चांगल्या वाचनालयांसाठी
ग्रंथालय कथा आणि व्यथा या लेखाला गुंडोपंत यांनी दिलेल्या विचारप्रवर्तक आणि माहितीप्रद प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.
मित्रहो (आणी मैत्रिणींनो!;) )
बुकं हातात मिळणं हे पुर्वी फार मोठी गोष्ट होती. हल्ली जरा दुर्मीळ पणा कमी होत चालला आहे. वाचनालयांचे पण संगणकीकरण करणे अत्त्यावश्यक आहे. त्यामुळे शोधशोध करणे सोपे होईल.
पुस्तकांच्या रॅक्स पर्यंत जाऊ ने देण्यामागे पुस्तकांची ढापाढाप आणी नासधुस- पाने फाडून घेणे, अश्या प्रकारचे वर्तन कारणीभूत आहे असे वाटते.
मी अनेकदा अशी पाने फाडतांना पाहिली आहे आणी हटकले/पकडले पण आहे. त्यामुळे पुस्तके ही 'आपल्या सगळ्यांची' संपत्ती आहे हा भाव समाजात जागृत होत नाहे तोवर हे घडत राहील.
यात ग्रंथालये(च) महत्वाची भुमीका बजावू शकतात.
जसे
१. नवीन सदस्यांसाठी एक नोदणीच्या वेळी वाचनालय कसे वापरावे याचे प्रशिक्षण देणे. (पण नवीन सदस्य तर पाहिजे ना त्यासाठी?)
२. आपले नियम सुकर आणी पुस्तके वापरणार्यांच्या दृष्टीकोनातून कसे आहेत हे तपासून पाहणे. (तेव्हढा पगार मिळतो का आम्हाला साहेब?)
३. आपली ग्रंथसंपदा केव्हढी आणी किती उपयोगी आहे याचे वेळोवेळी प्रदर्शन मांडणे. (हेच कांमं करु का आता आम्ही? आं?)
४. नियम 'का आहेत' हे सदस्यांना वारंवार समजावून देणे. (कोणी ऐकायला तर थांबले पाहिजे ना भाऊ!)
५. ग्राहकसेवेचे प्रशिक्षण सर्व ग्रंथालय सेवकांना देणे - आणी कायम देत राहणे. (यांना आधी बाहेर काढा हो!)
६. ग्रंथालय आणी वाचक वेगळे नाहीत हे व्यवस्थापनाने मान्य करणे. (हे कोण आपल्याला सांगणारे? आम्ही आमचे बघुन घेऊ!)
७. मुक्त संचार देण्यासोबत सुरक्षेचे उपाय राबवणे.
८. आपली ग्रंथ संपदा ही समाजाच्या गरजेशी निगडीत आहे आणी राहिल हे सतत पाहणे.
असो. असे अनेक उपाय करता येतील.
पण आता वाचक म्हणून मी काय काय करु शकतो?
१. ग्रंथालय हे माझेच नाही तर इतरांसाठी ही आहे याचे जाणीव ठेवणे. (मह्णून तर आयर्विंग वॅलेस च्या स्वर्गिय शैय्याची 'ती' पाने फाडून घेतो आहे ना... नाही तर इतर वाचकांची संस्कृती बुडेल ना बाबा!)
२. पुस्तके जपुन हाताळू शकतो. ग्रंथालय चालकांना हा विश्वास देऊ शकतो. (अगदी जपुनच फाडली ती पाने... कळणार पण नाही!)
३. फाटकी पाने चिकटवू शकतो.
४. ग्रंथालयाची नासधुस होणार नाही हे पाहू शकतो.
५. नियमीतपणे पुस्तके वाचू शकतो!
६. ग्रंथालयाचे नियम का व कसे हे नीट समजून घेऊन मग सदस्यत्वाचा फायदा घेऊ शकतो. (फायद्याचं...? काय म्हणाले?)
७. पुस्तके वेळेवर परत करु शकतो. (बरं बरं)
मित्र-मत्रिणींनो,
मला असे पण वाटते की व्यवस्थापनाने आपले ग्रंथालय इतर ग्रंथालयांसोबत साखळीत जोडणे आवश्यक आहे. यामुळे कोणतेही पुस्तक कुठेही परत करणे सोपे होईल, आणी इतर वाचनालयातली पुस्तके पण कोठे ही नाममात्र फी मध्ये उपलब्ध होऊ शकतील. यासाठी संगणकीकरण मोठीच मदत करु शकेल.
याशिवाय मला असा पण प्रश्न आहे की, ग्रंथालयात, पुस्तकांशिवाय व्याख्याने आणी टि. व्ही. चे रेकॉर्डेड कार्यक्रम पण का मिळू नयेत? असे किती तरी (फक्त माहितीपुर्णच?) कार्यक्रम असतात की जे हुकतात पण नंतर बघायला मिळतीलच असे नाही.
आज जे समाजाला आवडते आहे ते देण्यात काय गैर आहे?
काय वाटते आपल्याला?
आपला
(पुस्तकवेडा)
गुंडोपंत
Comments
चांगला विषय
गुंडोपंत,
आपल्याला आधीच्या चर्चेत दिलेल्या प्रतिसादातील काही भाग येथे चिकटवत आहे. त्यात भर एवढीच की चांगल्या ग्रंथालयांसाठी चांगल्या वाचकांचीही गरज असते.
"बर्याच सामाजिक "व्यथांना" दूर करण्याची किल्ली ही शालेय शिक्षणात तसेच लोकशिक्षणात असते. ज्यांना आपल्या आजूबाजूचे काही बदलावेसे वाटते त्याने अशा बाबतीत स्वतः रस घेणे जरूरीचे आहे. प्रत्येकाने आपल्या जवळच्या लोकांना पुस्तकांचे महत्त्व समजावून देण्यासाठी जागरूक करण्यात हातभार लावला तर मोठे काम होऊ शकते. जर ग्रंथालयांना आणि ग्रंथपालांना बदलणे कठीण असले (ते आहेच) तर सुरुवात म्हणून आपल्या जवळपासच्या लहान मुलांच्या शिक्षणापासून सुरुवात केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो कारण एकवेळ मुलांना शिक्षण देणे सोपे आहे -हा एक असा दुवा पहा
मुलांमध्ये वाचनाची गोडी आणि क्षमता तयार करण्यासाठी हा दुवा पहा आणि एक अमेरिकेतही पुस्तके कशी वापरावी याचे असे शिक्षण (मोठ्यांनाही) द्यावे लागते त्याचा हा पुरावा पहा! "
संपूर्ण प्रतिसाद आधीच्या चर्चेत येथे मिळेल.
वा!
गुंडोपंत तुम्ही चांगले मुद्दे चांगल्याप्रकारे मांडले आहेत (हे बाकी जमायला कठिण हो!) आणि चित्राताईंनी त्यात उत्तम दुवेदार भर टाकली आहे. (पण "हा एक असा दुवा पाहा" मधील दुवा चालत नाही.)
आपला
(पुस्तकी) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
वासुदेवा
वासुदेवा कौतुका बद्दल धन्यवाद...
जमून जातं हो चुकून एखाद्यावेळी... ;)
आपला
गुंडो.
अशी पुस्तके नसतात.
मला वाटते भारतीय वाचनालयांकडे वाचकाला जगाच्या बरोबर राखु शकतील अशी पुस्तके नसतात.
पुणे विद्यापीठातल्या आणी इतर अनेक प्राध्यापकांना जगात त्यांच्या विषयात लेटेस्ट काय आहे हे माहीत नसते. जगात कॉपीराईट व इतर महत्वाच्या क्षेत्रात काय घडामोडी आहेत हे माहीत् नसते. विद्यार्थ्यांचे तर सोडाच.
या सगळ्या साठी वाचनालयेच महत्वाचीच ठरतात.
या शिवाय गुंडोपंतांनी म्हंटल्याप्रमाणे वाचनालयां मध्ये पुस्तकांशिवाय व्याख्याने आणी टि. व्ही. चे रेकॉर्डेड कार्यक्रम मिळावेतच.
पण यासाठी लागणारी यंत्रणा कुठे आहे?
आपला
अण्णा
लेटेस्ट काय आहे ?
व्यवस्थापनाने आपले ग्रंथालय इतर ग्रंथालयांसोबत साखळीत जोडणे आवश्यक आहे. यामुळे कोणतेही पुस्तक कुठेही परत करणे सोपे होईल, आणी इतर वाचनालयातली पुस्तके पण कोठे ही नाममात्र फी मध्ये उपलब्ध होऊ शकतील. यासाठी संगणकीकरण मोठीच मदत करु शकेल.
हेच म्हणतो आम्ही.
प्राध्यापकांना जगात त्यांच्या विषयात लेटेस्ट काय आहे हे माहीत नसते.
मराठी या विषयात लेटेस्ट काय आहे ? मला माहिती हवी आहे.
आमचे उत्तर:-( भगवदगीता,पून्हा तुकाराम.महानुभाव साहित्य,महाभारतातील स्त्री पात्रे,यनावाला यांची कोडी.
वा वा
ग्रंथालय कथा आणि व्यथा या लेखाला गुंडोपंत यांनी दिलेल्या विचारप्रवर्तक आणि माहितीप्रद प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.
धन्यवाद!
आमच्या प्रतिसादास आपण
विचारप्रवर्तक आणि माहितीप्रद म्हणून
अगदी लाजवूनच टाकले आहे आंम्हास!
परत एकदा धन्यवाद!
आपला
(अगदी जड जड वाटणारा)
गुंडोपंत
ही यंत्रणा आपणच आणावी लागते
अण्णासाहेब
पण यासाठी लागणारी यंत्रणा कुठे आहे?
ही यंत्रणा आपणच आणावी लागते. आपोआप कशी बरं येईल?
तुम्ही करुन पहा एक चर्चासत्र आयोजित करुन.
आपला
गुंडोपंत
उत्तम विषय
अनिरुद्ध दातार
गुंडोपंतांनी अगदी चांगल्या विषयाला हात घातला आहे. सध्या मुळात वाचनालयांमध्येही नवीन प्रकाशित झालेली पुस्तके मिळतच नाहीत्. त्याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. बाकी पुस्तक हाताळणीचे प्रशिक्षण खरोखरीच गरजेचे आहे. यासाठी चळवळच उभी केली पाहिजे.
आपला(पुस्तकवेडा)
अनिरुद्ध दातार