चुकवू नयेत असे चित्रपट - ४ कॅसिनो ( १९९५ )

आधीचे धागे
चुकवू नयेत असे चित्रपट - पॅटन ( १९७० ) http://mr.upakram.org/node/3860
चुकवू नयेत असे चित्रपट - २ डॉ. झिवागो ( १९६५ ) - http://mr.upakram.org/node/3862
चुकवू नयेत असे चित्रपट - ३ कॅसाब्लॅंका ( १९४२ ) - http://mr.upakram.org/node/3865

---------
ह्या वेळेला माझा फारच आवडत्या पण oscar वगैरे मधे बाहुली न मिळाल्या मुळे भारतात तसा दुर्लक्षीत झालेला Casino ( कॅसिनो ) नावाच्या सिनेमा बद्दल.

हा १९९५ सालचा सिनेमा, Martin Scorsese नी दिग्दर्शीत केलेला. हा दिग्दर्शक पण भारतात फारसा प्रसिद्ध नाही ( का ते कळत नाही ), पण आता त्याला जवळ्-जवळ Best Director of our time वगैरे नी गॉरवले जात आहे. मार्टीन ला ७ वेळेला ऑस्कर नोमिनेशन मिळाली पण एकदाही ऑस्कर नाही. पण त्याला AFI lifetime achievement award मात्र दिले. golden globe वगैरे बरीच मिळाली. त्याचे जुने सिनेमा कदाचीत माहिती नसतील, पण गेल्या दशकातील सिनेमा कदाचित भारतात जास्त माहिती असतील जसे Aviator, Departed आणी Higho .

पुन्हा कॅसिनो कडे वळुयात. ह्यात मार्टीन चा मित्र Robert de Nero, Sharon Stone आणि Joe Pesci आहेत. डी निरो आणि Joe Pesci ने मार्टीन बरोबर बरेच सिनेमा केले आहेत.
----------

थोडक्यात कथा....

हा सिनेमा सत्य घटने वर आधारीत आहे.

कॅसिनो ही एक गेलेल्या काळाची गोष्ट आहे जी लास वेगास मधे घडते. सिनेमाची सुरुवात होते तो काळ म्हणजे वेगास जेन्व्हा Underworld Families नी चालवले जात होते तो. सिनेमा संपे पर्यंत काळ बदलतो आणि फॅमिलींना वेगास मधुन हाकलले जाते आणि कॅसिनो मोठ्या कंपन्या चालवायला घेतात.

सिनेमाची मुख्य पात्र आहेत Sam "Ace" Rothstein ( एस रोथस्टाईन ) - डी निरो , Nicky Santoro - जो पाशी, जिंजर - शेरॉन स्टोन.
सॅम हा "हात लावेल तिथे सोने" अश्या प्रकाराचा जुगारी आहे, म्हणुन त्याला एक फॅमिली वेगास ला टॅन्जीयर्स नावाचा एक मोठा कॅसिनो कम हॉटेल चालवायला पाठवते. त्याला मदत म्हणुन गरम डोक्याच्या निकी ला पाठवले जाते. निकी चे काम सॅम ला मदत लागली तर muscle power पुरवणे हे असते.
सॅम ला टॅन्जीयर्स मधे जिंजर नावाची एक हुकर भेटते. जी पैश्यासाठी सॅम शी लग्न करते पण तिचा जीव तिच्या चरसी प्रियकरात गुंतलेला असतो.
सॅम, जिंजर आणि निकी ह्यांचा समांतर रेषेवरुन प्रवास चालू होतो. तिघांच्या conficting interest मुळे त्यांच्या आयुष्यांचे काय होते ते दिड तासात दाखवले आहे. त्याला backdrop आहे तो फॅमिली आणि FBI मधल्या खेळाचा.

मला गोष्ट सांगायला आवडत नाही त्यात सिनेमाची तर अजिबात नाही, त्यामुळे इतके बास.,

कशासाठी बघावा --

प्रचंड Stylish ( मला मराठी शब्द सुचत नाहीये ) : सिनेमा आणि त्यातली पात्र कीती stylish होऊ शकतात ह्याचे उदाहरण आहे.
सिनेमाची गोष्ट उलगडते ती सॅम आणि निकी च्या निवेदनातुन जे सिनेमाभर चालू असते. त्यामुळे सिनेमात उगाचच कोण काय करतो असे सांगण्यासाठी संवाद नाहीयेत. छोट्या छोट्या प्रसंगातुन कथा पुढे जाते
पटकथा ( Script ) तर सुरेख आहे, आणि मार्टीन स्टाईल चे सुंदर कॅमेराचे काम, मोठे शॉट्स, वेगास आणि त्याच्या आजुबाजुच्या वाळवंटाचे शॉट्स
कथानकात नाट्यमयता असुन सुद्धा ते खरोखरीच जसे साधे सरळ घडले असतीत तसे दाखवले आहेत, त्यामुळे खोटी डायलॉग्बाजी नाही. फॅमीलीच्या लोकांचे इटालियन पद्धतीने हातवारे करत बोलणे फार छान आहे.
संगीताचा वापर
Casting : कलाकारांचे ( अगदी छोट्या सुद्धा ) इतके परफेक्ट आहे की तुम्हाला ती सिनेमातली पात्र वाटतच नाहीत.
मी १९९५ साली २१ वर्षांचा असताना राहुल ला बघितला होता, तो पर्यंत हिंदी आणि नेहमीचे गाजलेले english सिनेमा पण बरेच बघितले होते, पण हा बघितल्या वर मी एकदम फ्लॅट च झालो. सलग ३ दिवस हा सिनेमा बघितल्यावर बरे वाटले. सिनेमा असाही असु शकतो हे कॅसिनो नी मला सांगितले, त्यामुळे ह्या सिनेमाची माझ्या मनात वेगळीच जागा आहे. मार्टीन ची ओळख पण ह्याच सिनेमानी मला करुन दिली. त्याकाळी आंतरजाल वगैरे नसल्यामुळे जास्त माहिती काढणे शक्य नव्हते. नंतर मात्र संधी मिळाल्यावर त्याचे बरेसचे सिनेमा बघुन घेतली.

हा सिनेमा बघणार असाल तर शक्यतो मोठ्या टीवी वर बघा, पीसी वर नका बघु, ती मजा येणार नाही.

आवडला तर सांगा. मार्टीन च्या Goodfellas बद्दल पण लिहायचे आहे, पण नंतर.
--------

लेखनविषय: दुवे:

Comments

राहुल चित्रपटगृह कुठल्या गावाला आहे?

मी १९९५ साली २१ वर्षांचा असताना राहुल ला बघितला होता,....
राहुल चित्रपटगृह कुठल्या गावाला आहे?

पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामती जवळच्या पुणे नावाच्या गावात

पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामती जवळच्या पुणे नावाच्या गावात राहुल चित्रपटगृह आहे

 
^ वर