बारबालांसाठी वेगळी वसाहत

मध्यंतरी ठाण्यांतील काही भागांत सभ्य वस्तींत राहणार्‍या बारबालांना तेथून हुसकून लावण्याची मोहीम शिवसैनिकांनी उघडली होती. (त्याचे पुढे काय झाले ते माहीत नाही). त्यानिमित्त Thane Plus ने Should bargirls be treated as social outcastes? असा प्रश्न देऊन उत्तरे मागवली होती. त्यावर १६ जूनच्या Thane Plus मध्ये माझे उत्तर प्रसिद्ध झाले आहे. त्याचा (शब्द-मर्यादेमुळे) काटछाट न केलेला मजकूर :

"बारबालांसाठी वेगळ्या वसाहती असाव्यात व त्यांवर तसे निर्देशित केलेले असावे. बारबालांसाठी कळवळा व्यक्त करणारे म्हणतात त्याप्रमाणे बारबाला त्यांच्या व्यवसायांत परिस्थितीपुढे नाइलाज झाल्यामुळे किंवा सन्मान्य रोजगारासाठी लागणारे शिक्षण घेऊ न शकल्यामुळे आलेल्या असतात हे पटण्यासारखे नाही. त्यांच्याचसारख्या प्रतिकूल परिस्थितींतील सर्वच स्त्रिया बारबाला होण्याचा विचार करीत नाहीत. सरकार गेली कित्येक वर्षे स्त्रियांच्या शिक्षणासाठी नाना प्रकारच्या सोयी व सवलती देत आलेले आहे. त्याचा फायदा घेऊन सन्मान्य रोजगारांमध्ये स्थिरावणे त्यांना अशक्य नाही. अशा रोजगारांमध्ये असणार्‍या स्त्रियांना लैंगिक शोषणाचा धोका बर्‍याच कमी प्रमाणांत असतो कारण बारबालांसारखे त्यांना कोणी गृहीत धरत नाही. पण बारबालांना जेवढा पैसा मिळतो तेवढा त्यांत मिळत नाही. म्हणजे बारबाला त्यांच्या व्यवसायांत सन्मान्य नोकरीधंद्यापेक्षा अधिक पैसा मिळतो म्हणून हिशोबीपणाने आलेल्या असतात असे होत नाही का?
ज्याला आपल्या कुटुंबियांची काळजी आहे अशा सर्वसाधारण कुटुंबवत्सल माणसाला आपल्या कुटुंबांतील कोणीही, विशेषतः तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली मुले-मुली बारबलांसारख्या व्यावसायिकांमध्ये मिसळू नयेत असेच वाटते. कारण त्यांत त्याला मुले बिघडण्याचा व ती झटपट पैशाचे आमिष दाखवणार्‍या अवैध मार्गाकडे आकर्षित होण्याचा धोका दिसत असतो. "

"उपक्रम"साठी ता.क.
बारबालांच्या बाबतींत कोणतेही कठोर पाऊल उचलायचे म्हंटले की त्यांच्याविषयी कळवळा व्यक्त करण्याची जणू काही स्पर्धाच लागते. (Thane plus मध्ये प्रसिद्ध झालेली इतर सर्व उत्तरे बारबालांविषयी सहानुभूति व्यक्त करणारी आहेत). म्हणून बारबाला व्यवसायावर कायद्याने बंदी आणता येत नसेल तर निदान त्यांच्या वसाहती तरी वेगळ्या असाव्यात.

आपणास काय वाटते?

Comments

वेगळ्या वसाहती

बारबालांसाठी वेगळ्या वसाहती असाव्यात व त्यांवर तसे निर्देशित केलेले असावे.

अहो, कोणाकोणासाठी वेगळ्या वसाहती करायच्या? अभ्यंकरांच्या गोष्टीत येणार्‍या बोटीवरील नवर्‍यांच्या बायका, ती मराठी अभिनेत्री आणि अशा अनेक स्त्रियांच्या वेगळ्या वसाहती कराव्या, यांना व्यवसायाला लावणारे बारमालक, त्यांच्याकडे जाणारी गिर्‍हाईके यांच्याही वेगळ्या वसाहती कराव्यात. काय म्हणता?

-राजीव.

उपक्रमराव, आपली परवानगी आहे का?

अभ्यंकरांच्या गोष्टीत येणार्‍या बोटीवरील नवर्‍यांच्या बायका, ती मराठी अभिनेत्री आणि अशा अनेक स्त्रियांच्या वेगळ्या वसाहती कराव्या, यांना व्यवसायाला लावणारे बारमालक, त्यांच्याकडे जाणारी गिर्‍हाईके यांच्याही वेगळ्या वसाहती कराव्यात. काय म्हणता?

राजीवसाहेबांचा प्रश्न आवडला! ;)

आपला,
गोष्टी सांगणारा अभ्यंकर! ;)

उपक्रमराव,

बारबाला, त्यांचे जीवन, त्यांचे राहणीमान, या मुली कुठून येतात, यांना कोण आणतं, त्यांची दर दिवशी होणारी प्रचंड कमाई या सर्व गोष्टी माझ्या कामधंद्याच्या निमित्ताने मी खूप जवळून पाहिल्या आहेत, पाहतो आहे!

या सर्व सामाजिक गोष्टींवर प्रकाश टाकणारा एखादा लेख लिहीन म्हणतो. तो लेख उपक्रमावर टाकलेला चालेल का? असे आपल्याला जाहीरपणे विचारतो आहे.

उत्तराच्या अपेक्षेत,

तात्या.

सदर चर्चेतील विषयांतरावरून घडलेली उपचर्चा निकालात निघाल्याने तिच्याशी संबंधित प्रतिसाद काढून टाकण्यात येत आहेत. सदस्यांनी चर्चेला अनुसरून प्रतिसाद द्यावेत ही विनंती. -- उपसंपादक.

जरूर लिही

तात्या

तुझ्या अनुभवावर आधारित लेख वाचायला आवडेल.

विनायक

लेखांतील मुद्द्यावर या.

आत्तापर्यंत, राजीव८२ यांचा प्रतिसाद वगळल्यास लेखांतील मुद्द्यांवर एकही प्रतिसाद नाही.

काय वाटते..

प्रश्न वाचून खालील विचार मनात आले.
१. भारतीय नागरिकांना भारतात कुठेही राहण्याचा, व्यवसाय (कायदेशीर) करण्याचा अधिकार आहे.
२. जात, धर्म, व्यवसाय या आधारावर एखाद्याला राहण्याची जागा (घरापुरती नव्हे, एका वस्तीत) नाकारणे असंवेधानिक वाटते.
३. बारबाला असणे किंवा पूर्वाश्रमीची बारबाला असणे गुन्हा आहे काय?
४. गुन्हा असलेल्यास दहशतवाद्यांना घर भाड्याने देता येत असेल तर बारबालांना देता येऊ नये काय?
५. आर्थिक गुन्हेगारांना, शिक्षा भोगून आलेल्या गुन्हेगारांना आपण अशी वागणूक देतो का?
६. इतर गैरव्यवहारांच्या अमिषाचे काय?
७. सभ्य वस्ती म्हणजे नक्की काय? उच्चभ्रू वस्ती सभ्य असते का? असल्यास अशा वस्तीतील लाडल्यांचे प्रताप सभ्य म्हणवता येतात काय? नसल्यास किती प्रकरणात 'वसाहतीतील संगत' कारणीभूत असते?
८. सभ्य वस्तीतील तरुणाईचा वावर, पोषाख, विचारधारा अशा संपर्काविना किती शुद्ध आहेत? कॉलेजातील संगतीचे काय?

अशी घरे नाकारण्याचा हक्क घरमालकाला आहे. (भाड्याने दिलेल्या घरातून हुसकावायचा मात्र नाही :) त्यासाठी खास कलमेच लागू आहेत. काम दिसते तितके सोपे नाही..). फारतर सोसायटीला आहे. शिवसेनेला नाही.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

जगात..

(हाउसिंग डिस्क्रिमिनेश हा अमेरिकेतही फेडरल ऑफेन्स आहे.)

परत आणी परत जगात फक्त ५२ (५२ च ना?) स्टेट्स आहेत! ;)

आपला
(अमेरिकन स्टेट्स शिवायही जग आहे असे मानणारा)
गुंडोपंत
(तात्याबांना 'उपक्रमाचे पब्लीक रिलेशन ऑफिसर' करावे याचे गुंडोपंत समर्थन करतात! ;) )

अमेरिकन स्टेट्स

(५२ च ना?)

आमच्यामते कागदोपत्री फक्त ५०च राज्ये आहेत. वॉशींगटन डी.सी. हा केंद्रशासित प्रदेश आहे. त्याला राज्य गणत नाहीत.

इतर जगात

इतर जगात सतत काहीतरी घडत असलेले पण "कोणीतरी ठरवून दिलेल्या बातम्यांत" नसणारे कितीतरी घट़क आहेत.
मला इण्ट्रेस्ट असलेले,
इजिप्त, चीन, मंगोलिया, सिएरा लिऑन, अदीस अबाबा, द. आफ्रिकेतले सोवेटो झालेच तर चीले, टोंगा बेटे, गालापगोस बेटे, फिलिपाईंस, दोन्ही ध्रुव असे अनेक विभाग आहेतच की...

आपला
गुंडोपंत

मला वाटले

मला वाटले की तुम्ही मला "ठरवून दिलेल्या बातम्या' वर खेचणार!
चालतील चाल्तील टिव्होलु बेटे चालतील शिवाय पापुआ न्युगिनी वगैरे आहेतच!

आवांतरः गंभीर आहे बरं तिथे परिस्थीती, मलेशियन लाकुडतोड कंपन्यांनी लाकडांसाठी मुळ लोकांची कशी वाट लावली आहे यावर मागे एक डॉक्यु. पाहिली होती. कॉर्पोरेट जगात सामान्यांचे हाल आहेत हेच खरं! म्हणूनच मी कधीकधी अगदीच 'डावा' होवून जातो की काय असे वाटते...

आपला
(कोणत्याही सर्वव्यापी आर्थिक सत्तेच्या विरोधातला)
गुंडोपंत

नको

त्याच्याशी सहमत.
वेगळे काढले जाणे नको. कारण त्यांच्या कुटुंबियांना, मुलांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळण्याची शक्यता आहे. त्यातून त्यांना बाकीच्या समाजाविषयी तिरस्कार वाटला तर नवल नाही. आख्ख्या समाजाचा तिरस्कार करणारा एक छोटा वर्ग म्हणजे समाजविघातक कारवायांचा कारखानाच.
माझ्यामते तुम्हाला बारबालांचा व्यवसाय पसंत नसेल तर त्यांना पर्याय देऊ करणे, या व्यवसायातून बाहेर पडण्यास मदत करणे, पटवणे किंवा त्यांच्यापासून दूर राहणे एव्हढेच करता येईल. कायदेशीर दबावाने काहीच साधले जाणार नाही.

सहमत

पूर्ण सहमत.

चित्रा

सहमत

त्याच्याशी सहमत.

अजुन एक मुद्दा मांडावासा वाटतो. बारबाला वगैरे अशा त्तत्सम व्यवसायास एक प्रकारे समाज जबाबदार आहे असे आपल्याला नाही वाटत का. बारबाला ही बारबाला होउ नये म्हणुन काय पावले समाजाने / सरकारने उचललेली दिसतात ? अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीस social outcast बरोबर् नाही हेच माझे मत आहे.

-सूर्य

कर्तव्ये व जबाबदार्‍या

'तो' यांस,

भारतीय नागरिकांना भारतात कुठेही राहण्याचा, व्यवसाय (कायदेशीर) करण्याचा अधिकार आहे.

याबाबत नागरिकांची कर्तव्ये व जबाबदार्‍या काय आहेत ते कुठे लिहिले आहे काय? नसेल तर नागरिकांची कर्तव्ये व जबाबदार्‍या काहीच नाहीत असे समजावे काय?

कर्तव्य/जबाबदारी

भारतीय संविधानात लिहीले आहे. ६ (अ) मध्यल्या ५१ (अ) मध्ये.

संदर्भ : संविधान

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

बारबाला आणि देहविक्रय्

कोर्डेसाहेब्,

बारबाला जर देहविक्रय् राहत्या जागेत करत् असतील् तर् त्यांना वेगळ्या जागी राहायला जाणे बंधनकारक् असावे. ज्या जागी वेश्यांचा वावर् वाढतो; म्हणजे जिथे त्या गिर्‍हाईके शोधण्यासाठी फिरतात् तिथे देहविक्रय न करणार्‍या स्त्रियांना वा वेश्यांगमन न करणार्‍या पुरूषांना किती त्रास सहन् करावा लागतो याची कल्पना केवळ तिथल्या रहिवासींनाच येउ शकते. आज अनेक् ठिकाणे अशी आहेत् जिथे संध्याकळनंतर बायका-मुलींना जर कोणाची वाट् पाहत थांबायचे असेल् तर ते अयक्य ठरते.

त्याचप्रमाणे अमुक् एक इमारतीत देहविक्रय चालतो हे समजलयावर इच्छुक् लोक् देहविक्रेती व्यतिरीक्त इतर सर्व दरवाजे ठोठावण्याची शक्यता असते. या इमारतीतून् बाहेर पडणार्‍या कोणत्याही स्त्रीला वेश्या समजून 'येतेस् का' असे विचारले जाणे अनेक ठिकाणी घडले आहे. चर्चबट स्थानकाबाहेर बस थांब्यावर संध्याकाळी उशीरा बस ची वाट पाहत् असलेल्या अनेक् स्त्रियांना अशा मानहानीला सामोरे जावे लागले आहे.

मात्र जर एखादी बारबाला एखाद्या इमारतीत सर्वसामान्य रहिवाशांसारखीच् राहत् असेल, ती जर त्या जागेचा वापर् कोणत्याही प्रकारे जर देहविक्रयासाठी करत नसेल, आपल्या गिर्‍हाईकांना तिथे आणत् नसेल्, तिच्या जागेत् कसलाही धिंगाणा घालत् नसेल्, वा इमारतीतील इतर मुलिंना आपल्या व्यवसायात खेचायचा प्रयत्न करत् नसेल तर तिला तिथे राहण्यास विरोध करायचे कारण् नाही. जो पर्यंत ती बारबाला त्या जागेत अन्य रहिवासींपमाणेच राहते आहे, तो पर्यंत जरी ती बारबाला असली त्या जागी ती केवळ् एक् रहिवासी असते. तरुण् मुलांना वेश्यागनमन करण्यासाठी वा दारु पिण्यासाठी शेजारी बारबाला राहणे आवश्यक नाही. निदान बोभाटा होइल या भितीने ती तरुण् मुले त्या बारबालेशी कसलाही संपर्क ठेवणार नाहीत. बाकी बाहेर त्यांना जे करायचे ते करतीलच, भले इमारतीत सर्वच्या सर्व सज्जन् कुटुंबे राहत् असोत्.

सहमत

मी सहमत आहे.

 
^ वर