नाही...दुसरीकडे fulfillment ही कशातच/कशानेच होत नाही आहे ही अवस्था. हे काही प्रगतीपथावर असलेले लक्षण वाटत नाही. असो....हे मी लिहीत असलो तरी निराश होऊन अथवा करायला लिहीत आहे असा कृपया समज करून घेऊ नका. कारण या "फेज" मधून जाण्या शिवाय पर्याय नाही. शेवटी माणसं (आणि समाज) स्वतःला झालेल्या जखमांनी सुधारतात दुसर्‍याला लागलेल्या ठेचांनी नाही... (मला वाटते हे वाक्य "ययाती"तील आहे)

वा! आवडले!

पण इतर सदरातल्या आम्हांस ठाकठिक पैसा, आवडते काम, स्वतःच्या आवडिनिवडी पुरवायला आणि येथे टंकायला पुरेसा वेळ मिळतो त्यात आम्हांस आनंद वाटतो.

वा आपले तत्व आवडले! काहीसे तात्याबांच्या जवळ जाणारे... 'झेन!'

पण आयुष्य यावरच थांबते तर खुप छान झाले असते. पण प्रत्यक्षात तसे घडत नाही हो. गरजा वाढतात. नको ती आजारपणे उद्भवतात. घरांच्या किमती वाढतात. पालकांची मुलांची काळजी नि गरजा वाढतात. अशा वेळी या गोष्टी फार जाणवणार्‍या असतात यात शंका नाही.

तरी या शिवायही आजचा दिवस आपला म्हणून आनंदात घालवता आला म्हणजे झाले नाही का?
शेवटी सगळ्या प्रश्नांना उत्तर पैसा नसतेच. तसं हा प्रश्न गुंडोपंतांनी, विनोबांनी मटा मध्ये म्हंटल्याप्रमाणे सोडून देवूनच सोडवला आहे ;)

आपला
गुंडोपंत

सोडा म्हणजे सुटेल :)

शेवटी सगळ्या प्रश्नांना उत्तर पैसा नसतेच. तसं हा प्रश्न गुंडोपंतांनी, विनोबांनी मटा मध्ये म्हंटल्याप्रमाणे सोडून देवूनच सोडवला आहे ;)
वाह् वा ! हे फार मस्त. विनोबांचा संदर्भमाहिती नाही. त्याबद्दल काही महिती द्याल का?
पण् सोडून देवून सोडवणे आवडले.

-- लिखाळ.

नेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :)

काही इतर

वर विसुनानांनी बर्‍याच इतरांची आर्थिक सुस्थिती वर्णन केलीच आहे. आता काही इतर

  1. जाहिरात क्षेत्रातील माझे काही मित्र मैत्रिणी सहा आकडी पगार महिन्याला घेतात.
  2. एअर इंडियात काम करणार्‍या एका एअर होस्टेस मैत्रिणीचा पगारही रग्गड आहे. इतर एअरलाईन्स त्याहूनही अधिक पगार देतात असे ऐकून आहे.
  3. शेजारी राहणार्‍या एका अभिनेत्याचा कार्यालेख पाहता त्याच्या आर्थिक सुस्थितीचा अंदाज येतो.
  4. असेच एक आमचे शेजारी, जे एका मल्टीनॅशनल फूड कंपनीच्या परचेस डिपार्टमेंटला आहेत त्यांची सुस्थिती काय वर्णावी?
  5. फॉरिन ब्यांकातूनही चांगले चुंगले पगार मिळतात आणि आयुष्यात वेळही इतर क्षेत्रांपेक्षा बरा मिळतो म्हणे.
  6. एक मैत्रिण वृत्तनिवेदिका होती पूर्वी, तिचाही पगार लै झ्याक होता.

मला वाटतं, आयटीला भारंभार पगार मिळतो हा एक उगीच फुगवलेला फुगा आहे. (याचे कारण आयटीकडे वळणार्‍या लोकांची संख्या वाढत आहे म्हणून असावे.) इतर अनेक क्षेत्रांत असाच भरभक्कम पगार मिळतो. वर लिखाळांनी म्हटल्याप्रमाने शहरी अर्थकारण झपाट्याने बदलत आहे आणि त्यात हल्ली समतोल आढळत नाही.

याचा अर्थ!

वरीच चर्चा परत एकदा वाचली.
मला असे जाणवले की, कौशल्याधारीत कामाला आजही मरण नाही.
कौशल्य कसे विकता यावर तुमची किंम्मत ठरते. तसे पैसे तुम्हाला मिळतात.

मात्र त्याच वेळी हे सगळे करतात म्हणून मी पण करेन अशा विचारापेक्षा, हे मला आवडते आहे नि त्याचा मला आनंद आहे म्हणून मी करतो आहे या भावनेने केले तर मजा आहे.
मात्र त्याच वेळी उद्या कडे लक्ष ठेवणे जरूरीचे आहे. बदलत्या ट्रेंड्स चा आढावा घेणे जरूरीचे आहे. त्यानुसार बदल घडवणे जरूरीचे आहे. या साठी एक उदाहरण देतो. मागे मी खजुराहो ला फिरायला गेलो होतो. मंदिरे (नीट ;)) पाहुन झाल्यावर तिथल्याच एका एंपोरियम मध्ये गेलो. तेथे अनेक मुर्ती विकायला होत्या. किमती साधारण पणे दहा लाख ते पुढे! मालक माझ्याशी बोलायलाही तयार नव्हता. अनेक युरोपीय दिसणार्‍या गिर्‍हाइकांना अस्खलित स्पॅनिश, फ्रेंच व इंग्रजी मध्ये पटवण्याची धडपड चालली होती. मात्र त्या मुर्ती घडवण्याची शैली मला वेगळी वाटली. जरा खोलात जावून चौकशी केली तर कळले की त्या मुर्ती जवळपासच्या नव्हत्याच! तेथे कोणी असे मुर्ती काम करत नाहीत. त्या जगन्नाथपुरीच्या करागीरांनी घडवलेल्या होत्या. एक कारागीर साधारण दोन वर्षात एक मुर्ती घडवतो. नंतर दुकानाच्याच एका माणसाने सांगितले की मालक मुर्ती फक्त ठेवायला घेतो. पैसे विकली गेली तर. आणी तीही मालक जे म्हणेल त्या किमतीत.
मला चटकन जाणवले की या कारागिरांना
१. कला विकण्याची सोय' नाहीये
२. अप्रतीम कौशल्य पण विक्रीतंत्र नगण्य
३. आजच्या जगाचे भान नगण्य
त्याचा फायदा अर्थातच इतर चाणक्ष लोक घेत आहेत.

याचा अर्थ असाही आहे की आर्ट हे पण एक इमर्जींग फिल्ड आहे. यात देशाबाहेर व देशांतर्गत मागणी उत्तम आहे.
मात्र हा व्यवसाय करायला लागणारा व्यावसायीक सांगाडा उभारण्यची गरज आहे. म्हणजेच भारतातील सर्व (अशा प्रकारच्या टुरीस्टीक) स्थळांचा आढावा घेवून त्यात कारागिरांना बांधुन घेवून एक फक्त आर्ट विषयक विश्वासार्ह शो रूम्सची मालिका भारतभर सुरु करायला मोठाच वाव आहे.
या कल्पनेवर अजून चर्चा आवडेल... म्हणजे व्यवसाय संकल्पना पुर्णपणे विकसित करायला आवडेल नि वाव ही आहे.

१. यात विक्री तंत्र काय असावे?
२. सप्लाय-चेन कशी असावी? (शिवाय बेभरवश्याचे कारागिर - शोरूम्स - देश -परदेश अधुनमधुन होणारे संप - वाहतुकीतला विस्कळीतपणा)
३. साधारण व्यवसाय तंत्र (बिसिनेस प्रोसेस) काय असावी?
४. कोणती तंत्रावली या साठी योग्य व दणकटपणे बसेल अशी असेल? वेगवेगळ्या भाषा!
५. मनुष्यबळ कसे हाताळावे? काही वर्तणुकीचे व विक्रीचे नियम? परत भाषा?
६. देशांतर्गत बरोबरच परदेशांत विक्री साठी काय करावे लागेल?
७. कॅपिटल व्हेंचर असेल तर ते उभारायला काय करणे आवश्यक वाटते?
८. साधारण किती कॅपिटल आवश्यक वाटते?
९. नफा साधारण पणे कधी पासून मिळायला लागावा? का?
१०. पाच वर्षांनंतर या व्यवसायाची काय स्थिती अपेक्षित असेल?

असो
तर आयटी जास्त पैसा मिळवते हा माझाही भ्रमच होता तर...?

आपला
कल्पनागुंग
गुंडोपंत

व्यवसाय संकल्पना

व्यवसाय संकल्पना
अशी वेगळी चर्चा सुरु करु या का?
काय वाटते?

आपला
कामधंदे सोडून तावातावाने शेखचिल्ली चर्चा करत बसणारा...
गुंडोपंत

चर्चा नव्हे समुदाय

बरीच मंडळी परदेशात आहे. कोणी भारतातून काही वस्तू ज्या परदेशात सहज / स्वस्त मिळत नाहीत अशा निर्यात करु शकत असेल तर जमुन जाईल दोन्ही कडच्यांचे काम. शिवाय अश्या एका स्वतंत्र समुदायात शोधाशोध पण सोपी होईल.

पार...

माझ्या 'भल्यामोठ्या कॉर्पोरेट स्वप्नाचा' तुम्ही पार 'कुटीरोद्योगच' करून टाकला की हो!!
चला माझ्या एखाद्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर द्या आता!

आपला
गुंडोपंत
प्रो.प्रा. गुंड्या मुर्ती विक्री केंद्र
"आमचे येथे सर्व प्रकारच्या सुबक मुर्ती आर्डरनुसार योग्यभावात बनवून मिळेल"

आयटी पगार

गुंडोपंतांनी चर्चे साठी एक छान विषय उचलला.. सर्वांचे विचार कळले आणि डोक्यात प्रकाश पड़ला कि आयटी सोडून ही बरीच क्षेत्र आहेत जिथे भरपूर पैसा आहे. ह्या चर्चे मधे एक-दोनच व्यवसायिक मित्रांनी आपले विचार मांडले. पण एकूण चर्चा महानगरीय किंवा नगरीय काम आणि पगारावरच झाली... लहान शहर (कस्बा... मराठी कमजोर आहे माझे) आणि किती तरी गावं आहेत जिथे लाखोंच्या संख्ये ने बेरोजगार तरुण नुसते बसून आहेत, त्याला दोन-तीन कारणं -
(अ) काम करायची इच्छाच नाही
(ब) गावाबाहेर पडा़यची हिम्मत नाही
(स) नवीन धंधा सुरु करायला भांडवल नाही
त्यामुळे माझा सल्ला असा कि तरुणांनी "स्किल" (परत एकदा मराठी ची कमकुवतपणा) वाले काम शिकावे, त्यात जास्त वाव आहे... जसे कार मैकेनिक, एसी मेकैनिक (आयटी वाले असो किंवा कुणी पण असो, पगार वाहाता आला कि ह्या दोन वस्तू तर येणारच, खराब ही होणारच), हार्डवेयर / नेटवर्क इंजिनियर, प्रॉपर्टी ब्रोकर (नाही तर त्याचा असिस्टंट तरी), खाण्या-पिण्याचे पदार्थाचे स्टॉल (एका व्यस्त बाजारात असलेला ठीक-ठाक चालणारा कचोरी चा ठेला रोजचे ५०० रुपये कमवून देतो, पोलीस-ट्राफ़िक-गुंड यांचा हप्ता वगळून ही), आणखीन कमी कमाईच्या धंद्याबद्दल म्हणटले तर एक केश-कर्तनालय / कम/जेन्टस ब्यूटी पार्लर, इंग्रजी/हिन्दी/मराठी टायपिंग-झेराक्स-इत्यादी... असे बरेच काही काम आहेत कि जाच्यात काम करणारी (चांगल्या प्रमाणे करणारी) फ़ारच कमी आहेत... पण आयटी चे "फ़्याड" डोक्यात घालून बसलेले आणि धक्के खात-खात इंजीनियरिंग कॉलेजातून बाहेर पडणार्या युवकांना कोण समजावणार ?

http://sureshchiplunkar.blogspot.com

कमी पगाराचे धनी

अगदी सुरुवाती सुरुवातीला बॅंक कर्मचार्‍यांचे पगार दुसर्‍याच्या डोळ्यात सलतील इतके वाढायला लागले. मला भेटलेले बहुतेक सर्व बॅंक कर्मचारी कद्रू, स्वार्थी, व्यवहाराला अत्यंत काटेकोर आणि त्यांच्या कमी पगारवाल्या नातेवाईक -मित्रांपासून फटकून वागणारे होते. बॅकेकडून प्रवासखर्च, परगावी सवलतीच्या दरात राहण्याची व्यवस्था, अत्यल्प व्याजदरावर कर्ज, भरपूर ओव्हरटाइम, दर तीन चार वर्षाने नव्या गाडीसाठी व फर्निचर बदलण्यासाठी पैसे , खातेदार व्यापारी मंडळींकडून उंची नजराणे या गोष्टींमुळे ते इतरंपेक्षा वेगळे आहेत हे जाणवायचे. वर्तमानपत्र घरी आल्यावर हे प्रथम शेअर बाजाराचे पान उघडतात. अजूनही त्यांच्यातले अनेक तसेच आहेत. बँकेतून घरी आल्यावर हे कधीही दमलेले दिसत नाहीत. एकंदरीत नोकरी आखुडशिंगी बहुदुधी असते असे त्यातले अनेक प्रामाणिकजन सांगतात. अधूनधून संपावर जाणे हा यांचा आवडीचा छंद असतो.
प्रचंड पगार घेणारे आय टी वाले सुद्धा समाजातील इतरांना वेळ देऊ शकत नसल्याने नातेवाइकांपासून फटकून असले तर आश्चर्य वाटायला नको. कॉल सेंटरवरची भलत्यासलत्या वेळची नोकरी, त्यातही परदेशी ग्राहकांकडून त्रास देण्याचे मोठे प्रमाण कर्मचार्‍याचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत होते की काय अशी धास्ती वाटते. मात्र विविध संकेतस्थळांवर भेटणारे संगणकतज्ञ पाहिले की आय टी वाले समाजाकरिता बरेच काही करू शकतील याचा विश्वास वाटतो.
आता कमी पगारवाल्यांमध्ये खासगी छोट्या धंद्यातले मुनीम, कारकून , टंकलेखक, घरगुती कामगार, कंपाउंडर, लहान व्यावसिकांकडे काम करणार्‍या स्वागतिका असे अनेक आहेत. याचे हाल कुत्रा खात नाही. एम ए झालेल्या व शाळेत किंवा ज्युनियर कॉलेजमधे शिकवणार्‍या कंत्राटी शिक्षकाचा एकून मासिक तनखा १५०० रुपयांइतका कमी असू शकतो. सरकारमान्य शाळेतील शिक्षकांचे पगार बॅंकेतील चपराशापेक्षा किंवा महापालिकेतल्या झाडूवाल्यापेक्षा फारच कमी असतात. इतर सर्व नोकरदार कार्यालय संपले की स्वस्थपणे घरी विश्रांती घेतात; शिक्षक घरीसुद्धा वह्या, पेपरांचे गठ्ठे तपासत असतात. एक मे महिन्याची एक महिना सुट्टी सोडली तर शिक्षकांना कुठलीही बिनकामाची सुट्टी नसते. हल्ली त्या सुट्टीतपण कुठल्यातरी अभ्यासक्रमाला किंवा एखाद्या सर्व्हेला पाठवून शिक्षकांना हैराण केले जाते. शिक्षकभरतीसाठी खूप लाच द्यावी लागते, अशाने चांगले शिक्षक मिळणे शक्य नाही. भाषा शिकवणार्‍या शिक्षकांचे दुर्भिक्ष्य असते. एक निवृत्त झाला तरी त्याजागी दुसरा यायला सहासहा महिने उलटतात. सरकारकडून येतो त्याची भाषा विषय शिकवण्याची पात्रता नसते. त्याचे बी एड चे विषयच वेगळे असतात.
समाजातली दरी रुंदावणार नाही तर आणखी काय होणार?--वाचक्‍नवी

समाजातील दरी सही.

सहमत.
या चर्चेच्या सुरवातीलाच आम्ही म्हणत होतो की,इतर क्षेत्रातील नोक-यांचा विचार झाला पाहिजे,तेव्हा ती चर्चा आय.टी तील पगाराच्या पुढील तितक्याच दमदार पगाराकडे गेली,त्यामुळे या चर्चेचा पारा काही केल्या खाली येईना, कमी पगाराची चर्चा झालीच नाही इथेही आम्हाला तोच मुद्दा मांडायचा होता.खरे तर या चर्चेत काही शासकीय पगाराचे बेसीक आमच्या डोळ्यासमोर होते,अंगणवाडी,बालवाडी,प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक,कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक,प्राध्यापक, या सर्व प्रकारातील कंत्राटी हा प्रकार,शासकीय कार्यातील कर्मचारी.हे सर्व आमच्या डोळ्यासमोर होते.पण तो नाद आम्ही सोडून दिला,(पंतानी आणि आम्ही एकमेकाच्या खरडीत चर्चा केली)पण कमी पगाराच्या धनीतील प्रतिसादामुळे आम्ही पुरोगामी महाराष्ट्रात आहोत,आणि आमच्या प्रमाणे काही जाणीवा या संकेतस्थळावर आहे, याचा अधिक आनंद झाला.

आपला
कमी पगाराचा धनी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इथे पाहा...

कोण किती पाण्यात आहे, नि कुणी कुणाला पाण्यात पाहायचे ते इथे पाहा.

यामागे कोण आहे ही माहिती इथे.

भारताबद्दल अशा आकडेवारीच्या शोधात..

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

चांगली आकडेवारी

चांगली आकडेवारी आहे.
२००६ म्हणजे तशी नवी आहे.
पण् ही फक्त अमेरीकेच्या एच १ व्हीसा ची आहे.
सगळेच कसे जाणार त्यासाठी बरं?

भारतातली कुठे मिळणार अशी आकडेवारी?

अर्थात यात "हवाई विभागाची" कुणाला आठवण झाली नाही... हे सगळ्यात जास्त पगार असलेले क्षेत्र आहे असे दिसते.

आशा आहे या सगळ्या चर्चेचा परिणाम नव्या क्षेत्रांच्या शोधात असलेल्या पीढीला
योग्य निर्णय - योग्यवेळी
घेण्यासाठी होईल.

आपला
गुंडोपंत
(कधी कळलेच नाही हो काय करायला हवे आता... नि बरोबरचे गेले निघुन... आम्ही बसलो व्यायमशाळेत! : ) )

पंत विसरु नका

तुमच्याकडे आहे जबरदस्त कौशल्य

(कधी कळलेच नाही हो काय करायला हवे आता... नि बरोबरचे गेले निघुन... आम्ही बसलो व्यायमशाळेत! : ) )

व्यायमशाळेत सडपातळ होण्याचे वर्ग काढा अन दरवर्षी संपत्तीचा "वर्ग" ह्याच प्रकाराने वाढणारी गणीताची जादू बघा.

क्या बात है!

वा सहजराव,
नक्की काढू बरं!

फक्त आमची पोरं नि येणार्‍या पोरी यांच्या वेळा वेगळ्या कराव्या लागतील ... नाय तर हे लोक भलत्याच कवायती करत बसायचे!

आपला
कवायती
गुंडोपंत

बघा मार्गच मार्ग मिळतायत

अहो पोरं नि पोरी आल्याकी त्यांच्या खिशातला पैसा, वेगवेगळ्या कवायती करुन काढा बघा. बाकी ज्यांना जे करायचे आहे ते, ते कुठेही करणारच, तुम्ही आपल धंदयाच बघा.

खरंय!

ज्यांना जे करायचे आहे ते, ते कुठेही करणारच

खरंय! अगदी मैत्रीपार्कातल्या बाकांवरही करणार!! काय तात्या बरोबर ना?
;)

आपला
कोणत्याही कवायतीला नाही न म्हणणारा
गुंडोपंत

जागृत देवस्थान कल्पना

तसेच देवस्थानाचे स्वतःचे कॉल-सेंटर असेल. त्यावर भाविकांच्या समस्यांचे समाधान करण्यात येईल. धार्मिक युवक-युवतींनी त्यासाठी संपर्क साधावा.

कृपया अजमेरी बाबा, पीर सैय्यद साहीब आणि पार्टींना आऊटसोअर्स करू नका. याबाबत स्वदेशी माल काही कमी नसेल.. (आता अमेकेतील कुठल्यातरी अशाच बाबाच्या जाहीराती चालू झाल्या आहेत!)

तसेच "ऑन लाईन" अभिषेकाची वगैरे व्यवस्था केल्यास उत्तम.

ही माहिती बघा

 
^ वर