पुन्हा एकदा राष्ट्रपती निवडणूक
या वेळची राष्ट्रपती निवडणूक धूमधडाक्यात चालू आहे आणि तशीच पार पडणार असे दिसते. त्यात कोण राष्ट्रपती (अथवा बाळासाहेब म्हणतात त्याप्रमाणे "राष्ट्राध्यक्ष") होईल अथवा जास्त योग्य आहे वगैरे मुद्दे चर्चीणे हा एक् भाग झाला. पण बर्याच अंशी प्रतिभा पाटीलांवर आणि आता काही प्रमाणात भैरवसिंग शेखावत यांच्यावार त्यांच्या त्यांच्या विरोधक कंपूतून दोषारोप होत आहेत. त्यामुळे आणि एकंदरीतच एकतर्फी निवडणूकीमुळे माध्यमे, काही राजकारणी आणि विचारवंत "विचार" मांडत आहेत.
त्या संदर्भातील सारांशाने, आपल्याला या बाबतीत खालील मुद्दे मांडणे आणि तसे आचरणे योग्य आणि खर्या अर्थाने लोकशाहीचे पालन करणारे वाटते का?
- "असे राष्ट्राध्यक्षा"च्या उमेदवारावर चिखलफेक करणे म्हणजे जणू काही राष्ट्राच्या "इभ्रतीचा प्रश्न आहे" म्हणून ते "पावित्र्य" टिकवत काही टिकात्मक बोलू नये.
- तसेच जर या निवडणूकीत "प्रतिभा पाटील" निवडून येणार हे बहुतांशी नक्की असेल तर भैरवसिंग शेखावत यांनी माघार घ्यावी आणि प्रतिभाताईंना अविरोध निवडणून द्यावे. त्यातच "राष्ट्रपतीपदाची शान राहील"
- वगैरे वगैरे...
या चर्चेत कोणत्याही उमेदवारच्या अथवा पक्षाच्या बा़जूने लिहीण्याचा उद्देश नाही तर आपण लोकशाही ज्याला म्हणतो त्यात राजकीय आचार पद्धती (पॉलीटीकल प्रोसेस) कशाला समजतो हे समजून घेण्याचा आहे.
धन्यवाद
विकास
Comments
भारतीय गोंधळ
मूर्खपणा आहे. इतक्या गंभीर आरोपांखाली अडकलेल्या आणि बुवाबाजीमध्ये गुंतलेल्या बाईंकडून उत्तरे मागण्याचा जनतेचा अधिकारच नाही तर कर्तव्यही आहे. श्रीमती रजनी पाटील यांची खुनाला वाचा फोडण्याच्या धडपडीमागे (जी आजची नाही) राजकारण कमी आणि तडफडाट जास्त वाटतो.
निवडणूक न लढता बिनविरोधाचे खूळ आजचे नाही. सर्वच राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात याला बळी पडतात.
(१) कलाम साहेबांनी राजकीय प्रक्रियेस नकार दिला. त्यांच्या प्रकृतीस एकवेळ ते रुचणारे असेल. पण जनतेच्या मनात स्थान मिळविलेल्या ह्या राष्ट्रपतींनी बिनविरोध हा आग्रह सोडून खुलेपणाने राजकीय लढाईत बलिदान दिले असते तर कदाचित भारताच्या राजकारणाला बरे दिवस आले असे म्हटले असते.
(२) शेखावत साहेबांनी हे अपक्षचे घोडे का दामटले ह्याचा राजकीय लाभातोट्याचा विचार केला तरीही हा कोठेतरी भारतीयांना अतिप्रिय अशा बिगरराजकीय मुखवट्याची गरज भासविण्याचा फसलेला प्रयोग दिसतो आहे.
(३) इ... इ.. इ.
(स्वमताधिकारी) एकलव्य