गडक-यांचा 'तळीराम' एक उत्तम विनोद.
एकच प्याला तील गडकर-यांचा विनोद.
"एकच प्याला"तील तळीराम दारु पिण्याचे जे समर्थन करतो ते मोठे मासलेवाईक आहे. तो म्हणतो-
"दारु एकदा घेतली म्हणजे ती सुटत नाही,पण तेवढ्याने दारु वाईट कशी ठरते ? विश्वविद्यालयाची एकदा पदवी मिळवली म्हणजे ती जन्माची चिकटते. एकदा नुसती माळ घातली की बायको कायमची बिलगते.मग पदवीला न बायकोला जर लोक वाईट समजत नाहीत तर दारुलाच तेवढे लोक वाईट का समजतात ? प्रेमाचे दुष्परिणाम तर दारुपेक्षा वाईट असूनसुद्धा प्रेमाला जगात काय भाव आला आहे. ? प्रेमात राजासुद्धा गुलाम होतो,पण मदिरेत गुलामाला आपन राजा आहोत असे वाटते.प्रेमामुळे काही सुचेनासे होते-तर मदिरेमुळे कल्पनाशक्ती अनिवार वाढते.लोक म्हणतात,मद्यपान हे अनीतिकारक आहे. साफ खोटे. मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे.मद्यपी कधी खोटे बोलत नाही. कारण खोटे रचून त्याला सांगताच येत नाही. तो कधी कोणाचा विश्वासघात करी नाही. कारण त्यावर कोणी विश्वास ठेवीत नाही.चोरीच्या बाबतीत तर तो अजाण असतो. एखादी लहानशी गोष्टसुद्धा त्याला दुस-याजवळून चोरुन ठेवता येत नाही"
त्यावर भगीरथ तळीरामाला विचारतो,"दारु जर इतकी चांगली आहे असे तुम्ही म्हणता, तर मग तिची जगात एवढी निंदा का होते ?"
त्याला तळीराम उत्तर देतो की, "मद्यपान हे बहुतांशी हलक्या लोकांच्या हाती गेल्यामुळे संभावित समाजाकडून दारुची हेटाळणी होते असते. ती बंद व्हावी आणि मद्यपानाच्या व्यसनाला सभ्य स्वरुप यावे एवढ्यासाठी सर्व धर्माच्या, सर्व जातींच्या आणि पोटजातींच्या दारु पिणा-यांचे एक "आर्य मदिरा मंडळ" काढण्याचे आपण ठरविले आहे"
या मंडळाच्या नावाबद्दल आणि उद्देशाबद्दल तळीरामाने जे टाचण केलेले आहे त्यातला उपरोध आणि उपहास अतिशय मार्मिक आहे-
"मद्यपानाच्या व्यसनाला सभ्य स्वरुप यावे एवढ्यासाठी संस्थेच्या नावात "आर्य" हा शब्द घालण्यात आलेला आहे.मंडळाच्या प्रत्येक सभासद दारु पिणारा आणि आपण दारु पितो हे चारचौघात बोलून दाखविणारा असा पाहिजे. मांसाहाराला हे मंडळ उत्तेजन देते. साडेआठला दारुची दुकाने बंद होतात. तो कायदा मोडून सर्रास अहोरात्र ती दुकाने उघडी ठेवावीत एवढ्यासाठी हे मंडळ सरकारला विनवण्या करीत राहणार.बिनवासाची प्यायची दारु शोधून काढण्यासाठी हे मंडळ शिष्यवृत्ती देऊन विद्यार्थ्यांना परदेशी पाठवणार. प्रत्येक सभासदाने नवीन सभासद मिळवून मद्यपानाचा जारीने प्रसार करावयाला हवा.त्याप्रमाणे व्यसने सोडण्याचे आजकाल समाजात जे खूळ बोकाळले आहे, कोणी चहा सोडतो,कोणी विडी सोडतो,त्या खुळाला या मंडळाने आळा घातला पाहिजे.
या विनोदाबद्दल आपल्याला काही सांगायचे आहे,बिनधास्त सांगा ! वाट पहातोय;)
Comments
विनोद आठवण्याची प्रेरणा.
शिल्पा दा. जोशी.(विविध गावाची दारुबंदी ) पण दुसरीही बाजू कुणीतरी मांडली पाहिजे,म्हणून त्यांचाही एक प्रतिनिधी तळीराम ;)
आपला.
आर्य मदिरा मंडळाचा समर्थक.
बोले तैसा चाले!
तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलेले आहे की, "बोले तैसा चाले|त्याची वंदावी पाऊले||
आजकालच्या जगात फक्त एक दारूडाच असा आहे की तो बोलतो तसा चालतो...... अ. .ड.. ख.. ळ.. त!!!
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
प्रबोधन
एका गावात दारुचे दुष्परिणाम सांगण्यासाठी एक कार्यकर्ता भाषण देताना एक प्रयोग शेवटी करतो. एका बाटलीत मुंगी किडा ठेवलेला असतो. त्यात तो दारु ओततो. तर थोड्या वेळात तो किडा व मुंगी मरुन जाते. मग तो कार्यकर्ता लोकांना विचारतो बघा आता आपण यातून काय धडा घ्याल्? एक् तळिराम उठतो व म्हणतो,''दारु पिल्याने पोटातील किडा मुंगी मरुन जाते."
प्रकाश घाटपांडे
सुंदर प्रबोधन.
तळीरामाच्या प्रबोधनाने चांगलीच तरतरी आली. गडकरी ग्रेटच.
नाही हो!
नाही हो!
नको ती दारू नको!!!
मला तर अजिबात नको
आता मला ती नशा नको
काय होते त्या द्रव्यामध्ये
याची आता मला आठवण नको
मी धुंदलो येथ भरीव शब्दांमध्ये
माहितीपुर्ण लेखांच्या तळ्यामध्ये
मज पोकळ त्या बाटलीची सय नको!
सांग आता युयुत्सु त्यांना
गुंड तात्या बिरुटे या लोकांची संगत नको.
आपला
गुंडोपंत
सुरेख काव्य!
माहितीपुर्ण लेखांच्या तळ्यामध्ये
मज पोकळ त्या बाटलीची सय नको!
सांग आता युयुत्सु त्यांना
गुंड तात्या बिरुटे या लोकांची संगत नको.
वा गुंड्या! सुरेखच काव्य केलं आहेस हो!
आपला,
(माहितीपूर्ण लेखांच्या तळ्यात डुबक्या मारणारा!) आर्य तात्या.
तुम्हा वाटे बंडल?
(कोण तळीराम? कोणते आर्य? कोण ते मंडळ?
येथे गाव सुधारते पण तुम्हा वाटे बंडल?)
आपला
गुंडोपंत
आम्हीही सभासद होणार! :)
ती बंद व्हावी आणि मद्यपानाच्या व्यसनाला सभ्य स्वरुप यावे एवढ्यासाठी सर्व धर्माच्या, सर्व जातींच्या आणि पोटजातींच्या दारु पिणा-यांचे एक "आर्य मदिरा मंडळ" काढण्याचे आपण ठरविले आहे"
वा वा वा! बिरुटेसाहेब, आम्हीही या आर्य मदिरा मंडळाचे सभासद होणार! :)
आपला,
आर्य तात्या!
अवांतर- स्वतःला आर्य वगैरे म्हणवून घ्यायला बाकी गंमत वाटते! :)
धर्मबुडवा!
"मद्यपानाच्या व्यसनाला सभ्य स्वरुप यावे एवढ्यासाठी संस्थेच्या नावात "आर्य" हा शब्द घालण्यात आलेला आहे.मंडळाच्या प्रत्येक सभासद दारु पिणारा आणि आपण दारु पितो हे चारचौघात बोलून दाखविणारा असा पाहिजे. मांसाहाराला हे मंडळ उत्तेजन देते. साडेआठला दारुची दुकाने बंद होतात. तो कायदा मोडून सर्रास अहोरात्र ती दुकाने उघडी ठेवावीत एवढ्यासाठी हे मंडळ सरकारला विनवण्या करीत राहणार.बिनवासाची प्यायची दारु शोधून काढण्यासाठी हे मंडळ शिष्यवृत्ती देऊन विद्यार्थ्यांना परदेशी पाठवणार. प्रत्येक सभासदाने नवीन सभासद मिळवून मद्यपानाचा जारीने प्रसार करावयाला हवा.त्याप्रमाणे व्यसने सोडण्याचे आजकाल समाजात जे खूळ बोकाळले आहे, कोणी चहा सोडतो,कोणी विडी सोडतो,त्या खुळाला या मंडळाने आळा घातला पाहिजे.
बिरुटेसाहेब - मंडळाचा प्रामाणिकपणा आवडला. 'जनहो खादी वापरा' असे धोरण हे मंडळ ठेवणार नाही हे पाहून कोण आनंद झाला म्हणून सांगू. आपल्या घरादारापासून, मुलाबाळांपासून, आणि माताभगिनींपासून सर्वांना गंडा बांधण्याचे व्रत पाळले जाईल अशी शुभलक्षणे दिसता आहेत.
आम्ही मात्र हा धर्म बुडवायला बसलो आहोत.
(बिनधास्त अनार्य) एकलव्य
सूचना - धर्मरक्षकांपेक्षा धर्मबुडव्यांची भारतवर्षात चलती आहे ह्याचा आम्हाला आज अभिमान वाटतो.
एकलव्य साहेब.
बिरुटेसाहेब - मंडळाचा प्रामाणिकपणा आवडला. 'जनहो खादी वापरा' असे धोरण हे मंडळ ठेवणार नाही हे पाहून कोण आनंद झाला म्हणून सांगू. आपल्या घरादारापासून, मुलाबाळांपासून, आणि माताभगिनींपासून सर्वांना गंडा बांधण्याचे व्रत पाळले जाईल अशी शुभलक्षणे दिसता आहेत.
आम्ही मात्र हा धर्म बुडवायला बसलो आहोत.
अहो आम्ही सांगितला तो रा.ग.गडकरी यांच्या साहित्यातला विनोद होता. दारुची विविध रुपे आणि घे रे ! बियर म्हणजे काय दारु असते का ? वाइन म्हणजे फळांचा ज्यूस,आणि एका पेग ने काय होते, असे म्हणणारे तळीरामाचे सभासद अनेकांच्या आयुष्यात येतातच त्यांना कसे सामोरे जायचे ते आपल्या मनोनिग्रहावर अवलंबून असते, आम्ही विनोदाने समर्थक असे म्हणालो,म्हणून आम्ही दारू पिण्याचे,आणि पिणा-यांचे समर्थन करतो, असे समजण्याचे काही कारण नाही.
राम गणेश गडकरी यांनी आपल्या नाटकामधून अनेक प्रसंग असे गुंफले आहेत,की त्या प्रत्येक पात्रात आपण वावरतो आहोत असा भास होत असतो. राम गणेश गडकरीं यांच्या नाटकामधून उत्कट व भडक प्रसंग,उत्कट व्यक्तिरेखा, संस्कृत भाषा व कोटिबाजपणा असल्यामुळे ती लोकप्रिय बनली.त्यांच्या नाटकातला कल्पनाविलास तर विचारू नका ! त्यांच्या प्रेमसंन्यास,पुण्यप्रभाव,एकच प्याला,भावबंधन,राजसंन्यास, आणि अपूर्ण राहिलेले,वेड्यांचा बाजार,अशी थोडीच नाटके त्यांच्या नावावर असली तरी आपल्या प्रतिभेच्या बळावर त्यांनी नाट्यक्षेत्रात अलौकिक यश मिळविलेले आहे." एकच प्याला" हे नाटक आजही लोकप्रिय आहे .दारूचा एकच प्याला घेतला की,तो सद्गुणी,ध्येयनिष्ठ व मनस्वी व्यक्तिमत्त्वाचा पुरुषाचा कसा घात करतो,याचे चित्रण यात आहे.सुधाकर व सिंधू यांनी आपल्या स्वभावामुळे मराठी नाटकात मानाचे स्थान मिळविले आहे.सुधाकरासारखा मनस्वी पती व सिंधूसारखी पतिव्रता ही उपमानेच बनून गेली आहेत.भगीरथ,शरद,यांचे उपकथानक,तळीरामाचे आर्य मदिरा मंडळ एकच प्याला नाटकातील भीषण जीवन सुसह्य करते.आर्य मदिरा मंडळाचे प्रवेश गडक-यांचे प्रखर कल्पनाशक्तीचे, विनोदी बुद्धीचे आणि चटकदार भाषापद्धतीचे नमुने वाटतात.सिंधू व गीता यांच्या व्यक्तिरेखा निर्माण करून काही नवे आदर्श निर्माण करण्याचे प्रयत्न गडक-यांनी याच नाटकात केला आहे.तेव्हा आम्ही त्यांच्या नाटकातल्या विनोदावर बोलत होतो,त्यावरून धर्म बुडवायचा आणि त्यांच्या शुभलक्षणांचा फार विचार करू नये असे वाटते.
आपला विश्वासू
तळीराम.
सॉरी
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटेसाहेब
या विनोदाबद्दल आपल्याला काही सांगायचे आहे,बिनधास्त सांगा ! वाट पहातोय;)
... ... तेव्हा आम्ही त्यांच्या नाटकातल्या विनोदावर बोलत होतो,
गडकर्यांचा विनोद आम्हाला समजतो आणि बिरुटेसाहेबांचे दिलखुलास निवेदनही कळते. त्याच शैलीत लिहायचा धडपडाट केला आहे इतकेच.
ज्यांनी आर्यमंडळ विनोद म्हणून मांडले आहे त्यांनी धर्म बुडविण्याचे एकलव्याचे आवाहनही विनोदाची पोचपावती म्हणून पाहावे. ज्यांना दारूचे जबरा समर्थन करायचे आहे त्यांनी सग्यासोयर्यांना गंडा बांधण्याचे जरा गंभीरपणे घ्यावे.
(बिरुटेमित्र) एकलव्य
सूचना - या प्रतिसादावरील रागलोभ आणि सूचना व्यनितून मांडू नयेत. सगळा खुलेआम कारभार असावा.
आभार !
(बिरुटेमित्र) एकलव्य
आभारी !
यापूर्वी आपणास प्रतिसादावरील रागलोभ आणि सूचना(ज्यांचे कोणाचे) व्य.नि.तून येत होते,त्याचे आम्हाला आश्चर्य वाटते.
चीअर्स्!
चीअर्स् टू यू ... चीअर्स् टू समस्त गडकरी फॅन्स्...
द्रविड मन्दिरा मंडळ :)
"द्रविड मन्दिरा मंडळ" हे मंडळ बाकी खासच आहे! :)
तळीराम की जय
संसार उध्वस्त करी दारू....
म्हणून म्हणतो ,"संसार नका करू....फक्त प्या दारू...."
ज्या बापड्यांना तळीराम चालत नसेल त्यांनी 'पळी'राम होऊन पळी-पळीने प्यावी.
आपूण,आपूण हाय...बाकी समदे ढेकूण हाय
अत्रे उवाच्
केशव
आचार्य अत्र्यांना एकदा 'दारुचे दुश्परिणाम' या वीषयावर बोलायला एका समाज सुधारक [ ? ] मंडळाने मुद्दाम पाचारण केले.
अत्र्यांनी दारुच्या दुष्परिणामांचे छान विवेचन करुन शेवटी तिच्या चवी बद्दल वर्णन करु लागले, " अहो, काय तिची ती घाणेरडी चव? कोणालाही विचारा,तो तोंड वाकडेच करणार. ते समोर गाढव दिसते ना त्याला पण विचारा. ते पण तोंड वाकडेच करेल." एवढे बोलून लगेच पुढे म्हणतात " अहो, गाढवच ते, त्याला काय कळताय?"
--- केशव