आर्य टिळा का लावतात...??

टिळा लावल्याने समाजामध्ये मान-सन्मान ने पाहतात. आर्य धर्मात प्रत्येक शुभ कार्यात टिळा लावणे हि प्रथा आहे. टिळा अनेक वस्तू आणि पदार्थाचे असतो.

उदा. हळदी, कुंकू, केशर, भस्म आणि चंदन हे प्रमुख आहे. पण तुम्हाला माहित आहे टिळा लावण्या मागे काय भावना असते...??
पुराणामध्ये असे लिहिलेले आहे कि, संगमाच्या किनार्यावर "गंगा स्नान" केल्यानंतर साधू\पंडित द्वारे टिळा लावल्यास मोक्ष प्राप्ती होते. कपाळावर टिळा लावण्यामागे आध्यात्मिक महत्व आहे. आपल्या शरीरात सात (७) सुश्मउर्जा केंद्र आहे जे अपार शक्ती चे भांडार आहे.
यांना "चक्र" असे म्हणतात.कपाळाच्या मध्ये जिथे आपण टिळा लावतो, तिथे आज्ञाचक्र असतो. हा चक्र आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वपूर्ण स्थान आहे. इथे आपल्या शरीराच्या प्रमुख तीन नाड्या १) इडा २)पिंगला आणि ३)सुष्मना येउन मिळतात म्हणून याला "त्रिवेणी" किवा "संगम" पण म्हणतात. हे गुरु स्थान आहे. इथूनच पूर्ण शरीर संचालन होते. हे आपल्या चेतनाचे मुख्य स्थान पण आहे. याला मनाचे घर पण म्हणतात. यामुळे हे स्थान पूर्ण शरीरात सगळ्यात जास्त पूजनीय आहे. योग मध्ये ध्यान करता वेळी याच ठिकाणी मन एकाग्र केले जाते. टिळा लावल्याने स्वभावात चांगले बदल घडून येतात व पाहणार्याचे सात्विक प्रभाव आपल्यावर पडतो. टिळा काही खास प्रयोजना साठी पण लावतात. जसे मोक्षप्राप्ती करायची असेल तर टिळा अंगठ्याने..शत्रू चा नाश करायचा असेल तर तर्जनीने, धनप्राप्ती हेतू मध्यमानी आणि शांती प्राप्ती साठी अनामिकानि टिळा लावला जातो.

साधारणत : टिळा अनामिका द्वारे लावला जातो. आणि त्याच्यात पण चंदनाचे लावला जातो.
तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते व थंडक व सात्विकता प्रदान करण्याचा निमित्त लपलेले असते. म्हणून टिळा जरूर लावावा. आर्य प्रथेप्रमाणे टिळा न लावणे अशुभ आहे. टिळा आर्य संस्कृती ची ओळख आहे. टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण पण आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

सोय

उपक्रमावर "लाईक"ची सोय करा बुवा ;-)

"लाईक"ची सोय..

केली, "लाईक"ची सोय उपक्रमावर केली. चर्चेच्या शेवटी आहे.

असे काही नसते.

असे काही नसते. जेव्हा मनुष्य टोळ्या बनवून राहत असे आणि आपसात लढाया करत असे त्यावेळी शत्रू टोळी मधील लोकांचे शीर कापले जात असे आणि रक्ताचे टिळे लावले जात. त्याचप्रमाणे यज्ञामधेही बळी देणे हे रीत होती.
नंतर शत्रूचे शीर आणि रक्त ह्याची जागा नारळ आणि कुंकू ह्यांनी घेतली.
नक्की आठवत नाही पण 'समाजशास्त्र' (बीए - १,२,३) एकदा चाळावे ह्याचे सर्विस्तर स्पष्टीकरण मिळेल. त्याचप्रमाणे साने गुरुजींचे पण एक पुस्तक आहे ज्यात हे सर्व विशद केले आहे.

आर्य

आर्य म्हणजे कोण हे लेखकाने विशद केलेले नाही. वर्णन हिंदू समाजासंबंधी वाटते आहे. हिंदू समाजासच आर्य म्हणून संबोधले असणे शक्य आहे पण मग सरळ हिंदूंमधील टिळा लावण्याची प्रथा असे न म्हणता आर्य कशाला मधे आणले आहेत ते कळत नाही.

टिळा लावण्याच्या प्रथेला वैज्ञानिक कारण आहे हे पटले नाही. पाळत असलेल्या प्रथेला उगीचच वैज्ञानिक कारण परंपरा देणे हे योग्य वाटत नाही. त्यापेक्षा आपण ही प्रथा का पाळतो याचे थोडे विवेचन केले असते तर जास्त आवडले असते.

हिंदू समाज कोठून आणला?

हिंदू धर्म हा मुळातच सामाजिक विषमतेवर आधारित आहे. उच्च नीच, भेदभाव, कर्मकांड आणि अंधश्रधा हि हिंदू धर्माचे मुख्य आधारस्तंभ आहेत. ३३ कोटी देव तर आहेच वरून त्यांच्याकडे अद्भुत शक्ती आहे ती वेगळीच तरी सुधा देश १५० वर्ष इंग्रजाच्या गुलामगिरित आणि ७०० वर्ष मुघलांच्या गुलामगिरीत होताच आणि आजही भारत देश बरयाच संकटाला तोंड देत आहे. असो, हिंदू धरमचे तत्वद्यान कितीही वेडेवाकडे असले तरी आपण या धर्माची स्तुतीच केली पाहिजे कारण ८५ कोटी भोळ्या भाबड्या जनतेला मूर्ख बनविण्यात हा धर्म यशस्वी झाला आहे. जो कोणत्याच धर्मात नाही तो हिंदू असा मोघम नियम काढून त्यात बळजबरीने सर्व लोकांना कोंबले आहे. टिळा हा फक्त आर्यच लावतात हिंदू नाही.

टिळा व आर्य

माझी संपादक मंडळाला विनंती आहे की हा प्रतिसाद काढून टाकण्यात यावा. लेखाच्या विषयाशी हा प्रतिसाद संबंधित तर नाहीच आणि यात उगीचच हिंदूंवर चिखलफेक करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला गेला आहे.

विनंती मान्य होईलच

समतादर्शन यांचा घडा भरतो आहे. अंमळ करमणूक म्हणून हा लेख येथे असावा. संपादन मंडळ लवकरच समतादर्शन यांच्यावर कार्यवाही करेल याची खात्री आहे.

घडा आणी खात्री.

प्रियालीबाई, घडा पाण्याचा असतो त्यात पुरेसे पाणी टाकले की तो भरतो, भरल्याची खात्री आपोआप होते. खरे तर हिंदू नावाचा धर्मच मुळचा नव्हता काही लोकांनी तो निर्माण केला आहे. बाकी कार्यवाही संपादन मंडळ करीलच.

उगीचच हिंदूंवर चिखलफेक...

चंद्रशेखरजी, उगीचच हिंदूंवर चिखलफेक कोणी करीत नाही. मी काय लिहीले आहे तर आपल्याच प्रश्नाचे उत्तर, तेही विषय ओघात निघाला म्हणून.

हिंदू समाजासच आर्य म्हणून संबोधले असणे शक्य नाही, कारण हिंदू विषयी पुराणात कोठेच उल्लेख/संदर्भ नाही मात्र आर्यांची समाज रचना, जाती व धर्मा विषयी सविस्तर माहीती सर्वांनाच कमी जास्त प्रमाणात आहे. बाकी राहीला प्रश्न तो प्रतिसादाचा माझे काही खोटे असेल तर ते सुधारण्याचा आनंदच वाटेल.

पंगत.

पंगतीत जेवायला बसला की आधी टिळा लावीत. म्हणजे मग दोन वेळा जेवणार्‍यांची पंचाईत होई. टिळा आहे, म्हणजे ऑलरेडी जेवलेला आहे हे ओळखायची ती खूण होय.

आणखी एक बंडलबाजी...

तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते

कुठले तिळे? आयडेंटिकल की फ्रॅटर्नल?

ए़क दुरुस्ती.

तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते.

ऐवजी

टिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते. असे वाचावे.

समतादर्शन,

एक अत्यंत हलकट प्रश्न विचारू का?

टिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते.

नक्की का?
आकर्षित करावी लागते? आकर्षित करावीशी वाटते??
पहा बुवा! असं असतं का आर्यांत??
त्या तांदूळ अन टिळेवाल्यांच्या... जाऊ द्या. तुमची विकृती तुमच्यापाशीच बरी.

वैज्ञानिक सत्य (?)

आपल्या शरीरात सात (७) सुश्मउर्जा केंद्र आहे जे अपार शक्ती चे भांडार आहे.
यांना "चक्र" असे म्हणतात.......... टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण पण आहे.

अशा गोष्टीत जर विज्ञान असल्यास सर्व (प्रामाणिक) वैज्ञानिकांनी सामूहिक आत्महत्या करणे इष्ट ठरेल.

कैच्याकै

तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते व थंडक व सात्विकता प्रदान करण्याचा निमित्त लपलेले असते. म्हणून टिळा जरूर लावावा. आर्य प्रथेप्रमाणे टिळा न लावणे अशुभ आहे. टिळा आर्य संस्कृती ची ओळख आहे. टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण पण आहे.

आम्रिकेत सालं हे माहितीच नाही कुणाला!! बिचार्‍यांना इतके साधे सोपे कळाले असते तर फायनान्शियल क्रायसिस टळली असती की हो!! ते तैलसम्राट म्लेंच्छ तर कसलाच टिळा न लावूनसुद्धा आई लक्ष्मी कशीकाय प्रसन्न ब्वॉ त्यांच्यावर?

बाकी टिळेमाळा लावून कर्मकांडे करणार्‍यांवर आमच्या रामजोशीबावा सोलापूरकरांनी मस्त लिहिलेयः

टिळा टोपिवर शिळा पडो या बिळांत करिसी जपा ।

तथापि न होय हरीची कृपा ।

फ्रॉड साले! हाड!!

हिटलर टिळा लावत होता काय?

हिटलर स्वतःला (आणि समस्त जर्मनांना) शुद्ध आर्य समजत असे.

हिटलर (आणि समस्त जर्मन) टिळा लावत होते / आहेत काय?

सनातन प्रभात?

उदा. हळदी, कुंकू, केशर, भस्म आणि चंदन हे प्रमुख आहे. पण तुम्हाला माहित आहे टिळा लावण्या मागे काय भावना असते...??
पुराणामध्ये असे लिहिलेले आहे कि, संगमाच्या किनार्यावर "गंगा स्नान" केल्यानंतर साधू\पंडित द्वारे टिळा लावल्यास मोक्ष प्राप्ती होते. कपाळावर टिळा लावण्यामागे आध्यात्मिक महत्व आहे. आपल्या शरीरात सात (७) सुश्मउर्जा केंद्र आहे जे अपार शक्ती चे भांडार आहे.
यांना "चक्र" असे म्हणतात.कपाळाच्या मध्ये जिथे आपण टिळा लावतो, तिथे आज्ञाचक्र असतो. हा चक्र आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वपूर्ण स्थान आहे. इथे आपल्या शरीराच्या प्रमुख तीन नाड्या १) इडा २)पिंगला आणि ३)सुष्मना येउन मिळतात म्हणून याला "त्रिवेणी" किवा "संगम" पण म्हणतात. हे गुरु स्थान आहे. इथूनच पूर्ण शरीर संचालन होते. हे आपल्या चेतनाचे मुख्य स्थान पण आहे. याला मनाचे घर पण म्हणतात. यामुळे हे स्थान पूर्ण शरीरात सगळ्यात जास्त पूजनीय आहे. योग मध्ये ध्यान करता वेळी याच ठिकाणी मन एकाग्र केले जाते. टिळा लावल्याने स्वभावात चांगले बदल घडून येतात व पाहणार्याचे सात्विक प्रभाव आपल्यावर पडतो. टिळा काही खास प्रयोजना साठी पण लावतात. जसे मोक्षप्राप्ती करायची असेल तर टिळा अंगठ्याने..शत्रू चा नाश करायचा असेल तर तर्जनीने, धनप्राप्ती हेतू मध्यमानी आणि शांती प्राप्ती साठी अनामिकानि टिळा लावला जातो.

'उपक्रमा'स 'सनातन प्रभाता'ने विकत घेतले काय?
उपक्रमावर वाचकांचा कौल घेऊन लेख अप्रकाशित करण्याची सोय करा बुवा!

छे छे...

उपक्रमाने असे अजिबात करु नये.
उद्या सनातनवाली मंडळी अधिक झाली इथे आणि मतदानाने त्यांनी रिटे,चंद्रशेखर्,यनावाला,नानावटी,प्रियाली ह्यांचे व असे सर्व "काफिरलिखित" लेख उडवायचे म्हटले तर आख्खे उपक्रम रिकामे होइल.
तुमचे आमचे संख्याबळ मुळातच प्रचंड कमी आहे. तेव्हा इथली अरिस्टोक्रसी परवडली, पण सनातनला वाढायची संधी देणारी डेमोक्रसी नको ही उपक्रमास पोटतिडकिने विनंती करतो.
कावळ्यांनी मतदान करुन हंस कोण हे ठरवणे नकोच.

रिकामे उपक्रम

उद्या सनातनवाली मंडळी अधिक झाली इथे आणि मतदानाने त्यांनी रिटे,चंद्रशेखर्,यनावाला,नानावटी,प्रियाली ह्यांचे व असे सर्व "काफिरलिखित" लेख उडवायचे म्हटले तर आख्खे उपक्रम रिकामे होइल.

उपक्रम तसे रिकामेच असते पण इतक्या वर्षांत अनेक सनातनी आले आणि गेले त्यांनी घोळक्यात येऊन मतदान केले तरी उपक्रमचे मालक आणि चालक त्यांना वारा घालतील असे वाटत नाही.

छान करमणूक

छान करमणूक झाली.

का ?

आजही भारतामध्ये घरामध्ये झाडू विकत आणला तर त्याला टिळा लावला जातो......का ?

आणि जगात...कपाळ..

वकील साहेब, न्याय बरोबर नाही.

समजा, एका बाईने तिला मुलबाळ नसल्याने तिन मुले असलेल्या एका मुलाला (पुरुषाला) दत्तक घेतले व स्थावर मिळकत त्या दोघांनी वाटून घेतली. पुढे त्या बाईने तिच्या हिश्याची सर्व स्थावर मिळकत तीन पैकी मोठ्या मुलाच्या नावे करुन मरुन गेली . आत्ता जर वाटप करायचे म्हटले तर कायद्याने अडचण येणार आहे.

उलट तपासणी: जगात इतर ठिकाणी नुकसान झाल्यावर किंवा मनासारखे झाले नाही तर हाताच्या तळव्याने कपाळावर हवेचा टिळा मारीत नाहीत काय?

टिळा टिळा चक्र उघड....

'विप्रो' गँगने हे असले भूत लोकांच्या मनात भरवले.

टिळा लावताना विप्राकडून लावावा.. दक्षिणा द्यावी, तर चक्र गरगर फिरते.... असेही असेल.

'विप्रो' गँग... समजले नाही.

आंबा, 'विप्रो' गँग विषयी समजले नाही. जरा अधिक माहीती दिली असती तर बरे झाले असते.

एका चित्रपटात 'गुज्जर' गँग विषयी माहीती आहे. चित्रपटाच्या शेवटी सदरील 'गुज्जर' गँगचा नायनाट झाल्यावर नात्याचा प्रश्न नायिकेकडून निर्माण होतो तेव्हा नायक आपल्या रक्ताचा टिळा काही न बोलता नायिकेला लावून आपल्या सर्वांचे समाधान करतो.

टिळा कशासाठी लावला जातो, त्यासाठी काय वापरतात, शरीराच्या कोणत्या अंगाने कोणत्या अंगाला, वगैरे लावावा असे अगणित प्रश्न काही लोकांना पडतात. उदा. पायाच्या आंगठ्याने जर कपाळाला टिळा लावला तर त्याचा अर्थ काय? तो लावला की लोक काहीतरी विपरीत अर्थ काढतील या भिती पोटी टिळा ही भानगडच नको म्हणून टिळा न लावणारा एक नवीन अतिरेकी वर्ग तयार झाला आहे. बाकी खुप काही सांगायचे आहे पण वेळ कमी आहे. सध्या जो कोणत्याच धर्मात नाही तो हिंदू असा मोघम नियम काढून त्यात बळजबरीने सर्व लोकांना कोंबले आहे एवढेच सांगू वाटते.

विप्र लोकांची गँग...... विप्रो, भ्रमवृंद, ब्रह्मपुत्र , शेंडीवाले , साडेतीन टक्के इ इ शब्द आम्ही एकाच अर्थाने वापरतो.

^ वर