अमेरिकेतील निवडणूक आणि भारतावरील, जगावरील परिणाम
जगातील एकमेव आर्थिक आणि सामरिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. या निवडणुकीच्या निकालाचे भारतीयांवर, भारतावर आणि जगावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, तातडीचे तसेच दीर्घकालीन परिणाम होतील हे स्पष्ट आहे. या अनुषंगाने खालील प्रश्न पडले आहेत.
१. शर्यतीत असलेल्या उमेदवारांपैकी निवडून येण्याची शक्यता असलेले किती?
२. निवडणुकीनंतर अमेरिकेच्या धोरणांवर राष्ट्राध्यक्षांचा प्रभाव असेल की त्यांच्या पक्षाचा?
३. अमेरिकेत राहणार्या भारतीयांविषयी या प्रमुख उमेदवारांची आणि पक्षांची प्रकट आणि अप्रकट भूमिका काय आहे?
४. बहि:स्रोतीकरण (आउटसोर्सिंग) विषयी प्रमुख उमेदवारांची आणि पक्षांची प्रकट आणि अप्रकट भूमिका काय आहे?
५. भारताशी सामरिक आणि अणुतंत्रज्ञानविषयक सहकार्याविषयी प्रमुख उमेदवारांची आणि पक्षांची प्रकट आणि अप्रकट भूमिका काय आहे?
६. इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान अश्या कळीच्या मुद्द्यांवर प्रमुख उमेदवारांची आणि पक्षांची प्रकट आणि अप्रकट भूमिका काय आहे?
याशिवाय भारतावर आणि भारतीयांवर परिणाम करू शकणारे इतर काही मुद्दे आहेत असे आपल्याला वाटते का?
आपला,
(निरीक्षक) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
Comments
आउटसोर्सिंग आणि ओबामा
श्रीमान युयुत्सु, विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
अमेरिकेच्या आर्थिक प्रगतीसाठी जी आवश्यक भूमिका असेल
बराक ओबामा यांची भूमिका आउट्सोर्सिंग विरोधी आहे काय? हिलरी क्लिंटन या त्यांच्या प्रतिस्पर्धकावर त्यांनी सिस्को सारख्या म्हणजे आउटसोर्सिंग करणार्या कंपनीच्या कर्मचार्यांकडून आर्थिक मदत स्वीकारली असा आरोप केल्याचे नुकतेच वाचले.
जर डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार निवडून आल्यास इराकचे काय होईल याविषयी काय तर्कवितर्क आहेत?
आपला
(प्रश्नांकित) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
धन्यवाद!
निवडणुकांत होणारा प्रचार, आणि अध्यक्ष झाल्यावरचे धोरण ह्यात तफावत ही असतेच. त्यामुळे आत्ता ओबामा आउटसोर्सिंगच्या नाअवाने बोंब मारतही असतील, तरी त्याच्याविरुद्ध कुठलीही कृती ते करणार नाही. गेली तीन वर्षे ते सिनेट मध्ये आहेत. त्यांनी कधीही आउटसोर्सिंग विरुद्ध आवाज उठवल्याचे आठवत नाही.
या माहितीबद्दल धन्यवाद!
२००८ च्या उन्हाळ्यात बुश इराकमधून सैन्य परत बोलवायला सुरुवात करेल, असा माझा अंदाज आहे. दक्षिण कोरिया सारखे पुढची पन्नास वर्षे अमेरिकन सैन्याची एक छोटी तुकडी इराकमध्ये असेल. (दॅट मॉडेल वर्क्ड् देअर, इट् शुड् वर्क् हिअर टू :-)
इराकमधील हिंसाचाराला धार्मिक बाजू असल्याने हा प्रश्न इतक्या सहज सुटेल असे वाटत नाही. इराकमध्ये अमेरिकेच्या विरुद्ध अल-कायदा सारखी विस्कळीत स्वरूपाची (म्हणजे बलपूर्वक सहज संपवता न येणारी) संघटना असल्याने "संपूर्ण विजय" अशक्यप्राय वाटतो.
पण आपणा दोघांशिवाय या महत्त्वाच्या विषयात कोणालाही रस नाही असे का बरे?
आपला
(संभ्रमित) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
का बरे?
पण आपणा दोघांशिवाय या महत्त्वाच्या विषयात कोणालाही रस नाही असे का बरे?
हा प्रश्न खरच इतका महत्वाचा आहे का? भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा विषय खरतर आम्हाला जास्त महत्वाचा नाही काय? अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष त्या निवडणुकीमुळी भारताच्या लोकसंख्येचा प्रश्न सोडवणार आहेत काय? अमेरिकेच्या या निवडणुकीचे भारताच्या समस्यांवर आणि भवितव्यावर खरच असे काय पडसाद असणार आहेत कि जे भारतातल्या प्रत्येक प्रश्नापेक्षा महत्वाचे आहेत हे माहितीपुर्वक जाणून घ्यायला आवडेल मग भाष्य करणे योग्य ठरेल.
इथे महत्वाचे चर्चेचे विषय म्हणजे अश्लीलता, बारबाला, त्यावरून सदस्यांची स्टंटबाजी, ज्या विषयांना कधीही अंत नसतो असे चघळायचे विषय आहेत... बोला या पुढे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका आणि त्याचे .... परिणाम हा खरच महत्वाचा विषय आहे का?
मराठीत लिहा. वापरा.
अल गोअर रिंगणात उतरतील काय?
यु.एस्. ए. च्या राजकारणातील अनुभवी आणि विचारशील डेमोक्रॅट (२००० सालचे जवळजवळ राष्ट्राध्यक्ष) ऍल गोअर यांचा चर्चेत उल्लेख दिसत नाही. असे का?
यावेळी त्यांचे काय भवितव्य आहे?
अल् गोर्...
गोर् रिंगणात उतरले, तरी त्यांना डेमॉक्रॅटिक पक्षातच तिसर्या क्रमांकापेक्षा वर येता येणार नाही. मग हात दाखवून अवलक्षण कोण करून घेईल ?
अल् गोर् जर रिंगणात उतरले तर डेमॉक्रॅटिक पक्षात पहिल्या क्रमांकावर सहज पोहचतील.
(वरील लिखाणामागे एकलव्याची तिरंदाजी असे उपपद लावून मग वाचावे)
जरतारीचा नखरा
समजा गोअर मैदानात उतरले, तर मी तुम्हाला शंभर डॉलर्स देईन. नाही तर तुम्ही मला पन्नास डॉलर द्यायचे.
पहिले म्हणजे मला अल् गोर् रिंगणात उतरतील असे वाटत नाही. त्यामुळे पहिली पैज गेली उडत!
आणि समजा गोअर उतरले मैदानात, आणि प्रायमरी जिंकली, ...
तर मला एक डॉलर द्या! त्यांनी प्रायमरी नाही जिंकली तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पाचशे डॉलर द्यायला मी तयार आहे.
आपण शेअर बाजारात जुगार खेळता (ह घ्या :-) असे ऐकले आहे.
अहो या सांगोवांगीच्या गोष्टी! मी (ज्ञानाच्या मर्यादा मान्य करून) hedging आणि risk arbitrage करतो... त्यामुळे एकाच रोख्यावर -- अगदी हुकमी असला तरीही -- पैसे लावणे माझ्या धर्मात बसत नाही. त्यामुळे वरील सौद्याला जोडीचे काहीतरी शोधावे लागेल.
(गुरुदक्षिणा देण्यास आजही तयार असलेला) एकलव्य
हा हा हा...
पहिली पैज नाकारून केलेले हेजिंग आपल्या बरोबर लक्षात आले! (...तेव्हा कोठे गेला होता तुझा धर्म? हा प्रश्नच यायला नको!!) आपण महाचतुर आहात.
पैजेच्या अटी उलट्यापालट्या करून दिलदारपणे (reciprocate) प्रतिसादही दिलात. आनंद झाला!
मी आजच एक डॉलरचा ऑप्शन खरेदी करायला तयार आहे!
Anyway! Let's have fun some day!! Cheers!!!
(स्वधर्मे निधनं श्रेयः मानणारा) एकलव्य
बेअर स्टर्न्स
ते तात्यासाहेब मार्जिन वगैरे म्हणत होते ना... त्यासारखेच लेव्हरेज असे प्रकरणही आहे. सबप्राईममुळे पाया भुसभुशीत होताच पण लेव्हरजमुळे टॉवर उभा राहिला होता... तो कोसळला सगळ्यांना घेऊन.
विदाबिंदु
ह्याच लॉजीकने - महिला अथवा कृष्णवर्णीय असणारा एकही अध्यक्ष मलातरी माहित नाही! ;-)
पॉइंटाचा मुद्दा...तर्कक्रीडा
आणखी एक डेटापॉईंट - विदाबिंदु - देतो: मागच्या वेळी गोअर हरले, तेव्हा त्यांनी दाढी वाढवली होती. तुला लिंकननंतरचा एखादातरी दाढीवाला अध्यक्ष माहिती आहे का?)
ह्याच लॉजीकने - महिला अथवा कृष्णवर्णीय असणारा एकही अध्यक्ष मलातरी माहित नाही! ;-)
ह्म्म्म्.... म्हणजे मग यावेळी महिला अथवा कृष्णवर्णीय अध्यक्ष होण्याची शक्यता अधिक की कमी?
चेष्टा नाही ... (यनावालांसह सर्वांनी) गंभीरपणे तर्क लढवावा ही अपेक्षा!!
(कूटपटू) एकलव्य
काय स्पष्ट आहे??
आअजवर झाले नाही, म्हणून ते होणारच नाही, हे पटवून देण्यासाठी आपण ही उदाहरणे दिली आहेत, हे स्पष्ट आहे.
काय स्पष्ट आहे?? म्हणता आहात बंधुराज! परत एकदा आमचा प्रतिसाद वाचावात ही विनंती!!
(तटस्थ पोर्टफोलिओ मॅनेजर) एकलव्य
रिग्रेशन आणि प्रॉबॅबिलीटी
रणांगण बदललेले दिसते आहे... जनमत चाचण्या हा ग्रास कोर्टवरचा सामना आहे. प्रॉबॅबिलीटीच्या क्ले कोर्टवरील सर्व्हिस आम्ही तेथे करू इच्छित नाही.
आमचा एस् फक्कड जमला आहे असे अजूनही वाटते...
(पांडवांच्या गोटातल्या कौरवाने रामायणात ढकललेला) एकलव्य
जनमत चाचण्या
जनमत चाचण्या (आमच्या पहाण्यात आलेल्या) ह्या हिलरी प्रायमेरीज जींकून डेमोक्रॅट्सची उमेदवाअरी पटकवणार इतकेच दाखवत आहेत.
राष्ट्राध्यक्ष कोण? ह्याच्या चाचण्या आमच्या मते दोन्हीकडून उमेदवर्या पक्क्या झाल्यावर होतात त्यामूळे त्या भरवश्यावर हिलरीच राष्ट्राध्यक्ष होणार असे म्हणता येणार नाही.
पैज
युयुत्सु,
डेमोक्रॅटीक पक्षाकडून ओबामा किंवा हिलरी ह्यापैकी कुणीही उभे राहिले तर रिपब्लिकन्सच्या कोणत्याही उमेदवाराचा विजय निश्चित आहे ह्यावर कितीची पैज लावायची सांगा?
खिशाला परवडल्यास मी तयार आहे ;-)
अब आयेगा मजा!
चीअर्स!!
स्मरण...
ओबामा किंवा क्लिंटन यांतील एकाची उमेदवारी नक्की झालेली आहे. आता कोलबेर आणि युयुत्सु यांची पैज लागायला हरकत नसावी!!
अंगठाबहाद्दर
भारतीयांशी जवळीक
भारतीय आणि भारतीय वंशाच्या लोकांशी असलेली जवळीक हा यंदाच्या निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा बनत चालला आहे असे दिसते. मागे ओबामा यांच्या प्रचारकांनी हिलरी क्लिंटन यांच्या भारतीय लोकांशी असलेल्या सौहार्दाच्या संबंधांविषयीचा मुद्दा उठवला होता. त्यावेळी ओबामा यांनी आपण त्या प्रचाराशी, आरोपांशी संबंधित नसल्याचा खुलासा केला होता. आता प्रसिद्धी माध्यमांनी पुन्हा हा मुद्दा उचलून धरला आहे असे दिसते. या अनुषंगाने पुढील प्रश्न पडले.
आपणांस काय वाटते?
आपला
(प्रश्नकर्ता) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"
सुपर ट्यूसडे ला काय होणार?
सुपर ट्यूसडे ला काय होणार? इराक युद्धाला संमती देणारे मत हिलरी क्लिंटन यांना नडणार की काय? ओबामा अखेरच्या क्षणी बाजी मारतील असे एकंदर वातावरण बनले/बनवले जात आहे काय?
भाकित
यावर डिलबर्टकार स्कॉट ऍडम्स यांचे (विनोदी?) भाकित.
ओबामा आणि मॅकेन शेवटच्या शर्यतीत असतील, पण शेवटी मॅकेन जिंकतील. कारण? बिकॉज रिपब्लिकन्स आर गुड ऍट रिगिंग इलेक्शन्स.
अवांतर : बुशसाहेबांसाठी फैज अहमद फैज यांचा एक शेर :-)
कर रहा था गम-ए-जहां का हिसाब
आज तुम याद बेहिसाब आए
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.