चुकवू नयेत असे चित्रपट - पॅटन ( १९७० )
नोंद - हा लेख मी आधी दुसर्या एका संकेतस्थळावर पण टाकला आहे.
जर आपल्याला सर्वात उत्तम बघायलाच मिळाले नाही तर जे थोडेसे Above Average आहे तेच फार चांगले वाटायला लागते. त्यामुळे सुमार चित्रपटांचा पण उदो उदो होताना दिसतो. म्हणुन असे वाटले कि, काही उत्तम चित्रपटान्ची ओळख करुन देणारा एक नविन धागा सुरु करावा. ह्या धाग्यातला हा पहिला प्रयत्न.
Internet वर सगळी माहिति उपलब्ध असल्यामुळे मी फक्त तोन्डओळख करुन द्यायच्या विचारात आहे.
Patton ( 1970 )
हा चित्रपट Patton ह्या अमेरिकन General वर आहे. हा चित्रपट काही Patton ची Biography नाही. हे पण एक विषेश आहे. ह्याच्यात Melodrama नाही, युद्धावर असुन सुद्धा उगाचच शीरा ताणुन ओरडा आरडी नाही. महत्वाचे म्हणजे, वस्तुस्थितीची तोडफोड नाही.
चित्रपटात १९४३ ते १९४५ एव्हडा कालखंड दाखवला आहे. George C Scott ह्या अभिनेत्यानी Patton ची भुमिका केली आहे. अभिनय म्हणजे काय त्याचा हा वस्तुपाठ आहे. ह्या भुमिके साठी त्याला ऑस्कर मिळाले.
Karl Malden नी General Omar Bradley ची भुमिका केली आहे. आठवत असेल तर हा अभिनेता A Street Car named Desire मधे होता. त्या चित्रपटा विषयी नंतर केंव्हातरी.
Patton ला ७ ऑस्कर मिळाली. George Scott नी ऑस्कर नाकरले.
ह्या चित्रपटा चे खासियत.
. अप्रतिम अभिनय.
. चांगली पटकथा. Francis Ford Coppola ची आहे. हा GodFather मुळे सर्वांना माहिती असलेला.
. सत्या च्या बराच जवळ, पण तरीही अजिबात कंटाळवाणा होत नाही.
. चांगले संगीत.
. Hollywood Movies मधे नेहमी च असतात ती Production Value.
हा चित्रपट Patton हा माणुस कसा होता ते उत्तम रित्या दाखवतो.
चित्रपटा ची सुरुवात सुद्धा बघण्या सारखी आहे. Patton नी त्याच्या Brigade ला उद्देशुन केलेले भाषण आहे. हे भाषण आपल्याला जरी खुप आक्रमक वाटले तरी Patton नी केलेले खरे भाषण जास्त आक्रमक होते म्हणे.
------
हा लेखन प्रपंच जर तुम्हाला आवडला असला तर पुढे अजुन लिहिन.
Comments
विस्तृत लिहा
उपक्रमवर स्वागत आहे.
चित्रपटाचे परीक्षण विस्तृत लिहा. तुम्हाला त्यात काय आवडले - पटकथा, दिग्दर्शन, चित्रण, अभिनय त्याविषयीही लिहा.
पॅटनबद्दल अधिक सांगावे
मलाही हेच म्हणायचे होते की हा पॅटन नावाच्या जनरलबद्दल सिनेमा आहे. पण विषय नक्की काय आहे चित्रपटाचा? दुसर्या महायुध्दावर बरेच चित्रपट आहेत. ( या महायुध्दांमुळे/अनुभवांमुळे तिकडचे कलाक्षेत्र अधिक समृध्द झाले म्हणतात )
उत्तम चित्रपटांची ओळख करून देणारा धागा आहे त्यामुळे मला आवडलेल्या एका चित्रपटाविषयी लिहितो - मध्यंतरी मुव्हीज नाऊ किंवा एच. बी. ओ. कोणत्यातरी एका चॅनलवर एक चित्रपट चालू होता. काही कारणांनी संपूर्ण चित्रपट पाहू शकलो नाही ( सलग सुध्दा पाहता आला नाही) व नावही लक्षात नाही. पण जो काही अल्पकाळ चित्रपट पाहिला तेवढा वेळ अक्षरशः गुंतून पडलो. अगदी नाईलाज म्हणूनच बाकी चित्रपट पाहू शकलो नाही चित्रपटाबद्दल थोडक्यात :-
कोणत्यातरी देशातील एक मुख्य चौक, चौकासमोर एक मोठी इमारत जिला चौकातच उघडणार्या खिडक्या व त्या चौकात होणार असलेले कुठल्यातरी महत्वाच्या व्यक्तीचे भाषण ( महत्वाची व्यक्ती बहुध्दा कोणीतरी मान्यवर नेता/ राष्ट्राध्यक्ष अशा स्वरूपाची ). त्या व्यक्तीला कडक सिक्युरिटी, सिक्युरिटीचा प्रमुख डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतोय. भाषण सुरू होताना समोरच्या इमारतीमधील एका खिडकीचा पडदा थोडासा हलतो, तोही त्या सिक्युरिटीच्या नजरेतून सुटत नाही. त्या इमारतीमधील मजला व खिडकी कोणती हे हलक्या आवाजात कोणालातरी सांगून चेक करण्याच्या सुचना. भाषण सुरू होण्याआधी गर्दीतील वेगवेगळ्या लोकांवर रेंगाळणारा कैमेरा. या गर्दीत एक स्त्री व लहान मुलगी, एक हौशी पर्यटक जो आपल्या हैंडीकॅमने सभा कव्हर करत असतो. अशी अन्य काही पात्रे.
भाषण सुरू असताना त्याच इमारतीमधून गोळी येते आणि नेता खल्लास. चौकात धावपळ, गोंधळ गडबड, पळापळी, सिक्युरिटीची धावपळ नेत्याकरता अअॅम्ब्युलन्स बोलवायची, मारेकर्याचा शोध घ्यायचा, त्या साठी सुचना ह्या सगळ्या गदारोळातच त्या चौओआत बॉम्बस्फोटही होतो. ...... हा एवढाच सीन पण पुन्हा पुन्हा दिसत राहतो. एका ठराविक वेळेपासून ते तो बॉम्बस्फोट होईपर्यंत फक्त तो दरवेळी वेगवेगळ्या अअॅन्गलने दिसत राहतो. एकदा सिक्युरिटीच्या नजरेतून ( जो सगळ्यात आधी दाखवलेलाच आहे), एक त्या हौशी पर्यटकाच्या अॅन्गलने ( आणि त्याच्या कॅममधून),आणि एखाद्या अॅन्गलनी........ प्रत्येकवेळी घटनाक्रम तोच पण अजून काहीतरी वेगळा अॅन्गल उघडून दाखवतो..... असे २-४ वेळा दाखवून झाल्यावर सिक्युरिटी इन्चार्ज बाहेरील ओ.बॉ व्हॅनमध्ये बसून पुन्हा पुन्हा काही दृष्ये बघत असतो व नंतर त्या मारेकर्याचा पाठलाग वगैरे.
एकच ठराविक घटना/ घटनाक्रम पुन्हा पुन्हा पण वेगळ्या अॅन्गलने दाखवायची तेही कुठेही कंटाळवाणी न होऊ देता आणि प्रत्येक वेळी रहस्य अजून उलगडून दाखवायचे ही कल्पना मला खूप आवडली.
कोणाला चित्रपट माहीत असल्यास कृपया नाव सांगावे. डिव्हीडी उपलब्ध असल्यास आणून पूर्ण चित्रपट पहायचा आहे.
छान चित्रपट
तो हा चित्रपट आहे,
तो हा चित्रपट आहे,
तो हा चित्रपट आहे,
तो हा चित्रपट आहे,
तो हा चित्रपट आहे,
http://en.wikipedia.org/wiki/Vantage_Point_(film)
मला आवडलेल्या चित्रपटा बद्द्ल लिहीन म्हणतो.
धन्यवाद
आभारी आहे. हाच तो चित्रपट
पॅटन विषयी
पॅटन हा अमेरिकन general होता. अतिशय मनस्वि, देशप्रेमी, आणि leading from Front म्हणतात तसा होता. तो Tank warfare मधला expert होता. त्यानी १९२० च्या आधी पासुन सैन्यात काम केले होते. पॅटन बद्दल च्या काही खास गोष्टी.
- पॅटन दुसर्या महायुद्धा पूर्वी Pearl Harbour ला होता. त्यानी त्या बेटाचे महत्व ओळखले होते आणि जपान कडुन तिथे हल्ला होऊ शकतो असे पण सरकार ला कळवले होते.
- पॅटन नी पश्चिमेकडुन जोरदार मुसंडी मारुन रशिया ला Berlin च्या अलिकडेच रोखले होते. पॅटन नसता तर सम्पुर्ण germany रुशिया च्या अधिपत्या खाली आल असता आणि cold war ची definition च बदलली असती.
- पॅटन नी साम्यवादी रुशिया चा धोका फार पुर्वीच ओळखला होता. त्याचे तर म्हणणे होते की 2nd world war संपल्या वर लगेच रशिया वर हल्ला करुन तिथला साम्यवाद नष्ट करावा. ( Churchill चे पण असेच मत होते )
चित्रपट अनुभवण्या विषयी
@ प्रियाली आणि प्रसाद लिमये -
तुमच्या अभिप्राया बद्दल धन्यवाद.
माझ्या मते चित्रपट ही एक अनुभवण्याची गोष्ट आहे. पॅटन मधे काय चांगल्या गोष्टी आहेत त्या मी bullet Points मधे लिहिल्या आहेत. गोष्ट लिहिण्याचे मी मुद्दाम टाळले आहे कारण तुम्ही हा चित्रपट पहावा अशी माझी मनापासुन अपेक्षा आहे.
दुसरे महायुद्ध
दुसर्या महायुद्धाशी संबंधित अनेक चित्रपट ६५-७० सालापर्यंत तयार करण्यात आलेले आहेत. माझ्यामते त्यांतील सर्वोत्तम चित्रपट १९६२चा The Longest Day हा होता. Judgement at Nuremberg हा जर्मन बाजू मांडणारा चित्रपटहि आठवतो, तो यूट्यूबवर आहे.
The Longest Day चे बोनस वैशिष्टय म्हणजे त्या वेळचे बहुतेक सर्व गाजलेले हॉलिवुड स्टार्स त्यात छोटयामोठया भूमिकांमधून दिसतात.