थोर इतिहासकार जदुनाथ सरकार

इथे थोर इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्याबद्दल जाणून बुजून खोटी माहिती दिलेली पाहून वाईट वाटले. खरे म्हणजे सर सरकार आपले म्हणणे नेहमी पुराव्यानिशीच मांडतात. त्यामुळे ते थोर म्हणवले जातात हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी पुराव्यानिशी स्पष्ठ केले कि राज्याभिषेकावेळीस सनातनी भट लोकांनी शिवरायांना कशे छळले. तसेच त्यांनी खरा इतिहास मांडला त्यामुळे याच प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांची बदनामी सुरु केलेली आहे. परंतु या स्वार्थी, मूर्ख आणि अज्ञानी लोकांना प्रो. सरकार उंची काय कळणार ? या भट मंडळीना तर केवळ आपल्या वैदिक धर्माची पडलेली असते. त्यामधूनच काही विकृत इतिहासकार जन्माला घातले गेले आहेत. असो.

आता भारत वर्षातले सर्व लोक सुशिक्षित आणि साक्षर झाले आहेत म्हणून त्यांना सरकार यांचे योगदान माहित आहे. इतिहासाच्या विकृती करणारे केवळ एकाच कळपातील आहेत आणि ते कोण आहेत हे सांगण्याची इथे गरज नाही. प्रो सरकार यांना खुद्द सेतू माधवपगडी, डॉ बाळकृष्ण हे गुरु मनात आहेत याचा विसर पडला आहे काय???

प्रो सरकार हेच खरे निःशंक शिवचरित्रकार आहेत !!

Comments

प्रक्षोभक धागे

जाती आणि धर्म यांच्या संदर्भाने असणारे प्रक्षोभक धागे उपक्रमावर असावेत काय? हे स्थळ माहितीपूर्ण लेखनासाठी आहे असा आमचा समज आहे. त्याचा वापर जर चुकीचा होत असेल तर ते योग्य नाही.

प्रबोधनकार ठाकरे यांचेही विचार महत्वाचेच आहेत

आदरणीय चाणक्य जी, तुमचे म्हणणे बरोबर आहे परंतु स्पष्ट आणि परखड मत मांडायला हवेच आहे. प्रत्येक लेखामागील आणि टिकेमागील आपण कारणी मीमांसा केलीच पाहिजे हेही लक्षात घ्या. शिव-शाहू , फुले, आंबेडकर, आगरकर, महर्षी कर्वे आणि हरी नरके यांच्या विचारधारा महत्वाच्या आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांचेही विचार महत्वाचेच आहेत. त्यांना डावलून नाही चालणार.

विषमता

शंकरराव,
विचार महत्वाचे आहेतच. पण असे प्रश्न सोडवायचे असतील तर मतभेद, विषमता बाजूला ठेवणे महत्वाचे आहे. आहे त्यात सुद्धा फुट पाडण्याने हे प्रश्न जास्त जटिल होत आहेत.

काहीही

सरकारांचे महत्व वादातीत आहे. पण म्हणून त्यांच्या तपशिलात चुका नाहीत असे आजिबात नाही. आणि कर्वे-आंबेडकर वगैरेंच्या लायनीत हरी नरके यांना बसवल्याचे पाहून सखेद आश्चर्य वाटले. चालू द्या.

ह्याचा संदर्भ काय?

<इथे थोर इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्याबद्दल जाणून बुजून खोटी माहिती दिलेली पाहून वाईट वाटले.>

'इथे' म्हणजे कोठे? संदर्भ कळला तर बरे वाटेल आणि कही साधकबाधक लिहिताहि येईल

<खरे म्हणजे सर सरकार आपले म्हणणे नेहमी पुराव्यानिशीच मांडतात.>

ह्यावर एक सूचना. इंग्रजी पद्धतीनुसार 'सर जदुनाथ सरकार' हे योग्य आहे अथवा 'सर जदुनाथ' हे योग्य आहे. मात्र 'सर सरकार' हे पूर्ण चुकीचे आहे. It is either 'Sir Winston' or 'Sir Winston Churchill' but never 'Sir Churchill'. हे मी Fowler's Oxford English Usage येथे बरेच पूर्वी वाचले होते. ह्या खेरीज पहा http://en.wikipedia.org/wiki/Sir.

अनावश्यक धागा

या भट मंडळीना तर केवळ आपल्या वैदिक धर्माची पडलेली असते. त्यामधूनच काही विकृत इतिहासकार जन्माला घातले गेले आहेत.

अनावश्यक धागा आणि वाक्ये. असे लेख नाही टाकले तर बरे होईल.

इतिहास

माफ करा प्रियाली ताई …परन्तु जे इतिहासात घडले त्याची पुनरावृत्ती घडू नये म्हणून त्याचे स्मरण ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते… मी काही ब्राह्मण द्वेषी नाहीये।…. माझे अनेक परम प्रिय मित्र हे ब्राह्मणच आहेत आणि काही ज्येष्ठ श्रेष्ठ ब्राहामन गुरुंना आम्ही व आमच्या घराचे पूजाही करतो । हे सांगण्याचे तात्पर्य हेच कि काही सनातन ब्राहाम्न लोकांनीच त्यांनि केलेल्या विकृतीमुळे चांगल्या ब्राह्मणाचे नाव खराब केले आहे. हे टाळण्यासाठीच मी हा मुद्दा इथे मांडला आहे…

शंकरराव

तुम्ही मी ब्राम्हण द्वेष्टा नाही म्हणता आणि प्रत्येक धाग्यात द्वेश ओकताय. इतिहास आपण बदलू शकत नाही. घडवू शकतो, चांगला इतिहास घडवायचे असेल तर सर्वसमावेषक समाजकार्य करा. उगाच द्वेषाची बीजे पेरुन तुम्ही काय मिळवत आहात? या भारत देशात आजच्या घडीला जात पाहून मैत्री आणि गुरु केले जात नाही असे वाटते आहे.
माहितीपूर्ण लेखन करायचे असेल तर जरा अभ्यासपूर्ण लेखन करा. उगाच उतारे इथे मांडण्यात काय नवे आहे?

बाय द वे, सगळे राजकारणी नालायक आहेत असे तुम्हाला वाटते का?

स्वागत

उपक्रमवर आपले स्वागत. लेख म्हणून लिहिण्यास येथे किमान शब्दमर्यादा नसली तरी इथे लिहित असलेल्या लेखांपेक्षा मोठे लेख अपेक्षित आहेत (वाचक म्हणून.).

जदूनाथांचा शिवाजी या लेखावर आपली ही प्रतिक्रिया आली होती. त्याचा स्वतंत्र धागा करण्यात आलेला दिसतो.

पहिल्यांदा हा एक जुना लेख तुम्ही डोळ्याखालून घातला आणि त्यावर प्रतिक्रिया दिलीत याबद्दल आभार.

आपल्या लेखाची सुरुवात इथे थोर इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्याबद्दल जाणून बुजून खोटी माहिती दिलेली पाहून वाईट वाटले अशी झाली आहे. यातील 'इथे' शब्दाचा अर्थ मी त्या लेखासंबंधी घेतो. माझ्या लेखात आणि त्यावर आलेल्या प्रतिसादात नेमकी कुठली माहिती आपणास खटकली हे दिले असते तर बरे झाले असते. एकतर त्यावर कुणास प्रतिवाद करता आला असता किंवा झाली चूक सुधारता आली असती.

जदूनाथांचे कुठलेही पुस्तक हा लेख लिहिण्यापूर्वी मी वाचले नव्हते. त्यांच्या या पुस्तकाबद्दल सेतुमाधव्रराव पगडी यांनी लिहिलेले (बहुदा श्र्रीमान योगीच्या प्रस्तावनेत) वाचले होते. पण त्याशिवाय त्याबद्दल एकंदरित टीकात्मक उल्लेख जास्त वेळा यायचे. पुस्तक वाचल्यावर त्यातील भावणारा भाग मला इतरांना सांगावासा वाटला.

महाराष्ट्राबाहेरच्या इतिहासकाराने हे चरित्र लिहिले असल्याने या चरित्रात काही मोकळेपणा आला आहे. या मोकळेपणातून आलेले काही कयास आजही सर्व जातींच्या मराठी इतिहासकारांना (जातीचा उल्लेख आपण केल्याने मी असे म्हणतो.) बहुदा पचनी पडणारा नसावा. जदुनाथांचे शिवाजी निरक्षर असण्याचे विवेचन, आग्र्यातील मुत्सद्देगिरीबद्दलचे लिखाण, सूरत मधील लुटीची हकिकत इत्यादी मुद्दे खटकणारे असू शकतात.

आपल्यामते जदूनाथ हे थोर इतिहासकार होते. असा अन्वयार्थ आपल्या लेखावरून मी लावला. आपणास त्यांचे म्हणणे एकंदरित पटते असा त्याचा अर्थ धरतो. शिवराज्याभिषेकाबद्दल त्यांनी जे लिहिले आहे त्यात फारशी 'तत्कालीन भट' मंडळींची निंदा आढळली नाही. (आपणास काही नेमके मांडायचे असल्यास त्यावर लिहावे.). या राज्याभिषेकानंतर दुसर्‍या गटाने अजून एक राज्याभिषेक करविला असा उल्लेख वाचल्याचे आठवते. यासर्वांवर जदुनाथांच्या या पुस्तकाच्या पुराव्यानुसार आपल्याकडून लेखन यावे अशी मी अपेक्षा करतो.

प्रमोद

पुरावा

प्रमोद सहस्रबुद्धे ... तुम्ही सेतूमाधव पगडी यांचे "श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची प्रभावळ " हे पुस्तक वाचा मग तुम्हाला कळेल ... तसेच Shivaji : हिस Life and Times " हे पुस्तकही वाचा मगच तुम्हाला शिवरायांविषयी त्यांनी खरेच काय लिहिले आणि काय नाही हे कळेल. माझ्याकडे अजूनही ते पुस्तक आहे व मी ते पुस्तक अनेक वेळा वाचले आहे म्हणूनच इथे मत मांडले आहे हे लक्षात घ्या. उगाच त्यांचे दोष काढून फायदा नाही. खुद्द सेतू माधव पगडी यांना त्यांची सनातनी मंडळींवर केलेली टीका पचली नाही. आणि हे नमूद केलेल्या " ..प्रभावळ " या पुस्तकात लिहिले गेले आहे.

शिवाजी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सेतु माधवरावांचे पुस्तक मी वाचलेले नाही. मिळाल्यास जरूर वाचीन. पण माझा मूळ लेख जदुनाथ सरकारांच्या तुम्ही उल्लेखिलेल्या पुस्तकावरचाच होता. तेव्हा ते पुस्तक मी वाचले आहे. (संग्रही नाही.) सेतूमाधवरावांचे पुस्तक तुमच्या संग्रही असल्यास त्यातील असे काही उल्लेख देऊ शकाल का? की ज्या उल्लेखात जदूनाथांच्या पुस्तकावरची रास्त नसलेली टीका आहे

मी तुम्हाला दोन प्रश्न विचारले होते त्यातील पहिला प्रश्नाचा निचरा सहज होईल असे वाटते. पहिल्या प्रश्नात 'इथे' असा उपक्रम संकेतस्थळाचा उल्लेख आहे. तो बरोबर आहे का?

दुसर्‍या प्रश्नाबद्दलही आपल्याकडून अधिक अपेक्षा होती. जदूनाथांनी शिवाजीवर जी टीका केली आहे ती आपणास मान्य आहे का? असा काहीसा दुसरा प्रश्न आहे. वानगी दाखल निरक्षरता आणि आग्र्यातील मुत्सद्देगिरीचा अभाव असे काही उल्लेख केले आहेत. याबद्दल आपले मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.

प्रमोद

 
^ वर