थोडी (खगोलशास्त्रीय) गंमत

१९६० च्या दशकांत चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांनी चन्द्रावरील खडकांचे नमुने आणले होते. त्यांचे वजन काही किलो असावे.

आणखी काही वर्षांत चंद्रावर येणे-जाणे ही नित्याची बाब होईल. समजा, चंद्रावर आपण रोज मालवाहू अवकाशयाने पाठवू शकलो व त्यांतून प्रत्येक फेरीमागे आपण काही टन चंद्रावरील माती / खडक आणू शकलो तर ................

काही वर्षांनी चंद्र संपून जाईल व आकाशांत तो दिसणार नाही.

चन्द्राचे वस्तुमान जसजसे कमी होत जाईल तसतसा तो पृथ्वीपासून लांब जाईल की पृथ्वीच्या जवळ येईल?

आणखी काय काय होण्याची शक्यता आहे असे आपल्याला वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

भन्नाट

वा भन्नाट कल्पना...
(शिल्लक) चंद्र जवळ यावा...

आपला
गुंडोपंत

काय होईल?

चंद्राचे वस्तूमान कमी झाल्याने, पृथ्वीचे वस्तूमान तेवढ्याच एककांनी वाढले तरीही, गुरूत्वाकर्षण कमी होत जाईल. (स्थिरांक * पृ * चं / (अंतर)वर्ग). आधीच प्रसरण पावणार्‍या विश्वात, या कमजोर बळाने व वाढत्या अंतराने चंद्र पृथ्वीपासून दूर जातच राहील.

सौर-ऊर्जा

पृथ्वीच्या वातावरणापलीकडे सौर-ऊर्जा बर्‍याच ज्यास्त प्रमाणांत उपलब्ध होईल. ती भ्रमण चालू असतांना अवकाशयानासाठी वापरण्याचे तंत्र विकसित केल्यास इंधनाचा प्रश्न सुटू शकेल.

 
^ वर