अपने - पराये

इस्लाम म्हणजे शांति असे म्हणतात. इस्लामचा इतिहास लक्षांत घेतला तर इस्लाम म्हणजे शांति हे फक्त इस्लामच्या अनुयायांसाठी आहे. बिगर-इस्लामी लोकांसाठी इस्लाम म्हणजे (इस्लामला न कवटाळल्यास) शिरकाण आहे.

कम्युनिस्टांच्या दृष्टीने बिगर-कम्युनिस्ट व्यक्ति, बिगर-कम्युनिस्ट शासन हे भांडवलदारांचे हस्तक व कामगारांचे शोषण करणारे असतात. त्यांचा नायनाट करणे, त्यांना उखडून टाकणे हे प्रत्येक सच्च्या कम्युनिस्टाचे कर्तव्य ठरते.

कॅथलिक, बिगर कॅथलिक (एक ऐकलेली गोष्ट)
एकदा एक मनुष्य आत्महत्त्या करायला निघतो. त्यासाठी तो एका उंच इमारतीच्या गच्चीवर जाऊन अशा ठिकाणी उभा राहतो की त्याला हाताने धरून मागे ओढणे शक्य नसते. त्यामुळे तिथे जमलेले लोक विनवण्या करून त्याला आत्महत्त्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. पण तो कोणाचेच ऐकत नाही. शेवटी त्याला समजावण्यासाठी लोक गावांतल्या धर्मगुरुला तिथे आणतात. धर्मगुरु त्याला म्हणतात, "भल्या गृहस्था, प्रभूने दिलेलं सुंदर आयुष्य तू कशाला संपवतोयस्?"
"मला वीट आलाय्. मी निराश झालोय्. काही म्हणता काही मनासारखं होत नाहीये."
"मुला, निराश होऊ नकोस. माझं ऐक. प्रभूवर विश्वास ठेव. तो नक्की तुझे कल्याण करील."
"मला नाही तुमचं ऐकायचं. मला मरू द्या."
"हे बघ, एक सच्चा कॅथलिक असा अविश्वास दाखवीत नाही. चल, खाली ये."
"पण मी कॅथलिक नाही"
"काय? तू कॅथलिक नाहीस?" धर्मगुरु आश्चर्याने विचारतात.
"नाही" तो उत्तरतो.
"मग तुला उडी मारायला हरकत नाही." असे म्हणून धर्मगुरु शांतपणे तिथून निघून जातात.

लेखनविषय: दुवे:

Comments

तुम्हाला

तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे?

पल्लवी

कॅथॉलिकांचे नेटवर्क

कॅथॉलिक समाजाचे एक घट्ट विणीचे जाळे असते. चर्चमधील त्यांच्या धर्मगुरूकडे प्रत्येक सभासदाची नोंद असते. समाजातील एखादी मुलगी विवाह करून परधर्मीय कुटुंबात गेली की तिच्या नव्या घरी धर्मगुरूंच्या फेर्‍या सुरू होतात. "तू कॅथॉलिक, तू स्वर्गात जाणार. तुझा नवरा मात्र नरकात. तुला हे चालेल?" अशी भुणभुण तिच्यामागे लावून तिला जेरीस आणतात. तिने दर रविवारी चर्चमध्ये जाणे सोडलेले नसतेच. तिच्या बरोबर नवरा असलाच तर तो काही महिने चर्चच्या बाहेर बसतो. पुढे पावसाळ्यात आत यायला लागतो, आणि एक दिवशी ख्रिस्ती होतो. अशा अनेक घटना लोक सांगतात. धर्म पटला म्हणून धर्मांतर करणारे विरळा.
--वाचक्‍नवी

हे तर काहीच नाही..

समाजातील एखादी मुलगी विवाह करून परधर्मीय कुटुंबात गेली...

हे तर काहीच नाही निव्वळ दुसर्‍या जातीत किंवा सारख्याच गोत्रात विवाह केल्यास जोडप्यांना यमसदनी पाठवणारे ही धर्म आहेत असे वाचून आहे.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

आहेत की

हे तर काहीच नाही निव्वळ दुसर्‍या जातीत किंवा सारख्याच गोत्रात विवाह केल्यास जोडप्यांना यमसदनी पाठवणारे ही धर्म आहेत असे वाचून आहे.

हो का? तुम्ही वाचूनच आहात का...मी अनुभवूनही आहे. म्हणजे आपल्या फारच जवळ असावेत हे धर्म नाही का?

म.सा.वि.

माझ्या लिखाणाचा म.सा.वि.

"आम्ही फक्त आमच्या लोकांशी चांगले वागायला बांधील आहोत, इतरांचे वाईट करण्यांत काही गैर नाही" अशी काहींची विचारसरणी असते.

ल. सा. वि.

"आम्ही फक्त आमच्या लोकांशी वागायचे तसे वागू, पण इतरांच्या वागणुकीवर आमचे बारीक लक्ष आहे." अशी ही विचारसरणी असू शकते!

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

सही!!!

"आम्ही फक्त आमच्या लोकांशी वागायचे तसे वागू, पण इतरांच्या वागणुकीवर आमचे बारीक लक्ष आहे."

ल.सा.वि. आवडला.

बारीक लक्ष कशाला?

'तो' यांस,

गोष्टी इतक्या ढळढळीतपणे होत असतात की 'बारीक' लक्ष ठेवण्याची गरज नाही.

कृपया आजच्या महाराष्ट्र टाइम्स (मुख्य पेपर) च्या पान नं. ९ वरील "मुस्लिम व्हा; अन्यथा मृत्यूला सामोरे जा - ख्रिश्चन समुदायाला पाकिस्तानांत धमक्या" ही बातमी वाचा.

कॅथोलिक

काही शनिवारी माझ्याकडे कॅथोलिक धर्माचे काही सदस्य येतात आणि तोच धर्म कसा खरा आहे, मी का स्वीकारला पाहिजे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. आमची गाडी उत्क्रांतीवर आल्यावर ते मला एक पुस्तक देऊन गेले. त्यांच्या मते त्यात उत्क्रांती आणि ख्रिस्ती धर्म यांची सांगड घातली आहे. पुस्तक चाळल्यावर लक्षात आले की क्रिएशनला अडचणीत आणणार्‍या सर्व मुद्यांना सोईस्करपणे बगल देण्यात आली आहे. पुढच्या वेळी आले तर यावर बघू काय म्हणतात.

अवांतर : मी ख्रिस्ती होणे अशक्य आहे, त्यामुळे त्यांना उत्क्रांतीवादी करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. :)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

मस्त! ;)

काय? तू कॅथलिक नाहीस?" धर्मगुरु आश्चर्याने विचारतात.
"नाही" तो उत्तरतो.
"मग तुला उडी मारायला हरकत नाही." असे म्हणून धर्मगुरु शांतपणे तिथून निघून जातात.

मस्त ! :)

आपला,
(मिसळधर्मी) तात्या.

कौन अपना कौन पराया?

बहुतेक सगळीच माणसे परकी. दुसर्‍यांचे विचार म्हणजे तिर्‍हाईतांची उगाच मांडलेली मते! त्यांच्या आयुष्याला एका करुण अस्तित्वापलिकडे काहीही अर्थ नाही. त्यांची स्वप्ने ही तर पोकळ घोषणाबाजी अन् त्यांच्या भावभावना हे एक निव्वळ नाटक.

कौन अपना और कौन पराया?

संदर्भ - वरील वाक्य हे "Most people are other people. Their thoughts are someone else's opinions, their lives a mimicry, their passions a quotation." या ऑस्कर वाईल्डे यांच्या टिपण्णीवर स्वैरपणे बेतलेले आहे.

(परका) एकलव्य

अवांतर

कॅथोलिक चा मूळ अर्थ वैश्विक, सर्वसामान्य, सर्वसमावेशक (?) असल्याने असा 'विनोद' हेतुपुरस्सर केला असावा असे वाटते.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

आमचा धर्म

ही सर्वसमावेशक(?) असल्याचे वाचले आहे.. तो ही 'विनोद' का?

मूळ अर्थ

कॅथलिक चा मूळ अर्थ किती कॅथलिक्स् ना माहीत आहे? आणि माहीत असला तरी कितीजण त्या अर्थानुसार वागतात? तसे असते तर त्यांच्या धर्मगुरूंनी (राजेंद्र व वाचक्नवी यांच्या प्रतिसादांत वर्णिल्याप्रमाणे) धर्मप्रसारासाठी आटापिटा केला नसता. की धर्मगुरूंनाच सर्वसमावेशक हा शब्द कळला नाही?

अर्थानुसार लोक वागत असते तर इस्लाम (म्हणजे शांति) च्या नावावर बिगर-इस्लामींचे रक्त सांडण्याचे कारण नव्हते.

अर्थात् विनोद हेतुपुरस्सर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याचे सार वस्तुस्थितीला धरून आहे.

 
^ वर