सुट्टीचा एकच दिवस...
उपक्रमींनो मागे आपण उत्पादने, सेवाक्षेत्र आणि भारतीय हि चर्चा केली. त्याचर्चेचा कुठेतरी अप्रत्यक्ष संबंध लावत ही चर्चा सुरू करत आहे.
गेले काही दिवस अनेक वृत्तपत्रांमध्ये हि बातमी झळकत आहे आणि तो एक चर्चेचा विषय बनला आहे. विषय असा आहे कि माहिती तंत्रज्ञान आणि निगडीत व्यवसायांमध्ये आता आठवड्यात फक्त एकच दिवस सुटीचा असेल. ५ दिवसांचा कामाचा आठवडा याची सवय झालेल्यांना हे पचवणे जरा जड जात आहे. बेंगलोर मध्ये काही ठिकाणी हे सत्यात येणार आहे. नारायण मुर्ती यांनी याचे समर्थन केले आहे.
जिथे सेवा पुरवून प्रत्येक तासाचा प्रत्येक माणसाचा मोबदला घेतला जातो तिथे कामाचा काळ वाढवून तोटा न होउ देणे हा एकच मार्ग सध्या दिसतो आहे. या मुद्यामध्ये अनेक प्रश्न दडले आहेत. आपल्याला काय वाटत? याचे दुरगामी परिणाम काय होतील? काही मुद्दे समोर येतात ते असे...
- जे होते आहे ते कोणाच्याच हातात नाही. तसेच अपरिहार्य आहे. दुसरा उपायच नाही.
- असे होण्या पेक्षा आम्हाला रुपया सबल होणे हानीकारक आहे.
- ६ दिवसांचा कामाचा आठवडा हे जीवावर येणे हे स्वार्थाचे लक्षण आहे.
- एक उपाय म्हणून कामाचा आठवडा ५ दिवसांचाच असावा. पण दिवस-रात्र पाळीत काम (बी. पी. ओ. आगोदरच करतात) करावे.
- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आता जास्त राम आणि पैसा नाही राहिला. आता दुसरे क्षेत्र निवडलेले बरे..
- काहीही फरक पडणार नाही. शनिवारचे काम आम्ही करतोच आहोत. ते आता कागदोपत्री होईल हाच काय तो फरक.
- ६ दिवसांचा कामाचा आठवडा झाल्याने कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल...
आपल्याला काय वाटतं?
Comments
१,४,७
शनीवार रवीवार सुट्टी एक दिवस कामे/भेटीगाठी आणि दुसरा दिवस विश्रांती यासाठी बरी पडते.
तसेच आधीच सूर्य उगवताना कामावर गेलेला आयटीतला माणूस रोज सूर्य मावळल्यावर घरी परत येतो. जसे 'शनीवार आम्ही काम करतोच, फक्त ते कागदोपत्री होईल' आहे तसेच 'आम्ही तसेपण रोज १०-११ तास काम करतो, मग सरळ कामाचे कागदोपत्री तास ११ तास रोज ठेवून आमची शनीवारची सुट्टी कायम राहू द्या' का नाही?
आणि रुपयाच्या चलनातील बदलामुळे आता ६ दिवसाचा आठवडा करणारे साहेब जर '६ दिवस आठवडा कागदो पत्री, रोजच्यासारखे ११ तास काम अकागदोपत्री,रवीवारी आपलं फक्त २ तास येऊन महत्वाची कामं उरकणं अकागदोपत्री' करायला लागले तर त्यांचे हात कोण धरणार?
आजही बर्याच भारतीय कचेर्या आहेत ज्या अमेरिकन प्रमाणवेळेत काम करण्यासाठी कर्मचार्यांना रात्री ३ पर्यंत थांबवतात, आणि त्याच्याच दुसर्या दिवशी 'ऑफीस टाइम हा असा आहे' या नियमावर बोट ठेवून त्यांना सकाळी ९ ला कचेरीत हजर रहायलाही लावतात.
इतर उत्पादन क्षेत्रांसारखे आयटीत एखाद्या कामाला लागणारा किमान वेळ याची गणिते पटकन इतके माणसे* इतके तास=इतके काम असे गणित करुन काढता येत नाहीत. आणि याचाच फायदा घेऊन प्रसिद्ध आयटी कचेर्यांची उंदिरशर्यत चाललेली असते. 'तमुक कचेरी ५०० तासात करते काय, आम्ही ४५० तासात करतो, आम्हाला ऑर्डर द्या' या स्पर्धेत हळूहळू तास कमी कमी होत जातात आणि कमी तासात काम करण्यासाठी त्या टोळीचे कर्मचारी अक्षरशः रात्रंदिवस कचेरीत काढतात. झोपा येतात म्हणून सारखे चहा कॉफ्या सिगरेटी मारतात,आणि या सर्वांत कामाची प्रत आपोआप खालावतात.
'६ दिवस काम करु, आणि रोज लवकर घरी जा' म्हणताय खरे, पण नंतर यातला वाकयाचा दुसरा भाग सोयीस्करपणे विसरला गेला तर दाद कोणाकडे मागणार?
(शु. चि. केलेला नाही)
का नाही?
इतके तास=इतके काम
हे का शक्य नाही? आमचा अनुभव असा सांगतो कि एखादे काम देताना तुम्ही हे किती वेळात करू शकता हे पहिला विचारले जाते. आता हा वेळ किती हे सांगताना काही आडाखे बांधले जातात.
चर्चा पुढे जाइल तसे मुद्दे येतीलच. त्यावेळी याचे स्पष्टीकरण देने योग्य ठरेल. नाही का?
मराठीत लिहा. वापरा.
५ अथवा ६ दिवस
तसा काहीच फरक पडत नाही. काम करणार्या नोकराला मालक म्हणेल ते बरेच वेळा करावे लागते. बहुसंख्य लोकांना रोज काम करावे लागते (मुख्य उदाहरण - गृहीणी, आईला खर्या अर्थाने सुटी घेतलेले पाहीले आहे काय? ) पटले का? रोजंदारीवर काम करणार्या कितीतरी कष्टकर्यांना रोज खपावेच लागते.
असो जादा काम, जादा उलाढाल , जादा संधी, जादा महसुल, वाढती अर्थव्यवस्था, देशाच्या विकासाला हातभार..
कौटुंबिक स्वास्थ्य हे प्रत्येक कुटूंब सदस्याच्या वर्तनावर आणी त्यासाठी (स्वास्थ्य) घेणार्या परिश्रमावर अवलंबुन आहे. जो काही वेळ कुटूंबासाठी मिळेल त्याचा योग्य वापर केला तर कौटुंबिक स्वास्थ्य छानच राहील. ("quality time" rather than quantity of time) काही कुटूंब सदस्याच्यात असे मतभेद असतात की ते जितका कमी वेळ एकत्र घालवतील तेवढे उत्तम (हा हा हा)
मी एवढेच म्हणेन की मालक वर्गाने कंपनी नीती (company policies) फमिली फ्रेंडली ठेवाव्यात. जमले तर जास्त सुट्या द्याव्यात. कामगाराला त्याच्या कुटूंबाला जास्त चांगले ठेवता येईल हे पहावे.
नवे काम
अनेकदा कमी पगारात काम चालवून घेण्यासाठी कमी अनुभवी/शून्य अनुभवी लोक घेतले जातात. नवे काम हाती घेताना आपल्या पाशी त्या कामातले कुशल प्रोग्रामर कामगार किती आहेत हे गणित मिळणार्या पैशाच्या लोभात विचारात घेतले जात नाही.
'अमके तमके तंत्रज्ञान तुझं तू शीक आणि काम करुन दे' असे म्हणून 'हे काम किती वेळात करशील' विचारले तर अमक्या तमक्याकडे त्याचे काय उत्तर असेल? हे उत्तर काम देणाराच मग देतो, 'तू इतक्या इतक्या वेळात पूर्ण करुन दे.' आता हा काम देणारा किंवा कामाचे तपशील ठरवणारा माणूस सूज्ञ असला तर ठीक नाहीतर काम मिळतंय आणि आपण दुसर्यांपेक्षा लवकर करुन देतो या कैफात 'इतका इतका वेळ' खरोखर लागणार्या वेळापेक्षा कमी नसेल कशावरुन ? मग काही वेळा प्रोग्रामरचे नाव बदलून त्याचा 'मरमर' होतो आणि घड्याळाचा काटा न बघता कामाची तारीख पाहिली जाते.
(शु. चि. परत केलेला नाही.(आळशी)अनु)
दूरगामी परिणाम
वरीलपैकी सध्या एकाच मुद्दयावर लिहिते.
माहितीतंत्रज्ञानात काम करणार्या लोकांना बौद्धिक शीण नावाचा थकवा येत असावाच. सहा दिवसांचा आठवडा केला तर सहा दिवसांत काम संपेलच असे व्यावहारिक वाटत नाही. त्यामुळे राहिलेल्या रविवारीही काम केले जाईल किंवा घरी नेले जाईल.
कमी वेळात अधिक काम करणे, रात्र-दिवसपाळी याबद्दल कुरकुर न करणे इ. इ. गोष्टींतून अनेक आयटी कंपन्या ज्युनिअर स्टाफ घेतात. याचा कामावर विपरित परिणाम घडलेला दिसून येतो.
रात्र-दिवसपाळी करणे हे एका विशिष्ट वयात शक्य असले तरी नंतर कौटुंबिक जबाबदार्या, स्वास्थ्य या सर्वांमुळे फारसे फीजीबल वाटत नाही.
काम हे काम आहे
काम हे काम आहे. आता माहिती तंत्रज्ञानातले काम हेच फक्त बुद्धीचे आहे म्हणणे योग्य वाटत नाही. वाहन उद्योगात डिझाइन क्षेत्रात काम करणारे रात्र-दिवसपाळी करतात. त्यांचे काम सुद्धा बुद्धीचेच आहे. नव्हे तर बौद्धिक आणि शारिरीक श्रमांचे आहे. हे लोक कित्येक वर्षे करत येत आहेतच. उत्पादन जीवनचक्राचा कालावधी कमी करणे हे एक उद्दीष्ट त्यामध्ये आहेच. जे उद्या माहिती तंत्रज्ञानाला लागू होईल. तसेच बी. पी. ओ. चे काम हे खरच बौद्धीक श्रमांचे आहे का?
मराठीत लिहा. वापरा.
या बद्दल कसे?
घरून काम - या बद्दल कसे? या मुळे अनेक प्रश्न निकालात निघतील. प्रश्न आहे तो फक्त विदा सुरक्षेचा. पण हा सगळ्याचा सुवर्ण मध्य वाटतो. भारतीय मानसिकता पाहता विदा सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे. यावर तज्ञ लोक प्रकाश टाकतील अशी अपेक्षा आहे. तसेच कामाचे तास अथवा कामाचे दिवस वाढवताना महिलांची सोय पाहणे हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. कचेर्यांनी पाळणाघराची सोय ठेवल्यास अनेक जोडप्यांची मोठी सोय होईल. पण हे शक्य आहे मोठ्या कचेर्यांसाठी लहान कचेर्यांसाठी काय? लहान माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा यात निभाव लागेल का? तसेच हा प्रश्न मोठा आहे तो डॉलर मध्ये पैसा कमवणार्या कंपन्यांसाठी. जे मुख्यत्वे युरो मध्ये पैसा कमावतात त्यांना फारसा फरक नाही पडणार.
मराठीत लिहा. वापरा.
वाईट प्रथा
माहिती तंत्रज्ञान व निगडीत व्यवसायांमधील कामाचे स्वरुप हे वेळेशी बांधील नसते. अनु यांनी सांगितल्याप्रमाणे प्रोजेक्ट मिळवण्यासाठी अगदी कमी दर व अतिशय कमी कालावधीत तो पूर्ण करण्याची हमी ग्राहकाला दिली जाते. काम करणार्या व्यक्तीची ते काम करण्याची क्षमता, त्याला उपलब्ध साधने यांचा विचार केला जात नाही.
अनेक आयटी कंपन्यांमध्ये तुलनेने अतिशय कमी पगार (अगदी रु. ४ ते ५ हजारापेक्षाही कमी) दिला जातो मात्र कामाची अपेक्षा मात्र अर्थातच कमी नसते.
कौटुंबिक स्वास्थ्याच्या अनुषंगाने सामनामध्ये आलेली ही बातमी वाचा.
उद्या डॉलरचा भाव ३५ रुपयांपर्यंत खाली आला तर रविवारीही कामाला बोलावले जाईल किंवा कसे यावर चिंतन सुरु आहे.
बातमी
ही बातमी चेन्नई ऐवजी पुणे लिहिले असते तरी याच प्रकारचा परिसंवाद आय टी जोडिदार शोधताना यावर परिसंवाद होता त्यावेळि व्यक्त झाला होता. साथ साथ् , मिळून सार्याजणि यांनी आयोजित केला होता.
प्रकाश घाटपांडे
६ दिवस
६ दिवस काम आणि आठवडा आठ दिवसांचा करावा. म्हणजे फार वाईट वाटणार नाही.
अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.
अरे वा!
आठवड्याचे सहा दिवस काम? म्हणजे उपक्रमावरील लेख/चर्चा/प्रतिसाद ह्यामध्ये चांगलीच वाढ होणार तर :-)
कामाच्या वेळेस उपक्रमवर.
आठवड्याचे सहा दिवस काम? म्हणजे उपक्रमावरील लेख/चर्चा/प्रतिसाद ह्यामध्ये चांगलीच वाढ होणार तर :-)
लोक कामाच्या वेळेत उपक्रमवर असतात,सुट्टीच्या दिवशी लोक विक एन्ड साजरा करतात.आणि आम्ही सुट्टीच्या दिवशी,आणि दिवसभर पोटापाण्याच्या उद्योगानंतर राहिलेल्या लेखांना प्रतिसाद देत असतो आणि मग संसार.तरी म्हटले,रविवारी दिवसभरात आलेल्या सदस्यात प्रा.डॊ.दिलीप बिरुटे हे एकच नाव का दिसते.
अवांतर ;) विठोबा रुसल्यापासून आम्ही आमचा दिनक्रम बदलला आहे. महाविद्यालय,संसार,वाचन,फेरफटका,अन आता कधीतरी उपक्रम.
उपक्रमावरील वेळ
उपक्रमावर बरेच भारतातून भारतीय असतात असे वाटते. मी बॉस्टनच्या संद्याकाळी अथवा ४-५ वाजता जर पाहू लागलो, तर सन्नाटा असतो..
५ दिवसच असावे!
काम फक्त ५ दिवसच असावे असे माझे कामगार या नात्याने मत आहे.
आपला
कामचोर
गुंडोपंत
तास
१२ तास काम आणि ५ दिवस असे चालेल का? हा ही एक पर्याय आहे.
मराठीत लिहा. वापरा.
८ तास काम आणी तेही
८ तास काम आणी तेही फक्त पाचच दिवस असावे!
याशिवाय कोणतेही म्हणणे मान्य नाही - मान्य नाही - मान्य नाही!!
माणसाला माणूस म्हणून जगताच आले पाहिजे!
८ तास काम तेही फक्त ५ दिवस!
आपला
गुंडोपंत कामसु
कॉफी की कप?
आजच एक फॉरवर्ड मेल आला. विविध कंपन्यामध्ये उच्च पदांवर काम करणार्या माजी विद्यार्थ्यांचा समूह त्यांच्या महाविद्यालयातील आवडत्या प्राध्यापकांकडे एके दिवशी एकत्र भेटतात. गप्पा रंगतात. सर्वांची एकच तक्रार असते. कामाच्या व्यापामूळे एकमेंकांना भेटण्यास वेळ मिळत नाही. आणि कुटूंबाला सुद्धा वेळ देऊ शकत नाही. तणाव जाणवतो.
...प्राध्यापक सर्वांना कॉफी बनवून आणतात. प्रत्येक कप वेगवेगळ्या रंगांचे व कमी अधिक प्रमाणात आकर्षक असतात. काही उंची तर काही साधे. ट्रे समोर ठेवल्यावर प्रत्येकजण चांगला व आकर्षक कप उचलण्यास लगबगीने पुढे सरसावतात.
प्राध्यापक म्हणतात " तुम्ही सर्वांनी आकर्षक कप लगबगीने उचललात. सर्वोत्तम ते घेणं हे तुमच्या दृष्टीने स्वाभाविक आहे, परंतु तुम्हा सर्वांना कॉफी प्यायची होती, कप नव्हे. आपला कप उचलल्या नंतर सुद्धा इतरांच्या कपाकडे तुम्ही पहात होतात."
आयुष्य कॉफी आहे आणि पैसा, प्रतिष्ठा, पद म्हणजे कप आहे असे समजा. अनेकदा फक्त कपाकडे लक्ष केंद्रीत केल्याने आपण कॉफीचा आस्वाद व आनंद घ्यायचा विसरून जातो.
-जयेश
तरीदेखिल
१) साधी रहाणी साधी विचारश्रेणी
२) साधी रहाणी उच्च् विचारश्रेणी
३) उच्च् रहाणी साधी विचार्श्रेणी
४) उच्च् रहाणी उच्च् विचारश्रेणी
असे ठळक प्रकार समाजात आढळून येतात. कुणाला पैशाचा कैफ तर कुणाला प्रतिष्ठेचा कैफ, कुणाला पदाचा कैफ. जीवन जगण्याची प्रत्येकाची तर्हा निराळी. अकॅडमीक आणि ऍक्टीव्हीस्ट यांच्यातील प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संघर्ष याच मनोवृत्तीतून दिसून येतो.
प्रकाश घाटपांडे
म्हणजे
"कामाचा एक दिवस वाढल्याने उत्पन्न वाढेल आणि वाढीव उत्पन्नामुळे रुपयाच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम कमी/नाहीसा होईल. कर्मचार्यांना अधिक कामाचा अधिक पगार मिळेल." असे आहे का?
जास्त काम
मला वाटत कि
१. कर्मचार्यांकडून जास्त काम
२. जास्त डॉलरची कमाई करणे
जेणे करून कंपन्यांचे आर्थिक अंदाज बिघडणार नाहीत. अर्थात ज्या भारतीय कंपन्या डॉलरमघ्ये जास्तीत जास्त धंदा करतात त्यांना याची झळ बसते आहे.
मराठीत लिहा. वापरा.
पगारवाढ
या बातमीनुसार एक दिवस काम वाढले तर पगारही वाढेल असे वाटते. पण बीपीओ कंपन्यात असा बदल झाला तरी आयटी कंपन्यात असा बदल इतक्यात होईल असे वाटत नाही. कारण यासाठी ग्राहक तयार व्हावे लागतील आणि (दर ताशी पैसे घेणार्या प्रकल्पांसाठी) कॉन्ट्रॅक्ट्स बदलावी लागतील. पूर्ण प्रकल्पाचे पैसे आणि वेळ जिथे आधी ठरले आहेत (फिक्स्ड बिड प्रकल्प) तिथे मात्र कर्मचार्यांची संख्या कमी करून उरलेल्या कर्मचार्यांना अधिक काम करावयास सांगून कंपन्यांना पैसे वाचवता येतील.
बरोबर आहे
बरोबर आहे. हे वाटते तितके सोपे नक्किच नाही. पण असे वाटून जाते कि सुगीचे दिवस कमी झाले आहेत. मुळ मुद्दा हा आहे कि जर कर्मचारी मुळातच जास्त काम करतात तर हे जे सगळे चालले आहे ते फक्त काम देणार्या कंपन्यांना समजावण्यासाठी. त्यातल्या त्यात जर पैसा मिळत असेल जास्त काही न करता तर कंपन्या का सोडतील?
मराठीत लिहा. वापरा.
एलबीडीएन् आणि हुहुची पूपु
Looking Busy Doing Nothing याचे लघुरूप म्हणजेच एल बी डि एन् सरकारी खात्यात हा प्रकार चालतो. याला चादर असेही म्हणतात.( ६०*९०)दुसरा प्रकार म्हणजे नाही म्हणायचे नाही व करायचे ही नाही. तिसरा प्रकार म्हणजे साहेब रेडा एक शेर दूध देतो असे म्हणाला तर आपण साहेबांचा रेडा दोन शेर दुध देतो असे म्हणावे. साहेबाच्या पुढून व गाढवाच्या मागून कधी जाउ नये ( कवा लाथ बसंन सांगता येत नाही) { पण हा गाढवाचा सन्मान आहे कि साहेबाचा अद्याप मला समजले नाही} काही लोक याला लांगूलचालन म्हणतात. झेल्या म्हणतात. तुम्हि कसेही काम केले तरी तुमचा पगार तेवढाच चालू असतो. पण हूहूचीपूपू ( हुजूर हुकुमाची पुर्ण पुर्तता) मात्र वरील प्रकारे करावी. इथे टिकायचे असेल तर गाढवाला गोपाळशेट म्हणायला शिक असे माझे बॉस सांगायचे.
( अव्वल सरकारी पोलिस बिनतारी तंत्रज्ञ्)
प्रकाश घाटपांडे
सरकारी खाते!
घाटपांडे साहेबांनी सांगितलेले प्रकार एकदम 'जंक्शान' आहेत. सरकारी खात्यात तेच लोक पुढे जातात जे साहेबाचे 'होयबा' असतात. असे म्हणतात की साहेबाच्या खोलीत दोन वाक्ये लिहिलेली असतात(जी कधीच दिसत नाहीत). १) दी बॉस इज ऑलवेज राईट २)इफ ही इज राँग देन सी द फर्स्ट सेंटेन्स!
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
सहमत
१) दी बॉस इज ऑलवेज राईट २)इफ ही इज राँग देन सी द फर्स्ट सेंटेन्स!
मराठीत लिहा. वापरा.
सुट्टीच्या दिवशी
आमचे एक वरिष्ठ् आयपीएस् अधिकारी सुट्टीच्या दिवशी घरीच असल्याने कार्यालयातील वर्तमानपत्र १०-१२ किलोमिटर
दूर असलेल्या ठिकाणी मागवत. त्यासाठी एक जीप अर्थात ड्रायव्हर सह जाई व वर्तमानपत्र देउन परत कार्यालयात येउन पुढील वर्दी साठी हजर. ही गोष्ट आमच्या कॅनव्हासवर अदखलपात्र असते.
तुम्ही लोक हिशोब करता? सरकारी गाडीचे अऍव्हरेज किती? वर्तमानपत्राची किंमत काय? वेळेची किंमत कशी मोजायची? मनुष्यबळाची किंमत कशी मोजायची ? आम्ही नाही.
Every thing is cheaper at the cost of law & order.
{स.पो.उपनिरिक्षक बि.सं वि (अभि)म.रा.(स्वें. नि)}
प्रकाश घाटपांडे
आवडले
{स.पो.उपनिरिक्षक बि.सं वि (अभि)म.रा.(स्वें. नि)}
सही... आवडले!
आपला
गुंडोपंत
पोलिस त्यो पोलिस.
बिनतारी असूनद्या की हत्यारधारी ,पोलिस त्यो पोलिस/ सुट्टीच्या दिवस असुन द्याकी
कामाचा दिस,हात केला का पन्नास,शंभर,लायसन नसले की दोनशे,सरकारनी यायचे
पगार बंद बी केले तरी,रुसनार नाय पोलिसदादा ;)
बाबूराव