पंडीत नेहरू, चीन आणि सीआयए

माहीती हक्काच्या प्रकरणामुळे अमेरिकेतील सध्य प्रशासनाला सिआयएची पुर्वीची कागदपत्रे लोकांसमोर प्रकाशीत करावी लागलीत. त्यात तत्कालीन अमेरिकन राजकारण्यांच्या कृत्याचा जसा अहवाल मिळतो तसाच नेहरूंचा पण संदर्भ मिळतो.

बातमी प्रकाशीत झाल्या प्रमाणे थोडक्यात नेहरूंना चीनच्या हल्ला करण्याच्या मानसीकतेची कल्पना होती पण त्यांनी ती उघड केली नाही कारण त्यांना चीनशी संबंध चांगले ठेवायचे होते. त्यांना चीनच्या हल्ल्या पुर्वी ६२ साली चीनने बर्‍यच ठिकाणी फिरवून आणले होते. आणि अर्थातच नंतर त्यांची (आणि त्यांच्या मुळे देशाची) फसवणूक झाली. त्यातील एक वाक्य सर्व काही बोलून जाते: "Chou played on Nehru's Asian, anti-imperialist mental attitude, his proclivity to temporize, and his sincere desire for an amicable Sino-Indian relationship."

आज ही बातमी आपल्याला रिडीफ, सीएनएन-आयबीएन वगैरे ठिकाणी वाचायला मिळू शकेल. बातमीच्या मथळ्यांवरून ती ती माध्यमे बातमीचे महत्व कमी अथवा अधीक करताहेत ते समजते. हा गुगल बातम्यांचा दुवा पहा.

लेखनविषय: दुवे:

Comments

वास्तविक

यामुळे अमेरिकेचा दृष्टिकोन जगासमोर येईल ही चांगलीच गोष्ट आहे. अतिस्वप्नाळू आणि अतिआशावादी नेतृत्वामुळे भारताला युद्धाची आणि पराभवाची झळ सोसावी लागली हे सीआयएचे विश्लेषण वास्तविक आहे.
आपला
(वास्तववादी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

सहमत

अतिस्वप्नाळू आणि अतिआशावादी नेतृत्वामुळे भारताला युद्धाची आणि पराभवाची झळ सोसावी लागली हे सीआयएचे विश्लेषण वास्तविक आहे.

१००% सहमत !

नीलकांत

सीआयए

ते येथे बरोबर आहेत म्हणुन बरोबर, पण ह्या बरोबर असण्याचा संदर्भ ठेऊन त्यांनी केलेल्या प्रत्येक कामाचे समर्थन करने म्हणजे सीआयएभोळेपणा (देवभोळे सारखं ) होईल, नाही का ?

सीआयए ने आता प्रकाशित केलं आहे. मात्र आमचे पंतप्रधान पंचशिलाच्या करारात आणि हिंदी-चीनी भाई भाई च्या नार्‍यात एवढे मशगुल झाले होते की चीन ने आक्रमण केलं हे मान्य करायला त्यांना दोन दिवस लागले.
आपले सैनिक मरताहेत हे स्पष्ट सांगीतल्यावर कुठे ते भानावर आले. त्या युध्दा भारताला सपाटून मार खावा लागला. आपले संरक्षणमंत्री मेनन होते. युध्दामुळे सैन्याची खचलेली मनोवृत्ती दुर करण्यासाठी यशवंतराव चव्हाणांना संरक्षणमंत्री करण्यात आले होते.

चीनच्या या विश्वासघाताचा नेहरूंना खुप धक्का बसला होता. शेवटी ते यातच गेले. त्यानंतर त्यांनी सत्तेच्या वेगळे होण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आम्हा भारतियांसाठी ते देव होते , आम्हाला तेच हवे होते. जरि ते म्हणत असले की माझे निर्णय चुकताहेत, तरिही आम्हाला तेच हवे होते. दुर्दैव दुसरे काय? आम्ही लोक भावना आणि बुध्दीचा घोळ निदान देशाबाबतीत तरी कधी दूर करनार आहोत?

नीलकांत

मला वाटते गोविंद वल्लभ पंत

गोविंद वल्लभ पंतांनी स्वतःचे केस नसलेले डोके पुढे केले होते आणि म्हणाले होते की आता हे (डोकेच) कापणार का?

 
^ वर