आजच्या विज्ञानयुगांत हे अशक्य आहे?

आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे, तंत्रज्ञानाचे युग आहे असे आपण म्हणतो. दोनशे वर्षांपूर्वी ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता या युगांत शक्य झालेल्या दिसत आहेत. अजूनही काही गोष्टी निर्माण व्हायला हव्यात अशी माझी इच्छा आहे. उपलब्ध ज्ञानाच्या आधारे त्या साध्य होतील असे मला वाटते.

१) कृत्रिम रक्त : औषधांप्रमाणेच रक्तही कारखान्यांत तयार करता यायला हवे. पाहिजे त्या गटाचे पाहिजे तितके रक्त डॉक्टरच्या चिठ्ठीप्रमाणे केमिस्टकडे मिळायला हवे.
२) जिन्याच्या (किंबहुना कुठल्याही) पायर्‍या चढणारी, बॅटरीवर चालणारी व्हील-चेअर.
३) समुद्राच्या पाण्यावर शेती : अन्नधान्याची पिके समुद्राच्या पाण्यावर काढता यायला हवीत. त्यासाठी बियाणावर आवश्यक ती प्रक्रिया करता यायला हवी. याचीच पुढची पायरी म्हणजे हवेंतील आर्द्रतेवर वाढणारी पिके निर्माण करणे.
४) मुलांसाठी खेळांतले पॅरॅशूट : मर्यादित उंचीवरून (इमारतीची गच्ची किंवा तत्सम उंचीवरून) उडी मारण्यासाठी उपयोगी पडेल असे पॅरॅशूट. हे पॅरॅशूट उडी मारण्यापूर्वी छत्रीप्रमाणे उघडता यायला हवे.
५) लहान मुले स्वतः उडवू शकतील अशी छोटी विमाने : मुलांना ज्यांत बसून चालवता येतील अशा बॅटरीवर चालणार्‍या मोटरगाड्या सर्वांनी पाहिल्या असतील. त्याप्रमाणे मुले स्वतः आंत बसून मर्यादित उंचीवरून मर्यादित अंतरापर्यंत उडवू शकतील अशी विमाने तयार करणे. त्याकरिता मुलांसाठी फ्लाइंग पार्क तयार करावे लागतील व संकटकाळांत आपोआप उघडणारी पॅरॅशूट अशा विमानांना लावावी लागतील.
६) मृत माणसाच्या डोळ्याचा जो भाग जिवंत माणसाला दृष्टि मिळण्यासाठी वापरता येतो तो भाग कारखान्यांत तयार करता यावा.
७) विद्युत् उत्पादन केंद्रापासून विजेचे बिनतारी पारेषण ( Transmission).
८) कृत्रिम सूर्य : आपण अवकाशांत संदेशवहनासाठी उपग्रह पाठवतो. त्याचप्रमाणे अवकाशांत कृत्रिम 'सूर्य' सोयीस्कर उंचीवर अशा तर्‍हेने फिरत ठेवणे की पृथ्वीच्या ज्या भागावर रात्र असेल त्या भागावर सर्वत्र सूर्याइतका नाही तरी दिव्यांइतका प्रकाश मिळू शकेल.

आपल्याला वरील गोष्टी कितपत शक्य वाटतात?

आपल्याही मनांत अशा काही इच्छा आहेत का?

Comments

सगळ्या शक्य् आहेत्

आज् आपली प्रतिकृती डॉली तयार् करता येते, लिंगबदल् करता येतो, माणसाचे अवयव् काढून् एखाद्या गाडीचे पार्ट् बदलावे तसे बदलता येतात् मग् काय् अशक्य् आहे?
जीविताचा धोका कमी करून् जे काही शक्य् असते, फायदेशीर् असते ते सर्व् राबतात .

गरमागरम मिसळीची सुरेखशी प्लेट! ;)

८) कृत्रिम सूर्य : आपण अवकाशांत संदेशवहनासाठी उपग्रह पाठवतो. त्याचप्रमाणे अवकाशांत कृत्रिम 'सूर्य' सोयीस्कर उंचीवर अशा तर्‍हेने फिरत ठेवणे की पृथ्वीच्या ज्या भागावर रात्र असेल त्या भागावर सर्वत्र सूर्याइतका नाही तरी दिव्यांइतका प्रकाश मिळू शकेल.

जाऊ द्या कोर्डेसाहेब! एक झकासपैकी देवगडी बोलीभाषेतला प्रतिसाद देणार होतो पण आपण आणि उपक्रमराव, दोघेही रागवाल माझ्यावर! ;)

बाय द वे, कृत्रिम सूर्य म्हणजे जरा जास्तच होतंय हो! असो, याबाबत मी बुधवारी किंवा शनिवारी रात्री उशिराने एखादा उत्तम प्रतिसाद देऊ शकेन! ;)

आपल्याला वरील गोष्टी कितपत शक्य वाटतात?

हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन,
हो हो मन मै है विश्वास, पुरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन!

आपल्याही मनांत अशा काही इच्छा आहेत का?

अशी एखादी वैज्ञानिक कळ निर्माण व्हायला हवी की ती दाबल्यावर एका क्षणात गरमागरम मिसळीची सुरेखशी प्लेट खायला मिळावी! ;)

आपलाच,
तात्या.

४,५ आणि ८

भारीच विनोदी, रविवारची उदासवाणी संध्याकाळ बरी गेली.

बायकोला घाबरणार्‍या नवर्‍यांसाठीही अशीच पॅरॅशूट्स बनवावीत. भांडण झालं की गॅलरीतून झू....म!!

(अविवाहीत) राजीव.

व्हील चेअर

२) जिन्याच्या (किंबहुना कुठल्याही) पायर्‍या चढणारी, बॅटरीवर चालणारी व्हील-चेअर.

ही अस्तित्वात आहे. त्यांना स्टेअर लिफ्ट म्हणतात. चित्र

पल्लवी

१,२,६,७

या शक्यता जास्त आवश्यक वाटल्या.

१,२,३,६, व ७/मला आमरसपुरी! :ड

विज्ञानाच्या प्रगतीमुळे क्रमांक १,२,३,६ व ७ हे मुद्दे जर प्रत्यक्षात उतरले तर ते खूपच चांगले होईल. क्रमांक ४ व ५ ची काहीही गरज नाही असे मला वाटते. त्यामुळे मुले अधिक बिघडतील आणि अधिक हट्टी होतील असे मला वाटते.

क्षमस्व, परंतु क्रमांक ८ चा मुद्दा मला तरी हास्यास्पद वाटतो आहे.

आपल्याही मनांत अशा काही इच्छा आहेत का?

तात्यांप्रमाणे मलाही अशी एखादी जादूची कळ असावी असे वाटते की ती दाबताच आमरसपुरीचे ताट माझ्यासमोर येईल! :ड

बुधवारी रात्री तात्यांच्या प्रतिसादाची वाट पाहात आहे! :ड

--ईश्वरी.

शक्यता / इच्छा

१ शक्य आहे असे कुठेतरी वाचले होते.
३ - समुद्राच्या पाण्यावर शेती जरी नाही तरी त्यापासून सोप्या पध्दतीने पिण्याचे पाणी तयार करता येईल असे एक उपकरण मद्रासला तयार केले आहे असे ऐकले होते.

आता माझी इच्छा - अमेरिकेच्या SSN पद्धतीप्रमाणे भारतात प्रत्येक नागरिकाची सर्व माहिती एका विदागारात असावी. ह्या माहितीचा उपयोग बॅंक, वीज महावितरण संस्था, दूरसंचार विभाग, यांनी करून नागरिकांना हजारो अर्ज / कागदपत्रे भरणे ह्या त्रासातून मुक्त करावे.
अमेरिकेच्या व्हिसा अर्ज करण्याच्या पद्धतीतही असा बदल व्हावा. (होऊन जाऊ दे)

हे असे अर्ज भरत असताना मला 'म्हैस' मधले संवाद आठवतात :
'ए शिवराम गोविंद, नाव् सांग'
'पण त्या लायसन्स वरचं नाव वाचून पुन्हा त्यांना नाव विचारण्यात काय पॉईंट आहे ते मला समजत नाही'

------------------------------------------
तुम्ही सध्या हे वाचत आहात.

धन्यवाद

सदर दस्त माझ्याजवळही आहे, परंतु वरील प्रतिसादात मी केलेले स्वप्नरंजन त्या कार्डामुळे आजतरी सत्यात येत नाही.
------------------------------------------
तुम्ही सध्या हे वाचत आहात.

वैधता

माझ्या इच्छेप्रमाणे हे सर्व अर्ज करताना फक्त खाद्यविवरणपत्राचा क्रमांक देणे पुरेसे ठरावे.
सगळीकडे उत्पन्नाचा दाखला / पत्त्याचा दाखला / वयाचा दाखला वेगळा भरायला लागू नये असे आहे, व ते मी पहिल्याच प्रतिसादात नमूद केले होते. असो..

------------------------------------------
तुम्ही सध्या हे वाचत आहात.

दाखला

रेशन कार्ड जर नेहमी अद्ययावत ठेवले बदललेल्या पत्त्यानुसार तर आपण म्हणता ते शक्य आहे. आता कागद स्वरूपातले कार्ड इतिहास जमा होत आहे. भारतात आपण म्हणता तसे त्याचे विदागार बनवण्याचे काम चालू आहे. तेंव्हा आपण म्हणत आहात ते भारतात शक्य आहे. तसेच, सार्वजनीक भविष्यनिर्वाह निधी संचलनालया तर्फे सुद्धा नोकरी करणार्‍यांसाठी असेच विदागार बनवणे सुरू आहे. जेणे करून आपण नोकरी बदलल्यास दरवेळी उस्तवारी करावी लागणार नाही. तसेच आपला निधी, महाजालावरून संपर्क करून मागवणे शक्य आहे.

मला वाटत कोणत्याही देशात जिथे SSN सारखी सुविधा आहे तिथे तुम्ही तुमचा विदा नेहमी अद्ययावत ठेवणे बंधनकारक आहे. त्याचा फायदा सर्वांनाच होतो. तसेच आपण भारतात ठेवणे अपेक्षीत आहे. असे विदागार बनल्यावर भारतात सुद्धा हि प्रक्रिया सोपी होईल.





मराठीत लिहा. वापरा.

विदा अद्ययावत ठेवणे

हे बंधन सर्वांनी पाळलेच पाहिजे, त्याचा नक्की फायदा होईल.

प्रतिसादाबद्दल् धन्यवाद!
------------------------------------------
तुम्ही सध्या हे वाचत आहात.

बातमी

रेशन कार्ड बद्दल हि बातमी वाचा.





मराठीत लिहा. वापरा.

मान्य

तुमचे मुद्दे मान्य. पण गोष्ट नमुद करावी असे वाटते कि, तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे हे मला जास्त आनंददायक वाटते आहे. तुम्ही आम्ही आजच्या संगणकयुगात असलो तरी, सगळे भारतीय जनता नाही. खास करून दारिद्र्य रेषे खालच्या लोक तरी. अर्थात सगळे भारतीय इतके हुशार आहेत की याला बगल देणारा मार्ग नक्किच शोधुन काढतील.

रेशनकार्डचे संगणकिकरण हे आम्ही एस एस एन च्या दिशेने जात आहोत याचे लक्षण नाही का? अहो, आम्ही भारतीय तसे मागास आहोत. त्यामुळे सर्वच बाबतीत तसे आम्ही असे काही ऑटोमेशन मिळाले कि खुश होतो. भारतीय मागास आहेत निदान अमेरिकेपेक्षा हे तरी आपल्याला मान्य असेलच.





मराठीत लिहा. वापरा.

शांतताक्षेपक आणि अंधारदिवा

कित्येक वर्षांपासून वाटत आले आहे की
१. इतर सर्व आवाज क्यान्सल करून, ठराविक परिघात का होईना, शांतता प्रक्षेपित करणारे ध्वनिनाशक यंत्र असायला हवे (मग बाहेर कोपर्‍यावर लाऊडस्पीकर ठणाणा बोंबलू दे) आणि
२. खोलीत दिवा लावून कोणीही काही काम करीत असले तरी फक्त आपल्यापुरता डोळ्यांवर अंधार पाडणारा टेबल-नॉनलॅम्प हवा.
इतरही गोष्टी हव्या आहेतच पण यांची प्राथमिकता जास्त ...
- दिगम्भा

झकास

दिगम्भा, लई भारी आयडिया? याची उलटप्रतिमा बी चालनं!

प्रकाश घाटपांडे

शांतताक्षेपक

१. इतर सर्व आवाज क्यान्सल करून, ठराविक परिघात का होईना, शांतता प्रक्षेपित करणारे ध्वनिनाशक यंत्र असायला हवे (मग बाहेर कोपर्‍यावर लाऊडस्पीकर ठणाणा बोंबलू दे)

आपल्याला हवा असलेला आवाज मोठा करून तो केवळ आपल्याच कानापर्यंत पोहोचेल असे यंत्र अमेरिकन बाजारात मि़ळते याची जाहिरात पाहिली आहे. विशेषतः घरात इतरांना टिव्ही पाहायचा नसतो आणि तुम्हाला तो पाहायचा असतो आणि त्यावेळेस ते इतर आवाज कमी करा म्हणून सांगतात तेव्हा या यंत्राचा उपयोग सर्वाधिक होतो असे सांगितले जाते. ;-)

सध्या त्याचे नाव आठवत नाही. जाहिरात पुन्हा पाहण्यात आली तर कळवेन.

वेगळा प्रकार असावा.

'नॉइझ कॅन्सलिंग हेडफोन्स' हा काय प्रकार असतो?

हा तो प्रकार नाही. मी लिहिलेले यंत्र हे ज्यांना कमी ऐकू येतं त्यांच्यासाठी जे अँप्लिफायर्स असतात त्या सदृश दिसते. मला नेमके नाव आठ्वत नाहीये.

टिव्हीवर ऍड येते. बायको फोनवर बोलताना, नवर्‍याला आवाज हळू कर मी बोलत्ये कळत नाही का छाप लूक देते. शेजारणींचे संभाषण ऐकते. (देश, धर्म, संस्कृती बदलली तरी संवाद तेच राहतात. ;-))
अशा टाईपची जाहिरात आहे.

नॉइज मफलर

आमच्या शिक्षणात असे शिकल्याचे आठवते की आलिशान गाड्यांमध्ये नॉइज मफलर तंत्र वापरतात. म्हणजे, आवाजाच्या ज्या लहरी आहेत त्यांची वारंवारता(फ्रिक्वेन्सी) ओळखून चिपेच्या साहाय्याने त्याच्या बरोबर विरुद्ध फेज वाल्या लहरी निर्माण करणे म्हणजे दोन्ही लहरी एकमेकांवर पडून एकमेकांना रद्द करतात आणि परिणामकारक आवाज कानांना कमी/नाही इतका ऐकू येतो. असे काही आपल्या रोजच्या आयुष्यातही सत्यात आणले तर तुमचे पहिले स्वप्न काही अंशी पूर्ण होईल.

 
^ वर