ब्राह्मणांनो भारत सोडा..
(१) गुर्जर आन्दोलना मुळे सरकार त्यांना हवे तसे आरक्षण देणार आहे.
(२) अर्जुन सिंह यांनी तर दुसरा आरक्षण-पुरुष बनण्याचे नक्की केले आहे.
(३) पुढच्या लोकसभेच्या निवडणुकां साठी प्रायवेट कम्पन्यांमधे आरक्षण हा मुद्दा संप्रग सरकार ने राखून ठेवला आहे.
(४) मायावती यांनी नुकताच उदघोष केला कि प्रायवेट कम्पन्यांमधे सुद्धा तीस टक्के जागा आरक्षित करावी.
(५) आन्ध्रप्रदेश सरकार ने मुस्लिमांना काही टक्के आरक्षण देऊ केले आहे.
(६) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे "आरक्षण" ह्या विषयाला संविधानाच्या नऊव्या "अनुसूची" (माफ़ करा मराठी शब्द नाही माहित) मधे टाकण्याचा विचार चालू आहे, जेणेकरून सुप्रीम कोर्ट त्यात ढवळाढवळ करु शकणार नाही...
म्हणजे एक तर सरकारी नोकरी मिळण्याचे स्वप्न बघणे सोडले होतेच आता प्रायव्हेट कम्पनीज मधे पण ब्राहमणा ला जागा मिळणे अतिशय कठीण होणार आहे... हिन्दीतून एक म्हण आहे "पढे फ़ारसी, बेचे तेल"... तशी अवस्था सामान्य वर्गाची विशेषकर गरीब ब्राह्मणाची होणार आहे, समजा खूप मेहनत करून एका निम्न-मध्यम वर्गाच्या ब्राह्मणा ने चांगले मार्क्स मिळवले, पण तरी त्याचे एडमिशन चांगल्या कालेजात होणार नाही, प्रायवेट कालेजात शिक्षण घेण्याचे ठरवले तर तिथे पण कालेज चालवणारे वणिक जाडजूड फ़ीस घेतील, समजा एडमिशन झाले तरी नोकरी मिळेलच ह्याची काही गारंटी नाही, समजा सुदैवाने सरकारी नोकरी मिळाली, तर प्रमोशन होणार नाही कारण त्याच्याहून जूनियर व कमी अक्कल असलेला एसटी वर्गाचे प्रमोशन होईल, सरकारी नोकरी नाही मिळाली आणि प्रायवेट मधे जायचे ठरवले तर तिथे ही आरक्षण.... मग प्रश्न पडतो को ब्राहमण युवकांनी भारत सोडावे काय ? येथे राहून त्याची प्रतिभा कुन्द होणार नाही का ? त्याला पदोपदी अपमान सहन करावा लागणार नाही का ? अर्थात भारत सोडणे हे काही इतके सोपे नाही, आणि त्यात ही भरपूर खर्च आहेच, पण हा खर्च इतर सर्व गोष्टी पाहता परवडण्या सारखा नाही का ? कुणी आपली बाजू घेत नाही आहे, आणि कुणी ऐकून सुद्धा घेत नाही आहे, मग काय पर्याय राहतो... काही जणांना हा पळखोरपणा वाटेल परन्तु त्यावर उपाय काय, आरक्षण तर वाढतच जाणार, आम्बेडकर जरी म्हणाले असले कि ते फ़क्त दहा वर्षासाठी असावे, पण त्यांचे ऐकतयं कोण ? जेणेकरून प्रतिभाशाली ब्राह्मण युवकांनी एक गट तयार करावे, आपले परदेशात राहणारे मित्रांबरोबर मदत घेऊन, लवकरात लवकर भारत सोडून निघून जावे...
Comments
सुरुवात?
याची सुरुवात ब्राह्मण कोणाला म्हणावे? ब्राह्मण्य म्हणजे नेमके काय? जन्माधिष्ठीत की कर्माघीष्ठीत ? कुमार केतकर यांचे ब्राह्मण सभेतील भाषणात घातलेल गोंधळ? आता सरकारी ब्राह्मण कुणाला म्हणतात? का म्हणतात?" आमची टीका ब्राह्मण्यावर आहे ब्राह्मणांवर नाही असे पुरोगामी गटात गुळगुळीत झालेले वाक्य आहे त्याचा नेमका अर्थ काय्? अशी अनेक प्रश्नांची मालिका चालू होते.
'देशाचे दुश्मन' हे दिनकरराव जवळकरांच्या पुस्तकाची मूळ आवृत्ती बघावी . ( ती सहज उपलब्ध नही) केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर हे कट्टर ब्राह्मण विरोधक असूनही गांधी हत्येवेळी जी ब्राह्मणांची घरे जाळली त्याबाबत त्यांची भूमिका ही ब्राह्मणांच्या बाजूने होती,त्यातील शब्दप्रयोग व वाक्ये वाचावीत. लो. टिळकांवर जहरी टीका आहे. ( श्री बागडे यांची प्रस्तावना पण तेवढीच महत्वाची वाटते)
प्रकाश घाटपांडे
त्याच त्याच
चर्चांचे गुर्हाळ टाकू नका असे म्हणता येत नाही म्हणून प्रश्न विचारतो.
त्याच त्याच चर्चा, तेच तेच वाद आणि शेवटी कोणतेही उत्तर न निघणे या सर्वाला उपक्रमावर आरक्षण हवे का?
- राजीव.
क्या चिपूलूनकर साब.
चिपूलूनकर साहेब,
अहो,परदेशात नौकरीसाठी धावणारे तेच होते.तीच संख्या अधिक आहे,मागे राहिलेले बिच्चारे,गृहशांती,होमहवन,कंपण्याचे भुमिपूजन यात बिझी आहेत.तुम टेन्शन नही लेना भाय.त्यांनी येणा-या पिढीची व्यव्यस्था चोख करुन ठेवली आहे.आमचे घाटपांडे साहेब म्हणतात ते'देशाचे दुश्मन' एकदा चाळून नका काढू, तर वाचून काढा.
अवांतर ;) आमची टीका ब्राह्मण्यावर आहे ब्राह्मणांवर नाही ,आणि कोणाला जर ती आपल्यावर ओढवून घ्यायची असेल तर आमची टीका या दोघांवर ही नाही.हाहाहाहा. च्यायला मी एकटाच हसतोय.विठोबा रुसला तेव्हा पासून अस्सच होतंय.
का?
प्रगती होत असेल तर सोडा देश त्यात काय इतके?
असेही ब्राह्मण जेथे नोकरी मिळेल रोजी रोटी मिळेल तेथे गेलेच, मग आज त्यासाठी इतकी आरडओरड का?
आणी मग फक्त ब्राह्मणच का?
इतर सवर्णांचे काय? ठाकूर, मराठा, कुडाळदेशकर नि अजून काय काय ... त्यांनी काय घोडे मारले आहे?
त्यांनी पण जावे देश सोडून... ?? नाही जाता आले तर काय करावे?
मग ही स्थिती आणणार्या मागच्या पीढीत तर मोठ्या प्रमाणात ब्राह्मण नव्हते का नोकरशाही मध्ये?
देश सोडून गेल्यानेच प्रगती होते का? असे गेलेल्या इतरांचा काय आहे अनुभव?
देशात राहून प्रगती होतच नाही का?
सवर्णांनी नोकरीच केली पाहीजे का? का म्हणून?
इतरांकडे ही तुमचा ब्राह्मण्याचा चष्मा दूर करून बघण्याचा प्रयत्न करा... काही वेगळेही दिसून जाईल कदाचित.
आपला
गुंडोपंत
एकदम पटलं गुंडोपंत!
इतरांकडे ही तुमचा ब्राह्मण्याचा चष्मा दूर करून बघण्याचा प्रयत्न करा... काही वेगळेही दिसून जाईल कदाचित.
अगदी बरोबर...
असेही ब्राह्मण जेथे नोकरी मिळेल रोजी रोटी मिळेल तेथे गेलेच, मग आज त्यासाठी इतकी आरडओरड का?
"सरशी तिथे पारशी" च्या ऐवजी हल्ली "सरशी तिथे देशी" ही म्हण जास्त योग्य वाटते..
बरोबर गुंडोपंत
जेणेकरून प्रतिभाशाली ब्राह्मण युवकांनी एक गट तयार करावे, आपले परदेशात राहणारे मित्रांबरोबर मदत घेऊन, लवकरात लवकर भारत सोडून निघून जावे...
बाकी उरलेल्या प्रतिभाशाली जातीवंत लोकांनी भारताची प्रगती करावी म्हणजे सिलिकॉन व्हॅलीला पळालेल्या ब्राम्ह्नणांना परत येताना देश सुस्थितीत भेटेल. :-)))
अभिजित...
येडं की खुळं म्हणायचं
आवडला
गुंडोपंत, प्रतिसाद आवडला.
आयला!
"कुडाळदेशकर" ही जात इतकी "उल्लेखनीय" कधीपासून झाली? आम्हाला पत्ताच नाही. आणि अर्धे कुडाळदेशकर तरी भट व्हायला नुसते वळवळत असतात हे मला चांगलं माहीत आहे. तसं सगळीकडेच आहे म्हणा. अमेरिकेत नाही देशी लोकांना लागलीय, आपण कधी व्हाईट होऊ म्हणून?
हाहा हा!
येव्हढ्यातच वाचली हो म्हणून टाकली! मला काय माहीत त्याचे इतके तडकाफडकी तुकडे पाडाल ते...!
तरी मी आपले सांगतो हो - तो मी नव्हेच!
आपला
गुंडोपंत उपक्रमदेशकर
विषयांतरः कुडाळदेशकर सारस्वत ब्राह्मण
कुडाळदेशकर म्हणजे कोकणातील कुडाळ आणि त्या आसपासच्या परिसरातून येणारे. त्यात अठरापगड जातींचे लोक असावेत तरी प्रामुख्याने कुडाळदेशकर, बारदेसकर आणि अनेक या गौड सारस्वत ब्राह्मणांच्या जाती -पोटजाती आहेत असे समजले जाते, त्या महत्त्वाच्या आणि उल्लेखनीय नाहीत हे खरेच. गुंडोपंतांचा गैरसमज झालेला दिसतो. असो, त्यातले अर्धे भट व्हायला वळवळत असतील तर ते ब्राह्मण असून भट व्हायला निघाल्याने अनभिज्ञ (किंवा अज्ञानी आहेत) असे समजून त्यांना मोठ्या मनाने माफ करावे आणि वळवळण्याचा अधिकार सर्व सजीवांना आहे असे समजावे.
मूळ चर्चेत काडीमात्र रस नाही म्हणून या विषयांतराबद्दल क्षमस्व!
व्यक्तिशः मला ही चर्चा उपक्रमाच्या ध्येय धोरणांशी विसंगत वाटली.
नामदेवराव ढसाळ
नामदेवराव ढसाळ यांनी एकदा साडेनउ च्या बातम्यात सांगितल होते कि हल्ली ब्राम्हण राहिलेच कुठे इथे सगळे पळाते सिलिकॉन वॅली ला. संदर्भ होता आरक्षणा मुळे वाढणारी तेढ.( अर्थात ब्राह्मण ब्राह्मणेतरातील्) मुलाखत सुंदर होती.
प्रकाश घाटपांडे
भारतीयांनो जाती सोडा....
चिपलूनकर बुवा,
"ब्राह्मणांनो भारत सोडा.." असे नाव देण्या ऐवजी, "भारतीयांनो जाती सोडा.." असे म्हणून सकारात्मक रीत्या आपण मांडलेल्या मुद्द्यांवर् लिहीता अगदी टिका पण करता आली असती - एक भारतीय म्हणून, ब्राम्हण म्हणून नाही. बघा विचार करून पटतयं का आणि जमतयं का ते...
नहीतर आपण सर्वच जण म्हणत बसणार - जात नाही ती जात, आणि भारतीयपणाचा, संस्कृती इत्यादीचा फुका अभिमान बाळगत बसणार...
झकास!
नहीतर आपण सर्वच जण म्हणत बसणार - जात नाही ती जात, आणि भारतीयपणाचा, संस्कृती इत्यादीचा फुका अभिमान बाळगत बसणार...
अगदी झकास...
अगदीच पोकळ नि फुका अभिमान बाळगत बसणार... अगदी पटले...
जरा मोठ्या (जागतीक?)स्तरावर विचार केला की मगगच पटते हे... एकुणच "आपण आपण किती थोर याच्या टिमक्या वाजवण्यात अर्थ नाही.
पण आज भारतातून बाहेर येणारी मंडळीच भारताला उद्याचे भविष्य देतील यात शंका नाही. (हेच आधीही घडले आहे जगात)
तेंव्हा ते कोणत्या जातीचे आहेत नि होते हा विचार असणार नाही ही आशा !
आपला
अजातीवंत
गुंडोपंत
जानवी तोडा माणसे जोडा
जानवी तोडा माणसे जोडा असे घोषवाक्य घेउन समाजवादि चळवळीत कामे झाली आहेत.
प्रकाश घाटपांडे
पण तेही जातीयच झाले
जानवी तोडा माणसे जोडा असे घोषवाक्य घेउन समाजवादि चळवळीत कामे झाली आहेत.
हा समाजभेदीपणा झाला. म्हणून तो मान्य नाही. फक्त भारतीय म्हणणे हेच योग्य त्याच्या खालोखाल ओळख म्हणजे प्रांतावरून आणि त्याच्या वरची ओळख म्हणजे स्वकर्तुत्व. (नाहीतर आहेच : सांगे वडीलांची किर्ती तो येक मुर्ख!)
एक अनुभवः जातीशी संबधीत नाही पण या मुद्यात म्हणलेल्या भारतीयत्वाशी आहे -
काही (१०-१२) वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. Massachusetts Institute of Technology (MIT) ह्या जगद्विख्यात विश्वविद्यालयात एका प्रसिद्ध भारतीय विद्वानाचे भाषण होते - तो कार्यक्रम भारतात तत्कालीन चालू असलेल्या घटनांवरून भारताला अत्यंत (लोकांच्या) नकळत नावे ठेवायचा प्रकार होता. मला हा प्रकार एका गोष्टीसाठी आवडत नाही कारण भारताबाहेर असताना - भारताच्या बद्दल कमी करणार्या गप्पा कशाला मारायच्या. प्रत्येक व्यक्ती परदेशात स्वदेशाचे आवडो-न आवडो प्रतिनिधीत्व करते. त्यात त्या वेळेस भारताच्या बाबतीत अमेरिकन्स "one point extrapolation" करायचे. त्यामुळे तुम्ह् जसे असाल, जे भारताबद्दल बोलाल तोच त्यांच्या दृष्टीने भारत...
मी त्या कार्यक्रमात होतो. कार्यक्रम झाल्यावर काही माहीती पत्रके बाहेर वाटत होतो. त्या विद्वानाने अतिशय प्रेमाने पाठीवर हात फिरवत विचारले की मुला तू कुठल्या गटाचे प्रतिनिधित्व करतो आहेस? मी म्हणालो की फक्त भारताचे, तुम्ही कुणाचे करता? ते विद्वान (मला आदर आहे त्यांच्या बद्दल पण..) चेहेरा पाडून निघून गेले.
अजात
दै. सकाळ मधिल् एक बातमी वाचली होती , एका गावात जात अशी भानगड न मानणारे लोक होते. त्यांचे जनगणनेच्या वेळी काय लिहायचे असा प्रश्न पडला? जन गणना करणार्या सरकारी माणसाने 'अजात 'असे लिहिले . तीच त्यांची सरकार दरबारी पुढे जात झाली.
समांतर- हा विनोद नसून वास्तव आहे , कृपया जड घ्या.
प्रकाश घाटपांडे
हे वास्तव आहे
पण आता सरकारदरबारी त्यांना अडचणी येऊन राहिल्या आहेत. आणि अजात हीसुद्धा नवीन जात असल्याप्रमाणे वागणूक मिळत आहे.
अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.
अवांतर
पण आता सरकारदरबारी त्यांना अडचणी येऊन राहिल्या आहेत.
-- अजातांना त्रास देणार्या अधिकार्यांना 'अजातशत्रू' म्हणावे काय? :)
ओळख
जो पर्यंत आपण फक्त "भारतीय " ह्या एकमेव वर्गात (ओळखले) समावुन जाणार नाही तो पर्यंत हे असेच चालायचे. देशाचे, समाजाचे भले होणार नाही. कायम मतभेद आणी विभाजनाचा धोका असणार.
मुळ मुद्दा आरक्षणाचा नाहीच आहे, जास्त उमेदवार कमी संधी हा वांदा आहे.
सरकारने एतक्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहीजेत कि सर्व भारतीयांच्या आवडीच्या क्षेत्रातील शिक्षण व पुढे अर्थाजनाची सोय झाली पाहीजे शिवाय अजुन अनुशेष राहीला पाहीजे ज्या करता अन्य देशातील लोकांना संधी मिळेल.
लोकसंख्यानियंत्रण अपयश किंवा ज्या प्रमाणात लोकसंख्या निर्माण झाली त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध न होणे हा खरा प्रॉब्लेम आहे.
मुख्य चर्चा ज्या शब्दांच्या रंगात, चवीत आली आहे ती माझ्या तब्येतीला न-आवडणारी आहे.
----------------------------------
धन्यवाद = म्हणजे वाद घालण्यात धन्यता नव्हे.
सहज
सहजपणे मांडलेला पण हे वास्तव पचवायला जड असणारा मुद्दा.
प्रकाश घाटपांडे
वा सहजराव
वा सहजराव!
आपला मुद्दा पटला. मला वाटते आपल्याकडे आता व्होकेशनल शिक्षण येण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. हे कौशल्याधारीत शिक्षण खुप काही करून जाईल अशी मला खात्री आहे. यातून अनेक प्रकारच्या जाती येतील पण त्या परत कौशल्याधारीत असतील.
आपल्या एक वेगळ्या मुद्या संदर्भात - असेही जगात जाती आहेतच फक्त स्वरूप वेगवेगळे आहे. त्या कधीच जाणार नाहीत. जाऊ ही नयेत - साम्यवादात ही त्या गेल्या नाही तर काय!
जातींचे स्वरूप स्वरूप बदलेल पण त्या असतीलच.
आपला
कामकरी
गुंडोपंत
व्यावसायिक जाती
पोलिसाची जातच हलकट, कारकुन ( कारस्थान रचून कुटिलतेने नष्ट करणारा) याची जातच हलकट. वकिलाची जातच हलकट, भारतीयांची जातच हलकट, पाकिस्तन्यांची जातच हलकट ,अमक्याची जातच हलकट वगैरे उल्लेख हे जन्माधिष्टित जातीशी निगडित नसले तरी अस्मिता वा अवहेलना यात पुन्हा प्रेरित होणारच.
प्रकाश घाटपांडे
आपुन तर बा जातीचा 'कोली ' हाय! :)
.... मग प्रश्न पडतो को ब्राहमण युवकांनी भारत सोडावे काय ?
हे ज्यानेत्यानेच ठरवावे लागेल..
सुरेशराव, आपल्या बर्याचश्या प्रश्नांची आणि शंकांची उत्तरे येणारा काळच देईल असे वाटते.
जेणेकरून प्रतिभाशाली ब्राह्मण युवकांनी एक गट तयार करावे, आपले परदेशात राहणारे मित्रांबरोबर मदत घेऊन, लवकरात लवकर भारत सोडून निघून जावे...
बाय बाय आणि ऑल द बेष्ट! :) ज्यांना जायचंय त्यांनी अवश्य जावे आणि सुखी रहावे...
आपुन तर बा कधी जानवं पण नाय घातलं आणि कधी जातीचा फारसा अभिमानही बाळगला नाही. अन् तसं म्हटलं तर मनानं आपुन तर बा जातीचा 'कोली ' हाय! :)
याहूवरच्या चित्तपावन मंडळींच्या ग्रुपमध्ये आपुन धंद्याकरता शिरलो. तेथे आपल्याला विम्याचा आणि शेअर्स पोर्टफोलियो सांभाळण्याचा चांगला धंदा मिळाला,/मिळतो आहे. आपुन को क्या, अपने धंदेसे मतलब! :)
आपला,
(कुणाचाही नोकर नसलेला आणि जातीचा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता उपयोग करून घेणारा एक धंदेवाईक चित्तपावन!:) तात्या.
अपने धंदेसे मतलब!
या वरून विषयांतर करून एक आठवलेला विनोद सांगतो ... माहीती असण्याची शक्यता आहे, असल्यास क्षमस्व!
इंग्लंड मधील एका मिशनरी शाळेत शिक्षिकेने सर्वांना प्रश्न विचारला की सगळ्यात श्रेष्ठ देव कोणचा? जो बरोबर उत्तर देईल त्याला २० पाउंड मिळणार..
ज्यू म्हणाला मोझेस, टिचर म्हणाली चूक!
मुसलमान म्हणाला महंमद - परत टिचर म्हणाली चूक!
मग पटेल वर पा़ळी आली, तो म्हणाला जिझस - टिचर खूश आणि पटेलच्या हातात २० पाउंड!
पण तीला राहवले नाही म्हणून तिने त्याला विचारले की तू कसे काय जिझस म्हणालास? पटेल बाबाने (पटेल असे) उत्तर दिले: "इन माय हार्ट द ग्रेटेस्ट गॉड इज कृष्णा बट यू नो, बिझिनेस इज बिझिनेस!"
अगदी खरं!
पण तीला राहवले नाही म्हणून तिने त्याला विचारले की तू कसे काय जिझस म्हणालास? पटेल बाबाने (पटेल असे) उत्तर दिले: "इन माय हार्ट द ग्रेटेस्ट गॉड इज कृष्णा बट यू नो, बिझिनेस इज बिझिनेस!"
अगदी खरं! अहो शेवटी धर्म, जाती-पाती, त्यांचे फुकाचे अहंकार या गोष्टी दुपारी १२ वाजता आणि रात्री ९ वाजता उपयोगी पडत नाहीत! माझ्या मते कष्टाने कमवलेली 'लक्ष्मी' हीच खरी जात अन् तोच खरा धर्म!
बाकी धर्म, जातीपाती वगैरे सगळ्या भरल्या पोटी मारायच्या गप्पा आहेत असं माझं मत आहे आणि त्यात मीही कधी कधी हिरिरिने भाग वगैरे घेत असतो! :)
आपला,
(संकष्टीला मटण खाणारा चितपावन ब्राह्मणांच्या जातीला काळिमा असलेला!) तात्या.
भारत सोडून
भारत सोडून निघावे या मुद्द्यावर सहमत. पण केवळ एकाच जातीने नव्हे तर ज्यांना संधी भारतात नाही त्या कोणत्याही जातीतल्या कोणीही.
इतकी लोकसंख्या वाढते आहे, थोडी अमेरिक/युरोप/आशियाई (किंवा जिथे मनुष्यबळ कमी आहे) त्या देशांत वाटली गेली तर काही फारसे बिघडणार नाही. राहिलेल्यांचे प्रश्न, ज्यात लोकसंख्या सिंहाचा वाटा उचलते ते थोडे कमी होतील.
एक (विचित्र?) सूचना
राहिलेल्यांचे प्रश्न, ज्यात लोकसंख्या सिंहाचा वाटा उचलते ते थोडे कमी होतील.
ज्यांना इथेच रहायचे आहे त्यांनी स्वखर्चाने इतरांना भारताबाहेर पाठवावे.
भारत सोडून
विशेष सूचना:
'भारत सोडून निघावे' या माझ्या प्रतिसादाचा सूर मूळ चर्चेसारखा विध्यर्थी असला तरी 'तुम्ही सगळे जा आम्ही राहतो' असा अर्थ त्यात नाही. ज्यांना भारताबाहेर राहण्याची इच्छा आणि तितकी आर्थिक व तांत्रिक क्षमता आहे त्यांनी भारताबाहेर जावे, यात अमुक एक जातीचा प्रश्न नाही इतका एकच मुद्दा ध्वनित करायचा होता.
(चुकलंच जरा!असल्या 'कोंबडी आधी की अंडे' छापाच्या अनुत्तरीत विषयांवर प्रतिसाद देणे कधीच सोडले होते, आज उगीच दिला.)
ब्राहमणानों भारत सोडा
चर्चे वर चांगले प्रतिसाद मिळाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद,
मात्र एक पाहिले कि चर्चे ला वळण कसे देता येईल ह्यात बरेच जण हुशार आहेत... चर्चे मागच्या भावना काही लोक समजले, काहींनी उपदेश ही केले, काहींनी "ब्राहमण कोण ? ह्यालाच धरून ठेवले... असो.. पण माझ्या प्रश्नामागची भावना अशी होती कि गरीब किंवा निम्न-मध्यमवर्गीय ब्राहमणाला आता किती चांस उरलाय ह्या देशात ? आणि नाही उरलाय, तर तो कसा मिळवावा ? कुणाला ही देश / जागा सोड़ताना खुषी होत नसते, पण जेव्हां पोटा-पाण्याची व्यवस्था सम्मानजनक होत नसेल तर त्यानी काय करावे ? त्याची बाजू कुणी समजून घेत नसेल तर त्यानी काय करावे ? येथे चर्चे मधे विद्वान लोकं कुठल्या कुठे पोहोचले, आश्चर्य आहे... असो... प्रत्येकाची आपापली मतं असतांत (असायला ही पाहिजे) । भारतात "जाति" कधी संपणार नाही असे मला वाटते, म्हणून उगाच मोठ्या-मोठ्या गोष्टी कां कराव्यात ? मोठ-मोठे उपदेश... जनसंख्या नियन्त्रण करा, जाति तोडा, "सवर्णांनी नोकरीच केली पाहीजे का? का म्हणून?", (म्हणजे आता नोकरी चा पण अधिकार राहिला नाही ?), "ब्राह्मणत्वा चा चष्मा दूर करा", "ब्राह्मणात्वा चे अभिमान बाळगू नका"... वा, वा, वा काय एकाहून-एक छान प्रतिक्रिया... आम्हाला ब्राह्मणात्वा चा अभिमान मुळीच नाही (कशापाई हवा ?), पण एक मात्र नक्की कि मागील पिढी नी केलेल्या चुकांची शिक्षा मात्र आजच्या पिढी ला (आणि बहुतेक येणाऱ्या पिढी ला पण) सोसावी लागणार दिसते... मी काही मोठा विद्वान नाही... चर्चा संपवावी असे वाटते...
http://sureshchiplunkar.blogspot.com
प्रतिसाद भाग - १
सुरेश, तुम्हाला नक्कि काय म्हणायच आहे? ब्राम्हणांसाठी (उच्चवर्णीयांसाठीच्या) संधी कमी होत आहेत म्हणून भारता बाहेर जायचे? मानले बुवा.. पण मग काही प्रश्न येतात. ते असे, त्याची उत्तरे द्या जमल तर.
माझ्या वर लिहिलेल्या प्रश्नांची सविस्तर आणि जाहिर उत्तरे द्याल अशी अपेक्षा करतो. म्हणजे प्रतिसादाचा पुढचा भाग लिहितो.
मराठीत लिहा. वापरा.
बहुसंख्य्!!!
कोण मानते बुवा? की आपल्याला तसे वाटते?
ब्राह्मणांनो भारत सोडा
चाणक्य बुवा..
भारता बाहेर म्हणजे नक्कि कुठे? हे स्पष्ट केले तर पुढे लिहिणे जरा बरे पडेल.
हे स्पष्ट केल्याने उत्तरात काही बदल होणार आहे काय ?
ब्राम्हणेतरांनी भारता बाहेरजाउ नये का?
हे मात्र विषयांतर आहे, मी असे कुठे ही लिहीले नाही कि इतरांनी जाऊ नये...
भारता बाहेर जाउन नक्कि काय करायचे?
हे वेगळं सांगायची गरज आहे काय ? ज्या बुद्धिमत्तेची भारतात किंमत नाही, त्याचा बाहेर तरी उपयोग करावा...
ब्राम्हण इथले बहुसंख्य मानले जातात.
हे कुणी सांगितले ? कुठून सिद्ध झाले आहे ?
ते भारता बाहेर गेले तर लोकसंख्या कमी होउन भारताचे सगळे प्रश्न सुटतील काय? तसेच जे बहुसंख्य स्थलांतरीत होतील. त्यांना खिश्चनबहुल वा मुस्लिमबहुल देशात नक्कि काय दर्जा मिळेल?
तो दर्जा त्यांनी स्वतः च्या कतृत्वा वर मिळवावा लागेल, जो येथे कर्तृत्व दाखवून सुद्धा मिळणार नाही...
जगात भारत हा सर्वात मोठी लोकशाही असलेला एकमेव धर्मनिरपेक्ष देश आहे.
हा हा हा हा.... लोकशाही.... ज्या लोकशाही मधे जनतेच्या एक मोठ्या वर्गाची सुनवाईच नाही...
जे ब्राम्हण आजवर भारत सोडुन गेले ते जाण्याचे मुख्य कारण फक्त ते ब्राम्हण आहेत कि त्यांच्या बुद्धीमतेला चांगला पैसा, मोबदला म्हणुन मिळतो हे कारण आहे?
ते सर्व त्यांनी आपल्या कामामुळे, बुद्धिमत्ते मुळे मिळवले आहे...
मायावती आज कशामुळे सत्तेत आहेत?
ब्राहमणांमुळे तर नक्कीच नाही...
इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. त्यानुषंगाने, काहि पिढ्यांनंतर हेच चित्र उलटे असणार नाही का?
चला... म्हणजे काही पिढ्यांपर्यन्त वाट बघा...
http://sureshchiplunkar.blogspot.com
ब्राह्मणांनो भारत सोडा
हे स्पष्ट केल्याने उत्तरात काही बदल होणार आहे काय ?
होय
हे मात्र विषयांतर आहे, मी असे कुठे ही लिहीले नाही कि इतरांनी जाऊ नये...
हे विषयांतर नाही. मुळात हा प्रश्न मानसिकतेचा आहे. ती अशीच राहणार जर ब्राम्हण ब्राम्हणेतर नेहमीच एका गोष्टीसाठी वाद घालत राहिले तर.
हे कुणी सांगितले ? कुठून सिद्ध झाले आहे ? या नंतर आपणच लिहिले आहे. हा हा हा हा.... लोकशाही.... ज्या लोकशाही मधे जनतेच्या एक मोठ्या वर्गाची सुनवाईच नाही...
हे वेगळं सांगायची गरज आहे काय ? ज्या बुद्धिमत्तेची भारतात किंमत नाही, त्याचा बाहेर तरी उपयोग करावा...
असे कोणी सांगितले? भारता बाहेर अशी किती किंमत आहे? भारतीय फक्त कमी पैस्यात काम करणारे कामगार आहेत जगासाठी. बुद्धीमान आहेत तर मग इतकि वर्षे भारतात काय बसुन रवंथ करत होते का?
तो दर्जा त्यांनी स्वतः च्या कतृत्वा वर मिळवावा लागेल, जो येथे कर्तृत्व दाखवून सुद्धा मिळणार नाही...
असे सगळे म्हणत असले तर नक्कि मान्य करता येईल. कोणी एकच म्हणतो आहे म्हणून नव्हे.
ब्राहमणांमुळे तर नक्कीच नाही...
हा चक्क विनोद आहे.
चला... म्हणजे काही पिढ्यांपर्यन्त वाट बघा...
हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. ज्याला मार्ग काढायचा आहे तो काढतो आहेच.
टिपः सुरेश, कृपया गैरसमज करून घेउ नका. हा विषय पिढ्या न पिढ्या चालणारा आहे. आपला मुळ मुद्दा बरोबर आहे कि भारतात ब्राम्हणांचा वाली कोणीच नाही. पण तसा तो भारता बाहेर सुद्धा कोणी नाही. भारतात आधी धार्मिक तेढ, मग जातीय असे पसरवणे हे राजकारण्याचे खेळ आहेत. आपल्याला जे पटतय ते आपण कराव. इतर लोकांसारखी ब्राम्हणांकडे एकी नाही हे सुद्धा सत्य आहे. तसेच जसे जर्मन लोकांना हिटलरचे नाव लावल्याने कलंक आहे तसेच काहि मुठभर जुन्या पिढीतल्या ब्राम्हणांमुळे आजचे ब्राम्हण सुद्धा पिडीत आहेत हे सुद्धा सत्यच आहे. नाही का?
मराठीत लिहा. वापरा.
ब्राह्मणानों भारत सोडा
टिपः सुरेश, कृपया गैरसमज करून घेउ नका. हा विषय पिढ्या न पिढ्या चालणारा आहे. आपला मुळ मुद्दा बरोबर आहे कि भारतात ब्राम्हणांचा वाली कोणीच नाही. पण तसा तो भारता बाहेर सुद्धा कोणी नाही. भारतात आधी धार्मिक तेढ, मग जातीय असे पसरवणे हे राजकारण्याचे खेळ आहेत. आपल्याला जे पटतय ते आपण कराव. इतर लोकांसारखी ब्राम्हणांकडे एकी नाही हे सुद्धा सत्य आहे. तसेच जसे जर्मन लोकांना हिटलरचे नाव लावल्याने कलंक आहे तसेच काहि मुठभर जुन्या पिढीतल्या ब्राम्हणांमुळे आजचे ब्राम्हण सुद्धा पिडीत आहेत हे सुद्धा सत्यच आहे. नाही का?
चला माझे म्हणणे काही तरी पटले तर, ह्यातच समाधान...तुमच्या ह्या "टिप" मधेच सगळं आलं... माझ्या एका मित्राच्या मुलाला आयआयटी च्या परीक्षेत जेवढे अंक मिळाले, त्याच्या दहा पटी ने कमी त्याची रैंकिंग होती, त्याच्या दलित मित्राच्या तुलनेत (ज्याला त्याच्या हून खूप कमी अंक होते), आता सांगा... मी त्या युवकाला काय सांगू ? कि बाबा, तू डोळे फ़ोडून अभ्यास केला ती तुझी चूक होती ? आणि तू ह्या पिढीत जन्माला आला ही पण तुझीच चूक आहे... आता असं कर कि तू इंजीनियर व्हायचे स्वप्न सोडून दे आणि किराणा दुकान उघड़, किंवा ट्रांसपोर्ट चे काम कर... योग्यते विषयी बरेच काही बोलले जाते, एक उदाहरण देतो... एका सरकारी खात्यात एक टायपिस्ट-कम-क्लर्क आहे गेली वीस वर्षे पासून, अर्थातच त्याची कामाची गुणवत्ता चांगली आहे... पण त्याच्या मागाहून आलेला एक दलित मित्र ज्याला मात्र ५-६ वर्षे नोकरी झालेली, तो आता त्याचा बॉस झाला आहे प्रमोशन घेवून आणि हा बिचारा तसाच क्लर्क, मग कुठे गेली गुणवत्ता ? असे बरेच उदाहरण देवू शकतो (पुराव्यासह)... पण एका वर अन्याय झाला (पिढ्यांपूर्वी) आणि त्या अन्यायाचा परिष्कार करायचा म्ह्णून दुसऱ्यावर अन्याय करा... हे काही जमत नाही भाऊ.. पण... ह्या पण मधेच सर्व काही आले... मी चार ओळी लिहील्या किंवा तुम्हीं चार ओळी विरोधात लिहील्यामुळे काही होणार नाही आहे... हे असेच चालू रहाणार...
टिप : मी कधीही गैरसमज करून घेत नाही आणि कुठल्या ही विरोधाला मी सकारात्मक रीत्या घेतो... वाद-विवाद हे चालतच रहाणार हो... ह्याला लोकतंत्र म्हणतात... त्याला नाही जे दिल्लीत चालू असते :) एकदा पुनश्च - तुमची टीप मात्र आवड़ली... :)
http://sureshchiplunkar.blogspot.com
धन्यवाद
अहो असे पिडीत किती म्हणून दाखवू. यालाच आपण भारत म्हणतो. मुळातच हिंदुत्व हि संकल्पना आहे ज्याला लोक धर्मांधता म्हणतात. मग त्यात जातिय तेढ वाढवून आपले खिसे भरून घेतात. त्यांना कोणी काही करत नाही. आज जे चालले आहे तो अतिरेक आहे हे इतरांना सुद्धा पटते पण स्वार्थीपणा मुळे सर्वजण न बोलता फायदा करून घेत आहेत. असेच सुरू राहिले तर निदान भारतात उच्चवर्णीय राहणारच नाहित. मग आरक्षण ठेवणार कोणासाठी आणि बोंब कोणाच्या नावाने मारणार. इतर मार्ग शोधणे सर्वांनाच जमते असे नाही. जे बुद्धी आणि जिद्दीच्या जोरावर काही करू शकतात ते करतातच.
मराठीत लिहा. वापरा.
माफ करा चिपळूणकर साहेब,
प्रमोशनचे उदाहरण असतील तुमच्या डोळ्यासमोर, खरेही असेल ती प्रवेशाची गोष्ट. पण अजून तुम्ही पाहिले आहे का ते कोणत्या मेहनतीने प्राविण्य मिळवितात ते.अहो त्याचे सत्तर टक्के हे कागदावर आहेत पण त्याने नव्वद टक्क्याची बरोबरी केली आहे असे नाही का तुम्हाला वाटत.अहो त्याच्या घरातल्या सुविधाही पहा त्याने ज्या परिस्थितीतून हे सर्व सहन करत त्याने शिक्षन घेतले आहे,तेव्हा त्याच्या गुणाकडे दुर्लक्ष करणार का ? त्याचेही मुल्यमापन झाले पाहिजे असे वाटते.स्कॉलरशीप मिळत असेल तर शिक्षन घेणे परवडेल,असे सांगणारे किती विद्यार्थी सांगु साहेब तुम्हाला.
ब्राह्मणानो...
पण अजून तुम्ही पाहिले आहे का ते कोणत्या मेहनतीने प्राविण्य मिळवितात ते.अहो त्याचे सत्तर टक्के हे कागदावर आहेत पण त्याने नव्वद टक्क्याची बरोबरी केली आहे असे नाही का तुम्हाला वाटत.अहो त्याच्या घरातल्या सुविधाही पहा त्याने ज्या परिस्थितीतून हे सर्व सहन करत त्याने शिक्षन घेतले आहे,तेव्हा त्याच्या गुणाकडे दुर्लक्ष करणार का ?
अहो... त्या उदाहरणात (आणि अश्या अनेक उदाहरणात, त्या प्रमोशन मिळालेल्या इसमाला सादे एक पत्र सुद्धा लिहीता येत नाही हो... आणि एका केस चे उदाहरण - एक प्रमोशन मिळालेले इंजीनियर साहेब आपल्या क्लर्क कडून "एस्टीमेट" कसा बनवायचा हे शिकत आहेत) आणि संघर्ष, परिस्थिति वगैरा सोडा़ हो... त्यांचे वडील पण एक अधिकारी आहेत आणि घरात काही आणीबाणी ची परिस्थिति नाही... सुशील कुमार शिन्दे यांचा मुलाला कशापायी आरक्षण द्यावे ? त्यानी कुठला "संघर्ष" केला आहे ? किंवा त्याच्या वर अत्याचार झाला आहे ? आरक्षण ची मलाई पात्र व्यक्ति पर्यन्त पोहोचतच नाहीये, ती मधल्यामधे खाल्ली जात आहे..
http://sureshchiplunkar.blogspot.com
आरक्षण पोहचत नाही.
फक्त अशा आरक्षणाने बढती मिळाल्यांनाच पत्र लिहिता येत नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला.त्या सदगृहस्थाप्रमाणे खुल्या वर्गातील अनेक पात्र अधिकारी वर्गही तसाच असतो.त्यात काही नवल नाही.
आरक्षण ची मलाई पात्र व्यक्ति पर्यन्त पोहोचतच नाहीये, ती मधल्यामधे खाल्ली जात आहे..
हेच वाक्य सर्वात मह्त्वाचे आहे आणि यातले "मलाई" सोडून बाकी वाक्याशी आपल्याशी पूर्णपणे सहमत आहे.
अवांतर:- "मलाई" इथे उपहासपूर्ण वाटतो.आरक्षण हा त्या पात्र व्यक्तिंचा हक्क आहे. (ह्.घ्या)
नवा विषय
"
हक्क आणि सवलत. माझ एक् परिचित जातपडताळणी विभागातील प्रामाणिक व आदिवासी समाजातून आलेले पोलिस अधिकारी (सायकल वापरणारे ( ज्यांना शिक्षा म्हणून तिथे टाकले होते) खाजगीत म्हणाले "इथे इतक्या बोगस जातीचे फायदे घेणारे लोक आहेत,(७० ते ७५ %) कि बोगस लोकांवर कारवाई करणे महा कठीण. अपवाद थोडे अस्तील तर नियमांना अर्थ असतो. पण वाईट याचेच वाटते कि त्यामुळे खरा गरजू वंचित व उपेक्षित राह्तो."
प्रकाश घाटपांडे
ब्राह्मणांनो...
एकदम सहमत घाटपांडे साहेब,
म्हणूनच मी "मलाई" शब्दाचा उपयोग केला होता... आणि महिला आरक्षणाचे पण तेच होणार आहे.. (बल्कि होतयं)
http://sureshchiplunkar.blogspot.com
चर्चा
या स्वरूपाच्या चर्चा आधीही झाल्या आहेत. त्यामुळे अगदी थोडक्यात मत देतो.
- आरक्षणामुळे भारतात नोकरी मिळवणे अवघड (काही बाबतीत अशक्य ) झाले आहे.
- यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी जगात जिथे मिळेल/आवडेल तिथे जावे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
ब्राह्मणांनो...
उत्तरप्रदेशात काही ग्रेजुएट ब्राह्मण युवकांनी नगर निगम च्या भर्ती मधे "सफ़ाईकर्मी" साठी आवेदन केले व त्यांची निवड़ ही झाली, पण आश्चर्य असे कि त्यांचा विरोध त्यांचे स्वकीय नाही करत आहेत, बल्कि तिथे वर्षानुवर्षे काम करणारे दलित आणि त्यांचे नातेवाईक करत आहेत, त्यांचे म्हणणे असे कि "हे काम आमच्या लोकांचे आहे आणि आम्हीच ते करणार" ब्राह्मणांना "सफ़ाईकर्मी" म्हणून खपवून घेणार नाही... आता तुम्हीं ह्याला काय म्हणणार ? आणि त्या ब्राह्मण युवकांनी काय करावे ?
http://sureshchiplunkar.blogspot.com
आरक्षण
ठराविक कार्यक्षेत्रे आपल्या जातबंधूंचे कुरण आहे असा त्यांचा गैरसमज दिसतो. त्या ब्राम्हण युवकांनी सफाईकर्मींमध्ये ब्राह्मणांसाठी आरक्षणाची मागणी करावी.
ब्राम्हण युवकांनी सफाईकर्मींमध्ये ब्राह्मणांसाठी आरक्षणाची मागणी
नाहि तरि शनकराचारयाच्या पोष्त्त् मध्ये ब्राम्हनाना १०० % आरक्षण आहेच् !
तिथे जर हिन्दूतल्या "सफ़ाईकर्मीनी "दावा केला तर!
यावरुन आठवले
डॉ आ.ह. साळुंखे हे संस्कृत व तत्वज्ञानाचे प्राध्यापक. सातार्याचे विवेकशील विचारवंत . धर्म व संस्कृतीवर अनेक पुस्तके आहेत. चार्वाक दर्शन हे त्यांचे खूपच सुंदर आहे, ते एकदा शंकराचार्यांना( कुठल्या पीठाचे ते माहीत नाही) भेटायला गेले. ( चर्चा करण्यासाठी) त्यावेळी केवळ ते (जन्माने) ब्राह्मण नाहीत म्हणून शंकराचार्यानी खंडन मंडनास् नकार दिला. मला ही गोष्ट निषेधार्ह वाटते. ( खरं कारण असेही असण्याची शक्यता आहे की साळुंख्यांनी शंकराचार्यांन निरुत्तर केले असते) पण साळुंख्यांचा विवेक त्यामुळे ढळला नाही.
प्रकाश घाटपांडे
ब्राह्मणांनो...
घाटपांडे साहेब
ह्या अशा मनोवृत्तिनेच तर घात केला आहे ना... पण ते शंकराचार्यां ना कोण समजावणार ?
आणि ब्राह्मण युवक "सफ़ाईकर्मी" ची नोकरी करायला सुद्धा तयार झाले आहेत, तर "योग्यता" आणि "गुणवत्ता" बद्दल बोलणारे बन्धु लोकं तिथे ही तो "क्रायटेरिया" ठेवायला तयार आहेत काय ? म्हणजे कोण जास्त चांगल्या रीत्या नाल्या व संडास स्वच्छ करतो, त्यालाच नोकरी द्यावी ? आहे ना मजेदार.. म्हणजे सगळ माझंच-माझं, तुझं काहीच नाही.. समजा ब्राह्मण भीक मागायला मन्दिरा बाहेर बसले तरी तिथे पण त्यांचा विरोध होणार, हे अटळ आहे..
http://sureshchiplunkar.blogspot.com
मनोवृत्तिनेच तर घात केला .
चिपलूणकर सेठ,
ह्या अशा मनोवृत्तिनेच तर घात केला आहे ना...
या बाबत आमचे मत असे आहे की,ही मनोवृत्ती आत्ताची नव्हे तीला हजारो वर्षाची थोर परंपरा आहे.ठीक आहे ब्राम्हणांना आरक्षण दिले तर ब्राम्हणांचे सर्व प्रश्न सुटणार आहेत का ? समजा नाल्या संडास साफ करण्याच्या कामात आले तर येऊद्यावे खुशाल .(इथे बरी गुणवत्तेची आठवण होत आहे.गुणवत्ता असुन ही नाकारल्या गेलेला एकलव्य कसा विसरता.)किंवा समजा ब्राह्मण(नव्हे कोणीही ) भीक मागायला मन्दिरा बाहेर बसले तरी तिथे पण कोणीतरी विरोध करणारच. कारण येणा-या काळात पैसा मिळत असेल तर वाट्टेल ते काम करण्याची तयारी इथे प्रत्येकाचीच असेल, इथे मात्र आपण पात्रतेचा विचार करता आहात.याच्याच अगोदर त्यांच्या आज्ज्याने हे आमचे काम नव्हे असे म्हटले होते.तेही जाऊद्या.हा सर्व खटाटोप सरकारी नोकरी मिळावी यासाठी दिसतो.आणि आरक्षणाला विरोध यातुनच आला आहे.आता त्यांनी सर्व गोत्र सोडून,पारंपारिक व्यवसाय सोडून आता ते बारा बलूतेदाराचे काम करत आहेत, आम्ही ही आनंदाची गोष्ट समजतो,(त्यांनी इकडे येऊन कोणाच्याही व्यवसायात घुसखोरी केली तर चालते,फक्त इकडच्यांनी तिकडे येऊ नये हे मात्र कसोशीने पाळल्या जात आहे.त्यांना कोणी अडविले हा प्रश्नही विचारु नये.)कारण ते अधिक पात्रताधारक आहेत ;) (ही जाणिव या पन्नास वर्षातच झाली.हाहाहा) तो त्यांचा स्वभावच आहे.या पन्नास वर्षातच सर्वांना समान संधीचा नारा असतांना जराशी संधी मिळेना तर किती वेदना होताहेत, तरी बरे त्या आरक्षणातही असंख्य वर्गवारी आहे,म्हणून ठीक आहे.सर्वांना समान पातळीवर आणतांना तराजूचे माप खाली वर होते इतकेच.ते समान पातळीवर येण्यासाठी (आणखी किती वर्ष असाही प्रश्न विचारु नये.) थोडी कळ प्रत्येकालाच सोसावी लागते,आणि ती सोसली पाहिजे असे वाटते.
अवांतर ;) आमच्या चर्चेचा रोख खेळीमेळीचाच आहे.त्या शहाण्या प्राध्यापकाचा ब्राम्हणाला विरोध दिसतो असा अर्थ कृपया कोणी घेऊ नये. तसा अर्थ कोणी घेत असल्यास,तो त्यांचा ... काय लिहू सुचेना ;)
समजा ब्राह्मण भीक मागायला मन्दिरा बाहेर बसले तरी तिथे पण त्यांचा
अजुन तरि ब्राह्मण भीक मागायला मन्दिरात बसतात आनि ते तिथला मलिदा
ब्राह्मनेतराना दयायला तयार नाही .
जिलानींचे दोन षटकार.
जिलानी सेठ,
आपले दोन्ही ही प्रतिसाद उत्तमच आहे.मलिदा,आणि शंकराचार्यांच्या पोष्ट .
या सर्व प्रतिसादातले दोन उत्तम नव्हे उत्तुंग षटकार आहेत ते.
अवांतर ;) जरा जमले तर आपले नाव मराठीतून करता का ?
नाही केले तरी आपले काही म्हणने नाही.मराठीत केले तर जीवाभावाचा माणूस भेटला असे वाटेल,बाकी काय ;)
लोकसंख्या
या सर्व प्रकाराला लोकसंख्या हा एक प्रत्यक्ष भागिदार असे कोणाला नाही का वाटत? तसेच ज्यांना आरक्षण हवे ते दिले जाते. मुख्यत्वे ते हिंदु धर्मातील विविध जातींसाठी आहे. पण मग हेच लोक धर्म बदलतात आणि सवलती/आरक्षण सुद्धा मागतात. हे कितपत न्याय आहे? तसेच इतर धर्मीयांना आरक्षण वगैरे हे मुद्दे आहेतच. त्यात ब्राम्हणांचा काय दोष? जसे प्राध्यापक साहेब म्हणतात तसेच. हे लिहिणे म्हणजे ब्राम्हणाची पाठराखण करणे नव्हे. इथे प्रत्येकजण जातीवर मग धर्मावर आरक्षण मागु लागला आहे. याचा शेवट काय होईल? लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांना मिळून १००% आरक्षण कि काही घातक परिणाम?
मराठीत लिहा. वापरा.