मार्गदर्शन हवे आहे!

माझ्या संगणकावर मी एक्स्पी-पॅक दोन ही विंडो प्रणाली वापरतोय. गेल्या १०-१२ दिवसांपासून संगणक खूपच मंद झालाय. आत्तापर्यंत अगदी हार्डडिस्क फॉरमॅट करण्यापासून सर्व प्रकार झाले. काही वेळ संगणक नीट काम करतो आणि पुन्हा पुन्हा बिघडतो आहे. हल्ली तो एक संदेश वारंवार देतोय. 'हार्ड सिस्टम एरर'! असा तो संदेश आहे. ह्याचा अर्थ काय असावा?बायॉसमधे काही गडबड असण्याची शक्यता कितपत आहे? तोही रिसेट करून पाहिला पण काहीच उपयोग झालेला नाही.
मदरबोर्ड,हार्डडिस्क,पॉवर सप्लाय ह्यांपैकी अथवा इतर कोणते हार्डवेअर खराब असण्याची शक्यता आहे की विंडो एक्स्पी मधेच काही दोष असावा. विंडो 'रिपेअर' असा पर्याय देऊन संगणक तात्पुरता काम करतो. मात्र तो कधी पुन्हा बिघडेल हे मात्र सांगता येत नाही.ह्या बाबत कुणी काही मार्गदर्शन करू शकेल काय?
व्हायरस स्कॅन,स्पायबॉट स्कॅन आदी सगळे प्रकारही वापरून झालेत.सीसी क्लीनर हा प्रोग्रामही वापरून साफसफाई झालेली आहे.पण ह्या सर्व गोष्टी करूनही संगणक अतिशय बेभरवशाचा झालाय. हा काय प्रकार असावा?
माझ्या संगणकाची वैशिष्ठ्ये अशी आहेतः
प्रोसेसरः इन्टेल पेंटीयम डी २.६६गिगाहर्ट्झः
रॅमः १जीबी डीडीआर२
हार्डडिस्कः सॅमसंग ८०जीबी साटा
मदरबोर्डःइन्टेल डी९४५जीएनटी

Comments

पर्याय संपले असतील तर !

आदरणीय प्रमोद काका !

सर्वच पर्याय संपले आहेत असे आपल्या बोलण्यातुन वाटते आहे,आणि आता कोणी जरी मार्गदर्शन केले तरी तुमचा मुड काही,त्याला अपडेट करण्याचा दिसत नाही.मी याच्यावर उपाय सांगुच शकत नाही.सल्ला देऊ शकतो तो हाच की,एक नवा संगणक तुमची दुकानात वाट पहातोय !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तरीही

(खरं तर असे लांबून सल्ले देणे योग्य नाही तरी प्रयत्न करतो.)
मला मुख्य शक्यता आपल्या एक्स पी मध्येच काहीतरी गोम असण्याची वाटते आहे. माझ्या बाबतीत असे झाले आहे की पिसी खुप हळू झाल्याने आपण केलेल सर्व उपाय केले... पण तरीही तो हळूच राहिला. मग 'परत' सगळे काढून टाकून एक्स पी टाकले. मग मात्र नीट सुरु झाला.
जर संगणक काम करत असेल तर 'मातृपट' योग्य काम करतो आहे असं म्हणायला हरकत नाही.
यात एक शक्यता क्वचीत प्रसंगी असते ती रॅम योग्य रीतीने काम न करण्याची. एकदा रॅम काढून परत स्लॉट मध्ये बसवून पाहणे ठीक राहील. (स्लॉट मध्ये धूळ नको! ) काहीवेळा रॅम चे माहितीचे पत्ते खराब झाल्यानेही त्रास होतो. पण हे फार क्वचित होते.

संगणक फॉरमॅट केल्यावर एक्स पी लोड केल्यावर अँटी व्हायरस/फायरवॉल (झोन अलार्म सारखे) टाकल्याशिवाय जालाला जोडू नका.

आपला
गुंडोपंत

डॉ. बिरुटे आणि गुंडोपंत धन्यवाद!

डॉक्टरसाहेब अहो माझा संगणक नवीनच आहे आणि तो मी स्वतःच बनवलेला आहे.तेव्हा आता नवा संगणक घेणे कठीण दिसतेय.माझे प्रयत्न मी सोडलेले नाहीत आणि सोडणारही नाही. अहो हीच संधी आहे नवीन काही तरी शिकायची आणि मी ती हातची जाऊ देणार नाही.आपल्या सदिछेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

गुंडोपंत आपण म्हटल्याप्रमाणे मी रॅमचे स्लॉट साफ केलेत आणि पुन्हा रॅम नीट बसवलेली आहे. हे सगळे बायॉसमधे कळते. कारण रॅम,हार्डडिस्क इत्यादि गोष्टी बायॉसमधे पाहता येतात. तिथे त्या दिसतात म्हणजेच त्या व्यवस्थितपणे आपल्या जागी बसलेल्या आहेत हे नक्की! आपण म्हटल्याप्रमाणे मी सगळे केलेलेच आहे;पण तरीही काहीतरी दोष असावा असे वाटते आणि तो नेमका काय असावा ह्याचा शोध जारी आहेच. तरीदेखिल इथल्या अनुभवी सदस्यांचा सल्ला घ्यावा म्हणून हा खटाटोप.'हार्ड सिस्टम एरर'!चा नेमका अर्थ काय हे जाणून घ्यायचे आहे आणि माझी खात्री आहे की इथे कुणी तरी (एखादा तंत्रज्ञ) मला त्याबाबत समजेल अशा भाषेत ते समजावून देईल.
आज पुन्हा नव्याने फॉरमॅट,विंडो चढवणे इत्यादि करून बघतो आहे.
आपल्याही सदिच्छेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

रॅम

कारण रॅम,हार्डडिस्क इत्यादि गोष्टी बायॉसमधे पाहता येतात. तिथे त्या दिसतात म्हणजेच त्या व्यवस्थितपणे आपल्या जागी बसलेल्या आहेत हे नक्की!

रॅम चे काही ऍड्रेसेस खराब झाले असते तरी बायस पुर्ण रीड करतो, पण जेंव्हा ओ एस ते ऍड्रेसेस प्रत्यक्ष ऍक्सेस करते तेंव्हा रीड करत नाहीत.
थोडक्यात बायस वर पुर्ण विसंबू नका! :)
आपली रॅम खराब असेलच असे नाही. आपल्या बाबतीत ही फक्त शक्यता आहे. एक निव्वळ शक्यता. पण दुसरी रॅम असेल तर टाकुन चालू करुन् पहा चालला तर सरळ आहे की...

आपला
गुंडोपंत

बायस ला डिफॉल्ट

बायस ला डिफॉल्ट व्हॅल्यु सेट करा किंवा फेल सेफ सेटिंग्ज लोड करा.
यात एकतर रॅम चा स्पीड मॅच होत नाहिये किंवा सिपीयु ओव्हर क्लॉक झालाय.

हे

हे पहा
आपला
गुंडोपंत

धन्यवाद गुंडोपंत!

आपण दाखवत असलेल्या सदिच्छेबद्दल आणि विविध पर्यायांबद्दल मनापासून धन्यवाद!
माझ्याकडे ५१२ च्या दोन अशा रॅमच्या पट्ट्या आहेत आणि त्या दोन वेगवेगळ्या खाचेत घातलेल्या आहेत.बायॉस आणि सिस्टीममधेही दोन्ही मिळून ०.९९जीबी असे दाखवत आहे. आता ह्यांची तपासणी आपण सांगत असल्याप्रमाणे करायची असेल तर एक वेगळीच रॅमची पट्टी आणावी लागेल आणि तो वेगळा खर्च होईल. तेव्हा तो पर्याय सर्वात शेवटचा म्हणून मी राखून ठेवत आहे.रॅम जर खराब असेल तर ती बदलण्यावाचून पर्याय नाही आणि ती बदलावीच लागेल. म्हणून तशी निश्चिती करण्याचे अजून काही मार्ग असल्यास शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
आपण दिलेला दुवा मी जरा जास्त खोलात जाऊन अभ्यासावा म्हणतोय. बघू या त्यातून काही सोपा उपाय मिळतोय का!
आशानाम मनुष्याणाम् काचिदाश्चर्य शृंखला...... असे काहीसे आहे.

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

२ आहेत न मग झाले की काम!

एका वेळी एक एक पट्टी तपासा!
एकच पट्टी लावा, सुरु करुन पहा... ज्यावर चालेल ती चांगली!
५१२ वर एक्स पी नक्की उत्तम चालते !

स्टॅटीक इले. पासून मात्र सांभाळा! स्टॅटीक इले. रॅम क्षणात उडवू शकते.. स्वतःला 'शॉर्ट' करुन मगच रॅम ला हात लावणे योग्य!

आपला
गुंडोपंत

तुमचं आमचं जमलं!

धोडोपंत क्या बात है! मी देखिल नेमके हेच करून बघितले आणि गंमत म्हणजे दोन्ही पट्ट्या सहीसलामत आहेत(आलटून-पालटून घालून पाहिल्या). ड्युअल कोअरचे सिंगल करून पाहिले. संगणक प्रत्येक परिस्थितीत चालतोय.पण तरीही मनासारखे काम देत नाहीये.डीफॉल्ट बायोस देखिल करून मगच विंडो चढवलेय. आता ह्या क्षणी ड्युअल कोअर आणि एकच पट्टी(५१२ची) असा चालू ठेवलेला आहे. थोडा वेळ असा चालवून मग दुसरी पट्टीदेखिल घालून बघणार आहे.बघू काय करतोय ते!
मनासारखा चालू होईपर्यंत प्रयोग सुरुच राहतील. आपल्या मोलाच्या सुचनांचे स्वागत आहेच. आपल्या विचारांच्या तारा नेमक्या जुळताहेत हे मात्र नक्की!
पुन्हा एकदा सदिच्छेबद्दल आणि उपयुक्त सुचनांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
डॉक्टरसाहेब आपले अभिनंदन आपला संगणक साफसुफ करून धावायला लागल्याबद्दल!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

टंकलेखनातील चूक!

मिलिंद,
अपेयपान आणि मी! शांतम् पापम्!
इथे सवाई गंधर्वांचे गायन ऐकता ऐकता उत्तर लिहित होतो(त्या नशेत आहे) आणि टंकलेखनात चूक झाली. आपण ती निदर्शनाला आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
गुंडोपंत क्षमस्व! आपण आपल्या मोलाच्या सुचना देत राहा. त्यामुळे विचार एका जागी कुंठित न राहता त्यांना चालना मिळत राहते.

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

चालायचंच!

नशा ही अशीच असते.मग ती मदिरेची असो,संगीताची असो अथवा सत्तेची असो! माणूस त्यात धुंद झाला की आजूबाजूच्या जगाचे त्याला भानच राहात नाही. असो.माफी मागायची काहीच जरूर नाही. पण तुम्हीही शेवटी काय लिहून बसलात ते वाचा!
(क्षमस्व) युयुस्तु

रामभाऊंचे गुजरी तोडी,कोमल रिषभ आसावरी,पुरिया आणि शंकरा हे राग मी सद्या ऐकतो आहे.
त्यांच्या जोडीला ओंकारनाथही आहेत(म्हणजे जुगलबंदी नव्हे बरं का) ! बरोबर मालकंस घेऊन आलेत.
संगीताची मेजवानी सुरु आहे इथे.(आवृत्त्या सुरु आहेत)
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

वा गुंडोपंत गुरुजी..!

प्रमोद काका !

काय परिस्थिती आहे, संगणकाची. इतके सोप्पे मार्गदर्शन केले आहे गुंडोपंतांनी,की माझा उत्तम चालत असलेला संगणक उघडुन त्याच्यातल्या सर्व पट्ट्या धूवुन पुसून लावल्या,सायकलच्या टायरमधे हवा मारण्याच्या पंपाने मातृपट( मदर बोर्ड),पंखे,स्वच्छ करुन घेतले.आणि असा भन्नाट चालू आहे ना,आपला संगणक की पुछो मत.

अवांतर ;) पंत, संगणकाचे सामान्य आजार आणि त्यावरील उपाय यावर एखादा लेख यायला हरकत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जंपर सेटींग तपासा!

'मातृपटाचे पुस्तक' मिळाले असेलच सोबत त्यातले 'जंपर सेटींग' तपासा!
त्यात घोळ होवू शकतो. काही सेटींग्ज हळू चालण्यासाठी असतात!!!

बायस मध्ये नक्की सगळे सेटींग्ज योग्य आहेत ना? पपुस्तकाप्रमाणे पाहून घेणे.

एक्सपीवर मेमरी अडवून धरणारे काही नाहिये ना नक्की?
उदा. पिकासा? खुप नाही पण बरीच मेमरी खाते! स्पाय बॉट पण नको.

कोणतेही कार्ड कॉन्फ्लिक्ट करत नाहिये ना? व्हिडीयो कार्ड सोडून ;)
असल्यास एक एक कार्ड काढून पहा. मोडेम आहे का इन्बिल्ट? त्याला काढून पहा!

आपला
गुंडोपंत

याहू टूलबार काढून टाका.

म्हणजे एक्सपि हळू आहे की आय ई?
आय ई असेल आय ई काढून सुरु करा. आणी मग परत आय ई टाका.
याहू टूलबार काढून टाका. मेसेंजर पण तात्पुरते काढून टाका. ते सर्व्हर ला पिंग करत बसते कारण!
मला वाटते की तुम्ही सगळे फ्रेश इंस्टॉल करून बघा. म्हणजे कोरे एक्सपि, आणी त्यावर फक्त एंटी व्हायरस व फायर वॉल. (एंटी व्हायरस सतत संगणक तपासत बसतो! फायर वॉल पण हळू करते!)

आपला
गुंडोपंत

 
^ वर