नवी सुविधा - गूगल शोध

उपक्रमवर आता ड्रुपलच्या अंगभूत शोध सुविधेच्या बरोबरीने गूगल शोधाची सुविधा उपलब्ध आहे!

नव्या सुविधेचे फायदे

१. गूगलचे शोध तंत्रज्ञान जगातील सर्वोत्तम शोध तंत्रज्ञानांपैकी आहे, त्याचा फायदा उपक्रमच्या सदस्यांना आणि वाचकांना थेट घेता येईल.
२. ड्रुपलच्या अंगभूत शोध सुविधेत असणार्‍या त्रुटी उदा. कमी शब्द शोधल्यास बरेचसे असंबद्ध निकाल दिसणे इ. गूगलच्या वापराने दूर होतील.
३. गूगलच्या 'कस्टम सर्च इंजिन' या सुविधेचा लाभ घेऊन उपक्रमवरील गूगल शोधयंत्रणेत काही बदल केले आहेत. उदा. उपक्रमवरील गूगल शोधयंत्राच्या निकालात इसकाळ, महाराष्ट्र टाइम्स, विकीपीडिया या संकेतस्थळांच्या पानांना प्राधान्य मिळेल.

सुविधा कशी वापरायची?

गूगल शोध या मथळ्याखाली असलेल्या चौकटीत आपल्याला हवे ते शब्द भरून गूगल शोध सुविधा वापरता येईल. (येण्याची नोंद केलेली असल्यास निकालाच्या पानावर "लेखन", "सदस्य" आणि "Google" असे विभाग दिसतील. त्यातील "लेखन" विभागात ड्रुपलची अंगभूत लेखन-शोध सुविधा आहे आणि "सदस्य" या विभागात ड्रुपलची अंगभूत सदस्य-शोध सुविधा आहे.)

नव्या सुविधेच्या मर्यादा

१. गूगलच्या निकालाच्या पानात काही बदल करणे शक्य नसल्याने शोधाच्या निकालाच्या पानावरील टंक हा तुमच्या संगणकावरील नेहमीचा (डिफॉल्ट) टंक असेल. जर तुमच्या संगणकावर युनिकोड वापरणारी पण डायनॅमिक फाँट्स न वापरणारी संकेतस्थळे उदा. मराठी विकीपीडिया, अनुदिन्या इ. दिसत असतील तर निकालाचे पान दिसण्यात अडचण येणार नाही.
२. गूगल शोधाच्या निकालाच्या पानावर असलेल्या चौकटीत देवनागरीत लिहिता येत नाही. देवनागरी/मराठी शब्द शोधण्यासाठी समासात असलेल्या शोधाच्या चौकटीत शब्द भरून शोध घ्यावा.

या नव्या सुविधेचा उपक्रमच्या सदस्यांना आणि वाचकांना चांगला उपयोग होईल अशी आशा आहे. आडचणी, शंका, सूचना निरोपातून कळवाव्यात.

Comments

अभिनंदन/ एक अडचण

काही वेळापूर्वीच ही सोय डाव्या कोपर्‍यात सुरू केल्याचे कळले होते. नवी सोय आवडली. धन्यवाद.

एक अडचण अशी नजरेस आली की एखाद्या शब्दावर शोध दिल्यावर "लेखन", "सदस्य" आणि "Google" हे जे तीन विभाग दिसले त्यात टॉगल केले असता शोध चौकट रिकामी होते. म्हणजे गूगल शोध "रोचक" या शब्दावर दिला तर गूगललेले शोध दिसतात परंतु लेखन या विभागावर टिचकी मारली तर शोध चौकट रिकामी होते. शब्द पुन्हा टंकावा लागतो. याबाबत काही करणे शक्य आहे का?

अभिनंदन

अभिनंदन

गूगल शोध इथेच उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभारी,आणि आपले मनापासुन अभिनंदन.

खूप छान

हे खूप उपयुक्त ठरेल.

धन्यवाद

विकास

अभिनंदन

मी यात "मराठी" हा शब्द शोधला. या शोधपानाचा नवीन पत्ता मी कोणालाही पाठवून त्यांचे मराठीप्रेम वाढवू शकतो. तसेच माझ्या अनुदिनीमध्ये त्याचा दुवा देऊ शकतो. हा असा.
(टाईनी युआरएल tinyurl.com हे संकेतस्थळ वापरून मी हे दुवे लहान केले आहेत.)
मला मराठी हा शब्द उपक्रमावर किती वेळा व कुठे कुठे आला आहे ते पाहावयाचे असेल तर मी मराठी शब्दाच्या पुढे site:mr.upakram.org असे लिहून शोध घेईन. की काम फत्ते.
गुगलचे सर्व शोध सहाय्यक यातही चालत असल्याचा फायदा का घेऊ नये?

शंतनू साहेब एक शंका

माझ्या ब्लॉगवर मी गूगल कस्टम सर्च आधारित शोधयंत्र टाकले आहे. त्यात शोध घेताना आपोआप मराठी अक्षरे यावीत म्हणून काय करावे? गमभन तेथे कसे जोडता येईल?


येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

गमभन आणि गूगल सीएसई

माझ्या ब्लॉगवर मी गूगल कस्टम सर्च आधारित शोधयंत्र टाकले आहे. त्यात शोध घेताना आपोआप मराठी अक्षरे यावीत म्हणून काय करावे? गमभन तेथे कसे जोडता येईल?

तुमच्या ब्लॉगच्या सेवादात्याने आपल्या स्वतःच्या जावास्क्रिप्ट्स ठेवण्याची सोय दिली आहे का? (ब्लॉगर.कॉम किंवा वर्डप्रेस वर अशी सोय नसावी.) असेल तर सर्चच्या चौकटीत मराठी टंकलेखन शक्य होईल. गूगलचे सर्च रिझल्ट्स ज्या पानावर येतात त्यात काही बदल करणे (रंग बदलणे, चौकट लहान-मोठी करणे वगैरे सामान्य गोष्टी वगळता) शक्य नाही असे कळते.

अभिनंदन

गूगल शोध इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल अभिनंदन

एक शंका - उपक्रम "न" वापरता जर गूगल शोध वापरून "फक्त मराठी" शोध मिळवायचे असतील तर काय करावे लागते?

मराठी शोध

उपक्रम "न" वापरता जर गूगल शोध वापरून "फक्त मराठी" शोध मिळवायचे असतील तर काय करावे लागते?

गूगल.कॉम वर देवनागरी शब्द शोधला तर देवनागरीतील रिझल्ट्स दिसतात. बहुसंख्य शब्द सारखे असल्याने मराठी/हिंदी/संस्कृत असा फरक गूगल शोधयंत्राला करता येत असेल की नाही याबाबत शंका आहे. देवनागरीत टाइप करण्यासाठी गमभन, बराहा किंवा उपक्रम/मनोगत/मायबोली वरील टंकलेखन खिडक्यांचा वापर करता येईल आणि तिथून कॉपी करून गूगलच्या पानावर चिकटवता येईल.

धन्यवाद

करून पाहिले - आधी देवनागरी मध्ये टाइप करायला "बाहेरील" मदत घ्यावीच लागते तर .

गमभन ही पाहिले (प्रथमच). त्यामध्ये ऑफलाईन वापराकरिता डाउनलोड करा असा पर्याय दिसला. याचा अर्थ, मला मराठीतून लिहिता येइल आपण जसे वर्ड मध्ये टाइप करतो तसेच? कुठला वर्ड प्रोसेसर वापरला जातो?

बाहेरील मदत, बरहा आणि गमभन

आधी देवनागरी मध्ये टाइप करायला "बाहेरील" मदत घ्यावीच लागते तर.

हो. थेट देवनागरीत टाइप करण्याची सोय गूगलमध्ये (बहुतेक इतर कोणत्याही शोधयंत्रात) अजून तरी नाही.

विंडोज़ वापरणार्‍यांना बरहा हा पर्याय उपलब्ध आहे. बरहा वापरून (युनिकोडला सपोर्ट असणार्‍या) कोणत्याही ऍप्लिकेशन (मासॉ वर्ड, इंटरनेट एक्स्प्लोरर, वर्डपॅड इ.) मध्ये थेट देवनागरीत आणि इतर भारतीय भाषांमध्ये लिहिता येते. (बरहा कसे वापरायचे याविषयी बर्‍याच दिवसांपूर्वी इथे माहिती दिली होती. आता बरहाची नवी आवृत्ती आली असली तरी वापरण्यात अडचण येऊ नये.)

बराहा वापरण्यासाठी इंस्टॉल करावे लागते आणि बर्‍याचवेळेस (उदा. कार्यालयीन संगणक असेल तर) इंस्टॉल करणे शक्य नसते. अश्यावेळी गमभन ऑफलाइन वापरणे शक्य आहे. गमभनमध्ये टंकलेले फाइल म्हणून सेव्ह करता येते किंवा तिथून कॉपी करून इतरत्र चिकटवता येते.

आउहोहीआआ (याचा पयोग होईल ही शा हे)

 
^ वर