साहित्यातील "अभिजातवाद"!

साहित्यातील "अभिजातवाद".

साहित्याच्या वादातील एक वाद म्हणजे "अभिजातवाद"गेल्या अनेक वर्षात अनेकवाद साहित्य चर्चेत दिसून येतात.त्यापैकी हा एक आहे.अभिजातवाद म्हणजे जातिवंत किंवा अव्वल दर्जाचे.'अभिजातवाद'ज्याला इंग्रजीत ' क्लासिझम’ असे म्हणतात.ज्या साहित्यकृतीचा रसिकाच्या मनावर दीर्घकाळ प्रभाव राहतो.अशा दीर्घकाळ टिकणा-या साहित्यकृतीला अभिजात म्हणतात.युरोपातील ग्रीक व लॆटीन भाषेमध्ये अशा अभिजात साहित्यकृती निर्माण झाल्या,व त्यांचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहतो.अशा प्रवृत्तीच्या म्हणजे,खूप कालावधी लाभलेला तो अभिजातवादी संप्रदाय.ग्रीक,लॆटीन,संस्कृत,भाषांचा अभिजात भाषा म्हणून उल्लेख करतात."जीवनासाठी कला "असे या संप्रदायाचे वैशिष्ट्ये.
कलावंताने मानवी जीवनाचे निरीक्षण करावे,आपल्या लेखनातून ते मांडावे,ज्यातून समाजाला काहीतरी उदबोध झाला पाहिजे.आणि ज्यातून जीवनाचा अर्थ कळण्यास मदत होईल.असा एक विचार या संप्रदायाचा सांगता येईल. समाजातील रुढी,परंपरा,आदर्श,यांचे पालन समाजात होते,असे जे कोणते साहित्य असेल,किंवा ज्याच्यामध्ये जीवनभाष्य उत्तम रीतीने आलेले असेल.ते अभिजातवादी साहित्य.
लेखकाच्या अनुभवापेक्षा,सूक्ष्म निरीक्षणे वस्तुनिष्ठपणे करून समाजाला आनंदाबरोबरच उपदेश करताना "काय आहे, यापेक्षा "काय होणे शक्य आहे" हे सांगण्याची धडपड या साहित्यामध्ये आहे.अभिजातवादी साहित्य पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेवर प्रेम करणारे आहे.परंपरेचा अनुकरण या संप्रदायाचा महत्त्वाचा गूण,नियमांच्या चाकोरीत राहून लिहिणे हा त्याचा एक भाग,त्याच बरोबर "जुनं ते सोनं" हा विचार स्वीकारलेला असल्यामुळे ते साहित्य विश्वासार्ह वाटते.
साहित्यिक आपला अनुभव व्यक्त करताना कल्पनाविलासात रमत नाही.तर जे वास्तविक आहे,ते सांगण्यावर भर देतो.आत्माविष्कार ज्या साहित्यप्रकारातून करायचा आहे,त्या साहित्यप्रकाराच्या चौकटीतून लिहिण्यावर अधिक भर या साहित्यप्रकाराचा असतो.या प्रकारांच्या नियमनामुळे अभिजातवादी साहित्यकृती अधिक प्रमाणबद्ध,रेखीव,व निर्दोषपणाकडे जाणारी असते.
अभिजातवादी साहित्याचे थोडक्यात परंपरानुकरण,आदर्शावर श्रद्धा,शुद्धता,असे गुणविशेष सांगता येतात. या वादातले हे अंतिम मत आहे,असे मानन्याचे कारण नाही. हा धावता आढावा आहे.साहित्यातला स्वच्छंदतावाद,आणि वास्तववाद या वादाचे निर्मितीचे कारण अभिजातवाद आहे, हेही आम्ही जाणतो.त्याबद्दल काही शंका असण्याचे कारणच नाही.

Comments

अजूनही लिवा की राव!

या प्रकारांच्या नियमनामुळे अभिजातवादी साहित्यकृती अधिक प्रमाणबद्ध,रेखीव,व निर्दोषपणाकडे जाणारी असते.
अभिजातवादी साहित्याचे थोडक्यात परंपरानुकरण,आदर्शावर श्रद्धा,शुद्धता,असे गुणविशेष सांगता येतात. या वादातले हे अंतिम मत आहे,असे मानन्याचे कारण नाही. हा धावता आढावा आहे.साहित्यातला स्वच्छंदतावाद,आणि वास्तववाद या वादाचे निर्मितीचे कारण अभिजातवाद आहे, हेही आम्ही जाणतो.त्याबद्दल काही शंका असण्याचे कारणच नाही.

क्या बात है बिरुटेसाहेब! आपले लेखन आवडले. विषयही आवडला. पण जरा आणखी विस्तृतपणे लिवा की राव. आपल्या या धावत्या आढाव्याने आमचे समाधान झाले नसून या संदर्भात आणखीही वाचावयास आवडेल एवढेच सांगू इच्छितो!

आपलाच,
तात्या.

अभिजात ! हा हा हा !

साहित्याचा अभिजातवादावरील लेख,जरा सोप्या शब्दात करता आला असता हे मान्य,म्हणून या लेखाचा मनोरंजक पूर्वार्ध आम्ही इथे लिहिला आहे.खरे तर हलके फूलके लिहिणे आमचा स्वभाव,पण आम्हाला गुंड्याभाऊने उचकावले म्हटले काही तरी लिहा,त्यांना तरी काय माहित,इतका रुचीहीन लेख लिहीतील.असो,बाकी साहित्याचे वाद कितीही आवडीचे असले तरी, भविष्यात मनोरंजक उदाहरणे, सोप्याभाषेत स्पष्टीकरणे, याचा प्रयत्न नक्की करेन.

अवांतर :-आमच्या मनोरंजनात्मक लेखात,काही नावे काल्पनिक आहेत,ती जर कुणाला आपली वाटत असतील तर तो केवळ योगायोग समजावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय बा...

काय मला गरीबाचं नाव घेता राव?

असो.
तुम्ही १००% उपक्रमावर रहाणार. कोणतेही लिखाण मनोरंजक नसेल तर ते विद्वत्तादर्शक का काय ते म्हणतात. त्यात माहिती असते म्हणे! त्यामुळे तुमच्या लेखात माहिती असणारच. आणी माहिती असली की काय होते?
उपक्रमराव खुश!

तर असं आहे.

आपला
गुंड्याभाऊ

 
^ वर