रत्नपारखी

रत्नपारखी म्हणजे रत्नांची अचूक पारख करणारा आणि पर्यायाने त्या रत्नांचा स्वत:जवळ संचय करणारा.
आपला हिंदुस्थान म्हणजे हिरे-माणिक-पांचू-मोती अशा रत्नांचा देश.पण या सर्व रत्नांच्यापेक्षाही अमोल रत्ने या देशाने जगाला दिली.
या सर्व रत्नांचा उल्लेख जग स्वातंत्र्यवीर सावरकर,शहीद भगतसिंग,राजगुरु,सुखदेव,सुभाषचंद्र बोस आणि अशा अनेक नावांनी करते.
पण या सर्व रत्नांचा राजा, संग्राहक असणारा आपला देश ज्याने एक अनमोल असा हिरा जगाला दिला आणि हा हिरा स्वत:च एक उत्तम असा
रत्नपारखी होता.त्याचं नांव घेतलं तरी ऊर अभिमानाने भरुन येतो, बाहू स्फुरण पावतात, मस्तक आदरानं आणि अतीव प्रेमाने
खाली झुकतं.
आणि ते नांव म्हणजे.....

सतराव्या शतकातील अद्वितीय महामानव राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज !

छत्रपतींनी आपल्याजवळ प्राणांपेक्षा जास्त मोल देवून जपलेली रत्नं कुठून,कधी व कशी निवडली ही सगळीच माहिती आज जरी
इतिहासात उपलब्ध नसली तरी किमानपक्षी ती रत्नं कोण होती किंबहुना आहेत , आणि त्यांचा आपल्या माय मराठीसाठीचा त्याग,
बलिदान किती मोठा आहे हे जनता जनर्दनांपर्यन्त पोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

मी कुणीही इतिहास तज्ञ किंवा संशोधक नाही , मूळ ऐतिहासिक व्यक्तिरेखेला धक्का न पोचवता प्रसंगात नाट्यमयता आणि परिणामकारकता आणण्यासाठी आवश्यक ते बदल केले आहेत याची वाचकांनी नोंद घ्यावी.

सरते शेवटी एकच सांगावेसे वाटते, छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस हे मला अतिशय
जिव्हाळ्याचे आहेत , तेंव्हा लेखनात कुठेही चऊक आढळल्यास मला अवश्य कळवावे आणि त्यासाठी मला उदार मनाने क्षमा करावी
ही विनम्र "सप्रे"म विनंती.

उदय् गंगाधर सप्रे , ठाणे.
sudayan2003@yahoo.com

लेखनविषय: दुवे:

Comments

मुरारबाजी देशपांडे

जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांशी जेंव्हा महाराज लढायला गेले होते तेंव्हा मोर्‍यांपर्यंत पोचायच्या आधी एक व्यक्ती दाणपट्ट्याने महाराज आणि त्यांच्या सैनीकांना रोखावून ठेवत होती. महाराजांना त्याचे विलक्षण कौतूक वाटले आणि स्वराज्याच्या लढ्यात याचा उपयोग होईल हे तंतोतंत जाणले. म्हणून जावळीच्या विजयानंतर त्याला लगेच स्वराज्याच्या सैन्यात मानाचे स्थान दिले. याच मुरारबाजीने नंतर प्राणांतीक लढत देऊन पुरंदरचा किल्ला वाचवायची शर्थ केली. त्याचा आदर्श इतरांपुढे इतका तयार झाला होता की तो युद्धात मारल्या गेल्यावर लगेचच महाराजांना जरी वाटले की आता "तुर्त" हार मानून आपली माणसे (रत्ने) हकनाक मारण्यापासून थांबवू, तर मावळ्यांनी त्यांना अशा आशयाचे उत्तर पाठवले की एका मुरारबाजीने हे थांबणार नाही तो आमच्या रूपातून अजून लढत राहील.

रत्नपारखी खरेच

उदयराव, आपण शिवाजी राजांना रत्नपारखी असे अगदी यथार्थपणे संबोधले आहे. याविषयावर अधिक लेखन किंवा लेखमालिका लिहिण्याचा आपला विचार आहे काय?

आपला
(प्रश्नांकित) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

 
^ वर