स्त्री जन्मा...ही तुझी कहाणी....!
स्त्री जन्मा...ही तुझी कहाणी....!
हिमाचल प्रदेश मधील "कुल्लू" या शहराला देवता ची घाटी म्हटले जाते, हि घाटी आपल्या चित्र विचित्र अंधश्रद्धा आणि देव परंपरा यासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या बोली भाषेला "गणाशी" म्हटले जाते. त्या घाटीमध्येच "मलाणा" हे गाव असून, या गावात अशी मान्यता आहे, या गावावर फक्त देवाचे शासन चालते, या गावाच्या भूमीवर "जमलु" नामक देवताचा अधिकार असून गावातील लोक त्याची प्रजा आहेत.
"जमलु" नामक देवताच्या परवानगी शिवाय या गावात कोणी येवू शकत नाही आणि बाहेर देखील जाऊ शकत नाही, देवाच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द हा अखेरचा मानला जातो...!
देवाच्या आणि त्याच्या प्रजेच्या मध्ये एक दुवा आहे, तो म्हणजे "गुर" (ब्राह्मण पुजारी). हा गुर भक्ताचे गाऱ्हाणे देवाला सांगतो आणि ती "जमलु" नामक देवता या "गुर" (पुजारी) व्दारे भक्ताला उपाय सांगते...!
मलाना गावामध्ये स्त्रियांची परिस्थिती अतिशय कष्ट दायक आणि गंभीर आहे, जिथे संपूर्ण भारतात जर कोणाला मुल बाळ होणार असेल तर सगळीकडे कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. मुल जन्मल्यावर मुल आणि आईची विशेष काळजी घेतली जाते...त्यांना ऊन, वारा, पाऊस या पासून रक्षण केले जाते...त्यांना आवश्यक दवा पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यांची मनोभावे सेवा केली जाते... सकस आहार दिला जातो, खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली जाते....इथे मात्र....
कुल्लू घाटी मधील "मलाणा" या गावामध्ये एखादी महिला प्रसूत झाली कि, देवाच्या आदेशाने त्या महिलेला तिच्या नवजात शिशुसोबत घराबाहेर काढले जाते, जन्म दिल्या पासून १५ दिवस गावाच्या बाहेर एखाद्या तात्पुरत्या तंबू मध्ये त्या दोघांना रहावे लागते. हि परंपरा आज देखील या गावातील लोक मानतात...या प्रथे विरुद्ध कोणी बोलत नाही, कारण त्याला या तथाकथित "देवता" चा कोप "गुर " व्दारे सहन करावा लागेल.
गावामध्ये वीज, दवाखाना, शाळा देखील आहे परंतु स्त्रियांसोबत होणारा हा अमानुष खेळ यांच्या परंपरेचा एक भाग आहे. तत्पूर्वी प्रसूत झालेल्या महिलेला स्वतचे रक्ताळलेले कपडे स्वतच धुवावे लागतात, १५ दिवस नवजात शिशुचे देखील कपडे त्याच्या आईलाच धुवावे लागतात, १५ दिवस गावाच्या बाहेर राहिल्यानंतर १६ व्या दिवशी घराला रंगकाम वगैरे करून देवताच्या आदेशा नुसार तिला व तिच्या नवजात शिशूला घरात घेतले जाते. कित्येकदा १५ दिवस घराच्या बाहेर राहिल्यामुळे औषधपाणी व व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे प्रसूता किंवा त्या नवजात शिशूचा अंत होतो. आज हि गावातील लोक या रूढीचे पालन करने हे "जमलु" देवाचा आदेश आणि आपला धर्म समजतात.
मालानाच्या स्त्रियांचे एवढेच दुखः नाही तर अशी अनेख रूढीवादी परंपरा त्यांना रोजच्या जनजीवनात छळत आहेत, नवऱ्याने बायकोला सोडून दिले तर ३०००/- रुपये देवाला अर्पण करून त्याचे कृत्य जायज समजले जाते, विधवा झाल्यास कोणताही दाग दागिना स्त्री घालू शकत नाही. अश्या कित्येक गोष्टीव्दारे "स्त्री" वर्गाची विटंबना केली जाते.
हे देवाचे शासन आहे, देव हे सांगतो, देव ते सांगतो असे म्हणून लोकांना वेड्यात काढणाऱ्या पुजारयाना अद्दल घडविणे गरजेचे आहे, अन्यथा हे "गुर " नामक ब्राह्मण पुजारी "जमलु" देवाला खुश करण्यासाठी स्त्रियांचे अश्या प्रकारे बळी देतच राहतील. देवाच्या नावाने बाळगली जाणारी अश्या प्रकारची अंधश्रद्धा लवकरात लवकर व्हायला हवी.
आज हि या पुरातन, रूढीवादी, धर्मांध, पुरुषप्रधान संस्कृती मध्ये एक तर स्त्रीला "देवीचा" दर्जा दिला जातो, नाहीतर "वेश्ये" चा तरी.....! (स्त्रीला महान तरी बनविले जाते नाहीतर हीन वागणूक दिली जाते, समान वागणूक दिली जात नाही )
आज भारत एक जागतिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहे, परंतु आज हि खेडो पाडी, ग्रामीण भागात, हिमालयात लोक पोथी, पुराण, रूढी, अंधश्रद्धा, उपास तपास यामध्येच अडकलेले आहेत, आणि याचे मुख्यत शिकार प्रामुख्याने "स्त्री" वर्ग होताना दिसतो...याला मुख्यत रूढीवादी, अवाजवी, पुरुषप्रधान संस्कृती कारणीभूत ठरतेय, हीच पुरुषप्रधान संस्कृती सध्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बलात्कारात दिसून येत आहे, "स्त्री" ला जोपर्यंत हीन दर्जाने पाहणे, वागवणे सोडून दिले जाणार तो पर्यंत स्त्रियांवर अशे अत्याचार होताच राहणार....त्यामुळे आपणच आपल्या वागण्यात रोजच्या जीवनात, आई, बहिण, पत्नी, सहकारी यांच्या सोबत सन्मानाने वागले पाहिजे, घरातूनच स्त्रीचा सन्मान करायला शिकाल तर बाहेरच्या स्त्रीला देखील सन्मानानेच पाहाल, तेव्हा कुठे अश्या घटनांना आळा बसेल....!
लेखक - अँड. राज जाधव...!!!
Comments
स्त्री शक्तीचा सन्मान करणे हाच प्रमुख मार्ग आहे.....!
स्त्री शक्तीचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे. स्त्री ही माता, बहीण, पत्नी अशा विविध रुपात तुमच्या-आमच्या घरात वावरते. तिच्या वावरण्यानेच घरात सुख, समृध्दी संपन्नता येते. याउलट जिथे तिचा अपमान होतो, तिथे दु:ख व नैराश्य निर्माण होते. जीवनात आनंद निर्माण करायचा असेल तर, स्त्री शक्तीचा सन्मान करणे हाच प्रमुख मार्ग आहे.....!
हम्म!
हम्म!
ही आणखी एक बातमी.
धन्यवाद......!
धन्यवाद......!
स्त्रीया अजून स्वतंत्र नाहितच, यात नवे काय सांगितले?
सज्ञान बायकांना "रात्री बाहेर पडायचे नाही" असे सांगणार्या पुरुषांच्या देशांत (यात केवळ भारतच नाही) स्त्रिया स्वतंत्र नाहीत हे स्पष्टच आहे.
वगैरे मते स्त्रियांवर लादली गेली आहेत ती वेगळीच. नोकरी करून बॉसरूपात वावरणार्या स्त्रियांमुळे घरात सुख येत नाही?
बाकी,
हे नक्की कोण म्हणतं? कशावरून? बाकी महासत्ता म्हंजे काय?
मलाणा
विकीत हे सापडले. लेखाची माहिती त्यास जुळत नसल्यासारखी वाटली. मला हा प्रकार शनिशिंगणापूर गावासारखा सामुहिक स्टंट वाटला. (गावात लोक यावेत म्हणून?)
प्रमोद
मलाणा
मी स्वतः मलाणा ह्या गावी Youth Hostels Association of India ने चालविलेल्या ट्रेकबरोबर १९८२ साली गेलो होतो. त्या वेळीहि आम्हाला त्या गावच्या चालीरीती आणि तेथे कसे जपून वावरायला हवे हे सांगण्यात आले होते. पार्वती नदीच्या प्रवाहापासून सुमारे ५००० फूट वर असलेल्या ह्या गावी कसलीच दळणवळणाची साधने नव्हती आणि गावातील लोक बाह्य जगापासून भीतीपोटी तुटून राहिल्यासारखे होते. ते लोक अलेक्झँडरच्या सैन्यातून फुटून बाहेर पडलेल्या सैनिकांची प्रजा आहे असल्याहि काही समजुती होत्या.
जगाशी संपर्क नसल्यामुळे तेथील लोक अन्य जगाशी फटकून वागत होते हे खरे आहे. तेथील बायका आम्ही पायवाटेवर समोर आलो की तोंड फिरवून उभ्या राहात, तेथील कोठल्याहि दगडाला आम्ही स्पर्श केला तर एक बोकड बळी द्यावा लागेल आणि त्याचे पैसे आम्हाला भरावे लागतील अशाहि काही समजुती ऐकण्यात आल्या होत्या पण प्रत्यक्षात आमचा तेथील दोनतीन तासांचा मुक्काम सरळ पार पडला . तेथील दुकानातून आम्ही बिस्किटे, गोळ्या वगैरे विकतहि घेतल्या.
गावात अंधश्रद्धा तेव्हाहि होत्या आणि आजहि असणार ह्याची खात्री आहे पण ती स्थिति भारतातील अन्य काही हजारो खेड्यांहून काही अलग आहे काय, ज्यामुळे लेखकास हा लेख आताच का लिहावासा वाटला हे कळत नाही. त्यांना हे जालावर कोठेतरी मिळाले आणि सनसनाटी वृत्त सापडले असे वाटून लिहिल्यासारखे वाटते.
तेव्हा लेखकास विनंति अशी की त्यांना हे सर्व कोठे सापडले आणि काही अश्रुतपूर्व आहे असे वाटून त्यांनी ते येथे का लिहिले ते सांगावे. आपण पुरोगामी विचारांबरोबर आणि अंधश्रद्धेविरुद्ध आहो त हे दाखविण्याच्या इच्छेपलीकडे ह्या लेखामागे काही प्रेरणा असल्यास ते जाणून घ्यायला आवडेल.
जुमला देव वगैरे आम्ही तेव्हाहि ऐकले होते. पण मलाणापुरते मर्यादित नव्हते. हिमाचल प्रदेशातील त्या भागातील सर्व खेड्यांमध्ये animalistic म्हणता येतील अशा श्रद्धांचा पगडा होता आणि अजूनहि असेल पण त्यात नवे काय आहे ते समजत नाही.
गावामध्ये आता नर्स, दवाखाना इत्यादि आहेत हे प्रगतीच आहे. १९८२ पासून ही सुधारणाच म्हणता येईल.
प्रतिसाद संपादित
लेखकास हा लेख आताच का लिहावासा वाटला हे कळत नाही. त्यांना हे जालावर कोठेतरी मिळाले आणि सनसनाटी वृत्त सापडले असे वाटून लिहिल्यासारखे वाटते..!
कोल्हटकर महाशय...तुम्ही जाऊन आलात.....पण इतरांना नाही सांगितलेत..... दुसरे कोणी सांगतेय तर का काड्या करताय ?
विपर्यस्त माहिती
लेखात दिलेली माहिती विपर्यस्त आहे असे वरील चर्चेनुसार स्पष्ट होते. तेव्हा लेखकाने आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी आपल्या माहितीचे दुवे दिले असते तर योग्य झाले असते.
हे दुवे न मिळाल्यास लेखातील सर्व माहिती शंकास्पद मानाण्यावाचून गत्यंतर नाही.
प्रमोद
विकि
मलाणाच्या विकित हे सापडले –
This is also seen as a technique used by the people of Malana to protect their vested interest in the Hashish manufacture / Marijuana fields in the mountains above their village, since Malana Cream and other popular, yet costly varieties of the drug come from this part of India alone.
असले अनधिकृत धंदे लपवायलाच आम्ही untouchable वगैरे नाटके असतील असे विकिवरील माहितीवरून वाटते.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
मेरा भारत महान
आपल्या देश एक अजब रसायन आहे. एकीकडे म्हणयाचे आम्ही महासत्ता बनणार आणि दुसरीकडे संस्कृतीच्या नावाखाली खुळचट गोष्टींना चिटकून राहणार.
महासत्ता
भारतात किती भारतीयांना जागतिक महासत्ता म्हणजे काय याचा अर्थ कळतो?