डान्सबार, बारबाला आणि जिवाची मुंबई, एक बरबादी!
माझा सदर लेख उपक्रमरावांना माहितीपूर्ण व सामाजिक आशयाचा वाटल्यास इथे राहील, अन्यथा इथून उडवून लावला जाईल याची मला कल्पना आहे! ;)
काजल! वय वर्ष वीसच्या आसपास. रोजची कमाई रुपये पाच ते दहा हजार!
मोनिका! वय वर्ष वीसच्या आसपास. रोजची कमाई रुपये पंचवीस ते तीस हजार!!
सोनी! वय वर्ष वीसच्या आसपास. रोजची कमाई रुपये पंचवीस ते तीस हजार किंवा त्याहून जास्त!
मंडळी, ही नांवे आहेत काही बारबालांची.
मंडळी, माझा काय योग आहे हे माहिती नाही, पण माझ्या आयुष्यात माझ्या कामधंद्याच्या निमित्ताने दारुवाले, शेट्टी बारमालक ही मंडळीच खूप आली. मी पडलो शेअरमार्केटचा माणूस! ज्या मार्केटची रोजची सरासरी उलाढाल ५०००० कोटी रुपयांची आहे अश्या मार्केटचा, ज्याला फक्त पैशांचं ग्लॅमर आहे आणि पैशांचीच भाषा कळते! त्यामुळे साहजिकच ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे अशी दोन नंबरवाली मंडळी या बाजारात अक्षरश: खोर्यानं पैसा ओततात. आपला धंदा पोर्टफोलिओ मॅनेजमेन्टचा! त्यामुळे ओळखीपाळखीने असे अनेक शेट्टी बारमालक माझे अशील आहेत. त्यामुळे त्यांच्याशी 'अपनेको क्या? धंदेसे मतलब!' या हेतूने वरचेवर भेटी होतात, त्यांच्या बारमध्येही जाणंयेणं होतं. या बारभेटींचाच एक भाग म्हणून मला डान्सबार, त्यातील पैशांची उलाढाल, त्यात थिरकणार्या बारबाला या सर्व गोष्टी खूप जवळून पाहायला मिळाल्या.
मंडळी, आपण पैशाला लक्ष्मीचं रूप मानतो आणि तिची पूजा करतो. पण या डान्सबारमध्ये लक्ष्मीला अक्षरशः बटीक होताना मी पाहिले आहे! हे डान्सबार म्हणजे आपल्या समाजाला लागलेली एक भयानक कीड आहे असे माझे वैयक्तिक मत आहे!
अवांतर - सुदैवाची गोष्ट इतकीच की इतक्या वेळा त्या डान्सबार्समध्ये जाऊनही मी माझ्या कष्टाचा, मेहनतीचा एक नवा पैसाही कधी कुठल्या बारबालेवर उडवला नाही, मला कधी उडवावासा वाटलाही नाही! आपण फक्त दुरून काय दिसेल ती दुनिया पाहायचं काम करायचं इतकंच! फक्त भीमसेनजींसारख्या दिग्गज गवयांच्या स्वरांचीच नशा आम्हाला आजवर भुरळ घालू शकली हे आमचं भाग्य! आणि तीच नशा आम्ही आजवर केली आणि जपली! नाहीतर पाय घसरून पडण्याचे भरपूर फसवे क्षण आजवरच्या आयुष्यात आले! असो..
हे डान्सबार दिवसभर बंद असतात. साधारणपणे संध्याकाळी सात नंतर ते सुरू होतात. रिक्षा करून, गाड्या करून त्यात नाचणार्या बारबाला तिथे जमू लागतात. प्रत्येक बारमध्ये त्यांची वेगळी मेकप रूम असते. मेकप करून, तंग आकर्षक पेहेराव करून हळूहळू बारच्या मुख्य बैठकीत या नटव्या दाखल होऊ लागतात. बहुतेक बारबालांची वयं पंचविशी तिशीच्या आतच! त्यातल्या बर्याचश्या दिसायला 'बर्या' म्हणता येतील अश्या. त्यातल्या काही खरोखरच 'सुरेख' या प्रकारात मोडणार्या! एका बारमध्ये साधारण तीस ते साठ एवढ्या बारबाला असतात. बर्याच डान्सबारमधून लाईव्ह ऑर्केस्ट्रे असतात. एखाददोन गाणारे, एखाददोन गाणार्या आणि साथीदार यांना या बार्समध्ये एक वेगळी रंगमंचवजा जागा असते.
हळूहळू गिर्हाइकांची वर्दळ वाढू लागते. व्हिस्की, बियर सर्व्ह केली जाऊ लागते. संध्याकाळची वेळ. समोर दारुचा गिल्लास, खिशात काळ्या पैशांची मस्ती आणि समोर दिसायला बर्या, तंग आकर्षक कपडे घातलेल्या तरूण मुली! बरबादीकरता अजून काय हवं?
साधारणपणे बिल्डर मंडळी, सरकारी कार्यालयात काम करून मजबूत वरपैसा कमावणारी माणसं, ही मंडळी या बार्सची गिर्हाईकं! बारमध्ये दारू प्यायला बसल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक मुलींपैकी एखादी मुलगी गिर्हाईकास पसंत पडते. वेटर लोकांकडून पाचशे हजाराच्या नोटांच्या बदल्यात दहा दहा चे सुट्टे मागवले जातात आणि त्या मुलीवर उधळले जाऊ लागतात. हजार, दोन हजार, तीन हजार! अशी रक्कम वाढतच जाते! एकदा आपल्याकडे पाहून एखादा मनुष्य पैसे उडवू लागला की ती बारबाला त्याच्यासमोर उभीच राहते. मध्येच सूचक हासणे, लाडिक हासणे, थोडक्यात समोरच्या माणसाला जितकं पाघळवता येईल तितकं पाघळवणे हेच तिचं काम! हे वेटर लोक मोठ्या स्टायलीत त्या पोरीवर हजार रुपायांची बंडलं उडवत असतात! मग बाकीचे वेटर लोक त्या खाली पडलेल्या नोटा गोळा करून नोटांची ती गड्डी त्या मुलीच्या हातात देतात. जशी दारुची आणि समोर उभ्या असलेल्या मुलीची धुंदी डोक्यात चढू लागते तश्या अजून नोटा उधळल्या जाऊ लागतात! मुलीच्या हातातली नोटांची गड्डी वाढतच जाते! एकेका मुलीची रोजची सरासरी कमाई दहा हजारापासून तीस हजारापर्यंत आहे अश्या दादरच्या 'बेवॉच' मधल्या किंवा ठाण्याच्या 'सीक्वीनस्' मधल्या काही बारबाला मला माहीत आहेत! या मुलींच्या अत्यंत पॉश अश्या शोफर्ड कार्स आहेत!
हे चित्र रोजचेच! साधारणपणे २०-२५ वर्षाची कुठलिही मुलगी ही आकर्षकच दिसते. त्यातून मग ती रंगरुपाने खरोखरंच सुरेख आणि देहबांध्याने आकर्षक असेल तर मग बघायलाच नको! तिच्यावर मरणारा तिचा यार रोज संध्याकाळी केवळ तिच्याकरता हज्जारो रुपये घेऊन बारमध्ये येणार! तिच्यावर वाट्टेल तसे पैसे उधळणार. काही वेळेला बारमध्ये येणार्या दुसर्या एखाद्या माणसाला तिच मुलगी आवडते. मग दोघात पैसे उडवण्याची स्पर्धा आणि जिद्द! यात त्या मुलीची दोन्हीकडून चांदी! खरं पाहता ती कुणाचीच नसते. ती असते फक्त पैशांची! पण स्त्रीदेहाच्या आणि दारुच्या धुंदीमुळे या गिर्हाइकांची सत्सदविवेकबुद्धी हरवते. गैरमर्गाने कमावलेला पैसा हा गैरमार्गानेच दुप्पट वेगात खर्च होतो हेच खरे! मंडळी, एकेका मुलीवर एकाच वेळेला दोघाजणांकडून अक्षरशः दोन दोन लाख रुपये तासाभरात उडवले गेलेले मी पाहिले आहेत! एकाने नोटा उधळल्या की दुसरा जिद्दीस पेटणार आणि दुसर्याने उधळल्या की पुन्हा पहिला जिद्दीस पेटणार! कसली भयानक जिद्द ही? की पैशांची, दारुची आणि स्त्रीदेहाच्या लालसेची मस्ती? यापैकी कुणालाही इंडियन कॅन्सर सोसायटीला किंवा क्राय सारख्या एखाद्या संस्थेला अवघ्या शंभर रुपयांचीही देणगी द्यायला सांगा. ते त्यांना जमणार नाही! मंडळी, या सगळ्या गोष्टी फार भयानक आहेत! घरच्या घरी सरकरी स्टॅम्प पेपर छापून विकणार्या (काय मस्त धंदा आहे ना!) अब्दुल करीम तेलगीने दादरच्या बेवॉच बार मध्ये अक्षरशः करोडो रुपये 'जानू' नांवाच्या बारबालेवर उडवले आहेत! उत्तरप्रदेशमधली अशिक्षित 'जानू' सध्या स्वतःच्या सर्व कुटुंबियांसमवेत कायमची दुबईत स्थायिक झालेली आहे! मंडळी, आता काय काय सांगू तुम्हाला!
आता हे शेट्टी बारमालक कधी कधी काय गेम खेळतात हे सांगतो! बारमध्ये एखादा मनुष्य त्याच्या आवडत्या बारबालेवर पैसे उधळत असतो. हा मासा जर गब्बर असेल तर बार मॅनेजमेन्टचाच दुसरा कुणीतरी मनुष्य डमी गिर्हाईक बनून त्याच्या बाजूला जाऊन बसतो. या डमीकडे अर्थातच ४-५ लाख रुपये (मालकाचेच!) तयार असतात. मग हा डमी गिर्हाईक त्याच बारबालेवर पैसे उधळू लागतो. (हे पैसे अर्थातच नंतर मालकाला परत मिळतात!) हे पाहून पहिला जिद्दीला पेटतो आणि आणखी पैसे उधळू लागतो! वेटर लोकांची खाली पडलेले हजारो लाखो रुपये गोळा करतांना अक्षरशः धावपळ सुरू होते. डमीकडचे पैसे अर्थातच कधीच न संपणारे असतात! ;) कारण त्याला चुपचाप मागच्या दाराने पैसे मिळतच असतात! असं करता करता खरा गिर्हाईक मात्र जिद्दीमध्ये येऊन बरबाद होतो. त्याचा संपूर्ण खिसा रिकामा होतो! आता बोला!
चेंबूरला कँपभागात, ठाण्याच्या लोकमान्यनगर, रामचंद्रनगर, किसननगर या भागात ह्या बारबालांची बरीच वस्ती आहे. बहुतेक बारबाला या उत्तरप्रदेश मधून मुंबईत येतात/आणल्या जातात. काही राजस्थानातूनही येतात. यांच्या सख्ख्या आयाच यांना इकडे पाठवायला उत्सुक असतात! 'बेटी, जल्दी बडी हो जा. पैसा कमानेके लिये तुझे बंबई जाना है' हे सांगून आईच मुलीला तयार करते! एक खूप मोठा अशिक्षित परंतु पैसे कमवायची बरोब्बर अक्कल असलेला हा उत्तरप्रदेशीय भय्या समाज आहे! तिवारी, मिश्रा, सिंग, अशी बहुतेकांची आडनांव! बार्समध्ये या बारबाला बॉलिवुडच्या नट्यांची (काजल, रवीना, रानी ) नावं घेऊन वावरतात! या मुलींना मुंबईच्या डान्सबारमध्ये आणणारी दलाल मंडळी ही बरीचशी शेट्टी आणि बंगाली आहेत. बसंतसेठ, मॉन्टोसेठ, गणेशसेठ असे काही दलाल मला माहिती आहेत! ही दलाल मंडळी उत्तरप्रदेश, राजस्थनातल्या १८ ते २० वर्षांच्या मुलींना हेरतात आणि पैशांचं अमिष दाखवून इकडे आणतात! 'पैसा कमानेका है, तो मुझको पेहेले खुश करना पडेगा. फिर मै सेठसे बात करके तुझे डान्सबारमे कामपे लगाऊंगा' या न्यायाने ही चाळीशी पन्नाशीतली दलाल मंडळीच सर्वप्रथम या अठरा अठरा वीस वीस वर्षांच्या मुलींना भोगतात! मग ज्या बारमध्ये तिला कामाला आणली जाते त्या बारच्या शेट्टी मालकाची मर्जी संपादन करायला हवी! मग ती मुलगी क्वालिफाईड बारबाला बनून लोकांसमोर उभी राहू लागते!
या डान्सबारमधले दारुचे आणि इतर पदार्थांचे दरही आवाच्या सवा असतात. दुकानात ५० रुपायाला मिळणारी बियर ही डान्सबारमध्ये २०० रुपायाला मिळते! १० रुपायाला मिळणारं शीतपेयं १०० रुपायाला मिलतं. म्हणजे ही शेट्टी बारमालक मंडळी किती प्रचंड नफेखोर आहेत ते पाहा! अर्थात, जोपर्यंत ते दर देणारी गिर्हाईकं आहेत तोपर्यंत बारमालकांना दोष देण्यात तरी काय अर्थ आहे असा विचार कधी कधी मनात येतो. शिवाय प्रत्येक बारबालेकडून त्यांच्या बारमध्ये उभं राहण्याचा १०० ते १५० रुपये रोजचा हप्ता बारबालांना बारमालकांना द्यावा लागतो. बारबालांची बारमधली सरासरी संख्या ४० जरी धरली तरी बारमालकाला रोजचे चार ते सहा हजार रुपये हे हप्त्यापोटी मिळतात! यातूनच पोलिस, गुमास्ताकायदावाले, यांचे हप्ते भरले जातात!
बारमध्ये येणारी नेहमीची गिर्हाइकं आणि त्यांच्या आवडत्या बारबाला यांच्यात मोबाईल फोनस् च्या नंबरचीही बर्याचदा देवाणघेवाण होते. तिला बाहेर घेऊन जाण्याकरता तो अर्थातच उत्सुक असतो! ते पैसे वेगळे. त्याच्याशी बारचा काहीच संबंध नाही. बाहेरच्या खाजगी लॉजिंग हॉटेलातून बर्याचश्या बारबाला आपापल्या गिर्हाईकासोबत जातात! हे दर दोन हजारापासून ते बारा हजारापर्यंत असतात! ती या बारबालांची दिवसाची कमाई! सर्वसाधारण दिसणार्या बारबाला असले प्रकार करतात! मी वर उल्लेख केल्याप्रमाणे दिसायला खरोखरंच सुरेख अश्या काही बारबाला असतात, ज्या दिवसाला पंचवीस ते तीस हजार रुपये कमावतात त्या दहा बारा हजार रुपयात खाजगी लॉजमध्ये कुठल्याही गिर्हाइकासोबत जात नाहीत! त्या फक्त झुलवत ठेवायचं काम करतात. त्यातच त्यांना लाख्खो रुपये मिळतात मग त्या कशाला कुणाबरोबर जाऊन आपला फॉर्म बिघडवून घेतील?! त्यांना 'त्या' कामाकरता न्यायचंच असेल तर त्यांचे दर अक्षरशः लाखात आहेत आणि ते देणारीही मंडळी आहेत!
असो मंडळी, इथेच थांबतो आता!
दारुडा मारकुटा नवरा, चार पोरं पदरात असलेल्या, परंतु मेहनतीने, इज्जतीने महिना दोन तीन हजार रुपये कमावणार्या आपल्या धुणंभांडी करणार्या बाया त्यापरीस मला खूप खूप मोठ्या वाटतात आणि त्यांच्यापुढे मी नतमस्तक होतो!
पण तात्याच्या नतमस्तक होण्या न होण्याला मुंबईत विचारतंय कोण?
--तात्या अभ्यंकर.
Comments
भयंकर..
'बेटी, जल्दी बडी हो जा. पैसा कमानेके लिये तुझे बंबई जाना है' हे सांगून आईच मुलीला तयार करते!
भयानक आहे!
स्वाती
उत्तरे..
तात्या, एक सांग. गोरेगाव पश्चिम येथील डान्सबारचा मालक "प्रसाद शेट्टी" मारला गेला. ह्याचे कारण काय ?
मला माहिती नाही.
दुसरा प्रश्न. ते अशा डान्स बारच्या समोर उभे असणारे प्रायव्हेट सेक्युरिटी गार्ड लोक, आपण आत जाताना आपला हात हातात घेऊन असे दाबून का बघतात ?
त्यांचीही पैशांची (टिप) अपेक्षा असते.
बारबाला ह्या लैंगिकदृष्ट्या संकुचित संस्कृतीत, (म्हणजे आपल्या भारतात रे), का एवढ्या कमवतात ?
प्रश्न कळला नाही! ;)
पण सदर बारबालांची मागणी शिक्षिकांपेक्षा जास्त असल्याने ह्यांची अर्थप्राप्ती जास्त आहे का
शक्यता आहे! ;)
स्वतःच्या लिंगकंडशमनाव्यतिरीक्त भारतीय पुरुषांची मागणी आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांच्या हिताची असती, तर शिक्षक/शिक्षिकांना दिवसाचे पंचवीस हजार रुपये मिळाले नसते का ?
मिळायला पाहिजेत असे वाटते, पण मिळत नाहीत!
ता. क. आणि हा लेख ललित साहित्याचा प्रकार नाही, हे माझ्यासारखा अडाणचोट ओळखू शकतो. ते उपक्रमाच्या ज्ञानी संपादकांना ओळखू आले नाही, तर आपण दोघेही येथून एकदमच बाहेर पडू.
उत्तम! आता लवकरच मिसळपाव डॉट कॉम सुरू करतोय. तूही तिथे ये. तुला मिसळपावचा गृहमंत्री करतो! ;)
भीषण सत्य!
तात्या आपण लिहिलेत ते भीषण सत्य आहे. बारबालांना बारबंदी असूनही मुंबईत ज्या वेगाने ही बारसंस्कृती वाढतेय त्यावरून हेच सिद्ध होतेय की ही बंदी फक्त कागदावरच आहे. प्रत्यक्षात हे सगळे सुखैनैव चाललेले आहे! हा सर्व पैशाचा खेळ आहे! ज्याचे त्याचे हप्ते घरपोच होत असतात. मग कोण कुणाला टोकतंय. मधेच कधी तरी धाड टाकण्याचे नाटक करून लोकांच्या डोळ्यात धुळ फेकली की झाले! हाय काय आणि नाय काय!
जोवरी पैसा| तोवरी बैसा|| असा इथला कायदा आहे.
चषक
चषक हा पेगला शब्द नाही. दारुचे पात्र
प्रकाश घाटपांडे
काय करणार......
माझ्या सारख्याला हे सुक्ष्म भेद कळत नाहीत .कारण गालीबच्या भाषेत सांगायचे तर "कंबख्त मैंने(तूने) पी ही नही(तसे काही थेंब घेऊन बघितले होते पण ते आवडले नाहीत.त्याबद्दल जिज्ञासूंनी इथे वाचावे.) त्यामुळे अशा ठिकाणी मी कधी गेलोच नाही. जे काही वृत्तपत्रात वाचले तेवढ्या तुटपुंज्या ज्ञानावर दिली एक मताची पिंक टाकून(बाकी आम्ही दुसरे तरी काय करणार म्हणा)! असो.
त्यामुळे बार आणि डान्सबार हा फरक माझ्या लक्षातच आला नाही. लक्षात आणून दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!तेवढीच ज्ञानात भर!!!
चंगीभंगी! ;)
असो. ह्यात एक प्रामाणिकपणा असतो. आपण कुणी सम्राट अकबर अथवा विश्वामित्र असल्यासारखे वर्तन नसते. आपण चषकांतून मद्याचे घुटके घेत असताना कुणी आपल्यासमोर नाचावे, ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षही मागणी नसते.
मी चुकून सम्राट अकबर अथवा विश्वामित्रच्या जागी 'कृष्णद्वैपायन व्यास' असं वाचून गेलो! चूक झाल्याबद्दल मनातल्या मनात माझीच क्षमा मागतो! ;)
बाय द वे, मुंबईच्या 'झमझम' बार मध्ये आम्ही काही काळ नोकरी करत होतो, तेव्हा आमचं तेही अनुभवविश्व समृद्ध आहे! ;) त्या बारमध्ये येणारी मंडळी ही आत येतांना फुल्टू टपोरी माणसं म्हणूनच आत येत पण बाहेर जातांना मात्र सम्राट अकबर अथवा विश्वामित्र बनून बाहेर जात! ;) त्यातील काही जण 'सलीम' बनून शेजारीच असलेल्या रौशनीच्या चाळीतील त्याच्या 'अनारकलीला' भेटण्यासही जात असत! असो..
म्हणजेच, बारसंस्कृती ही शंकराच्या काळापासून चालू असली, आणि स्वर्गातले इतर चंगीभंगी देव डान्स संस्कृतीचे भोक्ते असले, तरी ह्या दोन संस्कृतीचे मीलन, म्हणजे डान्सबारसंस्कृती ही मात्र आजकालची आहे.
हम्म! विचारात भर टाकणाता उतारा! (म्हणजे 'परिच्छेद' या अर्थी हां, नाहीतर आपल्याला वेगळाच उतारा वाटायचा!) -;)
आपला,
तात्या अभ्यंकर.
माजी अकाउंटस् मॅनेजर,
झमझम बार, रौशनीच्या चाळीशेजारी,
फोरास रोड, मुंबई!
उतारा!
"विचारात भर टाकणाता उतारा"
उतारा एकदम झकास!
आपला
(आता उतरलेला)
गुंडोपंत
वा वा!
देशी प्यायल्यावर दुसर्यादिवशी मात्र त्रास होतो. कारण सोपे आहे. यात अल्कोहोल चे प्रमाण जास्त असते. तिखट चिवडा/मिरच्या खाण्या शिवाय गत्यंतर रहात नाही. पुढे पोटाची अजून वाट लागते!
आवांतरः
बाकी चिवड्या विषयी सहमत!
वर कांदा नि कोथिंबीर आणी कोणताही रस न उरलेल्या अर्ध्या लिंबाची एक नुसती ओवाळणी! वा! आत्ताच पाणी सुटलय तोंडाला!
नाशिकचा कोंडाजी चिवडा तसा खास बरं का... जमलं तर चाखून पहा!
आणी तोच चिवडा घातलेली पंचवटीतली अंबिका रेस्टॉरंटचे मिसळ पण एकदम झकास असते! अहाहा!
आपला
(मिसळप्रेमी)
गुंडोपंत
(जगात प्रत्येक दारू देणार्या जागेजवळ चिवडा मिळालाच पाहिजी याचे मी समर्थन करतो ;) )
चकणा
चिवडा,खारे-तिखट दाणे, याला चकणा का म्हणायचे हे सुरुवातीला मला कळायच नाही. हिंदी सिनेमात केश्तो मुखर्जी सारखे नट हे दारु पिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात तिरळेपणाची झाक अधिक डोकवायची, अगोदरच तिरळेपणा व त्यात दारु पिल्यावर होणारी वाढ ही खूपच विनोदि वाटायची. ही बाब उद्दिपित करणारा हा खाद्यघटक म्हणून याला चकणा म्हणतात कि काय? अशी शंका मला येई. पण नंतर असे लक्षात आले कि हा हिंदीतील 'चखना' या शब्दाचा अपभ्रंश आहे. अर्थात हे सगळ चाखून झाल्यावर.
(च म्हणता चकणा ओळखणारा)
प्रकाश घाटपांडे
आयडिया!
खल्लास बिजनेस आयडिया दिलीत !
युयुत्सुराव,
नवनवीन कल्पना लढवून त्या व्यवस्थापनाला देणे हा एकेकाळचा धंदाच होता आपला...
आपला
(नवनवीन कल्पनेत रमणारा)
गूंड्या
मध्यममार्गी अनैतिकता?
डमी गिर्हाईकाचा किस्सा वाचून शेअरबाजाराबद्दल तात्यांनीच लिहिलेल्या 'माकडांच्या व्यापार्याची' गोष्ट आठवली.
मला एक कळत नाही, आपण दारू पीत असताना, आपल्या समोर कुणी स्त्री नाचावी, असे लोकांना का वाटते ? अद्यापही मुघल साम्राज्य आहे असे कुठल्या तरी सरकारी कचेरीत क्लर्क असणार्या देशपांड्याला का वाटते ? फक्त त्या रात्री त्यांच्या खिशात दोनशे रुपये आहेत म्हणून ?
-- याचे उत्तर/कारण देणे अवघड वाटते. वेश्यागमन करणे म्हणजे (खूपच) अनैतिक किंवा तेवढे धाडस न झाल्याने, हा (थोडा कमी) अनैतिक असा 'मध्यम'मार्ग निवडावा अशी तर यामागची मानसिकता नसेल?
पुरुषांचे डान्सबार
पुरुषांचे डान्सबार नसतीलच का मुंबईत?
असलेच पाहिजेत! नसतील तर असावेत याचे मी समर्थन करतो.
का नसावेत? जर पुरुष ही मनमानी करु शकतात तर बायकांनीच काय घोडे मारले आहे? त्यानी पैसे उडवायला कुठे जावे बरं? असा भेदभाव आम्हाला योग्य वाटत नाही.
आणी असेही दोन्ही प्रकारच्या बारांत बाया आणी माणसे असे दोघांनाही जायला समाजाची आडकाठी का असावी?
मला वाटते की या किडीचा (?)उपयोग करुन समाज पुढे गेला पाहिजे.
सध्याच्या बार मध्ये बायका जात असतील असे तात्यांच्या लेखातून दिसत नाही. म्हणजे नाचणार्यां व्यतिरीक्त!
आपला
(आता उतरतेय की चढतेय तेच न कळणारा)
गुंडोपंत
(समाजात अनेक प्रकारचे 'बार' असावेत आणी त्यामागे कोणतीही हिप्पोक्रसी नसावे याचे मी समर्थन करतो.)
नैतिक अनैतिक
वेश्यागमन करणे म्हणजे (खूपच) अनैतिक किंवा तेवढे धाडस न झाल्याने, हा (थोडा कमी) अनैतिक असा 'मध्यम'मार्ग निवडावा अशी तर यामागची मानसिकता नसेल?
नंदन -
आपला धाडसाचा मुद्दा पटण्यासारखा आहे. पण अनैतिकतेची सारणी कशी लावणार?
माझा अगदी जवळचा मित्र शिक्षण चालू असताना दर शुक्रवारी खुलेआमपणे -- सार्या वसतीगृहावर हाळी देऊन -- पोरींकडे जायचा. त्याचे एकूण व्यवहार आणि वर्तन मला जवळून माहिती आहेत. ह्या माणसाला कोणीही -- तेव्हाही आणि आताही -- अनैतिक म्हणलेले मला आठवत नाही. सगळा उघडा कारभार आहे असे म्हणतात इतकेच.
वेश्यागमनापेक्षाही भाची/भाच्याच्या पाठीवर फिरणारा किचकाचा हात अधिक अनैतिक आहे. आपल्या आईवडिलांना वारसाहक्कासाठी छळणे अनैतिक आहे.... ... ... ही उदाहरणे कदाचित अगदी योग्य तुलना होत नसेल तर मुलाची पुस्तके विकून डान्सबारमध्ये येणारा अधिक अनैतिक वर्तनाचा धनी आहे असे मी मानतो.
किचकशंका
वेश्यागमनापेक्षाही भाची/भाच्याच्या पाठीवर फिरणारा किचकाचा हात अधिक अनैतिक आहे.
(पण एक शंका. कीचकाने सैरंध्रीला (म्हणजे द्रौपदीला) "बोलावले" होते, तेव्हा द्रौपदी किमान २६-२७ वर्षांची तरी असेल. त्यामुळे कीचकाची उपमा कळली नाही.)
आता विचारलीच आहे शंका तर निरसन करायचा पसारा मांडतो -
(किचकाची गाठ न पडलेला) एकलव्य
एक तर असा नाही तर नसा...
हे एक काही कळले नाही बॉ!
खुप अनैतिक आणी कमी अनैतिक असे काही कसे काय असते?
- एकतर बाई प्रेग्नंट असते किंवा बाई प्रेग्नंट नसते-
"मी किनाई 'जराशी प्रेग्नंट' आहे"
असं कधी ऐकलय का?
तसंच नैतीकतेचेही नाही का?
आपला
गुंडोपंत
महिना...
थेंबभर काय आणि हौदभर काय ... लाज गेली ती गेलीच. खरे आहे! म्हणून सारणी लावता येणारच नाही.
आता प्रेग्नंट म्हणत असाल तर पहिला दुसरा महिना असणे आणि नववा भरून येणे यांत "जीवनमरणाचा" फरक आहे असे ऐकून आहे.
(जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे)
सहमत
अशी सारणी लावता येणार नाही , याबद्दल सहमत आहे. मला म्हणायचं एवढंच होतं की, क्लर्क देशपांड्यांसारखी व्यक्ती आपल्या या कृतीचं - लंगडं का होईना, पण समर्थन (आपल्या मनाशी) कसं करत असेल. भ्रष्टाचारी राजकारण्यांविषयी पोटतिडीकीने बोलणारा एखादा कारकून हपिसातली स्टेशनरी घरी आणतो किंवा बसने जाऊन टॅक्सीचा प्रवासभत्ता घेतो. आपल्या या वागण्याचं समर्थन करताना तो ज्या भंपक नैतिकतेचा आधार घेतो, त्याचेच हे एक वेगळे रुप असावे, इतकाच माझ्या म्हणण्याचा हेतू होता.
भंपकपणा...
... दाखवून देणे या नंदनच्या हेतूबद्दल तिळमात्रही शंका मनात नव्हती. काळजी नसावी. तशी असती तर आमच्या प्रतिसादाची भाषाही वेगळी असली असती!!
(नंदनमित्र) एकलव्य
भंपकपणाचेच सांगायचे झाले तर जगात कोणत्या गोष्टीचे समर्थन देता येत नाही आणि लोक देत नाहीत ते सांगा!! मातृगमनापासून ते भृणहत्येपर्यंत हे त्या त्या परिस्थितीत योग्य कसे होते हे पटवून देणारे विद्वान जळीकाष्टीपाषाणी नि संस्थळी पावलापावलाला भेटतील.
बार आणि डान्सबार!
शंकररावांचा तो बार आणि इंद्रादि इतर देवांचा(मी सोडून) डान्सबार असे म्हणायला काही हरकत नसावी. कारण इतर देवही सोमरस प्राशन करून/करता करताच अप्सरांचा नाच बघत असत असे वाचल्याचे आठवते!(संदर्भ गाढवाचे लग्न)
डान्स बार च्या वाढीच्या संदर्भात नंदन ह्यांची प्रतिक्रियादेखिल योग्य वाटते!
करेक्ट
अत्यंत सुंदर वगनाट्य (तमाशा). अप्सरा या केवळ नृत्यांगना नव्हेत. इंद्राच्या मैफिलीत(डान्सबारमध्ये) सोमरस सर्व्ह करणार्या बारबालाच्. ॠषिंना भुलवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असे. ही देवांची स्ट्रॅटीजी.
प्रकाश घाटपांडे
काही प्रश्न...
तरुण पिढीची यामुळे भयानक बरबादी होते आहे असे मुंबईतील तरुण पिढीकडूनच समजते.
फिलिपाईन्स, इंडोनेशिआ या देशांमध्ये हे असे प्रकार बोकाळले आहेत... मॉडेलिंगला आज भारतात जी प्रतिष्ठा आहे त्या पद्धतीचे ग्लॅमर या क्षेत्रातील होतकरूंना या देशांमध्ये मिळते. किंबहुना पर्यटक आकर्षित करण्यासाठीही या इंडस्ट्रीचा मोठा हातभार लागतो. त्या वाटेवर मुंबईचीही वाटचाल होते आहे असे तात्यांच्या वर्णनावरून वाटते.
काही प्रश्न -
(१) हे डान्सबार मुंबईत कधीपासून आहेत? स्फोट कधीपासून झाला आणि कशामुळे याबद्दल काही कळेल काय?
(२) मुलींना हे पैसे मिळतात की मालकांना? मुलींना निव्वळ रोजंदारी मिळत असावी असा अंदाज!
(३) यातून बाहेर पडण्याचा कोणी प्रयत्न केला तर काय अनुभव येतात ह्याची उत्सुकता आहे.
(कौरव दरबारात कधीही न गेलेला) एकलव्य
डान्सबार प्रकरणाचा समूळ निचरा करावा याचे मी समर्थन करतो.
केवळ मुलींनाच..
(२) मुलींना हे पैसे मिळतात की मालकांना? मुलींना निव्वळ रोजंदारी मिळत असावी असा अंदाज!
सर्व पैसे केवळ मुलींनाच मिळतात. त्यांनी फक्त बारचा रोजचा ठरलेला हप्ता भरायचा असतो.
मानवी लैंगिक वाहतूक
मानवी लैंगिक वाहतूक या विषयावर मुंबईतील सामाजिक संस्थेत काम करणारे दांपत्य प्रिती पाटकर व प्रवीण पाटकर यांचे एक खूप आशयपूर्ण पुस्तक आहे.तो एक चांगला सामाजिक दस्तैवज आहे.
प्रकाश घाटपांडे
माहिती
लेखातून अनपेक्षित अशी काही माहिती मिळाली नाही. तरी समाज कोणत्या दिशेने चालला आहे अशी चर्चा करायला उपयुक्त पाया तयार झाला असे वाटते.
मुघल साम्राज्यात काय किंवा इंद्राच्या दरबारात काय, धनवान सत्ताधार्यांनी स्त्रियांना नाचवणे आपल्या पूज्य भारतीय संस्कृतीत नवे नाही. आता धनवान लोकांची संख्या वाढली आहे त्यामुळे जागोजाग असे दरबार भरतात, इतकेच.
कुठल्याशा सेवाभावी संस्थेला मदत करणे हे तर फारच उदात्त, आदर्श वगैरे होईल. पण स्वतःला मदत करणे, म्हणजे आहेत ते पैसे गुंतवणे, भविष्याचा विचार करणे, कुटुंबियांचा विचार करणे हे या अर्वाचीन इंद्रांकडून का घडत नाही असा प्रश्न आहे. माझ्या मते याचे कारण म्हणजे, "उद्या काय होईल कोणास ठाऊक. आहे तो क्षण आपला, तो उपभोगावा!" ही वृत्ती आणि 'उपभोग' म्हणजे काय याच्या अतिशय संकुचित संकल्पना.
अनेकानेक सुदृढ (हेल्दी), सुस्वरूप माद्या आपल्या अधिपत्याखाली असाव्यात असे वाटणे मनुष्यनरासाठी नैसर्गिक, स्वाभाविक आहे. त्यांना मिळवण्यासाठी आपली क्षमता सिद्ध करणे म्हणजेच आपण किती 'श्रीमंत' आहोत हे दाखवणे हेही नैसर्गिक. या दाखवण्याला आपल्यासारख्या कपिंमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. मानसिक स्थैर्यासाठी आपण 'काहीतरी' आहोत हे समोरच्या मादीला पटणे आवश्यक. जगातल्या सर्व संस्कृतीत या शक्तिप्रदर्शनाचे काही ना काही मार्ग आहेत. जितकी संस्कृती 'आधुनिक' तितके हे मार्ग छुपे (सटल) असे ढोबळ मानाने म्हणता येईल.
आता, समाजाच्या काही थरांत पालकांकडून मुलांना मिळणारे संस्कार असे की उत्तमोत्तम पुस्तके वाचून, संगीत ऐकून, मित्र मंडळीशी गप्पा मारून, चवीचे खाऊन, पिऊन मिळतो तो आनंद आणि पर्यायाने आयुष्य उपभोगायचे म्हणजे हे असे. तर काही थरात, लोकांवर सत्ता गाजवून, शारीरिकदृष्ट्या इतरांवर मात करून, स्त्रियांना अंकित करून मिळतो तो आनंद असे, तर आणखी कुठे आणखी कसे.. मोठेपणी इंद्रपदाला पोचल्यावर मग काय करावेसे वाटते ते असे मनात आधीच ठरवले जाते. संस्कार असे काहीच नसतील तर नैसर्गिकपणे जे करून बरे वाटते ते केले जाते. हुशारीने हजारो लोकांना फसवणारा तेलगी माणूस असे उगीच पैसे का उडवेल? कारण त्यात त्याला आनंद मिळतो. तात्यांच्या लेखातल्या अवांतरात सांगितल्याप्रमाणे त्यांचा आनंद कुठे दुसरीचकडे त्यांना मिळतो आणि लोक असे वेड्यासारखे पैसे का उधळतात असा प्रश्न त्यांना पडतो!
समस्येच्या मुळात, माझ्या मते, संस्कारांचा अभाव हे मुख्य कारण आहे.
भारत आणि इतर जग
मुघल साम्राज्यात काय किंवा इंद्राच्या दरबारात काय, धनवान सत्ताधार्यांनी स्त्रियांना नाचवणे आपल्या पूज्य भारतीय संस्कृतीत नवे नाही. आता धनवान लोकांची संख्या वाढली आहे त्यामुळे जागोजाग असे दरबार भरतात, इतकेच.
स्त्रियांना नाचविणे हा जगभर असलेली वहिवाट आहे. भारतीय संस्कृतीची त्यावर मक्तेदारी नाही.
दुसरे म्हणजे भारतात हे प्रमाण आजवर तुलनेने कमी होते असे मला वाटते. (आणि आजही असावे असा अंदाज!)
केरळ, गोवा, आणि इतर पर्यटनस्थळी गल्लोगली डान्सबार आहेत, किंवा अन्य मार्गे राजरोसपणे मुली पुरविण्याची सोय आहे अशी भारताची ख्याती नाही किंवा नव्हती.
मृदुला, प्रतिसाद आवडला!
मुघल साम्राज्यात काय किंवा इंद्राच्या दरबारात काय, धनवान सत्ताधार्यांनी स्त्रियांना नाचवणे आपल्या पूज्य भारतीय संस्कृतीत नवे नाही.
हम्म्! हे वाक्य जरा चरचरीत, तिखट आहे परंतु सत्य आहे!
माझ्या मते याचे कारण म्हणजे, "उद्या काय होईल कोणास ठाऊक. आहे तो क्षण आपला, तो उपभोगावा!" ही वृत्ती आणि 'उपभोग' म्हणजे काय याच्या अतिशय संकुचित संकल्पना.
अरे मृदुला जरा थांब! ;)
माझ्याही ब्लॉगच्या ओळख माहितीपटात मी 'गेला दिस आपला, उद्याचा माहीत नाही!' असे वाक्य लिहिले आहे! परंतु तुझा इशारा माझ्याकडे नसावा असे मी समजतो! ;)
कारण सुदैवाने गाणं, खाणं, थोडंफार पिणं(!), जिवलग मित्रमंडळी या सर्वांसोबत मी आयुष्याचा संकुचित अर्थाने नव्हे तर व्यापक अर्थाने उपभोग घेतला आहे असे सांगू इच्छितो! तू जी काही मला ओळखतेस यावरून तुझाही असा समज नसावा, पण म्हटलं खुलासा केलेला बरा! ;)
अनेकानेक सुदृढ (हेल्दी), सुस्वरूप माद्या आपल्या अधिपत्याखाली असाव्यात असे वाटणे मनुष्यनरासाठी नैसर्गिक, स्वाभाविक आहे. त्यांना मिळवण्यासाठी आपली क्षमता सिद्ध करणे म्हणजेच आपण किती 'श्रीमंत' आहोत हे दाखवणे हेही नैसर्गिक. या दाखवण्याला आपल्यासारख्या कपिंमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. मानसिक स्थैर्यासाठी आपण 'काहीतरी' आहोत हे समोरच्या मादीला पटणे आवश्यक.
छे बुवा! भारीच बोचरी आणि वंशशास्त्रीय भाषा वापरली आहेस बुवा तू! ;) पण तुझं म्हणणं खरं आहे, पटण्याजोगं आहे! 'सुदृढ (हेल्दी), सुस्वरूप माद्या आणि मनुष्यनर' हे शब्द तर लय भारी! ;)
आता, समाजाच्या काही थरांत पालकांकडून मुलांना मिळणारे संस्कार असे की उत्तमोत्तम पुस्तके वाचून, संगीत ऐकून, मित्र मंडळीशी गप्पा मारून, चवीचे खाऊन, पिऊन मिळतो तो आनंद आणि पर्यायाने आयुष्य उपभोगायचे म्हणजे हे असे.
खरं आहे बुवा. आपल्याला तरी याच गोष्टींतून आनंद मिळाला आहे!
अवांतर - कधी कधी मराठी संकेतस्थळांच्या चालकमालकांशी भांडूनही मला खूप आनंद मिळतो. परंतु तेवढा आनंद अपवादात्मक असून तो अधूनमधून मला घेऊ द्यावा आणि त्याबद्दल मला कुणी दुषणे देऊ नयेत असे वाटते! ;)
असो!
मृदुला, तुझा प्रतिसाद आवडला..
आपला,
(आनंदी) तात्या.
किंचीत असहमत
या दाखवण्याला आपल्यासारख्या कपिंमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे.
कपींची आणि माणसाची प्रेरणा एकच आहे पण प्रगत मेंदूमुळे माणसाची मानसिकता गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे ह्याचे स्पष्टीकरण मानसिकता विचारात घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही असे वाटते.
समस्येच्या मुळात, माझ्या मते, संस्कारांचा अभाव हे मुख्य कारण आहे.
अभाव म्हणण्यापेक्षा चुकीचे संस्कार, बालपणातील भोवतालची परिस्थिती, मूळ स्वभाव अशा अनेक गोष्टी यात येतील.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
मानसिकता व चुकीचे संस्कार
कुठलेही संस्कार 'चुकीचे' असतात असे मला वाटत नाही. पालकांना मनापासून वाटते की अमके करण्यात हित आहे, उदा शिकण्यात, पैसे कमाविण्यात; किंवा तमके करणे म्हणजे 'एन्जॉय' करणे उदा खाणे, वाचणे, मोटारी चालवणे. किंबहुना त्यांना त्या गोष्टी करून बरे वाटतच असते. वाढणारी पिल्ले या गोष्टीचे आपोआप अनुकरण करतात. त्यांनाही मग चांगले गुण पडल्याने, बरेच पैसे मिळाल्याने, महागडी मोटार चालवायला मिळाल्याने आनंद होतो. इतर कपिंमध्ये विचारांची थोडी कमी गुंतागुंत असली तरी मूलभूत संस्काराची पद्धत सारखीच आहे.
बर्न्सकाका सांगतात तसे एखादी गोष्ट केल्याने आपल्याला बरे वाटेल असे मनाला 'वाटले' किंवा मनाला 'सांगितले' कि खरोखर मग ती गोष्ट केल्याने बरे वाटते. तसेच हे.
फार विषयांतर नको, पण एक उदाहरण. एखाद्याला बारबालेवर पैसे उडवून, तिच्या अदा पाहून अतोनात आनंद होतो. बर्यावाईट मार्गाने जमविलेले धन तो तसे खर्च करतो. तर दुसर्याला समजा आत्यंतिक ज्ञानलालसा आहे. जमेल तिथून ज्ञान जमविण्याचे 'व्यसन' आहे. तर तो बर्यावाईट मार्गाने मिळवलेली पैपै खर्च करून शिकत राहतो, व्याख्यानांना जातो, पुस्तके जमवतो. समजा एके दिवशी दोघांची टक्कर होऊन अपघातात ते मृत्यू पावले. तर दोघांचीही कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सारख्याच दुःस्थितीत असतील. पण कदाचित तुम्ही म्हणाल एकावर 'चुकीचे' संस्कार तर एकावर 'योग्य तेच'.
आत्यंतिक सहमत
बोंबलाच्या वासाने एखाद्याला मळमळ होउन अन्नावर्ची वासना उडते तर् एखाद्याची भूक चाळवली जाते.(चक्क लाळ गळते हे मी बघितलेले आहे) घटना एकच आहे पण परिणाम वेगळे. एखाद्यासाठी विष असलेली गोष्ट् दुसर्यासाठी संजीवनी असते. योग्य अयोग्य सापेक्ष आहे.
प्रकाश घाटपांडे
संस्कार/मानसिकता
कुठलेही संस्कार 'चुकीचे' असतात असे मला वाटत नाही. पालकांना मनापासून वाटते की अमके करण्यात हित आहे,
अगदी बरोबर. कुठलेही पालक आपल्या मुलामुलींचे अहित इच्छीत नाहीत. पण पालकांच्या विचारांमध्येच चुका असतील आणि त्याच्या कारणाने मुलांचे नुकसान होत असेल तर त्याला चुकीचे संस्कार असे म्हणायचे होते. मानसिकता म्हणजे मला काय अभिप्रेत होते ते थोडक्यात स्पष्ट करतो. माणसाच्या वर्तनाचा विचार करताना त्याच्या/तिच्या लैंगिकतेचा विचार करावा लागतो कारण बर्याच वेळा त्याच्यामागे हीच प्रेरणा असते. पुढे त्याचे/तिचे संगोपन कोणत्या रीतीने झाले याचाही विचार करावा लागतो कारण यातून त्याच्या/तिच्या ह्या प्रेरणांना कशी वाट मिळाली हे कळू शकते.
मानवी लैंगिकतेची थिअरी (Theory of Human Sexuality) बरीच गुंतागुंतीची आहे आणि इथे आपल्याला फ्रॉइडकाकांना शरण जावे लागते. फ्रॉइड यांच्या मते माणसामध्ये दोन प्रकारच्या प्रेरणा असतात, एक् जीवन आणि दुसरी मृत्यू. दुसर्या शब्दात पहिली प्रेरणा लैंगिकता आणि दुसरी हिंसा. हे प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही पण आजूबाजूला पाहिल्यास याची असंख्य उदाहरणे दिसतात. (चित्रपटातून सेन्सॉर कुठली दृश्ये कापते? असो.)
बर्न्सकाका या दिशेने जात नाहीत कॉग्निटीव्ह थेरपीमध्ये फ्रॉइडकाकांचे सायकोऍनालिसिस जमेस धरले जात नाही. पण यामुळेच विविध प्रकारच्या डिसऑर्डर्स, स्किझोफ्रेनिया यावर कॉग्निटिव्ह थेरपी प्रभावी ठरत नाही.
दिलेल्या उदाहरणामध्ये कधीकधी ज्ञानलालसा हीसुद्धा आपल्या प्रेरणा वेगळ्या रीतीने व्यक्त करण्याचा एक मार्ग असू शकते. याला फ्रॉइडकाका सब्लिमेशन असे म्हणतात.
डिसक्लेमर : हा माझा विषय नाही. जेवढे कळल्यासारखे वाटले ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चू भू द्या घ्या.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
माणूस नावाचा कपि
या दाखवण्याला आपल्यासारख्या कपिंमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे.
यावरून एका पाश्चात्य विद्वानाचे एक वाक्य आठवले. ते असे:
"बहुतेक माणसे माकडेच असतात. फार लांबून पाहिल्यामुळे ती माणसांसारखी दिसतात."
सुरुवात
तात्या ही तर सुरुवात आहे.
प्रकाश घाटपांडे
कोई बात नही!
तात्या ही तर सुरुवात आहे.
ठीक है घाटपांडे साब. अगर मूड बना तो आगे औरभी लिखेंगे!
तात्या.
काहे तरसाये....
तात्या,
चांदनीबार, मध्यंतरी वर्तमानपत्रातून डान्सबारबद्दल येणारे असंख्य कॉलम्स वाचल्यावर लेखामध्ये अपेक्षित होते तेच आले. काढून टाकण्यासारखे काहीच नाही. एखाद्या बारबालेशी शेअर्स व्यवसायानिमित्त आलेले अनुभव, त्यांची आणि पांढरपेशांची मानसिकता इ. लेखात आले असते तर अधिक रोचक वाटले असते.
हा लेखही लेख म्हणून न टाकता चर्चा म्हणून टाकायला हरकत नव्हती असे वाटले.
अवांतरः
काल रात्री मुलीला नृत्य, संगीत आणि गायन यांचा चांगला मिलाफ दिसावा म्हणून यू ट्यूबवर चित्रलेखा चित्रपटातील 'काहे तरसाये...' गाणे दाखवत होते. यावर 'मग या राजनर्तिका आहेत का? त्या इतरवेळेस काय करतात' अशी काहीतरी प्रश्नोत्तरे चालली होती. ते पाहताना/ विचार करताना लक्षात आले की टिव्हीवर पाहिलेल्या किंवा पडद्यावर पाहिलेल्या चित्रांपेक्षा माणसांनी समोर येऊन सादर केलेली हाडामासांची कला निराळी असते. नाटक हे चित्रपटापेक्षा वेगळे असते. नृत्य-गायनाचे समोरासमोर बसून पाहिलेले, अनुभवलेले कार्यक्रम आणि पडद्यावरचे नाच, टेप-रेकॉर्डर, बूम बॉक्सेस, कार स्टेरिओवर ऐकलेली गाणी यांतून मिळाणार्या आनंदात जमीन आस्मानाचा फरक असतो.
नाचणे आणि गाणे या माणसाच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया असाव्यात आणि म्हणूनच सामूहिक नाच-गाण्याचे विविध प्रकार डिस्को-थेक, क्लब्ज इ. मधून अजूनही पुढे येतात.
मुली नाचवणे हा प्रकार सर्वच संस्कृतींमध्ये असावा आणि फार प्राचीन असावा, त्यामुळे बायकांनी आपल्यासमोर नाचावे तो एक करमणूकीचा प्रकार आहे अशी मानसिकता समाजाची असण्यात वावगे नाही. (फारसे चुकीचे आहे असेही मला वाटत नाही.)
प्रश्न मात्र वेगळा आहे की डान्सबारमध्ये जाऊन आपली ऐपत नसताना पैसे उडवून, आपल्या कुटुंबाला देशोधडीला लावून, आपले चित्त अशाप्रकारे चळवून एखाद्याला काय आनंद मिळतो? त्याचे दूरगामी परिणाम काय होतील याची माणसे काळजी करत नाहीत.
भारतीयांची एकंदरीत मानसिकता पाहता स्त्रियांना पुरुषांचे डान्सबार उघडायला थोडा अवधी द्यावा असे वाटते. तसे प्रायवेट पार्टीजमध्ये नाचणे आणि...., किंवा पुरूष एस्कॉर्टस इ. मुंबईतही सर्रास चालतात असे ऐकून आहे.
काही प्रश्नः
१. डान्सबार्स हा संपूर्ण भारतीय बनावटीचा धंदा असावा का?
२. मध्यमवर्गीय, पांढरपेशी, "भारतीय" मानसिकता नसती तर डान्सबारच्या ऐवजी "स्ट्रीप"बारस् आले असते का? (किंवा हेतू हाच असावा पण कायदा परवानगी देत नाही यातील प्रकार आहे?)
गुंतवणुकीची मानसिकता, माझ्यामते एक महत्वाचा मुद्दा!
एखाद्या बारबालेशी शेअर्स व्यवसायानिमित्त आलेले अनुभव, त्यांची आणि पांढरपेशांची मानसिकता इ. लेखात आले असते तर अधिक रोचक वाटले असते.
नक्कीच! परंतु माझी अजून तेवढी पोहोच नाही! अद्याप मी कोणत्याही बारबालेचा 'शेअर गुंतवणूक सल्लागार' झालेलो नाही आणि होईनसा वाटत नाही! ;)
बाय द वे, 'मानसिकता' म्हणशील तर मला तरी बर्याचश्या बारबालांची गुंतवणुकीची वगैरे मानसिकता नसावी असे वाटते. कारण मुळात गुंतवणूक करावी, आयुष्याच्या उत्तरार्धाकरता काही पैसे वाचवावेत, या सगळ्या गोष्टी काही एका फॉर्मल शिक्षणाने अधिक कळू शकतात असे मला वाटते. परंतु बर्याचश्या बारबाला गावी असताना जेमतेमच शिक्षण घेतात/किंवा त्यांना दिलं जातं! खुद्द आईवडीलच जेथे मुलीचं 'बारबाला' नावाचं पैशांचं मशिन बनवायला उत्सुक असतात तिकडे गुंतवणूक वगैरेंचा विचार तिला कोण शिकवणार? आणि त्यांच्या आईबाबांची मानसिकता म्हणशील तर उत्तरप्रदेशमधली वर्षानुवर्षांची उपासमार, आणि खंडीभर पोरवडा यातून केव्हा एकदा मुलगी पैसा कमवून पाठवत्ये आणि आपण जरा डोकं वर काढून जगतो, अशीच झालेली असते/असावी!
हा लेखही लेख म्हणून न टाकता चर्चा म्हणून टाकायला हरकत नव्हती असे वाटले.
किंवा 'चर्चा करायला प्रवृत्त करणारा लेख' असेही 'लेखाचे' कौतुक करता येईल! ;) Isn't it Mam? ;)
मुली नाचवणे हा प्रकार सर्वच संस्कृतींमध्ये असावा आणि फार प्राचीन असावा, त्यामुळे बायकांनी आपल्यासमोर नाचावे तो एक करमणूकीचा प्रकार आहे अशी मानसिकता समाजाची असण्यात वावगे नाही.
हम्म!
(फारसे चुकीचे आहे असेही मला वाटत नाही.)
का बरं वाटत नाही?
भारतीयांची एकंदरीत मानसिकता पाहता स्त्रियांना पुरुषांचे डान्सबार उघडायला थोडा अवधी द्यावा असे वाटते.
क्या बात है! ये खास प्रियालीका सिक्सर! अच्छा लगा..!
आपला,
(यष्टीरक्षक) तात्या.
फारसे चुकीचे....
नाही असे का म्हणावेसे वाटले.....
कारण, बायकांनी नाचावे ते त्यांना शोभते असे भलेभले लोक म्हणतातच. शास्त्रीय/ लोक नृत्य आपल्या मुलींना शिकवणारे आणि स्टेजवर त्यांना नाचायला लावणारे किती पालक असावेत? आम्हीही यांत येतो. वयाने वाढलेल्या १५-१६ वर्षांच्या मुलींच्या नृत्याचे कार्यक्रम काही काका/मामा वेगळ्याच चवीने बघतात याची जाणीव पदोपदी होते. चित्रपटातून समीरा रेड्डी, मल्लिका आणि इतर समस्त सोज्वळ नायिका नाचताना सर्वच मंडळी अभिजात नृत्याचा अविष्कार पाहण्यात रमलेली नसतात असे वाटले म्हणून.
हेमामालिनीचे नृत्य पाचशे-हजारांचे तिकिट काढून पाहिले तर ती कला आणि काजल/ सोनियाला आम्ही दाद दिली तर आम्ही 'गिर्हाईकं' ;-) हे मी वाचलेले/ ऐकलेले संवाद आहेत.
---
अरे बापरे! या प्रतिसादाने मी औरंग्याची वंशज वाटते आहे का?
;)
वयाने वाढलेल्या १५-१६ वर्षांच्या मुलींच्या नृत्याचे कार्यक्रम काही काका/मामा वेगळ्याच चवीने बघतात याची जाणीव पदोपदी होते.
;)
चित्रपटातून समीरा रेड्डी, मल्लिका आणि इतर समस्त सोज्वळ नायिका नाचताना सर्वच मंडळी अभिजात नृत्याचा अविष्कार पाहण्यात रमलेली नसतात असे वाटले म्हणून.
;)
उत्तर आवडले. धन्यवाद!
आपला,
(कुणाचाही 'तसा!' काकामामा नसलेला!) तात्यामामा.
वातावरण निर्मिती
लेख वाचून यात मनाविरुद्ध भरडल्या जाणार्या मुलींबद्दल वाईट वाटले. तेथे जाऊन स्वतःची आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबाची धूळधाण करून घेणार्या लोकांची कीव करावीशी वाटली. बारबालांचा एवढा सुकाळ होणे हे चांगले नाही, पण त्या आहेत कारण त्यांना त्यांच्या गरजांसाठी लागणारा आणि कधी न पाहिलेला पैसा त्यातून मिळतो. पण त्यापेक्षा डान्सबारमध्ये नेहमी जाणार्या लोकांची मानसिकता हा एक मोठा संशोधनाचा विषय होऊ शकेल असे मला वाटते.
शास्त्रीय/ लोक नृत्य आपल्या मुलींना शिकवणारे आणि स्टेजवर त्यांना नाचायला लावणारे किती पालक असावेत? आम्हीही यांत येतो.
मला वाटते नृत्य किंवा कुठचीही कला यातून मिळणारा आनंद हा व्यक्तींच्या आवडीनिवडींच्या/ संस्कारांच्या पलिकडे अश्या प्रसंगी आजूबाजूचे वातावरण कसे आहे, गाणे कसे आहे - त्याने कशी वातावरण निर्मिती होते यावर अवलंबून असतो. Dirty Dancing मधील I've had the time of my life ह्यावरील नृत्य मधील नृत्य म्हणूनच वाईट परिणाम करीत नाही. चांगल्या गोष्टी घडाव्यात , सुचाव्यात, म्हणून "चांगल्या" वातावरण निर्मितीला म्हणूनच तर आपण महत्त्व देतो.
अवांतरः मध्यंतरी एका मायकल विट्झल नावाच्या अमेरिकन संस्कृतच्या अभ्यासकाने भारतीयांच्या मुलींना भरतनाट्यम किंवा कथ्थकला घालण्याच्या सवयीला "not exactly a highly regarded occupation back home" म्हणून नावे ठेवली होती ते आठवले. (त्यांच्या बोलण्याचा रोख हा भारतीय आपल्या मुलांना साच्यातलेच शिक्षण देतात यावर होता. ते काहीसे खरे असले तरी हे बोलण्याची गरज नव्हती असे मला वाटले, आणि भरतनाट्यम तर माझ्या लहानपणापासून मी आजूबाजूच्या अनेक मुलींना शिकताना पाहिले आहे पण तो भाग अलाहिदा. ).
अरे बापरे! या प्रतिसादाने मी औरंग्याची वंशज वाटते आहे का?
औरंग्या स्वतः नृत्य बघत असेल असे वाटते का?!
नृत्याला प्रोत्साहन आणि पालक
शास्त्रीय/ लोक नृत्य आपल्या मुलींना शिकवणारे आणि स्टेजवर त्यांना नाचायला लावणारे किती पालक असावेत? आम्हीही यांत येतो.
मला वाटते नृत्य किंवा कुठचीही कला यातून मिळणारा आनंद हा व्यक्तींच्या आवडीनिवडींच्या/ संस्कारांच्या पलिकडे अश्या प्रसंगी आजूबाजूचे वातावरण कसे आहे, गाणे कसे आहे - त्याने कशी वातावरण निर्मिती होते यावर अवलंबून असतो.
सकाळी सकाळी लिहिल्याने माझा प्रश्न थोडा चुकला त्यांना नाचायला लावणारे किती पालक असावेत? खूप आहेत, आम्हीही यांत येतो. असे वाचावे.
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की नृत्य शिकणे, पदन्यास शिकणे, त्यांतील खुबी शिकणे, व्यासपीठावर तो सादर करणे यांत त्या व्यक्तीचे गुण चमकतात, आत्मविश्वास वाढतो. नाचणे-गाणे त्यातून आनंद द्विगुणित करणे या माणसाच्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत यामुळेच चांगल्या घरांतूनही मुलींना नृत्य शिकायला आणि ते लोकांसमोर सादर करायला प्रोत्साहन दिले जाते, त्यामुळे नाच पाहणे, तो ही बायकांचा यात मला चुकीचे वाटत नाही. (अर्थात, त्यात पुरुष असू नयेत असे नाही, त्यांनीही नृत्यातून तो आनंद घेणे करून पाहिले पाहिजे.)
त्या प्रतिसादातून मी नृत्याला विरोध करते आहे असे मला वाटत होते म्हणून तसे लिहिले. औरंगजेबाने नृत्याला आपल्या राज्यात बंदी घातली होती असे वाचले आहे. मला तसे सुचवायचे नाही. नृत्य ही कला म्हणून मान्य आहे, ती मनोरंजनासाठी सादर केली जाते. त्यामुळे डान्स-बार असू नयेत असे मला वाटत नाहीत परंतु तेथे जे (पैसे उडवायचे, गिर्हाईके गटवायचे_ प्रकार चालतात ते गैर आहेत.
आम्हीही एक
खूप आहेत, आम्हीही यांत येतो. असे वाचावे.
त्या " खूप "मध्ये आम्हीदेखील एक! नृत्य शिकण्यावरून तुम्ही म्हटले आहे त्याच्याशी पूर्ण सहमत!
त्या प्रतिसादातून मी नृत्याला विरोध करते आहे असे मला वाटत होते म्हणून तसे लिहिले.
तुमच्या प्रतिसादातून मला असे नाही वाटले की नृत्याला तुमचा विरोध आहे, उलट तुम्हाला काय म्हणायचे आहे ते नीट कळले होते. मलाही तुम्ही म्हणताय तसेच म्हणायचे होते की नृत्य वाईट नसून जसे वातावरण डान्सबार मध्ये असते/ किंवा तयार केले जाते त्यामुळे या गोष्टी जास्त होत असाव्यात.
चुकीचे?
पुर्वी ही जाणीव होउ न देण्याची दक्षता लोक घेत असावेत. काळानुरुप आता तशी गरज वाटेनाशी झाली असावी. यातून एका नव्या विषयाची निर्मिती होते, तो विषय म्हणजे incest उपक्रमावर हा विषय कितपत सुसह्य आहे कुणास ठाउक? भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या इतिहासाचार्य राजवाड्यांच्या पुस्तकात त्याचे संदर्भ सापडतात. अश्लिलतेच्या संकल्पनेतील चर्चेत त्याचा उल्लेख आहे.
प्रकाश घाटपांडे
हम्म
जगातील सर्व देशांमध्ये असे प्रकार चालू असतात. यामागची कारणे वर आलीच आहेत. आपली मुंबई काय किंवा अमेरिकेतील लास वेगास काय, शेवटी माणसे आणि माणसांची वृत्ती तीच असते. पाश्चात्य देशांमध्ये स्त्रियांसाठी पुरूषांचे डान्सबारही असतात. आपल्याकडे असे प्रकार गुप्तपणे होतात.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
कुठे हो?
आपल्याकडे असे प्रकार गुप्तपणे होतात.
कुठे हो होतात? नाही, म्हणजे मी लगेचच काही तिथे नाचायला जाणार नाहीये, पण एक उत्सुकता म्हणून विचारतो आहे! ;)
पत्ते व्य नि ने कळवलेत तरी चालेल! ;)
तात्या.
पत्ता
नेमके कुठे ते मलाही माहित नाही. मागे कुठल्यातरी मासिकात यावर लेख आला होता, म्हणून आठवले.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
उत्सुक तात्या..
तात्या तुम्ही नाचायला जाणार नाही ह्याची खात्री आहे म्हणूनच सांगतो ;-)
..मागं तो एक चित्रपट आला होता 'ऊप्स!' नावाचा ...त्यात दाखवले होते बघा.. तसेच अमेरिकेत 'चिप न डेल' नावाच्या क्लबात पुरुष कपडे उतरवत नाचतात असे सहकारी मैत्रिणींकडून ऐकून आहे.
जर!
असं पुरुषांनी बायकांसाठी नाचणं वाईट आहे का?
असेल तर का आहे वाईट?
जर पुरुषांचे बायकांसाठी डांस बार असतील,
ते कायदेशीररीत्या चालवले जात असतील, उदा. पे स्लीप वर पैसे मिळ्णे, फंड असणे, तर तशी माझी गरज निर्माण झाल्यास मी तर जाईन बॉ नाचायला! अगदी कपडे काढत पण चालेल.
आपली काहीच हरकत नाय!
(असं ही आपल्याला काय... प्रॉब्लेम बघणार्याच्या नजरेत असतो...)
आपला
(आयुष्याच्या रंगमंच्यावरचा )
गुंडोपंत
हाहाहाहाहाहा!!!!!
ते कायदेशीररीत्या चालवले जात असतील, उदा. पे स्लीप वर पैसे मिळ्णे, फंड असणे, तर तशी माझी गरज निर्माण झाल्यास मी तर जाईन बॉ नाचायला! अगदी कपडे काढत पण चालेल.
आपली काहीच हरकत नाय!
(असं ही आपल्याला काय... प्रॉब्लेम बघणार्याच्या नजरेत असतो...)
:))))))))))))))))))))))))))))))))))))))
नक्की मिळेल...
उदा. पे स्लीप वर पैसे मिळ्णे, फंड असणे,
नक्की मिळेल. इतर नोकर्यांमध्ये पगार थकतील येथे बोनस, ओव्हरटाईम, बँकेची अकाउंटस पासून सारी सोय जॉईन व्हायच्या आदल्या दिवशीपासून होईल असे वाटते. (तात्या - तुम्हीच सांगा हो खरे का खोटे ते!)
तर तशी माझी गरज निर्माण झाल्यास मी तर जाईन बॉ नाचायला! अगदी कपडे काढत पण चालेल.
चला... मंडळी गुंडोबारचा पत्ता काढायच्या मागे लागा!!
(गुंडोबारवर निव्वळ माहिती (@@)मिळविण्यासाठी जाणारा उपक्रमी) एकलव्य
अरे अरे...
अरे! अरे!!
असं करू नका...
थांबा जरा... गुंडोबार 'बायकांसाठीच' आहे हे मी सुरुवातीलाच म्हंटलय रे बाबांनो. तेंव्हा...
आपला
(आता बायका मागे लागणे सोडून 'भलतीच' माणसे पाठी लागतील की काय भयशंकेने पळत सुटलेला...!)
गुंडोपंत
विध्यर्थ - जन हो खादी वापरा
चला... मंडळी गुंडोबारचा पत्ता काढायच्या मागे लागा!!
पळा पळा पळा....