कसा वाटतो आपला महाराष्ट्र?

महाराष्ट्र टाईम्सला ४५ वर्षे पूर्ण झाल्याबदद्ल निघालेल्या विशेषांकात त्यांनी परदेशस्थ भारतीयांचे "कसा काय वाटतो आपला महाराष्ट्र" या विषयावर् लेख मागीतले होते. मी पण पाठवला होता आणि तो प्रकाशीत झाल्याचे कळले म्हणून उपक्रमींसाठी येथे देतो. (म.टा. दुवा)

विकास देशपांडे, बोस्टन, अमेरिका

[ Tuesday, June 19, 2007 09:11:28 pm]

कसा वाटतोय आपला महाराष्ट्र?

सर्वप्रथम म.टा. ला वर्धापनदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

महाराष्ट्र कसा वाटला याचे सरळ उत्तर असावेसे वाटते की, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ह्या गीतात वर्णन केल्यासारखा वाटतो! अर्थात इतके सरळ सोपे उत्तर जगाच्या पाठीवर कुठेच देता येणार नाही..

गेली सोळा वषेर् बोस्टनहून महाराष्ट्र बघताना सुरूवातीला घरून येणाऱ्या कात्रणांची वाट पाहत बसावे लागायचे पण नंतर इंटरनेटमुळे म.टा. आणि बातम्या मिळणे सोपे झाले. प्रत्येक वेळेस मुंबईत उतरल्यावर नाविन्य नव्हते! रस्ते चांगले झाले, पुणे-मुंबई रस्त्यावरून जाण्यासारखे सुख नाही असे कधी वाटले नव्हते! माणसांमधे (विशेषत: नवीन पिढीत) आत्मविश्वास वाढलेला जाणवतो. बदलत्या अर्थकारणात मराठी माणूस स्वत:ला सामावून घेताना दिसतो. प्रशासकीय सेवा परीक्षांमधे यावेळेस मारलेली बाजी बघून आनंद झाला.

बोईंगसारखा उद्योग महाराष्ट्रात येत असल्याचे पाहून चांगले वाटते. नुसत्या चार महानगरात फक्त मराठी स्त्रिया महपौर होत असल्याचे पाहून चांगलेच वाटते. एकिकडे वचनी लेखणी ही मराठी गिरा दिसो... याचा कृतीतील आभाव पाहून काळजी वाटत असताना दुसरीकडे मराठी नाटके आणि ती बघणाऱ्यांची गदीर् कमी झालेली दिसत नाही.

परंतु सर्वच काही आनंदीआनंद वाटत नाही... गेले वर्षभर लोकांना दाटला चोहीकडे अधार म्हणत बसायची आलेली वेळ बघून आमि तरी पण राज्यर्कत्यांना अचाट निष्काम कर्मयोग पाहून खेद वाटतो. समाजातील विषमता दूर करण्याचा संपूर्ण भारतात प्रथम प्रयत्न करणाऱ्या आणि अनेक सुधारकांना जन्म देणार या महाराष्ट्रात खैरलांजी सारख्या घटना घडतात हे पाहून अस्वस्थता हा शब्द सुध्दा त्रोटक वाटतो.

नगर रचनेचा योग्य विचार न करता झालेल्या वाढीचा परिणाम भोगून मुंबईला सव्वीस जूनला आता दोन वषेर् होतील पण हवा तसा विचार अजूनही होताना दिसत नाही. पाण्याचा अनियमित वापर करून शेती धोक्यात येणे काय किंवा शुध्द हवा आणि शुध्द पाणी अशा मुलभूत गोष्टींपासून संपूर्ण समाजाला वंचीत राहावे लागणे काय, या गोष्टी प्रगत राज्याचे द्योतक होऊ शकत नाहीत. व्यक्तीगत स्वास्थ्य टिकवायला जसा संतुलीत आहार लागतो, तसाच निरोगी समाजस्वास्थ्यासाठी संतुलीत वाढ लागते- अर्थकारण, राजकारण, समाजकारण, आमि पर्यावरण. यातील संतुलन बिघडले तर थोडा काळ कदाचित हव्या त्या गोष्टा लवकर मितीलही पण त्या झटपट फायद्यांप्रमाणेच अनेक तोटे दूर करावे लागतील.

शेवटी मुंबईचे शांघाय करायला हवे का लंडन की न्यू यॉर्क याचा विचार करताना आणि सरळ उत्तर देण्याऐवजी एक जुनी ऐकलेली गोष्ट राहून आठवते लिहीतो: स्वातंत्र्यपूवर्व काळात एकाशाळेत मुलांना शाळामास्तरांनी प्रश्न विचारला की तुम्हाला कोण व्हायचे आहेत्याची उत्तरे यायला लागली की शिवाजी, टिळक, गांधी वगैरे... मग मास्तरांनी एका गप्प राहीलेल्या मुलाला विचारले की यशवंता तमला कोण व्हायचे आहे, तो मुलगा म्हणाला यशवंतराव चव्हाण. बाकी शिवाजी, टिळक झाले का ते माहीत नाही पण तो मुलगा मात्र यशवंतराव चव्हाण झाला.

Comments

विकास?

नगर रचनेचा योग्य विचार न करता झालेल्या वाढीचा परिणाम भोगून मुंबईला सव्वीस जूनला आता दोन वषेर् होतील पण हवा तसा विचार अजूनही होताना दिसत नाही.

अगदी खरं आहे.
इच्छाशक्ती,नियोजन व अधिकार एकत्रित व एकच वेळी काम करेल त्यावेळीच काही सकारत्मक घडेल.(लॉजिक ऍण्ड गेट)शासकीय खात्यांचे व्यवस्थापकीय पातळीवर सर्वांगिण मुल्यमापन केले तर शासकीय यंत्रणा मोडीत निघेल.नागरिकांच्या करातून शासकीय नोकरांचा पगार मिळतो.याची जाणीव ना नागरिकांना ना शासकीय नोकरांना ना लोकप्रतिनिधींना

प्रकाश घाटपांडे

मान्य

प्रकाश आणि युयुत्यु,

आपले कर आकारणीबद्दलचे मत नक्कीच मान्य आहे (जरी ९८% लोकांना भिकारी मानणे मान्य नसले तरी). मला वाटते हळू हळू ती पद्धत बदलत आहे. म्हणूनच पीआयएन काढला आहे आणि तो सर्वत्र लागायला लागला आहे. त्या दृष्टीने मला अमेरिकेतील पद्धत आवडते जिथे प्रत्येकाचाच कर पगाराच्यावेळेस कापला जातो जरी काही लोकांना वर्षाअखेरीस तो १००% परत मिळत असला तरी - फक्त बेकायदेशीर पगारच चेक व्यतिरीक्त रोकड पैशात दिला जातो.

दुसरा भाग मी सरकारी कामात असल्यामुळे स्थानीक नागरीकांकडून कायम बघितला म्हणजे "टॅक्स पेयर्स मनी" म्हणत प्रत्येक गोष्टींची अपेक्षा केली जाते. काही अर्थाने हे चांगले वाटते पण त्याचा अतिरेक होतो. शिवाय जेंव्हा सरकारच्या जबाबदारीतील गोष्टी लोक नीट वापरत नाहीत तेंव्हा तो करदात्यांच्या पैशाचा अपव्ययच आहे. या वरून एक चांगली जाहीरात मी मला वाटते बॉस्टन सबवे मधे पाहीली होती: " ही गाडी तुमच्या पैशाने स्वच्छ ठेवली जाते, ती खराब करून तुमच्याच पैशाचा अपव्यय करू नका".

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा मुद्दा!

विकास,

बोस्टनहून गेल्या १६ वर्षांपासून घेतलेला महाराष्ट्राचा आढावा चांगला आहे. छानच लिहिले आहेस हो. तुझा लेख मटात छापून आला याबद्दल तुझे अभिनंदन. परंतु सदर आढाव्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येसारख्या महत्वाच्या मुद्द्याचा उल्लेख राहिला असे वाटते!

एक सुधारणा -

नगर रचनेचा योग्य विचार न करता झालेल्या वाढीचा परिणाम भोगून मुंबईला सव्वीस जूनला आता दोन वषेर् होतील पण हवा तसा विचार अजूनही होताना दिसत नाही.

ही तारीख २६ जून नसून २६ जुलै आहे.

आपला,
(२६ जुलै पाहिलेला मुंबईकर) तात्या.

धन्यवाद

धन्यवाद तात्या आणि सर्वजण,

आपण शेतकर्‍यांच्या आत्महत्येबद्दलचा उल्लेख राहील्याचे बोललात ते अगदी मान्य आहे. मी ते लिहायला पाहीजे होते.

"लै" चा "न" कसा झाला ते माहीत नाही पण मला २६ जुलै तारीख (जरी अनुभवावी लागली नसली तरी) माहीत आहे (जशी १२ मार्च पण...). तेंव्हा क्षमस्व.

विकास

विस्तृत,

आपण शेतकर्‍यांच्या आत्महत्येबद्दलचा उल्लेख राहील्याचे बोललात ते अगदी मान्य आहे. मी ते लिहायला पाहीजे होते.

काहीच हरकत नाही, अजूनही लिहा. खरं पाहता महाराष्ट्रातील सामाजिक आणि ग्रामीण जीवनाविषयी आपला विस्तृत अभ्यास आहे, त्यामुळे 'शेतकर्‍यांच्या आत्महत्या' या अत्यंत गंभीर विषयावर आपल्याकडून एक स्वतंत्र विस्तृत लेख अपेक्षित आहे.

तात्या.

कल्पना चांगली आहे

धन्यवाद, मला (असे लिहायचे) सुचले नव्हते, पण मी नक्कीच प्रयत्न करीन.

 
^ वर