संस्कृती

मित्रांनो,

आपली भारतीय संस्कृती ही फार महान आहे.
या महान संस्कृतीच्या माहितीचे येथील सर्व सदस्यांत आदान-प्रदान व्हावे यासाठी हा लेखन प्रपंच

येथे मी माझ्या संग्रहातील काही गोष्टी देत आहे.
त्यांत आपण सर्वांनी भर टाकावी ही अपेक्षा

धन्यवाद
सागर

वर्षातील साडेतीन मुहूर्त आणि चातुर्मासाचा काल
वर्षातील साडेतीन मुहूर्त:
१. वर्षप्रतिपदा
२. अक्षय तृतीया
३. विजयादशमी हे तीन मुहूर्त आणि
४. बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त

चातुर्मास : आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचे ४ महिने

पंचामृत, पंचधातू, पंचमहाभूते आणि अभ्यासाची ५ अंगे

पंचामृत : याने देवाला अभिषेक करतात.
१. गाईचे दूध
२. दही
३. तूप
४. मध
५. साखर

पंचधातू: ५ धातूंचे मिश्रण
१. सोने
२. रुपे
३. लोखंड
४. तांबे
५. जस्त

पंचमहाभूते: यापासून सजीव सृष्टी तयार झाली
१. पृथ्वी (जमीन)
२. आप (पाणी अथवा जल)
३. तेज (अग्नी)
४. वायु
५. आकाश

अभ्यासाची ५ अंगे:
१. अभ्यास
२. लेखन
३. निरिक्षण
४. चर्चा
५. गुरुची उपासना

षड् रिपु : माणसाचे सहा शत्रू

१. काम : वैषयिक गोष्टीत गुंतणे
२. क्रोध : राग
३. लोभ : संपत्तीची हाव
४. मोह : जे आपल्याकडे नाही ते मिळवण्याचा हव्यास
५. मद : स्वत:विषयीचा फाजील गर्व अथवा अहंकार
६. मत्सर : दुसर्र्याकडे असलेल्या गोष्टीचा हेवा करणे

सप्त चिरंजिव:
१. अश्वत्थामा
२. बलि
३. व्यास
४. हनुमंत
५. विभिषण
६. कृप
७. परशुराम

अष्टगंध आणि नवरत्ने

अष्टगंध :
१. चंदन
२. अगरु
३. देवदार
४. कोष्ट - कोळींजन
५. कुसुम
६. शैलज
७. जटामांसि
८. सुरगोरोचन ही आठ सुगंधी द्रव्ये वापरुन तयार केलेले गंध

नवरत्ने :
१. हिरा
२. मोती
३. प्रवाळ
४. गोमेद
५. इंद्रनील
६. वैडूर्य
७. पुष्कराज
८. पाचू
९. माणिक

वेद पद्धतीतील १२ मास (महिने)

१. मधु
२. माधव (मिळून वसंत ऋतू)
३. शुक्र
४. शुचि (मिळून ग्रीष्म ऋतू)
५. नभ
६. नभस्य (मिळून वर्षा ऋतू)
७. इष
८. उर्ज (मिळून शरद ऋतू)
९. सहस
१०.सहस्य (मिळून हेमंत ऋतू)
११.तपस्
१२.तपस्य (मिळून शिशिर ऋतू)

दहा प्राण

दहा प्राण : आपल्या शरीरात असलेल्या वायुचे हे १० विविध प्रकार आहेत
(०१)प्राण - श्वास. नाकातून आपण आत घेतो तो वायु
(०२)अपान - उच्छवास.नाकातून आपण बाहेर सोडतो तो वायु
(०३)व्यान - आपल्या अवयवांना हालचाल करायला लावणारा वायु
(०४)समान - रक्ताभिसरण करणारा वायु
(०५)उदान - अन्न गिळण्यास मदत करणारा वायु
(०६)नघ - ढेकर आणणारा वायु
(०७)कुरम् - पापण्यांची उघडझाप करणारा वायु
(०८)कृकल - जांभई आणणारा वायु
(०९)देवदत्त - भूक निर्माण करणारा वायु
(१०)धनंजय - मृत्यूनंतर शरीरात राहून मृत शरीर फुगवणारा वायू

सोळा संस्कार

१. गर्भाधान (गर्भसंस्कार)
२. पुंसवन
३. अनुवलोभन
४. विष्णुबली
५. सीमंतोन्नयन
६. जातकर्म
७. नामकरण
८. निष्क्रमण
९. सूर्यावलोकन
१०.अन्नप्राशन
११.चूडाकर्म (जावळ)
१२.उपनयन (मुंज)
१३.गायत्र्युपदेश
१४.समावर्तन
१५.विवाह
१६.अंत्यविधी

अमरकोशातील देवतांचे १० जातिभेद

१. विद्याधर
२. अप्सरस्
३. यक्ष
४. रक्षस्
५. गन्धर्व
६. किन्नर
७. पिशाच
८. गुह्यक
९. सिद्ध ..... आणि
१०. भूत

लेखनविषय: दुवे:

Comments

शंका

इथे संस्कृतीची नेमकी कोणती व्याख्या अपेक्षित आहे? वर दिलेल्या गोष्टीमधून असे वाटते की धार्मिक तत्वे म्हणजे संस्कृती. पण जर संस्कृती म्हणजे कल्चर असा अर्थ घेतला तर त्यात अजून बर्‍याच गोष्टी येतील.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

माझ्या मते,

पण जर संस्कृती म्हणजे कल्चर असा अर्थ घेतला तर त्यात अजून बर्‍याच गोष्टी येतील.

माझ्या मते १४ विद्या आणि ६४ कला ह्यादेखील 'संस्कृती' मध्येच मोडतात. त्यांचाही उल्लेख सागरसाहेबांच्या लेखात दिसला नाही..

असो!

तात्या.

मी फक्त सुरुवात करुन दिली आहे.

तात्या,

येथे मी फक्त सुरुवात करुन दिली आहे. येथे योगदान हे सर्वांचेच अपेक्षीत आहे.
तुम्ही १४ विद्या आणि ६४ कला म्हणत आहात
मलाही काही गोष्टी हव्या आहेत.
उदा:
- ६४ योगिनी
- १८ पुराणे
- उपनिषदे (ही बहुतेक ४०-५० असावीत)
- आरण्यके....(म्हणजे काय?)

इ....................
तेव्हा ज्यांना यापैकी व अजून कोणतीही माहीती असेल त्यांनी कृपया ती द्यावी ही विनंती

धन्यवाद
(तात्यांचा भक्त) सागर

प्रमुख(?) उपनिषदे

प्रमुख उपनिषदे -

कठ केन प्रश्न मुंड मांडुक्य तथा तित्तिरि|
छांदोग्यं ऐतरेयंच बृहदारण्यकं तथा||
प्रमुख नऊ उपपनिषदे अशी - कठ, केन, प्रश्न, मुंड, मांडुक्य, तैत्तिरीय, छांदोग्य, ऐतरेय, बृहदारण्यक

ह्यांमध्ये ईशावास्य उपनिशदाचा समावेश का नसावा? की ते प्रमुख उपनिषदांपैकी नाही?

----------------------------------------
ही सहीच् आहे, नाही? :)

ईशावास्य उपनिशद

ह्यांमध्ये ईशावास्य उपनिशदाचा समावेश का नसावा? की ते प्रमुख उपनिषदांपैकी नाही?

मला पण आश्चर्य वाटले कारण ईशावास्याच्या १३ श्लोकांवर भगवद्गीता आधारीत आहे.

प्राचीन भारतीय संस्कृतीतीचे वैभव अपेक्षीत आहे

राजेंद्र,

येथे संस्कृती म्हणजे आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीतीचे वैभव असलेली कोणतीही गोष्ट मला अपेक्षीत आहे

धन्यवाद
सागर

आपली संस्कृती

आपली संस्कृती (भारतीय) जीवनाचे ध्येय विशद करते. जीवनाचे अन्तिम लक्ष्य कसे गाठायचे याची शिकवण देते. थोडक्यात जीवन कसे जगायचे हे सुचविते. परन्तु जगाच्या पाठीवर ईतर कोणतीही संस्कृतीत ह्याचा उल्लेख आढळत नाही. ईतर संस्कृतीत केवळ शरीर व मन याचाच विचार करुन जीवन जगतात. मात्र आपली संस्कृती शरीर, मन व आत्मा या तीघान्ची योग्य सान्गड घालुन जीवन कसे जगायचे ही कला सान्गते.(आचार, विचार व विहार)
हरि-कमल सुत

धन्यवाद

थोडक्यात जीवन कसे जगायचे हे सुचविते.

पण कोणाला न-थोडक्यात (=भपक्यात?) जगायचे असेल तर? ("कोणाला थोडक्यात जगायचे नसेल तर?" असा प्रश्न विचारला तर हे "मग थोडक्यात मरावे" असे उत्तर देऊ शकतील.)
यांना बरी नेमकी गटारीलाच संस्कृती आठविली?

- असंस्कुत्र

म्हशीचे किंवा शेळीचे दूध चालणार नाही का?

सागरसाहेब,

छान माहिती दिली आहे. यातल्या बर्‍याचश्या गोष्टी ऐकून होतो, पण त्यातले डिटेल्स् माहीत नव्हते. धन्यवाद..

पंचामृत : याने देवाला अभिषेक करतात.
१. गाईचे दूध

म्हशीचे किंवा शेळीचे दूध चालणार नाही का?

अमरकोशातील देवतांचे १० जातिभेद
७. पिशाच
१०. भूत

भूत आणि पिशाच्च या 'देवता' कश्या काय हे कळले नाही.

१४ विद्या आणि ६४ कला कोणत्या हेदेखील कळले तर बरे होईल..

आपला,
(१६ संस्कारांपैकी शेवटचे दोन संस्कार न झालेला!) तात्या.

माहिती आवडली.

सागरसेठ,
माहिती आवडली.पण अनेक उपप्रश्नांना जन्म घालणारी माहिती आहे असे वाटते.

पंचामृत : याने देवाला अभिषेक करतात.
१. गाईचे दूध

म्हशीचे किंवा शेळीचे दूध चालणार नाही का?

नाही .कारण म्हैस आणि शेळी, चारा ,गवत खाते.गाय, काजू,बदाम,पिस्ता,मनूके,खात असेल त्या काळी म्हणून तसे असेल.

(पाणी अथवा जल) यात फरक कसा आहे ?

प्यायचे ते पाणी आणि पूजेचे ते जल असेच ना !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गाईचेच दूध का? खुलासा

डॉक्टरसाहेब

तुम्ही या प्रश्नांचा उहापोह करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आपले अनेक धन्यवाद.

मी माझ्या मेंदूच्या कुवतीप्रमाणे त्यात भर घालण्याचा प्रयत्न करतो.

गाईचेच दूध का?

मला याची २ महत्त्वाची कारणे वाटतात.

गायीपासून मिळणारे दूध हे नुसते दूधच समजले जात नव्हते तर त्यापासून शक्ती मिळत असे.
शेळीच्या दुधात किती शक्ती असते माहीत नाही.

दुसरे असे की गाय ही वेदकालापासून पूजनीय मानली जाते.
गायीत ३३ कोटी देव वास करतात अशी धारणा होती. म्हणूनच गाईचेच दूध पंचामृतात वापरले जाते.
जेणेकरुन गायीत असलेला देवत्वाचा थोडातरी अंश आपल्यात येईल.

शेळी किंवा तत्सम प्राण्यांत देव वास करतात असे कोठेही वाचनात आलेले नाही.
(तसा तो शक्तीमान परमेश्वर या विश्वातील चराचरात व्यापून आहे हे सांगणे न लगे...)

(गायीच्या दुधावर वाढलेला) - सागर

हे आवडले! ;)

सागरसाहेब,

शेळीच्या दुधात किती शक्ती असते माहीत नाही.

शेळीच्या दुधात किनै खूऽऽऽप शक्ति अस्ते माहित्ये का! ;)

(गायीच्या दुधावर वाढलेला) - सागर

हे आवडले!

आपला,
(आईच्या, गायीच्या आणि म्हशीच्या दुधावर वाढलेला!) तात्या.

तत्सम प्राण्यांत देव !

शेळी किंवा तत्सम प्राण्यांत देव वास करतात असे कोठेही वाचनात आलेले नाही.

सागरशेठ,
श्रीमद्भगवद्गीता,अध्याय पंधरावा श्लोक सातवा यात देव कूठे कूठे वास करतो,ते सांगितले आहे.तो श्लोक असा-

"ममैवांशो जीवलोके जीवभूत:सनातन:!
मन:षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति !!

ह.भ.प.प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,महाराज गंगापूरकर.

अमरकोश हा अधिकृत पुराणग्रंथात गृहीत धरला जात नाही.

देवतांचे भेद हे अमरकोशात दिलेले आहेत. अमरकोश हा अधिकृत पुराणग्रंथात गृहीत धरला जात नाही.
त्यामुळे त्यांत उल्लेख केलेल्या माहीतीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहेच.
पण हा जुना ग्रंथ असल्याने दुर्लक्षही करता येणार नाही.

बाकी प्रश्न तो शेळीच्या दुधाचा........ कोणी वरिष्ठच उत्तर देऊ शकेल, म्या पामराची ती योग्यता नव्हे

धन्यवाद
सागर

वरिष्ठ का वसीष्ठ,

वरिष्ठच उत्तर देऊ शकेल,
मैने सोचा वरिष्ठ मतलब,वसीष्ठ,व्यास,वाल्मिकी,कर्ण,महाभारत.असा नाय ना !

नाराज चंद्र
[उपक्रवर लाश्ट चार दिस ]

हा एक विनोद तर नाहीये ना?

चंद्र

तुम्ही नाराज का बरे आहात? आणि उपक्रमवर फक्त शेवटचे ४ दिवस का आहात?
हा एक विनोद तर नाहीये ना? कारण १४ च्या रात्रि अमावस्या सुरु होत आहे.

असे करु नका हो. अर्थातच मी येथे नवीन असल्याने मला तुमच्या शेवटच्या ४ दिवसांचा इतिहास काही माहीत नाही.
पण मनापासून वाटते की असे तुम्ही करु नये

तेव्हा येथे येतच रहा
धन्यवाद
(चंद्रदर्शनास आसुसलेला) सागर

पंचकन्या स्मरेत् नित्यम्

अहिल्या,द्रौपदि,सीता
तारा,मंदोदरी तथा
या पंचकन्या
प्रकाश घाटपांडे

अहल्या

पंचकन्यांतील अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी का?

असल्यास ती अहल्या असावी. (अहिल्या हा शब्द चुकीचा आहे.)

अहल्या

अहल्या शब्दाचा अर्थ काय?

या सोबत पंच पतिव्रता, सप्त् चिरंजीव आणि अशीच् आकडेवारी मिळाल्यास आनंद होईल.

(माहीती का प्यासा) अभिजित

अहल्या - खरडवही

अ हल्या शब्दाचा एक अर्थ ज्या जागेची नांगरणी झाली नाही ती असा होतो. ;-) (हल=नांगर) अधिक अर्थही असावेत. फारशी कल्पना नाही.

पंचकन्या किंवा पंचकुमारी म्हणून यांची निवड कशी केली ते मात्र माहित नाही. यापुढचे मात्र खरडवहीत. ज्यांना इंटरेश्ट असेल त्यांनी अभिजितची खरडवही तपासावी.

सार्वजनिक शिष्टाचारात हे विचार बसले नाहीत तर काय घ्या?

याबद्दल अधिक माहिती हवी.

यातील अनेक गोष्टी माहित नाहीत. कोणाकडे या संज्ञांची अधिक माहिती असल्यास कृपया पुरवावी.

अष्टगंध :

१. अगरु
२. कोष्ट - कोळींजन
३. शैलज
४. जटामांसि
५. सुरगोरोचन

हे काय प्रकार आहेत. या वनस्पती असल्यास त्यांना मराठीत नावे आहेत काय?

वेद पद्धतीतील १२ मास याबाबत कोणी अधिक माहिती पुरवू शकेल का?

१. विष्णुबली
२. सीमंतोन्नयन

हे संस्कार कशासाठी केले जातात.

सीमंतोन्नयन म्हणजे आपलं ते सीमोल्लंघन (दसरा)

प्रियाली,

बाकीचे माहीत नाही.

पण सीमंतोन्नयन म्हणजे आपलं ते सीमोल्लंघन (दसरा)
खेदाने म्हणावे लागते की दसरा हा सीमंतोन्नयन यासाठी न ओळखले जाता रावण जाळण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो,

खरे तर हा संस्कार ह्यासाठी होता की शिक्षणानंतर घराबाहेर पडून उदरनिर्वाहास योग्य किंवा पात्र होता यावे यासाठी हा संस्कार होता

धन्यवाद
(वारंवार मोठ्या काळासाठी सीमोल्लंघन केलेला) सागर

महान संस्कृती

आपली भारतीय संस्कृती ही फार महान आहे.

प्रत्येकाला आपली संस्कृति महान वाटते. चिनी,बॅबिलॉन,ग्रीक,सुमेरियन,खाल्डियन,ईजिप्शियन यांना ही आपली महान वाटते. जेवढी प्राचीन तेवढी महान असे देखिल काहींना वाटते.
प्रकाश घाटपांडे

म्हान

प्रत्येकाला आपली संस्कृति महान वाटते. चिनी,बॅबिलॉन,ग्रीक,सुमेरियन,खाल्डियन,ईजिप्शियन यांना ही आपली महान वाटते.

मग बिगडलं कुटं म्हनतोया म्या? त्ये सागरराव कुटं चिनी विनी संस्क्रुतीला ल्हान म्हनतायत? म्हनू द्येत की आपल्या संस्क्रुतीला म्हान... हाय की ती म्हान मला बी असचं वाटतया.

लई छान वाटलंया....

राजीव

आप्ली संस्क्रुती म्हान हाय हे तुम्चे शब्द् वाचुन लई छान वाटलंया....
माज्या मतांशि कोनितरी सहमत हाय यातच आनंद

धन्यवाद
सागर

पंचामृत आणि पंचगव्य यातील फरक

पंचामृत आणि पंचगव्य यात फरक असतो का?
त्यांच्या वापरात काय फरक असतो?
पंचगव्याचे घटक कोणते?

पंचामृत आणि पंचगव्य!

पंचामृत आणि पंचगव्य यात फरक असतो का?
त्यांच्या वापरात काय फरक असतो?
पंचगव्याचे घटक कोणते?

अहो विसुनाना, पंचामृत आणि पंचगव्यामध्ये बराच फरक आहे. पंचामृताबद्दल वर लिहिले आहेच. पंचगव्यामध्ये गोमुत्र, गोमय, मध, दूध आणि पाणी हे माझ्या माहितीप्रमाणे मुख्य घटक असतात. दिवसवारे, श्राद्धपक्षाच्या वेळेस ही शिंत्रेगुरुजी मंडळी यजमानांना पंचगव्य प्राशन करायला लावतात. तसं शास्त्र आहे म्हणे!

आमचे पिताश्री वारले तेव्हा त्यांचं १२ वं मी करत होतो. तेव्हा पटवर्धन गुरुजींनी माझ्या हातावर थोडंसं पंचगव्य देऊन ते प्राशन करायला लावल होतं! मला आधी काहीच कल्पना नव्हती. मी ते प्राशन केल्यावर मला पटवर्धन गुरुजींनी कोकणस्थी सानुनासिक आवाजात मिश्किलपणे विचारले होते, 'कांय? माईल्ड झालांय कां? कीं कडक आहे? नाही, कडक असेल तर सांगा हो. पाणी घालून थोडं माईल्ड करतों! तुम्हाला अजून दोंन वेळा प्यांयचें आहे हें!' असं म्हणून ते मिश्किलपणे हसले होते! ;)

नंतर मला कळलं की 'कुठली' गोष्ट ते मला माईल्ड करून देत होते! ;))

मला तर क्षणभर हॉटेलचा वेटर R C च्या लार्ज पेगमध्ये सोडा घालताना, 'साब, और डालू क्या? की थोडा कडकही रेहेने दू?' असं विचारतो त्याचीच आठवण झाली! ;)

असो! गेले बिचारे रामभाऊ....आज या निमित्ताने अचानक त्यांची आठवण झाली!

आपला,
(एक 'स्मॉल' पंचगव्य घेतलेला!) तात्या.

पंचगव्य

आमचे पिताश्री वारले तेव्हा त्यांचं १२ वं मी करत होतो. तेव्हा पटवर्धन गुरुजींनी माझ्या हातावर थोडंसं पंचगव्य देऊन ते प्राशन करायला लावल होतं! मला आधी काहीच कल्पना नव्हती. मी ते प्राशन केल्यावर मला पटवर्धन गुरुजींनी कोकणस्थी सानुनासिक आवाजात मिश्किलपणे विचारले होते, 'कांय? माईल्ड झालांय कां? कीं कडक आहे? नाही, कडक असेल तर सांगा हो. पाणी घालून थोडं माईल्ड करतों! तुम्हाला अजून दोंन वेळा प्यांयचें आहे हें!' असं म्हणून ते मिश्किलपणे हसले होते! ;)

तात्या !मला भूतकाळात घेउन गेलात.श्रावणी मध्ये जानवं बदलताना मला हे कृत्य माझ्या गावी आमच्या रामाच्या देवळात सामुदायिकरित्या करावे लागत असे. गोमुत्र व पंचगव्य यांची मला धास्तीच बसली होती. पण करता काय सुटका नाही. जानवं सिंगल कराव तर लांब व्ह्यायचं आणि डबल कराव तर् आखूड व्हायचं,पण किल्ली ठेवायला व पाठ खाजवायला मात्र जानव्याच उपयोग व्हायचा. माझ्या ग्रंथपेटिकेला उगीचच छोटे कुलुप लावून त्याची चावी जानव्याला लावल्यावर् मला मोठे झाल्यासारखे वाटे.ॠषीपंचमीला जेवणात जो पंचामृत नावाचा पदार्थ असे, त्याची चव बघता त्याला पंचामृत का म्हणायचे हे मला अजून कळाले नाही.
प्रकाश घाटपांडे

श्रावणी, पंचामृत, जानवी, वगैरे..

श्रावणी मध्ये जानवं बदलताना मला हे कृत्य माझ्या गावी आमच्या रामाच्या देवळात सामुदायिकरित्या करावे लागत असे.

अरे हो! श्रावणीत जानवी बदलतानाही पंचगव्य घ्यावं लागतं हे विसरलोच होतो!

आपला,
(नारळी पौर्णिमेला जानवं बदलणारा अपस्तंभि कोकणस्थ!) तात्या.

रुग्वेदी कोकणस्थ मंडळी, नागपंचमीला श्रावणी करून जानवी बदलतात!

पण किल्ली ठेवायला व पाठ खाजवायला मात्र जानव्याच उपयोग व्हायचा. माझ्या ग्रंथपेटिकेला उगीचच छोटे कुलुप लावून त्याची चावी जानव्याला लावल्यावर् मला मोठे झाल्यासारखे वाटे.

मस्त! ;)

ॠषीपंचमीला जेवणात जो पंचामृत नावाचा पदार्थ असे, त्याची चव बघता त्याला पंचामृत का म्हणायचे हे मला अजून कळाले नाही.

घाटपांडेसाहेब, मला जातीचं राजकारण करायचं नाही, परंतु आमच्या कोकणस्थांकडचं पंचामृत खाऊन बघा एकदा! फारच सुरेख पदार्थ आहे हा. जेवणात चव आणि खमंगपणा आणतो!

आपला,
(पंचामृतावर पोसला गेलेला कोकणातला हलकट कोकणस्थ!) तात्या देवगडकर.

संस्कतीची व्याख्या

मला या संदर्भात वाचलेल्या तीन व्याख्या आठवल्या - कुठे वाचल्या ते आठवत नाही, पण योग्य नक्कीच वाटल्या. त्या वृत्तीनुसार ठरवलेल्या आहेतः

स्वतः भुकेले असताना खाणे - प्रकृती
स्वतः भुकेले असताना पण समोर अजूनही कोणी तरी भुकेला आहे हे पाहून त्या व्यक्तीस स्वतःचा खाणे देणे - संस्कृती
स्वतःचे पोट भरलेले तरीही उगाच खाणे आणि भुकेल्याला न देणे - विकृती

जो स्व्तःच्या कृतीतून,
प्रकृती जोपासतो तो - मानव
संस्कृती तयार करतो, तो - देव
विकृती निर्माण करतो - दानव

मानव

जो स्व्तःच्या कृतीतून,
प्रकृती जोपासतो तो - मानव
संस्कृती तयार करतो, तो - देव
विकृती निर्माण करतो - दानव

एकाच व्यक्तित प्रसंगवशात् कधि मानव कधि दानव तर् कधि देव असतो.या काही कायमस्वरुपाच्या विभागण्या नव्हेत.

प्रकाश घाटपांडे

अक्षय्य तृतीयेची माहिती

अक्षय्य तृतीयेची माहिती

स्त्रोतः http://www.khapre.org/portal/url/mr/panchang/02/shudha/03.aspx

अक्षय्य तृतीया: वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. हा सनातनी धार्मिकांचा उत्सव (सण) आहे.या दिवशी दिलेले दान अगर केलेला जप , होम, स्नान आदी कृत्यांचे फ़ल अनंत असते. सर्वच अक्षय्य (नाश न पावणारे ) होते, यामुळेच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात.तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे; (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे. ) यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया , नरनारायणजयंती, परशुरामजयंती व हयग्रीव जयंती साजरी करतात, व जर द्वितीया अधिक असेल तर परशुरामजयंती दुसरे दिवशी करतात.जर याच दिवशी 'गौरीव्रत' असेल तर गौरीपुत्र गणेशाची चतुर्थीतिथी अधिक शुभ मानतात. अक्षय्य तृतीया अत्यंत पवित्र व महान फ़ल देणारी तिथी आहे. यासाठी यशस्वी होण्यासाठी या व्रतोत्सवाशिवाय वस्त्रे, शस्त्रे, दागदागिने आदि वस्तू तयार करवतात अगर परिधान करतात. तसेच, नवीन जागा , संस्था अगर मंडळे आदी यांची स्थापना , उद्‌घाटन वगैरेही केली जातात. ज्योतिषी पुढील वर्षाची तेजीमंदी समजण्यासाठी या दिवशी सर्व प्रकारची धान्ये, वस्त्रे, वैगरे व्यवहारिक वस्तू आणि विशेष व्यक्तीची नावे वजन करुन एका पवित्र जागी ठेवतात व दुसरे दिवशी फ़िरुन वजन करतात आणि कमीअधिक वजनावरुन भविष्यातील शुभाशुभ समजून घेतात. अक्षय्य तृतीये दिवशी तृतीया तिथी, सोमवार किंवा बुधवार आणि रोहिणी नक्षत्र हे तीन्ही योग असतील तर तो परमश्रेष्ठ योग मानला गेला आहे. यावेळी चंद्राचा अस्त होताना रोहिणी नक्षत्र पुढे जाणॆ शुभ आणि मागे राहणे शेतकरी अशुभ मानतात. या व्रताचा विधी : या दिवशी वर दिलेल्या तीन्ही जयंत्या एकत्र येतात, त्यावेळी व्रत करणार्‍याने प्रात:काळी स्नान करुन 'ममाखिलपापक्षयपूर्वक सकल-शुभ फलप्राप्तये भगवत्प्रीतिकामनया देवत्रयपूजनमहं करिष्ये' असा संकल्प सोडून परमेश्वराची षोडशोपचारे पूजा करावी. पंचामृतस्नान घालून त्यास सुवासिक फ़ुलांचा हार घालावा. नरनारायणासाठी भाजलेले जव अगर गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरबर्‍याची डाळ घालून नैवद्य अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे. तसेच जव गहु ,हरबरे , सातु, दहीभात , उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ ( खवा, मिठाई आदी ) तसेच जलपूर्ण कुंभ ( गन्धॊदकतिलैमिश्रं सान्नं कुंभं फलाचितम् ) घर्मघट, धान्यपदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तुंचे दान करावे. त्याचप्रमाणे पितृश्राध्द करुन ब्राह्मणभोजन घालावे. हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फल मिळते. या तिथीस केलेले दान ,हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते , ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे, असे श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख 'मदनरत्‍न' या ग्रंथात आहे. म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया हे नाव पडले आहे. या दिवशी पितृतर्पण करण्यास न जमल्यास निदान तिलतर्पण तरी करावे, असे आहे. उन्हापासून रक्षण करणार्‍या छ्त्री जोडा इ. वस्तु दान द्यावयाच्या असतात. स्त्रियांना हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या गौरीचे त्यांना या दिवशी विसर्जन करावयाचे असते. त्या निमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात. २) उदककुंभदान : वैशाख शु. तृतीयेच्या दिवशी करावयाचे हे व्रत. या अक्षय्य तिथीस ब्राह्मणास उदकाने पूर्ण असा कुंभ दान दिल्याने मोक्ष मिळतो, अशी श्रध्दा आहे. उदककुंभाचे दान स्वत:साठी , त्याचप्रमाणे, पितरांची अक्षय्य तृप्ती व्हावी म्हणूनही देतात. प्रथम उदककुंभाला गंध लावून त्यात फळे व यव घालून त्यास सूत गुंडाळतात. मग स्वत:साठी असल्यास -- एष धर्मघटो दत्तो ब्रह्माविष्णुशिवात्मक : । अस्य प्रदानात् सफला मम सन्तु मनोरथा: ॥ हा मंत्र म्हणून व पितरांसाठी असल्यास -- एष धर्मघटो दत्तो ब्रह्माविष्णुशिवात्मक : । अस्य प्रदानात्‌ तृप्यन्तु पितरोऽपि पितामहा: ॥ असा मंत्र म्हणून दान देतात. ३) गौरीपूजा : ही पूजाही वैशाख सु. तृतीयेलाच करतात. या दिवशी प्रेमपूर्वक पार्वतीची पूजा करावी. धातूच्या अथवा मातीच्या कलशात पाणी, फ़ले, फ़ुळे, गंध, तीळ, आणि धान्य घालून, एष धर्मघटो दत्तो ब्रह्माविष्णुशिवात्मक: । अस्य प्रदानात्सफला मम सन्तु मनोरथा: ॥ असे म्हणून त्या घटाचे ब्राह्मणास दान करावे. ४) परशुरामजयंती : एक व्रत व उत्सव . वैशाख शु. तृतियेला परशुरामजयंती असते. परशुराम हा विष्णुचा अवतार होय. तो रेणुकेच्या पोटी वैशाख शु. तृतियेला पुनर्वसू नक्षत्रावर रात्रीच्या पहिल्या प्रहरी सहा ग्रह उच्चीचे आणि राहू मिथुनराशीत असता जन्माला आला, म्हणून परशुरामजयंती रात्रीच्या पहिल्या प्रहरात साजरी करतात. यानिमित्त परशुरामाची पूजा करतात व उपवास करतात. उद्यापनाच्या वेळी सर्वतोभद्र मंडलावर ब्रह्मादि देवतांचे आवाहन करुन कलशावर परशुरामाची सुवर्णमूर्ती स्थापन करतात. मग विष्णुमंत्राने तिची पूजा करतात. मग अग्निस्थापना करुन प्रधान होमापर्यंत कर्म झाल्यावर घृतमिश्रित पायस द्रव्याने प्रधान देवतेसाठी १०८ आहुती देतात. मग पूर्णाहुती करतात. फल-- पापनाश व पुरुषार्थसिध्दी कोकणात चिपळूणनजिक परशुरामाचे देवालय असून त्या गावाला परशुरामक्षेत्र म्हणतात. तेथे परशुरामजयंतीचा मोठा उत्सव होतो. दक्षिण भारतात परशुरामजयंतीला विशेष महत्व असते.

चूक मान्य युयुत्सु...

चूक मान्य युयुत्सु...

माझा हेतू एक तर अक्षय्य तृतीयेची माहीती देणे हा होता.
पण सुदैवाने मला मायाजालावर थोडीशी माहीती सापडली आहे

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1510469.cms

या दुव्यावर दिवाळीतील पाडवा (बलिप्रतिपदा) हाच अर्धा मुहूर्त असल्याचे म्हटले आहे

(अर्ध्या मुहूर्ताने ग्रासलेला ) सागर

अक्षय्य तृतीया फक्त श्राद्ध विधी साठी ओळखला जात नाही

युयुत्सु

अक्षय्य तृतीया हा मुहूर्त काही फक्त श्राद्ध विधी साठी म्हणून ओळखला जात नाही.
हा दिवस असा आहे की ह्या दिवशी जे घेतात ते अक्षय राहते म्हणूनच
नवीन कपडे - सोने - नवीन गाडी - नवीन घर हे सर्व या दिवशी खरेदी केले जाते.
श्राद्धादी कर्मे करण्यामागचे प्रयोजनही आपल्या पितरांना पारलौकीक जगातील सुख अक्षय्यपणे मिळावे असे आहे.

(अक्षय्य तृतीयेवर मोठे व्यवहार करणारा ) सागर :)

तुम्ही तरी कुठे विचारले आहे...

पण तुम्ही तरी कुठे विचारले आहे...?

प्रतिसादाचा उपप्रतिसाद
या न्यायाने ही माहिती यायला हवी होती, हे मात्र मान्य आहे.

आपला
गुंडोपंत

सर्व उदाहरणे हिंदू संस्कृतीची आहेत.

भारताशी सांस्कृतिक नाळ जोडलेली असणार्‍या बौद्ध, जैन व शीख धर्मीयांच्या प्रथांचा "भारतीय संस्कृतीत" समावेश होत असावा असे वाटते.

(अधर्मी) शुद्धलेखित लघुसर्किट

हे सर्व पंथ आहेत हो.....

शॉर्ट सर्किट राव

तुमचे म्हणणे एकदम बरोबर आहे
बौद्ध काय किंवा जैन काय किंवा शीख काय सर्वच पंथ आहेत् हो खरे. या सर्वांना धर्म समजणे (त्या त्या धर्माचे लोकही) खरेच त्याला वेगळ्या धर्माचे स्वरुप देणे आहे.
मुस्लिम व ख्रिश्चन धर्म सोडून वरील सर्व पंथांना मी हिंदू धर्माचा अविभाज्य भाग समजतो.

या सर्वच पंथांचे संस्थापक हिंदूच होते की हो.....

(देशातील धर्म-की-अधर्म या सुंदोपसुंदीने माजलेल्या यादवीने वैफल्यग्रस्त झालेला) - सागर

आसं कसं सागरराव

बौद्ध काय किंवा जैन काय किंवा शीख काय सर्वच पंथ आहेत् हो खरे. या सर्वांना धर्म समजणे (त्या त्या धर्माचे लोकही) खरेच त्याला वेगळ्या धर्माचे स्वरुप देणे आहे.

आवं त्ये लोक पूर्वी हिंदू आसलं तरी हिंदू धर्माला कंटालून आपला धर्म बदलला की वं त्यांनी. त्यांना कशापायी पुन्यांदा मागं खेचताय?

तसं तर आमचं पाकिस्तानी जनता बी आदी हिंदू आन् भारतीय व्हती की. त्यांना बी हिंदूच समजायचं का मग?

--
म्या खेडुताचा फ्यान हाय.

खरा तो एकची धर्म ....आपला हिंदू धर्म

त्याचं असं आहे राजीवराव

जैन, शीख वा बौद्ध धर्माची मुलगी आपल्या मुलाने लग्नासाठी पसंत केली तर ते आपण खपवून घेऊ हो
पण मुस्लिम किंवा ख्रिश्चन म्हणजे जास्तच होते की.

आणि हिंदू धर्माचा जो इतिहास मी अभ्यासिला आहे तो असेच सांगतो की, जेव्हा जेव्हा लोक धर्म सोडून वागू लागले होते तेव्हा तेव्हा
जैन, शीख वा बौद्ध ह्या धर्मांची स्थापना झाली. जेव्हा हे धर्म निर्माण झाले तेव्हा त्यांच्या संस्थापकांना ही वेगळी विचारधारा म्हणून अभिप्रेत होते. धर्म नव्हे. त्या त्या धर्मसंस्थापकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी त्याला आजच्या धर्माचे स्वरुप दिले गेले.

जगात प्रत्येक धर्माच्या संस्थापकांची नावे आपल्याला सांगता येतील. पण आपल्या हिंदु धर्माचा संस्थापक कोणी सांगू शकेल काय?
मुस्लिम व ख्रिश्चन धर्माच्या गोष्टी तर मी आपल्या धर्माशी जोडणं मानत नाही.

दुर्दैवाने आपल्या हिंदु धर्माचाही र्‍हास व्हायची वेळ आली होती हो.....
सम्राट अशोकाने बौद्ध धर्मास राजाश्रय दिल्यावर सगळीकडे बौद्ध धर्म झपाट्याने पसरु लागला होता. तो वेग वाढण्याचे कारण काय होते? राजाश्रय मिळाल्यामुळे बौद्ध मठांमध्ये आयते बसून खायला मिळत होते. बौद्ध धर्माचा मूळ उद्देश इथे मागे पडला. थोडक्यात बौद्ध धर्माचा र्‍हास सुरु झाला.
बौद्ध धर्माचे अनुयायी वाढण्याचा हा जबरदस्त वेग थांबवण्याचे महान कार्य केले ते "आदी शंकराचार्यांनी".
पुष्यमित्र शृंगाने मौर्य घराण्याचे शिरकाण करुन आर्य धर्मास राजाश्रय दिला (हिंदू धर्म त्या काळात वैदीक धर्म वा आर्य धर्म म्हणून प्रचलित होता.)

शंकराचार्यांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सर्व भारतात भ्रमण करुन सर्वांमध्ये सुप्तावस्थेत असलेले धर्माचे स्फुल्लिंग पेटविले आणि अशा प्रकारे हिंदू धर्माचे रक्षण झाले.
असो.
(हिंदू धर्माभिमानी आणि देशास एकसंध पाहणारा) - सागर

पुष्यमित्र शुंग

या राजाचे नाव श्रृंग नसून पुष्यमित्र शुंग किंवा शुङग असे आहे. सदर राजाने बौद्ध धर्म बाजूला सारून वैदिक धर्मास मान्यता कशी मिळवून दिली याबद्दल काही सांगता येईल का?

पुष्यमित्र शुंग

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या "भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सहा सोनेरी पाने" य पुस्तकात सांगीतलेली गोष्ट (पुस्तक जवळ नसल्यामुळे) जेव्ह्ढे आठवतयं तेव्ह्ढे सांगतो:

अशोकानंतर बौद्ध धर्माचा आणि पर्यायाने अहींसेचा अतिरेक झाला आणि त्यामुळे "क्षात्रधर्म" (जात या अर्थाने नव्हे) लोप पावायला लागला. परीणामी राष्ट्राची सुरक्षा धोक्यात आली. इतर काही तत्कालीन संदर्भाचा अन्वयार्थ लावल्यास त्याच सुमारास ग्रीक राजा मिनँडरचे आक्रमण होणार होते. पण तत्कालीन सम्राट आणि अशोकाचा नातू की पणतू हिंसेच्या पूर्ण विरोधात होता. त्या वेळेस जे काही सैन्य होते त्याचा सेनापती असलेल्या पुष्यमित्राने त्याला मारले, क्षात्रधर्म दाखवायला अश्वमेध यज्ञ केला आणि नंतर ग्रीकांना (अलेक़्झँडरच्या वेळचे नसावेत..) हरवले आणि मग स्वतःच्या नावाने राज्य स्थापले. त्याच्यावर आरोप होतो की त्याने बुद्धधर्मीयांना त्रास दिला आणि भारतातून् बौद्धधर्म काढून टाकला आणि परत तत्कालीन सनातन हिंदू धर्म परत् वर आणला.

आमच्या मताची जोरदार पिंक

जैन, शीख वा बौद्ध धर्माची मुलगी आपल्या मुलाने लग्नासाठी पसंत केली तर ते आपण खपवून घेऊ हो
पण मुस्लिम किंवा ख्रिश्चन म्हणजे जास्तच होते की.

काय प्रॉब्लेम आहे? इथे राहणारे मुस्लिम व ख्रिश्चनही मूळचे हिंदूच आहेत ना? मग त्यांच्यापैकी एखादी न चालण्याचे कारण समजेल का?

जेव्हा हे धर्म निर्माण झाले तेव्हा त्यांच्या संस्थापकांना ही वेगळी विचारधारा म्हणून अभिप्रेत होते. धर्म नव्हे. त्या त्या धर्मसंस्थापकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी त्याला आजच्या धर्माचे स्वरुप दिले गेले.

हीच गोष्ट हिंदू धर्माला लागू होत नाही का? एका सर्वसमावेशक जीवनपद्धतीला बाजारु वृत्ती देणारे अडवाणी, मोदी, तोगडिया यांचे अनुयायी तर याच धर्मात पदोपदी पहावयास मिळतात.

मुस्लिम व ख्रिश्चन धर्माच्या गोष्टी तर मी आपल्या धर्माशी जोडणं मानत नाही.

मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीयही जातीव्यवस्थेचा जोरदार पुरस्कार करणार्‍या हिंदूधर्माशी नाते जोडणे टाळतील.

असो.

आम्हाला प्रातःस्मरणीय असणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे "मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही" हे वचन आपल्याला माहिती असावेच.

दरम्यान बौद्ध धर्माचे अनुयायी वाढण्याचा हा जबरदस्त वेग थांबवण्याचे महान कार्य करणार्‍या आदी शंकराचार्यांनी व त्यांच्या वंशजांनी किती धर्मपीठांमध्ये, मंदिरांमध्ये पददलितांना, तथाकथित अस्पृश्यांना मानाचे पद दिले याची आकडेवारी कळू शकेल काय?

आपला,
(अधर्माभिमानी) शुद्धलेखित लघुसर्किट

सहमत

सर्वसमावेशकता, सहिष्णुता, दुसर्‍यांच्या विचारांचा आदर, कोणत्याही नव्या विचारातील उत्तम, अनुकरणीय गोष्टी स्वीकारणे यासारखे अनेक चांगले गुण भारतीय संस्कृतीचे सांगता येतील. दुराभिमान आणि धर्मांधता दोन्हीही आपल्या संस्कृतीशी जुळणारे नाहीत.
आपला
(विवेकवादी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

महाराज युयुत्सु!

हळू वाढणार्‍या किंवा स्टॅग्नंट असणार्‍या अर्थव्यवस्थेला जगात "हिंदु इकॉनॉमी" असे नाव रूढ आहे, तसेच.

आपण या विधानासाठी संदर्भ देऊ शकाल का? उत्सुकतेपोटी मी गुगलवर पाहीले पण काही मिळाला नाही. नसल्यास हे विधान स्वत्:चेच आहे का ते ही सांगा.

धन्यवाद

सेक्युलर इकॉनॉमी?

युयुत्सु,

दुव्याबद्दल धन्यवाद. मी आपण वापरलेल्या शब्दांप्रमाणे "Hindu Economics" या नावाने शोधत होतो. पण ते " Hindu rate of growth" या शब्दाने मिळू शकते. यावर आपण दिलेल्या दुव्याचा उपयोग करून मी विकीपेडीयावरून त्यांनी दिलेला संदर्भ घेऊन "लॊर्ड मेघनाद देसाई", या लंडन स्कूल ऒफ इकॊनॊमिक्सच्या प्राध्यापकाच्या मुलाखतीच्या पानावर गेलो. तिथे त्यांनी म्हणल्याप्रमाणे मूळ शब्द (आपण संगीतलेल्या कारणास्तव) "सेक्युलर रेट ऒफ ग्रोथ" असा होता. पण भारतातील अर्थशास्त्रज्नाने त्याचा भारतात भारतापुरता वापर करताना "हिंदू रेट ऒफ ग्रोथ" हा शब्द प्रचलीत केला. (विकीपेडीया मधे ही भारतापुरताच शब्द असल्याचे म्हणले आहे...)

म्हणून आपल्या प्रतिसादातील "हळू वाढणार्‍या किंवा स्टॅग्नंट असणार्‍या अर्थव्यवस्थेला जगात "हिंदु इकॉनॉमी" असे नाव रूढ आहे, तसेच..." हे वाक्य परत वाचताना, वाचकांची दिशाभूल होत असल्याचे जाणवले. आशा करतो की दिशाभूल नकळत झाली इतर काही उद्देशाने नाही.

अजून एक लक्षात आले की विकीपेडीयावर "seculare rate of growth" वरून काही संदर्भ अथवा माहीती उपलब्ध नाही...

धन्यवाद
विकास

माहीती आहे...आणि अजून थोडेसे हिंदू इकॉनॉमिक्सबद्दल

जाणून बुजून दिशाभूल करण्याचा कुठलाही मानस नव्हता.

मला कल्पना आहे. आपले बाकीचे लेखन माहीती आहे. आपला एखादा विचार पटला नाही तर वाद घालत असलो तरी आपण दिशाभूल करता असे कधी वाटले नाही.

मनमोहन सिंगांनी ९१ मध्ये जे बदल घडवून आणले, त्याविषयी बोलताना ते म्हणाले होते, की "आजवरच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताच्या अत्यंत कमी बाढदराला हेटाळणी करण्यासाठी हिंदु रेट ऑफ ग्रोथ म्हणतात. ह्यानंतर हिंदु रेट ऑफ ग्रोथ ह्या शब्दांना अत्यंत तेजीने होणारी वाढ असा अर्थ प्राप्त होईल अशी आशा आहे.

जर मनमोहनसिंगांनी तसा शब्द वापरला असला तर ते चुकीचे आहेत. त्याच् पद्धतीने त्यांनी ऑक्सफर्डमधे ब्रिटीश भारतात आले ते चांगले झाले, अशा अर्थाचे विधानही केले होते. (आणि मनातल्यामनात कदाचीत नंतर सोनीया़जी आल्या असेही!)

आता थोडे हिंदू इकॉनॉमिक्स बद्दल (ऐकीव माहीती):

"Hindu Economics: Eternal Economic Order. New Delhi: Janaki Prakashan, 1993" असे पुस्तक एम. जी. बोकारे यांनी लिहीले होते. माझ्या माहीतीप्रमाणे ते कम्युनिस्ट पॉलीटब्युरोचे कदाचीत पहील्या पिढीतील सदस्य होते. नंतर त्यांनी जगभरच्या अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि तसाच प्राचीन भारतीय अर्थशास्त्राचा - ज्यात अर्थशास्त्र हा फक्त पैशाशी निगडीत शब्द नव्हता तेंव्हाचा अभ्यास केला. त्यांना लक्षात आले की भांडवलशाही आणि मार्क्सवाद यांना (चांगल्या अर्थाने) छेद देऊन अजून एक संस्कृती/शास्त्र आहे की ज्यामधे संपूर्ण समाजाचा विचार केला आहे. त्यावर आधारीत त्यांनी पुस्तक लिहीले आणि या कडक मार्क्सवाद्याला त्या शास्त्राला नाव द्यावेसे वाटले: "Hindu Economics"....

अजून थोडे...

  • कै. श्री. दत्तोपंत ठेंगडी यांचे याविषयावरील "Third Way" http://www.pragna.org/dynamic/modules.php?name=News&file=print&sid=31 हे पुस्तक वाचण्यासारखे आहे.
    ठेंगडी यांचे अभ्यासपूर्ण लिखाण साम्यवाद आणि भांडवलीशाही यापलिकडे जाऊन अर्थशास्त्र, कायदा, आणि इतर सामाजिक बाबींना "हिंदू मार्ग" कसा लागू करता येऊ शकेल याचे विचरण करतो. लिखाण केवळ भावनिक पातळीवर राहत नाही.
    तसेच हे केवळ पुस्तक न राहता प्रत्यक्षात येण्यासाठी काय करता येऊ शकेल याविषयीही ठेंगडींची धडपड राहली असल्याचे दिसते.
  • अमर्त्य सेन यांचे अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र यावरील लिखाणही माझ्यामते भांडवलीशाही आणि साम्यवाद या साच्यात बसविता येत नाही. त्यांची सोशल चॉईस थेअरि ही गणित/तर्कशास्त्र यांवर जितकी आधारित आहे तितकीच नैतिकता आणि तत्वज्ञानावरही अवलंबून आहे. (मी सोशल चॉईस थेअरि मुळातून वाचलेली नाही )
    त्यांच्या लिखाणाची एक झलक येथे मिळावी ... http://www.unesco.org/culture/worldreport/html_eng/wcrb12.shtml
  • अमर्त्य सेन यांच्याबद्दलही त्यांचे तत्वज्ञान हे निव्वळ पुस्तकात न राहता त्याचे प्रत्यक्ष प्रयोग व्हावेत यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न चालू असतात.

आवडले

मी हिंदू म्हणून जन्माला आलो, भारतीय म्हणून मोठा झालो, अनिवासी भारतीय म्हणून आणखी मोठा झालो, अमेरिकन भारतीय म्हणून आणखी मोठा होणार, भारतीय अमेरिकन म्हणून आणखी मोठा,

आवडले....
आपला हा विचार 'कसा कसा घडत गेला' यावर काही मौलिक विचार मिळाल्यास आवडेल.

आणि मरताना "कोण होता" ह्याचा विचारही कुणाच्या मनात येऊ नये, ही व्यवस्था करण्याचा संकल्प सोडला आहे.

हे तर एकदम मस्त...
मला शक्य असते आणी माझी पावर असती तर मी अत्ताच आपल्याला मोक्षपद देउन टाकले असते! ;)

आपला
गुंडोपंत

ग्रेट

आणि मरताना "कोण होता" ह्याचा विचारही कुणाच्या मनात येऊ नये, ही व्यवस्था करण्याचा संकल्प सोडला आहे.

'पण काय चीज होती 'हा विचार नक्कीच येईल.

प्रकाश घाटपांडे

वा !!! वा !!! वा !!! चर्चा काय झकासपणे रंगात येत चालली आहे

वा !!! वा !!! वा !!!
चर्चा काय झकासपणे रंगात येत चालली आहे

मित्रांनो,

येथे मी हे स्पष्ट करु इच्छितो की मी जसा धर्माभिमानी आहे तसाच आपल्या हिंदू संस्कृतीचा मूल्याभिमानीपण आहे.
सहिष्णूता हा आपल्या भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. हे ही मला मान्य आहे.
पण ज्या आक्रमकांनी आपल्या देशातील मंदीरे फोडली , आया-बहिणींवर अत्याचार केले, आणि आता त्यांच्या सत्तेचे उच्चाटन झाल्यावर अल्पसंख्यांक म्हणून मतांचे पुढारी त्यांच्या दाढ्या कुरवाळतात याचीच फक्त चीड आहे.

कोणावरही व्यक्तीगत रोख नाहीच. धर्मावर तर नाहीच नाही. माणुसकीचा धर्म मानणारा मी ही आहे.
धर्माच्या नावाने लोकांना भडकवणार्‍या पुंडांचा मलाही तिटकारा आहे.
असो.
प्रत्येकाने आपापला धर्म प्रामाणिकपणे निभवावा हेच मला सांगायचे होते.

तुम्ही मुस्लिमांचे अथवा ख्रिश्चनांचे समर्थन करत असाल तर तुम्ही हिंदू धर्म बदलून मुस्लिम अथवा ख्रिश्चन होणार आहात का?
एवढेच म्हणायचे होते.

सर्वांना विनंती की चर्चेचा विषय हा आपली प्राचीन भारतीय संस्कृती आहे.
तेव्हा कृपया हा धार्मिक चर्चा संवाद थांबवावा असे मला प्रामाणिकपणे म्हणावेसे वाटते.

अर्थातच विचार मांडताना मीही वाहवत गेल्याची चूक मला मान्य आहे. मी ही यापुढे अशा संवेदनशील विषयावर भाष्य टाळेन.

धन्यवाद
सागर

 
^ वर