चुकवू नयेत असे चित्रपट - २ डॉ. झिवागो ( १९६५ )

आधिचा धागा - चुकवू नयेत असे चित्रपट - पॅटन ( १९७० ) : http://mr.upakram.org/node/3860

नोंद - हा लेख मी आधी दुसर्‍या एका संकेतस्थळावर पण टाकला आहे.

नमस्कार,

लेखनाचा धागा पुढे चालवतो आहे. चित्रपट बनवणे हि फार मोठी कला आहे. त्या मधे बाकी सर्व कला चा अन्तर्भाव होतो. जसे की साहित्य, संगीत, अभिनय, Imagination and skills required for production design and execution. ह्या सर्व बांधुन ठेवतो तो Director.

Good Movies should be watched few times to understand the intricacies of film making. माझा असा अनुभव आहे की उत्तम चित्रपट पहिल्या वेळेस बघताना अचंबित करतो, नंतर काहि दिवस सतत डोक्यात रहातो. पुन्हा पुन्हा बघितला की त्यामधिल आधि miss झालेल्या गोष्टी जाणवतात. हा जो चित्रपट तो सुद्धा कमीत कमी २-३ वेळेला तरी बघाच.
-----
Doctor Zhivago : -

हा सिनेमा १९६५ साली तयार केला आहे आणि बोरिस पास्तरनाक ( Boris Pasternak ) ह्या प्रसिद्ध लेखकाच्या ह्याच नावाच्या कादंबरी वर बेतला आहे. ह्या लेखकाला Nobel Prize जाहिर झाले होते.

ह्या चित्रपटाचे एका वाक्यात वर्णन म्हणजे "Passionate Movie about Passionate People in Passionate Times" ( Rotten Tomato ). Love Story in epic proportion with backdrop of Country in Civil War.

Backdrop of Civil war and end of a Culture ह्या दोन गोष्टी "Gone With the Wind" आणि ह्या चित्रपटात सारख्या आहेत.

थोडक्यात कथावस्तु - चित्रपट Russian Revolution च्या थोडा आधी चालु होउन काही वर्षा चा काळ दाखवतो. कहाणी एका पॅरीस हुन डॉक्टर होउन आलेल्या तरुणा ची आहे. केन्द्र्स्थानी ड्रॉ. युरि झिवगो, त्याची प्रेयसी /बायको Tanya, नंतर ची प्रेयसी "लारा" ही पात्र आहेत. त्यांच्या आजुबाजुला तितकिच महत्वाची "पाशा" ( Pavel Pavlovich ), विक्टोर ( Victor Komarovsky ), युरी चे वडिल अशी पात्र आहेत.

आवर्जुन काय बघावे -

- मानवी मनाचे अतिशय सुंदर चित्रण. प्रत्येक पात्र बघण्या सारखे आहे.
- भव्य Canvas - एखादे ४ फुटांचे चित्र आणि एखादे भव्य, मोठी भिन्त व्यापुन राहिल असे चित्र ह्या मधला जो फरक आहे तो हा चित्रपट बघताना जाणवत रहातो.
- Omar Sharif चा उत्तम अभिनय. Underplay केलाय खूप पण डोळ्या मधे जी आर्तता त्यानी दाखवली आहे त्याला तोड नाही.
- Production Values - रशिया चे सगळे वातावरण जसे च्या तसे उभे केले आहे आणि ते सुद्धा स्पेन मधे. माझी अशी request आहे की प्रत्येक सीन बघताना विचार करा कि हा सेट कसा उभा केला असेल? किती कष्ट पडले असतील?

थोड्या ऊणिवा -

- लांबी ३ तासा हुन जास्त आहे.
- शेवट जास्त रेंगाळतो.
- संवाद जास्त effective पाहिजे होते.

---------------

आपल्या अभिप्रायाची वाट बघतोय. पण हा सिनेमा नक्की बघा आणि मग कळवा.

लेखनविषय: दुवे:

Comments

कथावस्तु

कथावस्तु लिहिल्याशिवाय सिनेमाबद्दल वाचताना मजा येत नाही. थोडक्यात का होईना पण नक्की लिहा.

 
^ वर