परदेशांत पासपोर्ट हरवणे

परदेशांत पासपोर्ट हरवणे
परदेशांत पासपोर्ट हरवणे हे एक दु:स्व्प्नच असणार. त्यात वेगवेगळ्या देशांचे कायदे आणी त्यांची विवीध प्रकारे अंमलबजावणी. कायद्याची वेगवेगळी भाषा. याशिवाय पुर्णपणे वेगळी भाषा. जगात अनेक ठिकाणी आड येणारा भ्रष्टाचार.
या अडचणी असल्या तरी, काही पद्धती समान असणार.
१. पोलिसात तक्रार देणे
२. त्यांच्या कडून तशी पोचपावती मिळवणे
३. भारतीय वकिलातीला कळवून नवीन पारपत्रासाठी अर्ज देणे
४. योग्य ती पैशांची व राहण्याची व्यवस्था ठेवणे

यात आपल्याला अजून काय महत्वाचे वाटते? कोणते महत्वाचे नियम माहीती असावेत?
अमेरीकेचे ठीक माहिती मिळेल पण आफ्रिकेत झाईरे किंवा चीन मध्ये हरवला तर? काय काय करणे आवश्यक असते?
आपले काही माहीती काही अनुभव? ऐकीवही चालतील.

Comments

काही दुवे सापडले

काही दुवे सापडले... पण मी काही ते नीट पाहिले नाहियेत.

हे पहा

आपला
(सर्व प्रकारच्या हरवा-हरवीत एक्सपर्ट)
गुंडोपंत

काल व्यायामात डंबेल्स हरवलेत ते आता शोधतोय! :)
म्या गरीबाकडे पारपत्र नाहीये पण एकदा काढले, की ते पण हरवायला नि शोधायला एक निमित्त होईल...

ही कहाणी वाचा...

"स्वाती दिनेश" यांनी मनोगतावर लिहीलेली रोमकहाणी वाचा. रोमांचकारी आहे.

विकास

ते वाचूनच तर

ते वाचूनच तर हा प्रस्ताव सुचला... :)
मग वाटलं की युरोपात जरा तरी सुव्यवस्था आहे, पण समजा गेलो केनियाला नि हरवला तर?
किंवा हैतीला हरवला तर?
किंवा जर त्या देशात भारतीय वकिलात नसेलच तर काय करायचे? असे अनेक प्रश्न पडले म्हणून चर्चा प्रस्तावच टाकला...

आपला
(चेन्नईला गेला तरी हॉटेल चा पत्ता आणी मग स्वतःच हरवणारा)
गुंडोपंत

चीन,अफ्रिकेत

भारतात प्रत्येक देशाची कार्यालय आहेत ,तेथे तुम्हाला जास्त माहिती मिळेल.

कसे?

प्रत्येक देशाची कार्यालय आहेत

माझ्या अल्प माहिती नुसार भारताचे राजनैतीक संबंध त्या देशाशी असल्याशिवाय असे घडू शकत नाही. म्हणजे इराकचे नवीन सरकार भारताने मान्य केले तरच असे राजकिय संबंध येवू शकतात नि मगच आपले कॉसुलेट तेथे येईल. इराकी सरकारचे अस्तित्व जर भारताने मान्य केलेच नाही तर असे कार्यालय येण्याचा प्रश्नच नाही.

म्हणून राजकिय बंडाळी असलेल्या ठिकाणी किंवा समजा इथिओपिया मध्ये आपली वकिलात असेलच असे नाही. (मला माहित नाही, आहे की नाही ते.) अशा ठिकाणी तुमच्या नशिबाने तुम्ही तेथे अहात नि पारपत्र हरवले/चोरीला तर काय करायचे? त्याशिवाय तुम्ही पुढच्या /मागच्या देशांत कसे जाणार?
किंवा भारताचे संबंध असलेल्या देशात तुम्ही असतांना बंडाळी झाली तर?
कोणतेही सरकार नसतांना व पारपत्रही हरवलेले असेल तर देश सोडण्याचा मार्ग काय असतो?

आपला
गुंडोपंत

वा

आपण ही फार चांगली माहिती दिली आहे. पालक देश ही संकल्पना मला नव्याने समजली.
(अर्मानिया, क्रोएशिया अश्या लहान देशांचा विसा असाच कोणितरी देत असणार. त्यांनननेक देशांत आपले स्वतःचे वकिलातीचे कार्यालय थाटणे अवघडच असेल.)
--लिखाळ.

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

स्वीडन- जर्मनी

माझा एक नातेवाईक स्वीडन मध्ये राहत होता,त्याला ऑस्ट्रेलियाला जायचे होते.पण ऑस्ट्रेलियाची वकिलात स्वीडन मध्ये नाही,त्याला बर्लिन मध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियन वकिलातीतून विजा मिळेल असे सांगण्यात आले.त्याप्रमाणे त्याने कार्यवाही केली व त्याला विजा मिळाला.
स्वाती

वेंधळेपणा !

आपल्याला अजून काय महत्वाचे वाटते?

पासपोर्ट हरवू नये यासाठी,
आपल्या वेंधळेपणालाही आवर घातला पाहिजे असे वाटते. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदा

बरं का, माझ्याकडे एकदम जालीम उपाय आहे!
अहो एकदा पारपत्र मिळले की त्याचा क्रमांक गोंदवूनच टाकणार आहे हातावर...नि त्याची कलर फोटोकॉपी 'स्ट्रॅटेजिकली प्लेस्ड टॅटू' म्हणून लावणार पोटाच्या जरा खालच्या भागावर!
कशी वाटते आमची 'दुहेरी' आयडीया? ;)

आपला
भल-भलत्या आयडीयावाला
गुंडोपंत

शेखचिल्ली

गुंडोपंत आज आपल्याला काय झाले आहे? अचानक शेखचिल्लीसारख्या कल्पना डोक्यात स्वैराचार करत आहेत ते! बाकी जे नाही ते आहे वाटणे म्हणजे माया. आपण त्या अर्थाने फारच "मायावी" होत चालला आहात! :-) (ह.घ्या.)

बाकी आपल्या कल्पनाविलासात, एक नकळत होणारा फायदा: पासपोर्ट नं. हातावर गोंडवून जर तुम्ही पाश्चत्य जगात वावरलात आणि कुठल्या माणसाने असा नंबर पाहीला तर तो/ती आपल्याला नाझी छळछावणीतील एक मुक्तझालेला ज्यू बांधव समजून जरा जास्तच आदरातिथ्य करेल ! (पण त्यासाठी आपले वय १९४० च्या सुमारास कमितकमी २० -२२ वगैरे असेल असे त्याला आत्ताच्या आपल्याकडे पाहून वाटले पाहीजे)

असो, आधी पासपोर्ट काढा मग तो कसा (कुठल्या देशात) हरवायचा आणि मग कसा मिळवायचा ते ठरवूया! बाकीच्या ठिकाणचे माहीत नाही पण अमेरिकेत न्युयॉर्क शहरातील कॉन्स्युलेटमधे लोकांना अनुभव चांगला येतो. पासपोर्ट हरवल्या नंतरचा नाही, पण रिन्यू करताना अथवा नवीन करताना पोस्टाची पोचपावती (की त्यांना आमचा अर्ज मिळाला वगैरे) आम्हाल् घरी येण्या आधी पासपोर्ट आलेला आहे ! (अगदी माझ्याबाबतीत हे झाले आहे). पासपोर्टची काळजी खूप घ्यावी लागते पण असा कधी क्धी गहाळ होणे वगैरे प्रकार शेकडा काही लोकांमधे कुठल्यन् कुठल्या तर्‍हेने होतातच हे सरकारला माहीत असते तेंव्हा तसे नियमही आहेत. काळजी घ्यावी पण काळजी नसावी.

काय सांगता?

बाकी आपल्या कल्पनाविलासात, एक नकळत होणारा फायदा: पासपोर्ट नं. हातावर गोंडवून जर तुम्ही पाश्चत्य जगात वावरलात आणि कुठल्या माणसाने असा नंबर पाहीला तर तो/ती आपल्याला नाझी छळछावणीतील एक मुक्तझालेला ज्यू बांधव समजून जरा जास्तच आदरातिथ्य करेल !
मग मी मराठी भाषक ज्यु होणार की काय?;)

मला या बद्दल काही माहीती नाही बॉ! पण शिंडलर्स लिस्ट आणी अ ब्युटीफुल लाईफ पाहिला आहे.
त्यातुन जे दिसले ते भयानकच होते. त्यामुळे तसे होणे मला आता विचार केल्यावर आवडत नाहीये... (अ ब्युटीफुल लाईफ ला शेवटी तर मी जाम रडलो होतो हो!)

पारपत्र हरवले तरी चालेल पण यातनामय ज्यु होणे नि नंतर त्याचा अति डांगोरा पिटणे दोन्ही नको! :(

आपला
मायावी
गुंडोपंत

पासपोर्ट नंबर एक मजेदार आठवण

गुंडोपंत, आपण पासपोर्ट नंबर गोंदवून घेण्याचे बोललात त्यावरून खालील एक गोष्ट आठवली:

९४-९५ मधील गोष्ट आहे. माझा एक भारतीय मित्र त्याच्या अजून मित्राबरोबर Vermont राज्यात कँपिंगसाठी म्हणून चालला होता. Vermont हे कॅनडाच्या सीमेवरील म्हणजेच आंतरराष्ट्रीय सीमेवरील राज्य आहे. त्यांचे कँपिंगचे ठिकाण हे पण कॅनॅडीयन सीमेलगत होते. हे दोघे गाडी चालवत चालवत हायवेवरून चालले होते, आणि काहीतरी गोंधळ घातल्यामुळे चुकून अमेरिकेतील अमेरित असलेला शेवटचा "एक्झीट" चुकले आणि पुढे एकदम सीमेवरच गेले. अर्थातच कँपिंगच्या तयारीत पासपोर्ट कुणाकडे असणार! बर हाच एकटाच "विद्यार्थी व्हीसावरील" मुलगा. (अमेरिकन्स/कॅनेडीयन्सना जायला आत्ता आत्ता पर्यंत फक्त ड्रायव्हर्स लायसन्स पुरे असायचे - त्यामुळे गोर्‍यालोकांना तसे जास्त प्रश्न विचारणे वगैरे सीमासुरक्षा करत नाही हा आजचापण अनुभव आहे, आपल्याला पण ग्रीनकार्ड वगैरे असले तर काही त्रास होत नाही).

आता हायवेवर उलटे फिरणे शक्य नसल्याने त्यांना सीमेवरील चेकपोस्ट मधे जावे लागले. अर्थातच ते कॅनडाचे होते. त्यांनी सर्व कहाणी सांगीतली. अधीकारी म्हणला, "नो प्रॉब्लेम, एकदा बूथच्या पुढे गेलास की यू टर्न घेता येईल तसा घ्या आणि जा परत अमेरिकेत." हे खूष झाले आणि उलटे फिरले, पण यावेळेस ते आता कॅनडातून अमेरिकेत येत होते. त्यामुळे अमेरिकन चेकपोस्टवर थांबले. तिथल्या अधिकार्‍याला सर्व सांगीतले आणि तसे म्हणाल तर त्याच्या डोळ्यासमोरच सर्व घडले होते. त्याने पण सांगीतले की नो प्रॉब्लेम फक्त तो (माझा मित्र) जेंव्हा केंव्हा अमेरिकेत आला, तो, ते कायदेशीर आला का नाही तेव्हढे त्याला कायद्यानुसार पहावे लागेल त्या शिवाय तो पासपोर्टवीना आत सोडू शकणार नाही. मग ते बघणार कसे? माझा मित्र म्हणाला, हे माझे नाव, ड्रायव्हर्स लायसन्स,आणि सोशल सिक्यूरीटी नंबर. त्यावर ऑफिसर म्हणाला की आमच्या स्थानीक डेटाबेस मधे "पासपोर्ट नंबर" दिल्याशिवाय बाकीची त्यांना हवी असलेली माहीती मिळत नाही (कायदेशीर आगमन झाले का नाही ते वगैरे). क्षणभर माझा मित्र घाबरला पण नंतर बहुतेक भारतातून आलेले विद्यार्थी करतात किंवा करायचे (माझे ही तसे होते..), त्याचा फायदा झाला... पासपोर्ट नंबर पाठ होता! परीणामी त्याने शांतपणे तो सांगीतला मग त्याचे नाव वगैरे त्यांच्या सिस्टीममधून आणि त्याच्याकडे असलेल्या लायसन्सवरील छायाचित्र पाहून त्याला परत अमेरिकेत सोडले!

तात्पर्यः पासपोर्ट नंबर पाठ करून ठेवला तर त्याचा असा संकटसमयी पटकन उपयोग होऊ शकतो...

च्यामारी

च्यामारी...
आता नंबर पण बदलायचा म्हणजे काही खरं नाही राव...

बापरे म्हणजे जग प्रवासाला गेलो तर पारपत्र हरवत हरवत मी तर असाच दिसेन मग! :)

असा एकच नंबर का नाही देत हे लोक कैद्यांसारखा... परत तापच नको ना!
आपला
गुंडोपंत

व्हिसा बद्दल

पारपत्र हरवल्यानंतर व्हिसा नोंदणी कशी होते? पारपत्र कार्यालयामार्फत पुन्हा एकदा पारपत्र आवश्यक त्या सर्व देशांच्या वकिलातींकडे पाठवले जाते का? पूर्वी वापरात असलेला व आता पात्र नसलेला व्हिसाही त्यावर नोंद होतो का?

नवीन व्हिसासाठी अर्ज देताना असा जुना व्हिसा असला तर कॉन्सुलेट अधिकारी थोडे कमी संशयी असतात असे ऐकले आहे...
शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.

ह्म्म् !

पारपत्र दुसर्‍या देशात जावून हरवणे हे अजूनच भयस्वप्न ! (उदा. भारतीय माणसाचे पारपत्र, जर्मन विज्यावर जर्मनीत राहताना रोममध्ये हरवणे)

माझ्या मित्राचे (भारतीय-डच विजा) पारपत्र स्वित्झर्लंडमध्ये गेलो असता भिजले. त्यावरचे सही आणि शिक्के ओघळले. आणि स्विस सीमेवर त्यांचे पोलिस पारपत्र कसून तपासतात. अतीनील किरणाच्या भिंगातून वगैरे न्याहाळतात. (आगगाडीत कुत्रा वगैरे घेवून येतात :). त्यामूळे आता परत जातान ते काही अडचण आणतील असे आम्हांस वाटत होते. माझ्या मते पोलीसला जावून पारपत्र दाखवून काही लेखी पत्र घ्यावे असे होते. पण इतरांच्या मते पारपत्र आता १ तासापूर्वी आगगाडितच भिजले असे सांगावे असे ठरले..... आणि...पोलिसाने विशेष दखलच घेतली नाही. बहुधा आम्ही स्विस च्या बाहेर जात असल्याने त्याला रस नसावा.
असो. पण जर्मन सीमेवर जर्मन पोलीसांनी जर हरकत घेतली असती तर काय !
-- (पारपत्र जीवापाड जपणारा :) लिखाळ.

त्यांनी दारुचा अर्धा पेला रिचवून भैरवी गायली आणि श्रोत्यांनी उरलेल्या अर्ध्या पेल्यावर चर्चा केली.

 
^ वर