तर्कक्रीडा :४१ :भागाकार

......सहावीच्या वर्गात गणितशिक्षक आले.त्यांनी फळ्यावर एक पाच अंकी भाज्यसंख्या लिहिली.तिला भागण्यासाठी तीन अंकी भाजक लिहिला.विद्यार्थ्यांना वहीवर भागाकार करायला सांगितले.थोड्यावेळाने विचारले;

"झाले का गणित सोडवून? काय उत्तर आले ? "

"हो सर.भागाकार आला एकाहत्तर (७१),बाकी राहिली चौसष्ट(६४)"
"अरे वा ! अचूक.छान ! आता ताळा करून पाहा.कसा ते तुम्हाला सांगितलेच आहे. पण पुन्हा लिहितो."
असे म्हणून त्यानी फळ्यावर लिहिले;

भाजक भागाकारां गुणोनी बाकी तयात मिळवावी |
येईल भाज्य तयाने आर्या ध्यानात नित्य ठेवावी ||

.....थोड्या वेळाने एक विद्यार्थी उठून म्हणाला,

"सर, माझे उत्तर पस्तीस हजार सदुसष्ट (३५०६७) येते. तुम्ही दिलेली भाज्यसंख्या येत नाही."
"येत कशी नाही ? यायलाच हवी.वही इकडे आण पाहू."

त्याने वही दाखवली.

"अरे बाळा,दिलेल्या भाजकात दशक स्थानी शून्य आहे. तिथे तू नऊ (९) लिहिले आहेस.म्हणून ताळा चुकला.बाकी सगळे ठीक आहे..गणितातील अंक नेहमी नीट लिहावे.फराटे मारू नये

"
तर शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेल्या भाज्य आणि भाजक संख्या शोधून काढा."
***************************************************************
(कृपय उत्तर व्यनि. ने )

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तर

व्यनिने पाठवले आहे!!

भागाकारः उत्तरे:

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
१. वरदा,आवडाबाई आणि उमा यांची उत्तरे आली. सर्वांनी फळ्यावरील भाज्य आणि भाजक संख्या अचूक शोधल्या आहेत.
२. श्री विसुनाना यांनीही बरोबर उत्तर पाठविले आहे. "आर्या सुंदर आहे " असा त्यांचा अभिप्राय आहे.

भागाकार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय यांनी उत्तर पाठविले आहे. शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेल्या भाज्य आणि भाजक संख्या त्यांनी अचूक शोधल्या आहेत.
कोड्यातील गणितबाह्य इतर वर्णन श्री.धनंजय यांना अवांतर आणि (बहुदा) अनावश्यक वाटते. तर्कक्रीडेचा विषय "गणिती मनोरंजन (मॅथेमॅटिक्स फॉर एंटरटेंनमेंट ) " असा आहे.थोडीशी रंजकता आणण्यासाठी असे अवांतर लेखन होते. गणिताच्या दृष्टीने ते अनावश्यक असते हे खरे.

अवांतर शब्द चुकला म्हणावा

गणितासाठी अतिरिक्त, इतकेच म्हणायचे होते - मनोरंजक खासच! शिवाय अतिरिक्त तपशील ताळ्यासाठी उपयोगी पडले.

धनंजय

भागाकार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रमोदकाका यांचे उत्तर आले. त्यानी भाजकसंख्या बरोबर काढली.पण ती ताळा चुकलेल्या बाळाची. अर्थात त्यावरून शिक्षकांनी दिलेला भाजक काढणे अगदीच सोपे आहे. तेवढी शेवटची पायरी राहिली. बाकी बरोबर आहे.

तर्कक्रीडा:४१:उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
ताळा चुकलेल्या बाळाची भाज्यसंख्या : ३५०६७, बाकी = ६४, भागाकार = ७१
म्हणून त्याने घेतलेली भाजकसंख्या :(३५०६७-६४)/७१ = ४९३. इथे ० चा फराट्यामुळे ९ झाला. म्हणून शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेला भाजक=४०९. यावरून भाज्य = ४०३*७१ + ६४ =२८६७७.
...........................................................
श्री.विसुनाना यांना आवडलेली आर्या ही माझी रचना माझी नव्हे. आमच्या शिक्षकांनी सांगितलेली ही आर्या माझ्या स्मरणात राहिली. ती लिहिण्यासाठी तर हा कोडेलेखनाचा खटाटोप.

धन्यवाद यनाजी!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
ग्यानबाची मेख आत्ता ध्यानात आली.बाकी तशी आम्हाला डोकॅलिटी कमीच आहे म्हणा! पण डोळे मिटून बॅट हवेत फिरवली. म्हटले,फटका नीट बसला तर जाईल चौकार.पण कसले काय? दांडकंच गुल झालं की राव! :D

 
^ वर