संस्कृती

मित्रांनो,

आपली भारतीय संस्कृती ही फार महान आहे.
या महान संस्कृतीच्या माहितीचे येथील सर्व सदस्यांत आदान-प्रदान व्हावे यासाठी हा लेखन प्रपंच

येथे मी माझ्या संग्रहातील काही गोष्टी देत आहे.
त्यांत आपण सर्वांनी भर टाकावी ही अपेक्षा

धन्यवाद
सागर

वर्षातील साडेतीन मुहूर्त आणि चातुर्मासाचा काल
वर्षातील साडेतीन मुहूर्त:
१. वर्षप्रतिपदा
२. अक्षय तृतीया
३. विजयादशमी हे तीन मुहूर्त आणि
४. बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त

चातुर्मास : आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचे ४ महिने

पंचामृत, पंचधातू, पंचमहाभूते आणि अभ्यासाची ५ अंगे

पंचामृत : याने देवाला अभिषेक करतात.
१. गाईचे दूध
२. दही
३. तूप
४. मध
५. साखर

पंचधातू: ५ धातूंचे मिश्रण
१. सोने
२. रुपे
३. लोखंड
४. तांबे
५. जस्त

पंचमहाभूते: यापासून सजीव सृष्टी तयार झाली
१. पृथ्वी (जमीन)
२. आप (पाणी अथवा जल)
३. तेज (अग्नी)
४. वायु
५. आकाश

अभ्यासाची ५ अंगे:
१. अभ्यास
२. लेखन
३. निरिक्षण
४. चर्चा
५. गुरुची उपासना

षड् रिपु : माणसाचे सहा शत्रू

१. काम : वैषयिक गोष्टीत गुंतणे
२. क्रोध : राग
३. लोभ : संपत्तीची हाव
४. मोह : जे आपल्याकडे नाही ते मिळवण्याचा हव्यास
५. मद : स्वत:विषयीचा फाजील गर्व अथवा अहंकार
६. मत्सर : दुसर्र्याकडे असलेल्या गोष्टीचा हेवा करणे

सप्त चिरंजिव:
१. अश्वत्थामा
२. बलि
३. व्यास
४. हनुमंत
५. विभिषण
६. कृप
७. परशुराम

अष्टगंध आणि नवरत्ने

अष्टगंध :
१. चंदन
२. अगरु
३. देवदार
४. कोष्ट - कोळींजन
५. कुसुम
६. शैलज
७. जटामांसि
८. सुरगोरोचन ही आठ सुगंधी द्रव्ये वापरुन तयार केलेले गंध

नवरत्ने :
१. हिरा
२. मोती
३. प्रवाळ
४. गोमेद
५. इंद्रनील
६. वैडूर्य
७. पुष्कराज
८. पाचू
९. माणिक

वेद पद्धतीतील १२ मास (महिने)

१. मधु
२. माधव (मिळून वसंत ऋतू)
३. शुक्र
४. शुचि (मिळून ग्रीष्म ऋतू)
५. नभ
६. नभस्य (मिळून वर्षा ऋतू)
७. इष
८. उर्ज (मिळून शरद ऋतू)
९. सहस
१०.सहस्य (मिळून हेमंत ऋतू)
११.तपस्
१२.तपस्य (मिळून शिशिर ऋतू)

दहा प्राण

दहा प्राण : आपल्या शरीरात असलेल्या वायुचे हे १० विविध प्रकार आहेत
(०१)प्राण - श्वास. नाकातून आपण आत घेतो तो वायु
(०२)अपान - उच्छवास.नाकातून आपण बाहेर सोडतो तो वायु
(०३)व्यान - आपल्या अवयवांना हालचाल करायला लावणारा वायु
(०४)समान - रक्ताभिसरण करणारा वायु
(०५)उदान - अन्न गिळण्यास मदत करणारा वायु
(०६)नघ - ढेकर आणणारा वायु
(०७)कुरम् - पापण्यांची उघडझाप करणारा वायु
(०८)कृकल - जांभई आणणारा वायु
(०९)देवदत्त - भूक निर्माण करणारा वायु
(१०)धनंजय - मृत्यूनंतर शरीरात राहून मृत शरीर फुगवणारा वायू

सोळा संस्कार

१. गर्भाधान (गर्भसंस्कार)
२. पुंसवन
३. अनुवलोभन
४. विष्णुबली
५. सीमंतोन्नयन
६. जातकर्म
७. नामकरण
८. निष्क्रमण
९. सूर्यावलोकन
१०.अन्नप्राशन
११.चूडाकर्म (जावळ)
१२.उपनयन (मुंज)
१३.गायत्र्युपदेश
१४.समावर्तन
१५.विवाह
१६.अंत्यविधी

अमरकोशातील देवतांचे १० जातिभेद

१. विद्याधर
२. अप्सरस्
३. यक्ष
४. रक्षस्
५. गन्धर्व
६. किन्नर
७. पिशाच
८. गुह्यक
९. सिद्ध ..... आणि
१०. भूत

लेखनविषय: दुवे:

Comments

मूळ पदावर सगळेच आले तर बरे हो

मूळ पदावर सगळेच आले तर बरे हो

नाहीतर या समुदायाच्या संयोजकांना विनंती की चर्चेचे नाव बदलून "धर्म म्हणजे काय्?"अथवा "सर्व धर्मांचा शोध" हे ठेवावे....

संस्कृती नाव येथे चाललेल्या चर्चांमधून शोभत नाही.

(अशा स्वागताने हिरमुसलेला) सागर

सागर

तुम्हाला एखाद्या विषयाची सखोल माहिती नसेल तर त्याबद्दल बेधडक विचार मांडू नका असे सांगावेसे वाटले. ज्यू धर्म आणि पुष्यमित्र यांच्याबद्दल केलेली विधाने अत्यंत विवादास्पद आहेत आणि देण्यासाठी कोणतेही पुरावे आपण देऊ शकला नाहीत.

जुडाईजम ख्रिश्चन धर्मापेक्षा जुना नाही असे कोणतेही विधान आतापर्यंत मी वाचलेले नाही आणि शोधून सापडलेही नाही.

पुष्यमित्र शुंग याने बौद्ध धर्म मागे पडून हिंदू धर्म वापरात यावा यासाठी काय केले याचा इतिहास शोधून पाहा, तसेच त्याच्या पश्चात हिंदू धर्मात वाढीला लागलेली चातुर्वर्ण व्यवस्था आणि स्त्रियांची परिस्थिती यावर वाचून पाहा. आपण ते वाचले असेल तर त्यात अभिमानास्पद फारसे काही नाही हे जाणवेल.

आम्हीपण येऊ!

विश्व हिंदु परिषदेच्या अध्यक्षपदी जेव्हा एखादा दलित येईल, तेव्हा आम्ही स्वाभिमानाने ही संस्था स्वतःहून जॉईन करू.
वा योग्य मुद्दा!

आम्ही पण येऊ तेंव्हा तुमच्या बरोबर!

आपला
गुंडोपंत

काय सांगता!

जेव्हा जेव्हा लोक धर्म सोडून वागू लागले होते तेव्हा तेव्हा
जैन, शीख वा बौद्ध ह्या धर्मांची स्थापना झाली.

सध्या काय परिस्थिती आहे? जातीव्यवस्था पाळणे धर्मानुसार आहे की धर्म विरोधी?

जेव्हा हे धर्म निर्माण झाले तेव्हा त्यांच्या संस्थापकांना ही वेगळी विचारधारा म्हणून अभिप्रेत होते.

हे कशावरून?

जगात प्रत्येक धर्माच्या संस्थापकांची नावे आपल्याला सांगता येतील.

हे धाडसी विधान आहे. त्याला जगातल्या सगळ्या धर्मांची संख्यादेखील माहित नाही :)

जे धर्म हिंदूधर्मापासून (तत्वभेद असल्याने) जाणूनबुजून वेगळे झाले ते इतरत्र जन्मलेल्या धर्मांच्या तुलनेत जवळचे कसे? उलट यांचा हिंदूधर्म विरोध अधिक स्पष्ट नाही का?

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

मुळातच तिकडे ज्यु धर्म आधी की ख्रिश्चन आधीहा वाद सुरु आहे

युयुत्सु

मुळातच तिकडे ज्यु धर्म आधी की ख्रिश्चन आधीहा वाद सुरु आहे
खरे खोटे देवच जाणे

दुवे देऊ शकाल का?

मुळातच तिकडे ज्यु धर्म आधी की ख्रिश्चन आधीहा वाद सुरु आहे

हे माझ्या वाचनात कधी आले नव्हते. याच्या पुष्टीसाठी काही दुवे देऊ शकाल का?

खरा वाद ज्यू-ख्रिश्चन-की-इस्लाम असा आहे

प्रियाली,

माफ करा दुवा तर काही देता येणार नाही.
पण वाद हा नुसता ज्यू-ख्रिश्चन असा नाहीये तर तो वाद ज्यू-ख्रिश्चन-की-इस्लाम असा आहे

या वादाचे केंद्रबिंदु आहे जेरुसलेम. येथेच येशू झाला, पैगंबर झाला....
जेरुसलेम तुमचे की आमचे अशी रस्सीखेच या तिनही धर्मांत चालू आहे.

कारण ज्या काळात हे तीनही धर्म वाढले-नावारुपास आले तो काळ एकच होता.

दुर्दैवाने माझा ज्यू धर्माचा तितका अभ्यास नाहीये. पण त्यांच्या धर्माची पाळेमुळे पर्शियन साम्राज्यात आहेत एवढे नक्की.
हे लोक अग्निपूजक होते. सध्याच्या ज्यू धर्माची मला तितकी माहीती नाही. पण पारसी लोक् आजही अग्निपूजक आहेत.
मी माहीती शोधण्याचा प्रयत्न करतो. मिळाल्यास नक्की येथे दुवा देईन.

धन्यवाद
सागर

यापुढे असे मुद्देच मी टाळणार आहे युयुत्सु.

यापुढे असे मुद्देच मी टाळणार आहे युयुत्सु.

पण तरीही तुमची सूचना सर्वच बाबतीत शिरोधार्य आहे.
मी नक्कीच यापुढे माहितीचा स्त्रोत देण्याचा प्रयत्न करीन.

तुमच्या बहुमोल सूचनेबद्दल धन्यवाद
सागर

हस्ती मिटती नहीं हमारी

मुहम्मद इक्बाल उवाच -
इरानो मिसर रोमा सब मिट गये जहां से , बाकी रहा ही फिर भी नामो निशा हमारा
कुछ बात है की हस्ती मिटी नहीं हमारी , सदियों रहा है दुशमन दौर ए जमा हमारा

भारतीय संस्कृती मनापासून अंगी बाणवायची असेल तर धर्मपंथांच्या गोष्टी करण्याऐवजी हे समजून घ्यायची तयारी हवी.

(भारतीय) एकलव्य

मिटले आणि टिकले

"मिटले" कशाला म्हणायचे आणि "टिकले" कशाला म्हणायचा हा अवघड प्रश्न आहे. त्याचे उत्तर मला मिळाले तर माझ्या जीवनाचे सार्थक होईल. (म्हणून ते मिळविण्याची धडपड यालाच मी जीवन म्हणेन.)

इतर मिटले की नाही या वादात पडण्यापेक्षाही भारतीय संस्कृती जर का टिकली असेल आणि टिकणार असेल तर भारतीय संस्कृती म्हणजे फक्त हिंदूची संस्कृती हा दुराग्रह योग्य नाही हे प्रामुख्याने सांगण्याकडे रोख आहे.

योग्य वाटो वा अयोग्य पण सर्वांना सामावून घेणे हाच भारतीय संस्कृतीचा गाभा आहे.

धर्म

बौद्ध धर्माचे अनुयायी वाढण्याचा हा जबरदस्त वेग थांबवण्याचे महान कार्य केले ते "आदी शंकराचार्यांनी".


दुसरा धर्म थांबवणे हे महान कार्य कसे असू शकते? आपली संस्कृती सर्व धर्मांना समान मानते असे ऐकले होते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

धर्म व संस्कृती

धर्म व संस्कृतीला व्याख्येत पकडता येत नाही. पकडण्याचा प्रयत्न केला तर शब्दोच्छल होतो, शाब्दिक हाणामारी होते, कर्तव्य, आचारविचार, धारणा, यांचा समुच्चय असलेली संकल्पना आहेत.
प्रकाश घाटपांडे

येथे सध्या तरी हेच चित्र दिसत आहे

येथे सध्या तरी हेच चित्र दिसत आहे
शब्दोच्छल , शाब्दिक हाणामारी हेच चालू आहे.

माझी जाहीर माघार आहे या विषयावर.
मी अगोदरच स्पष्ट केले होते की यात मी अधिकारी व्यक्ती नाहीये. आणि योग्य ती माहीती ज्यांनयसेल त्यांनी द्यावी.

पण येथे तर सगळा हमरीतुमरीचाच प्रकार आहे.
असो.
जर यातून काही चांगले निष्पन्न होत असेल तर मला काही फरक पडत नाही
(नवागताचा विरस झालेला) सागर

जुन्या दिवसांची

आठवण झाली हे सगळे वाचुन (अर्थात जुन्या एका संकेतस्थळाची). कुणीतरी त्या वात कुक्कुटाला पण बोलवा रे इथे.

 
^ वर